सीता भवन भाग 10
उषाचा तो अनावृत्त देह...
एकेक अवयव प्रमाणबद्ध...जणू साच्यात ओतून तयार केलेला !
निसर्गाची अनुपम कलाकृती..
ती कुठे वापरली जाणार ?
एका अरिष्टाचा प्रवेशमार्ग म्हणून !
संपूर्ण मानवजातीसमोर अस्तित्वाचे संकट निर्माण करू शकणाऱ्या भयप्रद शक्तीला हे जग कोण खुले करून देईल ?
तर हा सुकुमार देह !!
सीताक्काच्या डोळ्यांसमोर ते चित्र उभे राहिले.
प्रसूतीवेदनांनी तळमळणारी उषा..अंगाला एकाच वेळी लक्षावधी सुया टोचाव्यात तशा त्या अपार वेदना..शरीराच्या प्रत्येक रंध्रातून घामाचा पाझर फुटलेला..तिच्या गर्भाशयात त्यावेळी रणकंदन माजले होते..
शेवटी तो जीव अमानवी असणार होता..
उषाचे गर्भाशय कोरडेठाक करून त्याचे समाधान होणार नव्हते.
तिचा संपूर्ण जीवनरस शोषून मगच तो बाहेर पडणार होता..
त्याला बंधन नसेल मानवाप्रमाणे जन्म घेण्याचे ! स्वतःच्या मर्जीने तो बाहेर येईल...तिच्या शरीराचा कोणताही अवयव फाडून..!
तिच्या जगण्याची पर्वा करण्याचे त्याला कारण नव्हते.
उषेचे हे नाजूक, कमनीय शरीर...
श्वापदानी फाडल्यागत पडलेले असेल आणि आपण तिच्याकडे ढुंकूनही न पाहता त्याच्या स्वागतात मग्न राहू !
त्या कल्पनेनेच सीताक्का शहारली..

ऐकतेस पोरी...सीताक्काने आवाज दिला.
आरशासमोर उभी उषा चपापली. बाजूला काढून टाकलेली साडी तिने कशीबशी अंगाभोवती गुंडाळली.
असू दे..असू दे..मला कसला पडदा ...म्हणत सीताक्का खोलीत शिरली. तिची नजर अद्यापही उषाच्या शरीरावरील लखलखत्या आकृत्यांवर खिळली होती. तिच्या कपाळावर आठ्या दाटून आल्या होत्या.
उषा, इकडे ये! सीताक्काने हाताने निर्देश करत तिला बोलावले.
ती काहीशी लाजतच सीताक्काजवळ पोहचली.
सीताक्काने तिचे खांदे चाचपले. हळूवारपणे तिचे हात उषाच्या कमरेपर्यंत पोहचले. तिथला साडीचा भाग बाजूला करीत तिने स्पर्श केला.
ज्वालामुखीच्या विवरात हात घातल्यासारखं सीताक्काला वाटले. तिने लगोलग हात मागे खेचला. त्याकडे बघितले...
तो भाजल्यासारखा काळाठिक्कर झाला होता.
सीताक्का पांढरीफटक पडली, किंचाळली!
उषा, काय आहे हे ?
उषा मात्र निर्विकार होती.
सीताक्का, कुणी मला स्पर्श करू नये म्हणून केलेल्या विधींनंतर ह्या खुणा उमटल्या. तेव्हापासून वस्त्रे काढली की त्या दिसू लागतात !
अग पण मग जयेश ? सीताक्काने विचारले.
हो, त्यांनाही ठाऊक आहे. त्यांना हव्या त्या तिथीशिवाय मला ते हात लावणार नाहीत आणि दुसरं कोणी लावू शकणार नाही..म्हणून उषा खुदकन हसली.
सीताक्काच्या डोक्यात तिडीक गेली.
आपला हात भाजलाय आणि ही खुशाल काहीतरी बरळतेय..
सावध..हे नुसतं बरळण नाहीये..
काहीतरी बदलतंय...
पण काय ?
सीताक्काने मेंदूच्या चित्तवृत्ती एकाग्र केल्या. काय वेगळेपण जाणवतंय ते शोधू लागली...
होय...सापडलं..
आवाज..तो ध्वनी...ते शब्दांचे तुकडे..ढब ....सगळंच बदललंय की !
तिने उषाकडे पाहिले...
आणि तिचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली..
उषाच्या अर्धवट मिटलेल्या तोंडात काळसर जीभ वळवळत होती..त्या मुखात अंधार साचला होता.. आणि !
तिची बुब्बुळे पांढरीधोप तर उरलेला भाग काळाशार झाला होता..
तिला तशीच सोडून सीताक्का चोरपावलांनी बाहेर पडली...चक्क पळाली.

आपण कोण ?
या नाट्याच्या प्रथम अंकापासूनच्या पात्र...
जयेशला वाचवणं हेच कर्तव्य मानलं ही चूक आहे ?
त्यापोटी तो अघोरी कापालिक, त्याच्या आज्ञा, बतावणी यांना बळी पडणं अयोग्य होतं ?
माझा स्वार्थ काय..अकाली मृत्युमुखी पडणारा एक जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करणे...ही ...?
त्यासाठी मानवी मर्यादा ओलांडणे ही ?
काय इष्ट, काय अनिष्ट...मानवतेसाठी काय योग्य आणि काय अयोग्य...चूक काय आणि बरोबर काय ?..तो विचार करण्यासाठी मी संत नाही, साध्वी नाही...प्रेषित नाही..दूत नाही...
मी हाडामांसाची, वासनाविकार असलेली स्त्री !
हीच माझी खरी ओळख!!!
जयेशला वाचवतांना मी साधकबाधक विचार केला नाही...
त्याचे परिणाम आज जाणवताहेत....
आणि या सर्व प्रकरणात सर्वाधिक पापी हात कोणाचे आहेत ?
मीच ! ....होय मीच...!
सीता भवनचे ते निष्पाप भाडेकरू...त्यांची मुले..
त्यांच्या अघोरी मृत्यूचे निमित्त कोण...
मीच !
ही उषा...मी शोधलेली एक अश्राप मुलगी...
तिचं रूपांतर आज एका भयावह वाहकात झालेय...
त्रिखंडातील पापांच्या पाऊलखुणा अंगावर वागवीत ती चाललीय..
ती दाहकता..ती तिच्या शरीराचा भाग झालीये..
त्याची जबाबदारी कोणाची ?
मीच...
मी..मी..आणि मीच !
सर्व मानवी विकार, भावभावना आणि चुका यांना अनुसरून मी वागले..त्याचा कधीच विचार केला नाही..कसला खेद ना खंत मानला नाही.
मी ...दोषी आहे...आणि ते मान्य करण्यात मला अजिबात लाज वाटत नाही.
बंद केलेल्या पापण्याआड सीताक्का तळमळत होती.
स्वतःशीच कबुली देत होती.
तिच्या मनाला असंख्य इंगळ्या डसत होत्या.
पण ती थांबली नव्हती..थांबू शकत नव्हती..
स्वतःशी दिलेल्या प्रत्येक प्रामाणिक कबुलीच्या वेदनेआड मुक्तीची एक सुप्त आणि सुखद जाणीव दडलेली असते...
म्हणून अद्याप जगाचा व्यवहार सुरळीत असावा.!
भाजलेला हात ठणकत असूनही सीताक्काच्या ओठांवर समाधानाचे हसू तरळत होते!
तिने निश्चय केला होता.....

रात्रीच्या काळोखात कोणता प्रहर उलटला असावा याचा अंदाज आला नाही. तरी सीताक्का धडपडत उठली..
पायात चपला अडकवेपर्यंत ती बरीच संयत झाली होती.
आताची ही खेप अखेरची असेल....
असू दे...
स्वतःला सावरत ती निघाली.
जिन्यावरून खाली जाताना तिची पावले वाजत होती..
हातात कितीही घट्ट धरल्या तरी त्या किल्ल्याही वाजत होत्या.
पण सीताक्काचे तिकडे लक्षच नव्हते.
ती खालच्या मजल्यावर पोहचली.
अंदाजाने तिने चावी लावून कुलूप उघडले..
तिच्या प्रवेशासरशी त्या खोलीतल्या अवकाशात कोलाहल माजला..ठार वेड लागेल इतपत...
पण आज सीताक्काला पर्वा नव्हती..
ती त्या खोलीच्या मध्यभागी विसावली.
दोन्ही पाय जवळ ओढून घेत ती बसली...
डोळे मिटलेले...त्यातून अनवरत अश्रूपात सुरू होता..
ओठ पुटपुटत होते..
हळूहळू तो कोलाहल विरत गेला...शांतता पसरली.
एक, दोन, तीन, चार...
चारही ब्लॉक्समध्ये त्याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली..
पुन्हा पावले वाजवीत सीताक्का तिच्या खोलीत परतली.

पहाट उजाडण्यासाठी दोन तास शिल्लक असावेत..
सीताक्का तिच्या बिछान्यावर मांडी घालून बसली होती!
तिने दार किंचित उघडे ठेवले होते.
ती डोळे फाडून कुणाची वाट बघत होती..
काही क्षण अस्वस्थता पसरली...
मग ते घडले...
दोन धुरकट सावल्या त्या किलकिल्या दारातून आत शिरल्या. काहीवेळ तिथल्या अवकाशाचा अंदाज त्यांनी घेतला. सुरक्षिततेची जाणीव होताच त्या खाली उतरल्या.
त्या मिट्ट काळोखात सीताक्काचा गंभीर स्वर उमटला.
आलात...या...तुमचीच वाट बघत होते..!
(क्रमशः)
सीता भवन भाग १ > https://marathighoststories.blogspot.com/2019/04/marathi-story.html
सीता भवन भाग २ > https://marathighoststories.blogspot.com/2019/04/marathi-story_14.html
सीता भवन भाग ३ >https://marathighoststories.blogspot.com/2019/04/marathi-story-part-3.html
सीता भवन भाग ४ > https://marathighoststories.blogspot.com/2019/04/marathi-story-part-4.html
सीता भवन भाग ५ >https://marathighoststories.blogspot.com/2019/04/marathi-story-part-5.html
सीता भवन भाग ६ > https://marathighoststories.blogspot.com/2019/04/marathi-story-part-6.html
सीता भवन भाग ७ >https://marathighoststories.blogspot.com/2019/04/marathi-story-part-7.html
सीता भवन भाग ८ >https://marathighoststories.blogspot.com/2019/06/8_19.html
सीता भवन भाग ९ >https://marathighoststories.blogspot.com/2019/06/9.html
सीता भवन भाग १० > https://marathighoststories.blogspot.com/2019/07/10.html
सीता भवन भाग ११ > https://marathighoststories.blogspot.com/2019/07/11.html
सीता भवन भाग १२ >https://marathighoststories.blogspot.com/2019/07/12.html