तिसऱ्या भागाची लिंक👇👇👇
https://marathighoststories.blogspot.com/2019/02/blog-post_53.html
प्रकाश घरी आला.......सकाळ झाली प्रकाशचे डोकं दुखत होत....त्याने आपल्याकडे बघितले त्याच्या अंगावर कपडे नव्हते...ह्यावेळी मात्र तो आश्चर्यचकित झाला त्याने खिडकीकडे बघितले खिडकी उघडी होती....."हे काय....माझ्या अंगावर एकही कपडा नाही....कुणी पाहिलं तर नसेल??"
प्रकाशने कपडे घातले आणि बाहेर जाऊन लोकांचा अंदाज घेऊ लागला.....प्रसिद्ध लेखक बनल्यामुळे त्याची प्रतिष्ठा वाढली होती....त्याला तसाच आदर मिळत होता.....त्याला खात्री पटली की कुणी त्याला त्या अवस्थेत पाहिलं नाही.....कुणीतरी मागून बोलावलं
"अहो प्रकाश राव....कुठे आहात तुम्ही आणि पुढच्या पुस्तकाचं काय?? कधी आणणार नवीन पुस्तक भेटीला??मागचं तुमचं "द ईजिप्शियन डेव्हील" हे पुस्तक मला खूप आवडले.... आणि ते मंत्र जे वेगळ्या उच्चाराचे होते...ते खरोखर ईजिप्शियन आहेत की तुमची कल्पना??....मला तर खूप आवडले ते....."
प्रकाश आपली तारीफ ऐकून खुश झाला....बाजूच्या मिस सविता कडे बघत बघत ते समोर उभे असलेल्या राणेंच्या कडे दुर्लक्ष करत होते.. . तरी त्यातून प्रकाशने राणेचा उत्तर दिलेच
"अहो राणे....काल्पनिक आहे ते.....असच लिहलेत ते....मंत्र वैगेरे काही नाहीत बरं"
अस बोलून प्रकाश घरी आला.....तो अंघोळीसाठी बाथरूम मध्ये शिरला शॉवर घेत असताना त्याची नजर आपल्या नखाकडे गेली....काहीतरी लाल रंगाचं थोड्या वाढलेल्या नखात अडकलं होत.....प्रकाश ने सुई ने ते बाहेर काढलं.....काहीतरी लाल रंग वाळून नखात अडकला होता
"काय??रक्त तर नसेल....छे छे त्याने आपल्याला दुसऱ्याला इजा न पोचवण्याचे वचन दिलं होतं....असू दे कसला तरी कुंकू वैगेरे असेल"
प्रकाशने आपल्या मनाची समजूत काढली....अंघोळ आवरून त्याने आपल्या बायकोसाठी आणलेला नेकलेस तिला गिफ्ट दिला.....ती आनंदात होती....पण काही बोलायच्या आत तो आपल्या खोलीत निघून गेला....दार लावून घेतले......सगळी तयारी केली.....पेन....वही सगळं जवळ होतं..... त्याने डोळे मिटले.......काहीवेळासाठी त्याने परत प्रकाशची आहुती दिली......त्याच्या अंगात परत स्मिथ वेलेरियस संचारला.......ह्या वेळी मात्र त्याच्या बोटांची हालचाल जोरात होऊ लागली......काहीतरी भयाण सूड भावनेने लिहावं असं प्रकाश त्या अवस्थेत लिहत होता....त्याच्या तोंडातून फुत्कार बाहेर पडत होते.....त्यांची मान आज जरा जास्तच जोरात फिरत होती......पाने झपझप पालटली जाऊ लागली.....काही वेळ लिखाण झाल्यावर एक जोराचा झटका प्रकाश ला बसला.....तो दूरवर जाऊन पडला...त्याला शुद्ध आली....त्याचं डोकं ठणकत होत.....भिंतीवर कपडे आडकवण्याच्या हँगर ला त्याच डोकं आपटलं होत.....डोक्यात प्रचंड कळा येत होत्या रक्तही वाहू लागलं..... प्रकाश डोके चोळू लागला "आज अस का झालं??हा स्मित वेलेरियस असा का वागतोय....हा मला इजा पोचवणार नाही असं मला वचन दिलं होतं तरी??" प्रकाश ने आपल्या डोक्याला रुमाल पकडून रक्त थांबवलं.....तो आता फस्टएड बॉक्स शोधू लागला....अचानक त्याची नजर समोर लिहलेल्या कागदावर पडली......आपल्या डोक्याची कळ आवरून त्याने ती वही हातात घेतली.....तो वाचू लागला.......शीर्षक वाचून त्याची उत्सुकता वाढू लागली "द एव्हील रिटर्न"
प्रकाश वाचू लागला......प्रत्येक शब्दाबरोबर त्याचे डोळे विस्फारत होते.....ह्या वेळीस काहीतरी भयानक लिहलं गेलंय अस त्याच्या मनात येत होतं....त्याच्या डोक्याची कळ त्या भयाण शब्दापुढे कधीच गायब झाली होती......मध्ये मध्ये मराठी फॉन्ट मध्ये लिहलेले पण अनोळखी ते भयाण मंत्र त्याच्या अंगातल्या स्मिथ वेलेरियस ला बळ देत होते...आजच्या कथेत ते मंत्र जरा जास्तच दिसत होते.....भयाण आक्रोश....रक्तपात यांनी ती कथा बरबटली होती...अनेकांची कत्तल त्या कथेत झाली होती.....कथेतील राक्षस क्रूर होता त्याने अनेकांना यमसदनी पाठवल्याचा उल्लेख येत होता...कथा वाचताना प्रकाश तिथे त्या जंगलात आहे आणि सगळं त्याच्या समोर घडतंय असं वाटत होतं...ते विचित्र राक्षसी सैनिक आपल्या समोर लोकांची कत्तल करत आहेत असं ते दृश्य..वाचताना प्रकाशच्या काळजाची धडधड वाढत होती......घामाने त्याचं अंग ओलं चिंब झालं होतं.....थरथरत्या हातांनी त्यांनी ती वही खाली ठेवली आणि समोरचा पाण्याचा ग्लास तोंडाला लावला......
"हे तर खूप भयानक लिखाण झालं आहे.....हा स्मिथ ते मंत्र त्या पुस्तकात नेहमी घालतो......पण कथा खूप भयानक झाली आहे...लोकांची काय हालत होईल हे असलं भयानक वाचून.....खरंच ही छापवी का??"
इतक्यात फोनची रिंग वाजली.....संपादकांचा फोन होता
"अरे प्रकाश यार कुठे आहेस तू???काय जादू केलीय तुझ्या पुस्तकाने ह्या लोकांवर.....अरे लवकर पुस्तक छापण्या बाबत धमक्या मिळत आहेत रे......समजतंय का तुला तुझं नेक्स्ट पुस्तक आपण हवं त्या किमतीत विकू शकतो.....तू बोलला होतास आज कथा लिहून पूर्ण होईल....झाली का??""
प्रकाश ला काही उत्तर सुचेना ....हे भयानक पुस्तक छापुच नये असं त्याला वाटत होतं....."नाही" हा शब्द त्याच्या तोंडून बाहेर पडणारच होता....तितक्यात त्याच्या डोक्यात आपल्या प्रसिद्धीचा विचार आला....त्याला मिळालेली प्रतिष्ठा प्रेम हे सगळं त्याच्या डोळ्यासमोर दिसू लागलं
"हो झालीय लिहून....मी 15 मिनिटात घेऊन येतो ऑफिस मध्ये"
प्रकाशने आपल्या जखमेची मलमपट्टी केली आणि तो ती कथा घेऊन निघाला.....वाटेत त्याला गर्दी दिसली.....आप्पासाहेबांच्या
तो पुढे गेला एकाला बोलावून विचारलं.....त्याने प्रकाश कडे बघितलं
"अहो साहेब खून झालाय आप्पासाहेबांचा..... तो कोण तो सायको किलर त्यानं मारलंय म्हणत्यात हे पोलीस लोग.....अजून हा सैतान किती बळी घेणार आहे काय माहीत??"
आप्पासाहेब प्रकाशला काही दिवसांपूर्वी घराबाहेर मॉर्निंग वॉक वेळी प्रकाशला भेटले होते.. .चर्चे अंती कळलं की प्रकाश एक भयकथा लेखक आहे तेव्हा त्यांनीच त्याला म्हंटल होतं
"बाळा....तुझ्या कथा मी वाचल्या आहेत....काहीतरी गूढ संकट तुझ्या कथा दर्शवत आहेत.....कसल्या तरी चमत्कारिक पद्धतीने तुझं लिखाण चालू आहे.....तुला सावरलं पाहिजे.....नाहीतर"
"चमत्कारिक" हा शब्द ऐकून प्रकाश बिथरला.....ह्याला आपलं सिक्रेट माहीत पडलं की काय? ह्या भीतीने त्याने झटकन रस्ता बदलला होता.....तेच आप्पासाहेब आज ह्या जगात नव्हते.....त्यांना एकदा बघायची इच्छा प्रकाश ला झाली तो लोकांना बाजूला करत पुढे पुढे जाऊ लागला....अचानक फोन ची रिंग वाजली....संपादकांचा फोन होता.....कसल्या तरी विचारांनी अचानक थैमान घातलं आणि त्याने परत प्रेस ची वाट धरली.....संपादक प्रतीक्षेत होते....त्यांनी काही न बोलता एक मोठी रक्कम प्रकाशच्या हातात ठेवली....प्रकाश ती घेऊन घरी आला....तो खूप अस्वस्थ होता.....कसल्या तरी विचारांनी त्याला जडजड वाटत होतं......आजूबाजूला कसल्या तरी आर्त हाका ऐकू येत होत्या......काय होतंय कळेना.....त्या दिवशी प्रकाश ला खूप त्रास झाला......नीट न जेवता अर्धपोटी तो झोपी गेला.....अचानक झोपेत त्याला रक्ताळलेले चेहरे दिसू लागले......त्यांच्या किंचाळी प्रकाशच्या कानाला वेदना देणाऱ्या होत्या तो झोपेतून ओरडत उठला त्याची पत्नी राधिका जागी झाली......प्रकाश घामाने भिजला होता
"अहो काय झालं??असं का उठलात??स्वप्न होत का भयानक?"
प्रकाशची वाचा बसली.....त्याला समोर 7 जण जखमी रक्ताने माखलेले दिसले...त्यात आप्पासाहेब सुद्धा त्याच्याकडे आशेने बघत होते....त्यांच्या पोटातुन एक अखंडित रक्तप्रवाह वाहत होता....ते हळूहळू प्रकाशच्या दिशेने येत होते.....प्रकाश घाबरला.मागे मागे सरकत राधिकाच्या कुशीत शिरला.....भिंतीकडे बोट दाखवून ओरडू लागला
"अहो कुणीच नाहीय तिथे.....तरी सांगत होते सारखी सारखी ती भयकथा पुस्तके लिहू नका म्हणून"
त्याला त्या रात्री झोप नव्हती.....किंचाळी,रक्त,वे
पण तिकडे प्रकाश मात्र सैतानाच्या आहारी जाऊ लागला.....कित्येक रात्री त्याने जागून काढल्या होत्या.....पुस्तकाची प्रसिद्धी बघून प्रकाशकाने एक पार्टी ठेवली होती......त्यात प्रकाश गेला.....पण प्रकाश कडे बघून संपादक अचंबित झाले.....इतका मोठा लेखक पण केस विस्कटलेल्या अवस्थेत कपड्याचे भान नव्हते.....एवढी गर्दी बघून प्रकाश बावरला होता.....एका सुंदर महिलेकडे बघून त्याने आपली जीभ बाहेर काढून एखाद्या सापाप्रमाणे जीभ वळवळली....तो एकटक त्या बाईकडे बघत होता.....त्याच्या एका मित्राने त्याला सावरायचा प्रयत्न केला पण प्रकाशने त्याला ढकलून दिले......मित्र दूरवर जाऊन पडला.......सगळे जण लांब सरकले.....समोरची गर्दी प्रकाशला किड्यामुंग्यांची वाटत होती......ते किडे आपल्याला डसायला येत आहेत असा भास प्रकाश ला होऊ लागला....त्याने समोरची जड सिमेंटची कुंडी रोपासकट उचलली आणि तो हवेत फिरवू लागला.....काही वेळाने तो भानावर आला....लोक घाबरून लांब उभे होते.....प्रकाशला आपल्या कृत्याची जाणीव झाली आणि तो जोर जोरात ओरडत तिथून पळाला.....आता तो घरातच राहू लागला.....त्याने स्वतःला खोलीत कोंडून घेतले......."लिखाणासाठी एकांत हवा असेल" ह्या समजुतीने त्याची बायको त्या खोलीजवळ जात नसे......तो एकांत प्रकाशचा जीव घेई.....कुठली तरी पुरातन स्वप्न त्याला पडायची.....त्यातले युद्ध रक्तपात सारखं त्याच्या डोळ्यासमोर येत होते.....त्यातून तो आपल्यासाठी थोडाही विचार करत नव्हता......एक भयाण स्वप्न झाले की दुसरे तयार असायचे.....त्यातच त्याने म्हणजे त्याच्या आतील स्मिथ वेलेरियस ने सात खून केले हे महापाप डोक्यात आणून तो रडत असे......त्याची पत्नी निराश झाली आपली गरजेची कामं आटपून हे एकही शब्द न बोलता खोलीत जातात.....काही वेगळा विषय तरी नसेल ना.....एकेदिवशी टॉवेल ला तोंड लपवून खोलीत जाणाऱ्या प्रकाशला तिने अडवलं.......प्रकाश कडे बघून ती क्षणार्धात मागे सरकली......डोळ्याभोवती काळी वर्तुळे....लालभडक बुबुळे.... त्याच्या डोक्यावरचे केस जरा झडले होते.....
"अहो काय अवस्था केली आहे स्वतःची???डॉक्टरांना बोलावू का??"
प्रकाश तिच्याकडे रागाने बघू लागला.....त्याने फक्त आपल्या तोंडावर बोट ठेवून लालभडक डोळे मोठे करून शांत रहायला सांगितले.....तो आत गेला.....दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती...राधिका त्याच्या खोलीत त्याला जेवायला बोलवायला गेली....प्रकाश भिंतीकडे डोके ठेऊन उभा होता.....त्याच्या बायकोला प्रकाशचे वागणे जरा विचित्र वाटत होते.....
"अहो जेवायला येताय ना"
तिने ताटात जेवण वाढले होते......पूर्ण अंग स्थिर ठेवून फक्त पायाची हालचाल करत प्रकाश जेवायला बसला....बाजूला त्याची मुलगी बसली होती.....प्रकाश विचित्र हालचाली करत होता.....त्याची बायको राधिका प्रचंड घाबरली होती.....तिने आपला फोन उचलला आणि आपल्या आईला फोन लावण्यासाठी बाजूला गेली.....प्रकाश भाताचे गोळे बनवून ठेवत होता आणि त्या गोळ्याकडे एकटक बघत होता......अचानक त्याच्या डोक्यात विचार येऊ लागले....त्याच्या कानावर ह्रदयाची धडधड ऐकू येत होती......त्याला एक सुगंधित वास येऊ लागला....एखाद्या रुचकर खाद्यपदार्थासारखा तो वास होता.....त्याने त्या येणाऱ्या वासाकडे बघितले....बाजूला तिची मुलगी बसली होती.....तिच्याच हार्टबिटस चा आवाज प्रकाश ला बैचेन करत होता....जणू वाघाला आपल्या भक्ष्याची चाहूल लागावी तसे विचार त्याच्या मनात येत होते.....अचानक त्याला शुद्ध आली....त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले "अरे हा काय विचार करतोय मी" तो टेबल वरून उठून जाऊ लागला....अचानक त्याच्या कानात एक आवाज घुमला
"मारून ताक तिलाssssss......कथा आहे माझ्याकडे..... तुला अजून श्रीमंत व्हायचं आहे....मोठा लेखक व्हायचं आहे.....दे तिची बळी सैतानाला"
त्याचे डोळे बंद झाले....अनेक लोक त्याला समोर दिसत होते.....स्वप्नात तो बघत होता की तो एका स्टेज वर उभा आहे समोर त्याचा वाचकवर्ग उभा आहे....हजारो लोक त्याच्या समोर उभे होते....एकसाथ ते जोरजोरात टाळी वाजवू लागले....एखाद्या युद्धावेळी नगाडे वाजावेत असा तो ध्वनी होता.....प्रकाश चे डोळे मिटलेले होते पण त्या टाळ्यांचा आवाज त्याला एक वेगळंच सुख आणि चेहऱ्यावर हसू देत होता....अचानक ते लोक जोरजोरात ओरडू लागले
"पुस्तक.....पुस्तक......पु
डोळे मिटलेल्या अवस्थेत त्याच्या हातात चाकू आला.....प्रकाशची मुलगी जेवत होती तो तिच्या मागे होता....चाकू असलेला हात वर गेला.....एक जोराचा धक्का त्याला बसला तो बाजूला पडला....राधिकाने त्याला ढकलले.....खाली पडताच तो शुद्धीवर आला......राधिका आपल्या मुलीला कवटाळून रडत होती.....प्रकाश काही बोलायच्या आत राधिका आपल्या मुलीला घेऊन त्या खोलीतून पळून गेली.....प्रकाश मागे मागे जाऊ लागला....पण ती धावत पुढे निघून गेली.....प्रकाश रडू लागला.....त्याला राधिकाला समजावण्याचा सुद्धा वेळ मिळाला नाही....ज्या बायको मुलीसाठी हा सौदा केला होता तीच आता त्याच्यापासून दूर होती......तो आपल्या खोलीत गुडघ्यात डोकं खुपसून रडू लागला......अचानक त्याला अजून रडण्याचे आवाज येऊ लागले....त्याने डोके वर काढले.....ज्या लोकांना प्रकाश ने मारले होते ते त्याच्या समोर सडलेल्या अवस्थेत उभे असल्याचे त्याला दिसले.....प्रकाशने पहिला बळी घेतलेला शिरप्या म्हणत होता
"का मारलं मला....माझी बायको....माझी आई वाट बघत असेल त्यांना कोण बघणार."
ह्या बरोबर प्रत्येकजण आपापलं दुःख प्रकाश समोर मांडू लागला.....तो आवाज प्रकाशला त्रास देऊ लागला......समोरून हा भास आणि डोक्यातून त्याचे वाचक "पुस्तक....नवीन पुस्तक" अश्या कर्णकर्कश घोषणा देत होते.....हे सगळं असह्य झालं होतं......त्या त्रासातून स्वतःला सावरत होता.....त्याची नजर समोरच्या वृत्तपत्रावर गेली.....हेडलाईन होती
"सायको किलर चा सातवा बळी....पोलिसांची हतबलता"
हेडलाईन वाचून तो ताडकन उभा राहिला आणि जोरात ओरडला
"सायको.........सायको......
प्रकाशच्या डोळ्यात अश्रू आले....ते शर्टाला पुसत त्याने परत वही पेन हातात घेतला...आणि स्वतः लिहू लागला वरती टायटल टाकलं "सायको"
प्रस्थावना टाकली.....
"प्रिय वाचक वर्ग....तुम्ही जेव्हा हे पुस्तक वाचाल तेव्हा मी ह्या जगात नसेन.....माझ्या लिखाणाला तुम्ही उदंड प्रतिसाद दिला पण ते लिखाण नव्हतं....तो एक सौदा होता.....जो मी स्वतः केला होता....काय होता तो सौदा वाचा माझ्या शेवटच्या पुस्तकात...आणि मी त्या कुटुंबाची माफी मागतो ज्यांची माझ्यामुळे हानी झाली....ह्या पुस्तकाच्या विक्रीचा सगळा हिस्सा त्या पीडित कुटुंबाला देण्यात यावा....."
ती खोली प्रकाशला नरक वाटत होती....आजूबाजूला चित्रविचित पिशाच्च......कधी कधी अंगावर साप असलेला हिरव्या डोळ्याचा माणूस.....प्रचंड किंचाळ्या.... तरीही त्या भयाण वातावरणात न डगमगता त्याने आपले "सायको" हे पुस्तक लिहून काढले आणि ते प्रकाशनाकडे पोस्ट केले....त्या पुस्तकात त्याने आपल्यावर घडलेले प्रसंग रेखाटले होते..ते खुनाचे सत्र.... त्या वेळी जे जे घडले त्याने ते स्वप्नात बघितले ते त्याने लिहून काढले..त्या रात्री त्याने एक पत्र लिहले
राधिका
मला माफ कर....पण तू जस समजतेस तस काही नव्हतं.....तुझी माझी स्वप्ने पूर्ण व्हावीत म्हणून मी सर्व करत होतो....माझं शरीर आता माझं राहिलं नाही....त्याने वापर केला माझा....आता तो माझ्यावर हावी झाला आहे.....तो माझ्या शरीराचा वाट्टेल तसा वापर करून घेत आहे गं.... आपल्या पिल्लू वर सुद्धा त्याची नजर पडली होती....माझ्या अंगातील सैतान माझा वापर करून घेत आहे तो फक्त मी जिवंत असे पर्यंत.....म्हणून मी......
असो....मी जमवलेली माया जवळपास सहा सात कोटींच्या घरात गेली आहे....तुझ्यासाठी ते पुरे आहेत....आणि माझी शेवटची इच्छा आहे की तुझ्या आणि आपल्या पिल्लुच्या कल्याणासाठी तू दुसरं लग्न कर......
तुझाच
प्रकाश
त्या पत्रावर त्याचे अश्रू पडत होते....त्याच्या कानावर "पुस्तक.....पुस्तक....पुस्
हे शब्द चालूच होते......प्रकाश डोक्याला हाथ लावून जोरात किंचाळला........
"देतोsssssss........ बळी देतो..........पुस्तक पाहिजे ना तुम्हाला.....थांबा देतो"
अस बोलून त्याने पाणावलेल्या डोळ्यांनी गळ्यात फास अडकवला..रात्रीचे 9 वाजले होते...राधिका आणि आपल्या फोटोकडे बघत त्याने खालच्या स्टूलाला लाथ मारली......त्याचे पाय थरथरू लागले.....सैतानाला आता आपला वापर करता येणार नाही ह्या विचाराने मरताना सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटलं....त्याचे थरथरनारे पाय थंड झाले.....शरीर थंड गार पडलं....प्रकाश त्या दोरीला झुलत होता......त्याची प्राणज्योत कधीच मालवली होती......रात्रीचे 3 वाजले होते.....प्रकाशाच्या मृत चेहऱ्यावर ते समाधानाचे स्मितहास्य तसेच होते....अचानक त्याच्या बोटांची हालचाल झाली.....त्याचं अंग गरम होऊ लागलं.....बंद डोळ्यांनी त्याने ती फाशीची दोरी पकडली आणि काही क्षणात तो ओढून काढली.....स्लॅबचे लोखंडी हुक उखडून पडले......काही वेळ प्रकाश तसाच उभा होता त्याने आपली मान गरगर फिरवली आणि डोळे उघडले त्याची बुबुळे पांढरी फेक पडली होती.....तो आपल्या हाताकडे बघू लागला.....स्वतःला सावरत त्याने समोरचा प्रकाशचा फोटो घेतला.....त्याच्या मानेला फाशीचे वळ लालभडक दिसत होते....फोटो कडे बघून तो हसत होता
"प्रकाश....प्रकाश....प्रका
..त्याने प्रकाशचा फोटो खाली ठेवला....तो जाऊ लागला.....अचानक त्याला कसला तरी वास आला....तो वास कपाटातून येत होता.....त्याने कपाट उघडलं....."रॅट पॉयझन" ती बाटली बघून तो खुश झाला आणि तिचे टोपण उघडून त्याने ते विष घटाघटा पिऊन टाकलं....दीर्घ श्वास घेऊन...ते विष जणू त्याला नवीन ऊर्जा देत होत....तो बाहेर गेला.....बाहेर काळोख कुत्र्यांचे भुंकने चालू होतं.....तो सरसर एका बिल्डिंग वर चढला आणि ह्या बिल्डिंग वरून त्या बिल्डिंग वर उद्या मारत तो आता शहराबाहेर आला.....एक मोठी फॅक्टरी होती......त्याच्या धुराड्यातून धूर निघत होता.....बाहेर एक बोर्ड लिहलं होता
"poison(danger)"
(फक्त स्टाफ मेम्बर्सना प्रवेश....नागरिकांनी दूर रहावे)
त्याने तो बोर्ड बघितला....तो जाड पत्र्याचा बोर्ड त्याने गेट वरून उखडून फेकला.......आणि आकाशाकडे बघत म्हणाला
"मला अडवणार अजून पैदा व्हायचा आहे"
(समाप्त)
#शशांक_सुर्वे
(तर मित्रांनो....... शेवट वाचून तुम्ही थोडे नाराज झाला असालच...."वाईट शक्ती अजून जिवंत का? तिला मारायला हवं होतं" असे प्रश्न तुमच्या मनात येत असतील....कामातून ही कथा थोडक्यात मांडली.. तर माझी "टॅटू" ही कथा तुम्ही वाचली असेलच....त्यात मी दोन सुपरहिरो दाखवले होते....त्यात आणखी एकाची भर टाकून मी त्या तिघांना ह्या "सायको" समोर उभे करण्याचा विचार करतोय....अर्थातच ह्या कथेचा प्रतिसाद बघून पुढची कथा लवकरच लिहीन.....तेव्हा ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर नोंदवा.......धन्यवाद🙏🙏)