|
#सीता भवन भाग 3
#सचिन बी.पाटील
#सचिन बी.पाटील
अर्धवट गुंगीची तार डोळ्यांवर असलेली सीताक्का काही क्षण पडून राहिली. मोठ्या कष्टाने तिने किलकिलत्या नजरेने पाहिले....
नुकतेच धुतलेले केस मोकळे सोडलेली उषा ओणवी होऊन तिच्याकडे बघत होती. अद्याप अर्धवट ओले असलेले तिचे लांबसडक केस सीताक्काच्या चेहऱ्यावर घासत होते. तेवढ्या स्पर्शानेही सीताक्का शहारली.
उषा, तू इथं ? काय झालं, अशी काय बघतेस ?
मावशी, तुमचा चेहरा तर बघा. पांढरा फटफटीत झालाय. काही वाईट स्वप्न पडलं का ? बरं वाटत नाही का ?...उषाने विचारले.
हिला खरं सांगितलं तरी धास्तीने ती बेशुद्धच व्हायची. आधीच ते दोन्ही जीव चिंतेत आहेत. त्यात रात्रीच्या त्या प्रकाराची भर कशाला हवी ?...सीताक्का विचारात पडली. काहीशी थांबून म्हणाली,
काही नाही गं ! रात्री झोपच येत नव्हती. पहाटे डोळा लागला. तू आटोप बाकीचं, मी झोपते आणखी काही वेळ !
बरं..हो , आणखी एक. नवा भाडेकरू मिळाला. नवाच संसार आहे. थोड्या वेळातच ती सामान घेऊन येणार आहेत ...अशी उत्साहाने माहिती सांगत उषा आत गेली.
सीताक्काने खिन्न होऊन श्वास सोडला. भकास नजरेने छताकडे पाहत ती बराच वेळ पडून होती.

तासाभराने तयार होऊन सीताक्का नेहमीप्रमाणे देवळाकडे जाण्यासाठी निघाली. कधी नव्हे ती देवदर्शनाची कमालीची ओढ जाणवत होती. राहून राहून रात्रीचे ते आकार डोळ्यांपुढुन सरकत होते. त्यांच्या कुजबूजीची आवर्तने सीताक्काच्या मनात हिंदकळत होती.
शी..तो अभद्र प्रकार विसरायलाच हवा. कदाचित आपल्या म्हाताऱ्या, दुर्बळ मनाचा तो खेळही असू शकेल. सोडा, सोडा ते विचार..नकोच ती आठवण..देवळातल्या देवाची ती तेजस्वी, पवित्र मूर्ती पाहिली, तिच्या पायावर डोकं ठेवलं की सर्व काही सुरळीत होईल ! सीताक्का मनाला पुन्हा पुन्हा बजावत होती.
विचारांच्या त्या खेळात ती शहराच्या मुख्य वस्तीपासून कितीतरी लांब येऊन पोहचली. तिची वाट सरत नव्हती. रोजचे देऊळ कधीच मागे पडले होते. हा भाग तिला नवखा नसला तरी तिथे येण्याची आजवर तिला गरज भासली नव्हती.
ही वाट चुकीची आहे...हे तुझे साध्य स्थळ नाही..तू स्वतःला संकटात टाकते आहेस...फिर...मागे फिर...धोका..धोका..धोका...
तिचे मन तिला कळवळून सांगत होते.
पण शरीराचे काय ?....पाय थांबायला तयार नव्हते. डोळे भिरभिरत कसला तरी शोध घेत होते. हालचालीत नवा जोश संचारला होता.
चालता चालता त्या रस्त्याच्या डावीकडे सीताक्काची नजर वळली. डोळे बारीक करीत तिने त्या दिशेचा वेध घेतला. तिच्या नकळत त्या डोळ्यात चमक आली होती. तिचे पाय आपसूक त्या दिशेला वळले.
एका लहानखुऱ्या भग्न वास्तूच्या पडझडत्या कळसावर ती जीर्ण, फाटकी पताका फडकत होती.
मूळच्या बांधकामापासून कधीच सुटा झालेल्या दगडांच्या पायऱ्यांजवळ सीताक्का उभी राहिली तेव्हा उन्हे चढली होती. तिने पायातून चपला काढल्या...आणि पायाजवळ नजर जाताच ती आपादमस्तक शहारली...
तिची सावली कुठेच दिसत नव्हती !
सीताक्काने मदतीच्या अपेक्षेने आजूबाजूला पाहिले. त्या वास्तूच्या दोन्ही बाजूंना पाहून तिचे काळीज लक्कदिशी हलले..
त्या वास्तूलाही सावली राहिलेली नव्हती.
स्वतःच्या नकळत सीताक्का दगडावर चढून त्या वास्तूच्या सुरवातीच्या भागात उभी राहिली.
ते उध्वस्त झालेलं देऊळ होतं. खरंतर देऊळ कसलं ? कारण तिथे कुठल्याही देवाची मूर्ती नव्हती. वरकरणी आकार देवालयाचा असला तरी तिथल्या देवासोबत तिथलं मांगल्य, पावित्र्य नाश पावलं असावं. गाभारा काळ्याभोर अंधाराने भरला गेला होता. ज्या कुणी त्या राऊळाचा विध्वंस केला होता, त्याची दहशत अद्यापही कायम असावी..त्याच्या भीतीने अगदी वटवाघळेही तिकडे फिरवली नव्हती. वर्षानुवर्षे साठलेल्या धुळीचे थर सभामंडपात होते. जगात जे जे म्हणून अशुभ, अभद्र असेल ते तिथे वास्तव्यास असल्यासारखं जाणवत होतं.
आणि अशा जागी सीताक्का भर दुपारी येऊन उभी राहिली होती !
कोणत्याही उपासनेला तिथे जागा नव्हती. आणि उपासना तरी कशाची करणार ? प्रतिक म्हणून मूर्ती नव्हती. मूर्तीला प्रमाण मानून म्हटले जाणारे मंत्र नव्हते, पूजाविधी नव्हते. कशाचाही विधिनिषेध नव्हता. निर्गुण, निरकाराची प्रार्थना करण्याचे कोणतेच उपचार नव्हते. चुकूनही मांगल्य निर्माण होणार नाही याची पुरेपूर काळजी कुणीतरी घेतली होती.
सातत्याने होणारी प्रार्थना, पूजा, मंत्रघोष, उपासना साध्या मूर्त्यांनाही अलौकिक सामर्थ्य प्रदान करतात....
दैवतांची निर्मिती अशीच होत असते...
पण तशी कोणतीच तजवीज तिथे नव्हती...
सीताक्का हळूहळू भारावल्यासारखी पुढे सरकत होती. गाभाऱ्याबाहेर ती थबकली.
तिथल्या मिट्ट काळोखात काहीतरी सुरू होतं. नजरेला न जाणवणारे..पण सहाव्या इंद्रियाने निश्चितच नोंद घ्यावी असे काहीतरी...
यंत्रवत सीताक्काने डावा हात पुढे केला. त्या अंधाराला कापत तिची बोटे ते दान घेण्यासाठी पुढे सरसावली..एकमेकांना जुळली.
काही क्षणात तिने हात मागे खेचला...
पण तोवर उशीर झाला होता.
काळोखातलं दान अचूक पडलं होतं.
तिच्या हातात दहीभाताने भरलेला द्रोण होता.
तो फेकून धावत सुटावे असं तिला तीव्रतेने वाटू लागलं. पण ती तसूभरही सरकली नाही..सरकू शकली नाही.
पदराखाली तो प्रसाद घेऊन सीताक्का त्या वास्तुबाहेर पडली तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी तरळत होतं.
परतीचा मार्ग कमालीच्या गतीने कापला गेला. सीता भवनच्या अंगणात उभ्या राहिलेल्या सीताक्काने उसासा सोडला. हळुवारपणे ती पायऱ्या चढून आली. नव्या ब्लॉकमध्ये सामान रचणारी भाडेकरू तिला सामोरी गेली.
तुम्ही सीताक्का ना ? मला उषाताईंनी सांगितलं मघाशी ! नमस्कार करते..म्हणून ती सीताक्काच्या पायांवर वाकली.
तिच्या अंगाला हळदीचा वास अद्यापही येत होता. तिला आशीर्वाद देतांना सीताक्काचा गळा दाटून आला.
सुखी राहा पोरी...हा प्रसाद आणलाय तुम्हा दोघांसाठी...कल्याण होईल! म्हणत सीताक्काने प्रसादाचा द्रोण तिच्या हाती दिला.
कृतार्थ नजरेने सीताक्काकडे पाहून ती खोलीत परत गेली.
स्वतःच्या खोलीत पोहचताच सीताक्का जवळजवळ कोसळलीच...
तिच्या डोळ्यातून आसवांचे लोट बाहेर पडू लागले.
(क्रमशः)

सीता भवन चे सर्व भाग पुढील प्रमाणे
सीता भवन भाग १ > https://marathighoststories.blogspot.com/2019/04/marathi-story.html
सीता भवन भाग ८ >https://marathighoststories.blogspot.com/2019/06/8_19.html
सीता भवन भाग ९ >https://marathighoststories.blogspot.com/2019/06/9.html
सीता भवन भाग १० > https://marathighoststories.blogspot.com/2019/07/10.html
सीता भवन भाग ११ > https://marathighoststories.blogspot.com/2019/07/11.html
सीता भवन भाग १२ >https://marathighoststories.blogspot.com/2019/07/12.html