जन्म...
सृष्टीचा व्यवहार नियमित राहावा म्हणून निसर्गाने अनंत काळापासून सुरू ठेवलेली प्रक्रिया. निर्मात्याला अतीव कळा सोसूनही निर्मितीचा आनंद देणारी घटना. हे सृजन म्हणूनच नेहमी स्वागतार्ह राहिले आहे.
पण त्याची गोष्ट निराळी होती..
तो संकर असणार होता..
मानवी आणि अमानवी वृत्ती, शरीररचना आणि बुद्धिमत्तेचा संकर!
त्याचा आगमनाचा हेतू मात्र निश्चितच मानवी नसणार...!
सीता भवनच्या त्या वास्तुतून तो फैलावणार होता, महाभयंकर रोगाच्या साथीसारखा..कित्येक शतके त्या क्षणाची वाट त्याने पाहिली असावी.
मानवी रूप घेऊन मानवांना गुलाम करायचे की सर्वत्र संहार उडवून द्यायचा ? की आणखी काही निराळे कृत्य ?..त्याचा उद्देश अद्याप ठाऊक नव्हता.
जन्मापूर्वीच जयेशला, त्याच्या होऊ घातलेल्या जैविक पित्याला नियंत्रणात ठेवणारा तो...त्याच्याकडून संभवणाऱ्या विनाशाची नुसती कल्पनाही भयप्रद होती.
सीताक्का विचार करकरून थकली..आणखी काय तिच्या नशिबात असावं?

जयेश मात्र खुशीत होता.
आजवर ज्या कारणासाठी त्याने ती खडतर वामाचारी उपासना केली होती, ते फळास येणार होते. 'त्या' च्या आगमनासाठी सुयोग्य अशी पार्श्वभूमी लाभलेली उषा त्याने जोडीदार म्हणून निवडली होती. तिचा जन्मयोग, त्यावेळची नक्षत्रे, ग्रहस्थिती...सर्व काही..अगदी अनुकूल होते.
अडचण एकच होती...आणि तितकीच कठिणदेखील !
'त्या' च्या जन्माचा आघात सोसण्याची ताकद उषाच्या मानवी देहात नव्हती.
तिला तशी क्षमता बहाल करण्यासाठी खूप खडतर मार्गावरून जाणे भाग होते. आणि इतक्या अविश्रांत कष्टानंतर थोडक्या श्रमासाठी माघार घेण्यास जयेश अजिबात तयार नव्हता..
सीता भवनच्या त्या इमारतीत आता नवा अध्याय सुरू होणार होता. आजवर अघोरी तत्वांचा केवळ प्राथमिक परिचय झालेली ती वास्तू यापुढे वामोपचाराची प्रयोगशाळा बनणार होती. तिथे कसलाच विधिनिषेध उरणार नव्हता..

सीताक्का पुन्हा एकदा त्या प्रयोगाची वाहक झाली..
स्वतःच्या मुक्तीचे आमिष तिला सारासार विवेकापासून खेचून नेणारे ठरले.
पहिली कामगिरी तर कठीण होती.
उषाला सत्य न कळू देता या विधीत सामील करून घेणे भाग होते.
तिने थयथयाट केला तर इतक्या वर्षांनी चालून आलेली संधी हुकणार होती.
आणि त्याहून मोठा धोका होता..'तो' चिडण्याचा !
तसं घडलं असतं तर सीता भवनच्या मालकांपैकी कुणाचाही अंश शिल्लक राहिला नसता हे उघड होतं.
पण मार्ग सापडला !
स्वतःच्या सौंदर्याला कमालीचं जपणारी उषा ! तिनेच तो रस्ता दाखवला.
केवळ चिरतारुण्यच नव्हे तर त्यासोबत सौंदर्यही कायम राहील हे आमिष उषाच काय पण कोणत्याही स्त्रीला मोहात पाडणारे ठरले असते.
एकदा मोह शिरला की मग विवेकबुद्धी कुलपात बंद होते.
त्या लोभापोटी सर्व काही विधी उरकण्यास उषा तयार झाली.
ते कडूजार काढे, अमंगल पदार्थांचे धुपारे..रात्रीबेरात्री चालणारे विचित्र विधी, ती घाणेरड्या द्रव्यांची स्नाने, संपूर्ण शरीरावर रेखाटल्या जाणाऱ्या त्या अगम्य आकृत्या, ते नकोनकोसे विकृत चाळे.. ती मधूनच वैतागत होती.
हा तर पहिला टप्पा होता.

बाह्योपचार पूर्ण केल्यावर उषाला आंतरिकदृष्ट्या तयार करण्याच्या विधीला सुरवात झाली.
त्यासाठी वरवरच्या क्रिया उपयोगाच्या नव्हत्या.
मानवी बळींचे अधिष्ठान लाभल्याशिवाय तिच्या गर्भाशयात ती क्षमता येणार नव्हती...आणि कितीही पाशवी असल्या तरी त्या शक्तींना ते कृत्य जयेश, सीताक्का यांच्या माध्यमातून पूर्ण केल्याशिवाय गत्यंतर नव्हते.
अघोरी उपासना केली असली तरी सरळ मुडदे पाडण्याइतका जयेश निश्चितच निर्ढावलेला नव्हता.
अडचणी फक्त सन्मार्गावरच असतात असे नाही..कुमार्गाच्या वाटेतही खूप काटे असतात...फरक इतकाच की सारासार विवेक वगैरे भानगडी नसल्याने तेथे त्या लवकर निकाली निघतात.
बळी हवे होते...विवाहित दाम्पत्यांचे ! गृहस्थाश्रमाच्या वाटेवरील पांथस्थांचे !
ते सावज सहज मिळू शकेल असे ठिकाणही फार दूर नव्हते.
सीता भवन !
तिथल्या ब्लॉकमध्ये राहणारी जोडपी....हमरस्त्यावर घर मिळाल्याने स्वतःला भाग्यवान मानणारी...सीताक्काच्या पांढऱ्या केसांचा मान राखणारी.
मग तो बेत शिजला.
शरीराच्या अंतर्भागाशी संपर्क झाल्याबरोबर त्याचा इहलोकाशी असलेला संबंध तोडणारा तो प्रसाद..
त्या सैतानी शक्तींचे आश्रयस्थान असलेल्या भग्न देवळातून मिळणारा तो पदार्थ..त्याची शक्ती परम आसुरी होती.
मानवी देह..त्याच्या भौतिक आकारासोबत विरघळून टाकणारी..पण आत्म्याला कुठेही मुक्त न होऊ देणारी !
त्यांची विवक्षित संख्या पूर्ण झाली की एक छोटासा उपविधी..
मग यथोचित सांगता होणार होती.
पुढचं काम अगदी सोपं झालं.
सीताक्काने तो प्रसाद भाडेकरूंना द्यायचा..
त्यांच्या मुलाबाळांची विल्हेवाट जयेशचे साथीदार कापालिक लावत..
कुणालाही ठाऊक नसलेली, बेमालूमपणे दडवलेली सीता भवनच्या परिसरातली विहीर त्या कोवळ्या जीवांच्या अवशेषांनी भरून गेली.
कुठे हाक नाही, बोंब नाही.
भाडे बुडवून भाडेकरू फरार म्हणायला क्षीरसागर कुटुंब मोकळे !
त्या इमारतीत भाडेकरूना तोटा नव्हता.
ते येणार होते अन नाहीसे होणार होते...
हे सर्व अबाधित, अखंडित सुरू राहिले असते तर...!

आसक्ती...खूप चिवट असते. मेल्यावरही सुटत नाही.
ते साने कुटुंबच बघा.
इतर भाडेकरूंसारखे निमूटपणे भागधेय स्वीकारणे त्यांना जमले नाही. त्या पतिपत्नीचा मुलांमध्ये आणि मुलांचा आईवडिलांत भारी जीव गुंतलेला..
मृत्यूही त्यांची ताटातूट करू शकला नाही.
एकमेकांच्या आसक्तीनें त्यांची अशरीरी रूपे सीता भवनमध्ये रेंगाळत राहिली.
सीताक्काने ते ओळखले होते.
काहीतरी चुकतेय..एक धागा सुटलाय..पायरी चुकली..
नेमकं काय झालंय ?
कुणाला विचारावं ? कसं विचारावं ?
जयेशला सांगावं...नको, तो डाफरेल उगाच !
मग उषा.. चल..तिचा अंदाज घेऊन बघू..काही मदत मिळते का ? किंवा मग तिच्यामार्फत जयेशला सांगू..तिचं नक्की ऐकेल तो !
सीताक्का हळुवारपणे उषाच्या खोलीत डोकावली.
त्या खोलीतले सर्व दिवे पेटले होते. लख्ख उजेड होता.
भिंतीत बसवलेल्या पूर्ण उंचीच्या आरशासमोर उषा उभी होती.
सीताक्काने तिला न्याहाळले.
उषाच्या शरीरावर एकही वस्त्र नव्हते...
आरशात ती स्वतःचा नग्न देह न्याहाळत होती. तिचे हात वारंवार पोटावरुन फिरत होते..आणि...
तिच्या संपूर्ण शरीरावर चित्रविचित्र आकृत्या लखलखत होत्या..
(क्रमशः)

सीता भवन चे सर्व भाग पुढील प्रमाणे
सीता भवन भाग १ > https://marathighoststories.blogspot.com/2019/04/marathi-story.html
सीता भवन भाग ८ >https://marathighoststories.blogspot.com/2019/06/8_19.html
सीता भवन भाग ९ >https://marathighoststories.blogspot.com/2019/06/9.html
सीता भवन भाग १० > https://marathighoststories.blogspot.com/2019/07/10.html
सीता भवन भाग ११ > https://marathighoststories.blogspot.com/2019/07/11.html
सीता भवन भाग १२ >https://marathighoststories.blogspot.com/2019/07/12.html