कथा :- महरूम -महाअंतिम भाग :- १०
लेखक :- चेतन साळकरHorrorostory_tube_present
©सर्व हक्क लेखकाकडे बांधील आहेत
कथेचा भाग - ९ ची लिंक खाली दिलेली आहे
https://marathighoststories.blogspot.com/2020/12/blog-post_69.html
त्यासमोर प्रश्न हा होता की, आता सगळे संपले होते आता ही कसली नवीन सूरवात. . . . .आणि ह्याचा समाप्त कसा असेल. . . .!!
विनिता का एकतर उठता सुध्दा येत नव्हते आणि हा आणि प्रकार घडल्यामुळे ती खचून गेली. तिला काही झाले तरी चालेल पण, आदित्य ला जरा काही झालं तर जीव कासावीस होणारी ती. इतक्या प्रचंड वेगाने आदित्य फरफटत जंगलात लुप्त झाला की डोळ्यांची पापणी लवण्याआधी तो प्रसंग सुरू होऊन संपला सुध्दा. शोफी तर अर्धमेला झाला होता. इतक्या वेळ अर्धी रात्र त्या प्रचंड शक्तींसमोर लढून आता परत पुन्हा त्याच जबड्यात हात घालायचा तरी कसा. शेवटी कारण भाग होतो. विनिता पडली स्त्री आणि त्यात त्या शक्तींशी लढायची ताकद त्याच्याकडेच होती म्हटल्यावर अस अर्धवट सोडून चालणार नव्हतं. झाले दोघे पुन्हा जंगलाकडे निघाले. विनिता ला सांभाळत शोफी प्रस्थान करीत होता. जराही कसली हालचाल नाही किंवा कसली चाहूल नाही. कुठे गायब झाला असावा आदित्य. ह्या विचाराने शोफी घाबरला आणि विनिता तर संपल्यात जमा होती. रडून रडून धाय मोकलून स्वतःला वाटणारे दुःख बाहेर काढत होती. शोफी पुरुष ! रडू तर शकत नव्हता. लढण हा स्थायीभाव पुरूषाचा. शोफी देखील पेटला. ही कोण शक्ती असेल तिच्याशी दोन हात करायचेच ,मग माझ्या शक्तीची शर्थ लगळींतरी चालेल. असं प्रण त्याने केला आणि त्या प्रसंगावर तुटून पडला. . . . त्यासमोर प्रश्न होते , त्या दोन मुलांची आत्मा सुध्दा नाहीशी झाली होती , वडिलांना देखील अग्नी दिला होता. ते ही मुक्त झाले होते. मग ही नवीन शक्ती कोण ? कुठून आली ? कोण असेल ?
रात्र चढत चालली होती. गंभीर वातावरण खायला उठले होते. खोल जंगलात चाललेला तो सैतानी आणि मनुष्याच्या सत्वाचा खेळ गंभीर झाला होता. अश्या खेळात सत्य सिद्ध होणं थोड कठीण असतं पण म्हणून होतच नाही असे नाही ,त्याची किंमत मोजावी लागते. दोघे चालता चालता पोहोचले पुन्हा त्या जागेवर. खड्यातिल आग तशीच भगभग करीत होती. एक पर्व संपलं होतं. मुक्त झाल होतं. दुसऱ्या पर्वाची ती सुरवात होती. तिथलं वातावरण आहे तसचं शांत ,गंभीर रहस्यमयी होतं. शोफी तिथे पोहोचला. विनिता ला एका झाडाखाली बसायला लावून शोफी पुढे सरकला. त्याने त्याच्या देवाकडे हात जोडले. देवाकडून कुठलाही कौल किंवा संमती दिसली नाही. शोफी त्याच एका पेचात पडला होता. मागच्या कितीतरी तासांपासून तो देवाकडे मागणे मागत होता पण काही केल्या देव काहीच सांगत नव्हता. शोफी ने शेवटी स्वतः काहीतरी पावले उचलण्याचा निर्णय घेतला. त्याने स्वतः ते मिटवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याला होम करणं भाग होतं. त्याने करायचे ठरवले. धावत तो घरात गेला आणि सगळं समान घेऊन आला. प्रारंभ केला शेवटाला. .. .होमाला. . . ."पिशाचमोक्ष"
त्याने लाकडांच्या काटक्या गोळा केल्या. एकावर एक रचून रॉकेल टाकून अग्नी प्रज्वलित केला. त्या शेकोटिभोवती गोल रिंगण आखले. त्या रिंगणाच्या रेषेवर एक वित अंतर सोडून दगड मांडले. नक्षीदार दगड ठेवले गेले. हळूहळू सर्व दगड रचून संपूर्ण रिंगण तयार झाले. शोफी स्वतः अग्निसमोर बसला. विनिता झाडाखाली बसून सार बघत होती. शोफी ने एका भांड्यातून सहा काळे बिब्बे बाहेर काढले. ते अग्निभोवती समान अंतरावर ठेवले. त्याने उजव्या बाजूला असलेल्या पिशवीतून धारधार सुरा बाहेर काढला आणि बाजूला ठेवला. लागलीच पिशवीत हात घालून धोतरा झाडाचे मूळ काढले आणि पुढ्यात ठेवले. पिशवी बाजूला ठेवली. झाला होमा ला प्रारंभ केला. तो मंत्र म्हणू लागला. . .
शोफी :- "फटsss स्वहा , दीन दिनाही चार दिशाही , मल्लल्ल , जिर्क अल्ला सुजान पिशाचीनी मोक्षार्थ, रब ने उल दुरुस्त उक फन फन अर्मभू शाहुः"
त्याने एवढे बोलून आपला डावा हात पुढे केला आणि उजव्या हातात धारधार सुरा घेतला. डाव्या हाताची तर्जनी पुढे केली आणि सुरा त्यावर धरून चर्रsssकन फिरवला. रक्ताची गरम चिळकांडी उडाली. तिथल्या जमिनीवर पडली. शहारली जमीन. गरम रक्तच्या धारेचा स्पर्श रहस्य उलगडू पाहत होता. ती रक्ताची धर तर्जनी सकट त्याने अग्निवर धरली. एकेक ओघळणारे रक्ताचे थेंब चर्र चर्र आवाज करीत अग्नीत भस्म होऊ लागले. लाकडांच्या होणाऱ्या स्पर्शाने रक्त गडद होऊन अग्नीत समाविष्ट होऊ लागले. पुन्हा झाडे हलायला लागली. ज्याने कोणी हे सगळं घडवून आणले तो सैतान आता आपला रूप दाखवायला सज्ज झाला. शोफी का देखील बघायचे होते त्या मागे कोण आहे ते. मुलं आणि वडील तर संपले होते मग कोण आहे. ह्याचं प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी त्याने तो होम केला होता. नंतर त्याने लगेच धोतरा हातात घेतला. त्याला काळा धागा गुंडाळला. त्या काळ्या धाग्याचे अकरा फेरे त्या मुळा भोवती बांधले. ते धोतऱ्या चे मुळ त्याने अग्नीसमोर खाली जमिनीवर ठेवले. त्यावर अबीर भरून टाकले आणि त्या मुळाला भारून टाकून ते मुळ खाली जमिनीवर धरून मंत्र म्हणाला. . . .
शोफी :- "ह्रीं क्रिं ह्रं ह्रां , पिशाचे पिशाचे , सर्वसुखे दुखे भवांतू , अज्ञाच्य प्रथाने प्रस्थान येणी, घ्यारी घ्यारू, देवानं देवानं स्वा"
बघता बघता समोर असलेल्या रिंगणात एक आकृती आकार घेऊ लागली. पांढरट आकृती मुळ स्वरूपात येऊ लागली. पाहता पाहता त्या कृतीने रूप घेतले आणि शोफी ची नाराजी झाली कारण ती आत्मा त्या दोन मुलांची होती. पुन्हा तेच. ह्यांची समाप्ती मघाशी झाली होती मग पुन्हा हे इथे कसे ? तेव्हा मात्र शोफी ने एक गोष्ट पहिली ती म्हणजे ती दोन्ही मुले विनिता कडे बघून रडत होती. ह्याचा अर्थ काहीतरी संबंध असलाच पाहिजे. खूप विचारांची घालमेल झाल्यावर शेवटी शोफी ने वेगळा मार्ग अवलंबला. त्याने त्याच्या मुळात जाण्याचा निर्णय घेतला. नेमक ह्यामागे कारण काय ? काय असे घडले होते ? इतिहास काय असेल ? त्याने त्या मुलांकडून जाणून घेण्याचा निर्णय घेतला. आपल्या मंत्राने आणि विद्येने त्याने त्या मुलांना बोलत केलं पण ती स्वतः बोलली नाहीत. त्यांनी स्वतः शोफी च्या शरीराचा ताबा घेतला. क्षणभरात सार चित्र शोफी च्या समोर उघड पडलं. तशी विनिता सुध्दा घाबरली. तिला देखील काय घडले असेल ते जाणून घ्यायचे होते. शोफी तडफडत त्या समाधी अवस्थेतून बाहेर आला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. बाहेर आलेली दोन मुलांची आत्मा तशीच रडत त्या रिंगणात उभी राहिली. शोफी कडे उत्तर नव्हते.. . . विनिता ने खूप आग्रह केल्यावर शोफी बोलायला लागला....
शोफी :- ये जो दो लडके हैं ना , ते तुमचे भाऊ आहेत !
विनिता जागची हादरली. तिला प्रचंड हादरा बसला. तिच्या ओठातून शब्द फुटत नव्हते. तरी तिने डोळ्यातले अश्रू दाबून मान हलवून नुसते "कसं शक्य आहे" असे विचारले.
शोफी :- हो, तुमचे भाऊ आहेत. आपके पीताजी को भी भूत प्रेम आत्मा मे बहुत विश्वास था. त्यांनी त्याचा फक्त वाईट वापर करायचं ठरवलं. उनको कीसिने कहा की जाऊन दोन मुलांचा बळी दे, मग ती मोठी आत्मा तुला शक्तिशाली बनवेल. तो उन्होंने दोन मुलं दत्तक घेतली. तीच ही मुलं. उनको शक्तिशाली बनना था. इसलिये वो इस जंगल मध्ये येऊन त्या आत्म्याला ह्या दोन मुलांचा बळी देणार होते. पर कुछ गडबड होगयी. बळी देताना तुमचे पिताजी अचानक जागेवरच मेले. वो विद्या अधुरी रह गयी. तो ऊस आत्मा को अभितक उनका बली नाही भेटला. ती आत्मा त्या दोन मुलांच्या मागावर आहे. तो जोपर्यंत देणार नाही. ती मुलं तुमच्याकडे येऊन न्याय मागतील.
विनिता :- पण , वडिलांचं आणि आमचं काही नात नव्हतंच. मग आम्हाला का त्रास ?
शोफी :- मॅडम, वो लहान बच्चे हैं. उनको मालूम हैं तुम्ही त्यांच्या बहीण लागता ते. तुम्ही वडिलांच्या इस्टेट ची वाटणी सगळी स्वतः ला घेतल्यावर त्यांनी त्यांचं अस्तित्व आपको दिखाया. उनकी क्या गलती. मासूम थे वो. इसलीये आप लोग बराबर इकडेच आले. तुम्हाला इकडे आणले ते ह्या दोन मुलांनीच.
विनिता :- का ?
शोफी :- ये महरूम हैं विनिता. . महरूम म्हणजे "वंचित". त्यांना अपेक्षित असणाऱ्या प्रेमाला , हक्काला , न्यायाला. म्हणून तुम्हाला घेऊन इथे आले.
विनिता देखील त्यांच्या त्या घटनेवर भावूक झाली. कशी ही असली तरी ती भावंड होती. वडील वाईट वागले असतील पण , त्यात त्यांची काय चूक. निरागस मुलांना आपल्या हलकट बापाने फक्त नको त्या गोष्टीत वापरले. शीsss काय ही निर्दयता ! तिला त्या मुलांना तोंड दाखवू नये असे वाटले. शेवटी लाज ही वडिलांना नसली तरी विनिता ला होती. ती शेवटी न्यायाला पेटली. तिने ठाम केले. त्यांना न्याय मिळवून द्यायचा. काही झालं तरी ती दोघं त्या आत्म्याच्या बळी नाही पडता कामा. वातावरण जिद्दीला पेटले. विनिता ने शोफी ला ठणकावून सांगितले की ह्यांना न्याय द्यायचाच.
शोफी देखील इरेला पेटला पण एक प्रश्न उरला तो म्हणजे आदित्य ला मग कोण घेऊन गेलं ? मुलं जर इथे समोर आहेत तर दुसरं कोण आहे ? ज्याला बळी द्यायचा ती आत्मा कोण आहे ? खूप प्रश्न शोफी च्या मनात तसेच तरळत होते. विनिता देखील आता सर्व जखमा आणि त्रास विसरून आपल्या भावांना न्याय द्यायला सज्ज होती. शोफी उठला त्याने रिंगणातील होमाला समोर असलेला धोतरा च्या मुळाचा बळी द्यायचे ठरवले. शास्त्रात बरेच पर्याय उपलब्ध आहेत , सत्यनारायणाला गणपती म्हणून सुपारी चालते तसेच हा बळी देखील मान्य करवून देऊ. शोफी ने हातातील मुळ समोर धरले. त्यावर अबीर ,कुंकू भारले आणि ते मुळ मंत्र झाडून त्या अग्नीत सोडून दिले. काही ही फरक पडला नाही. आहे ती परिस्थिती तशीच होती. जराही त्यात बदल दिसून आला नाही. कसे करायचे ? काय करायचे ? हा बळी मान्य नाही तर काय करायचे ? कोणाला द्यायचा बळी ? आदित्य कुठे असेल ? शोफी ने ठाम विचार केला की, आधी आदित्य ला शोधून आणायचे तर त्याला कोणी नेले आहे ,ह्याचा उलगडा होईल..त्याने हातात अबीर घेऊन दगडांच्या माळ मधून एक दगड काढला आणि त्यावर फेकला. तो दगड शोफी ने त्या मुलांच्या समोर टाकला. मुलांनी त्यांच्या उजव्या बाजूला हात दर्शवला. समोर पाहिले तर आदित्य काळोखात जखमी अवस्थेत उभा होता. विनिता त्याला पाहून काळजीने धावू लागली पण शोफीने अडवले कारण ,शोफी ला मात्र वेगळच चित्र दिसत होते. विनिता ने फक्त आदित्य ला पाहिले होते. शोफी ला दिसले की, आदित्य च्या मागे काळोखात धूसर अवस्थेत एक आत्मा उभी होती. अगदी त्याला बिलगून ती उभी होती . . . . याचा अर्थ स्पष्ट होता , त्या आत्म्यानेच आदित्य ला खेचून नेले होते. . . . . .पण कोणाची होती ती आत्मा ?
त्याने मुलांना विचारणा केली पण मुले काहीच खूण दर्शवत नव्हती. शेवटी शोफी ला कळले की , ती वेगळी शक्ती असणार. त्याने खूप विचार केला. आपल्या दगडाच्या देवाला विचारणा करायचे ठरले. तो उठला आणि देवासमोर उभा राहिला. हात जोडून आकांताने बोलू लागला. आजूबाजूचे रहस्यमयी वातावरण ज्वलंत झाले. शोफी हात जोडून बोलत असतानाच लांब उभा असलेल्या त्या शक्तीने आपले अस्तित्व प्रस्थापित करायला प्रारंभ केला. विनिता घाबरली. तिलाही ते दिसू लागले. प्रचंड भयंकर रूप असलेली ती आत्मा धूसर पद्धतीने पुढे पुढे आली आणि क्षणात त्या शोफी समोर असलेल्या दगडात स्थानापन्न झाली. शोफी प्रचंड वेदनेने वेडावला. "ह्याचं अर्थ . . . . .ह्याचा अर्थ.. . .. माझा देव म्हणजे ती आत्मा". शब्दांनी, विचारांनी शोफी भांबावून गेला. ती शक्ती प्रत्यक्षात आपला तो दगडाचा देवच आहे , ज्याला आपण इतकी वर्ष पुजत आहोत. हे जेव्हा त्याला कळले तेव्हा शोफी चे अवसान गळून पडले. त्याला कारण होतं , आता जर लढायचे झाले तर आपल्या देवाविरुद्ध लढायचे ! कसं शक्य आहे. असे भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटले. तो मागे फिरला. देवाला पाठ दाखवून तो लढाई अर्धवट सोडून निघणार इतक्यात त्याच लक्ष विनिता आणि त्या दोन लहान मुलांच्या आत्म्याकडे गेलं. तो बावचळला. विनिता ची झालेली दशा. मुलांची चूक नसताना भोगत असलेली शिक्षा. हे सारं त्याच्यातील माणुसकीला चेतवू लागल. शेवटी तो निर्धारित होऊन पेटून उठला आणि मी लढणार अशी घोषणा मनामनात घुमावून त्याने , पुन्हा जंग पुकारला. . . . . !!
त्याने रिंगणात असणाऱ्या त्या दोन मुलांना आणि आदित्य ला सोडवायचे ठरवले. इतक्या वर्षांची सगळी शक्ती पणाला लावून सोडवायचे, असा निर्धार केला. तो वळला. रिंगणात असणाऱ्या दोन मुलांना त्याने आपल्या शक्तीने दुसऱ्या धोतराच्या मुळाशी थारा दिला. त्या दोघांच्याही आत्मा त्याने त्या दोन मुळाशी समर्पित केल्या. ह्याचं अर्थ त्यांना एक स्थायु रुपात देह दिला. समोरचा देव कोपिष्ट झाला. त्याला हवे असलेले बळी शोफी मुक्त करीत होता म्हणून. अचानक त्या मुर्तितून प्रचंड प्रकाश बाहेर फेकला गेला आणि तो प्रकाश शोफी च्या अंगावर येऊ लागला. शोफी ने ओळखले, आपला देव ह्या सगळ्याच्या आड येणार. त्याने त्वरा करून ते दोन्ही मूळ अग्नीत फेकले. तशी ती महाशक्ती पेटून उठली आणि तिने प्रचंड हलकल्लोळ केला. झाले दोन्ही मुलांचे अग्नी संस्कार झाले. मोक्षर्थ प्राप्ती ही अशी असते. आता भाग उरला होता तो आदित्य चा.. . . .
आदित्य जखमी अवस्थेत पडून होता एखाद्या जखमी वाघासारखा. त्या शक्तीने आपला मोर्चा आदित्य कडे वळवला. ती धूसर प्रकाशाने आदित्य कडे सरकू लागली. शोफी ने देखील जाणले. तो देखील प्रचंड वेगाने धावत सुटला. हातातील पिशवीतून त्याने धावत धावत असताना अबीर आणि कुंक बाहेर काढले. हाताच्या मुठीत गच्च धरून आदित्य जवळ पोहोचला आणि त्याभोवती ने त्याने मोठे रिंगण आखले. ती शक्ती आपला प्रभाव दाखवायच्या आताच रिंगण संपूर्ण झाले. ती शक्ती आत प्रवेश करू शकत नव्हती. झाली, घटी जवळ आली. एकेक क्षण आता परीक्षा घेऊ लागला. विनिता त्या लांबून ते सगळं बघत होती. शोफी ने जाणल त्याला काय करायला हवं ते. त्याने ते रिंगण तसेच अखून ठेवले आणि तो पुन्हा त्या होमा जवळ आला. जोपर्यंत रिंगण आहे ती शक्ती आदित्यच काही करू शकत नव्हती हे पक्क. तोपर्यंत शोफी ने दुसरा मार्ग अवलंबला. त्याने इकडे होमातील एकेक जळत्या लाकडाचे ढीग हाताने उचलून ,त्या त्या देवासमोर म्हणजेच त्या शक्तीच्या दगडासमोर रचले. त्या शक्तीने ते पाहिले ती प्रचंड वाऱ्याच्या वेगाने तिथे पोहोचली. तोपर्यंत तो दगड उष्ण होऊन त्या अग्नीत समाविष्ट झालेला होता. त्या अग्निने म्हणजेच पवित्र होमाने त्या दगडाचे म्हणजेच , त्या शक्तीचे सारे पाश सोपवले, सत्व संपवले, त्याचे स्थान संपवले. ती शक्ती तिथे पोहोचली आणि अचानक गायब झाली. तेवढ्यात त्या दगडातील तारेच्या कुंपणातून केवढा तरी मोठ्या आवाजाने स्फोट झालं. मोठाच्या मोठा आगीचा डोंब उसळला. धुराने सारे जंगल व्याप्त झाले. शक्तीने ने कायमचा निरोप घेतला.. . . . . .!!
धुराने माखलेल्या त्या जंगलातून वाट काढत कसाबसा शोफी आदित्य पर्यंत पोहोचला. आदित्य स्वतःला सावरत उठला. ते दोघे ही जागेवरून चालत चालत पुढे आले तर , त्यांना विनिता कुठे दिसली नाही. ते शोध घेऊ लागले. एकतर त्या प्रचंड धुराच्या लोट मध्ये ती कुठे डातही नव्हती. दोघेही हाका मारत फिरत होतें. आदित्य एका बाजूला शोधून आला , शोफी एकाबाजूला शोधून आला ,पण निष्फळ. कुठेच त्यांना साधा तिचा आवाजही आला नाही. इतक्यात एका त्या एकांतात त्यांना हालचाल झाल्याचा आणि झटपटीचा म्हणजेच कुणीतरी अंग झाडात असल्याचा सूक्ष्म आवाज आला. दोघेही तिकडे वळले. एका झाडाखाली आले , आवाज जवळून येत असल्याने त्यांनी वर खाली नजर फिरवली. तर ते उभे होते त्याच वर झाडावर त्यांना दिसली विनिता.
झाडाच्या पारंबिला लटकून होती. डोळे - जीभ बाहेर आली होती. शांत . . . .थंड झाली होती. त्या शक्तीने त्याचा बळी शेवटी घेतला होताच. . . . आदित्य कोसळला. .. .शोफी धाय मोकलून रडू लागला. . . . . .त्याला स्वतः च वाक्य आठवलं. . .
"साहेब , नियती होती है. जाने कब कहा घेऊन जाईल".
लेखकाची भेट :-
कशी वाटली कथा ?
काहींना शेवट आवडला नसेलही, पण दैवाच्या खेळात काय घडेल आपण नाही सांगू शकत. कौतुक करायचे ते शोफी आणि आदित्यचे. इतक्या जीवावर बेतून ते वाट काढत होते
असो, तर कथा पूर्ण झाली ,तुमचा सर्वांचा प्रतिसाद उत्तम होताच ह्यात वाद नाही. हे माझं महाभाग्य आहे.
तुमची आठवण येतच राहील
भेटू पुढच्या कथेसाठी लवकरच. . . . .!!
तोपर्यंत माझ्या आपल्या मराठी घोस्ट स्टोरीज वरील कथा नक्की वाचा. मराठी घोस्ट स्टोरीज वर सर्च ऑप्शन मध्ये नाव टाका. सर्व कथा समोर येतील. .
खाली माझ्या ७ कथेंची नावे देत आहे. . . .
(१) अफजल विला
(२) द ग्रेव ऑफ हिज
(३) चॅप्टर ओडी
(४) अख्ज
(५) नत्तुरी
(६) अस्केटिक
(७) अनेक्सेस
• या भयकथा व्यतिरिक्त माझ्या आणखीन कथा वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा