A real horror marathi story |
फ्लॅट...भाग ०१ - A real horror marathi story
(सदर गोष्ट काल्पनिक असून हिचा कोणत्याही घटनेशी, जागेशी काडीमात्र संबंध नाही आणि असल्यास निव्वळ योगायोग समजावा…)
आपण सामान्य माणसं आपल्या छोट्याशा जगात किती मग्न असतो नाही? मी , माझ घर, माझा संसार माझ कुटुंब, माझी नोकरी आणि सगळच… आपण आपल्याच गोतावळ्यात इतके अडकतो नं! की आजुबाजुला काय घडतय हे आपल्या लक्षातच येत नाही आणि जेंव्हा येते तेव्हां बराच उशीर झालेला असतो…
बरोबर! नेम धरून चुकीचा विचार केलात… आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी म्हणजे आपण वावरतो त्या जगातल्या नाही, तर आपल्या आजूबाजूला जे अदृश्य जग असतं नं ते… जे सतत आपल्या हालचालींवर लक्ष ठेऊन असत… त्यात शिरकाव करायची फक्त एक संधी, ती संधी ते सोडत नाहीत आणि आपण फसतो…
आणि मग सुरू होतो त्यांचा असह्य जीवघेणा घाबरवून सोडणारा खेळ… तो थरार ती भिती ती दहशत मी आणि माझ्या कुटुंबाने अगदी जवळून अनुभवली आहे… मी प्रिती… प्रिती बापट… कुटुंबात आम्ही चौघे… मी , माझा नवरा वैभव आणि माझी मुलं तन्मय आणि ऋद्र…
पुण्यातील कोथरूड भागात आम्ही रहात होतो… पण एकत्र कुटुंबात जागेची होणारी अडचण लक्षात घेता आणि नवरा IT वाला असल्याने प्राधिकरण भागात नवीन बांधकाम झालेला रेडी पझेशन फ्लॅट आम्हाला मिळाला… रीतसर वास्तुशांत घालून आम्ही आमच्या नवीन घरी शिफ्ट झालो… सगळं कसं मस्त होत… नवीन एरिया, नवीन माणसं, नवीन घर आमच्या चौघांचच सुरू झालेल नवीन आयुष्य… छान सुरळीत… पण...
पुण्यातील कोथरूड भागात आम्ही रहात होतो… पण एकत्र कुटुंबात जागेची होणारी अडचण लक्षात घेता आणि नवरा IT वाला असल्याने प्राधिकरण भागात नवीन बांधकाम झालेला रेडी पझेशन फ्लॅट आम्हाला मिळाला… रीतसर वास्तुशांत घालून आम्ही आमच्या नवीन घरी शिफ्ट झालो… सगळं कसं मस्त होत… नवीन एरिया, नवीन माणसं, नवीन घर आमच्या चौघांचच सुरू झालेल नवीन आयुष्य… छान सुरळीत… पण...
सार काही सुरळीत चालू असताना फार मोठ्ठ्ठ विपरीत घडण्याची तयारी चालू असते…
क्रमशः………
सार काही सुरळीत चालू असताना फार मोठ्ठ्ठ विपरीत घडण्याची तयारी चालू असते…
माझ्या मुलांची शाळा मिस्टरांच ऑफिस हे सुरू होऊन फक्त आठवडाभर झाला असेल… सगळ्यांच सकाळच आवरून आपापल्या कार्यस्थळी गेल्यावर मी घरचं सगळं आवरून सकाळी लवकर उठत असल्याने पेपर वाचत एखदी डूलकी घ्यायचे या एका आठवड्या पासून... सासरी होते तेंव्हा मोठ्यांचा आदर किंवा धाक असल्याने हे अस झोपण व्हायच नाही... माझे क्लासेस घेण मला परत सुरू करायच होतं पण एरिया नवीन मं क्लाससाठी मुलांचा शोध चालू होता…
एकदा असच सगळ आवरून पेपर वाचत बसले होते आणि पाण्याची टिपटिप ऐकायला येऊ लागली… नळ निट बंद केला नसेल म्हणून स्वयंपाकघरात जाऊन सिंक चा नळ चेक केला तर तो बंद होता आणि पाण्याचा टिपटिप आवाज ही यायचा बंद झालेला… भास असेल अस स्वतःशी म्हणत परत येऊन पेपर वाचत बसले... थोडाच वेळ झाला असेल की परत तोच टिपटिप आवाज... घर नवीन असल्याने तो आवाज ही घरात घुमल्या सारखा येत होता आणि डिस्टर्ब ही करत होता... परत उठून बघीतले तर सिंकचा नळ बंद म्हणून बाथरूम आणि इतर सर्व नळ चेक केले तर ते ही बंद आणि आवाज ही…
पुन्हा येऊन पेपर वाचत बसले… साधारण अर्धा तास तरी गेला असेल आणि बेल वाजली म्हणून उठले तर पायाला थंड स्पर्श जाणवला… पुण्याचं हवामान तसही थंड त्यातही अजून काय थंड लागल म्हणून खाली बघते तर मी बसलेले ती बेडरूम, कीचन आणि बाथरूम च्या पेसेजमध्ये पाणी… परत बेल वाजली म्हणून आधी दार उघडायला जाताना त्या पाण्यामुळे आणि स्पारटेक्स च्या लादीमुळे पाय घसरला पण वेळीच सावध होवून सावरले आणि आधी दार उघडलं?
दारात साधारण ६५/७०री च्या एक आज्जी उभ्या होत्या… दार उघडलं तस नमस्कार म्हणत आतच शीरल्या… मी ही बुचकळ्यात पडले, ओळख न पाळख ह्या अशा का घरात शीरल्या?
"कोण आपण? सॉरी मी ओळखल नाही आपल्याला"…
"अगगगं! मी माई… शेवटच्या विंगेत राहते आपल्या सोसायटीच्या… काल आम्ही सगळ्या बायका बसलो होतो तर तुम्ही रहायला आल्याच कळालं… म्हंटलं भेटून याव… नवीन जागेत ओळख असलेली चांगली, अडीअडचणी ला उपयोग होतो… काय?"…
"हो ना काकी"…
माझ बोलण अर्धवट तोडत मला म्हणे "मला माईच म्हण सगळे ह्याच नावाने ओळखत आलेत आज पर्यंत, तु ही तेच म्हण"…
"ओकेकेके… माई, मी माईच म्हणेन तुम्हाला… तुम्ही बसा मी चहा ठेवते पटकन"
"अग नको असू दे… मी निघते आता… तुलाही कामं असतील… तू आवर मी येते, कधी तुला गरज पडलीच तर येईन मी… काळजी घ्या"…
"ठिक आहे माई… येत जा अशाच"…
"मी येणार गं… तू नाही म्हणालीस तरी येणार"… अस म्हणून हसल्या आणि त्यांनी हॉल भर एक नजर टाकली एक वेगळीच जरब होती त्या नजरेत…
दारात पोहोचून बाहेर पडणार इतक्यात परत मागे फिरल्या आणि म्हणाल्या "ते पाणी पडलेल पुसून घे हं आधी… मगाशी पाय घसरला असता पण वाचलीस… आधी तेवढ पाणी पुस हं बाळा"…
मी ही हो म्हणाले, माई गेल्यावर पहीले सर्व पाणी पुसून काढल… स्वतःसाठी मस्त चहा केला… चहा घेताना माईंचा विचार आला डोक्यात, कोण कुठली बाई… अनोळखी असून ओळख देते स्वतः… जाताना बाळा म्हणत आपल्याला पाणी पुसून घ्यायला सांगते… किती प्रेमळ आवाज आणि वागणं… आई गेल्यानंतर पहिल्यांदा कोणीतरी मला बाळा म्हणाल…
दुपारी मुलं आली मग त्यांचा आभ्यास मग संध्याकाळी खाली गार्डन मध्ये खेळून आम्ही वर आलो… माई आणि त्यांच्या ग्रुपच्या बायका दिसतात का बघत होते पण नव्हत कोणी… संध्याकाळी वैभव ही आला, मग जेवणं, गप्पा, मस्ती करून मुलांना झोपवल आणि आमच्या बेडरूममध्ये आलो… दिवसभरात काय केलं हे आम्ही पहिल्या पासून शेअर करतो त्यात मी सकाळचा पाण्याचा किस्सा आणि माईं बद्दल वैभवला सांगितल… त्यालाही इनट्रेस्टिंग वाटल्या माई... आणि बोलता बोलता पटकन मला काहीतरी आठवलं आणि मी वैभव ला म्हणाले…
"अरे पण"…
"काय झालं ग?"…
"हे कस शक्य आहे?"…
"काय कस शक्य आहे प्रिती… निट सांग काय कस शक्य नाही ते?"…
"अरेरेरे! माईंना दार उघडायला उठले तेव्हा कळालं कि घरात पाणी पाणी झालय… माई तर घरात आल्याच नव्हत्या त्या वेळी, मग त्यांना कस कळालं की घरात पाणी पसरलय आणि माझा पाय घसरता घसरता मी वाचले ते? आमचा त्या बाबतीत काही विषय निघाला नाही सकाळी… म कस कळालं माईं ना?"…
"तू पण ना! काहीतरी डोक्यात घेऊ नकोस… तुच बोलली असशील… चल झोप सकाळी उठायचय परत"…
अस म्हणून वैभव झोपला पण मला बराचवेळ झोप नाही आली…
सतत डोक्यात एकच प्रश्न की माईंना कळाल कसं???
क्रमशः………
#फ्लॅट… भाग ०३
सतत डोक्यात एकच प्रश्न की माईंना कळाल कसं???
आजचा दिवस पण इतर दिवसां सारखाच सुरू झाला… वैभव गेल्यावर मी माझा चहाचा कप घेऊन आज बेडरूम च्या बाल्कनीत ऊन खात बसलेले… अख्खा पेपर वाचून झाला, आजुबाजुचं निसर्ग सौंदर्य बघण्यात हरवून गेले होते… तेवढ्यात माझ्या अंगावर वाळलेल्या गवताच्या काही काटक्या तुसं पडली… म्हणून सहज वरती नजर गेली तर एक डोमकावळा वरच्या मजल्यावर असलेल्या कबुतरांच्या घरट्याला त्रास देत होता… घरट उंचावर असल्याने असहाय्य पणे बघण्या पलिकडे मी काहीच करू शकत नव्हते… तो कावळा त्या घरट्यातल्या दोन पिल्लांच्या मागे होता... त्याला त्यांना खायच असेल, पण कबुतरांची जोडी कावळ्याला काही घरट्या पर्यंत पोहोचू देत नव्हती… १०/१५ मिनिटाच्या अथक प्रयत्नांना यश आल, पण ते त्या निर्दई कावळ्याच्या… त्याच्या पंजांमध्ये ते घरट अडकून बाहेर ओढल गेल आणि ते घरट आणि ती पिल्लं सगळ गुरूत्वीय नियमानुसार खाली जमीनीकडे झेपावली… ते कावळ्याच्या पायात घरट अडकणं, ते बाहेर ओढल जाणं आणि खाली पडणं ह्या क्रिया अशा काही क्षणात झाल्या नं… आणि त्या वर माझी रिएक्शन ही मनुष्य स्वभावाला धरून होती… माझ्या तोंडून एक किंकाळी निघाली आणि चेहरा हाताच्या ओंजळीत झाकला गेला… २ मिनिटे मी त्याच अवस्थेत होते… सगळा प्रकार घडत होता तो आमच्या बाल्कनीच्या बरोब्बर वरती, त्यामुळे ते घरट आणि त्यातले जीव हे आमच्या बाल्कनीत पडणच अपेक्षित होत आणि कोणत्याही आई असलेल्या स्त्री ला कोणाच्याच बाळाचा असा दुर्दैवी अंत नाही ओ बघता येणार…
नाईलाजाने २ मिनिटांनी मी माझ्या चेहऱ्या वरून माझे हात बाजूला घेतले… आजुबाजुला बघीतले तर बाल्कनीच्या रेलिंग वर ते घरटं पडल होतं आणि कबुतरांची ती जोडी तीथेच बसली होती… माझ धाडस झालं नाही त्या घरट्यातल्या जिवांचे काय झाले असेल ते जाऊन बघायचं… २/३ मिनिटात इतक वाईट दृश्य बघायला मिळेल अस वाटलं नव्हतं… अंगातली सगळी ताकद कोणीतरी काढून घेतल्या सारखा थकवा जाणवत होता म्हणून खाली खुर्चीवर बसले आणि आपण काय बघीतलं या विचारात पुढे वाकले तर...
मी खरोखरच झटका लागल्या सारखी उडून धडपडत मागे झाले… कारण त्या घरट्यात पिल्लं नसून अंडी होती त्या कबुतरांची आणि ती पण माझ्या दोन पायांच्या मधे पडून फुटलेली… त्यातुन अर्धवट जन्माला आलेले ते दोन जीव ती बाळं गतप्राण होऊन माझ्या पायात पडली होती… न जन्मालेल्या त्या पिल्लांना बघीतल्या मुळे अश्रू अनावर होऊन मी त्यांच्या पासून जेवढ लांब जाता येईल तेवढा प्रयत्न करत होते, उठून घरात जायचं भानही राहील नाही मला…
रेलिंग चा आधार घेऊन डोळ्यात आलेल पाणी पुसणारच येवढ्यात समोरच्या लॉनवर कोणीतरी उभं आहे असा भास झाला… पेहेरावा वरून व्यक्ती ओळखीची वाटत होती… नीट डोळे पुसून बघीतलं तर त्या माई होत्या, अगदी काल जश्या आल्या होत्या अगदी तशाच, आकाशी रंगाची नऊवारी साडी, डोक्यावरून पदर घेतलेला, एका हातात ऋद्राक्षाची माळ आणि दुसऱ्या हातात कापडी पिशवी… पण नजर एवढी भेदक आणि चेहऱ्यावरचा राग बघून एक क्षण वाटलं गेल्या १५/२० मिनिटात जे घडल ते…
"काय बावळटपणा आहे प्रिती?"… स्वतःच्या मनात म्हणत मी कसनुस हसले, पण माईंच्या चेहऱ्यावरचे भाव तुस भर ही बदलले नव्हते… मी पटकन घरात जायला वळाले तेव्हां माई तीथल्याच एका बाकावर बसत होत्या पण नजर तिच आणि एकटक आमच्या बाल्कनीच्या बाजूलाच बघत होत्या…
मी आत आले आणि दोन ग्लास थंड पाणी प्यायलं आणि अर्धा तास शांत बसले… जे सगळं झालं ते डोक्यातून जात नव्हते, कदाचित पहिल्यांदा अस बघितलं असेल म्हणूनही असेल कदाचित… पण माझी पिल्लं यायची वेळ झालेली त्या मुळे हे विचार झटकून मी त्यांच्या तयारी ला लागले… जेवण बनवल, पिल्लांना घेऊन आले, मुलं फ्रेश झाली आणि मग काय त्यांचा दंगा सुरू, मी दोघांना भरवायला म्हणून ताटच वाढत होते… इतक्यात ऋद्र ने हाक दिली…
"ए आईईई! हे बघ कोणत्यातरी बर्ड च नेस्ट आपल्या बाल्कनीत पडलय… दादू नको हात लाऊस आई ओरडेल…"
माझ्या हातातल ताट तसच टाकून मी बाल्कनीत धावले कारण त्या दोघांनी तस काही बघाव अशी माझी इच्छा नव्हती… आवरायच्या गडबडीत बाल्कनीची साफसफाई करायच डोक्यातच नाही… मुलांना आत पिटाळून एक जुना झाडू आणि एक मोठ्ठी पिशवी घेऊन बाल्कनीकडे निघाले… ते सगळं त्या पिशवीत कसं भरणार होते माहिती नाही पण मन घट्ट करून निघाले… मी गेले खरं बाल्कनीत पण अजून एक धक्का माझी वाट बघत होता…
मी गेल्या काही तासात जे काही म्हणून अनुभवल, बघितलं त्याची एकही खूण तीथे नव्हती… माझ्या मुलांना दिसलेल्या घरट्या खेरीज तीथे कसलाच नामोनिशाण नव्हता… ती फुटलेली अंडी त्यातून बाहेर पडलेले ते निष्पाप जिव, यातल काहीच नाही… ती जागा अगदी स्वच्छ, जसं काही झालच नाही… मी तन्मय आणि ऋद्र दोघांना बोलवून विचारलं ही, की त्यांनी काय बघितलं? पण त्यांनीही त्या घरट्या व्यतिरिक्त काहीच नाही बघितलं.… माझं डोक सुन्न पडतय अस वाटायला लागल मला… पिल्लांना आत पिटाळून बाल्कनीच दार लावून घेत होते, सहज समोर लॉन कडे लक्ष गेलं तर माई पाठमोऱ्या जाताना दिसल्या… स्वतःशीच बोलत असाव्यात कारण मान आणि माळ धरलेल्या हाताने नाही नाही म्हणत जात होत्या… का माहिती नाही पण भितीचा शहारा आला अंगावर…
पिल्लांना भरवल मी ही त्यांच्याच बरोबर थोड खाल्लं, दोघांना हॉल मध्ये टिव्ही वर कार्टून लावून दिल आणि न आवाज करता बघा अशी ताकीद देऊन एक डिस्प्रिन घेतली… डोक ठणकत होत खूपच, म गोळी घेऊन बेडरूम मध्ये झोपायला आले… तेव्हां साधारण २.३० वाजले असतील… जाग आली ती ऋद्र च्या रडण्याने… ६.३० वाजलेले समोरच्या घड्याळात…
"ए आई दादू बघ ना ग… मला बघ न भिजवल त्याने अख्ख"…
ऋद्र च्या आवाजाने मी खडबडून जागी झाले… बघीतल तर ऋद्र अख्खा ओला झालेला आणि तन्मय दारात ऊभा राहून त्याला हसत होता… मला वाटल दोघांनी बाथरूममध्ये जाऊन मस्ती केली असेल म्हणून दोघांना कपडे बदला असं म्हणत बेड वरुन उतरले तर परत पायांना तोच थंड स्पर्श…
चमकून खाली लक्ष गेल तर अख्ख्या बेडरूमभर पाणी… फक्त बेडरूम मध्येच नाही तर अख्ख्या घरात पाणी…
आणि पुन्हा बेल वाजली…
क्रमशः………
#फ्लॅट… भाग ०४
आणि पुन्हा बेल वाजली…
ते घरभर पसरलेल पाणी, पायांना जाणवणारा तो थंड स्पर्श आणि ती कालच्याच सारखी वाजलेली ती बेल… अंगावर सर्रर्रर्र कन काटा आला… मुलांना बाजूला करून दार उघडायला गेले, दार उघडतानाही हाताला एक प्रकारचा कंप होता…
दार उघडलं तर समोर वैभव होता… माझ्या जीवातजीव आला… त्याला समोर बघून काय वाटलं ते शब्दात नाही सांगता येणार… त्याला घरात घेऊन दार लावणारच होते इतक्यात आवाज आला…
दार उघडलं तर समोर वैभव होता… माझ्या जीवातजीव आला… त्याला समोर बघून काय वाटलं ते शब्दात नाही सांगता येणार… त्याला घरात घेऊन दार लावणारच होते इतक्यात आवाज आला…
"प्रिती"...
आवाज ओळखीचा, प्रेम होत त्यात पण माझी धडधड नजाणे का वाढली… वाकून बाहेर डोकावले तर चेहऱ्यावर गंभीर हास्य पण डोळ्यात फक्त प्रेम घेऊन जिन्यात माई उभ्या होत्या… मला बघून म्हणाल्या
"बाळा…! आज जे झालं त्याची चिंता नको करूस, काही गोष्टीत आपला नाईलाज असतो… ठरवून ही आपण काही वेळा नाही थांबवू शकत या गोष्टी… तू सवतःला जप… येते मी…"
अस म्हणून त्या वळल्या दोनच पायऱ्या उतरल्या असतील आणि परत वळल्या, चेहऱ्यावर एक मिश्कील हास्य होतं…
"आज पाणी जरा जास्त पसरल का गं घरात?… जा बाळा आवर, वैभव पण आत्ताच आलाय… जा जा!…"
अस म्हणून वळून उतरायला लागल्या, पण मानेने नाही नाहीच म्हणतं होत्या…
मी दार लावून घरातलं पसरलेल पाणी पुसून घेतल… वैभव बिल्डरशी बोलत होता…
"साहेब! पाणी लीक होतय घरात, दोन दिवस झाले राव अख्ख्या घरात पाणी पाणी होतय… नाही नाही, उद्या तुमच्या माणसाला काहीही करून पाठवा… हो हो दुपारी असतील मेडम घरी… हो चालेल… थेंक्स…?"
"उद्या येईल ग प्लंबर, दुपारी…"
"हममम… मला आज बोलायचय तुझ्याशी थोडं, आज शक्य असेल तर आपण बाहेर जाऊया का जेवायला? मी न आज… प्लिज जाऊया का रे बाहेर?…"
"हो ग चल तयार हो… मुलांना ही तयार कर मी एक दोन फोन करून आलोच…
मी मुलांना तयार केल आणि स्वतःही तयार झाले, वैभव ही फोन कॉल आटोपून तयार झाला… आम्ही हॉटेलसाठी निघालो… वैभव सोसायटी बाहेर गाडी घेत होता आणि मला सोसायटी च्या त्या लॉनवर माई दिसल्या सारख्या वाटल्या… तो भास होता की…
आम्ही त्या हॉटेल ला पोचलो, जेवण ऑर्डर केल… मुलांसाठी पावभाजी ऑर्डर केलेली ती खाल्यावर मुल तिथेच गार्डन मध्ये खेळायला गेली…
"प्रिती! काय झालय? आल्यापासून बघतोय डिस्टर्ब आहेस, आणि काय बोलायचं होत तुला?…"
"वैभव आज अरे सकाळी नं..." मी दिवस भरात घडलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या वैभव ला… सगळं ऐकून तो ही थोडा अस्वस्थ झाला असावा पण लपवत होता… त्याने मला धीर देण्याचा खूखूप प्रयत्न केला…
"मगाशी मला दार उघडलंस तेव्हां कोणाशी बोलायला बाहेर गेली होतीस?…"
"अरेरेरे!… तेंव्हा ही माईच होत्या घराबाहेर, तुझ्याच तर मागे जिना चढल्या न त्या?…"
"नाही ग!… मी एकटाच वर आलो होतो तेंव्हा, कोणच नव्हत माझ्या मागे पुढे…"
"अरे पण तू आत आलास आणि त्यांनी लगेच आवाज दिला मला… म्हणजे तुझ्या मागेच जिना चढून आल्या पाहिजेत म त्या तीथे कश्या आल्या?…"
"प्रिती!… मला ही माई ए न! तीच थोडी गडबड वाटते… तू हिच्या पासून थोडी लांबच रहा… एकटी असताना घरी नको घेऊस आणि तसा प्रश्न आलाच तर जरा सावध रहा…"
"हो… आणि अजून एक गोष्ट… माई माझ्याशी बोलताना जिन्याच्या ३/४ पायऱ्याच चढल्या होत्या, मग त्यांना घरभर पाणी पसरलेल कस समजल? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला माई भेटल्या पासून मी माझ आणि आपल्या कोणाचीही नावं त्यांना सांगितलेली नाहीत… तरी त्यांनी तुला आणि मला आज आपल्या नावाने हाक मारली!…"
"मला भिती वाटतीये नाही म्हणणार मी, पण थोड विचित्र नक्की वाटतंय रे…"
"मला भिती वाटतीये नाही म्हणणार मी, पण थोड विचित्र नक्की वाटतंय रे…"
"काही नाही दिवसभर झालेल्या प्रकाराने असं वाटतंय तुला… नको विचार करू जास्त…"
आम्ही हॉटेल मधून घरी आलो… मुलांना झोपवल… आम्ही ही झोपायला आलो, दिवस भराच्या थकव्या मुळे वैभव ही लगेच झोपला पण मला झोप लागत नव्हती… साधारण १.३० एक वाजला असेल आणि परत मला पाण्याची तीच टिपटिप एकायला आली… सुरुवातीला मला भास होतोय असंच वाटल म्हणून मी लक्ष दिल नाही पण थोडावेळ गेला असेल… रात्रीच्या त्या भयाण शांततेला तो आवाज चिरून माझ्या पर्यंत पोहोचतोय अस वाटत होतं… न रहावून मी बेड वरून उठले आणि आवाजाचा माग काढत स्वयंपाकघरात पोहोचले… सिंक चा नळ अपेक्षेप्रमाणे बंद होता पण आवाज आता बाथरूम मधून येत होता… बाथरूमची लाईट लावली, हळूच दार उघडलं आवाज येत होता पण नळातून पाण्याचा एक टिपूस ही पडत नव्हता पण आता आवाज माझ्या मागून बेडरूम कडे गेल्याचा भास झाला… का हा आवाज छळतोय मला हे शोधण्यासाठी मी आमच्या बेडरूम मध्ये गेले… बाल्कनीच्या दारा पलिकडे तो आवाज येत होता… बाल्कनीच दार उघडल तस थंड हवेची एक झुळूक माझ्या अंगावर आली…
बाल्कनीत जशी गेले तसा तो आवाज अजून पुढे जातोय अस वाटलं… मी जशी पुढे जात होते तसा आवाज आणखीन पुढे जात होता… मी रेलिंग जवळ पोहोचले आणि आवाज त्या पुढे पोहोचला होता… आणि येवढ्यात…
येवढ्यात माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला आणि मला मागे आढले…
"प्रितीतीती!… काय करतीयेस हे…" अस जोरात ओरडतच वैभव ने मला मागे ओढले… मी ही ऐकदम घाबरून त्याच्याकडे भेदरलेल्या नजरेने बघत होते…
"आत चल आधी…"
मला त्या स्थितीत आत आणून बेडवर बसवल वैभव ने, बाल्कनीच दार लाऊन मला पाणी दिल… एवढ्या थंडीत सुद्धा मी घामाने चीप्प भिजलेले…
"काय झालं प्रिती? तू काय करत होतीस माहितीये तुला? काय बघत होतीस रेलिंग वरून वाकून? पडली असतीस मं?…" मी शांत बघत होते त्याच्या चेहऱ्याकडे…
"अगगगं! बोलशील का काही?…"
"वैभव आपण मगाशी झोपलो न तर तू झोपलास पण मला नव्हती झोप येत, आणि मला पाण्याची टिपटिप ऐकायला आली… पहिले वाटलं भास असेल पण तो आवाज खरच येत होता म तो शोधायला…"
"म्हणून रेलिंग वर वाकून आवाज शोधत होतीस?…" मला मधेच तोडत वैभव म्हणाला…
" नाही रे!… तो आवाज मला आधी स्वयंपाकघरात आला मग बाथरूममध्ये आणि मग तो आवाज आपल्या बेडरूम मध्ये गेला… बेडरूम मधून बाल्कनीत आणि तिथून बाहेर…"
"काय बडबडतीयेस तू? कसली पाण्याची टिपटिप? कसला आवाज? बेडरूम मध्ये कोणता नळ आहे किंवा बाल्कनीत तरी आहे का नळ?…"
"वैभव अरे खरच मला आवाज…"
"प्रितीतीती! तू आता काहीही बोलू नकोस आणि शांत पणे झोप… मी आहे ना तुझ्या जवळ… चल बर झोप आता…"
आपण भयानक स्वप्न बघून झोपेतून जागं व्हाव पण नवऱ्याच्या आश्वासक मिठीत स्वतःला गुरफटलेल असाव त्या सारख सुख ते काय… तसंच काहीस वैभव ने त्याच्या मिठीत घेतल… बराचवेळ थोपटत होता मला आणि कधी झोप लागली ते कळलच नाही…
सकाळी उठले, मुलांना तयार करून टिफिन भरले… मुलांना शाळेच्या बसस्टॉपवर सोडून आले… वैभव ही उठला होता पण त्याचे डोळे सांगत होते की रात्रभर माझ्या मुळे त्याच्या झोपेच खोबर झालय… तो ऑफिससाठी तयार झाला मलाही तयारी कर म्हणाला, मला कोथरुड ड्रॉप करून ऑफिस जाणार होता तो… दुपारी बिल्डर कडून प्लंबर चा फोन आला तेव्हां मी परत घरी यायला निघाले… पार्किंग मधून जिना चढणारच होते की लॉन मधे बाकावर माई बसलेल्या दिसल्या… हार बनवत होत्या कदाचित… माईनी बरी आहेस नं असा हात दाखवला आणि हसल्या पण मी काहीही एक्सप्रेशन न देता वर निघून आले… प्लंबर यायला थोडा वेळ होता म्हणून हॉल मध्ये सोफ्यावर बसले… डोक्यात माईं चा विचार घोळत होता, त्यांनी मला लांबून का असेना माझी चौकशी करत होत्या आणि मी एटिट्यूड दाखवून निघून आले… मी माईंच्या विचारात होते आणि बेल वाजली… दारात प्लंबर आलेला… म्हातारासा होता, त्यांनी सगळी कनेक्शन चेक केली… कुठेच लिक मिळाल नाही, दोनदा चेक करायला लावल त्यांना… ते काका ही वैतागले पण लिकेज कुठेच नाही…
प्लंबर काकांना सरबत दिलं, येवढ्या उन्हात आलेले बिचारे… ते निघाले, त्यांना दारा पर्यंत सोडल आणि दार लाऊन मागे वळले तर…
अख्ख्या घरात परत पाणी…
क्रमशः………
#फ्लॅट… भाग ०५
अख्ख्या घरात परत पाणी…
मला हसावं की रडाव तेच कळत नव्हत… तशीच धावत खाली उतरले त्या प्लंबर काकांना बोलवायला पण मी पोहोचे पर्यंत ते गेले होते… तशीच वर आले कारण दार उघडच होत… घरात आत जायला भिती वाटत होती… कसतरी धाडस करून आत गेले तर घरात दुर्गंधी सुटली होती, काही तरी कुसल्या सारखा घाणेरडा वास येत होता… कसबस त्या दुर्गंधी मधे आत जाऊन फक्त माझी पर्स आणि घराची चावी घेऊन बाहेर पडतच होते की दारात माई उभ्या होत्या आणि दारातूनच आत बघत होत्या… मला थोडं विचित्रच वाटल… या इथे कशा? कधी आल्या? कशा आल्या? हे आणि असे बरेच प्रश्न भेडसावत होते…
”प्रितीतीती…" तीच प्रेमळ हाक…
"तुम्ही ईथे काय करताय माई?…"
"अग तुला भेटायला…" त्यांना मध्येच तोडून म्हणाले
"माईईई! मी न आत्ता खूप… तुम्ही प्लिज जाल का आत्ता..."
"ठिक आहे बाळा… येते मी… तू मात्र परत आत जाऊ नकोस इतक्यात… मुलांना जप आलीच असतील ती खाली… परत कोथरूड लाच गेलेल बरं तू आजतरी…" अस म्हणून माई जिना उतरल्या…
"हममम…" इतकाच रिप्लाय देऊन मी दार लावत होते तर माई वळून बघत होत्या… चेहऱ्यावर काळजी होती त्यांच्या… मी कुलूप लाऊन घर लॉक केलं आणि खाली आले तर मुलं पार्किंग मध्येच भेटली…
"चला आपण आज्जी कडे चाल्लोय…"
"येयेये!… पोरांना ही आनंद झाला.…
"आई!… बाबा पण येणार तीथे?…"
हो रे!…"
"आई! तू आम्हाला आणायला ईतक्या उशीरा का आलीस?…" (तन्मय)
"काययय?… मी आले?… अरे मी तर…" मला मधेच तोडत म्हणाला…
"आम्ही गेट पर्यंत आलो आणि तू आलीस… आणि आपण कोथरुड ला जाणार होतो तर म पर्स घेऊनच यायचस नं खाली…" (तन्मय)
"आम्हाला स्कूलबेग पण वर ठेवायला नाही दिलीस फक्त म्हणालीस इथेच थांबा मी पर्स घेऊन आलेच… का गं?" (ऋद्र)
हे तन्मय आणि ऋद्र काय बोलत होते? मी आज त्यांना घ्यायला गेलेच कधी? मी खाली आले तर हे दोघ खालीच थांबलेले… काय चाल्लय हे सगळं? मला काहीच सुधरत नव्हत…
"आई!… काय झाल गं, बोल नं!…"
"अरे!… ते प्लंबर काका आलेले नं!… म्हणून उशीर झाला आणि माझी पिल्लं वाट बघत असतील न माझी म उतरले तशीच…"
"आणि आज्जी कडे जाऊन नुसती मस्ती नाही करायची स्कूल चा होमवर्क पण करायचाय…"
"आणि आज्जी कडे जाऊन नुसती मस्ती नाही करायची स्कूल चा होमवर्क पण करायचाय…"
आम्ही रिक्षा ने कोथरूड ला आलो… जेवायची इच्छा नव्हती पण आईंनी आग्रह केला तर थोडं जेवले… पोरांचा होमवर्क झाला तशी ती खेळायला गेली आणि मी वैभवला फोन करून कोथरूड च्या स्वामींच्या मठात यायला सांगितले… मी जेव्हां जेव्हां अशी डिस्टर्ब असते तेव्हां तीथे जायची… छोटासाच मठ ए, वरच्या मजल्यावर ध्यान मंदिर आहे तीथे बसल कि शांत वाटत… आजही मला शांतीची अत्यंत आवश्यकता होती… ध्यानगृहातल्या स्वामींच्या तसबीरी समोर बसून मला त्यांना गेल्या काही दिवसात काय काय घडल ते सगळ सांगायचं होत… मी त्यांना सांगत आले होते तसेच आजही बोलायचं होत…
मी स्वामी समर्थांच्या मठात गेले… दर्शन घेऊन वैभव ला मेसेज केला की मी ध्यानगृहात आहे तू वरच ये म्हणून… ध्यानगृहात गेले तर तीथे एक मुलगी ध्यानाला बसली होती फक्त… मी ही बसले तीथेच कोपऱ्यात आणि स्वामींच्या तसबिरी कडे बघून मला हुंदका अनावर झाला… स्वामींना घडलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या आणि डोळे बंद करून शांत बसून राहिले… डोळ्यातून वहाणाऱ्या अश्रूंना वाट मात्र मिळत होती… थोडावेळ गेला असेल की माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेऊन मला हलवत होत…
"ताई!… काय झालं?… तुम्ही का रडताय?…"
"अं!…" मला वाटलं वैभव असेल म्हणून डोळे उघडले तर समोर ती मगाशी ध्यानाला बसलेली मुलगी होती…
"काय झालं तुम्हाला ताई?…" अस म्हणत बाजूलाच बसली… दोन मिनिटं मला माईंचा भास झाला… आवाजात तोच गोडवा होता…
"तुम्ही स्वामींना सांगितल असणार सगळं पण तुम्हाला वाटलं तर मला पण सांगितल तर चालेल… मी नाही सांगणार कोणालाच…"
"अगं नाही गं!… तस काही सिरीयस नाही…"
अच्छा!… कोण कुठली मुलगी म्हणून नाही न सांगू शकणार? मी दुर्गा!… आधी इथेच रहायचो आम्ही आता प्राधिकरण मध्ये माझ्या आज्जी आजोबांच घर होत तिथेच गेलोत रहायला… मी लास्ट ईयर ला आहे आर्ट्स च्या… घरी मी आणि आई बाबा असतो…" तीने तीची सगळी माहिती सांगून टाकली
"अरे वा!… मी पण प्राधिकरण मध्येच आहे रहायला…"
काय सागताय ताई!… खरच?… कुठे प्राधिकरणमधे?…"
"ती सन गार्डन स्किम झालीये न तीथे… आणि तू?…"
"तुमच्या सोसायटीच्या मागे जो वाडा वजा बंगला आहे नं तीथेच… थोडा आत आहे म्हणून लक्षात आला नसेल तुमच्या…"
"हो गं!… असेल कदाचित…"
"माझी माहिती पुरे झाली असेल तर आता सांगा का रडत होतात?… माझी आज्जी म्हणायची वाटलं की दुःख कमी होत आणि सुख वाटलं की वाढत… माझी जबरदस्ती नाही पण वाटल मला तुमच दुःख ऐकावस…"
"अगगगं!…" का माहिती नाही पण मला तीला सगळं सांगावस वाटलं आणि मी तीला सांगितल सुध्दा… तीच ते प्रेमळ हसण, गोड बोलण, लाघवी स्वभाव सगळच इतक छान होत नं की माझ्या जागी अजून कोणी ही असत नं तरी त्याने दुर्गा ला सगळं सांगितल असत… एक संमोहन असल्या सारख मी तीच्या स्वभावा कडे ओढले गेले म्हणा किंवा माझ्या त्या अवस्थेत मला कोणी तरी ऐकून घेणार हवं होतं म्हणून असेल कदाचित, मी बोलून हलकी झाले… पण या सगळ्यात मी माईंचा उल्लेख जाणूनबुजून टाळला, का ते नाही माहिती पण घडलेल्या प्रत्येक प्रसंगात त्याच जवळपास असण खटकत होत… म्हणूनही असेल कदाचित…
"हममम!… ए ताई!… सॉरी हं मला न जास्तवेळ आहो जाओ नाही करता येत…"
"It's Ok गं!… चलता है…"
"तुझ नाव काय ते नाही सांगितलस?…"
"अगं हो की!… मी प्रिती… प्रिती वैभव बापट… प्राधिकरण ला आम्ही चौघे असतो… मी नवरा आणि दोन मुलं… तन्मय आणि ऋद्र…"
"तू आता ये एकदा घरी… सगळ्यांशी ओळख होईल…"
"तू आता ये एकदा घरी… सगळ्यांशी ओळख होईल…"
"हो न नक्की… तू जे सांगितलस ते ऐकून यावच लागणार दिसतय घरी तुझ्या…"
"म्हणजे?… मला नाही समजल?…"
"अगं!… म्हणजे तू सांगितलस ते इनट्रेसस्टिंग आहे ग म्हणून… बाकी काही नाही…"
"हममम!…"
चल मी निघते आता… आई बाबा वाट बघत असतील माझी… तू ही निघतीयेस का?…"
"नाही गं वैभवनां इथेच बोलवलय म इथून कोथरूड ला जाऊन जेऊन मग आम्ही निघू… हा बघ आलाच वैभव…" इतक्यात वैभव वर आला…
"वैभव!… ही दुर्गा… प्राधिकरण ला आपल्या सोसायटी च्या मागेच बंगला आहे यांचा… आणि दुर्गा हे वैभव…"
दोघांनी एकमेकांना हाय हेलो केल आणि दुर्गा निघून गेली… मला परत कोथरूड मध्ये बघून वैभव कडे विचारायला बरेच प्रश्न असण साहजिकच होतं… त्या ध्यानगृहातच बसून मी त्याला दुपारी घडलेला सगळा प्रकार सांगितला ज्याने वैभव ही काळजीत पडलेला दिसला… काहितरी विचित्र होत होतं इतक नक्की पण काय?
मठातून घरी आलो, जेऊन मुलांना घेऊन आमच्या घरी परत आलो… मुलं येतांना गाडीतच झोपली… गाडीचा ए.सी. चालू ठेऊन मुलांना गाडीतच ठेवल… वरची साफ सफाई करून मग मुलांना वर आणायच अस म्हणून मी आणि वैभव घरा पर्यंत पोचलो… दोघांच्याही छातीत धडधडत होत… हिम्मत करून दरवाजा उघडला आणि आत बघतो तर…
आत सगळं स्वच्छ, अख्ख्या घरात फरशीवर पाण्याचा नामोनिशाण नाही की कसलीच दुर्गंधी नाही… काही घडलच नाही अश्या आविर्भावात घर टापटीप होत… वैभवने एक जळजळीत कटाक्ष माझ्यावर टाकला, कारण मी बोल्ले त्यातल काहीच त्याला बघायला मिळाल नाही…
"तुझे न सगळे भ्रम आहेत हे प्रिती…" अस म्हणून तो मुलांना आणायला गेला सुद्धा…
मुलांना त्यांच्या रूम मध्ये झोपवून आम्ही आमच्या बेडरूम मध्ये आलो खरं… पण वैभव चा चेहरा सांगत होता की माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवण त्याला पटत नव्हत…
"वैभव अरे खरच…"
"प्रिती प्लिज झोपूया? काल ही झोप नाही झालीये आणि आजची दगदग… प्लिज झोप तू ही आता आणि मला ही झोपू दे… कोणतेही विचार डोक्यात नको आणूस काहीही वाटल तर मला उठव प्लिज… मी आहे ना ग तुझ्या बरोबर? म नको घाबरू… चल झोप बर आता शांत…"
वैभवच्या धिर देण्याने मी ही थोडी रिलॅक्स झाले आणि आम्ही झोपलो… वैभव ची बुद्धी मानायला तयार नसली तरी त्याच मला कुशीत घेण मला सांगत होत की त्याला माझी काळजी वाटत होती… आणि आम्ही झोपलो…
रात्री मला घुसमटल्या सारख वाटायला लागलं म्हणून जाग आली… झोपेतून थोडी जागी झाले आणि लक्षात आल घुसमटण्याच कारण… हा तोच वास होता, दुपारी येत होता तसा… तोच घाणेरडा वास… खडबडून जाग आली, वैभव ला उठवायला गेले तर वैभव उठून बसलेला बेड वर…
"वैभव…" मी आवाज दिला त्याला
"प्रिती… इतका घाण वास कसला येतोय गं?…"
"वैभव अरे दुपारी असाच वास येत होता मी बोल्लेले न… सेम वास ए हा… पण आत्ता का येतोय हा वास?…"
वैभव ने बेड जवळच बटण लाऊन लाइट ऑन केला आणि आमच्या अख्ख्या बेडरूम मध्ये हिरवळी सारख पाणी भरलेल आणि त्यातून येणारी ती दुर्गंधी…
आता मात्र वैभव ला ही काहीतरी विचित्र घडतय याची जाणीव झाली…
ते पसरलेल पाणी आणि तो वास… आम्ही दोघेही आता पुरते टरकलो होतो…
क्रमशः………
#फ्लॅट… भाग ०६
ते पसरलेल पाणी आणि तो वास… आम्ही दोघेही आता पुरते टरकलो होतो…
"वैभव काय चालू आहे रे हे सगळं नक्की?…"
"तू थांब इथेच, मी आलो जरा बघून…"
"नाही!… मी ही येते… पिल्लं एकटीच आहेत रे आपली तिथे…"
"मला ही कळतय ते!… त्यांनाच घेऊन येतो आपल्या जवळच असुदेत…" अस म्हणून वैभव मुलांना आणायला गेला… दोघना आमच्या बेडरूम मध्ये आणून झोपवल तरी दोघे गाढ झोपलेले, त्या दुर्गंधी चा अज्जिबात त्रास होत नव्हता अस वाटत होतं दोघांना…
"अख्ख्या घरात तसच पाणी आणि दुर्गंधी आहे प्रिती…"
"असच पाणी आणि दुर्गंधी दुपारी पण होती…"
"प्लिज यार प्रिती! आता बंद करशील का तुझ पाणी पुराण… ड्रेनेज लाईन ब्लॉक असेल म्हणून आल असेल पाणी… तुम्ही दुपारी चेक केली ती पाण्याची लाईन होती… ड्रेनेज लाईन लिक किंवा ब्लॉक असेल तर?…"
"तू माझ्या सांगण्यावर विश्वास का नाही ठेवत आहेस पण?…"
"कारण तुझ्या मनात हे अघटित वगैरे घडतय याची जी पालवी फुटतीये न तीला मलातरी खतपाणी घालाव अस वाटत नाही…"
"पण आत्ता तू ही अनुभवलस ना रे की काहीतरी वेगळ घडतय ते?… म का जाणून बुजन नाकारण्याचा प्रयत्न करतोयस?…"
"आपण या वादात अडकण्यापेक्षा हे सगळ आवरून घेऊया का आधी? मला हा वास आता असह्य होतोय आणि तुलाही होतच असेल नाही क?… चल पटकन आवरू…"
वाद वाढवण्यात काहीच अर्थ नव्हता… आम्ही अख्ख घर त्या रात्रीत पुसून घेतल… घर पुसताना माझ्या लक्षात आलेली गोष्ट अशी की आम्ही जी जी खोली एक एक करत पुसत आलो त्या खोलीतली दुर्गंधी ही लगेच गायब… आणि अजुन एक कोणत्याही ड्रेनेज लाईन मधून पाणी वर आलय याची खूण नव्हती… वैभव ही डिस्टर्ब होता हे जाणवत होतं पण तोच डळमळला तर बाकी घराला आधार द्यायच कोण?… सगळं साफ करून पहाटे ०५.०० ला आम्ही बाहेर हॉल मध्ये बसलो… मस्त गरम गरम कॉफी केली… कॉफी घेत बसलेलो तेव्हां वैभव ला म्हणाले…
"वैभव!… तुला खरंच अस वाटतं कारे की मी खोट बोलतीये किंवा पराचा कावळा करतीये?…"
"हे बघ प्रिती… अमानवी गोष्टी असणं आणि त्यावर विश्वास ठेवणं या वर माझा विश्वास नाही… मी २१व्या शतकात जगणारा एक सुशिक्षित आहे… हे जे काही घडतय त्या मागची साईंटिफीक कारणं आणि योग्य उत्तरं मिळत नाहीत तो पर्यंत मी याला मानणार नाही…"
"मं मला सांग? बाल्कनीतल्या त्या अंड्याच काय झाल?… माईंना आपल्या नावा सकट सगळ्या गोष्टी कळणं… मुलांना मी घ्यायला न जाता ही माझ मुलांना दिसणं… मला पाण्याचा ऐकू आलेला तो आवाज, मी रेलिंग वर वाकणं आणि तुझ अचानक येऊन मला वाचवणं… काय म्हणशील तू या सगळ्याला?…"
"प्रिती… यातल्या बऱ्याचशा गोष्टी फक्त आणि फक्त तू अनुभवल्या आहेत… माई त्या काळ्या की गोऱ्या ते ही तुलाच माहिती… याचा अर्थ हा नाही की तू मनघडण कहाणी वगैरे किंवा…"
"खोटं बोलतीये असचं ना?… सोड?… मी पडते थोडावेळ… तू येतोयस का?…"
"नाही तू जा… मी झोपतो इथेच सोफ्यावर…"
मी बेडरूम मध्ये येऊन पिल्लांना कुशीत घेऊन झोपले… रात्रीच्या जागरणाने झोप मात्र लगेच आली ती ही सकाळी ०५.३० ला…
साडेआठ ला वैभव आमच्या करता चहा मुलांना दूध आणि ब्रेड बटर जाम असा नाश्ता चक्क स्वतः बनवून घेऊन आला…
"चला नाश्ता बोला… गरम गरम चाय लेलो, छोटे बच्चे दूध लेलो और सब मिलके ब्रेड बटर जाम लेलो…"
"बाबा ने सुट्टी डाली है हापिसात 2 दिवस की, तो लवकर तयार हो जाओ…"
"बाबा ने सुट्टी डाली है हापिसात 2 दिवस की, तो लवकर तयार हो जाओ…"
वैभव हे सगळं माझ्या साठी करत होता… मी सगळ्या विचारातून बाहेर यावं म्हणून… आम्ही तयार झालो तासाभरात आणि गाडीत येऊन बसलो… बिल्डर शी काहीतरी बोलण झालेल असणार कारण जाताना कोथरुड ला सासरी चावी ठेवली त्याने आणि बिल्डर च्या माणसा बरोबर बाबांना जाऊन काम करून घ्यायला सांगितल त्याने… आम्ही महाबळेश्वरला जातोय अस रस्त्यात सांगितल त्याने… साहेबांनी कधी येवढा सगळा प्लॅन केला देव जाणे…
गुरुवार ते रविवार मस्त चार दिवस आम्ही महाबळेश्वरला एंजॉय करणार म्हणून मुलं पण खुश झालेली… आम्ही रिसॉर्ट वर पोचलो दोन दिवस नुसती धमाल केली आम्ही… आता उद्या निघायच म्हणून मुलं थोडी नाराज झाली होती… त्यांना आपण पुढच्या शनिवारी परत येऊ अस सांगितल तेव्हां कुठे बिचारी झोपायला तयार झाली… मुलं झोपली तस साहेबांनी एंजॉय करायला बियर ऑर्डर केली… वेटर बियर घेऊन आला आणि त्या बरोबरच एक निरोप घेऊन आला…
"सर तुमच्या साठी लँडलाईन वर फोन होता तुम्हाला अर्जंट घरी फोन करायला सांगितला आहे… तुमचा फोन लागला नाही म्हणून काऊंटर वर निरोप दिलाय कोणी तरी…"
आमच रिसॉर्ट जिथे होत तिथे रेंज प्रॉब्लेम असल्याने सासू सासऱ्यांनी निरोप ठेवला असेल म्हणून मी गेले फोन करायला… वैभव ला त्याच एंजॉय करायला सांगून मी खाली फोन करायला आले…
"हां! हेलौ आई मी बोलतीये प्रिती… फोन करायला सांगितला होतात… निरोप आत्ता मिळाला…"
"प्रिती आहात तसे निघून या घरी… बाबांची तब्येत बरी नाही… लगेच निघा ना गं…" अस म्हणून सासूबाई रडायला लागल्या फोन वर…
"हो आई लगेच निघतोय आम्ही…" म्हणून मी फोन ठेवला…
धावतच रूमवर आले आणि बाबांच्या तब्येतीच वैभव ला सांगितल… त्याने ही प्रोग्रॅम उरकता घेतला… सगळ पटापट आवरून रात्रीच चेकआऊट केल आणि निघालो… पहाटे कोथरूड ला पोहोचलो तर आईंची रडून वाईट अवस्था होती… आईंनी सांगितल…
"दुपारी तुमच्या फ्लॅटवर गेले प्लंबर बरोबर आणि संध्याकाळी प्लंबर रिक्षातून घेऊन आला तेव्हां पासून वैभव प्रिती ला बोलव येवढच बोलतायत… डॉक्टर आलेले रात्री त्यांनी ईंजक्शण दिलं तेव्हां झोपलेत… सकाळी उठले की बोला… थोडावेळ पडा जा…" आई डोळे पुसत बाबांच्या खोलीत गेल्या…
वैभव कडे बघितलं तर तो ही विचारात होता… नक्की काय झालं फ्लॅट वर? याचा विचार करून झोपच उडाली होती… सकाळी आवरल कारण झोप अशी लागलीच नाही… डॉक्टर येऊन तपासून गेले आणि आम्ही बाबांना भेटायला त्यांच्या खोलीत गेलो… बाबा झोपलेले पण डोळे शुन्यात काहीतरी बघत असल्या सारखे…
"बाबा!…"
एकदम चमकून बाबा वैभवच्या आवाजाने जागे झाल्या सारखे जागे झाले…
"अरे!… आलायत तुम्ही?…"
"हो बाबा… काय झाल?… आई सांगत होती आपल्या तिथल्या घरी तुम्ही जाऊन आलात तेव्हां पासून वेगळे वागताय काय झाल?…"
"काही नाही तुम्ही सगळे परत या इकडे रहायला आज पासून…"
"आहो पण झाल काय असं तीथे?…"
"मला काही माहिती नाही तुम्ही ईकडे या परत सांगितल ना? ऐकत जा जरा…"
"ठिक आहे येतो आम्ही… पण का येऊ ईथे परत ते तरी कळू दे!…"
"काय करणारेस कळून… नाही काही करू शकत तू ठरवलस तरी… ये निघून इथे… परत… कायमचा…"
"अरे ते म्हणतात तर ऐक की जरा…" (आई)
"इतक सोप्पं असत का आई?… मुलांच्या शाळा बदलल्या… माझ ऑफिस… सगळं नाही ए शक्य आता परत बदलण…"
"तू जरा बाहेर जा मला या दोघांशी बोलायचय…" आई बाहेर गेल्या…
"वैभव प्रिती माझ ऐका नका राहूत त्या घरी…"
"आहो पण का?…"
"अरे ती जिवावर उठली ए तुमच्या… ती नाही जगू देणार तुम्हाला सुखाने तीथे… तिची जागा ए ती… ती आणि तीच मुल… दोघे वावरतात त्या जागेत… मी बघीतलय या डोळ्यांनी…"
"काय झालय बाबा नक्की?… सविस्तर सांगा प्लिज…" (मी)
""वैभव म्हणाला तस मी प्लंबर बरोबर त्या फ्लॅट वर गेलो… आम्हाला घरात लीक मिळाल नाही म्हणून बाहेर कुठे प्रॉब्लेम आहे का बघायला आम्ही खाली आलो… पाणी ड्रेन होतय का ते चेक करायला मी पाणी सोडायला वर आलो आणि दारात असताना मला स्वयंपाकघरात लहान बाळ खेळत रांगत असल्याचा आवाज आला… कोण आहे आत? मी आवाज देत आत गेलो तर एक बाई आणि लहान बाळ बसले होते कट्ट्यावर… मी विचारलं…
"कोण आहेस तू आणि आत काय करतीयेस?…"
ती म्हणाली "ऐ बैताड, म्या हितच असतीया… तू कोन मला इचारनारा?…"
"हे माझ्या मुलाच घर आहे… दार उघड दिसल तर आतमध्ये शिरलीस काय?…"
"ती तुझी पोट्टी हायेत काय?… माझ्या इलाख्यात जित्ती न्हाई जगू देत म्या त्यांना… माझ्या पोरासाठीच पानी पुसायच न्हव का त्यांना… त्यातच बुडिवते बघ समद्याना… चंदी शी गाठ हाय आता, चंदी शी…"
येवढ्यात प्लंबर ने आवाज दिला बाहेरून…
"ओओओ साहेब!… पाणी सोडल का नाई?.…"
त्यांला सांगून हीला बाहेर काढावी म्हणून बाहेर आलो
"आहो ती घरात बघा कोण बाई घूसली ए, बाहेर जात नाही ए… या जरा मदतीला…"
अस म्हणून मी आणि प्लंबर आत गेलो स्वयंपाकघरात तर तीथे कोणीच नव्हतं… माझ BP वाढल आणि तीथेच भोवळ आली मला… जाग आली तर या आपल्या घरी होतो…""
क्रमशः………
#फ्लॅट… भाग०७
"अस म्हणून मी आणि प्लंबर आत गेलो स्वयंपाकघरात तर तीथे कोणीच नव्हतं… माझ BP वाढल आणि तीथेच भोवळ आली मला… जाग आली तर या आपल्या घरी होतो…"
हे ऐकून मी वैभव कडे बघितले तर तो ही विचारात गढलेला दिसला…
"बाबा तुम्ही आराम करा… बोलू आपण या वर… चल वैभव बाबांना आराम करू दे…"
आम्ही बाहेर आलो… आई वाटच बघत होत्या…
"काय बोल्ले रे बाबा?… मला भिती वाटतीये रे खूप… तुम्ही ऐकत का नाही त्यांच?…"
"आई!… आपण बोलू यावर… आम्ही आत्ता जरा बाहेर जाऊन येतो… मग बोलू…" (वैभव)
मला आपण बाहेर जायचय आवर पटकन सांगून फोन करायला वैभव बाहेर गेला… पटकन आवरून आम्ही बाहेर पडलो…
"कुठे चाल्लोय आपण वैभव?…"
"बिल्डर कडे…"
"का?…"
"मला त्या प्लंबर ला भेटायचय…"
"कशासाठी?… आता बाबांच्या बोलण्यावर विश्वास नाही अस म्हणू नकोस फक्त…"
"आधी भेटू तर त्याला मग ठरऊ…"
आम्ही बिल्डर ऑफिस ला पोचलो… बिल्डर ने प्लंबर ला बोलवलच होतं… तो त्या दिवशी चा प्लंबरच होता…
"साहेब तुमचे बाबा कसे आहेत आता?…"
"आता बरे आहेत… काका तुम्ही आमच्या बाबां बरोबर घरी गेलेलात तीथे काय झालं सांगाल जरा?…"
"सांगतो की!… काय तुमच्या वडलांनी जीव काढला राव काल… आम्ही दुपारच्याला पोचलो बघा तिकडं… आणि घरातली ड्रेनेज चे सगळे पॉइण्ट बघितले?… मग खाली लाईन ला प्रॉब्लेम आहे का ते बघायला गेलो… खाली काही प्रॉब्लेम तर नाही दिसला पण तरी म्हंटल एकदा पाणी सोडून बघा म्हणून साहेबांना वर पाणी सोडायला जा म्हणलो… साहेब वर गेले तर पाणी सोडेनात म मी ही वर गेलो… दारातूनच आवाज दिला त्यांनला तर ते बेडरूम मधून काही तरी बोलत भाएर आले आणि मला म्हणले तीथ आत कोणीतरी घुसलय आपण भाएर काढू तीला… अस म्हनत आम्ही ते किचण ला गेलो आणि त्यास्नी चक्कर आली… म खाली गेलो वाचमन ला आनल त्यांना भाएर बसीवल जरा… पानी मारल थोड तोंडावर तशे आले न सुद्धित… पानी पाजल त्यांना आनी रिक्षात घालून सोडल बघा तुमच्या घरी…"
"ते कोणाशी बोलत होते? कोणाला बाहेर काढायला तुम्हाला आत चल म्हणाले काही म्हणाले?…"
"नाई बा… बाई घुसली म्हणले पण तीत कोन बी नवत साहेब… आनी असली तर मी वाचमन ला खाली जाऊन आवाज दिला न तवा पळाली असल…"
"तू तुझे कामाले जा हें!… मी काय मनते बापट साएब तुमी ए ना खालीपिली टेंसन घेते अ्ं!… ते काय असते ने, आजू बाजूला ते समदा कनट्रकशन चालू असते न ते तीतलीच कोन बाय असल… पानी पिवानू माटे गेली असते तुझे घरा मंदी… म्हातारा मानूस ने बघून तीनं बी आवाज चढवला असेल ने डर गयो थारो पप्पा… बिपीविपी वाढला असेल ने आली चक्कर… तुमी ए ने काय बि टेंसन वाटला नां मला सिद्दा फोन कर काय?… काय समजला वैनी?…"
"ठिक आहे साहेब… येतो आम्ही…"
आम्ही तिथून निघालो… रस्त्यात मी वैभव ला विचारल…
"आता तुझ काय मत आहे वैभव?… आता तर तू अजून डिटेल ऐकलयस…"
"तू ही जे ऐकलस तेच… बाबांना झाला तो भ्रम… काहीही झालं तरी एक गोष्ट नक्की की त्या आपल्या घरात काहीच प्रॉब्लेम नाहीये… तुम्हा सगळ्यांना वाटतय तसं काहीच नाहीये…"
"तू हट्टालाच पेटलायस तर मी तरी काय बोलू वैभव… ठिक ए काहीच प्रॉब्लेम नाहीये त्या घरात… आणि आई बाबांना काय सांगणार आहेस?…"
"ते मी बघतो… मी बोलतो दोघांशी… नको काळजी करूस…"
वैभव सगळं कळत असून न कळल्याचा आव का आणत होता हे कळत नव्हतं… त्या वरून त्याच्याशी वाद घालण्यात काहीच अर्थ ही नव्हता… कारण इतके वर्षात मी त्याला जे ओळखले होते त्या नुसार त्याच्या मनाला एखादी गोष्ट पटतं नसली न की तो कोणाचच ऐकायचा नाही आणि पटवून द्यायला माझ्या कडे काहीच नव्हतं…
आम्ही घरी आलो… जेऊन निघणार असं त्याने आईंना सांगितल आणि बाबांच्या खोलीत गेला बोलायला… अर्ध्या पाऊण तासाच्या चर्चे नंतर बाहेर आला ते बाबांना पटवून कारण जेवण करून आम्ही आमच्या घरी जायला निघालो… आई बाबा ही येणार होते थोडे दिवस आमच्या बरोबर… मुलं पण खूश झाली आज्जी आजोबा रहायला येणार म्हणून…
आम्ही घरी आलो खरे पण मुलांना सोडल तर प्रत्येकाच्या मनात एकप्रकारची भीती आणि दडपण होतं… हो!… हो!… वैभव ही होताच की भीती आणि दडपणाखाली… वरवर जरी दाखवल नाही त्याने तरी त्याच्या प्रत्येक कृतीतून लक्षात येत होत, त्याचं ते तासा तासाला फोन करण, सगळ्यांची चौकशी करण, कसाकाय फोन केलास विचारल्या वर "असच, फ्री होतो म्हणून केला" उत्तर देण, लवकर घरी येणं… कळत होतं सगळं… आम्ही सगळे घरी वावरत होतो तर एकमेकांच्या साथीला थांबायचो, कोणत्याही परीस्थितीत कोणालाही एकट सोडत नव्हतो… आई बाबा येऊन आठवडा होत आला पण ना घरात पाणी आलं ना दुर्गंधी ना पाण्याची टिपटिप काहिच नाही पण एक गोष्ट होती की सतत कोणीतरी लक्ष ठेवून आहे असं वाटायचं… दोन तीन वेळा माई दिसल्या त्या दिवसात, बाल्कनी समोरच्या बाकावर बसलेल्या असायच्या… पण सतत आमच्या घराकडे बघत बसलेल्या असायच्या…
ते म्हणतात नं!… एखाद्या गोष्टीपासून आपल्याला काही त्रास होत नाही अस लक्षात आलं की आपण निर्धास्त होऊन जातो… आपल्याला झालेला त्रास वाटलेली भिती सगळं विसरतो… भिड चेपली म्हणतात न तसच काही तरी… आई बाबा येऊन आठवडा झाला तरी अघटित असे काहीच घडले नाही… आम्हीही थोडे निश्चिंतच झालेलो… आई बाबा ही आता निघायच म्हणत होते… मला ते जाणार तर थोडं वेगळ वाटत होत पण पर्याय नव्हता…
आई बाबा परत कोथरूड ला गेले… आमच ही रेग्युलर रूटीन सुरू झाल… मध्ये एखाद दिवस गेला असेल आणि दुपारी बेल वाजली… मुलं यायची होती त्यांना आणायला जायच म्हणूनच तयार झालेले… दार उघडलं तर दारात माई… माझ्या काळजात कुठतरी धस्स्स झालं…
"आज तरी येऊ का आत?…"
मी तोंडावर उसन अवसान आणत म्हणाले…
"हो! हो!… या की माई… हे काय विचारण झालं का हो?…"
"हममम…"
"या!… बसा माई… मी सरबत करते"
"नको!… माझा उपास ए मंगळवारचा… मी फक्त रात्री खाते… बस जरा इथे बोलायचय तुझ्याशी…
"काय झालं माई?…"
"काय झालंय नक्की? काही सांगशील?… तुझ्या घरी तुझे सासरचे होते म्हणून नाही येता आलं मला…"
"आहो काहीच नाही!… कुठे काय?… सगळं तर ठिक चाल्लय…"
"बाळा!… माझ्या पासून तरी काही लपवूच नकोस… अगं प्रिती, तुझी काळजी वाटते रे बाळा…"
आता मात्र माझा तोल सुटला… मी टाळत होते इतके दिवस बोलायच… पण आता नाही… कुठेतरी जे जे झाल त्यात माईंचाच हात असण्याची जास्त शक्यता वाटत होती मला… अनायसे विषय निघालाच आहे म्हणून मी ही बोलायच ठरवल…
"माई?… तुम्हाला काहीच का हो माहिती नाही?… ज्या ज्या वेळी म्हणून भेट झाली आपली तेव्हां प्रत्येक वेळी तुमच्या बोलण्या वरून वाटल नाही, की तुम्हाला काहीच माहिती नाही ते… म इतक्या का अंजान असल्याचा आव कशासाठी माई?… सांगा ना?… मी खोट बोलत असेन तर?…"
"नाही रे बाळा… खर ए तुझ… पण मी आले ती तुझी आणि सगळ्यांची काळजी म्हणून गं, तुला त्रास द्यायला नाही गं… विश्वास ठेव माझ्यावर…"
"कोणी दिली माई तुम्हाला ही जबाबदारी?… का शिरकाव करायला बघताय माझ्या संसारात?… नको ए आम्हाला तुमची काळजी…"
"अगं पण!…"
"माईईई… त्रास होतोय मला या तुमच्या काळजी चा… प्लीज पाया पडते तुमच्या… बंद करा हे सगळ…"
"बंद करा… काय बोलतीयेस तू प्रिती?…"
"हो योग्य तेच बोलतीये आणि…"
"बाससस!… खुप बोल्लीस आणि मी ही खूप ऐकून घेतल… येते मी… कधी गरज वाटलीच तर आवाज दे मी आहे…"
माई गेल्या तशी त्यांच्या मागेच मी मूलांना आणायला उतरले… मुलांना घेऊन आले… त्यांना वाढल मी ही जेवले… मुलांचा होमवर्क झाला तस मुलांना खाली खेळायला घेऊन गेले… मुल खेळत होती मी तीथेच बाकावर बसले… माहिती नाही पण खूप विचित्र वाटत होते… नजर माईंना शोधत होती… खूखूखप रूड वागले होते मी आज त्यांच्याशी… खूखूखूप जास्तच सूनवल होत मी त्यांना… माईं विरूद्ध काहीही पुरावा नव्हता माझ्या कडे पण तरी मी आरोप करत गेले त्यांच्यावर आणि त्या फक्त ऐकून घेत होत्या… माणसाच शांत रहाण आपण त्याची संमती समजतो… माझ ही तसच झाल का?… रबिश!… माणसाला आपल्या चूकांना मान्य करायला आवडत नाही म्हणून तो अशा पळवाटा शोधतो… मी चुकले होते हेच सत्य…
"प्रितीतीती…"
तीच प्रेमळ हाक… माईंची… मी चमकून मागे बघितलं तर… दुर्गा…
"काय झालं ताई… सॉरी सॉरी मी मजा करत होते अगं… तू तुझ्या तंद्रीत होतीस… म्हणून म्हंटल थोडी गंमत करावी… सॉरी नं ताई…"
"हं… मला वाटलं…"
"अगं काय झालं?… तू बरी आहेस ना?…"
"अं… हो अगं… ये ना बस… कशी आहेस?… आज इथे कशी काय?…"
"अगं बरी आहेस नं?… तुच पर्वा बोलवलस न मला घरी म्हणून आले…"
"अगं ते माहिती ए मला… चल म घरीच जाऊ…"
"नको बस… मी पर्वा येईन संध्याकाळी… म निवांत बोलू… तशीही मला थोडी तयारी करावी लागेल तीथे यायच तर…"
"म्हणजे?… कसली तयारी?…"
"म्हणजे असं की मी बाहेर चाल्लेले आणि तू बसलेली दिसलीस, मं आले भेटायला… पिल्लांना पण काही खाऊ नाही आणला… म मी गुरुवारी येईन संध्याकाळी तेव्हां वेळ ही काढून येईन आणि तुझ्या पिल्लांना खाऊ पण आणेन… मी पळते आई ने काम दिली आहेत खूप… बाय…"
"ओके बाय… पण गुरुवारी नक्की…"
"हो हो!… पक्का…"
मुलांच ही खेळून झालेल म आम्ही ही वर आलो… संध्याकाळी वैभव ही आला… दंगा मस्ती जेवणं झाली… मुलांना झोपवल… आम्ही ही आलो झोपायला… वैभव ऑफिसच काही तरी काम करत बसलेला…
"कसा गेला दिवस?…"
"छान मस्त… तुझा?…"
"माझा काय ऑफिसमध्ये काम करण्यात गेला…"
"आज दुपारी न माई आलेल्या घरी…"
"काय?… कशासाठी?… काय म्हणाल्या?… बरेच दिवसांनी कशाकाय वाट चुकल्या आज?…"
"माझ्याशी बोलायचं होत त्यांना…"
"बर!… म काय बोल्ल्या?…"
"म्हणे की… 'काय झालंय नक्की?… काही सांगशील?'…"
"मं?…"
मी माई आणि माझ्यात झालेल सगळं बोलण सांगितल वैभव ला…
"काय केलस हे तू प्रिती?… त्यांची काय चुक होती?… आणि आई बाबा येऊन राहून गेले त्यालाही आज दोन दिवस झाले… काही घडलय का?… मं का ग बोल्लीस त्यांना?…"
"मला ही खर ते खूप गिल्टी वाटतय रे… मी शोधल ही त्यांना खाली पण नाही दिसल्या… मी उगीच त्या म्हाताऱ्या जिवाला दुखावल रे… खरच सॉरी…"
"आता सॉरी म्हणून परत घेता येणारे बोल्लीस ते?… आणि मला कशाला सॉरी… माईंनाच बोल… भेटल्या की…"
"हममम!… आणि आज ती दुर्गा ही भेटलेली… म्हणजे आलेली…"
"कोण गं?…"
"अरे ती त्या दिवशी मठात नाही का भेटलेली?…"
"हां ती?… काय म्हणाली?…"
"काही नाही भेटून गेली फक्त… गुरुवारी येणार ए म्हणाली…"
"हममम… चल झोपूया आता?…"
आम्ही ही झोपलो… रात्री मला हलवून कोणीतरी जागं करत होतं… खडबडून जागी झाले तर ऋद्र होता समोर… रडत होता… आता ह्याला काय झालं म्हणून उठतच होते की वैभव ही जागा झाला… त्याने टेबललँप लावला…
"काय झालं पिल्लू?… का रडतोस माऊ?…"
"आई तो बघ ना गं… सारखा सारखा मी बंद केलेला नळ सारखा सुरू करतोय…"
"तन्मय जागा ए अजून?… काय करता रे दोघं… सकाळी शाळेत जायचय आणि तुम्ही इतक्या रात्री खेळताय…"
"अग नाही गं!… दादू नाही… तो झोपला कधीच…"
"मं?…"
"मला सू लागली म्हणून मी टॉयलेटमध्ये गेलो न तर तो पाण्याचा नळ सोडून पाण्यात खेळत होता… मी बोल्लो त्याला तू काय करतोयस इथे… जा तुझ्या घरी… मी नळ बंद केला आणि बाहेर आलो तर तो परत नळ सोडून खेळत बसला… मी परत नळ बंद केला तर त्याने परत सोडला… मी परत बंद केला तर पाणी चालूच आहे… आई चल ना ग तिकडे… बोल न त्याला…"
हे काय चालू आहे ते समजून घ्यायला मला २ मिनिटं गेली आणि जेव्हां समजल तेव्हां घर पडतय डोक्यावर अस वाटलं… वैभव कडे बघीतलं तर त्याच तोंड उघड ते उघडच होतं… मी त्याला हलवून माणसात आणलं… आम्ही अक्षरशः घाबरलो होतो… शरीराला कंप सुटला होता… बाथरूममध्ये गेलो तर खरच नळ बंद होता आणि पाणी चालू होतं…
वैभव ने मला आणि ऋद्र ला जवळ ओढून घेतल आणि पेसेज मधला लाईट चालू केला… त्याने… आणि आता मात्र आम्ही दोघे चक्कर येऊन पडायचे बाकी होतो…
कारण बाथरूम मधून आमच्या बेडरूम पर्यंत एका बाईच्या आणि लहान बाळाच्या पायांचे हिरवट काळे ठसे उमटले होते… जस कोणी आत्ताच चालत गेलय कारण ठसे ओले होते… आम्ही तसेच आमच्या बेडरूममध्ये जाऊन लाईट लावला तर ते ठसे आमच्या बेडरूम भर फिरून बाल्कनी पर्यंत गेलेले…
"वैभव तू याला धर मी तन्मय ला घेऊन आले…"
मी मुलांच्या बेडरूम मधून तन्मय ला घेऊन आले तर वैभव बाल्कनी कडे बघत उभा होता…
काय झालं रे अस का बघतोयस तिकडे तर म्हणाला
"प्रिती आपल्या बाल्कनीत बघ ती कोपऱ्यात उभी ए मुलाला कडेवर घेऊन…"
क्रमशः………
#फ्लॅट… भाग ०८
"प्रिती आपल्या बाल्कनीत बघ ती कोपऱ्यात उभी ए मुलाला कडेवर घेऊन…"
"काय बोलतोयस वैभव?… कोणी नाहीये बाल्कनीत… मुलं हि ऐकतायत याच तरी भान असूदे…"
"प्रिती मी खरच सांगतोय… ती… ती हसतीये आपल्याकडे बघून…"
वैभव चा भेदरलेला चेहरा आणि बोलताना आवाजात आलेली थरथर बघून मुलं ही रडायला लागली… मला ही कळत नव्हतं की हा असा का बोलत होता?… बाल्कनीत कोणीही दिसत नव्हत… मी बाल्कनीत ला लाईट लावला…
"बघ वैभव कोणीही नाहिये…"
"अगं खरच प्रिती ती तीथेच होती…"
"तू शांत हो आधी आणि जरा बस… मी पाणी आणते…"
"नको!… तू थांब ईथे… ती परत मला… नको प्रिती तू थांब इथेच…"
"ती परत मला काय वैभव?… स्पष्ट बोल…"
"काही नाही… तू थांब…"
"नाही मला काय ते सांग…"
"ती… ती… ती मला… ती मला बोलवत होती… बाल्कनीत…"
"काययय?…"
"हो… आणि ती गेलीये पण ती परत येणारे…"
"म्हणजे?… ती बोल्ली तुझ्याशी?…"
"म्हणजे?… तू ही ऐकलसच की… तू ही होतिसच नं माझ्या बरोबर?…"
"नाही वैभव… मी एकतर बाल्कनीत काहीच बघीतलं नाही आणि ना कोणता आवाज ऐकला…"
"माझ डोकं खूखूखूप दुखतय गं…"
"तू पड इथे मी आहे ईथेच… ऋद्र, तन्मय या तूम्ही ईथे बाबां जवळ झोपा या…"
कसतरी वैभव आणि मुलांना शांत करून त्यांना झोपवल… पण आता पुढे काय?… आधी सासरे आणि आता ऋद्र आणि वैभव… काय चालू होतं हे?… सासऱ्यांना दिसलेली बाई आणि ते मुलं, ऋद्र ने बघीतलेला तो मुलगा, बाथरूममध्ये बंद नळातून येणार पाणी, बाथरूम ते बेडरूम बाल्कनी उमटलेले ते पायांचे ठसे आणि बाल्कनीत फक्त वैभव ला दिसलेली ती बाई… म्हणजे खरच या घरात काही आहे जे सामान्य नाही?… ज्याला फक्त भास म्हणून सोडून नाही चालणार?… माझ तर डोकच चालत नव्हतं… वैभव आणि मुलं तर झोपली… काही दिसलं नसलं तरी मी ही थोड्याफार प्रमाणात अनुभवलं होतच हे सगळं… मोबाईल वर स्वामींच्या नामाचा जप होता रेकॉर्डेड तो लावला… पहाटेचे ०४ वाजले… मोबाईल च्या Google वर पेरानॉर्मल एक्टिवीटी वर बरेच लेख होते त्यातले भितीदायक नसलेले फक्त माहिती मिळतील असलेले काही लेख वाचले… ह्या शक्ती सकाळी ०३ नंतर म्हणजेच ब्रम्ह मुहूर्तावर एक्टिव नसतात… दत्तमहाराजां समोर आणि त्या शक्ती पेक्षा अजून मोठ्या शक्ती समोर या हतबल असतात… असं आणि बरच काही वाचल मी त्यात…
सासू सासऱ्यांना बोलवलेल बर पण आत्ता नाही नंतर फोन करूया म्हणून सहज वैभव च्या अंगावरची चादर व्यवस्थित करायला गेले तर वैभवचं अंग गरम लागल… कपाळावर हात लाऊन बघीतलं तर वैभव तापाने फणफणला होता… ऋद्र मात्र नॉर्मल होता… बाल्कनी चा लाईट चालूच होता तो बंद करायला गेले आणि आता शॉक बसायची पाळी माझी होती… समोरच्या लॉन वरच्या बाकावर माई बसल्या होत्या… या आत्ता ईथे काय करत होत्या?… हे काय चाललय आमच्या बरोबर… मला वाटत होत मी माईंना जरा जास्त बोलले पण आत्ता इतक्या पहाटे त्यांना ईथे बघून जाणवत होतं की या सगळ्यात माईंचा हात नक्कीच आहे…
सकाळी ०९ वाजता सासऱ्यांना फोन करून रात्री घडलेला सगळा प्रकार सांगीतला आणि लगेच निघायला सांगितलं… सगळं आवरून सासू सासरे संध्याकाळी आले… वैभव चा ताप पण थोडा उतरला होता… सासू सासऱ्यांशी बोलत बसले होते आणि आठवल की रात्री च्या गडबडीत एक गोष्ट विसरले ती ही की… रात्री उमटलेली पावल आणि चालू राहीलेला नळ या दोन गोष्टी जशा दिसल्या तशाच गायब ही झालेल्या… आई बाबाही शॉक झाले… रात्रीचे १० वाजले असतील आम्ही जेवण आवरून बसलोच होतो… रात्री मी मुलांच्या बेडरूम मध्ये आणि आई बाबा आमच्या बेडरूममध्ये वैभव जवळ झोपायच ठरलं...
स्वामी नामाचा जप आणि त्यांच्यावरची श्रद्धा ईतकच होतं आत्तातरी माझ्या जवळ… वैभव आणि आमच्या बेडरूम मध्ये स्वामी नामस्मरण लावल आणि झोपलो… रात्री तन्मय ने जागं केल तशी घाबरून ऊठून बसले…
"काय झालं तन्मय?…"
"आई!… बाळाच्या रडण्याचा आवाज बघ ना गं… कित्ती जोराने रडतय ते…"
तन्मय बोलला आणि मलाही जाणवले की कोणाचतरी बाळ रडतय जोरजोरात… अगदी तान्ह बाळ नाही पण लहान मुलगा रडत होता… आवाज अगदीच जवळून येत होता… झोपेत असल्याने मेंदू वरचा झोपेचा अंमल उतरायला २ मिनिटे गेली आणि लक्षात आलं की तो आवाज दुसरीकडून कुठूनही येत नसून आमच्याच घरातून येत होता… फक्त तो आमच्या बेडरूममधून नव्हता तर बाहेरच्या खोलीतून येत होता… तन्मयला बेडवर तसंच बसवून मी आवाजाचा शोध घेण्यासाठी बाहेर आले… तो आवाज अजूनही येत होता पण कुठून ते समजेना… सहज म्हणून आमच्या बेडरूम कडे लक्ष गेलं तर सासरे पण जागेवर उठून बसले होते… तेही काहीतरी ऐकायचा प्रयत्न करतायत असंच वाटत होतं…
"काय झालं बाबा?…"
"काही नाही गं!… कसला तरी आवाज आला म्हणून जाग आली…
"तुम्हालाही आला आवाज?…"
"म्हणजे तू पण कसला आवाज आला म्हणून जागी झालीस?…"
त्या डिम लाइट च्या प्रकाशातही बाबांच्या चेहर्यावरचा रंग उडालेला मला स्पष्टपणे दिसत होता…
"मला नाही!… तन्मयला आला… बाळाच्या रडण्याचा आवाज…"
बाळाच्या रडण्याचा आवाज?…"
हो!… आणि तुम्हाला?…
"मला असं वाटलं की बाळासाठी कोणीतरी अंगाई म्हणतय… बाईचा आवाज होता…"
"तुम्ही झोपा मी बघते…"
"नाही प्रीती थांब!… एकटी नको जाऊस मी पण येतो…"
आम्ही बोलतच होतो की वैभव ला ही जाग आली…
"तुम्ही दोघे एवढ्या रात्री चे काय बोलत बसलायत?… झोप नाही आली का?… किती वाजलेत?…"
"तीन वाजत आलेत वैभव…"
"काय झाले नक्की सांगाल का दोघांपैकी?… आज असं काय नवीन घडलंय…"
"अरे!… मगाशी मी आणि तन्मयने लहान बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकला… कुठून आवाज येतोय बघायला बाहेर आले तर बाबा बेडरूम मध्ये उठून बसलेले दिसले… त्यांना विचारलं तर त्यांना कोणीतरी अंगाई गायल्या चा आवाज येत होता… कोणातरी बाईचा… तेच बघायला जात होतो तर तुला ही जाग आली…"
"तुम्ही दोघं झोपेतून नीट जागे झालेले नाही आहात का?… की डोक्यावर पडलायत?… हे असलं तुम्हाला काहीतरी रात्री ऐकायला येतय आणि तुम्ही दोघं शोधायला चाललायत घरात?… आपण जंगल सफारी खेळतोय का?… तुम्हाला कळतंय तुम्ही दोघं काय करताय?…"
"तुला काय वाटतं वैभव आम्हाला भीती वाटत नसेल?…"
"म्हणून एकटीच डेरिंग करायला निघाली आहेस का?… बाबा तुम्ही झोपा मी आणि प्रीती जाऊन बघतो…"
असं म्हणून मी आणि वैभव बाहेरच्या खोलीत आलो पण तिथून कसलाच आवाज येत नव्हता… आवाज स्वयंपाकघरातून येत होता… त्यात बाळाच्या रडण्याचा ही आवाज होता आणि त्याच्या करता अंगाई गायल्या चा ही आवाज होता, असे दोन संमिश्र आवाज… आम्ही जसे जसे स्वयंपाकघराकडे जात होतो तसा आवाज लांब जात होता… आम्ही स्वयंपाक घरात पाऊल ठेवलं आणि आवाज बंद… स्वयंपाकघराचा लाईट लावला तर सिंकचा नळ चालू होता सिंक ओव्हरफ्लो होऊन थोडेफार पाणी जमिनीवर पडलं होतं… तसंच हिरवगार शेवाळ्या सारखं पाणी पण नळातून पडणारे पाणी मात्र स्वच्छ होतं अगदी स्वच्छ… जास्त विचार करण्यात काहीच अर्थ नव्हता मि सिंक चा नळ बंद केला लाईट ऑफ केला आणि परत बेडरूम कडे आलो… बेडरूम मध्ये बाबा तसेच जागे बसले होते माझ्या चेहर्यावरचे भाव लपवत काहीच झाले नाही असं सांगितलं पण वैभवचा चेहऱ्यावरचे भाव बघून त्यांना सगळं समजलं… प्रीती माझ्या औषधांच्या पिशवीत एक पुडी आहे ती मला दे… येताना स्वामींच्या मठात गेलो होतो तिथून अंगारा आणलाय तो सगळ्यांनी लावून झोपा… मी बाबांच्या औषधांच्या पिशवीतली पुडी काढली सगळ्याना अंगारा लावायचा म्हणून लाईट ऑन केला… बाबांनी त्यांना आणि आईना अंगारा लावला… मी वैभवला अंगारा लावायला गेली तर त्याच्या मानेवर मला चार काळे चट्टे दिसले…
"हे काय झालं वैभव?…"
"कुठे काय झालंय?…"
"हे तुझ्या मानेवर चट्टे कसले आहेत?…"
"काय माहिती?… आता तू बोलतीयेस तेंव्हा मला कळालं… झोंबतय थोडंसं तिकडे…"
माने कडची बाजू थोडीशी लाल पडली होती पण असं वाटत होतं कुणाच्या तरी बोटांचे ठसे आहेत… सकाळी नीट बघता येईल असं म्हणून आम्ही झोपायला गेलो… बेडरुममध्ये आले तर तन्मय अजून जागाच होता आणि बेडरूमच्या खिडकी कडे एकटक बघत बसला होता…
"काय झालं तन्मय?… अजून जागा आहेस?…"
"आई खिडकीत बघ ना काय आहे…"
मी खिडकीत बघितलं तर एक काळी आकृती तिथून पास झाली…
"काही नाही झोप… झाडाची सावली असेल…"
असं मी सांगितलं खरं पण खिडकीत काहीतरी होतं नक्की… बाबांनी आणलेला अंगारा मी दोन्ही मुलांना लावला, स्वतःलाही लावून घेतला आणि सर्व स्वामींवर सोडून मी पण झोपले…
सकाळी मुलांच्या शाळेच आवरायचं होतं त्याप्रमाणेच जाग आली… रात्री काय काय घडलं हे विचार करायला अजिबात वेळ नव्हता… मुलांची शाळा चुकवून चालणारच नव्हतं… वैभव ने त्याच्यासाठी सुट्टी घेतली होती आजारपणाची… मुलांना तयार करून त्यांचा टिफिन पॅक करून त्यांना शाळेच्या बस स्टॉप वर सोडून आले… खालील लॉन मध्ये बाकड्यावर माई बसलेल्या होत्या… ही बाई पहाटेपासून ईथेच बसली आहे?… असा मनात विचार आला पण आता मला त्यांच्याशी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता… डायरेक्ट माईंनवर आरोप करणं चुकीचं होतं हे बुद्धीला पटत होतं पण मन मानायला तयार नव्हत… कुठेतरी मनात ठाम बसल्यासारखं झालं होतं की हे जे काही होतंय ते फक्त आणि फक्त माईं मुळेच तर नसेल?… प्रत्यक्षरीत्या माई कुठेच नव्हत्या पण ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या त्या वेळेला माई तिथे होत्याच…
घरी येऊन वैभवला उठवायला गेले तर वैभव तापाने परत फणफणला होता… त्याच्या मानेवर चे चट्टे अजून उठून दिसत होते… ते बोटांचे ऊठलेले ठसे होते हे कळत होतं… काय घडत होतं हे सगळे आमच्या बरोबर?… का आम्ही कोथरूडच घर सोडून येथे शिफ्ट झालो?… मला अश्रू अनावर झाले तेवढ्यात तिथे आई आणि बाबा पण आले… त्या दोन म्हाताऱ्या जीवांना मला कसं समजवावं हे कळत नसावं कदाचित… जे काही घडत होतं त्याला तेही हतबल होऊन बघण्यापलीकडे काही करू शकत नव्हते… त्यांच्या डोळ्यात पाणी यायच्या आत मला स्वतःला सावरणार आवश्यक होतं… घरातल आवरून मी वैभवला डॉक्टर कडे घेऊन गेले… डॉक्टर ने नेहमी सारख ताप उतरण्यासाठी गोळ्या दिल्या… निदान डॉक्टरला पण लागत नव्हतं… वैभव च्या मानेवर उठलेले चट्टे बघून एखाद्या क्रीमची ऍलर्जी आहे असं त्यांनी निदान काढलं… जे काही घरात घडत होतं त्याला एंटीबायोटिक हा पर्याय नाही हे कळत होतं पण वैभव चा ताप उतरण ही तेवढंच आवश्यक होतं… माझ्या लग्नानंतर वैभव हा माझी स्ट्रेंथ बनला होता… त्याला लवकरात लवकर या सगळ्यांना बाहेर काढण मला फार आवश्यक वाटत होतं… पण मार्ग काही मिळतच नव्हता… हे आम्हा सगळ्यांच्याच बाबतीत का घडत होतं याला काहीच उत्तर सापडत नव्हत…
दुपारी मुलं शाळेतून आली… आमच्या सगळ्यांची जेवणं होऊन आम्ही थोडा वेळ विश्रांती घेतली… मुलांचा होमवर्क पूर्ण झाल्यानंतर त्यांना थोडा वेळ खाली खेळायचं होतं… वैभवला ही दोन दिवस घरात बसून कंटाळा आला होता… मुलांना खेळायला जायच म्हणून आम्ही सगळेच खाली लॉन वर पाय मोकळे करायला गेलो… मुलं त्यांची खेळत होती, आई-बाबा फेऱ्या मारत होते, मी आणि वैभव बाकड्यावर बसलो होतो… वैभवला खोकल्याची उबळ आली पण पाणी जवळ नव्हतं म्हणून पाणी घेऊन आले असं म्हणून मी घरी आले… घराचं दार उघडलं आणि मला स्वयंपाक घरातून आवाज आला…
"बाबू!… हिकडं य रे ल्येकरा… अरेरेरे लब्बाडा… लपतोस व्हय र?… हितं मायेच्या मांडीवर ये…"
मी दारातच गार पडले… आवाज आला म्हणून स्वामींच नाव घेऊन स्वयंपाक घरात जायला निघाले…
"या!… मालकीण बाई… तुमीच न्हवं का आमच्या नवीन मालकीण बाई?…"
"कोण आहेस तू?…"
"आता हाय का?… माझ्याच जागेत येऊन मलाच ईचारता व्हय वं?… म्या चंदी…"
"कोण चं_दी?… "
"कोण चंदी?… आवं… तुमच्या सासऱ्यास्नी आनी तुझ्या नवऱ्यास्नी दिसली त्या म्याच…"
"काय हवय तुला?… का त्रास देतीयेस आम्हाला?…"
"तुजा नवरारारा…"
"काययय?…"
"व्हय तुजा न_व_रा… झ्याक हाय बघ… आदी तुजा नवरा आनी मग तुमी समदेच…"
"काय बोलतीयेस तू हे?…"
"खर त्येच बोलते म्या… इचार क्वनला भी… खर ब्वलायला आबा पाटलाला बी न्हाई घाबलीया ही चंदी… तर तू कोन गं?…"
"पण का हे सगळं?…"
"ए टवळे… फुका बडबड नगं करू… न्हाईतर आदी तुझाच काटा काढनं… काय समजलीस?…"
अस म्हणत स्वयंपाकघरातल्या कोपऱ्यात बसलेली ती माझ्या समोर येऊन ऊभी राहिली… तीच्या शरीरावर जागोजागी खरचटल्या चे निशाण होते आणि गळ्यावर कापलेल्या चा निशाण होता…
"लांब हो माझ्या पोरी पासून…"
"माई… तुमी…"
अस म्हणत चंदी ची नजर माझ्या मागे गेली आणि शॉक लागल्या सारखी ती परत त्या कोपऱ्यात गेली…
"होय मीच…"
"तुमी तर…"
"काय तुम्ही तर?… ईथेच ए मी… काही तरी घडतय हे कळतं होत पण तू माझ्याच मुलांच्या जिवावर उठलीसं?…"
"व्हय… म्या न्हाई सोडत आता या समद्यास्नी… बगाच तुमी…"
"बघतेच ना काय करतेस ते… ईतकी वर्ष सहन केल पण आता नाही… चालती हो इथून… नाहीतर!…"
"काय करशील ग थेरडे?… क्वना क्वनाला वाचवशील गं?… तुज तवा बी काय बी चाल्ल नाय आनी आता बी चालू द्यायची नाय ही चंदी… हा हा हा हा हा हा…"
अस म्हणत चंदी दिसेनाशी झाली… माई माझ्या बाजूलाच उभ्या होत्या… माईं ना बघून माझ्यातले होते नव्हते तेवढे सगळे अवसान गळून पडलं… मला चक्कर आणि माई मला सावरत होत्या… जेव्हां जाग आली तेव्हा माई माझ्यासमोर पाण्याचा ग्लास घेऊन उभ्या होत्या… आज माई माझ्या मदतीला धावून आल्या होत्या… ज्यांना ईतके दिवस मी फक्त दूषणं देत होते पण त्या सगळं विसरून माझ्यासाठी आल्या होत्या… त्यांना बघून मला आईची आठवण आली… माझा रडवेला चेहरा बघून माई माझ्या बाजूला बसल्या आणि मला कुशीत घेतलं… आई गेल्यानंतर मिळालेल्या त्या माईंच्या स्पर्शाने मला खूप भरून आलं… खूप वर्षांनी मी आईच्या कुशीत शिरून रडत होते… आणि माई फक्त मला थोपटत होत्या… त्या स्पर्शातून त्या एवढच म्हणत होत्या "बाळा मी आहे ना रे तुझ्या बरोबर?… मं का घाबरतेस तू…" खूप आश्वासक स्पर्श होता तो…
"बाळा सगळं होईल व्यवस्थित… नको काळजी करूस… आता तू जे काही बघितलं ते फक्त तुझ्यात आणि माझ्यात राहू दे… कोणालाही काहीही सांगायची गरज नाही… आज संध्याकाळी दुर्गा येईल ना तिला सांग फक्त… आणि ही माझी रुद्राक्षाची माळ आता तुझ्याजवळ ठेव… तुला कोणीही कुठल्याही प्रकारचा त्रास देणार नाही आणि ही रुद्राक्षाची माळ बघून दुर्गा समजून जाईल सगळं… तुला तिची खूप मदत होणार आहे… येते मी बाळा…"
"नाही माई… तुम्ही नका ना जाऊ मला खूप भीती वाटतेय हो…"
"नको काळजी करूस बाळा… तुला जेव्हां जेव्हां गरज लागेल तेव्हा मी आहे आणि तिची काळजी अजिबात करू नकोस तुझ्या केसालाही धक्का लागू देणार नाही ही माई… पण आता मला जावं लागेल… तू आराम कर थोडा वेळ मी आलेच…"
आणि मला शांत झोप लागली… का लागली कशी लागली माहिती नाही पण शांत झोप लागली… जेव्हां जाग आली तेव्हा वैभव, आई-बाबा, दोन्ही मुलं सगळे माझ्या समोर उभे होते मला बघत… सगळ्यांच्या चेहऱ्यावर अनेक प्रश्न दिसत होते…
आणि त्यांच्यामध्ये दुर्गा पण होती…
क्रमशः………
फ्लॅट- A real horror story -भाग १ -८ > https://marathighoststories.blogspot.com/2019/03/real-horror-story-bhutachi-gosht.html
फ्लॅट- A real horror story -भाग ९-१० > https://marathighoststories.blogspot.com/2019/06/real-horror-story-bhutachi-gosht-9-to-10.html
फ्लॅट- A real horror story -भाग ११-१३ > https://marathighoststories.blogspot.com/2019/06/real-horror-story-bhutachi-gosht-11-to.html
फ्लॅट- A real horror story -भाग १४-१५ >https://marathighoststories.blogspot.com/2019/06/real-horror-story-bhutachi-gosht-14-to.html
फ्लॅट- A real horror story -भाग १६-१८ > https://marathighoststories.blogspot.com/2019/06/real-horror-story-bhutachi-gosht-16-to.html
फ्लॅट- A real horror story -भाग १९ > https://marathighoststories.blogspot.com/2019/07/real-horror-story-bhutachi-gosht-19.html
फ्लॅट- A real horror story -भाग २० > https://marathighoststories.blogspot.com/2019/07/real-horror-story-bhutachi-gosht-20.html
फ्लॅट- A real horror story -भाग २१ >https://marathighoststories.blogspot.com/2019/07/real-horror-story-bhutachi-gosht-21.html
फ्लॅट- A real horror story -भाग १ -८ > https://marathighoststories.blogspot.com/2019/03/real-horror-story-bhutachi-gosht.html
फ्लॅट- A real horror story -भाग ९-१० > https://marathighoststories.blogspot.com/2019/06/real-horror-story-bhutachi-gosht-9-to-10.html
फ्लॅट- A real horror story -भाग ११-१३ > https://marathighoststories.blogspot.com/2019/06/real-horror-story-bhutachi-gosht-11-to.html
फ्लॅट- A real horror story -भाग १४-१५ >https://marathighoststories.blogspot.com/2019/06/real-horror-story-bhutachi-gosht-14-to.html
फ्लॅट- A real horror story -भाग १६-१८ > https://marathighoststories.blogspot.com/2019/06/real-horror-story-bhutachi-gosht-16-to.html
फ्लॅट- A real horror story -भाग १९ > https://marathighoststories.blogspot.com/2019/07/real-horror-story-bhutachi-gosht-19.html
फ्लॅट- A real horror story -भाग २० > https://marathighoststories.blogspot.com/2019/07/real-horror-story-bhutachi-gosht-20.html
फ्लॅट- A real horror story -भाग २१ >https://marathighoststories.blogspot.com/2019/07/real-horror-story-bhutachi-gosht-21.html
Next part plz
ReplyDeletePudhchi story kuthe ahe
ReplyDeleteKAY YAR AVAD INTEREST ANUN THEVLA ANI STORYCH NAHI KADHI STORY CONTINUE HONAR
ReplyDeleteDeshdoot Marathi News Paper, a Marathi News Website provides Latest News, ताज्या मराठी बातम्या, Breaking News in Marathi, Live Marathi Batmya in Nashik and Latest News North Maharashtra.
ReplyDelete