ROLEX

एक एक पायरी उतरत असताना एक कमालीचे नकारात्मक भाव राहुलच्या मनात येत होते....उग्र वासाने त्याचे नाक हालचाल करत होते.....त्या आलिशान बंगल्यात तास भर फिरल्यानंतर तिथलं वैभव बघून जे त्याचं मन प्रसन्न झालं होतं ते काही मिनिटात कमालीच निघेटिव्ह बनल होत अंग जडजड वाटत होतं...मन केंद्रित होत नव्हतं...इथे येताना त्या अंधाऱ्या जंगलात होणारा पाठलाग आणि आता परत ह्या अंधाऱ्या तळघरात??.....काहीतरी भयानक सुरू होतं इथे....जंगलात अनुभव जरी मनाचा खेळ मानला तरी इथे अचानक हे डार्क तळघर आणि त्यातून येणारा हा उग्र वास...सगळं काही डोकं बधिर करणारं होतं.....पण रिस्क तर घ्यायला पाहिजे होती.....हा रोलेक्स असले अघोरी उपाय करून श्रीमंत तर बनला नसेल??....आणि हे जर खर असेल तर आपल्यालाही त्या मार्गावर गेलं पाहिजे असं ठामपणे मनाला बजावून राहुल रोलेक्सच्या मागे अंधारात चालत होता.....चॅट वर ज्या पद्धतीने तो बोलला होता आता तसा सूर रोलेक्सचा वाटत नव्हता तो भलताच गंभीर झाला होता.....त्याची एनर्जेंटिक चाल आता भलतीच गंभीर आणि जडजड झाली होती...त्या अंधारात त्याचे पाय अचूक पडत होते आणि मुख्य म्हणजे मधेच हो...हो...हम्मम असे शब्द उद्गारून तो कुणाला तरी उत्तर देत होता.....तळघरात येताच तो कुबट वास भयानक वाढला होता.....वरती प्रशस्त बंगला आणि तितक्याच जागेत बनलेले हे तळघर....त्या तळघरात आधुनिक उजेड नव्हता खूप मोठं चौकोनी तळघर दोन तीन मशालीच्या मर्यादित उजेडात चमकत होतं......तिथे एक टेबल आणि खुर्ची ठेवली होती.....त्या खुर्चीवर जाऊन रोलेक्स बसला होता.....त्याच्या समोर एक मशाल पेटत होती......राहुल एका जागी येऊन उभा राहिला......त्या दोन तीन मशालीच्या उजेडात सगळं काही अस्पष्ट दिसत होतं....रोलेक्स ने घड्याळाकडे बघितले आणि त्याची हालचाल वाढली....मघाशी रेंगाळत चालणारा रोलेक्स कमालीचा स्फूर्तीत आला..डोळे बंद करून रोलेक्स त्या खुर्चीवर बसून काहीतरी पुटपुटत होता......ते शब्द राहुलच्या कानी पडत होते रोलेक्स कसलातरी मंत्रोच्चार करीत होता.....समोर लावलेल्या मशाली मुळे मागच्या भिंतीवर रोलेक्सची भली मोठी सावली पडली होती....अचानक राहुलने बघितलं की रोलेक्सची पडलेली काळी सावली तिचा मूळ आकार बदलून एखाद्या वादळाने हळणार्या सळसळत्या झाडाप्रमाणे हलत होती आपला आकार बदलून डुलत होती....राहुल प्रचंड घाबरला.....पैशाचा लोभ श्रीमंतीचा हव्यास कदाचित त्याला महाग पडणार होता.....त्याच्या मागची त्याची आकार बदलणारी सावली बघून राहुलची खात्री पटली होती की हा रोलेक्स कुणीतरी अमानवी आहे......तो डोळे वटारून राहुलकडे एकटक बघत होता ते बघणं एवढं तीक्ष्ण होत की त्या लालभडक डोळ्यातून पाणी येत होतं....राहुल प्रचंड घाबरला होता त्याने पळण्यासाठी आपला पाय उचलला तस त्याच्या लक्षात आलं की त्या तळघराच्या फ्लोर खालून त्याचे पाय कुणीतरी घट्ट पकडले आहेत....ती हातसदृश गोष्ट तिचं होती जिने जंगलात राहुलला खाली आपटलं होत....त्याच्यावर हल्ला केला होता....राहुल आता अगदी पुतळ्या प्रमाणे त्या जमिनीला चिटकून बसला होता....रोलेक्सचे मंत्रोच्चार थांबले तस त्याचं तोंड उघडलं गेलं.....तस काहीसं त्याच्या तोंडातून बाहेर पडत होतं....एखाद्या चिकट द्रव्यासारखं ते टेबलावर पडून आकार घेत होतं......रोलेक्सच्या तोंडातून टेबलावरून ओघळून ते त्या फ्लोर वर जमा होत होते.....ते जे काही होत ते बाहेर येताना त्या तळघरात लावलेल्या मशाली आता मोठ्या होळीसारख्या पेटत होत्या....त्यांच्या मोठ्या ज्वाला पूर्ण तळघर उजळून टाकत होत्या.....पूर्ण तळघर उजळून निघत होतं......मघापासून मर्यादित प्रकाशात असलेलं ते तळघर आता उजळून निघालं होत....त्या प्रकाशात आजूबाजूचे दृश्य बघून राहुलचे डोळे विस्फारले कारण एका कोपऱ्यात भलामोठा हाडांचा खच होता आणि दुसऱ्या कोपऱ्यात कवट्यांचा.....पण ती हाडे आणि कवट्या मानवी वाटत नव्हत्या.....बरेच प्राणी बळी दिले होते कदाचित.....बकरे,हरीण,रानगवे,बैल अश्या प्राण्यांची हाडे आणि त्यांच्या कवट्या सर्वत्र विखुरल्या होत्या.....त्या कवट्या मात्र एका रांगेत रचून ठेवल्या होत्या....कदाचित वेगवेगळ्या प्राण्यांचे बळी दिल्यामुळे प्रत्येक कवटी वेगळी दिसत होती बकर्यांच्या कवट्या जास्त दिसत होत्या त्यानंतर बैल,रेडे असे मोठे प्राणी सुद्धा कदाचित बळी दिले होते.....कदाचित खाणाऱ्याची भूक वाढली असावी बाजूला एक धारदार कुर्हाड दिसत होत्या त्याला लागलेलं रक्त वाळून गेलं होतं.....राहुल समजून चुकला होता की आता पुढचा नंबर त्याचा आहे.....जसं त्याचे पाय गोठले होते तस त्याचं तोंडही गोठलं होतं त्याच्या तोंडातून शब्द बाहेर येत नव्हते......तिकडे रोलेक्सच्या तोंडून बाहेर येणारी ती काळी ऊर्जा हळूहळू धुरासारखी राहुल समोर गोळा होऊ लागली.....ती राहुलच्या सर्व शरीराभोवती फिरू लागली....राहुलचे डोळे विस्फारले होते.....ती काळी शक्ती एखाद्या सापासारखी राहुल भोवती फिरत होती.....हे बघून रोलेक्स हसला त्याची साधना पूर्ण झाली होती.....त्या शक्तीने मागितलेल्या नरबळी देऊन रोलेक्स अजून ताकतवान आणि श्रीमंत होणार होता......डोळ्यात आलेले पाणी पुसून तो आता शेवटचे कार्य करायला निघाला होता.....ती कुऱ्हाड घेऊन राहुलचे शीर त्या शक्तीला अर्पण करून आपली अघोरी साधना पूर्ण करणार होता.....रोलेक्स कुर्हाड घ्यायला वळला....त्याच कुऱ्हाडीने त्याने शेकडो प्राण्यांचे बळी दिले होते आता आदेशानुसार नरबळी द्यायला चालला होता.....पण जसा तो कुऱ्हाड घ्यायला वळला तस तो थबकला कारण ती कुऱ्हाड तिथे नव्हती.....रोलेक्स तिला नेहमी एकाच जागेवर ठेवत होता पण आता ती तिथे दिसत नव्हती......रोलेक्स ती कुर्हाड शोधत होता अचानक त्याची नजर राहुलच्या दिशेने फिरली......मान टाकून राहुल उभा होता त्याचे डोळे बंद होते आणि त्या काळ्या धुराच्या रुपात असलेली शक्ती हळूहळू राहुलच्या नाकात घुसत होती......रोलेक्स घाबरला काहीतरी नियमबाह्य होत होते....राहुलचे ओठ हलत होते पण आवाज तितका स्पष्ट नव्हता.....ती शक्ती आता पूर्णपणे राहुलच्या अंगात घुसली होती......कुणीतरी त्याच्या कानात काहीतरी सांगावं आणि ते ऐकण्यासाठी त्याने मान थोडी तिरपी करावी ह्या स्तिथीत राहुल उभा होता.....राहुलने डोळे उघडले त्याच्या डोळ्यातले भाव थोडे क्रूर वाटत होते.....रोलेक्स कडे बघून तो थोडे अमानवी स्मितहास्य करत होता.....त्या मशालीच्या उजेडात राहुलचा चेहरा थोडा भयानक आणि पूर्णपणे बदलल्यासारखा वाटत होता.....तो एकटक रोलेक्स कडे बघत होता......त्याने आपला मागे असलेला हात पुढे आणला त्याच्या हातात ती भलीमोठी धारदार कुऱ्हाड होती......ती कुर्हाड बघून रोलेक्स प्रचंड घाबरला.....नेमका प्रकार त्याच्या लक्षात आला होता.....पैशाचा ताकतीचा प्रचंड माज असलेला बेदरकार रोलेक्स आता घाबरला होता रोलेक्सला आता खूप हलकं हलकं वाटत होतं कुणीतरी आपल्या अंगातली सगळी शक्ती ओढून घेतल्या सारखा तो अनुभव होता.....कदाचित त्याला आता आपण कुणी सामान्य व्यक्ती असल्याचा साक्षात्कार झाला होता.....आणि समोर हातात कुऱ्हाड घेऊन उभा असलेला राहुल आता त्याला घाबरवत होता त्याने तिथून पळ काढण्यासाठी पाय उचलला पण त्याचे पाय तिथेच गोठले होते.....त्याने पाय उचलण्याचा प्रयत्न केला पण त्याचे पाय त्या जमिनीचा भाग झाले होते......रोलेक्स घाबरला आणि किंचाळू लागला.....क्रूरपणे बघणाऱ्या राहुलकडे तो हात जोडून म्हणाला
"नाही नाही.....तू अस नाही करू शकत....मी....मी तुला 10 वर्ष सांभाळले....तुला हवं ते दिलं....."
हे ऐकून राहुल ती कुऱ्हाड जमिनीवर घासत स्मितहास्य करीत रोलेक्सच्या जवळ आला.....रोलेक्स हात जोडून विनवण्या करीत होत्या......राहुलने आपली नजर रोलेक्सच्या उजव्या हातावर मारली....त्या भेदक नजरेने रोलेक्सचा हात एकदम स्थिर झाला त्याला तो हलवता येईना विनवण्या करणारा तो हात हवेतच एखाद्या फांदी प्रमाणे स्थिर होता....रोलेक्स विनवण्या करत होता
"नाही....नाही.....मला सोड...तुला काय हवं आहे ते सांग मी आणून देईन तुला आआआह.....माझा हात आआआ"
अश्या आर्त विनवण्या त्या तळघरात घुमत होत्या...आवाज घुमत होता....राहुल कानात बोट घालून कान खाजवत उभा होता कदाचित रोलेक्सच्या त्या आर्त विनवण्या राहुलच्या कानाला त्रास देत होत्या......अचानक त्याने ती कुऱ्हाड वर उचलली.....तो घाव घालण्यासाठी तयार होता.....त्याने आपले टार्गेट फिक्स केले होते.....राहुल त्या स्थिर झालेल्या हाताकडे एकटक बघत होता.....तिकडे रोलेक्स विनवण्या करत होता.....राहुलने घाव घातला तश्या त्या धारदार कुऱ्हाडीने रोलेक्सचा उजवा हात मनगटापासून वेगळा केला.....रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या रोलेक्स वेदनेने तडफडत होता.....त्याचे उजव्या हाताचे मनगट त्या सोन्याच्या रोलेक्स घड्याळासोबत वेगळे झाले होते.....रक्त राहुलच्या तोंडावर उडाले होते.....रोलेक्सला तडफडताना बघून राहुल कमालीचा खुश होत होता....उजव्या हातातील घड्याळ वेगळे होताच.....रोलेक्स कमालीचा बदलला होता....मगाशी थोडा तगडा दिसणारा रोलेक्स आता कमालीचा अशक्त वाटत होता.....म्हणजे ते घड्याळ त्याच्या ऊर्जेचे स्रोत होत का?? असू शकते....तो हात अजूनही एखाद्या फांदी प्रमाणे स्थिर होता.....रोलेक्सने दुसऱ्या हाताने दाबून वेदना थांबवण्याचा प्रयत्न करीत होता पण काहीच फायदा नव्हता.....काहीवेळ वेदना सहन करून रोलेक्सने राहुल कडे बघितले.....त्याच्या चेहऱ्यावर जो स्वार्थी,लालची भाव होता तो कधीकाळी रोलेक्सच्या चेहऱ्यावर होता.....तो समजून चुकला होता की त्या पिशचिनीने आपला साधक बदलला आहे....होय ती एक पिशचिनी होती.....कधीकाळी श्रीमंतीच्या हव्यासाने रोलेक्सने एका अघोरी साधूला मारून तिला सिद्ध केले होते......तेव्हा जशी ती रोलेक्सच्या कानात बोलली असेल तस आता राहुलच्या कानात बोलली असेल.....राहुल डोळ्याची बुबुळे फिरवीत काहीतरी ऐकत होता मधेच हसत होता खुश होत होता.....रोलेक्सला तिने सुरवातीला सांगितलं होतं तसच कदाचित राहुलला ती सांगत होती ते ही आपल्या मादक स्वरात.....तिचा आवाजच एवढा मादक होता की तिला न बघताच फक्त तिच्या मादक आवाजाने राहुल तिच्या वश झाला होता....तिकडे रोलेक्स वेदनेने तळमळत होता.....त्याच्या हातातून रक्त गळत होतं पण ते खाली न पडता हवेत विरून जात होतं....कुणीतरी त्याचं रक्त शोषित होतं.....रोलेक्स ला प्रचंड वेदना होत होत्या करण तो आता एक सामान्य मनुष्य होता.....ह्या 10,15 वर्षात त्याच्यावर स्वतःचा ताबा नव्हता.....त्याने जे काही पाप केले होते ते सगळं काही रोलेक्सच्या डोळ्यासमोर फिरत होत......आपल्या परिवाराशी तो जे वागला होता त्याचा पश्चाताप त्याला आता होत होता......पण आता काही फायदा नव्हता कारण राहुलच्या रूपाने त्याच्यासमोर काळ उभा होता इथून सुटका नव्हती हे रोलेक्सला माहीत होते.....भूतकाळातसुद्धा त्याने त्या अघोरी साधू सोबत असच काही केलं होतं.....ती पिशचिनी त्या अघोरी साधूने कैद करून ठेवली होती पण अघोरी साधूला ठार मारून रोलेक्सने तिला सिद्ध केले होते.....ती आल्यापासून रोलेक्सचे दिवस पालटले होते.....तो प्रचंड यशस्वी झाला होता.....पैसा,अनेक सुखे तो उपभोगत होता.....जे सुख मिळत नाही ते ओरबाडून घेत होता.....त्या पिशचिनीचा काहीसा राक्षसी पणा रोलेक्स मध्ये आला होता....तो क्रूर,कपटी,लिंगपिसाट बनला होताच.....त्या पिशचिनीला रक्त पाजून तिच्याशी संभोग करून तो तिला खुश ठेवत होता.....रोलेक्स आणि तिच्यात मध्ये तिला कुणीही नको होते म्हणून तर तिने रोलेक्सच्या परिवाराला दूर केलं होतं......सगळं काही रोलेक्स समोर घुमत होत....त्याने केलेल्या व्यावसायिक प्रतिस्पर्धकांचे खून,जबरदस्ती पैशाच्या जोरावर तरुण मुलींच्या मजबुरीचा फायदा घेत त्यांच्यावर केलेले अत्याचार.....हे सगळं रोलेक्सच्या डोळ्यासमोर फिरत होत......तो एक साधा,सरळ एकमार्गी पुरुष होता पण ह्या पिशचिनीच्या येण्याने तो एक राक्षस बनला होता.....आणि त्याच प्रतिरूप अगदी समोर उभं होतं....आपल्या वेदना आवरत धापा टाकत रोलेक्स राहुलकडे बघत म्हणाला
"ती तुझा वापर करून घेईल......तुझ्याकडून वेगवेगळ रक्त मागवून ते पिऊन ती स्वतः ताकतवाण होईल.....ती तुला श्रीमंत तर करील पण तुझा परिवार तुझ्यापासून लांब ठेवेल......ती सगळी श्रीमंती फक्त मृगजळ आहे.....तुझी आत्मा त्या पिशचिनीच्या आधीन असल्यावर तुला ही राजेशाही सुख देईल ना कोणती स्त्री...तू कायम अतुप्तच राहशील.....स्वतःला तृप्त करण्यासाठी राक्षस बनशील..सगळं काही आसपास असून जन्मोजन्मीचा उपाशी असल्यासारखं वाटेल.....कारण तू तुझ्या आधीन नाही आहेस.....ती तुला कंट्रोल करत आहे.....तू फक्त तिचा एक मानवी चेहरा आहेस बाकी काही नाही.....तू जवान आहेस म्हणून तिने तुला निवडल आहे कदाचित...आता माझा उपयोग नाही तिला....तुझा उपयोग संपेल तेव्हा ती तुलाही ठार करील......अजून वेळ गे ..........."
पुढचा शब्द रोलेक्सच्या तोंडून यायचा आतच वाऱ्याच्या वेगाने राहुलच्या हातातील कुऱ्हाड फिरली.....रोलेक्सच शीर धडापासून वेगळं होऊन एखाद्या फुटबॉल प्रमाणे टप्पे खात बाजूला जाऊन पडलं.....राहुल जोरजोरात हसत होता......अचानक तो स्तब्ध झाला आणि डोळे गरगर फिरवू लागला....त्याच्या तोंडून काहीसे विचित्र मंत्र निघत होते.....डोळे पांढरे करून त्याने वर बघितले त्याच्या तोंडून तो काळा धूर बाहेर पडू लागला.....राहुलच्या गळ्याच्या शिरा ताणल्या होत्या धूर वेगाने बाहेर पडत होता आणि शीर नसलेल्या रोलेक्सच्या शरीराभोवती जमा होत होता...एखाद्या उपाशी हिंस्र प्राण्याला भूक लागावी आणि समोर भक्ष्य सापडावं तशी ती काळी शक्ती रोलेक्सच्या मृत शरीराभोवती गोळा झाली....राहुलच्या तोंडून सगळा धूर निघाला तसा राहुल धापा टाकत समोर बघत होता..... समोर सगळीकडे काळाकुट्ट धूर जमा झाला होता....राहुल कमालीचा अशक्त झाला होता....फक्त काही वेळ ती शक्ती त्याच्या अंगात होती....लडखडत तो रोलेक्सच्या खुर्चीवर येऊन बसला.....धापा टाकत तो त्या काळ्या धुराच्या चादरीकडे बघत होता....रोलेक्सच्या शरीराभोवती तो काळा धूर एखाद्या अजगरासारखा फिरत होता मधेच कडकड असा आवाज तिथून येत होता काही वेळ हा प्रकार सुरू होता......त्यानंतर तो काळा धूर आता एकवटू लागला होता....एखाद्या छोट्या चक्रीवादळा सारखा आकार घेत होता......रोलेक्सच्या जमिनीत अडकलेल्या शीर नसलेल्या धडा भोवती जमा झालेला तो धूर थोडा बाजूला झाला.....समोरचे दृश्य बघून राहुल पुरता हादरला.....एक शीर नसलेला हाडांचा सांगाडा..त्यावरचे सगळे मांस गायब होत खाऊन टाकलं होतं...इतक्या सफाईने की उरलेली हाडे एखाद्या लॅब मधील सांगाड्या इतकी स्वच्छ दिसत होती...त्याच्या अंगावर उंची कपडे गळ्यात सोन्याच्या चेन्स आणि डाव्या हातात सोन्याचे घड्याळ असा एकूण रोलेक्स अवतार होता....त्याच खाली पडलेलं शीर सुद्धा आता एका कवटीच्या रुपात पडलं होतं......हे सगळं बघून राहुल प्रचंड घाबरला होता.....काही मिनिटात रोलेक्सची अक्षरशः विल्हेवाट लावली होती......राहुल घाबरला होता......"कदाचित आपल्या बरोबर सुद्धा??"
असा एक विचार त्याच्या मनाला स्पर्शून गेलाच होता इतक्यात त्याला एक मादक हसू त्या तळघरात ऐकू आलं.....तो इकडे तिकडे बघत होता......समोरचा काळा धूर आकार घेऊ पाहत होता.....ते मादक हसू ऐकून राहुलच्या मनातली सगळी भीती गायब झाली आणि तो आवाज आता बंद झाला आणि राहुलच्या समोर होती ह्या जगातली सुंदर स्त्री.....अशी सुंदर स्त्री त्याने कधीच पाहिली नव्हती.....अश्या सुंदर देहाची स्त्री त्याने कधीकाळी एखाद्या पुरातन मंदिराच्या शिल्पात बघितली होती....तिथली पुरातन मादक आणि सुंदर शरीरसौष्ठवाची शिल्पे बघून ज्या स्त्रीची त्याने कल्पना केली होती ती अगदी तशीच होती....शरीरावरचे उभार इतके रेखीव होते की पुराणातले अप्सरांचे वर्णन फिके वाटावे.......अंगावर एकही वस्त्र नसलेली ती स्त्री वेगवेगळ्या अलंकाराने नटली होती.....तळघरात मशालीच्या उजेडात तिचा देह अगदी सोनेरी रंगात चमकत होता त्यासमोर तिने घातलेले सोन्याचे दागिने फिके पडत होते.....तिच्या येण्याने उग्र वासाने बरबटलेले ते तळघर आता मंद कस्तुरी सुवासाने बहरून गेले होते.....तिच्या नाजुळ कंबरेवरील कंबरपट्टा गळ्यातील सोन्याची साखळी सगळं काही खुलून दिसत होतं....ती पैंजनाचा छम छम आवाज करीत चालत येत होती.....तिच्या हातात राहुलने तोडलेला रोलेक्सचा हात होता....आपल्या सुंदर देहबोलीच्या विरुद्ध जाऊन ती तो तुटलेला हात आपल्या मोत्यासारख्या दातांनी कुरतडत येत होती.....त्या तुटलेल्या हाताचे रक्त तिचे ओठ अजून लाल करत होत.....तिचे सुळे दात थोडे मोठे असले तरी राहुलला भयानक वाटत नव्हते....तिने जवळपास त्या हाताचे सगळे मांस ओरबाडून खाल्लं होतं.....तिच्या हातात रोलेक्सच सोन्याचं घड्याळ होतं....ती अगदीच राहुलच्या जवळ आली आणि तिने आपली लांबलचक अमानवी जीभ बाहेर काढली आणि लांबूनच जीभ बाहेर काढून राहुलचा चेहरा चाटू लागली.....राहुल डोळे मिटून गप्पा उभा होता.....राहुलच्या हाताला काहीतरी जाणवलं.....तिने ते सोन्याचे रोलेक्स घड्याळ राहुलच्या हातात घातलं होत.....ते घड्याळ घालताच राहुलने एक उसळी घेतली.......त्याचा घसा कोरडा पडू लागला.....त्याच्या डोक्यात वेगवेगळे विचार फिरू लागले..त्याला कमालीची तहान लागली होती....समोरून तिच्या हसण्याचा मादक आवाज येत होता....त्या सुंदरीच्या हातात एक दारूची बाटली होती....कदाचित तिला राहुलची मनातली इच्छा कळली असावी..राहुल ने आपल्या दारुड्या बापाकडे बघून दारूला हात न लावण्याची शपथ घेतली होती पण त्याचा घसा प्रचंड कोरडा झाला होता आणि समोरच्या दारूबद्दल त्याच्या मनात एवढं आकर्षण निर्माण झालं की ती बाटली त्याने तोंडाला लावली.....एक...दोन....तीन अश्या अनेक बाटल्या त्याने संपवल्या तरीही त्याची तहान भागत नव्हती...त्याला ती आपल्या हाताने पाजवणारी सुंदर अप्सरा दिसत होती....तिचे डोळेच एवढे सुंदर आणि नशिले होते की राहुल त्या डोळ्यात हरवून गेला होता.....इतका की तिने विष जरी दिलं असत तरी तो न बघताच प्यायला असता..राहुल रोलेक्सच्या खुर्चीवर बसला होता आणि ती त्याच्या मांडीवर.....तिने त्याचे कपडे काढलेच होते.....ती राहुल कडून आपली तृप्ती करवून घेत होती.....राहुलचे डोळे जडजड होत होते.....त्याला कधी झोप लागली त्यालाच कळलं नाही त्याला जेव्हा जाग आली तेव्हा दुसऱ्या दिवशीची दुपार झाली होती.....राहुल स्वतःचे वजन थोडे जास्त जाणवत होते......त्याने आपल्या हाताकडे बघितले त्याच्या उजव्या हातात रोलेक्स घड्याळ होते.....जड पावलांनी तो त्या तळघरातून वरती आला.....त्याने स्वतःला आरश्यात बघितले.....आधीपेक्षा तो जास्तच हॅन्डसम दिसत होता...चेहऱ्यावर आलेले दारिद्र गायब झाले होते....तो आपला देह न्याहाळत त्या बंगल्यात नग्न फिरत होता.....खुश होऊन हसत होता....पूर्ण जग आपल्या काबीज असल्याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर होतं..रोलेक्सच्या त्या आलिशान बंगल्यात काहीवेळ नग्न फिरल्यानंतर त्याने रोलेक्सचे महागडे कपडे अंगावर चढवले.....राहुलने परत स्वतःला आरश्यात बघितले.....त्याला अंधुकशी ती पिशचिनी मागे उभी असल्याचे दिसली....ती राहुलकडे बघून स्मितहास्य करत होती.....राहुलने जाताना रोलेक्सच्या पूर्ण बंगल्याला आग लावली...ती आग त्याच पिशचिनीने लावायला सांगितली होती....ती राहुलच्या कानात आपल्या मादक स्वरात बोलत असायची....त्या आगीला रोलेक्सची महागडी सिगार पेटवून तो झुरके घेऊ लागला...राहुल रोलेक्स पासून खूप प्रभावित होता...त्याची लाईफस्टाईल त्याला प्रचंड आवडायची..जळत्या बंगल्याकडे बघत त्याने आपले इन्स्टाग्राम उघडले आणि त्याने आपले नाव राहुल खोडून रोलेक्स असे सेट केले......पैसा,संपत्ती, अशी अनेक सुखे काळ्या शक्तीने ओरबाडून काढायला राहुल उर्फ रोलेक्स निघाला.......एक आलिशान लाईफ जगायला राहुल निघाला होता......पण त्यात तो आपली भूक भागवत होता की त्या पिशचिनीची??.....हे कळण्यासाठी त्याचे स्वतःवर नियंत्रण तर हवे होते ना??......आता तो आपल्या अनियंत्रित हव्यासाबरोबर एका पिशचिनीची भूक भागवायला निघाला होता.....ह्याचा अंत कुठे होणार हे सुद्धा आता तिच्याच हातात होते.......(समाप्त)

(कथा कशी वाटली?? ह्याबद्दल आपले बहुमूल्य अभिप्राय कमेंट मध्ये जरूर नोंदवा......धन्यवाद

)


