कथा :- महरूम -भाग :- ८
#लेखक :- चेतन साळकरHorrorostory_tube_present
#©सर्व हक्क लेखकाकडे बांधील आहेत
सूचना :-
• कथेचे एकूण "10" भाग असतील.
• कथा रोज "संध्याकाळी 7" वाजता पोस्ट होईल.
• कथेत कुठल्याही धर्माचा अवमान झालेला नसेल.
कथेचा भाग - ७ ची लिंक खाली दिलेली आहे
https://marathighoststories.blogspot.com/2020/12/blog-post_19.html
आदित्य आणि विनिता ने समोर पाहिले तर समोर घडणारी घटना असह्य होत होती. . . . .
शोफी ने देखील पाहिलं तर समोर जो दगड होता , ज्याभोवती तारेचे कुंपण होते ते कुंपण हळूहळू तुटायला लागले. कट कट करून एकेक तारा तुटायला लागल्या. त्यातून प्रचंड वाऱ्याचा झोत आणि मंद असा प्रकाश बाहेर आला. ते पाहून आदित्य आणि विनिता घाबरले. शोफी ने घातलेली माळ जशी हलू लागली तसा तो दगड संपूर्ण उघडा पडला. शोफी लांब झाला आणि त्या दगडा समोर लोटांगण घातलं. तोंडाने काय बडबडू लागला देव जाणे , पण त्या दोघांना काही कळले नाही. त्याने तिथले तीन दगड उचलले आणि एकावर एक असे धरले आणि तोंडाने मंत्र म्हणू लागला
शोफी :- उल फक्र जीनेअस्कल एहतियाज अल्हखं || रुफ फकान शहादे ईल् अकाह ||
बघता बघता त्या तीनही दगडांचा मनोरा तयार झाला. एकावर एक असे तीन दगड रचले गेले. ते शोफी ने खाली ठेवले. त्याभोवती एका काडीने गोल वर्तुळ आखले. तो त्या समोर बसला. डोळे बंद केले. वारा आहे तसाच घमासान उधळत होता. किंचित डोळे उघडे रहावे अशी परिस्थिती होती. शोफी मात्र अगदी बेफिकीर पणे बसला होता. त्यामधून तो किती ह्या गोष्टींमध्ये तरबेज झाला होता , ते कळून येत होते. झाले, थोड्यावेळाने शोफी गदागदा हलू लागला. त्याचे अंग थरथरू लागले, डोळे बंदउघड होऊ लागले, हात जे गुढग्यावर होते ते तडतडू लागले, मान थरथरू लागली, अचानक तो उठला आणि एक गगनभेदी ओरड त्याने आसमंतात दुमदुमावली. सगळं रान उठलं. अनेक पक्ष्यांचे आवाज चित्कारत बाहेर पडले, कल्लोळ उठला , सैतान जागृत होण्याचे ते संकेत होते की काय असे वाटले. ते खरेच झाले. शोफी ने गगनात बघतच आरोळी ठोकली.
शोफी :- हे , पाक - ए - इस्लाम शोफी मांगता हैं , ए खुदा दे बक्ष इस आदम को. कर सामने जो करा हैं अल्लाह ||
ते दोघेही घाबरून ते काय चालले होते ते बघत होते. अचानक वारा हेळकावणी देत उसळून आला आणि बघता बघता वाऱ्याचा एक झोत गोलाकार ठिकाणी घुमू लागला. सगळे मातीचे कण एकवटले. गोल गोल घुमुन वारा बेभान झाला आणि अचानक अस्पष्ट होत जाऊन नाहीसा झाला आणि त्या आतमध्ये दिसून आले , दोन अमानवी देह. निरीक्षण करून पाहिले तर कळले की तिचं दोन मुले होती, जी इतके दिवस आदित्य आणि विनिता दोघांना त्रास देत होती. झाले हळूहळू जे उलगडायला हवं होतं ते उलगडायला प्रारंभ झाला. ती दोन मुलं कोण होती हा प्रश्न मागचे दोन दिवस आदित्य आणि विनिता ला होताच. त्या दोन मुलांचं त्यांना त्रास देण्याचा नेमका संबंध काय होता ? हे त्यांना जाणून घ्यायचे होते. शोफी पुढे सरसावला. त्याने डोळे उघडले आणि समोर त्या दोन मुलांना बघून त्याने हातात एक काठी घेतली. त्या काठीला त्याने एक काळा धागा बांधला आणि ती काठी त्याने त्या दगडासमोर धरली. बघता बघता तो धागा लाल होऊ लागला. शोफी ला जाणून घ्यायचे होते की ती दोन मुले का त्रास देत आहेत आणि त्यांच्यापासून धोका आहे का ? यासाठी तो धागा त्या मुलांसमोर धरून ते जाणता आले असते. तो काठीला लावलेला धागा त्या मुलांसमोर धरायच्या आधीच त्याच्या हातातून ती काठी उडवली गेली. पुढे काही समजायच्या आतच तिकडे विनिता च्या अंगाची लाहीलाही झाली. ती झटके देऊ लागली. तिने खूप सावरायचा यत्न केला परंतु सगळे निष्फळ. या अमानवी शक्तिंसमोर आपण मनुष्य काहीच करू शकत नसतो हे खरे. आदित्य ने तिला सावरायचं खूप प्रयत्न केला पण निरुपाय झाला. विनिता खाली कोसळली. आदित्य आणि शोफी ने तिला धरायचा प्रयत्न केला तर तिला फरफटत खेचले गेले. ती प्रचंड वेगाने फरफटत जाऊ लागली. आदित्य आणि शोफी दोघेही मागून धावू लागले. ती दृश्य स्वरूपातील दोन मुलं तिथेच उभी होती. विनिता खेचली जात होती. मागून आदित्य धावत होता , त्यामागून शोफी ही धावत होता. शोफी ने जाताजाता मागे वळून पाहिले , तर ती दोन मुले बाजूला एके ठिकाणी बघताना दिसली. जणू ती कुठेतरी बघत असावी.
शोफी :- आप विनिता को सांभाळा. मी आलोच
असं त्याने आदित्यला ओरडून सांगितले आणि शोफी पुन्हा मागे आला. त्याने त्या दोन मुलांच्या हालचाली पहिल्या. पुन्हा तो इरेला पेटला. त्याने पुन्हा मंत्रोच्चार सुरू केले. दगडांच्या मण्यांच्या माळेतील एक दगड त्याने तोडून काढला. तो दगड त्याने त्या दगडी देवासमोर धरला. पुन्हा मंत्र म्हंटले आणि तो दगड त्याने त्या दोन मुलांजवळ फेकला. तशी मुलं विव्हळू लागली. त्यांना त्रास होऊ लागला. ते गडबडू लागले. त्यांच्या भस्म भरल्या अंगावर व्रण उठू लागले. शेवटी न राहवून त्या दोन मुलांनी बाजूला असलेल्या एका जागेकडे हाताचे बोट दाखवले. शोफीने अंदाजे ती कुठली जागा असावी ह्याचा शोध घेऊ लागला. . .
तोपर्यंत तिकडे विनिता मात्र हैराण झाली आणि तिच्यापेक्षा जास्त हैराण झालं तो आदित्य. ती जंगलातल्या प्रत्येक खड्ड्यातून , काट्याकुट्यातून जखमी होऊन निघाली होती. अंगातून रक्ताची धार लागली होती. पाय - हात सोलून निघाले होते. चेहऱ्यावर ही जखम झाली होती. आदित्य अक्षरशः दमला होता. एका झाडाला जाऊन ती आपटली. डोक्याला मार बसला. मोकळ्या केसातून रक्ताच्या धारा सुरू झाल्या. आदित्य ला तीची काळजी वाटू लागली. त्याने तिला सावरले. पाठीत हात घालून उचलून धरले. ती बडबडत होती. तिला काय होत होते तिलाच कळले नव्हते. ती अर्धिमेली झाली होती. अंगात अजिबात त्राण उरले नव्हते. तिला आदित्य सावरत होता. जंगलातील ते सर्वांचे युद्ध पेटले होते. अमानवी शक्ती आणि मनुष्य ह्याचं युद्ध टिपेला पोहोचले होते. तोपर्यंत तिकडून शोफी बोलावत असल्याचा आवाज आदित्य ने ऐकला आणि त्याला प्रतिसाद देऊन ती तिला उचलून घेऊन धावत निघाला. शोफी पर्यंत पोहोचला. विनिता ला हातातून खाली जमिनीवर ठेवले. शोफी आणि आदित्य दोन पावलं पुढे सरकले आणि शोफी ने तोंडाने फक्त "बघ" असे खुणावले. आदित्य बघू लागला. . . . .
शोफी ने त्याच दगडांच्या माळेतील एक दगड आणखी काढला आणि तो एका विशिष्ट जागेवर मंत्रून फेकला. ती दगड घरंगळत जाऊन एका जागी थांबला आणि त्या दगडाचा रंग काळा पडला. चांगला करडा असलेला त्याचा रंग बदलला. शोफी ला खात्री पटली इथेच काहीतरी असायला हवे. ती जागा खणून काढावी लागेल असे शोफी म्हणाला. आदित्य पुढच्या मिनिटाला धावत घरात गेला आणि कुऱ्हाड घेऊन आला. दोघेही कामाला लागले. प्रत्येक घाव घालता आदित्यला मनात घालमेल उठत होतील. काय असेल खाली ? त्यांनतर तरी विनिता ठीक होईल ना ? असे अनेक प्रश्न मनात घोळत तो जोरदार घाव मातीत खुपसत होता. जेवढा वेळ ते दोघे मती उकरत होते तेवढा वेळ विनिता बाजूला पडून होती. तिला शुध्द होती की नव्हती ते तिला सोडा , ह्या दोघांनाही समजत नव्हते. वातावरण गंभीर झाले होते. कितीतरी रहस्य उगडणार होती पण त्यासाठी लागणारी मनाची आणि शरीराची तयारी मात्र सर्वांची होण गरजेचे होते. पुण्यात आपल्या घरात आनंदात असणारे दोघे ही तिथे कांडोवन मध्ये येऊन अडकले होते. ते लोकं खोदण्यात मग्न होते. जवळजवळ दीड - दोन फूट खोल खणून झाल्यावर आदित्यच्या कुऱ्हाडीला काहीतरी कडक लागले. दोघे ही थांबले. काय असावे ? हा अंदाज लावत असताना आदित्य ने आणखी एक कुऱ्हाडीचा घाव घातला तसा खाली असणाऱ्या मातीचा गच्चा उचलला गेला. शोफी सुध्दा काहीकाळ दचकून गेला. काय हा प्रकार ? ह्याचं काय संबंध ? कसं शक्य आहे ? आत काय असेल ? असे अनेक प्रश्न दोघांचेही मुखावर नाचायला लागले पण त्यांची उत्तरे मात्र काळाच्या गर्भात रहस्यमयी स्वरूपात कोंडून ठेवलेली होती. ती दारं एकदा उघडली की सारं नितळ पाण्यासारख स्पष्ट होईल. प्रश्न हा होता की ते दार उघडायचे कोणी ? शोफी हे माध्यम झाले. पलीकडची बाजू कोणी पहिली आहे ? कशी असेल ? काहीतरी भयानक अनुभव आला तर ? शेवटी अंताला जायचे आहेच.
एक आणखी जोरदार घाव आदित्य ने मातीवर घातला तशी विनिता पेटून उठली. तिच्यातला भयानक अवतार बाहेर येऊ लागला. समोर जी दोन मुलं उभी होती त्या आत्मा आहे त्या अवस्थेत धावत सुटल्या. त्या विनिता च्या दिशेने येऊ लागल्या. आदित्य ने ते पाहिले , तो घाबरला. तो देखील हातातील कुऱ्हाड बाजूला टाकून विनिता कडे धावला. शोफी ने थांबवले पण आदित्य काही हाताला लागला नाही. शोफी ला काही गोष्टींचा हालचालींच्या मुळाशी जायचे होते , त्यासाठी त्याला जे घडत होते ते घडू द्यावे लागणार होते. त्या दोन मुलांच्या आत्मा विनिता कडे धावत जाऊन काय करणार ? हे त्याला पहायचे होते. आदित्य धावत सुटला आणि त्या दोन आत्म्याच्या आणि विनिताच्या मध्ये गेला. सरतेशेवटी त्या अमानवी अनैसर्गिक योनी आहेत, त्यांची आणि मनुष्याची शक्ती ह्यामध्ये कितीतरी पटींनी अंतर असत. त्यांच्या शक्तीपुढे माणसाची शक्ती शुल्लक आहे. तेच झाले त्या दोन मुलांच्या आत्मा विनिता कडे धावताना मध्ये गेलेल्या आदित्यला जोरदार दणका बसला आणि तो शंभर फूट लांब जाऊन पडला. त्याला मार बसला.
शोफी ते सगळं पाहू लागला. ती दोन्ही मुलं विनिता कडे धावली आणि तिच्या अंगात नाहीशी झाली. . . . . . .मग
भाग - ९ पुढील टप्प्यात
https://marathighoststories.blogspot.com/2020/12/blog-post_69.html
• या भयकथा व्यतिरिक्त माझ्या आणखीन कथा वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा