#सीता भवन भाग 8
#सचिन बी. पाटील
वचन देणं सोपं, त्याचा निर्वाह करणे मात्र महाकठीण...
त्यातही काळोखात विकसित होऊ पाहणाऱ्या शक्तींना दिलेले वचन !
आपल्या संपूर्ण संहारक सामर्थ्यानिशी प्रकट होण्यासाठी आसुसलेल्या त्या अघोरी शक्तीला एक माध्यम हवं होतं. कुमार्गातली प्रलोभने अधिक मोठी, भव्य असतात. ते दाखवून स्वतःच्या सेवेला जुंपून घेतलेल्या उपासकांपैकी एकाच्या काव्याला सीताक्का फसली होती. वचन देऊन बसली होती.
जयेशचा जीव कसल्या मोबदल्यात वाचला हे रहस्य फक्त तिलाच ठाऊक होते. थोरल्या बहिणीचा बळी दिल्यावर तिला आपण किती मोठी घोडचूक केली ते लक्षात आलं होतं..
पण ती केवळ सुरवात असावी...किमान तिला तरी हे कळायला हवं होतं !

त्यांनी प्रारंभी केलेल्या मागण्या वरवर पाहता अगदी साध्या होत्या. बळीसाठी एखादा पक्षी, एखादा प्राणी... विशिष्ट तिथींना जयेशला घेऊन रात्री-बेरात्री त्या भग्न वास्तूत जाणे, तिथला विधी उरकणे, कधी थोड्याफार रक्ताची मागणी पूर्ण करणे...त्यात तिला काही वावगं वाटत नव्हतं.
चूक कळण्यासाठी दरवेळी ठोकर बसावी असे गरजेचे नसते..
काहीदा त्यासाठी जीवाचे मोल द्यावे लागते...
त्या घटनेनंतर सीताक्काला जाणीव झाली...
आपण भयंकराला निमंत्रण दिलंय!
आणि ते ....
आता 24 तास तिच्या आजूबाजूला वावरत होतं.
तिच्यावर नजर ठेवून होतं..
जिवंत, मानवी स्वरूपात...
जयेशच्या रूपाने !
होय..तो निरागस, मानवी जयेश त्यादिवशीच नाहीसा झाला होता. आता शिल्लक होता तो अमानवी शक्तीच्या संपूर्ण नियंत्रणात असलेला जयेशचा चालताबोलता देह !
सीताक्का वगळली तर आपल्या उगमाचा कोणताच साक्षीदार त्याला नको होता. त्यातून त्याचे वडील....
त्यांना जयेशच्या बदललेल्या स्वरूपाची चाहूल लागली असावी.
त्याशिवाय त्यांनी सीताक्कावर पाळत ठेवण्याचा मूर्खपणा केला नसता. त्याची शिक्षाही त्यांना भोगावी लागली.
वेडाच्या भरात त्यांनी गळफास लावून जीव दिला. तुळईला लटकलेला, जीभ बाहेर आलेला तो मृतदेह !....खोबणीबाहेर येऊ पाहणारे त्यांचे डोळे जर कुणी नीट पाहिले असते तर त्याला ते निश्चितच जाणवले असते..
काहीतरी भयानक, अमानवी पाहिल्यानंतरची भीती त्या डोळ्यांत होती !
आता जयेशला रान मोकळे होतं..
संपत्तीची ददात नव्हती. ती कुठून येतेय याची विचारणा करणारे कोणी नव्हते. दिवसभर स्वतःला कोंडून घेणारा जयेश रात्रभर टक्क जागा असायचा....त्याचा वामाचार वाढतच होता.
सीताक्काची काळजीही वाढत होती. त्याला हवी असलेली उपासनेची ती अघोरी साधने..त्यांची पूर्तता करतांना ती मेटाकुटीस आली.
यापुढे आपण काहीच आणून देणार नाहीत असं तिने निक्षून सांगितलं.
तो काहीच बोलला नाही. फक्त खांदे उडवून हसला.
दुसऱ्या दिवसापासून तिथे किळसवाण्या वेशातील लोकांची ये-जा सुरू झाली. त्यांच्या खांद्यावरच्या मळकटलेल्या, उग्र, घाणेरड्या वासाच्या गोण्या..त्यांच्या सदोदित भकभकणाऱ्या चिलमी..त्यातील गांजाचा दर्प..
त्या वास्तूचा अगदी उकिरडा झाला होता !

एकदाच तिने सोक्षमोक्ष लावण्याचा प्रयत्न केला..तेव्हा !
तिचे दोन्ही हात धरून जयेशने समोर बसवले. त्याची नजर पाहताच ती थक्क झाली..हा इतका मोठा बदल आपल्या ध्यानी कसा आला नाही ?
त्याच्या डोळ्यातली बुब्बुळे पांढरीफेक झाली होती. उर्वरित पांढरी जागा काळीभोर होऊन चमकत होती..
तो त्याच्या साधनेच्या चरम सीमेजवळ पोहचला होता !
त्याचा आवाज..किती थंड..बर्फाची सूरी काळजात खुपसावी तसा...
सीताक्का..नीट समजून घे..यातून तुझी सुटका नाही. मी केवळ निमित्तमात्र आहे. त्याला वचन देणारी तू होतीस. तू नेहमीच त्याला जवळ हवीस..तसा करार केलाय तू ! इथून जाऊ पाहशील तर तुला भयंकर यातना होतील आणि त्यातून सोडवण्यासाठी तुला मृत्यूही येणार नाही. जर्जर देहाने तू स्वतःची दुर्दशा बघत तडफडशील...
ते शब्द ऐकून ती काय समजायचे ते समजली. पश्चातापाचे अश्रू तिच्या डोळ्यातून वाहू लागले...
स्त्रियांचे अश्रू !
काय नाही घडवलं त्यांनी...
साम्राज्ये उध्वस्त केली..महाकाव्यांना प्रेरणा दिली..कितीतरी युद्धे लढवली..कित्येक बळी घेतले...
सीताक्काच्या अश्रूनीही नक्कीच परिणाम केला !
त्याची उपासना काही दिवस बंद झाली. मूळची वास्तू पाडून त्याजागी नवी इमारत उभी राहिली. तिच्या सर्व अभद्र आठवणी त्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्या, मातीसोबत वाहिल्या गेल्या..
वय झालंच होतं..घराणं नामांकित होतं. घरात लक्ष्मी मुक्त संचार करत होती. जयेशचा विवाह जुळण्यात कुठलंच विघ्न आलं नाही.
राजाची राणी बनवण्यासाठी उषाला तिच्या आईवडिलांनी न रडताकुढता हसतखेळत रवाना केलं..
सीताक्का तिला ओवाळत होती....
नि तिची नियती खदखदून हसत होती !

जयेश उषाची सर्वतोपरी काळजी घेत असल्याचं पाहून सीताक्का काहीशी निवांत झाली होती. जे घडून गेलं, ते अभद्र अरिष्ट आता टळल..यापुढे सर्व काही ठीक होईल..अशाच सुखात असतांना आपले डोळे कायमस्वरूपी मिटावेत..कोणत्या पापाची जाणीव त्याक्षणी उरू नये..हा जीव कशातच न अडकता मुक्त व्हावा..बस्स..इतकंच हवं होतं सीताक्काला !
ती तळहातावरल्या त्या व्रणाकडे बघत असायची..ती खूण! तिला नेहमीच त्या अघोरी कृत्याची जाणीव करून द्यायची..
पण अलीकडे ती टोचणीही बोथट होत चालली होती.
अशातच एकदा ती एकटी असल्याची संधी साधून जयेश तिच्या खोलीत आला. त्याच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद पसरला होता.
त्याला पाहून सीताक्काचा चेहराही फुलला.
तो म्हणाला..
सीताक्का, आजवर तू, मी, आपण जे काही केलं, करत होतो, त्या सर्वांचा शेवट होणार आहे. तू खूप झटलीस ग..काय काय केलं नाहीस माझ्यासाठी..तुझे उपकार कशानेच फिटणार नाहीत..
आणि काही क्षणातच तो स्फुंदून रडू लागला.
सीताक्का..कावरीबावरी झाली ती! एवढ्यात हसणारा जयेश रडतोय का ? आणि ही निरवानिरवीची भाषा कशासाठी ?
जयेश, लेकरा..आज झालंय तरी काय तुला ? नीट सांग राजा ...म्हणत तिने दोन्ही तळहाताच्या ओंजळीत धरून त्याचा चेहरा वर उचलला..
त्याची नजर पाहून ती चरकलीच !!
ते पांढरेधोप बुब्बुळ आणि चकचकीत काळ्या पार्श्वभूमीचे डोळे...
अतीव तेजाने लकाकत होते..त्यापेक्षाही त्याच्या तोंडातून बाहेर पडलेले ते शब्द...तिचे काळीज भेदून गेले..
सीताक्का....तो येण्याची वेळ झालीय !
(क्रमशः)

सीता भवन चे सर्व भाग पुढील प्रमाणे
सीता भवन भाग १ > https://marathighoststories.blogspot.com/2019/04/marathi-story.html
सीता भवन भाग ८ >https://marathighoststories.blogspot.com/2019/06/8_19.html
सीता भवन भाग ९ >https://marathighoststories.blogspot.com/2019/06/9.html
सीता भवन भाग १० > https://marathighoststories.blogspot.com/2019/07/10.html
सीता भवन भाग ११ > https://marathighoststories.blogspot.com/2019/07/11.html
सीता भवन भाग १२ >https://marathighoststories.blogspot.com/2019/07/12.html