ब्रेन वॉश...
लेखक:- अॅड.अंकुश नवघरे. (पालघर)
(ज्योतिष विशारद)
प्रकाशन:- दि.१४.०७.२०२४
(ह्या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत)
..... काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. एक कुटुंब माझ्या ऑफिसला त्यांच्या मुलाची पत्रिका दाखविण्यासाठी आले होते. त्यांना ऑफिसला येऊनच मार्गदर्शन घ्यायचे होते, कारण त्यांची समस्या वेगळी होती. त्यांचा 16 वर्षीय मुलगा, अचानक विचित्र वागू लागला होता. एकटा एकटा राहू लागला होता. त्याला अंधारात राहायला आवडायचं, काळे कपडे घालायला आवडायचं, एक विशिष्ठ प्रकारचं संगीत ऐकायला आवडायचं. ह्या वयात मुलांना कशाचीही लागण होऊ शकते. सुरवातीला त्याच्या ह्या वागण्याकडे नॉर्मल असेल म्हणून कोणी लक्ष देत नव्हत. त्यानंतर मात्र त्याच्यात खूप जास्त बदल होऊ लागले. तो शून्यात हरउ लागला, तासंतास एकटा राहायचा, त्याचे केस नख कपण्याकडे लक्ष नव्हत, त्याला भूक लागत नव्हती, तो जणू स्वतः मध्ये नव्हताच. मी त्यांना म्हटल की मला आधी ह्याची पत्रिका पहावी लागेल, तर मी पुढे जाईन. ते तयारच होते, त्यांना मुलाल ह्यातून लवकर बाहेर काढायचं होत. आपल्या संगोपनात काय कमी राहिली किंवा आपले असे काय दुर्लक्ष झाले हेच ते विचार करत असायचे. हसत खेळत असणारं घर एकदम सुन्न पडल होत. घरातील आनंदच कुठेतरी निघून गेला होता. ह्या प्रकारच्या समस्येचा शोध सुरवातीला माझे एक फेसबुक वरील अध्यात्मिक मित्र (त्यांचे नाव इथे देऊ शकत नाही) ह्यांनी लावला होता. ही सर्व लक्षण त्यांनी शोधून काढली होती, त्यानंतर मी त्यावर रिसर्च चालू करून उपचार पद्धती शोधून काढली.
.... मी त्यांना म्हटल की मी आधी पत्रिका पाहीन, नाहीच काही झाल तर तुमची वास्तू पहावी लागेल, जस मी सांगेन तस करावं लागेल, सर्व उपाय मग ते खर्चिक असोत किंवा नसोत करावे लागतील, तुम्हाला जमणार असेल तरच आपण पुढे जाऊया. कारण तुमच्या मुलाच्या संदर्भात आता मला जे intuation येत आहेत ते खूप विचित्र आहेत. इथे त्याच्यावर उपाय करंताना माझ्याही जीवावर बेतण्याची परिस्थिती वाटत आहे. कारण आपण ज्या गोष्टींना आता विरोध करणार आहोत त्या ऊर्जा खूप शक्तिशाली आहेत. अनंत काळापासून चालत आलेल्या आहेत. त्या जवळजवळ तुमच्या मुलाच्या रक्तातच भिनल्या आहेत असे म्हणायला हरकत नाही. आपली प्रत्येक खेळी त्यांना कळणार आहे, ते आपल्यावर आताही नजर ठेऊन आहेत. त्यामुळे सर्वकाही आपल्याला सावध पणें करावे लागणार आहे. ह्या अशा शक्ती शक्यतो ग्रहण काळात मनुष्याच्या शरीरात किंवा अंतर्मनात प्रवेश करत असतात, आणि पुढच्या ग्रहणापर्यंत आपली पाळेमुळे त्याच्यात घट्ट रोवून त्या ग्रहणात आपला अंतिम हल्ला करत असतात. जे ग्रहण काळातील नियम पाळत नाहीत, अशा लोकांच्या बाबत हे घडलेले मी ह्यापूर्वी पण पाहिलेले आहे. त्यामुळे आता आपल्याला घाई करावी लागणार आहे, नाहीतर काहीही अघटीत घडू शकते. त्यांनी सर्व गोष्टीला संमती दर्शवली. त्यांनी आजवर खूप मनोसोपाचार तज्ञांवर खर्च केला होता, मंदिराचे उंबरठे झिजवले होते, तांत्रिक मांत्रिक केले होते, पण कुठेच गुण आला नव्हता, कसा येणार, कारण हा डॉक्टर ने बरा होणारा आजार नव्हताच, किंवा सहज सापडेल असंही काही नव्हत. काही गोष्ठी आपल्याला लक्षणांवर पडताळून पाहाव्या लागतात. एक शेवटची संधी म्हणून त्यांनी माझा पर्याय निवडला होता. मी त्याची पत्रिका पाहायला सूरुवात केली. तो पण सोबत होता. जशी मी पत्रिका पाहायला सूरवात केली तशी त्याची चुळबुळ सुरू झाली, आधीपासून तो माझ्याकडे रोखून पाहत होता, नंतर नंतर त्याने दात ओठ खायला सुरवात केली. मी ह्या क्षेत्रातील असलो तरी मला त्याचं ते तस खाऊ की गिळू पाहून अस्वस्थ वाटत होत. त्याची मेष रास असून त्यावेळी मेषेवर राहू चालला होता. त्याच्या महादशा अंतर्दशा आणि राहूचे लग्नातील मुळ स्थान पाहता ही बाधा आहे, हे पत्रिका पण दाखवत होती, पण हे नॉर्मल बाधे पेक्षा अजून काहीतरी वेगळ आहे हेही जाणवत होत आणि तेच मला शोधून काढायचं होत. पत्रिकेबरोबर अध्यात्माचाही आपला सूक्ष्म अभ्यास असेल तर आपण काहीही शोधून काढू शकतो.
..... मी त्याला बाहेर बसण्यासाठी घेऊन जायला सांगितले. त्याच्यासोबत त्याचे नातेवाईक होते ते त्याला बाहेरच्य खोलीमध्ये बसायला घेऊन गेले. तो जेव्हा माझ्या केबिन मधून बाहेर पडले त्यावेळी तो थोडा शांत झाला. त्याच्या चेहऱ्यावरचा ताण कमी झाला होता. माझ्या काही तीव्र साधना मुळे कोणीही अशा पद्धतीची व्यक्ती माझ्यासमोर जास्त काळ बसू शकत नाही. मी त्याच्या आई वडिलांच्या चेहऱ्याकडे पाहिले, त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक मुद्रा होती. मी बोलायला सुरूवात केली. विषय खूप गंभीर आहे. ह्याच्या बाबत जो प्रकार झाला आहे तो साधा नाही. हे काही भुतं प्रेत असा कुठलाही प्रकार नसून त्याहूनही वेगळं आणि विचित्र आहे. हे सर्व तुम्हाला समजावणं कठीण आहे, तरीही मला जसे जमेल तसे सांगतो. त्याआधी मला काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. मला तुमच्या मुलाची दिनचर्या जाणून घ्यायची आहे. तो सकाळी उठल्या पासून रात्री झोपे पर्यंत काय काय करतो हे सांगा. त्यांनी सर्व सांगायला सुरूवात केली. त्यात काही गोष्ठी थोड्या विचित्र होत्या. जसे काही दिवसांपासून त्यांच्या मुलाला काही विशिष्ठ प्रकारचे संगीत ऐकायची सवय लागली होती, त्याला अंधारात बसायला आवडत होत, काळे कपडे घालायला आवडत होत. बऱ्याच अशा विशिष्ठ गोष्ठी करायची त्याला सवय लागली होती जी सामान्य वागणुकीची मुल करत नाहीत. हळूहळू त्याचे प्रमाण वाढत जाऊन तो घरातील सर्वांपासून अलिप्त राहू लागला होता. त्यांच्या कडून माहिती घेतल्यानंतर मी त्यांच्याशी बोलायला सुरवात केली.
.... बघा हे प्रकरण वाटते तितकं सरळ नाही. ह्या जगात खूप विचित्र अशा गोष्ठी आहेत, ज्या आपल्या सर्वांच्या आकलना पलीकडच्या आहेत, ज्याचा आपण कधी विचारही केले नसेल. परंतु ह्या गोष्ठी आपल्या आयुष्यात येण्यामागे काही प्रमाणात आपणही जबाबदार आहोत. कारण प्रत्येक गोष्टीची सुरवात आपल्याकडूनच होत असते. अशा गोष्ठी आपोआप आपल्या आयुष्यात येत नाहीत तर त्या आधी आपली परवानगी मागत असतात, आणि आपण ती दिली तरच त्या आपल्या जीवनात येत असतात. अध्यात्मात परवानगीला खूप महत्त्व आहे. जसे आपण घराच्या दरवाजाला उंबरठा लावतो. तो जेमतेम 1 ते दीड इंच उंच असतो, पण ज्या घराला उंबरठा असतो त्या घरात सहसा नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाहीत. आता त्या शक्ती इतक्या निर्बल असतात का, की इतका लहान उंबरठा ओलांडू शकत नाहीत. परंतु अध्यात्मातील किंवा निसर्गातील म्हणा तो एक अलिखित नियम आहे, की परवानगीशिवाय आत येऊ नये, माणूस सोडून इतर सर्व शक्ती हे नियम पाळत असतात, उंबरठा म्हणजे एक प्रकारची लक्ष्मण रेषा, तुम्ही त्यांना आतून बोलविल्याशिवाय त्या आत प्रवेश करणार नाहीत. पण आपण काय करतो की उंबरठा स्वच्छ ठेवत नाही, त्यावर घाण साठल्यावर त्या शक्तींना आपली परवानगी घ्यायची गरज पडत नाही. हे एक उदाहरण आहे.
.... हल्ली सोशियल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. त्यामुळे काही प्रकारच्या शक्ती संक्रमणासाठी पण ह्या प्लॅटफॉर्म च उपयोग होऊ शकतो किंवा केला जात असेल ह्याकडे कोणाचेच लक्ष नाही. सोशल मीडियाचा वापर वेगवेगळ्या माणसांकडून वेगवेगळ्या कामासाठी केला जातो. कोणी टाईम पास साठी करतो तर कोणी पैसे कमावण्यासाठी करत आहे. असाच हल्ली प्रत्येक जण कमी जास्त प्रमाणात सोशल मीडियाचा वापर करत आहे. त्यावर रिल्स, व्हिडिओ जास्त प्रमाणात पाहिले जातात. आपण स्क्रोल करत राहतो, पहात राहतो. एकदा का फेसबुक यूट्यूब उघडले की अर्धा अधिक तास कसा निघून जातो काही कळत नाही. कधी कधी आपण काय पाहतो ह्याकडेही आपले लक्ष नसते. कधीकधी ते सर्व आपल्या डोक्यावरून जात असते, तरी आपण बघत राहतो, घरी असलो तर काही वेळाने आपल्याला झोप येते. झोपेत पण आपल्याला त्याच गोष्ठी दिसत राहतात. कारण त्या गोष्ठी आपल्या अवचेतन मनात जात असतात. एखादा व्हिडिओ किंवा रिल पाहताना आपले लक्ष नसले तरी आपल्या अंतर्मनाकडून ती प्रत्येक गोष्ट नोट केली जात असते, आपल्याला ह्याची कल्पना पण नसते. मी अशी कित्येक लहान मूल पाहिली आहेत जी दिवसभर कार्टून पाहून रात्री झोपेत त्याप्रमाणे हाव भाव करत असतात. कार्टून मुळे कित्येक लहान मूल स्वमग्न झाल्याच्या केसेस माझ्याकडे आलेल्या आहेत. पाठांतराच्या एक नियमानुसार जेव्हा आपण एखादी गोष्ट एकाग्रतेने एकच वेळी पाहतो, ऐकतो आणि वाचतो तेव्हा ती आपल्या अवचेतन मनात अगदी फिट बसत असते. तसाच काहीसा हा प्रकार आहे. ह्याचा फायदा हल्ली सोसियल मीडियाच्या माध्यमातून घेताल जात असल्याचे दिसत आहे. एक मिनिटाच्या रिल मध्ये महत्त्वाची गोष्ट फक्त 5 सेकांदाची असेल पण ती तुमच्या अंतर्मनात उतरवण्या साठी 55 सेकंद तुम्हाला काही काही सांगितले जाते, तुमचे लक्ष एकच गोष्टीवर केंद्रित केले जाते, तुमच्या बाह्य मनाला भुलवले जाते, आणि मग त्यांचा विषय अलगद तुमच्या अंतर्मनात उतरवला जाऊन तुमच्याकडून हेतू साध्य करून घेतला जातो. अंतर्मनाला भुलवणे सोप असते पण त्यासाठी बहिर्मनाला गाफील ठेवावे लागते, हे कित्येक यूट्यूबर्स ना जमलेले आहे. मनोरंजनाचा भाग सोडला तर सर्व ठीक आहे पण आता ह्या कलेचा वापर काही चुकीच्या कामासाठी पण काही लोकांकडून केला जाऊ लागला आहे.
.... कित्येकदा आपण कुठले व्हिडिओ पाहतो, हे आपल्यालाच माहित नसते. हे लहान मुलांच्या बाबत जास्त होते. हल्ली काही वेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचे ट्रेण्ड आलेले आहे, त्यात money meditation सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. ह्या व्हिडिओमध्ये असे सांगितलेले असते की हा व्हिडिओ जो व्यक्ती ऐकेल त्याच्या आयुष्यातील पैशाचा अडचणी किंवा मनी ब्लोकेजेस दूर होतील. ह्या व्हिडिओ मध्ये काही विशिष्ठ प्रकारचे ध्वनी असतात. हे व्हिडिओ आपल्याला झोपून पाहायचे असतात, किंवा पहात पहात झोपायच असते. म्हणजे त्या व्हिडिओ मधील ध्वनी तरंग आपल्या अवचेतन मनात जातील अशी ती प्रक्रिया असते. असे कित्येक व्हिडिओ असतात, जसे नुसते meditaion चे व्हिडिओ, मनी meditation चे व्हिडिओ, कॉन्फिडन्स वाढविण्याचे व्हिडिओ, शांत झोप लागण्याचे व्हिडिओ किंवा ऑडियो. त्यांना ब्रेनवेव्ह entrainment audio असेही म्हणतात. काही व्हिडिओ कीव ऑडियो काही लोक आपल्याला घरात लावायला सांगतात, त्याच्या ध्वनी तरांगांमुळे आपल्या घरातील वातावरण शुद्ध होईल, नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल असे सांगितले जाते. मनुष्याचा स्वभाव असा आहे की एखादी अशी कुठली गोष्ट त्याला फुकट मिळाली की तो मागचा पुढचा कुठलाही विचार न करता ती करायला सुरु वात करतो. आपल्या पैकी खूप लोक असे व्हिडिओ, मेडीटेशन संगीत ऐकत असतात, पण त्यांचा काय चांगला वाईट परिणाम होऊ शकतो ह्याचा काहीच विचार करत नाही.
.... ही एक प्रक्रिया आहे, जी अत्यंत सावधपणे सुरू असते. आपण ऐकत असलेल्या कित्येक संगीत किंवा धून मध्ये असे काहीतरी धोकादायक असेल ह्याची आपल्याला कल्पना पण नसते. कारण ध्वनिला खूप महत्त्व आहे. आपण कुठला ध्वनी ऐकतो त्यावर आपल्या वर होणारे चांगले वाईट परिणाम अवलंबून असतात. जसे आपण एखादा श्लोक ऐकतो त्यामुळे आपले भय निघून जाते, एखादी हॉरर धून ऐकतो त्यामुळे आपल्याला भीती वाटते, हे सर्व ध्वनीचे तरंग करत असतात. म्हणून आपण नेहमी चांगलेच ऐकले पाहिजे. आता इंटरनेट कीव इतर मीडियाच्या माध्यमातून आपल्याला काय धोका असू शकतो, तर मी अशा कित्येक ध्वनी तरांगांचा अभ्यास केला आहे. कित्येक म्युझिकचा अभ्यास करताना मला असे आढळून आले की काही विशिष्ठ म्युझिक मधील काही बिट्स हे गूढ रीतीने बनवले गेलेले आहेत. जे वरवर ऐकताना सामान्य दिसतात पण त्यातील काही छुपे बिट्स मात्र दिसत नसतात. ते बिट्स ऐकणाऱ्या व्यक्तीच्या डायरेक्ट अंतर्मनात जातात आणि ज्या कामासाठी ते बनवलेले आहेत, ते कार्य करतात. हे सूक्ष्म रीतीने काम करत असते. कित्येकदा आपण असे व्हिडिओ पाहतो त्यात अस सांगितले जाते की अमुक एक मंत्र करा आणि तुम्हाला धन प्राप्ती होईल. मी हल्ली कित्येक अशा लोकांना पहात आहे जे त्यांच्या audiance ना काही वॉलपेपर त्यांच्या dp ला ठेवायला सांगतात, आणि कामे होतील असे सांगतात, त्यांची कामे होतात ही, परंतु त्यात असलेले छुपे धोके आपल्याला कळत नाही. तुम्हालाही प्रश्न पडला असेल की अस त्यात इतकं काय असू शकते. तर त्या गोष्टीत अस इंटेंशन ठेवलेले असू शकते की हा dp जो व्यक्ती ठेवेल त्याच सुरवातीला काम होईल पण त्याच्या उत्कर्षासाठी काम करणारी जीवन ऊर्जा ही त्या dp बनउन देणाऱ्या व्यक्तीकडे आपोआप ट्रान्स्फर होईल. तुम्ही स्वतः जर ह्या गोष्टीचा अभ्यास केला तर तुम्हाला कळून येईल की सुरवातीला आपली अशी कामे होतात पण नंतर मात्र आपल्याला सारखं त्या व्यक्तीची मदत घ्यावी लागते, कारण त्याने त्या गोष्टीत तसे इंटेशन टाकलेले असते की तुम्ही परत परत त्याच्याकडे यावं. अध्यात्मात इंटेंशन ह्या गोष्टीला खूप महत्त्व आहे. जसे चांगले लोक ह्या जगात आहेत तसे वाईट पण आहेत.
.... असेच इंटेशन ठेवलेले काही बीट्स त्या म्युझिक मध्ये ठेवलेले असतात. जे ऐकल्या नंतर ते directly आपल्या अंतर्मनात जाऊन एक प्रकारचा व्हायरस आपल्या शरीरात सोडला जातो. त्या व्हायरसला आपले नकारात्मक विचार अजून खतपाणी घालून तो आपल्या शरीराचा पूर्ण ताबा घ्यायला सुरुवात करतो, आणि काही दिवसांनी आपण त्याच्या पूर्ण आहारी जातो. काही ठिकाणी काही प्रार्थनास्थळांमध्ये अशा प्रकारच्या ध्वनीचा उपयोग लोकांच्या मनात काही भावना टाकण्यासाठी केला जातो. सुरवातीला चांगल वाटणार ते मुजिक कधी आपल मत परिवर्तन करून आपल्याला त्यांच्यात सामावून घेते आपल्यालाही कळू शकत नाही. एक प्रकारे आपला ब्रेनवॉश करून त्यात नवीन काहीतरी भरले जाते. अशा म्युझिक मधले हे बीट्स एका वेगळ्या मितिशी जोडलेले असतात. त्या मितीकडून किंवा प्रवाहांकडून ते नियंत्रित केले जातात, आणि त्याबरोबर आपल्यालाही ते नियंत्रित करत असतात, आपल्याकडून काही चुकीची कामे ही हे करून घेऊ शकतात. असाच काहीसा प्रकार तुमच्या मुलाच्या बाबत घडलेला आहे. नकळतपणे त्याच्याकडून ऐकले गेलेले म्युझिक किंवा पाहिला गेलेला व्हिडिओ त्याला एक वेगळ्या आणि नकारात्मक विचार प्रवाहाकडे आपल्यासोबत घेऊन चाललेला आहे. जो प्रवाह अगदी अनादी काळापासून गुप्त रीतीने आपल्या कारवाया करत आहे, त्याच्याबद्दल बोलण म्हणजे आपल्या स्वतःवर संकट ओढाऊन घेण्यासारखे आहे.
.... हेच साध्या प्रकारात तुम्हाला समजाऊन सांगायचे असेल तर,... बरेच मार्केटिंग पर्सन अशा प्रकारच्या आयडिया वापरून गिऱ्हाईक खेचत असतात. Telephonic Hypnosis नावाचा एक प्रकार आहे, त्यात फोनवर बोलून एखाद्याच संमोहन करण्याची कला एखद्या मध्ये असते. काही लोकांमध्ये हे उपजत गुण असतात जे त्यांनाही माहित नसते. जसे आपण एखद्या कपड्याच्या दुकानात जातो तिथे सेल्समन आपल्या समोर भरपूर वेगवेगळ्या रंगाचे कपडे टाकत असतो. आपण नको नको करत असताना ही तो टाकतच असतो. ते एकामागोमाग जलद गतीने आपल्या समोर येऊन पडणारे कपडे, त्यातील रंग, त्याच्या स्टाईल पाहून आपल बहिर्मन एक वेळ अगदी स्तब्ध झालेले असते, मंत्र मुग्ध झालेले असते, ते गोंधळलेले असते आणि त्याच वेळी तो दुकानदार आपल्याला सांगतो हा रंग तुमच्यावर चांगला दिसतो, बस आपले बहिर्मन गोंधळलेले असतानाच हे त्याच वाक्य डायरेक्ट काही अडथळ्या वीणा आपल्या अंतर्मनात जाते आणि ते तसे गेल्यामुळे आपल्याला तोच ड्रेस घ्यायची तीव्र इच्छा निर्माण होऊन आपण तो घेतो. अशाच प्रकारे आपल मन काम करत असते आणि त्याचा फायदा हल्ली काही लोक घेताना दिसून येतात. पण तुमच्या मुलाच्या बाबत झालेला हा प्रकार असाच असला तरी तो एक अमानवी शक्ती किंवा ऊर्जा प्रकारात आलेला आहे. काही माध्यमातून ही ऊर्जा तुमच्या मुलाच्या ब्रेन मध्ये किंवा शरीरात, त्याच्या ऑरा मध्ये, किंवा आत्म्यामध्ये गेलेली आहे.
..... हे सर्व खूप विचित्र आहे. त्यांच्याशी बोलत असताना त्यांच्या चेहऱ्यावर संमिश्र भाव उमटत होते. विषय त्यांना काही प्रमाणात समजला असावा अस मला जाणवलं. इतरही काही गोष्टींवर आमची चर्चा झाली पण त्या गूढ शास्त्रशी संबंधित असल्याने मला इथे देता येणार नाही. मी त्यांना म्हटल की आपल्याला आजपासूनच थेरेपी करायला सुरुवात करावी लागेल. त्याला ट्रान्स मध्ये घेऊन जावे लागेल, त्यातून त्याच्या अवचेतन मनात टाकलेला तो प्रोग्रॅम आपल्याला काढावा लागेल किंवा नष्ट करावा लागेल. त्यानंतर त्याला मी आत घेऊन यायला सांगितले. जसे तो आत आला त्याची पुन्हा चुळबुळ सुरू झाली. मी त्याला आराम खुर्चीवर बसवले आणि मंद संगीत सुरू करून suggession द्यायला सुरवात केली. मला त्याला ट्रान्स मध्ये घेऊन जायचं होत, पण ह्याचा बाबतीत हे तितकं सोप नसल्याने मी मंद संगीत चालू करून सज्जेशनस द्यायला सुरवात केली. तो ट्रान्स मध्ये गेल्यावर मला बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला. मी परत त्याला ट्रान्स मधून बाहेर आणलं. हे असे सेशन जवळपास 11 दिवस चालले होते. त्या सेशन च मुख्य हेतू मला त्या मुलाच्या अंतरातम्याची शक्ती जागृत करून त्याच्या अंतरातम्याला किंवा त्याच्या अवचेतन मनाला ह्या संकटाची जाणीव करून देणं हा होता. जर मी त्या शक्तींना डायरेक्ट बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता तर, त्या शक्तींनी अकांत्तांडव करून त्या मुलाला इजा पोहोचविण्याचा प्रयत्न केला असता. मला त्यांना गाफील ठेऊन हे कार्य करायचे होते. कारण त्या शक्ती माझ्या मनातील विचारांची प्रत्यके हालचाल टिपत होत्या हे मला कळत होत. त्यामुळे माझी पुढची move त्यांना कळू न देणे हेच माझे मिशन होते. त्या 11 दिवसाच्या कालावधीत मी माझे काही अँटीव्हायरस सारखे मंत्रांचे प्रोग्राम त्याच्या शरिरात प्लांट करण्यात यश मिळविले होते. आता ते प्रोग्राम म्हणजे सजेशन हळू हळू त्याच्या मनात, डोक्यात त्यांची कामगिरी पार पाडायला सुरवात करणार होते. जरी सर्वकाही मनाचा खेळ असला तरी तो मनात घुसून खेळण हे खूप धोकादायक पण ठरू शकते. कारण मन ही साधी गोष्ट नाही, वर वर साधं वाटणाऱ्या आपल्या मनात अनेक जन्मांचे संस्कार एखाद्या पेटीत वस्तू ठेवाव्यात तसे स्टोअर केलेले असतात. त्याची कुंजी गुप्त रीतीने तिथेच ठेवलेली असते. काही मोठे संत महात्मेच ती पेटी संपूर्ण पणे उघडून पाहू शकतात. ते त्या पेटीतल सर्वकाही पाहू शकतात. पण आपल्यासारखे सामान्य लोक म्हणजे हीलर इत्यादीना जितकी परवानगी सद्गुरुनकडून मिळालेली आहे तितकीच पेटी पाहू शकतात, पूर्ण पेटू उघडायची परवानगी आपल्याला नाही, किंवा तसे करून पण पाहू नये. त्या क्रियेला आकशिक रेकॉर्ड रीडिंग असे बोलतात. मी ह्यापूर्वी पण कित्येक लोकांचे अकशिक रेकॉर्ड रीडिंग केलेले आहे. त्याचे अनुभवाचे लेख पण टाकलेले आहेत. त्यातच कर्म प्रारब्ध भोग भाग एक आणि 2 वाचले तर तुम्हाला ह्या सर्वांची नीट कल्पना येईल. त्या लेखांची लिंक खाली देण्यात आलेली आहे.
..... 11 दिवस हीलिंग होत असताना त्याच्यात काही प्रमाणात फरक दिसायला लागला होता. 11 दिवस पूर्ण झाल्यानंतर खूप चांगला फरक दिसायला लागला होता. 12 व्या दिवशी ह्या सर्वाची पूर्णाहुती म्हणून एक नवचंडी हवन ठेवले होते. हवनासाठी इतर सामुग्री बरोबर अजून काही विशिष्ट प्रकारची सामुग्री, काही विशिष्ठ प्रकारच्या समिधा, जमा केल्या होत्या. जसे हवनपात्र स्थापित करून अग्नीचे आवाहन केले गेले, तसे परत त्या मुलाची चुळबुळ वाढू लागली होती. अचानक त्याने डोळे फिरवले आणि हात पाय ताठ करून तो ओठातल्या ओठात काहीतरी पुटपुटू लागला. असे उपाय करत असताना वाईट शक्तिंकडून अगम्य असे अडथळे आणले जाऊ शकतात. पहिली आहुती पडली तेव्हा त्याला एकदम घाम फुटून तो हलू लागला होता, दुसरी, तिसरी, चौथी अहुतीला हात पाय झाडू लागला, पाच, सहा आणि 7 व्या अहुतीला अचानक गचके देऊ लागला, हे सर्व पाहून त्याचे आईवडील पार घाबरून गेले होते, सारखे माझ्याकडे पाहत होते. मी त्यांना नजरेनेच इशारा करून शांत राहण्यास सांगितले. अशावेळी काहीही होऊ शकते, हे मला माहीत असल्याने मी त्याचा पूर्ण बंदोबस्त केला होता. आहुती देत असताना, काही प्रकारच्या वस्तूंनी त्याचा उतारा काढून त्या उतऱ्यांची आहुती देत असताना जो चरचर असा आवाज अग्नितून निघत असे अगदी त्याच वेळी तो मुलगा वेदनेने तडफडत असे, आचके देत असे, त्याला त्यावेळी नक्की काय वाटतं असावे ह्याची कल्पनाच न केलेली बरी.
.....त्यानंतर जस जसे मंत्रघोष आहुत्या वाढत गेल्या तस तशा त्याचा त्रास वाढत वाढ जाऊन शेवटी कमी कमी व्हायला सुरूवात झाली तेव्हा सर्वांना मनाला समाधान वाटलं. ते जे काही होत ते मागे मागे सरकत होत. त्याची पकड आता कमी कमी होत होती, शेवटी अगदीच पुसटशी म्हणजे फक्त 1 टक्का राहिली असेल. पण त्यावर पूर्णपणे उपचार करणे आवश्यक होते, कारण हा 1 टक्का पण खूप त्रासदायक झाला असतात, त्याचे कधी 100 टक्के होतील सांगता येत नव्हते. हा 1 टक्का त्याच्या मनाचाच एक अंश मात्र असल्याने त्याला फक्त हीलिंग करून किंवा कुठलेही हवन करून काढणे खूप कठीण होते. त्यासाठी त्या मुलालाही स्वतःसाठी आतून प्रयत्न करणे भाग होते. त्या एक टक्क्यावर आता काम करायचे होते. मी त्यांना म्हटल की ह्याच्यात जरी फरक पडला आहे तरी अजून 6 महिने आपल्याला धोका आहे. त्यामुळे ह्याच्या रक्षणासाठी मी काही वस्तू देत आहे, त्या ह्याला शरीरावर धारण कराव्या लागतील किंवा ह्याच्या आसपास ठेवाव्या लागतील, तसेच घरात काही दिशांना ठेवाव्या लागतील. ह्यावेळी मी एक वेगळा प्रयोग केला होता. त्याच्या पाणी पिण्याच्या ग्लास पासून ते तो घालत असलेल्या कापड्यानपर्यंत मी सर्व instruction दिले होते. चहाच्या मग पासून ते तो घालत असलेल्या टीशर्ट वर काही यंत्र छापून दिले होते, घरात काही पॉवर क्रिस्टल ठेवायला दिले होते. अगदी कडेकोट बंदोबस्त केल्यामुळे, त्याचे परिणाम दिसायला लागले होते. हल्ली खूप लोकांना काही ना काही समस्या येत असतात. मोबाईलच्या वापरा मुळे जेवढे जग फास्ट झाले तेवढे धोके पण वाढले आहेत.
..... 6 महिन्यांनी जेव्हा ते माझ्या ऑफिसला आले तेव्हा त्या मुलाला ओळखण मला कठीण गेलं. एकदम प्रसन्न चेहरा, हसतमुख भाव पाहून मनाला खूप समाधान वाटल. तो मुलगा आता माणसात आला होता, एकांतात रमण त्याने सोडून दिले होते. वेळच्यावेळी खाण, अभ्यास करणं, खेळण सर्व परत पूर्वीसारखं चालू झालं होत. त्यांच्याशी चर्चा करत असताना त्याच्या वडिलांनी मला विचारले की हे नक्की आले कुठून असेल. हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच राहिला आहे. मी त्यांना म्हटल की ह्या प्रश्नाचे उत्तर कदाचित आपल्याला तुमच्या घरातच सापडू शकेल, कारण सर्वप्रथम तुमची केस हातात घेतली तेव्हा मला एक घर डोळ्यासमोर आले होते. त्यासाठी मला तुमच्या घरी एकदा वास्तु विसीटला यावे लागेल. त्यानुसार वास्तु वीसिटला गेल्यानंतर त्यांच्या घरी काय झाले हे पुढील भागात तुम्हाला सर्वांना वाचायला मिळेल. तोवर हा लेख कसा वाटला हे मला कळवायला विसरू नका. तुमच्या आसपास कोणाला असे काही त्रास असतील तर त्यांना जमेल ती मदत करायला विसरू नका. तुम्ही मलाही संपर्क करू शकता. एखाद्याची केलेली मदत तुम्हाला भविष्यात काय कामी येईल हे सांगू शकत नाही. असे थेरेपी करून आलेले अनेक अनुभव तुमच्याशी शेयर करायची ईछा आहे. लवकरच भेटूया पुढील भागात, तोवर आपली आणि आपल्या मुलांची काळजी घ्या. धन्यवाद.
अँड. अंकुश नवघरे.
(ज्योतिष विशारद)
(लेख आवडला असेल तर शेयर, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.)