कथा :- महरूम -भाग :- ९
#Horrorostory_tube_present
#©सर्व हक्क लेखकाकडे बांधील आहेत
सूचना :-
• कथेचे एकूण "10" भाग असतील.
• कथा रोज "संध्याकाळी 7" वाजता पोस्ट होईल.
• कथेत कुठल्याही धर्माचा अवमान झालेला नसेल.
कथेचा भाग - ८ ची लिंक खाली दिलेली आहे
शोफी ते सगळं पाहू लागला. ती दोन्ही मुलं विनिता कडे धावली आणि तिच्या अंगात नाहीशी झाली. . . . . . .मग
शोफी ला अंदाज लागून येत नव्हता. ती दोन मुले विनिता कडे का धावली आणि धावली असतील तर विनिता विक्षिप्त वागायला लागल्यावरच का धावली. आधीपासून तिथेच उभी होती ? त्याने ती गोष्ट मनात ठेऊन पुढील कार्य चालू ठेवले. मग हळूहळू त्याच्या एकेक गोष्ट लक्षात येऊ लागली. आदित्य ला जाऊन उठवून त्याला घेऊन शोफी पुन्हा त्या खड्ड्याजवळ गेला. त्यांनी मिळून तो खड्डा खणून काढायचा प्रयत्न चालू केला.
शोफी :- इसके नीचे ही काही तरी असणार !!
आदित्य सुध्दा ईरेला पेटला. दोघांनी मिळून खड्डा खणून काढला आणि आतमध्ये जे दिसले ते पाहून दोघांनाही धक्का बसला. दोघेच्या दोघे मागे उडवले गेले. त्यांनी पाहिले तर आत हाडांचे सापळा होता. इतका प्रचंड दुर्गंधीचा धुवा उडाला. दोघांनीही नाकाला हात लावले. मातीच्या खालून हाडांचा सापळा बाहेर येताच दोघे ही घामाघूम झाले. आदित्य तर वेडापिसा झाला. शोफी देखील दचकला. इतक्यात विनिता पुन्हा पिसाळली. ती उठली आणि धावत धावत येऊन ती खड्ड्यात उतरली आणि त्या हाडांवर झोपली. तो प्रकार बघून आदित्य आणि शोफी दोघेही गप्प झाले. आदित्य चे डोके चालेनासे झाले. बंद पडते आहे की काय असे झाले. शोफी सुध्दा सुन्न झाला. विनिता आत पडून त्या खड्ड्यात लोळायला लागली. चित्रविचित्र आवाज काढत , लहान मुलांसारखी त्यात खेळू लागली. इतकं भीषण आणि भेसूर चित्र डोळ्यांना पाहवत नव्हत. आदित्य ने तिला वर खेचले आणि वर तिला बसवून शोफी ने तिच्या डोक्यावर हात ठेवला. बघता बघता तीची तडफड शांत होऊ लागली. ती प्रचंड घायाळ झाली होती. आदित्य ने तिला बाजूला बसवली आणि तो शोफी जवळ गेला. शोफी ने मनात काहीतरी विचार केला आणि तो त्या दगडू देवासमोर येऊन बसला आणि त्याने हातात एक बारीक काठी घेतली. .. .
आदित्य दुरून ते पाहू लागला. शोफी ने काठीने स्वतः भोवती एक रिंगण आखले. त्या रिंगणात तो स्वतः बसला. त्याने गळ्यातील दगडंची माळ उतरवून त्या रिंगणात स्वतः च्या बाजूला ठेवली. त्या दगडी देवाचा प्रकाश प्रज्वलित झाला. त्याने हाताने आदित्यला विनिता ला घेऊन ये असे खुणावले. तसा आदित्य विनिता ला घेऊन त्यासमोर बसला. शोफी ने विनीता ला रिंगणात ओढले. विनिता विव्हळू लागली, केस मोकळे सोडून कन्हायला लागली, डोळे लालसर झाले होते, हात पाय कडक झाले होते, नाकातून रक्त येत होतं. अर्थात काही झालं तरी हे पंचमहाभूतांचे शरीर त्या अमानवी, शक्ती सहन करू शकत नाहीत हे , सत्य आहे. विनिता घायाळ झाली होती. शोफी ने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि तो काही तोंडाने पुटपुट करू लागला. हळूहळू वातावरण गंभीर झाले. रात्रीचे 12 चा भर वाढला. थंडी वाढू लागली. सैतान आपले विक्राळ रूप धारण करून आपल अस्तित्व दाखवू पाहत होता. विनिता शोफी समोर बसली होती. आदित्य रिंगणाच्या बाहेर उभा होता. शोफी ने विनिता च्या डोक्यावर हात ठेवला होता. त्याने उजव्या हातात दगडांची माळ धरली होती आणि डावा हात डोक्यावर ठेवला होता. काही क्षणांनी त्याने ती दगडांची माळ तिच्या डोक्याला स्पर्श केली. विनिता विव्हळली. ती रिंगणाच्या बाहेर जाण्याचा अट्टाहास करू लागली परंतु शोफी ने गच्च धरून ठेवले होते. शोफी तिला धरून जाणवू पाहत होता की, नेमका तिच्या आतमध्ये असणारा आत्मा किंवा शक्ती कोणती आहे ? त्यामुळे त्याने तिला घट्ट धरले होते आणि डोळे बंद करून तो काही पुटपुटत होता. थोड्यावेळाने शांतता पसरली. रातकिड्यांची किर किर वाढीस लागली. तशी हळूहळू विनिता झटापटी करू लागली. शोफी ने मात्र जबरदस्त आवळून तील धरले होते. आदित्य देखील विनिता ची ती परिस्थिती पाहून कन्हत होता. त्याच जीव खाली वर होत होता. थोड्यावेळाने शोफी अचानक त्या साधनेतून बाहेर आला. डोळे उघडले. त्याच्या डोळ्यातून पाणी येत होते. त्याने आदित्य कडे पाहिले आणि विनिता कडे पाहून म्हणाला. .
शोफी :- ये तो विनिता च्या वडिलांची आत्मा आहे !!
आदित्य एखाद्या झटका लागलेल्या विजेच्या दिव्यासारखा उडाला. प्रचंड कळ त्याच्या हृदयात उठली. ज्या वडिलांनी तिला कधी अंगा खांद्यावर खेळवले सुध्दा नाही , ते वडील आता तिच्या अंगात येण्याचे कारण काय ? या अर्धवट विचाराने तो ग्रासून गेला.
आदित्य :- अरे मग त्यांना काढून टाक ना तिच्यातून ?
शोफी :- कुछ तो गडबड हो रही हैं. त्यांच्या वडिलांची शक्ती खूप वेगळी आहे.माझ्या शक्तीला पुरेपूर दाद देत आहे. त्यांना काही त्रास नही हो रहा है.
आदित्य :- अस कस, तुमची शक्ती वापरा ना ?
शोफी :- देखता हुं !!.
असं म्हणून शोफी ने डोळे बंद केले आणि पुन्हा मंत्र म्हणू लागला. त्याने बाजूला असलेल्या दगडांच्या माळेतील एक दगड काढला आणि तो हातात धरून विनिता च्या म्हणजेच तिच्या वडिलांच्या डोक्यावर ठेवायला जाणार इतक्यात समोर असणारा तो दगडांचा देव पिसळला. सारा पालापाचोळा उधळून लावला. झाडांच्या फांद्या कोलमडू लागल्या. मातीचे धुळीचे लोट उठू लागले. रिंगण जे आखलेले होते त्या रिंगणातून शोफी बाहेर आला आणि विनिता त्या रिंगणातच होती. शोफी त्या दगडासमोर जाऊन हात जोडून उभा राहिला आणि काहीतरी बोलत राहिला. शोफी ला कळेना काय झाले , कारण त्याने त्या वडिलांच्या विषयात हात घातला तसा दगडाच्या देवाचा त्रास सुरू झाला. त्याचा कोप सुरू झाला. कळेना काय करावे ? असे का झाले ? खूप प्रयास केला शोफी ने पोहोचायचा पण काहीतरी गडबड होत होती ती फक्त शोफीलाच समजत होती. शेवटी काही उपाय म्हणून शोफी ने त्या त्याच्या देवासमोर लोटांगण घातले. मनापासून शरण गेला. तसा पाठून विनिता म्हणजेच वडिलांनी आवाज दिला तसा शोफी आणि आदित्य विनिता कडे बघायला लागले. विनिता दातओठ खात तीक्ष्ण , भेदरट नजरेने शोफी कडे बघत म्हणू लागली. .
विनिता ( वडील ) :- ऐ शोफी , बस कर आता हे सगळं. मला जागं करायचं काही कारण नव्हतं.
शोफी :- मी तुला जाग केलेलं नाही, तुम्हारी लडकी के लिये हे करावं लागतंय.
विनिता :- बस कर , बस कर ( जोरात किंकाळी फोडली )
शोफी :- क्यू उसके पीछे लगे हो, सोडून द्या तिला ?
विनिता :- मला राग आलाय आता !
आदित्य :- शोफी , तू तुझी शक्ती वापरून ह्यांना काढून टाक कायमच !
विनिता जोरजोरात हसायला लागली. आदित्य कडे बघत तिने आपला डावा हात पुढे केला , तसा आदित्य भयंकर वेदनेने कळवळत मागे असलेल्या झाडाला आपटून पडला. शोफी ने आपला मोर्चा देवासमोर वळवला परंतु त्याला देवाकडून परवानगी हवी होती ती मिळत नव्हती. तो हैराण झाला होता , वैतागून गेला होता. काय एवढं मोठं कारण आहे जो देव त्याला परवानगी देत नव्हता ? हेच त्याला कळेनासे झाले होते. शेवटी त्याला आपला नेम त्या दोन लहान मुलांकडे वळवावा लागला. त्याने निर्धार केला, पहील त्या मुलांना घालवावे लागेल मग वडिलांचा समाचार घेऊ म्हणून त्याने त्या दोन मुलांना समोर येण्याची आज्ञा दिली. शेवटी देवाचा माणूस. दोन्ही मुलं जशीच्या तशी समोर हजर झाली. हजर होताच शोफी ने आपले दोन्ही हात देवाकडे पसरवून आणि मान वर करून आरोळी ठोकली.
शोफी :- कसम खुदा , अल्लाह की, इस्माल ए नुर , बंदा हुं. करम मस्जिद ए पाक मददगार हो.
देवाssssss.... साता दिशेचे मार्ग जोड , असशील तिथून धाव जोड , वचन - उल् - फकीर - ए - इस्लाम , रख तू सबका - मुहजिद्दी. हाजिर कर. . . . !!
दोन्ही मुलं विव्हळू लागली. देवाची साता दिशेची शक्ती एकवटली आणि त्या दोन मुलांच्या आत्म्यांना बंदी केलं. जगाच्या जागी जखडून बसली ती. शोफी पुढे सरकला. त्याने हातातील दगडांची माळ पुन्हा काढली आणि त्यातील एक दगड उजव्या हातात घेतला. तो मंत्रुन त्या मुलांच्या दिशेने फेकला. झाली वेळ जवळ आली होती. तीनही आत्मे आता नष्ट होणार होतें. ती दोन मुलं आणि विनिता च्या अंगात असणारी वडिलांची आत्मा. विनिता देखील त्या रिंगणात राहून चवताळली होती. आदळआपट करीत होती. माती उधळून लावीत होती. दोन्ही हाताने त्या रिंगणात जमिनीवर हात जोरजोरात आपटत होती. आदित्य बाजूला झाडाखाली पडला होता. त्याच्या कंबरेत मार बसला होता. रात्र चढत गेली 1 चा मध्यरात्रीचा सुमार झाला. चाललेलं ते युद्ध चांगलच पेटल होतं. मंत्रून जो दगड दोन मुलांवर फेकला होता ,तो त्यांच्यापर्यंत पोहोचायच्या आधीच विनिता धावली आणि त्या मुलांच्या मधे आली. बघता बघता तो दगड विनिता ला लागला. मुले क्षणभरात गायब झाली. शोफी प्रचंड चिडला पण चिडून निर्णय घेण्याची ती वेळ नव्हती. तो पुन्हा वैचारिक दृष्टीने पाहू लागला, तेव्हा त्याला जाणवले की आधी वडिलांची आत्मा संपवली पाहिजे तरच मुलांशी संपर्क करता येईल. नाहीतर मुलांच्या मध्ये वडील येतच राहणार.. . !!
प्रचंड विस्फारलेल्या डोळ्यांनी विनिता ने शोफी कडे द्वेषाने पाहिले आणि ती शोफी च्या अंगावर धावून आली. तिने त्याची मन दाबली. तसा पाठून आदित्य पुढे आला त्याने विनिता ला सोडवायचा प्रयत्न केला. विनिता ची ताकद प्रचंड वाढलेली होती. आदित्यचा निभाव लागत नव्हता. शोफी ने शेवटी पुन्हा तिला रिंगणात बसवले आणि वरून डोक्यावर पुन्हा हात ठेऊन मंत्र म्हणून तिला शांत केले. आदित्य ला सावरून दोघेही बाजूला जाऊन विचारविनिमय करू लागले.
शोफी :- हमे, वडिलांची आत्मा म्हणजेच तो हाडांचा सापळा जाळावा लागेल.
आदित्य :- मग काय करूयात , त्यासाठी रॉकेल लागेल.
शोफी :- घरात आहे, तुम्हाला जाऊन आणावं लागेल. मी थांबतो इथे विनिता कडे.
झालं आदित्य पळत पळत घराकडे निघाला. तोपर्यंत शोफी विनिता जवळ थांबला. विनिता खूपच घायाळ झाली होती. आजपर्यंत इतका भयानक अनुभव कधीच शोफी ने घेतला नव्हता. शेवटी त्याचा देव सुध्दा एक सात्विक नाही तर तामसी प्रकारचा दगड होता. त्या जंगलात त्याच अधिराज्य चालत म्हणून तिकडचा देव. त्याची ही काही तत्व होती, नियम होते. शोफी त्याच्या मदतीने ते सगळं प्रकरण हाताळत होता. त्याची शक्ती आणि त्याच्या वडिलांची शक्ती तिथे जुळून आली होती. एकदम कडक शांतता पसरली होती. विनिता च्या अंगात असणाऱ्या वडिलांनी वेगळं रूप धारण केलं होतं. इतक्यात काही वेळात आदित्य रॉकेल ची बॉटल घेऊन आला. विनिता पिसळली. शेवटी वडिलांना स्वतः च्या हाडांना दिलेला अग्नी मान्य नव्हता. ते पिसळले. "आपल्या हातात कमी वेळ आहे" अस शोफी ने सांगितले तसे आदित्य ने बॉटल संपूर्ण त्या खडय्यात रिकामी केली. वरून त्याने माचिस पेटवली. माचिस ची काडी घेऊन ती त्याने त्या खड्यात टाकली तसा पेट घेतला. अग्नी देवांनी आपले वर्चस्व त्या खड्यातील जागेत पसरवले. बघता बघता आगीचा झोत वाढला. मोठमोठ्या ज्वाळा त्यातून उफाळून बाहेर पडू लागल्या. तिकडे विनिता जोरजोरात किंकाळी फोडू लागली. हातपाय झाडू लागली. जणू काही तिच्या अंगात आग पेटली असावी. थरथर होणाऱ्या अंगाने ती उठली आणि रात्रीच्या आकाशाकडे मान वळवून तिने एक मोठा टाहो फोडला आणि बघता बघता हळूहळू विव्हळत ती संपूर्ण मोकळी होऊन खाली पडली. . . . .मुलांची आत्मा कदाचित मघाशी गायब झाली असावी असा, निष्कर्ष लावून तिघेही मोकळे झाले.
आदित्य ने तिला सावरले. शोफी देखील मोकळा होऊन एका झाडाखाली बसला. वडिलांकडून सुटका झाली होती. विनिता मोकळी झाली होती. घायाळ झालेल्या हरिणी सारखी ती आदित्य च्या कुशीत पडली होती. आदित्यच्या डोळ्यातील पाण्याने तिच्या दुःखाला मलम मिळत होते. झालेली तीची दशा पाहून शोफी देखील आ वासून बघत होता. त्या मुलांपासून देखील आपोआप सुटका मिळाली ह्या आनंदाने ते तिघेही घराकडे जायला निघाले. तिघेही प्रचंड दामले होते. वाताहात झाली, पण आता सुटका झाली होती. शोफी च्या पराक्रमाचे गोडवे गात आदित्य विनिता ला सावरत चालला होता. जळणारा खड्डा तसाच भगभगत ठेवत ,आगीचे लोट जंगलातल्या गगनाला भिडते ठेवत तिघे ही मार्गस्त झाले. वडिलांना अग्नी मिळाला हा आनंद होता. मुलांना मोक्ष. रात्रीचे 2 वाजले होते. रात्र रंगात चालली होती. मोठे युद्ध झाल्यानंतर विजयाची मिळालेली पोचपावती स्मरणात राहणारी झाली. तिघेही घराकडे परतले आणि घराच्या बाहेर उंबर्यावर बसले. शोफी आत पाणी आणण्यासाठी गेला. तोपर्यंत आदित्य बाहेर विनिता जवळ थांबला. विनिता च्या जखमा चिघळू लागल्या होत्या. त्या साफ करता करता तो उठला घरात जाऊन औषधाचा बॉक्स आणण्यासाठी त्याने आपले पाऊल वरच्या पायरीवर ठेवले आणि एका झटक्यात त्याला मागे खेचले गेले. इतक्या प्रचंड वेगाने आदित्य ला फरफटत घेऊन ओढून ताणून , जमिनीवर घसटत खेचले गेले. विनिता ओरडली तसा शोफी बाहेर आला. शोफी ते पाहून अवाक् झाला. . . .
त्यासमोर प्रश्न हा होता की, आता सगळे संपले होते आता ही कसली नवीन सूरवात. . . . .आणि ह्याचा समाप्त कसा असेल. . . .!!
उद्याचा "महाअंतिम भाग - १०" वाचायला विसरू नका
• या भयकथा व्यतिरिक्त माझ्या आणखीन कथा वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा