ही कथा काल्पनिक आहे नक्कीच , पण त्यात सुंदर कथानकाची गुंफण आहे.. .. आनंद घ्या. . !!
















स्थळ : उटी. . .
वेळ : मध्यरात्री 3 वाजता. . .!!
सोडा मला. . . .सोडा. . . .
मी पडतेय. . . .मला वाचवा. . . . आ. . .. आ. ...मला पकडा. . .
जोरजोरात आवाज करीत ती ओरडत होती. ...आजूबाजूला कोणी नव्हते. ती एकटीच एका उंच इमारतीवर उभी होती. तिच्या हातात एक दोरी होती. ती दोरी तिने आपल्या गळ्याला गुंडाळली. बघता बघता तिचा तोल गेला आणि ती क्षणात खाली कोसळली. करकचून दोरी लांबली गेली आणि फटक्यात गळ्याला आवळ बसली. . . क्षणात डोळे बंद झाले. समोरच्या छतावर एक पांढरट सावली उभी होती ती एकटक तिच्याकडे बघत होती. .. . . . .
तीने डोळे उघडले आणि घाबरत ओरडत झोपेतून जागी झाली. . . . तिने डोळे उघडले आणि इकडेतिकडे पाहिले तर कुठेच दोरी नव्हती की कुठली इमारत नव्हती. . . ती बेडवर झोपली होती. बाजूला तिचा नवरा गाढ झोपेतून जागा झाला होता. तो तिला गदगदा हलवत होता. काय झाले. . . काय झाले. . .म्हणून विचारात होता. ती थोडी थांबली , मग सावरली , पाणी घटाघट प्यायली. दोघेही थोडे त्या प्रसंगातून स्थिरावले.
ती म्हणजे "आभा" आणि तो म्हणजे "योग".
दोघेही नवरा बायको. . . उटी ही जागा आभाच्या आवडती म्हणून दोघेही तिथे व्हेकेशन टाईम साठी कामातून वेळ काढून आले होते. इतक्यात आभा उठली कॉफी करण्यासाठी. रात्रीचे तीन वाजलेले बघून योग गमतीने म्हणाला. .
योग : ओ मॅडम , तुम्ही "फॅशन डिझायनर" वाल्या मुली रात्री इतक्या भयानक दिसता हे माहीत नव्हत ओ. . . (हसू लागतो)
आभा : हो का , आणि तू "हार्ट स्पेशालिस्ट डॉक्टर" असून पण दुसऱ्याचे हार्ट दुखवायला कसे जमत रे तुला. . .
दोघेही हसले आणि किचन मध्ये गेले. रात्री 3 वाजता दोघेही कॉफी चा आनंद घेत होते. एवढ्या रात्री ते वेगळ्या क्षणांचा घेत होते , कारण ते त्या साठीच तर तिथे आले होते.
ते दोघे मूळचे पुण्याचे पण काही आठवडे ते उटी मध्ये राहणार होते, त्यांच्या फार्म हाऊस वर. त्याला आणखी एक कारण म्हणजे त्यांच्या फार्म हाऊस पासून 2 किलोमिटर च्या अंतरावर योग चे स्वतःच्या मालकीचे हॉस्पिटल होते. पुण्यात देखील त्यांचे हॉस्पिटल होते तिथे त्याचे वडील कारभार पाहत होते. उटी मधील हॉस्पिटल ची इमारत नवीन होती. पाच वर्षे झाली होती नवीन बांधून . पुण्यातील हॉस्पिटल मात्र वीस वर्षांपासून कार्यरत होते. नवीन शाखा असावी म्हणून त्यांनी पाच वर्षांपूर्वी त्यांच्या फार्म हाऊस च्या बाजूला उटी मध्ये नवीन शाखा खोलली. केवळ पुरेसा वेळ एकमेकांसोबत घालवता यावा म्हणून आणि हॉस्पिटल चे काम ही बघता येईल म्हणून योग आणि आभा उटी मध्ये काही आठवड्यांसाठी वास्तव्यास आले.
तर दोघांची कॉफी इतक्यात झाली होती. छान वातावरण होते. थंडी गुलाबी म्हणतात ती पडली होती. उटी म्हटलं की , निसर्गाने सर्व बाजूंनी अगदी मुक्तहस्ताने केलेली उधळण. रात्रीचे 3.20 झाले. योग तिला म्हणाला. . .
योग : तुला पुन्हा तेच स्वप्न पडलं. . .?
आभा : हो. . .काय करू सुचत नाही. . .फार भीतीदायक आहे ते स्वप्न. . .
योग : प्रॅक्टिकल रहा ग. .. .झोपेत अनेक चित्र दिसत असतात आपल्याला. इट्स अ सायन्स.. . त्यात काय एवढे. ती गोष्ट काय खरी होणार आहे का, आणि स्वप्नात बघितलेले खरे झाले असते तर मी दिवस रात्र झोपून श्रीमंत झाल्याची स्वप्ने बघेन . .शिकलेल्या माणसाने अडाणीपणा दाखवू नये , लोक हसतात. . . .
आभा : जाऊदेत सोड . . .तुझ लेक्चर चालू करू नकोस. काय व्हायचे ते होऊदे त्या स्वप्नांचं. . . .
इतक्यात योगचा मोबाईल खणखणला. इतक्या रात्री कोणाचा फोन. . .म्हणून आभा च्या कपाळावर आठी आली. योग ला वाटले एखाद्या पेशंट चा फोन असावा. आता कुठे जाणार ?? म्हणून त्याने तो फोन कट केला.. . पुढच्या दहा मिनिटात हॉस्पिटल च्या टेलिफोन वरून अनेक फोन कॉल चालू झाले. फोन घणाघन वाजू लागला. एका मागोमाग एक असे सलग दहा फोन आले. शेवटी हॉस्पिटल मधून इतके फोन येतात म्हटल्यावर योग ने फोन उचलला. . .
समोरून : सर , लवकर हॉस्पिटल ला या.
योग : अर पण झाले काय ?
समोरून : सर , आपल्या इलेक्ट्रिक वॉर्ड मधून गॅस ची गळती झालीय. मोठा स्फोट झालाय. .अनेक लोक जखमी आणि काही लोक ऑन द स्पॉट गेलीत सर. . . .
योग : कायsssssss. . . . .. . . !! ( ओरडला )
योगच्या पायाखालची जमीन सरकली.. . . त्याचे हात कंपन करू लागले , पायात त्राण राहिले नाहीत , आता काय होणार ? पोलिस येणार ? चौकशी होणार , गेलेल्या लोकांच्या नातेवाईकांना काय उत्तर देणार ? गॅस गळती कशी झाली . . . ? त्याला काही सूधरेना , आभा ने त्याला सावरले. त्याला खुर्चीवर बसवून धीर दिला.. शेवटी तोंड द्यावेच लागणार आपण मालक आहोत म्हंटल्यावर. असे समजावून ती त्याला धीर देत होती. . . शेवटी योग कसाबसा निघाला. आभा घरीच थांबली. . . ती मागावून जाणार होती.
साधारण पहाटेचे 4 वाजले होते. योग आपली गाडी घेऊन तिथे पोहोचला. . बघतो तर सारे वातावरण एकदम चक्रावून सोडणारे होते. जिकडे तिकडे धूर दिसू लागला , हॉस्पिटल ची इमारत धुराने वेढली होती. हॉस्पिटल चा अलर्ट अलार्म जोरजोरात खणखण वाजत होता , इलेक्ट्रिक वॉर्ड हॉस्पिटल च्या उजव्या कोपऱ्यात होता. तिथे अनेक माणसांची ओरडाओरड चालू होती , अँब्युलन्स रांगेने उभ्या होत्या , पटापट माणसांना दुसऱ्या वॉर्ड मध्ये हलवण्यात येत होते , अर्धा अधिक स्टाफ हा गॅस थांबवण्याचा प्रयत्न करीत होता , अनेक लोक आग विझवण्यासाठी माती उकरून टाकत होते , गडबड गोंधळ पाहून योग आणखीन नर्व्हस झाला. त्याला काय करावे हेच सुचत नव्हते. डोके काम करणे बंद झाले होते. त्याने मोबाईल वर पाहिले तर योग च्या वडिलांचे दहा मिस कॉल येऊन गेले होते. त्याने मोबाईल आहे तसाच खिशात टाकला आणि गाडीतून उतरून तो हॉस्पिटल कडे धावला.. . . .
सर्व स्टाफ धावत योग कडे आला. झालेला प्रकार सविस्तर योग ने जाणून घेतला. . तो त्या वॉर्ड कडे निघाला. तिथे जाऊन त्याने पाहिले तर बऱ्यापैकी आज थंड झाली होती. गॅस संपला होता. वातावरण काहीसे आवरण्यात आले असे वाटले इतक्यात अचानक गलका उठला. सारे लोक हॉस्पीटल च्या डाव्या बाजूच्या इलेक्ट्रिक वॉर्ड कडून उजव्या बाजूच्या कोपऱ्याकडे धावले. काय झाले माहित नाही . . . योग ही त्या बाजूला काय झाले म्हणून धावत सुटला.. . .इतक्यात मागून गाडीतून आभा आली. ती खाली उतरली. . .आभा योग ला भेटली. ते दोघेही झपाझप पावले टाकत कोपऱ्यात गेले आणि त्यांनी पाहिले तर इमारतीच्या सर्वात वरच्या वॉर्ड मधून एक पेशंट गळ्याला दोरी बांधून उभा होता. त्याचे लक्ष समोर नव्हतेच. तो डोळे एकटक एका गोष्टीकडे ठेवून होता. आभा आणि योग जागीच स्तब्ध झाले. काय करावे त्यांना कळेना. बघता बघता सारे जण ओरडा ओरड करू लागले. काही जण त्याला धरण्यासाठी शेवटच्या मजल्याकडे धावले. तोपर्यंत उशीर झाला होता. सर्वजण त्याला थांबवण्याचा प्रयत्न करीत होते . तो माणूस मात्र गळ्यात दोरी गुंडाळून डाव्या बाजूला छताकडे
इतक्यात आभाचा फोन वाजला. योग च्या वडिलांचा फोन आला होता. योग ने तिला फोन घ्यायला सांगितले. आभाने समोरील दृश्य बघता बघता फोन उचलला.
वडील : अरे योग फोन का उचलत नाही.. . इथे केवढा प्रॉब्लेम झालाय माहित आहे का ??
आभा : हा बाबा , आम्ही गडबडीत आहोत. आपल्या उटी मधल्या हॉस्पिटल मध्ये गॅस गळती झाली आणि एक व्यक्ती गळ्याला दोरी बांधून आत्महत्या करीत आहे. . .
वडील : अरे काय चालू आहे हे.. . .दोन्हीकडचे प्रॉब्लेम कसे सावरू मी. . .
आभा : दोन्हीकडे म्हणजे , तिकडे काय झालंय बाबा. . .
इतक्यात त्या खिडकीतील व्यक्ती पुढे झाली. . .तिने स्वतःचे अंग सोडून दिले आणि क्षणात ती व्यक्ती खिडकीतून खाली कोसळली. दोर आवळला गेला. मानेला फास बसला. इतक्या प्रचंड तावाने तो फास पिळवटला गेला की ,पुढच्या सेकंदाला त्या व्यक्तीचे डोळे पांढरे पडले आणि जीभ बाहेर आली. ते पाहून आभा सुन्न झाली. तिच्या हातातील मोबाईल खाली पडला. तिने लगबगीने तो उचलला. पुन्हा ती योग च्या वडिलांशी बोलू लागली. .
वडील : तुझ लक्ष कुठेय . . . . मी काहीतरी बोलतोय तुला. . .
आभा : हा बाबा बोला , काय झालंय म्हणालात तिकडे.. .
वडील : अग आपल्या पुण्यातील हॉस्पिटल च्या वरच्या मजल्यावरून एका व्यक्तीने गळफास लावून खाली उडी घेतली आणि तो गेला.. . .त्याने आत्महत्या केली आहे. .. .
हे ऐकताच आभा जागच्या जागी एकवटली गेली. तिला कळेना काय करावे..इकडे ही तीच घटना आणि तिकडे ही तीच घटना हा काय प्रकार आहे. दोन्ही कडे एकच घटना कशी काय घडू शकेल. . . इतक्यात आभा चे लक्ष समोरच्या खिडकीत लटकलेल्या व्यक्तीकडे गेले. त्या व्यक्तीला निरखून बघताना तो व्यक्ती खिडकीत उभा असताना वरच्या मजल्यावर काय बघत होता हे जाणून घेण्यासाठी आभा ने वर पाहिले तर तिला धडकी भरली. . . .वर एक पांढरट सावली उभी होती आणि ती सावली आभा कडे एकटक निरखून पाहत होती. . .
अनेक प्रश्न आभा ला सतावू लागले.
एकाच वेळी एकसारख्या घटना कशा घडू शकतात ? आणि तिला स्वप्नात दिसणारी ही घटना त्यात समानता आणत होती.. . यात काही साम्य आहे की केवळ योगायोग. . .
हे बघता बघता तिचे डोळे मिटले. तिला मूर्च्छा आली. . .
ती झाली गवतावर कोसळली. . .