मला आलेला एक थरारक अनुभव:
कॉलेज संपवून जॉबच्या शोधार्थ बाहेर पडलो. शोधाशोध केल्यानंतर अखेरीस दोन तीन महीन्याने गोव्याला जॉब मिळाला. सगळे सामान घेऊन गोव्याला (मडगांव) आलो. कंपनीतील ओळखीने शहराच्या मद्यवर्ती ठिकाणी एका अपार्टमेंट मध्ये रूम मिळाली. गोव्यातील अपार्टमेंट सहसा सुनसानच असतात. दिवसा देखील तुम्हाला बिल्डींग मध्ये जास्तीत जास्त एक नाहीतर दोन माणसे दिसतील. मी जॉब करत असलेली कंपनी फार्मा कंपनी असल्याने तिथे दोन शिफ्ट मध्ये काम चालत असे. त्यातील फर्स्ट शिफ्ट म्हणजे सकाळी 8 ते संध्याकाळी 4, दुपारी 4 ते रात्री 12 सेकेंड शिफ्ट.
मी नवीनच जॉईन झालो होतो म्हणून मला पहिले दोन आठवडे फर्स्ट शिफ्ट दिली. नंतर सेकंड शिफ्ट आल्यावर माझी जाम तंतरली. एक तर मी कुत्र्यांना जाम घाबरतो आणि दूसरे म्हणजे रात्री बारा वाजता एकटा मला बस स्टॉप वरून रूम पर्यंत चालत यायचे होते तशी न्यायला सोडायला कंपनी ची गाडी असते त्याची काही काळजी नसायची.
माझ्या अपार्टमेंट पासून बस स्टॉपचे अंतर जेमतेम पाच मिनिटांचे आहे,पण या पाच मिनीटांच्या अंतरामध्ये मला २५-३० कुत्र्यांचा सामना करायला लागत होता. गोवा सरकारला माझी कळकळीची विनंती आहे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. असो त्याच्यावर एक स्वतंत्र लेख होईल एवढे अनुभव आहेत .तर त्या झेड प्लस सेक्युरीटी मधून जीव मुठीत घेऊन निसटण्याच्या नादात कधी आपण एकटे आहोत कींवा भुतांची खेतांची भिती अशी कधी वाटलीच नाही.
पहिल्या तीन दिवसानंतर कुत्री ओळखायला लागली त्याबद्दल कुत्र्यांना मनापासुन धन्यवाद त्यामुळं माझ एक मोठं टेंशन गेलं. आणि त्याचा तोटा असा झाला की रात्री मी एकटाच असतो आणि भूत वैगेरे पण असतात याची जाणीव होऊ लागली. मग एकापाठोपाठ एक हॉरर सीन पाहिलेत कींवा जेवढ्या भयकथा मायबोलीवर वाचल्यात ते सगळ आठवू लागले.
पण पुढचे दोन दिवस शांततेत गेल्यानंतर,असाच एका रात्री मी अशीच सेकंड शिफ्ट सम्पवून रूमवर परतत असताना. जेव्हा मी आमच्या अपार्टमेंट च्या गेट मध्ये प्रवेश केला तेव्हा असे जाणवले की सगळी कुत्री आमच्याच बिल्डींगच्या दिशेने पाहून भुंकताहेत. मला थोडं विचीत्र वाटले पण त्यापेक्षा कुत्र्यांची भिती जास्त वाटली. पण आश्चर्यकारक त्यांनी माझ्याकडे पहिले आणि रडू लागले.आता मात्र मला फारच भेसुर आणि भयाण वाटू लागले. आपल्याकडे कुत्र्यांचे रडणे याचा अर्थ एकच काढला जातो आजुबाजुला कुठे तरी भूत आहे. आता खूपच भयाण आणि विचीत्र वातावरण निर्माण झाले होते. बिल्डींगच्या कोपऱ्यात एक छोटसं चर्च होते त्याच्या लाइटीन्ग च्या माळा अजूनही चमकत होत्या तेवढाच धीर वाटला. मी त्या क्रॉस कडे पाहिले आणि चालू लागलो.
बिल्डिंग ला एक छोटं लोखंडी गेट होते. ते नेहमीच एकतर बाहेरुन कींवा आतून लावलेले असते पण आज ते सताड उघडं होते. गेट मधून आत शिरले की उजव्या हाताला पायऱ्या तर समोरच्या बाजूला १५-२०पावलांवर लिफ्ट होती. बिल्डिंग मध्ये सगळीकडे ट्युबलाइट लावल्या असल्याने तसा अंधार वैगेरे काहीच न्हवता पण एवढी शांतता होती की पूर्ण बिल्डिंग मध्ये मी एकटाच आहे असे वाटत होते. तसेही रात्रीचे एक वाजता कोण जागे असणार आहे म्हणा. जिन्याने जाताना प्रत्येक फ्लोर वर समोर काचा होत्या त्या आरश्या सारख्याच होत्या आणि मी हॉरर मूव्ही मध्ये पाहील्याप्रमाणे आरश्यात कोणीतरी मागे उभे राहिलेले दिसेल या भितीने मी जीन्याने जायचा नाद सोडलाआणि लिफ्ट ने जायच ठरवलं
लिफ्ट तशी छोटीच होती आणि जुनी पण वर्किंग कन्डीशन मधे होती. लिफ्टचा जसा दरवाजा उघडला तसा त्याचा मोठा आवाज त्या कुत्र्यांच्या रडन्यात मिसळला. लिफ्ट मध्ये शिरल्यावर असे वाटले की आत कोणीतरी आधीपासूनच आहे. श्वासांचे आवाज कींवा वातावरणात बदल जाणवत होता. मी चौथ्या फ्लोर चे बटण दाबले आणि वरती बघू लागलो लिफ्ट चालू झाली कुत्र्यांचे रडणे आत्ता थांबले होते. पहिला फ्लोर झाला दुसरा झाला तिसऱ्या फ्लोर ला लिफ्ट अचानक थांबली मला आता जाम भिती वाटू लागली लिफ्ट बंद पड़ते की काय पण लिफ्टचा दरवाजा आपोआपच उघडला जसे काही कोणीतरी तिसऱ्या फ्लोरवर कोणीतरी थाम्बनार होते. लगेच दरवाजा बंद झाला आणि लिफ्ट चालू झाली. तिसऱ्या मजल्यावरुन जायला लिफ्टला साधारणपणे 1-2 मिनिटं लागतात.पण लिफ्ट चालू होऊन पाच मिनीट झाले तरी अजून चौथा मजला आला नाही आता मात्र मला कळाले की हा काहितरी वेगळाच प्रकार आहे. मी दरवाज्यात असणाऱ्या छोट्याश्या फटीतून बाहेर पाहण्याचा प्रयत्न केला आणि मला धक्काच बसला. जे फ्लोर येऊन जात होते ते आमच्या बिल्डींग चे न्हवतेच. आणि प्रत्येक प्लोर वर खूप माणसं दिसत होती. आता मात्र भितीने मला दरदरून घाम सुटला असे कित्येक फ्लोर येऊन गेले आता प्रत्येक फ्लोर वरची माणसे लिफ्ट कडे झेपावत असल्यासारखे वाटू लागले. हळूहळू सर्वत्र अंधार दाटून आला, मला काहीच दीसेनासे झाले. फक्त लिफ्ट चा आवाज आणि अवर्णनीय अशी दुर्गंध इतकी की श्वास घेण्यासाठी धडपड करावी लागत होती. शेवटी कितीतरी वेळाने मी बेशुद्ध झालो. जाग आली तेव्हा एक वयस्कर माणूस मला हलवून उठवत होता.मी त्याला धक्का देऊन बाजूला सारत तरी त्यांनी मला सोडले नाही. ते काका जोगीँग ला जात होते त्यांनी मला लिफ्ट च्या दारात पडलेले पाहिले आणि मला मदत करायला आले होते. नंतर मला तिथल्या लोकांनी सांगीतले की लिफ्ट संध्याकाळीच बंद पडली होती. पण बहुतेक हॉरर मूवी सारख या लिफ्टचा इतिहास काही वाईट नव्हता पण मलाच कसा हा अनुभव आला माहिती नाही की हा माझा भास होता देव जाणे पण त्यादिवसापासून मी सेकंड शिफ्टला मित्राच्या रूमवर झोपतो आणि सकाळी उठून माझ्या रूमला येतो. कधीही एकटा असताना त्या लिफ्टचा वापर करत नाही.