फ्युरीओसा

पहिल्या भागाची लिंक 





अंजलीचे डोळे झाकत होती तिला जाम गुंगी येत होती.....तरी सुद्धा समोरचे एक शिल्प तिला अंधुकसे दिसत होते....डोकं जाम ठणकत होतं त्यामुळे झोप हळूहळू उडत होती...समोरचे ते शिल्प तिला हलल्या सारखे भासत होते.....एका हत्तीचे शिल्प होते ते....हत्तीचा सोंडेचा भाग तिच्या समोर होता....अचानक अंजलीला काहीतरी आठवले......तिचा श्वास गळ्यातच अडकला....तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला.....तिच्या डोळ्यासमोर त्या हत्तीला बघून एक प्रतिमा आठवली.....तो तोच होता ज्याची अंजलीने आयुष्यभर पूजा केली होती.....अच्छा....मगापासून एक महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली....अंजली ही एकईश्वरवादी होती......तिच्या लहानपणापासून तिने एकच ईश्वराची उपासना केली होती तो म्हणजे गणपती......माहीत नाही तिने दुसऱ्या देवापुढे कधी हात जोडला असेल किंवा त्यांच्या मंदिरात गेली असेल पण गणपतीच्या दर्शनाशिवाय तिचा एकही दिवस जात नव्हता....मूर्तिकार असल्याने तिने स्वतःच्या घरात स्वतःच एक सुंदर मंदीर बांधले होते आणि त्यात तब्बल 5 फुटी गणपतीची तिने स्वतःच्या हाताने बनवलेली मूर्ती स्थापित केली होती.....पहाटे पासून लाल फुले,दुर्वा,अथर्वशीर्ष,आरती हे सगळं तिचं चालूच असायचं.....इतकी ती गणेशभक्त होती कधी कधी लोक ह्या सगळ्याला वेडेपणा म्हणायचे पण त्या मूर्ती समोरचे काही क्षण अंजलीला एकदम प्रसन्न वाटायचे....ती पूजेत ती हरवून जात असे पण आता ह्या जागेच्या प्रभावाने ती आपलं जे काही पूर्वायुष्य विसरून बसली होती त्यातली पहिली गोष्ट तिला आठवली ते म्हणजे आपले आराध्य गणपती बाप्पा.....डोळ्यासमोर तिने साकारलेली प्रसन्न अशी गणेशमूर्ती आली आणि अंजलीला बैचेन व्हायला झालं....तिचा श्वास गुदमरू लागला....आपल्या छातीवर धपधप मारून ती श्वास सोडवण्याचा प्रयत्न करू लागली.....डोक्यात एक मोठी कळ आली आणि अंजली गुडघ्यावर बसली....एक जोराची उलटी तिच्या तोंडून बाहेर पडली....सतत दोन तीन वेळा ही उलटी आली....प्रत्येक उलटी बरोबर तिचे डोळे विस्फारू लागले....तिच्या तोंडातून उलटी मार्फत मगाशी खाल्लेलं स्वादिष्ट भोजन न पडता छोटे छोटे विचित्र काळेकुट्ट किडे,अळ्या बाहेर पडत होत्या...एखाद्या जळक्या काळ्या इंजिन ऑइल प्रमाणे तिची काळी उलटी बाहेर पडली होती....तिच्या तोंडातून पडणारे पाणी एखाद्या लाव्हा रसा प्रमाणे उसळत होते....त्यातून बुडबुडे उमटत होते....अचानक असा विषारी पदार्थ तिच्या पोटातून बाहेर पडल्याने अंजली थकली होती धापा टाकत होती.....तिच्या तोंडातून बाहेर पडलेले घट्ट काळे द्रव आणि ते किडे वाफ होऊन हवेत विरून गेले होते....अंजलीने डोके हलवून स्वतःला शुद्धीत आणलं आणि लडखडत उभी राहिली.....तिच्या पोटातलं जे काही कळंबेरं होतं ते गणपतीच्या फक्त आठवणीने आणि अप्रत्यक्ष दर्शनाने बाहेर पडलं होतं.....ती आता थोडी सामान्य झाली होती....तिला सगळं काही आठवत होत....तिने आपला खिसा चाचपला तिचा मोबाईल गायब होता....अचानक तिची नजर आजूबाजूला गेली....तिला आपल्या डोळ्याबर विश्वास बसेना समोरचे दृश्य क्षणाक्षणाला बदलत होते म्हणजे एक क्षणी वाटत होतं की हा तोच आलिशान महल आहे पण दुसऱ्या काही सेकंदाला ही एक उंच मोठी पडकी जीर्ण काळवंढलेली वास्तू वाटत होती....एका क्षणाला इथून मंद सुवास तर पुढच्या क्षणी चित्र बदलताच कुबट सडका वास येत असे.....आजूबाजूचे सेकंदा सेकंदाला बदलणारे वातावरण बघून अंजली गोंधळली......ही वास्तू खरच आलिशान होती की दुसऱ्या दृश्याप्रमाणे पडकी जीर्ण आणि सडकी आहे??.....अस द्विअर्थी भांडणच अंजलीच्या डोक्यात उठलं होतं.......सेकंदा सेकंदाला आजूबाजूचे नजारे बदलत होते.....नंतर तिच्या लक्षात आलं की ज्या स्त्रीला आपण लिफ्ट दिली होती ती सोनाली होती....म्हणजे तिने फसवून इथे आणलं होतं.....पण का??हा प्रश्न अनुतरीत होता......आपण इथे का आहोत ह्याचे उत्तर आता बाहेर जाऊनच मिळणार होतं.....तिच्या पोटातून सगळी काळी जादू बाहेर पडली असली तरी तिचा काही अंशी प्रभाव होताच म्हणून तर सेकंदात आलिशान संगमरवरी बंगला आणि पुढच्या सेकंदाला जीर्ण झालेली काळीकुट्ट ओबडधोबड वास्तू असा हा सगळा खेळ सहन करीत अंजली आपल्या खोलीतून बाहेर पडली.....खालची संगमरवरी फरशी गायब होऊन खरडबडीत दगडी रस्त्या तरी पुढच्या सेकंदाला परत संगमरवरी फरशी येत होती.....तिने गॅलरी मधून वाकून बघितलं तर आजूबाजूचे सगळे दृश्य फिरत असल्या सारखं दिसत होतं....काहीसं ओबडधोबड काळाकुट्ट असं दृश्य सेकंदात बदलून परत आलिशान होत होतं.....थोडक्यात अंजलीला हे समजलं होत की हा सगळा नजरेचा धोका सुरू आहे....हे सगळं काही इथं असलेलं खरं नाहीय.....हे एक मायाजाल आहे त्यात ती का होती ह्याची तिला कल्पना नव्हती....सतत बदलत राहणारे चित्र....समोर गरगर फिरणारे देखावे बघून अंजलीला चक्कर आली होती....बाजूच्या बिपीनच्या खोलीतून सोनालीचे मादक सुस्कारे ऐकायला येत होते....लडखडत अंजली आपल्या खोलीत आली तिने दार लावून घेतलं तिला झोप येऊ लागली तशी ती बेड वर कोसळली
घड्याळात 2 वाजत आले होते....कसला तरी फरफटत नेण्याचा आवाज अंजलीला आला....अंजली डोळे चोळत उठली....आता ती थोडी सामान्य झाली होती....तिने हळूच चालत चालत दाराला कान लावले.....सरररर सररर असा आवाज येत होता ओढून नेल्यासारखा....तो आवाज हळूहळू मंद होऊ लागला तसं अंजलीने दरवाजा उघडला ती रांगत रांगत गॅलरी जवळ आली....तिने वाकून खाली बघितले....ते दोन तगडे चंद्रकांतरावांचे सारखेच दिसणारे बॉडीगार्ड बिपीनला अक्षरशः फरफटत नेट होते....त्याला पायरीवरून फरफटत नेत होते तरीही त्या बिपीनला जाग आली नाही ह्याची कारण अंजलीला माहीत होते.....ते चंद्रकांतरावांचे जेवण.....त्यानेच समाधी लागल्या सारखी गुंगी येत होती.....ते दोघेजण बिपीनला हॉल जवळच्या रूम मध्ये घेऊन जाऊ लागले.........ते दोघे बिपीनला ओढत त्या रूम मध्ये घेऊन गेले मागोमाग सोनाली सुद्धा त्या खोलीत शिरली आणि आटोमॅटिक व्हीलचेअर वरून चंद्रकांतराव सुद्धा त्या खोलीत शिरले.....अंजली सावध झाली.....तिने आजूबाजूला बघितलं.....आता आजूबाजूचे वातावरण फिरत नव्हते ते मूळ रुपात होते....मगाशी तिला कुणीतरी ह्या जागेची सत्यता दाखवली होती......अंजली जाणून होती की ही जागा मायावी आहे....इथून पळता येणार नाही....हे सगळं कृत्रिम बनवलं गेलं आहे...त्यामुळे तिने पळण्याचा विचार डोक्यातून काढून टाकला....तिला आता बघायचं होत की ह्या लोकांनी त्या दोघांच्या बरोबर काय केलं आहे.....अंजलीने मनात गणपतीच्या नावाचा जाप सुरू केला....आधीतर तिने देवाचे तिला शुद्धीत आणल्याबद्दल आभार मानले....आता पुढे जे काही करायचं ते तिलाच करायचं होतं.....अंजलीचा स्वतःवर इतका विश्वास होता की विचारूच नका.....दबक्या पावलांनी ती हळूहळू शिड्या उतरू लागली....इकडे तिकडे बघत तिला दिसलं की हॉलच्या बाजूला एक रूम होती ती नेहमी बंद असायची तिचा दरवाजा आज उघडा होता..सावधपणे अंजली त्या रूम मध्ये पोहोचली......ती रूम कमालीची प्रशस्त होती...त्या रूम मध्ये सगळीकडे काळाकुट्ट अंधार होता एका कोपऱ्यातून लालसर उजेड येत होता त्या उजेडाचा पाठलाग करत करत दबक्या पावलांनी ती त्या लालसर उजेडाकडे जाऊ लागली.....जस जसे ती त्या उजेडाच्या जवळ जात होती तसतसा तिचा वेग मंदावत होता ....ते एका दगडी गुहेचे प्रवेशद्वार होते....अंजली आता त्या गुहेच्या तोंडाजवळ उभी होती....तिने एकवार आत बघितले आत कुणीच दिसत नव्हते....पण आतून काही अघोरी मंत्रांचा आणि कसल्या तरी वाद्याचा आवाज येत होता....अर्थात ते चौघे इथेच होते....अंजली त्या गुहेत शिरली....एक कुबट वास त्या गुहेतून येत होता..जागोजागी मशाली लावल्या होत्या...त्या मशालीचा उजेड लालसर होता...वरून थेंब थेंब काहीतरी लालसर पाण्यासारखे गळत होते....अंजली दबक्या पावलांनी चालत दगडाच्या मागे लपत पुढच्या परिस्थिचा अंदाज घेत पुढे सरकत होती....मंत्रांचा आवाज तीव्र होत होता....त्या गुहेत घुमत होता....ओबडधोबड दगड चढत सर करत अखेर अंजली त्या चौघांच्या जवळ थोडता पोहोचली.....एका दगडाचा आडोसा घेत ती तिथे लपून सगळं दृश्य बघत होती.....समोरच दृश्य बघून तिला थोडी धडकी भरली....चंद्रकांतराव व्हीलचेअरवर बसले होते....त्यांचे ते दोन बॉडीगार्ड तिथे उभे होते आणि सोनाली एका दगडावर बसली होती.....एका दगड रचून बनवलेल्या चबुतर्यावर एक ओबडधोबड नाळ राक्षसी मूर्ती ठेवली होती.....आणि तिच्या समोर बेशुद्ध अवस्थेतल्या बिपीनला झोपवलं होतं....चंद्रकांतराव मंत्र म्हणत होते.....बाजूचा एक गार्ड ढोल वाजवत होता.....अंजली सगळीकडे निरखून बघू लागली.....चंद्रकांत आपल्या हातातील कापडी पिशवीमधील काळी राख बिपीनच्या तोंडावर मारत होता....तसा बिपीन हळूहळू शुद्धीवर येऊ लागला......हलकेच मान फिरवून इकडे तिकडे बघू लागला.....तो अजूनही पूर्णपणे शुद्धीत नव्हताच त्याला जाग आलेली पाहून चंद्रकांतने थोडं पुढे सरकून त्याच्या तोंडाला लाल भडक रंग फसला आणि मंत्र म्हणत म्हणत दुसऱ्या एका गार्डला इशारा केला....आता मात्र अंजलीचे डोळे विस्फारले....दुसऱ्या गार्ड ने बाजूचीq भलीमोठी तलवार उचलली आणि एका झटक्यात बिपीनचे शीर धडावेगळे केले...अंजलीने आपल्या तोंडावर हात ठेवला...ती थोडीफार घाबरली होती...रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या बिपीनचे तुटलेले शीर चंद्रकांतरावांच्या पायाजवळ येऊन पडले....तस त्यांनी स्मितहास्य करत ते तुटलेले शीर केसाला पकडून उचलले आणि आपल्या व्हीलचेअर वरून सरकून ते त्या छोट्या राक्षसी मूर्तीजवळ गेले आणि बिपीनचे शीर त्या मूर्तीवर धरले....त्या तुटलेल्या शिरातून जे रक्त वाहत होते त्या रक्ताचा अभिषेक त्या मूर्तीवर होऊ लागला....तश्या त्या मूर्तीतून वाफा निघू लागल्या.....रक्ताचा शेवट थेंब गळेपर्यंत चंद्रकांतने ते शीर त्या मूर्तीवर धरले होते.....नंतर त्यांनी ते तुटलेले शीर परत बिपीनच्या देहावर ठेवले.....आणि मंत्र म्हणू लागले....मंत्र सुरू होताच बिपीनचा देह आपोआप पेट घेऊ लागला....तसे चंद्रकांतरावांचे मंत्रोच्चार जोर धरू लागले.....काही क्षणात बिपीनच्या देहाची राख झाली.....राख होताच सोनाली दगडावरून उठली आणि ती राख एका कापडी पिशवीत भरू लागली ती राखेची पिशवी किमान 10 किलोची तरी असेल त्यात बिपीनच्या राखेने अजून एक किलोची भर पडली..सोनाली ती राखेची पिशवी बाजूला ठेवायला सरसावली...चंद्रकांत रावांनी त्या राखेकडे बघितलं आणि ते राखेचे पोतं जवळ आणायला सांगितलं....सोनालीने ते पोतं चंद्रकांत जवळ आणून ठेवलं....चंद्रकांत रावांनी त्या रखेतला काही भाग समोरच्या दगडावर ओतायला सांगितला तसा तो सोनालीने ओतला....चंद्रकांतरावांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच स्मितहास्य होते....ओतलेल्या राखेच्या ढिगाऱ्यात त्यांनी एक आळं बनवलं....आपल्या हातावर बाजूच्या चाकूने एक कट मारत त्यांनी रक्ताचे काही थेंब त्या राखेत सांडले....सोनालीने त्या राखेत थोडं पाणी ओतलं आता चंद्रकांतराव ती राख नीट कालवू लागले....आपल्याला हवा तसा राखेचा गोळा बनवून त्यांनी त्या राखेच्या गोळ्याला आकार द्यायला सुरुवात केली.....अंजली सगळं बघत होती.....एक मंद आवाज तिच्या कानापाशी येत होता काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत होता...त्या आवाजाकडे लक्ष देत अंजली समोर जे काही चालू आहे ते निरखून बघत होती...काही क्षणात चंद्रकांतरावांनी त्या राखेच्या गोळ्याला आकार दिला..चंद्रकांतराव शिल्पकार होते त्यामुळे त्यांनी अगदी रेखीव शिल्प साकारले होते...एका सुंदर स्त्रीचे शिल्प होते ते....तिच्याकडे एक नजर बघून तिच्याबद्दल आपल्या अपेक्षा चंद्रकांतराव मनात आणू लागले....आपल्याला अपेक्षित कल्पना मनात आणून ते त्या आताच बनवलेल्या राखेच्या शिल्पाजवळ गेले आणि तिच्या कानात ते नाव पुकारले
"मायराssssssss"
अस तिचं नामकरण करताच त्या राखेच्या मूर्तीतून धूर निघू लागला...त्या धुराने आजूबाजूचा परिसर अंधुक बनवला होता.....हळूहळू तो धूर हटू लागला तशी त्या दगडावर एक सुंदर तरुणी उभी होती....ती पूर्णपणे नग्न होती....चंद्रकांतरावांनी आपल्याला अपेक्षित आखीव रेखीव उभार त्या शिल्पावर साकारले होते त्याप्रमाणे ती एकदम सुंदर अप्सराच दिसत होती....ती स्मितहास्य करत चालत चालत चंद्रकांतरावांच्या जवळ येऊन उभी राहिली....तिचं ते सोनेरी सौन्दर्य बघून चंद्रकांतराव पुरते घायाळ झाले होते.....सोनालीने लगेच चंद्रकांतरावांचे कपडे काढायला सुरवात केली....चंद्रकांतराव हवशी नजरेने मायराकडे बघत होते तशी ती चंद्रकांत रावांच्या नग्न मांडीवर येऊन बसली आणि तिच्या नाजूक देहावर आता चंद्रकांतरावांचा हात फिरायला सुरू झाला....ते आपली हवस पूर्ण करण्यासाठी मायरावर तुटून पडले....मायरा ही चंद्रकांतरावांची गुलाम होती त्यामुळे ती त्याला साथ देत होती
अंजली हे बघून सुन्न झाली होती....तिने तिथून काढता पाय घेतला.....ती राख चंद्रकांतरावासाठी ऐशोआरामचे साधन होती......आणि ती वाढवण्यासाठी ते लोकांचे बळी देत होते.....सोनालीने बाकीची राख पिशवीत भरली.....अंजलीने दबक्या पावलांनी हळूहळू मागे सरकली आणि ती आपल्या रूम मध्ये येऊन झोपी गेली.....सगळं काही स्पष्ट झालं होतं....त्या तिघांना इथे बळी देण्यासाठी आणलं गेलं होतं...रोज एक एक बळी देण्याचे प्रकार इथे सुरू होते....आणि शेवटचा बळी आता अंजली होती......पण आयुष्यात अनेक जीवघेणे धाडस करून बसलेल्या अंजलीला हे सगळे विचार जास्त भयभीत करू शकले नाहीत....तिच्या डोक्यात आता एकच विचार होता......पुढे काय करायचं??......पळून जाणे ह्या मायाजालात शक्य नव्हते आणि अंजलीचा तो स्वभाव सुद्धा नव्हता...ती आता चंद्रकांतरावांच्या संमोहनामधून बाहेर आली होती.....एक योजना तिने आखली होती पण त्यात ती सक्सेस होईल की नाही ह्याची खात्री अंजलीला नव्हती..पण तिला आपण अजूनही चंद्रकांतरावाला आधीन आहोत असं नाटक तिला करायचं होतं.....ह्या सगळ्या शेवटी सगळा नशिबाचा खेळ होता.....अंजलीने आजूबाजूला बघितलं बाजूला असलेल्या एका अँटिक घड्याळात एक वेळ सेट करून गजर लावला....कारण दोन दिवस तिला एका ठराविक वेळेतच जाग येत होती ती वेळ तिच्या लक्षात होती....त्यानुसार सकाळी गजर होताच जाग येताच बरोबर ती दार उघडून बाहेर आली....समोर सोनाली उभी होती जणू ती अंजलीची वाटच बघत होती....आता सुरू होणार होते अंजलीचे नाटक.....ती एकदम तसच वागत होती जस दोन दिवसांपूर्वी इथे आल्यावर वागत होती....म्हणजे सोनालीच्या मागे मागे चालणे ती सांगेल ते ऐकणे वैगेरे.....आज सोनालीने अंजलीला तयार केलं होतं तिचे केस वैगेरे थोडासा मेकअप वैगेरे सोनालीने ठिकठाक केले होते.....अंजली मनोमन समजली होती की आज तिला बळी साठी ही तयार करत आहे पण अंजली सगळ्याला साथ देत होती.....आयुष्यातले सगळ्यात अवघड काम ती आज करत होती ते म्हणजे चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवणे.....बाकी खऱ्या आयुष्यात अंजलीचा चेहरा नेहमी गंभीर गूढ असा असायचा.....आलिशान चहा,नाष्टा झाला.....तिकडून व्हीलचेअर वरून चंद्रकांतराव आले त्यांच्या सोबत एक बॉडीगार्ड दोन तगडे घोडे घेऊन आला होता....एकावर तर सोनाली जाऊन बसली....तसे चंद्रकांतराव अंजलीकडे बघत म्हणाले
"जा अंजली थोडी घोडेस्वारी करून ये"
तशी अंजली चेहऱ्यावर खोटे स्मितहास्य आणीत घोड्यावर बसली.....ते घोडे आपोआप यांत्रिकी पद्धतीने पळत होते अंजली फक्त बसून होती.....तिला माहीत होते इथल्या गोष्टी म्हणजे एखाद्या प्रोग्रॅम सारख्या आखीव आहेत त्यामुळे तिने हे सगळं जास्त सिरीयस घेतलं नाही....फक्त आपल्याला मज्जा येत आहे हे दाखवण्यासाठी सोनालीकडे बघून ती स्मितहास्य करत होती.....ठराविक भाग फिरल्यावर बरोबर एका ठरलेल्या टायमिंगला त्या दोघी पॅलेस मध्ये आल्या....इकडं तिकडच्या चर्चा करत करत त्या दोघी हॉल मध्ये पोहोचल्या....समोर जेवण तयार होते.....आज चंद्रकांतरावांच्या अक्षरशः मांडीवर मायरा बसली होती....ती एका गंभीर चेहऱ्याने अंजलीकडे बघत होती.....आज डायनिंग टेबल वर अंजली एकटी होती....त्या कुणाला शंका येऊ नये म्हणून मागील दोन दिवसाप्रमाणे तिने दाबून जेवायला सुरवात केली.....जेवण आटोपून ती आपल्या रूम मध्ये झोपायला गेली....तिला एक टायमिंग माहीत होता 4:30 त्यावर गजर लावून ती बेड वर पडून राहिली रात्रीचे सगळे सिन तिच्या डोळ्यासमोर फिरत होते बीपीनचे धडावेगळे झालेले मुंडके सतत तिच्या चेहऱ्यासमोर येत होतं पण ह्यावर हळहळ न व्यक्त करता त्या सगळ्यांना ठार कसे करावे ह्याची एकूण प्लॅनिंग अंजली करत होती अचानक 4:30 चा गजर वाजला आणि अंजली दरवाजा उघडून बाहेर गेली....बाहेर कुस्सीत स्मितहास्य करत सोनाली उभी होती....अंजलीने तिच्याकडे बघून स्मितहास्य केले आणि तिच्यामागे चालू लागली....आज हॉल मध्ये एक वेगळा सेटअप केला होता मोठ्या पडद्यावर मुव्ही बघण्याचा विचार होता बहुतेक.....चंद्रकांतराव अंजलीकडे बघून गूढ हसत होते....हॉल मध्ये अंधार करून एक मुव्ही प्ले केला गेला....सगळेजण मुव्ही एन्जॉय करत होते.....अंजलीने खूप असे हॉलिवूड मुव्हीज बघितले पण हा थोडा नवीन वाटत होता.....कदाचित आजपासून म्हणजे अंजली जगत असलेल्या वर्षांपासून 15,20 वर्षानंतरचा वाटत होता..म्हणजे भविष्यातील सिनेमा...अंजली सगळे तर्क लावत होती....तिला भूतकाळातून आणलं होतं का??.....काहीच कल्पना नाही....अखेर मुव्ही संपला इतक्यात रात्र झाली होती.....हॉल मधील लाईट ऑन झाला....तशी तिची नजर मागे फिरली...डायनिंग टेबलवर जेवण तयार होते....तिचे शेवटचे जेवण......आता मायरा तिच्याजवळ आली आणि तिचा हात पकडून टेबल जवळ नेऊ लागली....अंजली स्मितहास्य करत टेबलावर बसली आजूबाजूला एकदम आलिशान जेवण दिसत होतं....अंजलीने आपली प्लेट सजवली तिचे आवडीचे पदार्थ अगदी भरभरून घेतले.....ती ओळखून होती की हे जेवण जीवघेण आहे....हे खाणे म्हणजे मृत्यूला कवटाळणे....पण काहीच पर्याय नव्हता...त्यांना जराही संशय आला असता तरी तिला इथेच संपवलं असत....5 लोकांच्या नजरा अंजलीवर खिळल्या होत्या....अखेर मनोमन तिने गणपतीचे नाव घेतले आणि तिचे डोळे विस्फारले.....समोरच्या आलिशान जेवणाने आपला रंग दाखवला होता....वळवळणारे किडे,आळ्या,फुगलेले सडलेले बेडूक सडकी फळे ह्यांचे काळेकुट्ट अवशेष काळेकुट्ट घट्ट पाणी त्या टेबलावर दिसत होते....वास तर इतका घाण होता की कितीही धाडसी माणसाची हवा टाईट झाली असती....पण अंजली वेगळी होती.....चेहऱ्यावरची एक रेषा ही न हलु देता तिने हे सगळं खायला सुरवात केली....तिच्या समोर असलेले सडके बेडूक,अळ्या हे सगळं ती चेहऱ्यावर स्मितहास्य आणून खात होती....चंद्रकांतराव मोठ्या आनंदाने तिचं खाणं बघत होते....तिने तेवढंच फस्त केलं जेवढे तिने मागील दोन दिवसात खाल्लं होत....तिने ते काळे गटारीच्या पाण्यासारखे पाणी सुद्धा गटगट पिले आणि डोळ्यांवर गुंगी आल्यासारखे करू लागली....तशी सोनाली पुढे झाली आणि अंजलीला सावरून उभे केले...सोनालीने अंजलीला सावरत आपल्या रूम पर्यंत आणले रूम जवळ येताच जड डोळ्यांनी सोनालीचा निरोप घेऊन अंजली रूम मध्ये शिरली आणि आतून दरवाजा लॉक केला....अंजली लडखडत रूम मध्ये आली....तिने मनोमन गणपती स्तोत्र म्हणायला सुरवात केली.....बाजूला एक छोटा पाण्याचा हंडा ठेवला होता त्यातले हंडाभरून पाणी ती गटागट प्याली.....त्या जेवनरुपी विषामुळे अंजलीचे डोळे जडजड होत होते....तिला माहीत होतं की तिला जर झोप लागली तर तिचा मृत्य अटळ आहे....त्यामुळे तिने आपल्या नरड्यात बोटं घालून खाल्लेलं ते विष बाहेर काढायला सुरवात केली....तिने इतकं पाणी पिलं होत की ते पाणी बाहेर येताना त्या विषारी अन्नाला बाहेर आणत होतं....मनोमन ती गणपतीचे नाव घेत होती....तिने जीन्सच्या खिश्यातून मगाशी घोड्यावरून बागेत फिरत असताना तिने एक विशिष्ट गवताची पाने तोडली होती....ती गवताची पाने तोंडात कोंबून चघळून तिने परत पाणी पिले....डोळे उघडे राहण्यासाठी ती तोंडावर सतत पाणी मारत होती....परत परत नरड्यात बोटं घालून ते विष बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होती....एक दोन प्रयत्नात त्या गवताबरोबर तर काळे घट्ट द्रव बाहेर पडू लागले तिच्या पोटात गेलेले जिवंत किडे,अळ्या छोटे काळे बेडूक तिच्या पोटातून बाहेर पडत होते....आणि धूर बनून हवेत विरघळत होते....आता अंजलीचे पोट रिकामं झालं होतं....हे विष बऱ्यापैकी तिच्या पोटातून बाहेर पडले होते त्यामुळे ती आता सामान्य झाली होती.....तिला कमालीचा थकवा आला होता....ती काहीवेळ बेडवर पडून राहिली.....तिने हे मनोमन ठरवलंच होत की जरी इथल्या मायाजाळातुन बाहेर पडता आलं नाही तरीही चंद्रकांतरावाला जिवंत सोडायचं नाही....त्याला इथंच गाडून टाकायच मग भले तिला इथे अडकून आयुष्य काढावं लागलं तरी बेहत्तर.....अंजलीने घड्याळाकडे बघितलं.....10:30 वाजत होते....तिने दाराला कान लावले.....हॉल मधून येणारे हसण्याखिदळण्याचे बोलण्याचे आवाज बंद झाले होते.....ह्याचा अर्थ ते सगळे झोपायला गेले असावेत.....अंजली दबक्या पावलांनी त्या रूम मधून बाहेर पडली...........(क्रमशः)
