वेळ झाली होती...
त्या काळोखातून आलेल्या प्रेरणांनी जयेशचा अंतर्बाह्य ताबा घेतला होता. त्याच्या मानवी जाणिवा केवळ स्थळकाळाच्या ज्ञानापर्यंत मर्यादित उरल्या होत्या. बसल्या जागेवर तो गर्रकन फिरला. जयघोषात रंगलेल्या कापालिकांच्या गर्दीकडे त्याने नजर फेकली.
प्रचंड कोलाहल करणारा तो जमाव शांत..शांत होत गेला. स्तब्ध झाला.
जयेशचे डोळे....
त्याकडे बघण्याची कुणाची क्षमता नव्हती. त्या अघोरी तत्वाने आपला आविष्कार त्या दोन नेत्रात साकारला होता. खोल, गर्द, काळ्याशार डोहात पाहिल्याचा भास त्यांच्याकडे बघून होत होता आणि त्यासोबत बुडण्याची भीतीही वाटत होती..
आणि त्याचे साकार दर्शन घेतल्याशिवाय बुडण्याची कोणाचीही तयारी नव्हती !
काही खाणाखुणा झाल्या नि त्या गर्दीतले दोघेतिघे उभे राहिले.
एकाने गर्द काळ्या रानटी फुलांची माळ त्याच्या गळ्यात घातली..
जयेश ताडकन उभा राहिला..अलगद एकेक पाऊल टाकत बाहेर पडला.
त्याचे स्वागत करण्यासाठी प्रत्येकाने ती अघोरी कृती केली.
मनगट, अंगठा, अनामिका, मध्यमा ...जे हाती आलं तिथं चिरून त्याच्या पावलांवर रक्ताचा अभिषेक केला.
ते रक्त त्याच्या पावलातून शोषले जात होते..
सभामंडपाच्या बाहेर येऊन त्याने आभाळाकडे पाहिले.
आकाशाचा रंगही रक्तवर्णी झाला होता.
गडगडाट करीत तो हसला..
काही क्षण...होय काही क्षण उरलेत !
तो गर्भ उषेच्या उदरात स्थापित होईल..
त्याच्या वाढीसाठी मानवाप्रमाणे महिन्यांच्या कालावधीची मर्यादा नसणार..नाहीच ! उषाच्या हाडामांसाचा फडशा पाडून तो लागलीच वाढणार होता. कोणाला काही कळण्यापूर्वीच तो त्याच्या मूळ रुपात बाहेर पडणार होता..काही क्षणांचा अवधी..!
तो दणदणीत पावले टाकत सीता भवनाची वाट चालू लागला. उग्र कापालिकांचा तो समुदाय त्याच्यामागे चालू लागला..
त्या विचित्र मिरवणुकीकडे शहरातले नागरिक आश्चर्याने आणि काहीशा भीतीने बघत होते. सकाळपासून भेसूर रडणारी कुत्री, अवेळी घुत्कार टाकणारी घुबडे, आभाळातला प्रखर लालिमा आणि आता ही अघोरांची शोभायात्रा....
प्रत्येक बघ्याच्या डोक्यात प्रश्नांची गर्दी झाली होती.

ती रात्र अधिकच अंधारली..छतावर येरझाऱ्या घालणाऱ्या जयेशने खाली पाहिले. ते ओंगळवाणे कापालिक दिवसभराच्या श्रमाने शिणून अंगणात अस्ताव्यस्त पडले होते. तो ठराविक स्वर ऐकल्यानंतरच त्यांना जाग येणार होती. काही अंतरावरच्या कोपऱ्यावर कुणीतरी उभे होते.
जयेशने डोळे आणखी ताणून पाहिले..
ती अंगलट ओळखीची होती.
सीताक्का..! ती काय करतेय तिथे ?
क्षणभर खाली उतरून जावे असे त्याला वाटले.
पण तेवढ्यात...
सीता भवनच्या माथ्यावरच्या काळोखात गारठा भरला गेला. जयेशच्या आतून कोणीतरी धडका देऊ लागले. त्याच्या हृदयाचे ठोके कित्येक पटींनी वाढले. आजवरच्या अघोरी साधनेचा अनुभव नसता तर त्याचे हृदय कधीच फाटले असते..
या खुणांचा अर्थ स्पष्ट होता..
ती घटिका आली होती.
त्याची पावले बेडरूमकडे वळली.
ते काही पावलांचे अंतर त्याला मैलामैलाचे वाटत होते.
हलक्या हाताने त्याने दार उघडून आत प्रवेश केला. मन घट्ट करून दोन्ही हात छातीशी धरून त्यांचा काटकोन केला. त्याच्या हृदयाजवळ काहीतरी लप्पकन हलले.
त्या स्पर्शानेही त्याला कितीतरी धीर आला.
उषाकडे त्याने नजर टाकली...
ती सलज्ज नेत्रांनी त्याच्याकडे बघत होती.
वेडी..काही क्षणात तू संपणार आहेस!..त्या विचाराने जयेशच्या ओठांवर हसू फुलले..हळूहळू तो उषाकडे सरकू लागला.
त्या मिलनोत्सुक स्त्रीने तिचे दोन्ही हात फैलावत त्याला निमंत्रण दिले.
तिच्या चेहऱ्याजवळ पोहचल्यावर त्यांची नजर एक झाली..
धोका...इथे काहीतरी वेगळं घडतंय..
त्याला आतून संदेश येऊ लागले..
पण आता वेळ नव्हता. तो आणखी खाली झुकला..
सप्प...आवाज झाला. त्याला काही क्षण कळले नाही. तो धडपडत उठला.
भानावर आला तेव्हा त्याचा हात स्वतःच्या गळ्यावर जाऊन भिडला होता. बाहेर येऊ पाहणारी रक्ताची कारंजी दाबण्याची त्याची व्यर्थ धडपड सुरू होती..
जमिनीवर धाडकन कोसळला तेव्हा जयेशच्या लक्षात आले.
उषाने अत्यंत सफाईदारपणे त्याचा गळा चिरला होता..
अवघ्या शरीराचे रक्त एकत्र होऊन त्या गळ्यातून बाहेर पडू बघत होते. स्वरयंत्र निकामी झाल्याने त्याचा आवाज बाहेर पडत नव्हता.
त्याच्याकडे निराकार बघत उषा उभी होती. तिच्या हाताने ते शस्त्र अद्यापही घट्ट धरले होते.
शुद्ध हरपताना जयेशने पाहिले.
खोलीचा दरवाजा उघडून सीताक्का आत आली. जयेशची तडफड पाहून तिचे डोळे डबडबले..मग तिने आपली बोटे त्याच्या गळ्यावरच्या जखमेत खोलवर रुतवली. त्यांची हालचाल करत तिने रक्ताला बाहेर येण्यास वाट करून दिली.
तो शांत झाला...पण अद्याप त्याची प्रतिक्षा लागून होती.
मृत, थंड झालेल्या शरीरात ते फार काळ राहू शकत नव्हते.
जयेशच्या गळ्यातून एक सूक्ष्म काळा ओघळ बाहेर पडू लागला.
सीताक्काने उषाला खूण केली तशी तिने ती वस्तू काढून दिली.
लाख, राळ, कापूर आणि तशाच कितीतरी ज्वालाग्रही वस्तूंनी तयार केलेले ते पात्र होते.
सीताक्काने अत्यंत काळजीपूर्वक तो ओघळ, त्याचा थेंब न थेंब त्या पात्रात साठवला. त्या पात्रावर त्याच घटकांचे वेष्टन घट्ट लपेटलं.
जयेशच्या निपचित पडलेल्या शरीराशेजारी ते पात्र ठेऊन सीताक्का स्वयंपाकघरात गेली. तिथून आणलेलं रॉकेल तिने त्या खोलीच्या कानाकोपऱ्यात शिंपडले. काडी ओढली..
आगीने पुरेसा पेट घेतलाय हे लक्षात येताच तिने उषाचा हात धरला.
जिना उतरून त्या दोन्ही खाली उतरल्या. जातांना त्या नव्या भाडेकरूंनाही तिने सोबत नेलं. त्या तिघांना सुरक्षित अंतरावर नेल्यानंतर तिने भाडेकरूला विचारले.
ते आणलेस सोबत ?
होय..म्हणून त्याने सोबतचा डबा तिच्या हातात दिला.
येते मी...म्हणत सीताक्काने निरोप घेतला.
उषाने तिचा हात घट्ट धरला.
कुठे निघालात मला सोडून ?...तिचा सूर रडवा झाला होता.
सर्वात महत्वाचं काम करायला जातेय..सीताक्का तुटकपणे बोलली.
पण उषा तिला सोडायला तयार नव्हती.
सीताक्काने तिच्या डोळ्यांवर हातांनी क्रिया केली. झापड उतरल्याप्रमाणे ती भानावर आली. तोवर सीता भवनचा वरचा मजला धडधड पेटला होता. त्याच्या ज्वाळानी आसमंत प्रकाशत होता.
तो प्रकार उषा स्तिमित होऊन पाहू लागली.
आमची सर्व मालमत्ता तुला मिळेल उषा..पण माझं ऐकशील तर दानधर्म करून ती नष्ट कर. ते पापांच संचित आहे. त्यात बरबटू नकोस. मोह सोड..फेऱ्यात अडकू नकोस..सीताक्काने निरवानीरव केली.
मूढ होऊन उषा तिच्याकडे बघत राहिली.
तोवर सीताक्का त्या कापालिकांच्या जमावात पोहचलीसुद्धा !
जळणाऱ्या सीता भवनला पाहून ते सर्व उर बडवत होते.
धोका झालाय..धोका! सीताक्का गरजली. तसं त्या सर्वांनी तिच्याकडे पाहिले..त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्हे होती.
याचा जाब तिथे जाऊन विचारावा लागेल..इथे थांबून उपयोग नाही. ती पुन्हा ओरडली आणि तरातरा चालू लागली. तिच्यामागे रडत भेकत तो जमाव चालू लागला. त्यांच्यामागे काही अंतर राखून उषा चालत होती.

त्या भग्न वास्तूजवळ तो समुदाय येऊन भिडला तेव्हा मध्यरात्र उलटण्याच्या बेतात होती. सीताक्का तडफेने सभामंडप ओलांडून गाभाऱ्याजवळ पोहोचली. पाठोपाठ ते किळसवाणे कापालिक येऊन बसले.
सीताक्काच्या हालचालींकडे ते उत्सुकतेने बघत होते.
त्या गाभाऱ्यात आज अस्वस्थता जाणवत होती. काहीतरी विपरीत घडण्याच्या आशंकेने तिथल्या काळोखाने सावध पवित्रा घेतला होता.
सीताक्काला ते जाणवलं..ती स्वतःशी हसली.
दुर्दैवी जीवांना लालसेपोटी हाताशी धरून माणसातून उठवणाऱ्या नतद्रष्टानो, हेच ना तुमच्या आगमनाचे प्रवेशद्वार.....बघा...नीट बघा...मानवाचा सूड कसा असतो ते..काही काळापुरते भलेही तुम्ही सामर्थ्यशाली भासत असाल. पण तुमचे अस्तित्व साकारणे कदापि शक्य नाही. यापुढे आणखी कुठल्या सीताक्काला हाताशी धरून विध्वंसाचा डाव तुम्हाला खेळता येणार नाही..सीताक्का पुटपुटत होती.
सोबत आणलेल्या डब्यातील द्रव्याचे काही थेंब तिने गाभाऱ्यात टाकले.
अशा पवित्र तीर्थाची त्या काळोखाला सवय नव्हती. अंग भाजल्याप्रमाणे आतून चित्कार उमटला. पण काही क्षणच!
तिथे पुन्हा शांतता पसरली. सुक्ष्म हास्यध्वनीही उमटला असावा.
ठीक आहे..या तिर्थाला आत प्रवेश देणार नाहीस तू...पण मी...माझ्यात तुझं द्रव्य मिसळले आहे...तुला वचन दिले त्या दिवशी..मला कसा थोपवशील ?
म्हणत सीताक्का ताडकन उठून उभी राहिली...
तिच्यामागे असलेल्या गर्दीत गोंधळ माजला.
काय करतेय ही ?
तोपर्यंत सीताक्का त्या गाभाऱ्यात प्रवेशलीसुद्धा !
सोबतच्या डब्यातील द्रव्य तिने ओतून घेतले..
एक भयंकर हादरा बसला. कानठळ्या बसवणाऱ्या किंकाळ्यानी तो परिसर थरारून गेला. जमीन कलली. त्या वास्तूचा एकेक चिरा सुटा होऊन कोसळू लागला..
बचावाची संधी कोणालाही नव्हती.
तो संपूर्ण समूह त्या अवजड दगडांच्या ढिगाऱ्याखाली दाबला गेला.
काही वेळाने ते दगड वितळू लागले..त्यांची राख होईपर्यंत ते तापले..
त्यावेळी त्या नष्टप्राय वास्तूच्या अवकाशात काही पांढुरक्या सावल्या स्तब्ध उभ्या होत्या. त्या वास्तुतून बाहेर पडलेल्या नवागत सावलीने विचारले..
संपलंय सगळं..निघू या आता ?
होय, चला..इथेही तुम्ही मालकीण सीताक्का..आणि तिकडेही तुम्हीच! एक सावली बोलली.
काही क्षण खळखळाट झाला..त्या सर्व सावल्या वरच्या दिशेने झेपावल्या.

उषा हा सर्व प्रकार बघत होती.
सगळीकडे शांतता झाली. तिने हळूच वेणी सोडली. तिच्या विस्तीर्ण केशसंभारातून खाली पडू पाहणारा तो अंश ....तिने अलगद झेलला.
असा कसा संपेल खेळ ?
चिरतारुण्य मिळाल्याशिवाय नाहीच नाही..होय ना ?
तिच्या तळहातावरल्या त्या काळ्याशार ओघळाने किंचित खळखळून तिला संमती दिली...
(समाप्त)
धन्यवाद !

सीता भवन चे सर्व भाग पुढील प्रमाणे
सीता भवन भाग १ > https://marathighoststories.blogspot.com/2019/04/marathi-story.html
सीता भवन भाग ८ >https://marathighoststories.blogspot.com/2019/06/8_19.html
सीता भवन भाग ९ >https://marathighoststories.blogspot.com/2019/06/9.html
सीता भवन भाग १० > https://marathighoststories.blogspot.com/2019/07/10.html
सीता भवन भाग ११ > https://marathighoststories.blogspot.com/2019/07/11.html
सीता भवन भाग १२ >https://marathighoststories.blogspot.com/2019/07/12.html