#ट्यून_इन_विथ_मी..... .
.........ये राते ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा....
92.7 डॅझ्झल fm वर रात्री ची जुनी गाणी नेहमीच रंगतात. आंबा घाटातून एक आलिशान चार चाकी भरधाव वेगाने धावत होती. गाडीतून गाण्यांचा येणारा मोठा आवाज चालकाची धुंद अवस्था सांगत होता. घाट पण आज धुंदच होता. पावसाची रिपरिप सुरू होती. सारा घाट ओलाचिंब होऊन पाणी झेलत होता. सुरुवातीला जोराच्या वाऱ्यासोबत आलेला हा पाऊस आता किळस वाणा वाटत होतं. त्या आलिशान गाडीचे वायपर वर्षाबाणांना थोपवत चालकाला समोरचा रस्ता मोकळा करून दाखवत होते. कारच्या हेडलाईट प्रत्येक वळणाचा कानोसा घेत होत्या.
खर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र घाटातून अजून एक आवाज घुमला. "राते सुहानी बाते मस्तानी और आपके साथ है आपकी प्यारी होस्ट और दोस्त इनाया. मुझे पता हे आप मुझे सून रहे है. लेकीन क्या मै आपको सुन सकती हू ? जी हा आप बात कर सकते आपके इस प्यारी सी इनाया के साथ और किसे पता सूनने सुनाने को रात भी कम पड जाये.......
तो अभी उठाये अपना फोन और कॉल किजीए ********** पर. कही आपको वो ना मिल जाये जीसकी आपको तलाश है. And tune in with me मे हू आपकी प्यारी rj इना.... या"
कार मधील रेडिओ स्टेशन आपोआपच बद्दलले होते. पावसाच्या वातावरणात आणि ते ही घाटात असेच होते. सागर ला हे नवीन नव्हते. हो पण ही जॉकी त्याच्यासाठी नवीन होती. प्रवासात अशी जोरजोरात गाणी लावून गाडी पळवण्याचा छंद च लागला होता. रेडिओ वर बोलणाऱ्या मुलीचा आवाज जिभेवर मध ओघळल्या प्रमाणे कानावर पडत होता. तिच्या आवाजात एक वेगळीच नशा होती. तिला अजून ऐकावेसेच वाटत होते. घाटातील वातावरण ही आताशा बदलत होते. पावसाची रिपरिप एव्हाना थांबली होती. डोंगर कपारीतून येणारा गारवा त्याला बंद गाडीत ही जाणवत होता. सागरने विंडो मिरर उघडली. बाहेरचा वारा झोंबला त्याला आणि त्याच अंग आणि अंग शहारून गेलं. त्याने आपला फोन हातात घेऊन रेडिओ वर सांगितलेल्या नंबर दाबला. घाट लागल्या पासून फोन ला रेंज म्हणून नव्हती आता पूर्ण नेटवर्क मिळाल्या मुळे तो स्वतःच्याच नशिबावर खुश झाला.
बाहेरच्या वातावरणाने सुटकेचा श्वास सोडून बघ्याची भूमिका धरली होती आता. घाटातील जंगल आणि अंधार मित्रांसारखे एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून त्या घाटातील आपबीती बघणार होते आणि आजची रात्र संपल्याचा सुस्कारा सोडणार होते.
डोंगरावरची मोठमोठ्याली झाडे जोरजोरात हेंदकाळत होती. पावसाचे जमलेले ढग त्यांना परतवून लावायचे होते आता. अजून वर्षभर तरी पावसाचा हा किळस वाना तमाशा नको होता त्या घाटाला.घरट्यातील पक्षी पिल्लांना पंखाखाली दडवू पाहत होते. इतर वन्यजीवांनी आपापला आसरा शोधून मन घट्ट बांधून घेतलं होतं. घुबड नेहमी सारखं डोळे फाकवुन अघटिताची वाट पहात होते.
.
.
.
.
.धुम्म..धडाम्...धाड..धाड ..धाड....
मगाहून घाटाचे काळीज चिरत वेगाने धावणारी गाडी घाटाचा कडेलोट करत डोंगर दरी मध्ये शिरत चालली होती. घाटात तो आवाज एकदाच घुमला. घाटातील चराचराने तो आवाज सामावून घेतला आणि जीव भांड्यात पडल्या प्रमाणे घाट ही पूर्ववत झाला. झाडा पालांनी पाऊस पाणी झटकून टाकलं. पावसाळी ढगाने परतीची भाषा करत निरोप घेतला. उंच झाडावर बसलेल्या घुबडाने डोळे लुकलूकवत मान झाडली आणि निशाचराला उडून गेले. पक्षांनी पदरा खालची पिल्ले मोकळी करून सोडून दिली. पुढच्या वेळी या सगळ्याचा सामना करण्याचे बळ या पिल्लांना येईल ही खात्री होती त्यांना. एकंदरीतच सगळे सगळे आधीसारखे झाले होते. पावसाने चिंब केलेला रस्ता ही उजडे पर्यंत पूर्ववत होणारच होता.
आणि डोंगराच्या रांगाच रांगा संपतात तिथे एक छोटी नदी वाहत होती. ज्या कठड्याला शिवून नदी जात होती त्या उंच कठड्यावर ती पाय खाली मोकळे सोडून बसली होती. 19 वर्षाची ती प्रकाशात न्हाऊन निघत होती. हात मागे टेकवून ती चंद्राकडे बघत होती. तिच्या चेहऱ्यावर एक शांती होती. ओठांच्या कडा पसरवून ती मंद मंद स्मित करत होती. पावसाळी ढग जाऊन हा चंद्र तिच्याच साठी आलाय हे माहीत होतं तिला. जवळच त्या आलिशान गाडीतील फोन होता. त्यावर तिने म्हणजे इनायाने गाणं लावलं……ये राते ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा....
19 वर्षाची इनाया चित्रपटांसाठी आवाज द्यायची. तिचा आवाज रेशीम सारखा मुलायम होता. ऐकणार्याला ऐकतच रहावे अस वाटे. रेडिओ वरही तिचे मुलाखतकार म्हणून कार्यक्रम असत. अशाच एका कार्यक्रमाला ती या घाटातून प्रवास करत होती. एका वळणावर एका कारचा अपघात झाला होता. गाडी बाजूला होती आणि दोघे खाली तडफडत पडले होते. इनायाने गाडी थांबवून विचारपूस करायचे ठरवले. स्वतःची गाडी पार्क करून ती रस्त्यावर पडलेल्या दोघांजवळ चौकशी साठी गेली. तेवढ्यात मागून दोघांनी तिच्यावर हल्ला केला. तिचा चेहरा जॅकेट ने झाकण्याचा प्रयत्न होऊ लागला. त्या घाटात तिच्या किंचाळण्याचे आवाज दुमदुमले. घाट निश्चल होऊन हे सारे स्वतःत सामावून घेत होता. या सगळ्यात आपण काहीच करू शकत नाही याची हवा त्या घाटालाही बोचत होती. डोंगर-दरी मधून, झाडा-सावलीमधून , राना-वनातून चार मुलांच्या राक्षसी हसण्याचा आणि एका कोवळ्या जिवाच्या आर्त किंकाळीचा आवाज घुमत होता. ती रडत होती. ओरडत होती. हाका मारत होती. सोडून देण्याची भीक मागत होती. तिचा लोभवणारा आवाज आर्जव करणाऱ्या किंचाळीत आला होता. ओरडून ओरडून तिचा गळा फाटला होता आणि....आणि त्यामध्ये बाजूचा पालापाचोळा कोंबून त्या निर्दयांनी तिचा आवाज दाबला होता. अत्याचाराची परिसीमा गाठली होती. तिचे निश्चल शरीर आकाशाला ही रडवत होते. पावसाने जनावरा सारखी पिसाळलेली हैवानं आता थांबली होतीत. त्या नराधमांनी इनाया ला उचलून तिच्याच कार मध्ये बसवले आणि दरीत ढकलून दिले.
इनाया तेव्हा जिवंत होती. संथ पणे जवळ येणाऱ्या दरी कडे पाहत होती. दरी ही आसुसली होती या पीडित कोवळ्या जीवाला कुशीत घेऊन वेदनामुक्त करण्यासाठी.
वरती घाट ही याच क्षणात अजून थांबला होता. पावसाने घडलेले सारे क्रूर कांड धुवून टाकले होते. पण त्या धरित्री ने एक एक अत्याचार लक्षात ठेवला होता. ठेवला आहे. आजही हा घाट त्या घटनेची साक्ष देतो. आणि आजही स्वतःचे नाकर्ते पण प्रत्येक मृत्यू वेळी दाखवतो.
तिचीच वेळ.... तिचीच जागा.....वेळही तिचीच....शिकार ही तीच निवडते आणि हा घाट तिच्या सोबत tune in असतो.
पूर्णपणे काल्पनिक.