सीता भवन - Marathi Story -Part 5 |
सीता भवनच्या जिन्याचा तो अवकाश आता गर्दीने भरला गेला होता. एकेका पायरीवर किंचित थांबून गुडघ्यांवर हात ठेवून मग पाय उचलणारी सीताक्का सर्वात पुढे होती.
तिच्या मागे सुरक्षित अंतर राखून त्या अंधारात स्वतःची ओळख लपवू पाहणारे ते नवागत जोडपे येत होते.
सहा डोळे तो काळोख भेदण्याचा कसोशीने प्रयत्न करीत होते...
त्याचवेळी..
त्यांच्या डोक्यावर दोन पांढुरक्या सावल्या तरळत होत्या !
झाली...कुजबुज सुरू झाली...
सीताक्का थबकली.
तिचा पाठलाग करणारे ते दाम्पत्यही अंग चोरत जिन्याच्या कोपऱ्यात दडले.
ती कुजबूज मात्र निर्धास्त सुरू होती.
ए भाऊ, आई दिसली ना रे तुला !
हो दादा, दिसली काय बोलली पण माझ्याशी !
काय म्हटली ? सांग ना रे !
तुला तिथे थांबायला काय झालं होतं तेव्हा ?
सॉरी रे, मी ना तेव्हा दुसरीकडे खेळत होतो. सांग ना..असं काय करतोस ?
अरे आईला मी म्हटलो..आम्हाला टाकून कुठे गेलात तुम्ही दोघे ? तर किती रडली ती ! ती म्हटली की लवकरच आपण सगळे एकत्र होऊ पुन्हा आणि इथून निघून जाऊ !
खरेच ?
हो..आणि आपल्यासोबत विनू, सदा, बॉबी आणि त्यांचे आईबाबा पण येणार आहेत.
अरे वा..मग तर मज्जाच मज्जा ! ए बाबा पण भेटले का रे ?
नाही ना...आई म्हणत होती की त्यांची अजून सुटका नाही !
म्हणजे, त्यांना कोणी पकडून नेलंय का ! त्या मिश्यावाल्या पोलिसाने..
छट..आपले बाबा किती चांगले आहेत. पोलीस ना फक्त वाईट लोकांना पकडतात.
बर, तू कुठं गेला होतास ?
शू...कोणाला बोलू नकोस. ही इथली आज्जी ना बरीच दुष्ट दिसते. ती काहीतरी भयंकर करतेय अस वाटतय..मी आईला सांगणार आहे.
नक्को रे, आईला नाही आवडत कोणाच्या चहाड्या ऐकायला !
चल, जाऊ या खाली!!!
ते दोन्ही आकार हवेत सूर मारून खालच्या दिशेने झेपावले. त्यांच्या खाली उभ्या असलेल्या मर्त्य सृष्टीतल्या त्या तिघांची त्यांना खबरबातही नव्हती.

सीताक्का तिथून घाईघाईने स्वतःच्या खोलीकडे वळली. जिन्यातले ते दोघे मात्र एकमेकांना घट्ट धरून अद्यापही थरथरत होते.
या वास्तूत चाललय तरी काय ? वरकरणी साधी, सरळ दिसणारी एक म्हातारी तो अघोरी प्रकार घडवते...दोन अशरीरी आवाज एकमेकांशी संवाद साधतात..त्यांचे आईवडील कोण ?...जी नावे त्यांनी घेतली ती कुणाची?
काहीही असलं तरी ही जागा मानवी वस्तीच्या लायकीची मुळीच नाही हे निश्चित !
पहाट होताच सीता भवन सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला...चोरपावलांनी ते पुन्हा खोलीकडे निघाले.

पहाटेचे तीन वाजले असावेत..
तिचा श्वास अडकल्यासारखा झाला. छातीत प्रचंड उबळ दाटली. आधीच डोळ्यांत झोप नव्हती. आता त्यांच्यासमोर काही आकार तरंगल्याचा भास होऊ लागला..
नक्की...भासच ? की आणखी काही !
मेंदू ताळ्यावर असला की भ्रम आणि सत्य यामधला फरक तपासता येतो.
मघाशी जिन्यातले ते दृश्य पाहून मेंदूची विचारशक्ती कुंठित झाली होती. आपण त्या दृश्यातून बाहेर पडलो की नाहीत ?
या खोलीत, या बिछान्यात आपण पतीच्या शेजारी आहोत इथपर्यंतची सुस्पष्ट आठवण तिला होती. पण मग तसे असेल तर...
समोर सीताक्का का उभी आहे ?
तिच्या डोळ्यात अंगार पेटला आहे. संतप्त चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांमध्ये आवळलेल्या हिरव्यागार शिरा दिसताहेत. ती दोन्ही हात पुढे करून चालत येतेय....तिच्या तोंडातून जणू ठिणग्या बाहेर पडताहेत...
मूर्ख पोरी..इतक्या सहज सीता भवनमधून बाहेर पडता येतं का ? दुपारी योगायोगाने वाचलीस..पण हा सीताक्काचा सापळा आहे. अजून यातून कुणीच सुटलं नाही. हे सैतानघर आहे...सैतानघर ! खास रक्तामांसाचा नैवेद्य मिळावा म्हणून बांधलेलं ....तुला काय वाटलं, तुम्ही विचार कराल आणि पळालसुद्धा ! इथून सुटका नाही...मरेपर्यंत नाही...
सीताक्काने दोन्ही हातांचे पंजे तिच्या नाजूक मानेत गाडले. त्या पंजाचा आकार...किती हिडीस होता ! कुजलेली पण तीक्ष्ण नखे..खोबणीबाहेर येऊ पाहणारे डोळे...
भयातिरेकाने तिने डोळे मिटून किंकाळी फोडली...त्या ब्लॉकमधली शांतता ढवळली गेली. कुणीतरी गपकन तिचे खांदे धरले. तिने डोळे उघडले..
तिचा नवरा विचारत होता...काय ग काय झाले ?
तिने फक्त मान झटकली. ती नखशिखांत घामाने भिजली होती.
त्याचवेळी...त्या खोलीबाहेर उभ्या सीताक्काने निराशेने भोवताली बघितले.
आणखी काय काय घडेल कोण जाणे... म्हणत तिने दोन्ही हात हवेत उडवले. त्या काळोखात तिच्यामागे कुणीतरी कुजकट हसत होते..
त्याच्याकडे एकदा तुच्छतेने बघून सीताक्का पुन्हा जिन्याकडे वळली.

सर्वच आवाज मानवी इंद्रियांच्या कक्षेतले नसतात.. त्यांची जाणीव होण्यासाठी काही निकष असतात.
तुमचं मन संस्काररहित असावं ही त्यातली प्रमुख अट !
मग तुम्ही बरंच काही ऐकू शकाल..अगदी सहन न होण्याच्या पलीकडले सुद्धा !
सीता भवनच्या रिकाम्या ब्लॉक्समध्ये तसाच कोलाहल सुरू होता..
झालेल्या अन्यायाची दाद मागितली जात होती. आर्जव सुरू होते. पिसाटलेल्या सुरात काहीजण विव्हळत होते. त्यांना धीर देऊ पाहणारे आवाजही होते...आणि ते पुन्हा पुन्हा झिडकारले जात होते.
सूर वेगवेगळे असले तरी तडफड मात्र एकच होती..
सर्वांना मुक्ती हवी होती...
त्या लहानखुऱ्या वास्तूच्या अवकाशातून प्रत्येकाला स्वतंत्र व्हायचे होते. पाशवी अभिलाषेने जखडून ठेवलेल्या त्यांना मुक्ततेचा आनंद घ्यायचा होता. त्या सुटकेसाठी ते सर्वजण तळमळत होते. त्या मोबदल्यात स्वतःचे अकाली संपलेले अस्तित्वही विसरण्यास त्यांची तयारी होती.
कधी येईल तो क्षण ?
हीच त्या गोंधळाची विचारणा होती.

वरच्या मजल्यावर फ्लॅटमधल्या त्या बंदिस्त बेडरूममध्ये भल्यामोठ्या कॉटवर पहुडलेल्या उषाने तशा अवस्थेतील स्वतःची प्रतिमा पायाजवळच्या भव्य आरशात न्याहाळली.
तिच्या ओठांवर स्मित तरळले !
ते रूप....किती आकर्षक..साजिरे..कातीव..
जीवनरस खळखळून वाहत असलेले ते सौंदर्य !
कित्येक युगांपासून पुरुषांना बेभान करणारी ती अस्त्रे !
अनेक साम्राज्यांची धूळधाण होण्यास कारणीभूत ठरलेले !
छ्या...हे रूप आटता कामा नये..
जगात हेच चिरंतन राहिले पाहिजे..
बेडरूमच्या कोपऱ्यातून दोन डोळे आपल्याकडे रोखून बघताहेत हे लक्षात आल्यावर ती काहीशी वरमली !
(क्रमशः)

सीता भवन चे सर्व भाग पुढील प्रमाणे
सीता भवन भाग १ > https://marathighoststories.blogspot.com/2019/04/marathi-story.html
सीता भवन भाग ८ >https://marathighoststories.blogspot.com/2019/06/8_19.html
सीता भवन भाग ९ >https://marathighoststories.blogspot.com/2019/06/9.html
सीता भवन भाग १० > https://marathighoststories.blogspot.com/2019/07/10.html
सीता भवन भाग ११ > https://marathighoststories.blogspot.com/2019/07/11.html
सीता भवन भाग १२ >https://marathighoststories.blogspot.com/2019/07/12.html