सीताक्का, तू मोठंच धाडस करू पाहतेस ! तुझ्या जीवाला अपायही होऊ शकतो..तो बायकी आवाज कुजबुजला.
आता मी कोणत्याही थराला जायची तयारी केली आहे. माझ्या मृत्यूने जर हा खेळ संपणार असेल तर मी मागेपुढे पाहणार नाही..सीताक्का ठामपणे म्हणाली. निर्धार पक्का केल्याने तिचा चेहरा करारी झाला होता.
पण उषा, तिचं काय ? ती कशी सामील होईल आपल्यात ?...पुरुषी सावली बोलली.
ती सहजपणे येणार नाही. तिला चिरतारुण्याची भुरळ पडलीय. ते केवळ आमिष आहे हे तिला कळत नाहीये. त्याच्या जन्मानंतर ती खचितच जगणार नाही. पण एका महाभयंकर पापाची धनीण मात्र होऊन बसेल..म्हणत सीताक्काने उसासा सोडला.
सीताक्का, तिला वेगळ्या मार्गाने वश केलं तर ?
कसं करता येईल ?
तिच्या शरीरात प्रवेश करून ! त्या दोन्ही सावल्या एकदमच बोलल्या.
ते कदापि शक्य नाही. तिचं शरीर बंधनात आहे. तिथे तुम्हाला प्रवेश करता येणार नाही...सीताक्काच्या स्वरात खिन्नता होती.
काही क्षण तिथे शांतता पसरली.
एक मात्र करता येईल....सीताक्काने जणू कोंडी फोडली.
काय ?
तुम्हाला तिचे शरीर वर्ज्य आहे, माझे नव्हे. तुमची शक्ती काही काळापुरती मला दिलीत तर एक उपाय करता येईल..सीताक्काचा चेहरा उजळला होता.
त्या दोघांनी मग अधिक वेळ घालवला नाही.
त्या खोलीत प्रचंड गारठा पसरला. अंधार आणखी गडद झाला. तिथल्या अवकाशात नजरेला न जाणवणारे कितीतरी सूक्ष्म बदल घडून आले. सीताक्काने डोळे मिटले.
त्या दोन्ही सावल्या आकुंचत गेल्या. त्यांचे स्वर तिच्या कानावर पडले.
सीताक्का, तुझं मन कोरे कर. कोणताही विचार करू नकोस. विचारशून्य अवस्थेत मनाची कवाडे उघड..आम्हाला प्रवेश दे..प्रवेश दे..
सीताक्का समाधिस्त झाली. निष्क्रिय, निर्गुण, बुळी होऊन ! आता ती स्वतःचा श्वासही स्पष्टपणे ऐकू शकत होती. स्वतःच्या शरीरात बाह्यतत्व प्रवेश करीत असल्याचं तिला जाणवत होतं. अमानवी योनीत अडकलेली ती पिशाच्चे मानवी शरीरात शिरत होती.
आपले शरीर एका निराळ्या शक्तीने भारले गेले असल्याची जाणीव उमटली तसं सीताक्काने समाधी सोडली. तिच्या वृद्ध शरीराला ती प्रक्रिया कमालीची थकवणारी ठरली.
त्या थकव्याने काही वेळातच ती गाढ झोपी गेली.

सकाळी काहीशा उशिरानेच तिला जाग आली.
अंगणात कोलाहल सुरू होता. बिछान्यातच काहीशी सरकून तिने खिडकीतून खाली नजर टाकली.
भणंग कापालिकांचे जथ्थे सीता भवनच्या अंगणात उभे होते. त्यांच्या मळकटलेल्या चेहऱ्यावर कमालीचा तजेला पसरला होता. आभाळाकडे दोन्ही हात आणि तोंडे वर करून ते अगम्य भाषेत सामूहिक आवाहन करत होते.
अशा अभद्र दर्शनाने दिवसाची सुरवात !
सीताक्काच्या काळजात कळ उठली.
भिंतीवरच्या दिनदर्शिकेकडे तिने नजर टाकली..
उषेच्या गर्भात त्या अनिष्टाचे बीजारोपण करण्याची तिथी येऊन ठेपली होती.
त्याच्या आगमनाला बळ देण्यासाठी ते उपासक गर्जत होते..
आता घाई करायला हवी...
स्वतःला बजावत सीताक्का ताडकन उठली.
नित्यकर्म आटोपून ती उषाकडे गेली तेव्हा दुपार झाली होती.
मघाचा कोलाहल शमला होता आणि जयेशही घरात नव्हता.
त्याच्या गैरहजेरीचा अर्थ स्पष्ट होता.
त्या अघोरी जथ्यासोबत तो त्या भग्न वास्तूत गेला होता.
तो येण्यापूर्वीच ते काम करणे गरजेचे होते.
तिने उषाकडे पाहिले..
तिचे डोळे तसेच होते...शाईसारखे गडद काळे आणि चमकती पांढरी बुब्बुळे!
पण आता सीताक्काला त्यांची भीती वाटत नव्हती.
तिच्या नजरेतल्या अपूर्व तेजात उषाची दृष्टी जणू गुंतून गेली. डोक्यातले एकेक जळमट जणू स्वच्छ होतय, आपण अगदी कोऱ्या...कोऱ्या होत जातोय..शरीरातली द्रव्ये बाहेर ओसंडून वाहून ते रिकामं व्हावं तसं तिला वाटू लागले. कानावर पडणारे सर्व बाह्य ध्वनी बंद झाले.
केवळ सीताक्काचा आज्ञावजा गंभीर आणि खोलवर रुतून कोरला जाणारा आवाज तिच्या मनात रुंजी घालत होता.
उषा..हे तूच करू शकशील आणि आज रात्रीच तुला ते करायचे आहे. जगातली कोणतीही शक्ती तुला अडवू शकणार नाही...
त्या आज्ञा मनाशी अनेकवार घोळवून घेण्याच्या नादात आपल्या शरीरावर फुललेल्या त्या विचित्र आकृत्या त्वरेने हालचाल करताहेत याकडे उषाचे लक्ष नव्हते..

त्या भग्न वास्तूत आज मोठी वर्दळ होती. दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकलेल्या आणि फसवून आणलेल्या जीवांव्यतिरिक्त आज प्रथमच एक समूह तिथे जमला होता.
तो सामान्य समूह नव्हता.
विश्वाचे नियंत्रण करणारी सुष्ट शक्ती अस्तित्वात आहे असा विश्वास ठेवून त्या शक्तीची वेगवेगळ्या स्वरूपात उपासना करणाऱ्या बहुसंख्य आस्तिकांविरोधात असलेल्या लोकांचा तो जमाव होता.
त्यांचे आराध्य निर्मिती करणाऱ्यांपैकी नव्हते. जे जे म्हणून जगाने त्याज्य, टाकाऊ ठरवले, त्या सर्वांची जपणूक आणि संवर्धन करणे हेच त्यांच्या जगण्याचे उद्दिष्ट होते. हिंसा..आणि तिच्यासाठी प्रवृत्त करणारी शक्ती यांचे त्यांना आकर्षण होते. रक्तमांस हाच त्यांचा प्रसाद होता आणि अघोर तत्वाच्या कराल मुखात पिचल्या जाणाऱ्या सामान्य जीवांची तडफड बघणे हेच त्यांचे मनोरंजन होते...शुद्धता त्यांना वर्ज्य होती. सर्व अमंगल बाबी त्यांना प्रिय होत्या..
त्यांनी आणि त्यांच्यापूर्वी त्या पंथातील अनेकांनी पाहिलेलं स्वप्न आता साकार होणार होते.
स्वप्न...केवळ इर्षेपोटी पाहिलेलं...
सुष्ट शक्ती उपासक त्यांच्या दैवतांच्या मूर्त्यांची पूजा बांधतात. त्यांना उपासनेसाठी त्या साकार स्वरूपाची मोठी मदत होते. एव्हढंच काय, पण त्या देवतांच्या मानव रुपातल्या दर्शनाचा लाभ, अनुभव घेतल्याच्याही बढाया ठोकतात..
ते मात्र त्याबाबतीत कमनशिबीच होते.
अद्याप त्यांच्या विध्वंसक शक्तींनी साकार मानव रूप घेतले नव्हते...ही बाजू उणी होती. एकदा ..फक्त एकदा त्यांचा आराध्य मानवी रुपात प्रगटला की त्याच्याही अस्तित्वाला जाहीर मान्यता लाभणार होती.
मग त्यांचा विस्तार कोणीच रोखू शकत नव्हते..

कधीही कोसळू शकेल इतका जीर्ण झालेला तो सभामंडप!
आज आवाहन आणि अखंड मंत्रोच्चार यामुळे थरथरत होता. मद्य, रक्त आणि मांसाचा एकत्रित दुर्गंध तिथे पसरला होता. त्यात त्या उपासकांच्या घामाची दुर्गंधीही मिसळली होती.
त्या काळोख्या गाभाऱ्यासमोर बसलेल्या जमावाचा अग्रणी होता जयेश ! त्याचे स्थान सर्वाधिक मोठे होते. त्या येऊ घातलेल्या अघोरी तत्वाचा तो जैविक पिता ठरणार होता..
मंत्रोच्चार करतांना त्याने डाव्या हाताच्या मनगटावर तीक्ष्ण शस्त्राने रेघ ओढली. बाहेर आलेल्या रक्ताचे थेंब त्या गाभाऱ्यात उधळले.
लपलप..लपलप..जिभेने ते चाटल्याचा ध्वनी उमटला आणि विरला.
जयेश समाधानाने हसला. नैवेद्य कबूल झाला होता..
त्या अंधारातून काळाभिन्न सूक्ष्म ओघळ सरपटत बाहेर आला. जयेशच्या शरीरावर सरसर चढला. मघाशी त्याने कापलेल्या जागेतून मनगटात शिरला. तसा जयेशने पाठीमागच्या जमावाला उजव्या हाताने खूण केली..
त्या क्षणाची जणू ते वाटच बघत होते.
त्यांच्या मंत्रोच्चाराचा गजर आभाळाला जाऊन भिडला..आणि थांबला.
'त्या'च्या संचाराची प्रक्रिया पूर्ण झाली होती.
आजवर कधीही न पाहिलेल्या आपल्या आराध्याची रूपे कल्पनेने डोळ्यासमोर उभी करत अघोरांच्या त्या गर्दीतून जयघोष टिपेला पोहचला.

(क्रमशः)
सीता भवन चे सर्व भाग पुढील प्रमाणे
सीता भवन भाग १ > https://marathighoststories.blogspot.com/2019/04/marathi-story.html
सीता भवन भाग २ > https://marathighoststories.blogspot.com/2019/04/marathi-story_14.html
सीता भवन भाग ३ >https://marathighoststories.blogspot.com/2019/04/marathi-story-part-3.html
सीता भवन भाग ४ > https://marathighoststories.blogspot.com/2019/04/marathi-story-part-4.html
सीता भवन भाग ५ >https://marathighoststories.blogspot.com/2019/04/marathi-story-part-5.html
सीता भवन भाग ६ > https://marathighoststories.blogspot.com/2019/04/marathi-story-part-6.html
सीता भवन भाग ७ >https://marathighoststories.blogspot.com/2019/04/marathi-story-part-7.html
सीता भवन भाग ८ >https://marathighoststories.blogspot.com/2019/06/8_19.html
सीता भवन भाग ९ >https://marathighoststories.blogspot.com/2019/06/9.html
सीता भवन भाग १० > https://marathighoststories.blogspot.com/2019/07/10.html
सीता भवन भाग ११ > https://marathighoststories.blogspot.com/2019/07/11.html
सीता भवन भाग १२ >https://marathighoststories.blogspot.com/2019/07/12.html