सोनमूस
श्रावण महिना लागला तसं आमोनीत कानबाई(कानुमाते)च्या रोटचं नियोजन झालं. सारे आपल्या घरातले, भावकीतले पोटापाण्यासाठी दूर गेलेल्यांना गावात रोट असल्याचं कळवत तयारीला लागले. आयाबाया एकमेकींना मदतीला घेत दिवसा शेतातली कामं करत रात्री घरांचं सारणं पोतारणं करू लागल्या, मळ्यात, नदीवर दिवसा कामातून सवड काढत गोधड्या धुतल्या जाऊ लागल्या. साऱ्या गावात एकच चैतन्य संचारू लागलं. आठ दिवसावर रोट आले तसं गोजरबाईनं अप्पामागं पोरांना फोन करून बोलवण्यासाठी तगादा लावला. गयभू अप्पा हो ला हो करत पुढे रेटत होते. त्यांना माहित होतं रामा व कृष्णा दोन्ही पोरं येणार नाहीत व आली तर काय निर्णय घेतील याची कल्पना असल्यानं मनोमन त्यांना भितीच वाटत होती.चार पाच वर्षांपासून दोघांची आमोनीतून निरवा निरवच चालू होती. प्रत्येक बाप मुलांना शिकवतो मोठं करतो उद्योगाला लावतो यामागं बापाच्या जिवास एकच भोळीभाबडी आस असते की पोरांनी आपल्या पावलावर पाऊल ठेवत शेती वाढवावी.ती कुठं ही राबोत पण आहे त्यात वाढ करत गावात आपलं नाव करावं. गयभू अप्पांनी ही हाडाची काडं करून पोरांना कसलीच ददात न पडू देता शिकवलं. पोरं ही हुशार दोघांनी इंजिनिअरिंगचं उच्च शिक्षण घेत एकानं पुण्यात स्वत:ची मोठी फर्म उभारली तर एक मोठ्या मल्टी नॅशनल कंपनीत उच्च पदावर लागला. गयभू अप्पास वाटे की यांनी गावातही काही तरी करावं. पण काही तरी करण्याचं राहिलंच बाजुला उलट आले की गयभू अप्पाचं काही ना काही कुरतडत राबत्याचं कंबरडं मोडण्याचं काम करत. आताशी अप्पांनी पोरांकडुन अपेक्षा तर सोडलीच होती पण निदान गावात कष्टानं उभारलेलं आपलं वैभव तरी आपण आहोत तो पावेतो राहू द्यावं हीच त्यांची आस होती. पण जे होत होतं ते उलटंच होत होतं. म्हणून हल्ली अप्पाच्या दिलास आतून दिमक लागल्यागत एक अनामिक भिती कुरतडत होती.
" अहो, लावा ना फोन ! काय विचारात गुंग झालात!" गोजर बाईनं तंद्री लागलेल्या अप्पांमागं पुन्हा टुमणं लावलं.
आता फोन लावल्या शिवाय गत्यंतर नाही ओळखून त्यांनी मोठ्या रामास फोन घुमवला.
" राम! पुढच्या रविवारी कानबाईचे रोट आहेत शनिवारी मुलासहीत गावास येऊन जा!"
" अप्पा आताच कृष्णाचा फोन होता. एरवी असं ही येणारच होतो, पण त्याला कळालं कुणाकडून तरी की गावात रोट आहेत, म्हणून आम्हीच ठरवलं की चला कानुमातेचा उत्सव ही साजरा होईल नी शेताचं......."
अप्पाच्या हातून फोन निसटला.त्यांना जी भिती होती ती खरी होऊ पाहत असल्याची त्यांना जाणीव झाली. त्याच धुंदीत त्यांनी लहान्या कृष्णासही फोन करत सांगितलं व तो ही तयारच होता.
त्या रात्री अप्पांना झोप लागलीच नाही. नऊ-दहा एकराचं रानं, गाई म्हशीचा भरलेला गोठा या वर आपण दोन्ही मुलांना शिकवलं. पण पाखरं कमावती झाली नी झेप घेतांना ते ज्यांनी त्याच्या पंखात बळ दिलं त्यांचेच पंख छाटू लागली. आधी सारा औतफाटा, टॅक्टर, बैलं गाई म्हशी विकल्या. सबब काय तर ' आई-बाबा या वयात एवढी उस्तवारी का करता? आम्ही आहोत ना आता करायला! सुखानं बसून खा!' पण हे कारण अप्पास पटलंच नाही. त्यांना कुठंतरी आपल्या आधाराचे पाय कापले गेल्याची जाणीव झाली. मग नऊ एकर रान भाड्यानं दिलं गेलं. त्यातल्या त्यात ते अप्पांनी सुरालाच द्यायला लावलं. मग दरवर्षी नित्यनेमानं येत शेताचा नफा परस्पर सुराकडंनं नेला जाऊ लागला. त्यातच एकानं पुण्यास जागा घेतली तोच दोन चार दिवसांनी दुसऱ्यांनं हेव्यानं.अप्पांना वाटलं नाही इथं पण शहरात का असेना पोरं प्रगती करताहेत तर समाधान मानून अप्पांनी दोघांना काडी काडी जमवलेली पुंजी- खात्यावरील सारी रक्कम काढत दोघांना पंधरा पंधरा लाख मदत केली . गयभू अप्पा फकीर होऊन बसले पण त्यातही समाधान होतं की पोरं प्रगती करत आहेत. पुढच्या वर्षी एकानं बांधकाम लावलं. पुन्हा मदतीची याचना.... गयभू अप्पा खाली...शेती नफ्यानं दिलेली तो नफा ही तेच नेत.मग मदत कशी करणार गोजरताईनं आपली मंगलपोत बाकी ठेवत, बाकी सारे दागिने मोडले व घरात दुध दुभतं असतांना अप्पानं कधीच दुधाचा हिशोब घेतला नाही,ती रक्कम गोजर ताईच्या खात्यावर जशीच्या तशी होती.आपणास लेक नाही पण नातींना लग्नासाठी काही तरी करता येईल म्हणून गोजर ताई चिडीगत काडी काडी वाढवत आलेली. गोठा मोडला नी वाढ थांबली तरी व्याज जमा होत रक्कम वाढतीच होती. नातीचं लग्न कोणी पाहिलं नी करणारे जे तेच आता संकटात असल्यावर गोजर ताईनं सारी रक्कम व दागीने मोडायला लावले व दोन हिश्शे दोघांना द्यायला लावले.
" गोजर! तेवढं तरी राहू दे! म्हातारपणाचा आधार.मेल्यावर त्यांनाच मिळेल पण आहोत तो पावेतो आधार म्हणून पडू दे! दिलंय आपण त्यांना भरपूर! शिवाय तुझ्या धनास मी आयुष्यभर हात लावला नाही फक्त सुरास दिले तेवढेच! नी आता..!" अप्पा तीळ तीळ तुटत गहिवरले.
" अहो, मेल्यावर तेच घेणार असतील तर आता संकटात असतांना देणं चांगलंच.मोडा ते अन नड भागवा."
मंगल पोत ठेवत पुन्हा गोजर बाई ही फकीर झाली. पण सोस.....! पोरांची हाव कमी व्हायचं नावंच घेईना. त्यांनी शेत विक्रीचा प्रस्ताव ठेवला.
" अप्पा , नाही तरी आम्ही आता पुणं सोडून गावात येऊन राहणं शक्य नाही. ना तुमच्याकडून शेती होत आता. त्यात गरज आहेच म्हणून ही शेती विका व तुम्हीपण पुण्यालाच चला आमच्याजवळ.तुम्ही इथं नी आम्ही तिथं हे काही योग्य नाही.बंगल्याचं बांधकाम ही तुमच्या देखरेखीत होईल."
" राम्या ,किसन्या हवं तर मला विका ,पण माझ्या काळ्या आईस तोशीस लावण्याचं नाव निदान आम्ही हयात असेपर्यंत तरी काढू नका! आमच्या गोवऱ्या मसणात गेल्या की मग काही ही करा.राहिला प्रश्न अडचणीचा तर सांगा किती हवेत? माझ्याकडं नसले तरी गावात माझी पत आहे अजुन मी कर्ज काढून देतो. त्यातला छदाम परत करू नका,फेडीन मी शेतीवर.पण मी शेत विकू देणार नाही"
अप्पांनी आतल्या आत तुटत पण आवेशात म्हटलं. जवळच सुरास हाक मारली.सुरा दुकानातून धावतच आला.
" सुरा! रामानं बांधकाम लावलंय. त्याला नड आहे. त्याला देण्यासाठी मदत ...."
" अप्पा हुकूम सोडा,पंधरा वीस....? जास्त लागले तर मी स्वत:लाही विकायला पुढं मागं पाहणार नाही.फक्त सांगा!"
" अप्पा, सुरा देईल.तेवढंच काय मी देखील बॅंकेतून लोन काढू शकतो.पण आणखी पुढच्या वर्षी कृष्णाचं बांधकाम लागेल! मग त्या वेळी काय करणार? त्यापेक्षा शेती अशीही पडून आहे! शेतीच विकू!" रामा निर्धारानं म्हणाला नी अप्पा उभ्या उभ्याच ढासळू लागले.
शेवट गोजर ताईनं समजावत चार एकरचा एक गट विकण्यास अप्पांना राजी केलं. रामा व कृष्णास ही चार एकर का असेना ते ही नसे थोडके असा विचार करत त्यांनी गिऱ्हाईक आणावयास सुरूवात केली. अप्पांन तो पावेतो सुराकडं किती जमतात याचा अंदाज काढून घेतला व त्यास तयारी करावयास लावली. पोरांनी गावातीलच गुलजार पाटलास तयार करत मध्यस्थी मार्फत सौदा करण्यास सुरुवात केली. अप्पांनी मध्ये पडत ' जमीन सुरालाच विकायास लावली. सुरानं सारी जमापुंजी व उचल दडप करत रक्कम जमवली व अप्पाचं चार एकर घेतलं. मध्ये बांध होताच. अप्पाचं सुपीक रानं नाशीक धुळे हायवेपासुन दोन किमी अंतरावर दोन नदीच्या बेचक्यात होतं. चार चार एकराचे दोन गट व नदीकाठावर दिड दोन एकराचं नदीकाठचं पोटखराबगत एक तुकडा. मोघल काळात याच शिवारात सुलतानाची गढी असल्याचं बोललं जाई. पण अप्पाला आठवे त्यापूर्वीच गढीचे अवशेष गायब झालेले.मात्र हल्लीही पावसानं माती धुतली की बऱ्याचसा काहीना काही किडूकमिडूक नक्कीच सापडे.
चार एकर विकून दोघांनी पैसे वाटून घेत निघाले. जातांना बंगल्यावर देखरेख व मार्गदर्शन म्हणून आई व अप्पास ही येण्यास बजावलं. अप्पाची अजिबात इच्छा नव्हती. पण गोजर ताईनं अप्पास समजावत
" अहो चार चौघात अप्रूक दिसणार नाही, नाहक शोभा होईल. विरोध न करता चला. बंगल्याचं काम झालं की हवं तर आपापलं पुन्हा परत येऊन गावात राहू!"
अप्पा निघाले. बस स्टॅण्ड वर नेमका गुलजार बसलेला.
" हल्लीच्या पोरांचं खर नाही बुवा! बापजाद्याची इस्टेट त्यांच्यासमोरच विकतात.माझ्या मुलांनी तर जमीन वाढवली उलट!" अप्पाकडं पाहत टोमणा मारला.
अप्पाचं काळीज कापलं गेलं. पण उगाच वाद वाढवण्यात मजा नाही म्हणून ते गुपचूप येणाऱ्या गाडीत चढले.
पुण्याला सांगवी भागात बंगल्याचं काम सुरू होतं. शेतात राबणाऱ्या अप्पास घरी बसणं अवघड वाटे. ते बंगल्याच्या कामावर दिवसभर थांबत पाणी मार, पडलेलं सामान गोळा कर, अशी कामं करत रात्री परतत पण पंधरा दिवसातच सुनबाई व रामानं रखवालदाराची सुट्टी केली व अप्पाचा मुक्काम रात्रंदिवस कामाच्या ठिकाणी होऊ लागला. दुपारी डबा येई. नंतर नंतर रात्रीचा डबा ही दुपारीच येऊ लागला. गोजरबाई व नातवांची पंधरा पंधरा दिवस भेट होईना. अंघोळ देखील बांधकामावरच. अप्पाचा भ्रमनिराश झाला. त्यांना कळून चुकलं की आपणास या ठिकाणी मार्गदर्शनासाठी नव्हे तर रखवालदार म्हणून आणलं गेलंय.एके दिवशी त्यांनी रिक्षा करत घरच गाठलं. रात्री गोजर बाईस त्यांनी रडतच सांगितलं. गोजरबाई कळवळली. दोन दोन सालदार ठेवणारा आपला कारभारी थंडी वाऱ्यात पडतोय रखवाली करत, याचं त्यांना आतून गलबलून आलं. सुनबाईनं तिच्या आई-वडिलांनाही बोलावलेलं. पण व्याही गुणाजीराव कधीच बंगल्याच्या बांधकामावर राबत नव्हते.मस्त घरात बसून त्यांची बडदास्त ठेवली जाई. गोजरबाई खवळली.सकाळी उठताच त्यांनी रामास ठोकलं
" रामा! बंगल्यावर रखवाल ठेव.यांना हल्ली काम होत नाही !"
तोच सुनबाई कडाडली.
" अप्पांना बंगल्यावर काय पहाड उपसायचं काम असतं का? देखरेख तर ठेवायचं काम.ते ही होत नसेल तर नाना जातील!"
सुनबाईची देखरेखीची संज्ञा अप्पांना कळाली. त्या दिवशी अंगात कण कण असुन ही ते गेले.व्याही गुणाजी आले पण बंगल्यांच्या कामावर अर्धा तास थांबले व नंतर मुलीस बोलवून घेत तिच्या गाडीवर परत फिरले. अप्पा मात्र वर्षभर बंगल्यावर दोन्ही वेळ पाणी मारत राहिले.
बांधकाम पूर्ण झालं. अप्पांना समाधान वाटलं. त्यांनी मनात आमोनीहून घरभरणीस कुणाकुणाला बोलवायचं याची लिस्टच बनवली. त्या गुलजारला तर बोलवून दाखवायचंच त्यांनी पक्कं ठरवलं. घरात तयारी होऊ लागली. पण अप्पांना कशालाच विचारलं गेलं नाही.तोच कृष्णाची गाडी आली व अप्पा, आईस घेऊन गेली. अप्पांना वाटलं हा घरी नेत असेल. त्यानं घरी चहापान होताच अप्पांना सांगितलं.
" अप्पा ,दादाचं बांधकाम झालं. आता तिथे तुमची गरज नाही. आता तुम्ही माझ्या बांधकामावरच लक्ष द्या."
नी त्यानं भोसरीच्या साईटवरच अप्पांना नेलं. गाडीत अप्पाच्या डोळ्यांना झरझर धारा लागल्या. पण एकाच्या घरी रखवालदारी केली आता याची का सोडा! म्हणून मध्येच काहीतरी बोलू पाहणाऱ्या गोजरला त्यांनी हात दाबत शांत बसवलं होतं व गाडीत निघाले होते. इथं ही रामाचाच कित्ता गिरवला गेला. अप्पाचं वय वाढलं दोन वेळचं जेवण पचत नाही म्हणून दुपारीच डबा. अप्पा मुकाट्यानं लहान्याची रखवाली करू लागले.पोरांना सारं सोपवत फकीर झालेले अप्पा काही शेतही विकलं नी रखवाल होण्यास पुण्यास आले. पण तरी त्यांना एक समाधान होतं आपली गोजर तरी निदान सुखात आहे.
रामाच्या घरभरणीस सुरास बोलावलं असल्यानं तो एक दिवस आधीच आला. आल्या आल्या त्याला मोठमाय व अप्पा दिसेना म्हणून तो कृष्णाकडं गाडी घेऊन आला. मोठमाय दिसताच त्याला आनंद झाला.गोजरबाईचं काळीज त्याला व शेवंताला पाहताच सुपाएवढं झालं. अप्पा बंगल्याच्या बांधकामावर गेल्याचं कळताच त्यानं शेवंतास मोठमायकडं ठेवत पत्ता घेत तो बांधकामाच्या ठिकाणी भोसरीस निघाला. त्याला साईट सापडेना. त्यांनं रिक्षा करत त्यास पत्ता दिला. रिक्षा मागं गाडी लावली व साईटवर आला.
अप्पा पाणी मारण्यात गर्क होते. एका वर्षानंतर तो अप्पाना पाहत होता. अप्पाची अवस्था पाहताच त्याला धक्का बसला. मजुरापेक्षाही बेहत्तर अवस्था. सुराला पाहताच मोटार बंद करत थरथरत अप्पा पुढं आले. सुरा त्यांना बिलगत पायावर वाकला. अप्पानं त्यास छातीस लावलं.
कुणीच काही बोलेना. न सांगता ही सुरानं सारं ओळखलं. आपण मध्यंतरी अप्पाला भेटायास यायला हवं होतं याचं सुरास दु:खं वाटलं. पण शेत घेतलं. कर्ज फेडण्यासाठी दुकान शेती सोबतच इतर धंदे वाढवले त्यातच गर्क. शिवाय पोरांजवळ अप्पा सुखी याच कल्पनेत.
भर ओसरला. अप्पाच्या अंगावरचं धोतर पूर्णत: फाटलेलं.
" अप्पा उद्या घरभरणी म्हणून रामा दादानं तुमच्या साठी खरेदी करवून आणण्यास पाठवलं"
अप्पाला बरं वाटलं. त्यांनी हातपाय धुत अंगावर मळका फाटलेला सदरा चढवला व ते सुरासोबत निघाले. सुरानं परस्पर गाडी एका दुकानावर लावत अप्पासाठी कपडे घेतले. दुकानातच अप्पाना कपडे चढवावयास लावले. त्या कपड्यातल्या अप्पात त्याला कधीच न पाहिलेला बाप दिसू लागला. त्याच्या डोळ्यात आसवे टपकली. ती त्यानं आपल्या बाप माणसास दिसू दिलीच नाहीत. तशीच गाडी घरी आणत गोजर मोठमाय व शेवंतास घेतलं व गोजर मोठमाईसही साड्या घेतल्या. रात्रभर चौघे गप्पा मारत बसले.
घरभरणीच्या कार्यक्रमास रामाला वडिलांकडे पाहण्यास सवडच नव्हती. पण अप्पांना आज रामाचा सार्थ अभिमान वाटत होता की त्यानं सुराला पाठवत आपल्यासाठी नवे कपडे घेतले. नंतर जेव्हा त्यांना कळालं की कार्यक्रमात आपणास सुरा घेऊन आलाय अन्यथा त्यांनी कपडे तर सोडाच पण बांधकामावरून बोलवलं ही नसतं. तेव्हा अप्पाच्या काळजात आरपार एक जोराची कळ गेली.तिकडे साऱ्यासमोर रामा व सून तिच्या आई- वडिलांना हाताशी धरत खुर्चीवर बसवत पाया पडत होती पण आपली साधी चौकशीही केली नाही. त्यावेळेस " आपलं सारं कष्ट वाया गेलं या वेदनेनं ते गर्दीत तडफडू लागले.त्यांचं गोजरबाईकडं ध्यान गेलं नी गोजरबाईच्या पापण्यात महापूर आला. ते उठून बाहेर पडणार तोच कृष्णानं " अप्पा ,आता निघा ना! बांधकामावर कुणीच नसेल! लवकर जा.इथं आम्ही आहोत.पण तिथं कोणीच नाही!" सांगितलं. गोजरबाईही हळूच बाहेर आली.
" नाही सांगत होतो ना यायला गोजर तुला! पण जगात हसं होईल!,शोभा होईल! ही भिती तुला!" अप्पा हताश आक्रंदू लागले. तोच मध्ये अप्पा दिसले नाही म्हणून सुरा बाहेर आला व पाठोपाठ शेवंता.सुरानं साऱ्यांना गाडीत बसवलं व गाडी आमोनीकडं धावू लागली. आई वडील न सांगता निघून गेले यापेक्षा बंगल्यावरील रखवालदार आता कोण याचीच कृष्णास अधिक चिंता सतावू लागली. तर रामास सून समजावू लागली
" अहो आहेत हातपाय तर उड्या मारत निघून गेले.एकदाचे हातपाय पडू द्या ,गपगुमानं येतील सारा ताठा गुंडाळत.तुम्ही कशाला काळजी करता!
आमोनीत येताच सुरा व शेवंताचं न ऐकता तीन वर्षांपासून उरलेलं शेत माणसं लावून स्वत: कसत ते राहू लागले. सुरा व शेवंता तर त्यांच्यावर लक्ष ठेवूनच होते. फक्त त्यांच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचू नये म्हणून त्यांना ते अलग राहू देत होते.
.
.
अप्पाचा विचार करत करत केव्हा डोळा लागला कळालंच नाही..

शनिवारी दुपारनंतर रामा व कृष्णा आपापली कुटुंबं घेऊन आले. रविवारी आमोनीत उत्सवाला व आनंदाला उधाण आलं. सोमवारी कानबाई उठली.
" अप्पा, आई ! आम्ही काय म्हणतो.तुमच्याकडंनं काम नाही होत आता. आम्ही खास तुम्हाला घ्यायलाच आलोत.का या खेड्यात राहता?"
" राम्या याच खेड्यात तुझा बा, बा चा बा मातीत खेळत मोठी झालीत! नी तु पण इथंच पडत झडत पोसला गेलाय! मग आताच का तुला या खेड्याचा कंटाळा आलाय?" अप्पा संतापले.
" अप्पा त्यांना तसं नाही म्हणायचं! पण आम्ही असतांना तुम्ही कुठंवर हातानं करणार!" मोठी सुनबाई नाटकी अश्रू आणत म्हणाली
" जोवर या हाता पायात जोर आहे तोवर राहू! नी हातपाय पडले तर येऊ तुमच्या दावणीला! पण जन्मात कुणाचं वाईट केलं नसेल तर त्या पंढरीच्या राणानं चालतं बोलतं नेलं तर सोन्याहून पिवळं!" अप्पा आतलं गरळ ओकू लागले.
" अप्पा पण तुम्ही इथं असल्यावर आम्हास चिंतेनं सुखाची झोप येत नाही!" कृष्णा बोलला.
" आम्ही सुखानं आहोत. आमची काळजी घेणारे आहेत! "
सरतेशेवटी लहान्या सूनेनं स्पष्ट बजावलंच.
" अप्पा, यांना आपली फर्म वाढवायची म्हणून पैशांची गरज असल्यानं शेत विकायचंय त्यांना!"
" आले औकातीवर! सरळ सरळ बोंबला ना! अरे या वयात मला वतनाची माती सोडावी वाटत नाही नी तुमचं आख्खं आयुष्य पडलंय तेवढ्यात गावाचं वतन विकतांना लाजा कशा वाटत नाही. हातात नको इतका पैसा खेळतोय. सासरवाडीकडं जमिनी विकत घेता.नी इकडं नड दाखवत वतन विकता! कुठं फेडणार ही पापं!"
" अहो ,जाऊ द्या .त्याचं आहे तर विकू द्या! का उगाच त्रागा करता हेत! आपण नाही तरी कुठं छातीवर घेऊन जाणार आहोत.ते सुखी यातच सर्व आलं!"
" गोजर पण एरवी ही ते सुखीच आहेत गं! मग का विकावं यांनी वतन!"
" नाही तरी ठेवून कुठं ती जमीन दूध देणार आहे!" मोठी सुन बोलली
" सुमे ,तोंड सांभाळ! जीभ कशी झडली नाही तुझी बोलतांना! त्याच वतनानं तुझ्या नवरा दिर यांना पोसलं!"
शेवटी संतापानं अप्पांनी पुन्हा चार एकर विकण्यास नाईलाजानं परवानगी दिली. दिड दोन एकराचं नदीकाठचं खांड त्यांनी मरतभाग म्हणून विकण्यास सपशेल नकार दिला.
सुरानं या चार वर्षात दुकान, शेती, फुलशेती, दूध भाजीपाला यातून बक्कळ कमाई केली. पैशाचा ओघ त्याच्याकडं येऊ लागला. अप्पानं हे चार एकर ही त्यालाच विकलं. गुलजार व अप्पाचं आयुष्यात जमलं नाही.गुलजारला अप्पाची शेती घेऊन अप्पांना डिवचायचं होतं. पण अप्पांनी ती संधीच दिली नाही. त्यांना माहित होतं आपली पोरं जरी शेती विकत होती तरी प्रगतीच करत होती. फक्त त्यांची मनोमन एकच इच्छा होती की भले प्रगती कमी करा पण गावातलं वतन असू देत.कारण वेळ काळ कधी बदलेल व खेड्यांना पुन्हा उर्जितावस्था येईल. शिवाय गावावर येणंजाणं यासाठी ते हयात असेपर्यंत त्यांना गावावर वतन राहू द्यावं असं वाटे. पण पोरांचा शहरी ओढा म्हणून त्यांनी विकली.त्यातल्या त्यात ही काळी आई योग्य माणसास मिळो म्हणून त्यांची खटपट होती. सुरा तर त्यांचा तिसऱ्या मुलाप्रमाणेच होता.
आठ एकर गेलं तरी दिड दोन एकर अजुनही होतं. त्यावर अप्पांना भरोसा होता की आपण आपली गुजराण करू. मुलांपुढे हात पसरत भिक मांगायची वेळ नको. सुरा व शेवंता तर त्यांनी आरामात बसुन खावं या साठी खटपटत. पण अप्पांचा स्वाभिमान त्यांना ठाऊक होता.
दोन वर्ष दोन्ही पोरांनी लोक लाजेस्तव व शेत चालूच विकलं म्हणून त्यांना पुण्यास येण्यास बराच आग्रह केला. पण अप्पा मनात राग दाबत वर प्रेमानं नकार देत. ते आपल्या गावातच सुखी होते. सुराच्या मदतीनं ते आपल्या दिड एकरात फुलशेती करू लागले.
काळ ही चांगल्या माणसाची सत्वपरीक्षाच पाहतो. गोजरबाईस छातीत दुखायला लागलं व कळा यायला लागल्या. गावातल्या डाॅक्टरानं त्वरीत नाशीकला न्यायला लावलं. अप्पा घाबरले. सुरानं स्वत:ची गाडी काढत शेवंता, अप्पासोबत मोठमाईस नाशीकला हलवलं. पहिला झटका येऊन गेल्याचं सांगत त्यांनी इंजेक्शनं देत एन्जिओग्राफी करायला लावली. सुरानं रामा दादा, कृष्णास कळवणं कर्तव्य समजून अप्पा नकार देत असतांनाही कळवलं. ते येईपर्यंत बाकी सारी ट्रीटमेंट त्यानं सुरू ठेवली. अनायासे कृष्ना नाशिकमध्येच होता. त्यानं सकाळी येतो सांगत फोन ठेवला. तो दुसऱ्या दिवशी आरामानं इतर कामं आटोपत दवाखान्यात आला. त्यानं डाॅक्टरांना भेटत सारी माहिती काढली. गांभिर्य ओळखून पुण्यास न्यावंच लागेल म्हणून रामास कळवलं. रामानं त्यास सपशेल
" खर्च करेन पण त्यांना तुझ्याकडंच ठेव " या अटीवर पुण्यास आणायचं कळवलं.
सुरानं शिर्डीला नेऊन एंजिओग्राफी व नंतर ब्लाॅकेज निघालेच तर तिथंच प्लास्टी करू म्हणून मी शिर्डीला नेऊ का? याबाबत कृष्णाची परवानगी मागितली. पण गोजरबाईस आपलं मरण जाणवलं की त्या घाबरल्या व कृष्णास बिलगल्या. मग कृष्णानं प्रेमानं म्हणा की नाईलाजानं पुण्यालाच नेलं. जातांना अप्पाला यातना होत होत्या पण गोजर साठी खाली मान घालत ते निघाले. तरी सुरानं त्यांना सोडलंच नाही. दवाखान्यात चाचणी झाली. कृष्णानं रिपोर्ट नाॅर्मल असल्याची बतावणी केली. सुरा मग निर्धास्त होत अप्पाकडं पैसे टाकत परतला.
कृष्णानं घरी आणलं. तोच सुनेचा पारा चढला. कपाळावर आट्याचं जाळं विणलं गेलं. कृष्णानं रामास निदान एंजिओप्लास्टी तरी करावीच लागेल हा डाॅक्टरांचा सल्ला कळवला.
" कृष्णा तात्पुरत्या गोळ्या इंजेक्शन सुरू ठेव.ही शेतात राबणारी माणसं काटक असतात. आपोआप रिकव्हर होईल आई!" तारे तोडत चालढकल गेली.
गोळ्या घेत ते कृष्णाकडं राहू लागले. अप्पांची गोजरसाठी मजबुरी होती. तरी ते सकाळी उठले की साऱ्या बंगल्याची साफसफाई करत. लाॅनमधलं गवत काढणं, झाडांची छाटणी करणं, पाणी देणं अशी सारी काम करत.गोजरबाईस वेळच्या वेळी औषधं ही देत. नातवांना शाळेत सोडायला जात. महिना भरात त्यांनी या रुटीनमध्ये स्वत:ला झोकून घेतलं. बागेतल्या झाडांना आकार देत त्यांनी बागेस बाळसं आणलं. मध्यंतरी सुरा येऊन भेटला. गोजरमाईची तब्येत बरी वाटली म्हणून तो त्यांना परत नेतो म्हणून सांगू लागला. पण कृष्णास आत कुठं तरी डाक्टरांच्या सल्ल्यात भिती दिसत होती. त्यानं अजुन थांब औषधोपचार सुरू आहेत सांगत त्यास परत पाठवलं. नी सून प्रेमा बिथरली. तिला वाटलं ही ब्याद आता काय जात नाही. मग ती कृष्णामागं लागली. यांना मोठ्यांकडं पाठवा म्हणून दटावू लागली.त्यानं पुन्हा रामास फोन केला.
" दादा एंजिओप्लास्टी तरी करून टाकू!"
" हे बघ, काही होणार नाही.नी तुला जर वाटत असेल तर कर अॅडमीट पण मला दवाखान्यात थांबणं शक्य नाही.हवं तर निम्मा खर्च मी आजच देतो." कृष्णा चक्रावला. आणण्याच्या वेळी खर्चाचं यानं कबुल केलं नी आता निम्यावर आला. शिवाय दवाखान्यात थांबायचं ही नाही म्हणतोय!"
तोच दुसऱ्या दिवशी विस्फोट झालाच. आमोनी गावाची आदर्श गाव म्हणून निवड झाली होती व यशोगाथा या सदरात दूरदर्शन वर कार्यक्रम दाखवणार होते. सुरानं फोन करत कळवलं होतं. त्यात अप्पांचे पण मोबाईल वरील जुन्या रेकार्डींगच्या काही बाईट्स दाखवल्या होत्या. त्या कार्यक्रमाचे पुनर्प्रक्षेपण दहा वाजता दाखवणार असल्यानं अप्पा आज लवकर बागेचं काम आटोपून हाॅलमध्ये टि.व्ही. समोर आले. नेमक्या त्याच वेळी सुन प्रेमाचे माहेरचं कुणी तरी आलं होतं व त्यांना नाश्त्यात बदामाचा शिरा व काही पदार्थ घेऊन प्रेमा हाॅल मध्ये प्रवेशीत झाली. अप्पा उठणार तोच आमोनी व गावातील लोक दिसू लागले. त्यानं अप्पाचे पाय थबकले. अप्पाचा अडथळा प्रेमाला खटकू लागला.
" बाहेर कोण आहे रे? जयू? त्या गेटवर कुत्रं आहे बघ,हाकल त्याला! त्याला कितीही खाऊ घातलं तरी लाळ गाळत शेपटी हालवत उभंच राहतं ते! पेकाटात काठी हाण त्याच्या!"
अप्पाला ना नाश्त्याची हाव होती ना खाण्याची.त्यांना फक्त आपलं गाव टि.व्हीवर दिसतंय याचंच कोण अप्रुक वाटत होतं.म्हणून प्रेमाच्या बोलण्यावर त्यांचं लक्षच नव्हतं. पण गोजरबाईनं हे ऐकलं नी त्या तडक हाॅलमध्ये येत अप्पाचा हात धरत घरात ओढू लागल्या.अप्पा त्यांना थांबवत बातमी दाखवणार तोच त्याचं लक्ष गोजरच्या आसवाकडं गेलं. क्षणात ते भानावर आले! त्यांनी गेटकडं पाहीलं तर कुत्रं नव्हतंच.त्यांचा उभा देह संतापानं व लाचारीनं थरथरू लागला. टिव्हीवर फेटा बांधलेला त्यांचाच फोटो दिसत होता. पण त्यांना आता कुत्र्यालाच फेटा बांधलाय असाच भास होऊ लागला. ते गर्रकन वळाले.
" प्रेमा! अप्पांना ही आण ना नाश्ता!" पण अप्पा थांबलेच नाही. आषाडात अख्ख्या गावाला भंडारा घालणारे अप्पा आज लाळ घोटणारं कुत्रं ठरले.त्यांनी गोजरला लगेच तयारी करायला लावली. त्यांच्या हंबरणारा देह पाहताच गोजर बाईच्या छातीत कळा सुरू झाल्या! नी दुसरा झटका...! धावाधाव, आरडाओरड... रामास फोन... रामा गाडी आणत दवाखान्यात नेऊ लागला.तोच कृष्णा त्यावर त्रागा करत सांगू लागला नी अप्पास कळालं. रामानं खाजगी दवाखान्यात नेलं. तेच निदान.मग रामानं एंजिओप्लाॅस्टी करण्याचा निर्णय घेतला. दवाखान्यात अप्पा व गोजर बाईस ठेवून निघाले. आॅपरेशन झालं. अप्पांनी सुरास फोन करताच तो धावतच आला. व डिस्चार्ज केव्हा मिळणार हा तपास करून त्या दिवशी परत येण्याचं सांगत पैशासाठी परत फिरला. बरेच दिवस दवाखान्यात अप्पा गोजरबाई सोबत एकटे राहिले. एक दिवस रामा येत त्यांना अंघोळीस व कपडे बदल करण्यासाठी घरी घेऊन गेला.सुमी मोठ्या मुलीसोबत लाॅनवर होती. हातात पतंग होता. तिनं अप्पाला पाहिलं.
" बेटा परी!हा पतंग, फुगा कितीही वर उडाले तरी हवा पडल्यावर पतंग व हवा निघाल्यावर फुगा खाली पडतातच. भली भली ताठा असलेली माणसं ही असंच शेपूट ...."
"सुमी पटकन चल..." रामानं विषय वाढू नये म्हणून मध्येच सुमीला टोकलं.अप्पा सुन्न काळजानं अंगावर पाणी ओतत होते पण उलट काहीली वाढतच होती.
बरेच दिवस झाल्यावर डिस्चार्ज च्या दिवशी रामा येईना, ना कृष्णा.मात्र सुरा वेळेवर आला. पण आदल्या दिवशीच अप्पानं गोजरच्या गळ्यातील तीन तोळ्याची मंगल पोत काढली.
" अहो, मंगळसुत्र आहेत मंगलपोतीत! निदान आपण हयात आहात तो पावेतो तरी....गळ्यात!" गोजर बाई आसवं गाळत हाफतच म्हणाली
" गोजर ! जिवनात मंगलपोत पेक्षा स्वाभिमानाचा पोत टिकवणं अधिक महत्वाचं असतं गं!" म्हणतच त्यांनी रिक्षा करत सराफाकडं विकून आले होते. आधीचे सुरा टाकून गेलेले पैशेही होतेच. त्यातून अप्पांनी बील पेड केलं नी तोच सुरा शेवंतासह आला.
सुरानं येताच काऊंटरवर जात बिलाची चौकशी केली. बील पेड झाल्याचं कळताच त्यानं "अप्पा बील कोणी पेड केलं?" विचारलं. अप्पांनी रामानं पेड केल्याचं सांगत वेळ मारली. तोच शेवंताचं लक्ष मोठमाईच्या गळ्यावर गेलं.
" माईच्या गळ्यातली पोत कुठंय? " सुराकडं पाहत शेवंतानं विचारलं.
सुरानं अप्पाकडं प्रश्नार्थक नजरेनं पाहताच अप्पा थरथरत नजर टाळत " होय मीच काढली होती"
"अप्पा द्या मग लवकर,विना मंगलसुत्राचा गळा विचीत्र दिसतोय माईचा! मी घालून देते!" शेवंता मागू लागली.
माईच्या पापणकडा पाणावल्या. अप्पांनी वेळ मारण्यासाठी प्रयत्न करत " घरी कृष्णाकडं ठेवलीय" सांगितलं.
सुराला संशय आला. तो काऊंटरवर गेला व बील कोणी व केव्हा पेड केल्याचं विचारताच सिस्टरनं त्यांच्यासोबत असलेल्या बाबांचं नाव सांगताच सुरा थरथरला. त्यानं सर्वांना गाडीत बसवलं.
" अप्पा ,गाडी कोणत्या सराफाकडं नेऊ?" सुरानं अचानक केलेल्या प्रश्नानं अप्पा भांबावले.
" का क्काय झालं सुरा!"
" अप्पा माझी माई विना पोतची आमोनीत जाणार नाही! नविनच करतो पोत!"
माई व अप्पा रडू लागले.
" अप्पा माझा बाप जिवंत असतांना माझ्या माईच्या गळ्यातून मंगळसुत्र काढण्याची हिम्मत कशी झाली तुमची? निदान हा सुरा येईपर्यंत विश्वास नव्हता का?"
अप्पानं मुकाट्यानं सराफाचं दुकान दाखवलं. सुरानं सोनारास वरून दोन हजार देत सारे पैसे देत तिच पोत परत घेतली व शेवंताकडं दिली.
" अप्पा माईच्या गळ्यात टाका पोत!" शेवंता हसत रडत बोलताच अप्पा माईस बिलगले व शेवंता रडतच माईस बिलगली.
" शेवंती आता जरी मरण आलं तरी मी निवांत मरेन .फक्त मरतांना लेक म्हणून तुझीच मांडी मिळावी हीच अंतिम इच्छा आहे गं!" माईनं डोळ्यातील आसवं पुसत शेवंताकडं पाहिलं.त्याचवेळी अप्पा सुरास म्हणाले.
" सुरा तू तर माझी सोन्याची मूस आहेस पोरा! तुझ्यावर विश्वास नाही तर कुणावर ठेवणार!"
" अप्पा मी सोन्याची मूस असो वा नसो पण तुम्ही या सुरारूपी लोहाचे परीस आहात हे कायम ध्यानात ठेवा. नी आता रामा दादा बोलवो वा कृष्णादादा,पण या सुरास सोडून कुठंच जाणार नाहीत हे वचन द्या!"
कारण त्यांना खऱ्या बापाची किंमत नसेल पण दत्तक बापाची किंमत मला अनमोल आहे!"
गाडी आमोनीकडं निघाली. सुराला आपल्या सावत्र भावांनी घरातून हाकलंलं तो दिवस आठवला.

क्रमशः