A real horror marathi story
फ्लॅट भाग १४
चंदी नं आणि धनाजी नं त्यांचा बदला घेतला होता…
आपल्या मुलाबरोबर आणि त्याच्या शरीराबरोबर झालेले ती किळसवाणी विटंबना, त्याचा झालेला इतका दुर्दैवी अंत सर्जेरावांना बघवला नाही… पण आपल्या उरल्यासुरल्या कुटुंबासाठी सर्जेरावांना स्वतःच मन घट्ट करणं आवश्यक होतं… शेतावरच्या बंगल्या वरून आपल्या मुलाची बॉडी सर्जेरावांनी बरोबरच्या गावकऱ्यांना घेऊन घरी आणली…
हो बरोबर… बॉडीच… किती विचित्र असत नाही… मनुष्य ज्या वेळेला जिवंत असतो त्या वेळेला त्याच्या शरीराला एक नाव असतं, एक किंमत असते… पण तो जसा मारतो तशी त्या शरीराची बॉडी होते… हृदयद्रावक असलं तरी हेच आयुष्याचं सत्य आहे… जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत किंमत आहे, एकदा का मेला की त्याची बॉडी होते…
हो बरोबर… बॉडीच… किती विचित्र असत नाही… मनुष्य ज्या वेळेला जिवंत असतो त्या वेळेला त्याच्या शरीराला एक नाव असतं, एक किंमत असते… पण तो जसा मारतो तशी त्या शरीराची बॉडी होते… हृदयद्रावक असलं तरी हेच आयुष्याचं सत्य आहे… जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत किंमत आहे, एकदा का मेला की त्याची बॉडी होते…
आपल्या मुलाचा मृत्यू कसा झाला?… हे कुणालाही न कळण्यासाठी, त्याची कोणत्याही प्रकारे पोलिस चौकशी नं होण्यासाठी… त्याच्या मृत्यूला अपघाती मृत्यूचं वळण देऊन आणि समाजात असलेलं आपलं वजन वापरून सर्जेरावांनी आबा पाटलाच्या मृत्यूच प्रकरण व्यवस्थित रित्या दाबलं… पण जे राव करी ते गाव ना करी आणि जे गाव करी ते राव कधीच नं करी…
आबा पाटलाचा झालेल्या गूढ मृत्यूची चर्चा गावात झाल्याशिवाय राहिली नाही… पण सर्जेराव पाटलांना तोंडावर बोलायची हिम्मत त्यांच्या उपकाराखाली दबलेल्या गावाला झाली नाही… नंदिनी आणि अक्का साहेबांच दुःख ते काय सांगावं… आपल्या डोळ्यासमोर घरात न गेलेला बाप अशा छिन्नविछिन्न अवस्थेमध्ये घरी परत आला याचे सगळ्यात मोठे दुःख नंदिनीला होतं… त्या मुलीच्या आयुष्यातला जणू आनंदच कोणी हिरावून नेला होता… सांत्वनासाठी येणारा प्रत्येक जण त्या भाबड्या पोरीची झालेली अवस्था बघून दुःख करत होता… कपाळावरचं कुंकू पुसल गेले याचे दुःख अक्का साहेबांना होतच… पण आपल्या नवर्याला आलेला मरण हे त्याने केलेल्या वाईट कर्मामुळे आलं हे अक्का साहेबांना चांगलंच ठाऊक होतं… आबा पाटील आणि चंदी प्रकरणामुळे अक्का साहेबांच्या मनातून आपला नवरा कधीच उतरला होता, पण काही झालं तरी बायको म्हणून दिलेला मान ते चांगले क्षण त्या विसरल्या नव्हत्या… त्यामुळे नवरा जाण्याचं दुःख त्यांना ही होतंच… पण नंदिनीची अवस्था बघता आणि सर्जेराव पाटील चेहऱ्यावर काहीही दाखवत नसले तरी ते मनातून खूप खचलेले आहेत हे अक्का साहेबांना कळत होतं आणि म्हणूनच त्या पाटील खानदानाच्या सुनेने आपलं दुःख बाजूला सारून परत जिद्दीने उभ रहायच ठरवल… फक्त आपल्या मुलीसाठी आणि मुलीसारखं प्रेम करणाऱ्या सासऱ्यासाठी…
काळ हे प्रत्येक जखमेवरच योग्य औषध असतं… झालेला घाव, ती जखम भरून काढायला काळासारख औषध नाही आणि तेच झालं… बघता बघता अक्का साहेबांनी घरातील सर्व व्यवहार, सर्व जवाबदार्या आपल्या खांद्यावर घेतल्या… वडिलांच्या मृत्यूमुळे अबोल झालेल्या आपल्या नंदिनीला अक्का साहेबांनी पुण्यात; आपल्या बहिणीकडे पुढील शिक्षणासाठी पाठवले…असं म्हणतात पुण्यात शिक्षण घेत असतानाच नंदिनीला दत्तमहाराजांच्या उपासनेची आवड लागली… कात्रजच्या शंकर महाराजांच्या मठात तिचं मन जास्ती रमायला लागलं… शिक्षण तर व्यवस्थित चालू होतं आणि त्याच दरम्यान शंकर महाराजांच्या मठात तिची दत्त उपासना ही बहरली, तिथे होत असलेली सेवा आणि साधना यामुळेच तिला स्वामी समर्थांचा अनुग्रह ही मिळाला… आपल्याला मिळालेल्या सात्विक शक्तीचा उपयोग त्या मुलीने लोक कल्याणासाठीच केला… दरम्यानच्या काळात सर्जेराव पाटीलही एका अपघातामध्ये निधन पावले… स्वतः एकदा ते जीप चालवत असताना गाडी वरचा कंट्रोल सुटल्याने त्यांचा अपघाती मृत्यू झाला… पण गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार चंदी आणि धनाजी त्यांच्या मृत्यूला सर्जेराव पाटीलही जवाबदार होते… त्यांच्यामुळेच सर्जेराव पाटलांचाही मृत्यू झाला, असं सर्वांचं म्हणणं होतं… कारण जीप वरचा कंट्रोल सुटून ज्या ठिकाणी अपघात झाला तिथेच चंदीच्या बाळाचा बळी दिला गेला होता… नंदिनीच शिक्षण पूर्ण झालं होतं… ती अक्कासाहेबां बरोबरच आता वाड्यात राहायला आली होती… वयात आलेल्या मुलीचे हात पिवळे करायचे म्हणून अक्कासाहेब तिच्यासाठी मुलगा शोधत होत्या… पण आपल्या आईला एकट सोडून जाणार नाही या नंदिनीच्या हट्टाखातर, आपल्या गावातल्या शाळेत; शिकवायला आलेल्या एका मास्तरां बरोबरच नंदिनीचे लग्न ठरवण्यात आलं… ते ही पोरग तस लाखात एक होतं, मास्तराला मागे-पुढे कोणी नसल्याकारणाने नंदिनी आणि मास्तरांचा संसार पाटलांच्या वाड्यातच सुरू झाला… त्यांना एक मुलगाही झाला… पण वाड्याला काहीतरी शाप होता… दुसऱ्या गावात जत्रेसाठी म्हणून गेलेला मास्तर अचानक गायब झाला… खूप तपास करूनही मास्तर मिळाला नाही… गावातल्या एका गुराख्याला तीन दिवसानंतर त्या पडक्या विहिरीत मास्तरांची बॉडी मिळाली, ज्यात आबा पाटलांनी बळी दिला होता… मास्तरांचा मृत्यू विहिरीत पडल्यामुळे झाला असा पंचनामा जरी करण्यात आला असलख तरी त्याच्या मृत्यूच कारण काय? हे अख्ख्या गावाला माहिती होतं… आज पर्यंत त्या जागेवर खूप जणांचे मृत्यू झालेले आहेत, ते सर्व चंदी मुळे झालेत असा गावकऱ्यांना ठाम पणे वाटतं… ती जागा पछाडलेली आहे, बाधित आहे अस प्रत्येक गावकरी म्हणतो… नंदिनी अक्का साहेबांबरोबर आपल्या मुलाला घेऊन त्याच वाड्यात राहिली… कालांतराने अक्कासाहेब ही स्वर्गवासी झाल्या… नंदिनी ने आपल्या मुलाला शिक्षणासाठी पुण्यात पाठवल… शिक्षण घेऊन तो तिथेच राहिला… त्याच ही लग्न झालं… नोकरी मुळे संसारही पुण्यातच थाटला होता त्याने… त्या पाटलांच्या वाड्यात नंदिनी शेवटपर्यंत एकटीच राहिली…"
"बाळांनो मला माहिती असलेली चंदी ची गोष्ट ही एवढीच… नंदिनी बरोबर चा समवयस्क म्हणा किंवा वर्गमित्र असल्याने म्हणा आणि आता खूप वर्षे या गावात राहिल्यामुळे मला जेवढ्या गोष्टी समजल्या होत्या त्या मुळे मी तुम्हाला हे सर्व सांगितलं… या म्हाताऱ्याची तुम्हाला एवढीच मदत होऊ शकते… प्रीतीताई आत्ता ज्या जागेवर तुमची बिल्डिंग उभी आहे ती जागा तीच जिथे चंदी च्या बाळाचा बळी दिला गेला होता… आणि चंदी अजूनही तिथे दिसते असं म्हणतात… ती जागा डेव्हलपमेंटमध्ये गेल्याकारणाने, तिथे इमारत उभी राहिली… नंदिनी हयात असती तर तिने ती जागा डेव्हलपमेंटला दिली नसती… कारण आत्तापर्यंत त्या जागेवर जेवढे काही अपघात म्हणून झालेत, लोकांचे जीव गेलेत तसेच नंदिनीने तिच्याकडे असलेल्या काही सात्वीक शक्तीच्या बळावर बरेच जणांचे प्राण ही वाचवले होते… मी एवढंच सांगेन की शहाण्या असाल तर तिथल्या वाईट शक्तींच्या वाटेला जाऊ नका, लवकरात लवकर ती जागा सोडा ही विनंती ए या म्हातार्याची…""
आबा पाटलाचा झालेल्या गूढ मृत्यूची चर्चा गावात झाल्याशिवाय राहिली नाही… पण सर्जेराव पाटलांना तोंडावर बोलायची हिम्मत त्यांच्या उपकाराखाली दबलेल्या गावाला झाली नाही… नंदिनी आणि अक्का साहेबांच दुःख ते काय सांगावं… आपल्या डोळ्यासमोर घरात न गेलेला बाप अशा छिन्नविछिन्न अवस्थेमध्ये घरी परत आला याचे सगळ्यात मोठे दुःख नंदिनीला होतं… त्या मुलीच्या आयुष्यातला जणू आनंदच कोणी हिरावून नेला होता… सांत्वनासाठी येणारा प्रत्येक जण त्या भाबड्या पोरीची झालेली अवस्था बघून दुःख करत होता… कपाळावरचं कुंकू पुसल गेले याचे दुःख अक्का साहेबांना होतच… पण आपल्या नवर्याला आलेला मरण हे त्याने केलेल्या वाईट कर्मामुळे आलं हे अक्का साहेबांना चांगलंच ठाऊक होतं… आबा पाटील आणि चंदी प्रकरणामुळे अक्का साहेबांच्या मनातून आपला नवरा कधीच उतरला होता, पण काही झालं तरी बायको म्हणून दिलेला मान ते चांगले क्षण त्या विसरल्या नव्हत्या… त्यामुळे नवरा जाण्याचं दुःख त्यांना ही होतंच… पण नंदिनीची अवस्था बघता आणि सर्जेराव पाटील चेहऱ्यावर काहीही दाखवत नसले तरी ते मनातून खूप खचलेले आहेत हे अक्का साहेबांना कळत होतं आणि म्हणूनच त्या पाटील खानदानाच्या सुनेने आपलं दुःख बाजूला सारून परत जिद्दीने उभ रहायच ठरवल… फक्त आपल्या मुलीसाठी आणि मुलीसारखं प्रेम करणाऱ्या सासऱ्यासाठी…
काळ हे प्रत्येक जखमेवरच योग्य औषध असतं… झालेला घाव, ती जखम भरून काढायला काळासारख औषध नाही आणि तेच झालं… बघता बघता अक्का साहेबांनी घरातील सर्व व्यवहार, सर्व जवाबदार्या आपल्या खांद्यावर घेतल्या… वडिलांच्या मृत्यूमुळे अबोल झालेल्या आपल्या नंदिनीला अक्का साहेबांनी पुण्यात; आपल्या बहिणीकडे पुढील शिक्षणासाठी पाठवले…असं म्हणतात पुण्यात शिक्षण घेत असतानाच नंदिनीला दत्तमहाराजांच्या उपासनेची आवड लागली… कात्रजच्या शंकर महाराजांच्या मठात तिचं मन जास्ती रमायला लागलं… शिक्षण तर व्यवस्थित चालू होतं आणि त्याच दरम्यान शंकर महाराजांच्या मठात तिची दत्त उपासना ही बहरली, तिथे होत असलेली सेवा आणि साधना यामुळेच तिला स्वामी समर्थांचा अनुग्रह ही मिळाला… आपल्याला मिळालेल्या सात्विक शक्तीचा उपयोग त्या मुलीने लोक कल्याणासाठीच केला… दरम्यानच्या काळात सर्जेराव पाटीलही एका अपघातामध्ये निधन पावले… स्वतः एकदा ते जीप चालवत असताना गाडी वरचा कंट्रोल सुटल्याने त्यांचा अपघाती मृत्यू झाला… पण गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार चंदी आणि धनाजी त्यांच्या मृत्यूला सर्जेराव पाटीलही जवाबदार होते… त्यांच्यामुळेच सर्जेराव पाटलांचाही मृत्यू झाला, असं सर्वांचं म्हणणं होतं… कारण जीप वरचा कंट्रोल सुटून ज्या ठिकाणी अपघात झाला तिथेच चंदीच्या बाळाचा बळी दिला गेला होता… नंदिनीच शिक्षण पूर्ण झालं होतं… ती अक्कासाहेबां बरोबरच आता वाड्यात राहायला आली होती… वयात आलेल्या मुलीचे हात पिवळे करायचे म्हणून अक्कासाहेब तिच्यासाठी मुलगा शोधत होत्या… पण आपल्या आईला एकट सोडून जाणार नाही या नंदिनीच्या हट्टाखातर, आपल्या गावातल्या शाळेत; शिकवायला आलेल्या एका मास्तरां बरोबरच नंदिनीचे लग्न ठरवण्यात आलं… ते ही पोरग तस लाखात एक होतं, मास्तराला मागे-पुढे कोणी नसल्याकारणाने नंदिनी आणि मास्तरांचा संसार पाटलांच्या वाड्यातच सुरू झाला… त्यांना एक मुलगाही झाला… पण वाड्याला काहीतरी शाप होता… दुसऱ्या गावात जत्रेसाठी म्हणून गेलेला मास्तर अचानक गायब झाला… खूप तपास करूनही मास्तर मिळाला नाही… गावातल्या एका गुराख्याला तीन दिवसानंतर त्या पडक्या विहिरीत मास्तरांची बॉडी मिळाली, ज्यात आबा पाटलांनी बळी दिला होता… मास्तरांचा मृत्यू विहिरीत पडल्यामुळे झाला असा पंचनामा जरी करण्यात आला असलख तरी त्याच्या मृत्यूच कारण काय? हे अख्ख्या गावाला माहिती होतं… आज पर्यंत त्या जागेवर खूप जणांचे मृत्यू झालेले आहेत, ते सर्व चंदी मुळे झालेत असा गावकऱ्यांना ठाम पणे वाटतं… ती जागा पछाडलेली आहे, बाधित आहे अस प्रत्येक गावकरी म्हणतो… नंदिनी अक्का साहेबांबरोबर आपल्या मुलाला घेऊन त्याच वाड्यात राहिली… कालांतराने अक्कासाहेब ही स्वर्गवासी झाल्या… नंदिनी ने आपल्या मुलाला शिक्षणासाठी पुण्यात पाठवल… शिक्षण घेऊन तो तिथेच राहिला… त्याच ही लग्न झालं… नोकरी मुळे संसारही पुण्यातच थाटला होता त्याने… त्या पाटलांच्या वाड्यात नंदिनी शेवटपर्यंत एकटीच राहिली…"
"बाळांनो मला माहिती असलेली चंदी ची गोष्ट ही एवढीच… नंदिनी बरोबर चा समवयस्क म्हणा किंवा वर्गमित्र असल्याने म्हणा आणि आता खूप वर्षे या गावात राहिल्यामुळे मला जेवढ्या गोष्टी समजल्या होत्या त्या मुळे मी तुम्हाला हे सर्व सांगितलं… या म्हाताऱ्याची तुम्हाला एवढीच मदत होऊ शकते… प्रीतीताई आत्ता ज्या जागेवर तुमची बिल्डिंग उभी आहे ती जागा तीच जिथे चंदी च्या बाळाचा बळी दिला गेला होता… आणि चंदी अजूनही तिथे दिसते असं म्हणतात… ती जागा डेव्हलपमेंटमध्ये गेल्याकारणाने, तिथे इमारत उभी राहिली… नंदिनी हयात असती तर तिने ती जागा डेव्हलपमेंटला दिली नसती… कारण आत्तापर्यंत त्या जागेवर जेवढे काही अपघात म्हणून झालेत, लोकांचे जीव गेलेत तसेच नंदिनीने तिच्याकडे असलेल्या काही सात्वीक शक्तीच्या बळावर बरेच जणांचे प्राण ही वाचवले होते… मी एवढंच सांगेन की शहाण्या असाल तर तिथल्या वाईट शक्तींच्या वाटेला जाऊ नका, लवकरात लवकर ती जागा सोडा ही विनंती ए या म्हातार्याची…""
मला खरंच हे सर्व ऐकून अंगावर काटा आला…
"माझी मैत्रीण आत्ता तिथे चंदीचा त्रास सहन करतीये… तुमची कळकळ मला समजतीये नाना… पण मी माझ्या मैत्रिणीला तिथून बाहेर काढेन…"
नानांचा निरोप घेऊन मी आणि दुर्गा तिथून निघालो… आम्ही देवळाच्या बाहेर पडलोच होतो की नानांनी परत दुर्गाला आवाज दिला आणि स्वतः जवळ बोलावून घेतले… नानांशी बोलून दुर्गा थोडी विचारात पडल्यासारखी दिसली…
"काय झालं दुर्गा?… कसला विचार करतीयेस?… नानांनी परत बोलावून काय सांगितलं?…"
"काही नाही गं!… बाबांना एक निरोप दिला त्यांनी…"
असं म्हणून मी आणि दुर्गा घरी यायला निघालो… मला घरी सोडून मगच दुर्गा स्वतःच्या घरी गेली… घरी आले तेव्हा आई-बाबा आणि वैभव दिवसभरात काय काय घडलं, चंदीचा पत्ता लागला का, हे सर्व ऐकायला वाटच बघत बसले होते… मुलं खाली खेळायला गेली असल्याकारणाने, मी थोडक्यात आम्हाला मिळालेली सर्व माहिती आई बाबा आणि वैभव यांना सांगितली… ते सर्व ऐकून त्यांच्याही चेहऱ्यावर दाटून आलेली भीती, माझ्यापासून लपली नाही… पण आता आमच्या बरोबर दुर्गाने अभिमंत्रित केलेले धागे आणि मला दिलेली रुद्राक्षांची माळ या गोष्टी आमच्या संरक्षणासाठी आहेत यामुळे आम्ही थोडेसे निश्चिंत होतो…
दुर्गा ने सांगितलं तसेच तिने अभिमंत्रित करून दिलेल्या धाग्यांमुळे आणि माझ्यासाठीच्या रुद्राक्ष माळे मुळे आम्हाला चंदीचा त्रास होणार नव्हता… आम्हाला जी खबरदारी घ्यायची होती त्यामध्ये रुद्राक्षाची माळ आणि अभिमंत्रित केलेले धागे आमच्या शरीरापासून वेगळे होऊ द्यायचे नव्हते आणि चंदी कडून दाखवल्या गेलेल्या कोणत्याही आमिषाला बळी पडायचं नव्हतं… पण ते आमिष नक्की काय हे कोणालाच माहिती नव्हतं… दुर्गा ला ही नाही… दुर्गा येऊन गेल्यानंतर दोन-तीन दिवस-रात्री आम्हाला कोणताच अनुभव आला नाही किंवा कदाचित आलाही असेल आम्हाला जाणवला नाही… आम्ही सगळे एकाच खोलीत झोपत होतो पण मुलं सोडली तर सगळ्यांचीच झोप सावध होती… मुलांसकट प्रत्येकाला ही ताकीद दिली गेली होती की, दिवसा किंवा रात्री तुम्हाला काहीही लागलं काही हवं असेल तरी एकमेकांना सांगितल्याशिवाय काहीच करायचं नाही… अगदी वॉशरूम ला जायचं असलं तरीसुद्धा…
मुलांची रेग्युलर शाळा सुरू होती, वैभव ला ही आता ऑफिसला जात येत होतं… दिवसभर मी आई आणि बाबा आम्ही तिघच असायचो… घरी नुसतं बसून राहायचा मलाही आता कंटाळा आला होता… इथे क्लास सुरू करायचे तर मला तश्या ओळखी ही मिळत नव्हत्या…
एकदा मुलांना बस स्टॉप वर सोडायला गेले होते… तर मुलांना सोडायला आलेल्या काही बायकांपैकी एक-दोन जणींनी माझ्याकडे क्लास संदर्भात चौकशी केली… क्लास संदर्भात मी काही जणांना सांगून ठेवलं असल्या कारणाने मला विचारलं गेलं असेल म्हणून मीही इंटरेस्ट दाखवला… संध्याकाळी भेटायला येतो असं सांगून आम्ही निरोप घेतला… दिवसभरात दुर्गाचे दोन-तीन फोन कॉल असायचे, जनरल हालहवाल विचारण्यासाठी ती फोन करायची… आध्येमध्ये एखादी चक्कर ही मारायची… पण माझ्या घरातला पाहूणचार तर तिने कधीच घेतला नव्हता… सकाळी चौकशी करणाऱ्या त्या बायका स्वतःबरोबर अजून चार-पाच बायकांना घेऊन संध्याकाळी मला भेटायला आल्या… आलेल्या सर्व बायकांच्या मुलांचे क्लास घ्यायचे होते… समोरून चालून आलेली संधी का वाया घालवा? म्हणून मीही क्लास घ्यायला तयार झाले… मुलांसाठी दुपारची क्लासची वेळ ठरवून आलेल्या सर्व बायकांनी माझा निरोप घेतला… आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे अशी माझी अवस्था झाली होती… कालपर्यंत मी क्लास साठी मुलं मिळावी म्हणून धडपडत होते आणि आज मला एका झटक्यात सात मुलांच्या शिकवण्याची ऑफर आली होती… रात्री वैभव कामावरून आल्यावर मी क्लासची गुड न्यूज दिली… माझं क्लासच रुटीन सुरू झालं… दुर्गा येऊन गेल्यापासून चंदीचा होणारा त्रास डायरेक्ट आम्हाला काहीच जाणवत नव्हता… आई-बाबा येऊनही आता बरेच दिवस झाले होते… त्यांच एक कोथरूड मधलं रुटीन सेट झालं होतं, पण आमच्या काळजीपोटी ईतके ते इथे थांबले होते… पण आता दुर्गावर त्यांनाही विश्वास बसला होता… माझे क्लासही सुरु झाले होते आणि म्हणूनच कदाचित आम्ही परत कोथरूडला जातो असा तगादा त्यांनी लावून धरला… आम्हीही नाईलाजाने त्यांना परत कोथरूडला जाण्यासाठी होकार दिला…
आई-बाबा कोथरूडला जाण्याचा दिवस उजाडला… मुलं शाळेला आणि वैभव ऑफिसला गेल्यानंतर आम्ही तीघ हॉलमध्ये बसून चहा घेत होतो… दाराची बेल वाजली…
"दूधवाला आलाय थांब मी बघते…"
असं म्हणून आईंनी दार उघडलं आणि दूधाच भांड आणण्यासाठी स्वयंपाक घरात गेल्या… आई स्वयंपाक घरात जाऊन एखादा मिनिटच झाला असेल की…
"ईईई!… प्रितीतीती!…"
असा आईंचा आवाज स्वयंपाकघरातून आला त्यापाठोपाठ भांड पडल्याचा आवाज आला आणि आई स्वयंपाक घरातून धावतच हॉलमध्ये आल्या… काहीतरी घाणेरडं बघितल्यासारखे भाव त्यांच्या चेहऱ्यावर होते, अंग झटकत होत्या…
आई काय झालं?… अशा का ओरडत बाहेर आलात?…"
मन चिंती ते वैरी न चिंती… माझ्या डोक्यात भलतेच विचार…
"थांब जरा!… लांब हो!… शीऊ नकोस मला!…"
"अहो पण झालं तरी काय?…"
"अग बाईईई!… दुधाचं भांडं शेल्फमधून घेतलं, विसळून घेण्यासाठी आपल्या सिंक चा नळ चालू केला तर नळातून हिरवट काळं शेवाळी रंगाच पाणी आलं आणि काही कळायच्या आत वरून दोन मोठ्या पाली माझ्या हातावर पडल्या…
"काययय्!…"
"चांगल्या मोठ्या आणि काळसर करड्या रंगाच्या होत्या…" असं आई बोलतच होत्या की मी स्वयंपाक घरात जाऊन बघितलं… सींकचा नळ चालू होता पण त्यातून रेग्युलर स्वच्छ पाणी येत होतं… सींकमध्ये विसळण्यासाठी घेतलेलं भांड पडून होतं, पण हिरव्या काळ्या पाण्याचा कुठे नामोनिशाण अस नव्हता आणि ना ही त्या पालींचा…
"अहो आई!… पण इथे काहीच नाहीये?…"
मी असं म्हंटल्यावर आईही किचनमध्ये आल्या…
"अगं इथेच होत्या या जागी… गेल्या असतील कुठेतरी…"
"आई पण आतापर्यंत आपल्या घरात पाल कधी आलीच नव्हती… आमच्या बघण्यात तर कधीच नव्हती हं!…"
असं म्हणत मी सिंक मधलं ते पडलेल भांड बाजूला ठेवायचं म्हणून उचललं, तर त्याखाली मला दुर्गा ने दिलेला पिवळा धागा दिसला…
"आई तुमच्या हातातला धागा?…"
"हा काय अगं!…" असं म्हणून धागा दाखवायला आईंनी हात पुढे केला…
"अरे!… कुठे गेला?… इतका वेळ तर होता माझ्या हातात!…"
"अरे!… कुठे गेला?… इतका वेळ तर होता माझ्या हातात!…"
"हा काय!… इथेच सिंकमध्ये पडलाय… द्या मी बांधते…"
"नको बाई!… थांब जरा!… मला आधी आंघोळ करू दे त्यावेळेला तो धूऊन घेते मग बांध असंही निघायची तयारी करायचीच आहे आता आम्हाला…"
दूधवाल्या मामांकडून दूध घेतलं… आईंनसाठी आंघोळीच पाणी सोडलं आणि मी आणि बाबा परत चहापानाच्या प्रोग्राम मध्ये मश्गुल झालो… आईंना अंघोळीला जाऊन पंधरा-वीस मिनिटं झाली असतील आणि एवढ्यात बाथरूममध्ये "धपपप…" असा काहीतरी पडल्यासारखा आवाज झाला आणि त्यापाठोपाठ…
"अग आई गं! मेले गं मेले!…प्रीती वाचव गं मला… आहोहोहो!…"
बाथरूममधून आईंच्या ओरडण्याचा आवाज आला… त्यांना काय झालं बघण्यासाठी मी आणि बाबा बाथरूम कडे धावलो… पण बाथरूमचं दार बंद होतं त्यामुळे बाहेरून आवाज देण्यापलीकडे आम्हाला काही करता आलं नाही…
"आई आहो काय झालं?…असं का ओरडलात?…"
"अगं बरी आहेस ना?… दार उघड आधी!…"
आईच्या विव्हळण्याचा आवाज आतून येत होता… दोन मिनिटांनी कसंतरी त्यांनी दार उघडलं आणि त्या बाथरूममध्ये खालीच बसल्या होत्या… मी आणि बाबांनी त्यांना आधार देऊन बेडरूम मध्ये आणून झोपवलं… आंघोळ झाल्यावर कपडे करून त्या बाहेर येतच होत्या आणि पाय घसरून पडल्या… कमरेला चांगलाच मुका मार लागला होता… उठून बसवलं तरी त्यांना त्रास होत होता… मी त्यांच्या कमरेला स्प्रे मारून दिला त्यांना थोडं खायला घातलं आणि एक कॉम्बिफ्लेम देऊन झोपवलं… बाबा बाहेर हॉलमध्ये बसले होते…
"बाबा माझ्यामते आता तुम्ही कोथरूडला जायचा प्लान रद्द केलेला बरा… मला नाही वाटत आई या स्थितीत कोथरूडला जाऊन वावरू शकतील…"
"हो मलाही तेच वाटतंय… तू थांब हिच्या जवळ, मी मुलांना घेऊन येतो…"
बाथरूम कडे जाऊन बघितलं तर तिथे घसरून पडण्या सारख काही निसर्ड झालं होतं, असं काहीच नव्हतं… पण तरीही आई पडल्या होत्या… आंघोळी बरोबर त्यांनी धुवून ठेवलेला पिवळा धागा मी आणून देव्हाऱ्यात ठेवला… आई उठल्यावर बांधू या विचाराने… दुपारी क्लासची मुलं आली, त्यांचा क्लास संपत आलाच होता एवढ्यात दुर्गा ने एन्ट्री घेतली…
"काय ताई?… काय म्हणताय?… अरे वा क्लास, मुलं काय खरं नाही बाई… जोरात चालू आहे की तुमचं रुटीन…"
"अगं नाही गं… तसं काही नाही… मुलांना बस स्टॉप वर सोडायला गेले होते, तर या मुलांच्या आया भेटल्या… त्यांनी क्लास बद्दल विचारलं मी पण हो म्हटलं आणि तसंही कोथरूडला असताना मी घेतच होते घरगुती क्लास… म्हंटल आनायसे ऑफर आली आहे तर का नाकारा?…"
दुर्गा आली तसा मी ही ५ मिनिट आधीच क्लास संपवला…
"आणि आई-बाबा काय म्हणतायत?…"
तिने असं विचारलं आणि माझ्या डोक्यात का माहिती नाही काय विचार आला… सकाळी दूध वाला आल्यानंतर आईं बरोबर जे काही घडलं, अंघोळीच्या वेळेला आई पडल्या या सर्व गोष्टी मी तिला इन डिटेल सांगितल्या… मी हे सांगितल्यावर मॅडम पण दोन मिनिटं चक्रावल्या…
"प्रीती तुझ्याकडे क्लासला मुलं येऊन किती दिवस झाले?…"
"दोन-तीन दिवस… का ग?…"
"आणि आई-बाबा कोथरूड ला जायचं कधीपासून म्हणतायत?…"
"ते ही दोन दिवसापासूनच… काय झालं काय, ते तरी सांग?…"
ती काही बोलली नाही पण तिचे डोळे एक दोन मिनिटांसाठी बंद झाले… दुर्गा माझ्या समोर असून परत नसल्या सारखी जाणवली…ती तिथेच होती माझ्या समोर, पण त्यावेळी मात्र ती तिच्यात नव्हती आणि दोनच मिनिटात तिने डोळे झटका लागल्यासारखे उघडले…
"प्रीती आई कुठे आहेत?…"
"बेडरूममध्ये झोपल्यात… आराम करतायत…"
"चल लवकर… आपल्याला त्यांच्या जवळ जायला हवं…"
असं म्हणून ती धावतच बेडरूम कडे गेली… तिचं बघून मी आणि बाबाही बेडरूम कडे धावलो आणि जाऊन बघतो तर आईंचे दोन्ही हात त्याच्या गळ्यावर होते… स्वतःचा गळा दाबल्या सारख्या त्या स्वतःचा गळा दाबून घेत होत्या… ओठ एकमेकांवर घट्ट दाबून घेतलेत असं तोंड बंद होतं… पण त्या ओरडायचा प्रयत्न करत होत्या, कारण त्यांच्या घशातून हुंकार बाहेर पडायचा प्रयत्न होत होता पण तोंड घट्ट बंद असल्यामुळे त्या ओरडू शकत नव्हत्या… स्वतःचे पाय झाडत होत्या… त्या स्वतःलाच मारायचा प्रयत्न करत होत्या… दुर्गा धावतच त्यांच्या डोक्याशी जाऊन उभी राहिली… तिने डोळे बंद केले आणि आपला उजवा हात आईंच्या कपाळावर ठेवून ती काहीतरी पुटपुटायला लागली… ती काय बोलत होती माहित नाही पण एक दहा-बारा सेकंदामध्ये आईंची तडफड थांबली… पहिले त्यांनी गळ्या कडून हात काढून पोटाशी घेतले… त्यांच तोंड उघडलं गेलं पण तोंडातुन दमल्यासारखा आवाज येत होता… डोळ्यात प्रत्यक्ष भीती दिसत होती… त्या शांत झाल्या होत्या पण प्रचंड घाबरलेल्या होत्या… दोन मिनिटांनी जेव्हां दुर्गा ने त्यांच्या कपाळावरून हात उचलला त्यावेळी आईना शांत झोप लागली होती…
"मी सांगितलं होतं ना?… हातातला धागा काढायचा नाही म्हणून?… कोणी काढायला सांगितलं तुम्हाला यांच्या हातातला तो धागा?… अक्कल आहे का तुम्हा लोकांना?… मी सांगितलेलं ऐकायचं नसेल तर सांगा तसं!… नाही येणार मी!…"
दोन मिनिटात दुर्गाने जो दुर्गावतार घेतला… तिचा तो अवतार बघून आम्हाला कोणाला काही बोलायची हिंमतच झाली नाही…
"अगं पण…"
"काय अगं पण?… देव्हाऱ्यात ठेवलेला तो धागा यांच्या हाताला बांध आधी मग बोल माझ्याशी…"
आणि त्याच दुर्गावतारा सरशी दुर्गा बाहेरच्या हॉलमध्ये जाऊन बसली…
देव्हाऱ्यातला तो धागा मी लगेच आईंच्या हातात बांधला… झालेल्या प्रकराने मी आणि बाबा घाबरलो तर होतोच पण दुर्गाच्या समोर आता आमची जायची हिम्मत नव्हती… थोडेसे घाबरतच आम्ही हॉलमध्ये आलो… दुर्गा स्वतःचीच काहीतरी बडबडत होती… पाच-दहा मिनिटं गेली असतील मी दुर्गा जवळ बसले… शक्य होईल तेवढ्या प्रेमाने तिला आवाज दिला…
"दुर्गा!…"
"प्रितीताई?… अगं चार दिवसांपूर्वी आपण एवढं सगळं ऐकून आलो ना गं?… आणि तरी तुम्ही हा वेडेपणा करताय?… तुला काय वाटतंय?… मी धागा बांधला म्हणून इथे घडत होतं ते सगळं शांत झालंय आता? चंदी तुम्हाला काहीच त्रास देत नाहीये?… तसं असेल तर मूर्ख आहात तुम्ही… मी सांगितलं होतं धागा बांधतानाच की हा शरीरापासून वेगळा करू नका आणि कोणत्याही आमिषाला भुलून जाऊ नका… पण तुम्ही नेमका त्याचा उलटं केलं… तुला काय वाटतं कुठंन आली क्लासाठी मुलं?… इतके दिवसात तुला क्लास साठी कधीतरी मुलं मिळाली का?… मं आत्तच का मिळाली?… आजच माईंच्या हातावर ते शेवाळ्या चे पाणी आणि त्या पाली का पडल्या? त्यांच्या हातातून तो धागा सुटला आणि आई बाथरूम मध्ये जाऊन घसरून पडल्या… तुझ्याकडे येणारी मुलं काही खोटी नाहीयेत, खरीच आहेत… सगळ्यांना सांगून इतके दिवसात मिळाली नाहीत ही आणि त्यांच्या आयांना आजच बुद्धिझाली तुझ्याकडे क्लाससाठी पाठवायची?… तू हे घर सोडून कुठेही जाऊ नयेस, आर्थिक मोहाला बळी पडून तू घर सोडू नयेस म्हणून चांदीने दिलेलं हे अमीष आहे… नळातुन शेवाळी रंगाच पाणी येणं, त्या दोन पाली आईंच्या अंगावर पडणं आणि आईंच्या हातातून तो धागा सुटणं या सगळ्या गोष्टी तो अभिमंत्रित धागा आईंच्या अंगापासून लांब करण हा एकमेव हेतू होता… आई आणि बाबा आज दुपारी कोथरूडला परत जाणार होते ना?… आई बाथरूम मध्ये घसरून पडल्या हे त्यांनी हे घर सोडून न जाण्यासाठी घडवून आणलं होतं… तुला जर कळलं होतं की आईंच्या हाततला धागा निघालाय तर तो तू आधी बांधणं गरजेचं होतं… आत्ता काय चालू होतं याचा थोडा तरी अंदाज आहे तुला?… नसेल तर ऐक… चंदी आईंच्या छातीवर बसून त्यांचा गळा दाबून त्यांना मारायचा प्रयत्न करत होती… तुम्हाला दिसताना हेच दिसलं की आई स्वतःचा गळा दाबत होत्या… पण मी वेळात आले नसते तर काय झालं असतं आणि हे सगळं झालं कारण त्यांच्या हातात धागा नव्हता… थोडं तरी शिरतय का डोक्यात?… माझं बोलणं आत्ता जरी तुला उद्धटपणाच आणि आरेरावीच वाटत असलं तरी त्यामागची कारणं समजून घ्यायचा प्रयत्न कर आणि तसं वागा विनंती ए हि माझी तुम्हाला…"
"दुर्गा तू म्हणतीयेस ते आता माझ्या लक्षात… खरंच सॉरी माझं थोडसं दुर्लक्ष झालं…"
"मी खूप हार्श बोलले असेन……… तरी मी सॉरी अज्जिबात म्हणणार नाही… कारण काही गोष्टी या तुम्हाला ऐकाव्याच लागतील नाहीतर एकदा का गोष्टी माझ्या हाताबाहेर गेल्या तर मला काहीच करता येणार नाही… होप सो… तू समजून घेशील… मी चलते…
"ठिक ए… यापुढे तू म्हणशील तसंच होईल…"
"काळजी घ्या… येते मी…"
"थांब मी पण येते खालपर्यंत…"
असं म्हणून मी आणि दुर्गा खाली आलो…दुर्गाने पार्किंगमध्ये जिथे तिची टुविलर पार्क केली होती तिथे आम्ही आलो तर दुर्गा गाडी शोधत होती…
"काय झालं?…"
"अगं… इथेच तर पार्क केली होती मी गाडी कुठे गेली?…"
"म्हणजे…"
"अगं!… मगाशी तुझ्याकडे येताना मी गाडी इथे पार्क केली आणि वर आले… आता गाडी इथे नाहीये…"
"गाडीला चावी विसरली होतीस का?…"
"नाही गं!… गाडी ची चावी माझ्याकडेच आहे… आणि गाडी हँडल लॉक होती… मं कुठे गेली?…
मी आमच्या वॉचमनला विचारल पण त्यालाही काही माहिती नव्हतं… आम्ही गाडी शोधत पार रस्त्यावर आलो आणि जे बघितलं त्याने दुर्गा ही शॉक्ड झाली होती… एखादी खेळण्यातली टुव्हिलर गाडी, खाली डोकं वर पाय करून ठेवल्यासारखी, दोन चाकं हवेत आणि हेंडलची बाजू खाली अशी ठेवली तर कशी दिसेल?… अगदी तशीच दुर्गाची गाडी मेन रोडच्या कडेला उलटी करून ठेवली होती… मी दुर्गा कडे बघितलं…
"दुर्गा हे काय झालं?… कोणी केलं?…"
"मी चंदीच्या कामात अडथळा आणला आज… असं समज की तिच्याकडून मला मिळालेली ही पहिली वॉरनींग आहे… काळजी करू नकोस होईल सगळे व्यवस्थित…"
"आता हा खेळ जरी तिने सुरू केला असला तरी याचा शेवट मीच करणार…"
क्रमशः………
वेलिंग नाडकर्णी...
फ्लॅट भाग १५
"आता हा खेळ जरी तिने सुरू केला असला तरी याचा शेवट मीच करणार…"
मी आणि दुर्गा ने मिळून उलटी ठेवलेली ती टू व्हीलर परत सरळ केली… कोणीतरी फरपटत आणल्या सारखी दुर्गाच्या टू व्हीलर वर स्क्रॅच मार्क होते… उपडी करून ठेवल्यामुळे गाडीच्या आरशांचे थोडेफार नुकसान झाले होते… आम्हाला जो काही चंदी कडून त्रास दिला जात होता त्यासाठी आम्हाला मदत केली म्हणून आज हा त्रास दुर्गाला ही सहन करावा लागत होता, याचंच मला जास्ती वाईट वाटत होतं…
"दुर्गा सॉरी गं!… आमच्यामुळे तुला हे सर्व सहन करावं लागतंय…"
"अगं ताई वेडी आहेस का तू?… अगं हे तर नॉर्मल आहे!… तसं बघायला गेलीस तर अजून चंदी माझ्या काहीच वाटेला आलेली नाही… आत्ता तर मी फक्त तिचा थोडासा रस्ता अडवलाय आणि जोपर्यंत माझे स्वामी आजोबा माझ्या बरोबर आहेत तोपर्यंत मी चंदीला अजिबात घाबरत नाही… हां आता थोडा फार विरोध तिच्याकडून पण होणं अपेक्षित तर आहेच ना? तोच ती करतीये, तेवढा चलता है।…"
"तसं नाही गं!… दुर्गा पण या सगळ्याचा तुला त्रास…"
"अज्जिबात त्रास बीस काही नाही आणि हो हे गाडीचं जे काही झालं ते उगीच घरी जाऊन सांगत बसू नकोस… आधीच सगळे टेन्शनमध्ये आहेत कशाला उगीच त्यांचं टेन्शन वाढवतेस… मी आहे ना सगळं बघून घेईन… चल निघते मी, आई वाट बघत असेल…"
माझा निरोप घेऊन दुर्गा गेली… रस्त्यातून घरी येत असताना माझ्या डोक्यात आज दिवसभरात घडलेले सर्व प्रसंग घोळत होते… फक्त आज दिवसभरात घडलेलेच नाही तर गेल्या चार-पाच दिवसात घडलेले सर्व… आम्ही आता त्या घरात अडकून पडलो होतो… त्या घरातून आमच्या मर्जीने बाहेर पडणं आता आम्हाला कोणत्याही परिस्थितीत शक्य नव्हतं, कारण आम्ही बाहेर पडण्याचा प्रत्येक मार्ग चंदी तिच्या हिशोबाने अडवणार होती… थोडीफार करो या मरो अशीच आमची अवस्था झाल्यासारखं मला वाटलं… सोसायटीत पोचले तर खाली लॉनमध्ये बाकावर माई बसलेल्या दिसल्या… मला त्यादिवशी चंदीपासून वाचवल्या नंतर माईंशी अशी भेट झालीच नव्हती… मीही त्यांच्याशी खूप वाईट वागले होते पण तरीही माई माझ्या मदतीला आल्या होत्या… माईंना भेटून त्यांची माफी मागायची हीच वेळ मला योग्य वाटली… मी तशीच माईंन कडे जायला निघाले, मला आपल्या जवळ येताना बघून माई बाकावरून उठल्या आणि निघून जायला लागल्या…
"माई!… थांबा ना माई!… मला बघून निघालात ना?… इतक्या रागावला आहात माझ्यावर?…"
"नाही रे बाळा!… तुझ्यावर का रागवेन मी?… संध्याकाळ झाली, तुळशी कडे दिवा लावायला हवा, म्हणून निघाले होते… म्हातारी झालीये आता मी, मला लांबचं दिसत नाही गं!… तू येतेस हे कळलच नाही बघ… बोल तू कशी आहेस?… इतक्या संध्याकाळचं फिरायला बाहेर पडली होतीस?…
"नाही ओ!… माई ते थोडं… या ना आपण बसून बोलू…"
"नको गं!… जायला हवं, तुळशी कडे दिवा लावायचा आहे…"
"थोडा वेळ बसा ना हो माई… माझ्याबरोबर…"
मी आणि माई परत त्याच बाकावर बसलो… मला माईंशी बोलायला कुठून सुरुवात करावी हे समजतच नव्हतं… आपण जेव्हां रागात असतो तेव्हां समोरच्याला वाटेल तसं बोलण्यासाठी आपल्याला भरपूर काही सुचतं… पण जेव्हा आपल्याला आपल्या हातून घडलेल्या चुकीचा पश्चाताप होत असतो, तेव्हां मात्र हे सर्व शब्द जणू काही कुठे तरी गायब होऊन जातात… मी खरंतर माईंची माफी मागायला आलेे होते, पण माई माझ्या जवळ बसल्या नंतर मला त्यांच्याशी बोलायची सुरुवात कुठून करावी हेच कळत नव्हतं… माईंना आधीच खूप बोलून मी दुखावलं होतं पण आता त्यांच्याशी कसं बोलावं हेच कळत नव्हतं…
"प्रीती!… बाळा काय झालं?… बोल ना गं माझ्याशी…"
माईंच्या आवाजामध्ये मला दरवेळी माझ्या आईचा भास का होतं होता हे मला कधीच कळलं नाही… पण आत्ता माईंनी दिलेली हाक ऐकून मला अश्रू अनावर झाले… मी रडत आहे हे लक्षात आल्यावर माई माझ्याजवळ सरकल्या आणि मला कुशीत घेऊन माझ्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली…
"माई!… माई मी चुकले हो… मी त्यादिवशी तुम्हाला वाट्टेल तसं बोलले… या सगळ्याशी तुमचा काहीही संबंध नव्हता तरीही तुम्हाला दोष देत राहिले… माई तुमची माफी मागायची मला लाज वाटते हो… त्यादिवशी तुम्ही आला नसतात तर माझं काय झालं असतं हे मला माहिती नाही… माझी लायकी नाही हो तुमची माफी मागायची… पण मी चुकले माई मला माफ करा ना!…"
"बाळ प्रीती!… जे काही झालं त्यात तुझी काहीही चूक नाही… परिस्थितीच अशी होती की… जाऊदे गं!… नको विचार करुस जास्त… मी बाळा तुझ्यावर अजिबात रागावलेले नाही… डोळे पूस बरं आणि आधी शांत हो… बाळा काहीही झालेलं नाही… उगीच स्वतःला दोष देत बसू नकोस… चल उठ जा बरं आता, घरी सगळे वाट बघत असतील…
माईंनी धीर दिल्यामुळे मला थोडं बरं वाटलं… माईंचा निरोप घेऊन मी तिथून निघाले… लॉन मधून परत येताना सहज म्हणून आमच्या बालकनी कडे माझे लक्ष गेलं, आमच्या बाल्कनीच्या भिंतीवर कोणीतरी कडेवर बाळाला घेऊन फेऱ्या मारतय अशी काळी सावली फिरताना दिसली… दोन सेकंद मला समजलंच नाही की मी काय बघतीये… मी तशीच धावत वर आले, कारण त्या खोलीत मी आईंना झोपवलेलं होतं… त्यांच्याबरोबर जे काही संध्याकाळी घडलं, त्यामुळे मी धावतच वर आले… घरी पोहोचले तर वैभव आलेला होता आणि वैभवने आणि बाबांनी मिळून आईना बाहेरच्या खोलीत आणून बसवलं होतं… बाबांनी वैभव ला दिवसभरात घडलेला सर्व प्रकार सांगितलेला होता…
"काय झालं प्रीती तुला इतका उशीर का लागला?… आणि अशी का धावत वर आली आहेस?…
"वैभव!… वैभव ती बाल्कनीत… आईंना कधी घेऊन आलास बाहेर?… आईंना परत काही झालं नाही ना वैभव?… खरं सांग मला, आई ठीक आहेत ना?…"
"अगं हो!… हो!… आधी श्वास तर घे थोडा… आणि आईला काहीही झालेलं नाही… मी ऑफिसमधून आलो तर मीच तिला जरा बाहेर आणून बसवलं… तिला जो मुकामार लागलाय त्यामुळे हालचाल केली नाही तर ती अजून जाम होऊन जाईल… म्हणून मी तिला जरा बाहेर घेऊन आलो…
मी घाबरतच आईंच्या जवळ जाऊन बसले आणि त्यांना विचारलं…
"आई त्या चंदीने तुम्हाला परत काही त्रास नाही ना दिला?…"
आईंशी बोलताना माझे डोळे भरून आले होते…
"नाही ग प्रीती… किती ती काळजी करशील आमच्या सगळ्यांची?…
असं म्हणत आईंनी माझ्या डोळ्यात आलेले अश्रू स्वतःच्या हाताने पुसले… त्यांनाही थोडसं भरून आलं होतं कारण लगेच मला त्यांनी त्यांच्या जवळ घेऊन शांत केलं…
"पण तू इतकी धावत का वर आली होतीस?… आणि असं का वाटलं तुला की आईला परत काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल म्हणून?…"
"वैभव ती बाल्कनीमध्ये तिच्या मुलाला घेऊन फेऱ्या मारतीये… मी माईंशी बोलून वर येत असताना मला तिची आणि तिच्या मुलाची सावली आपल्या बाल्कनीत फेर्या मारताना दिसली… म्हणून घाबरून मी धावत वर आले…
चंदीची दहशत दिवसेंदिवस वाढतच चालली होती आणि हे आम्हा घरातल्या मोठ्यांना जसं माहिती होतं, तसंच माझ्या मुलांनाही या संदर्भात कळत होतं… भूत प्रेत पिशाच्च वाईट शक्ती हे सर्व जरी त्यांना कळत नसलं, तरी आपले आई-वडील, आजी-आजोबा हे कोणत्या ना कोणत्या कारणाने घाबरलेले आहेत… घरात काहीतरी वेगळं घडतय, आपल्याला ते त्याच्यापासून वाचवत आहेत… आपल्याला काही कळू देत नाहीयेत, हे सर्व त्यांनी बोलून दाखवलं नसलं तरी त्यांना कळत होतं… कारण आम्ही आमच्या आमच्यात किंवा दुर्गा आलेली असताना जेव्हा चंदीचा विषय निघायचा, तेव्हा ती दोघं एकमेकांना नजरेनेच इशारा करून आतल्या खोलीत निघून जायची… "तुम्ही आत मध्ये जाऊन बसा, आम्हाला बोलायचंय" असं कधी त्यांना सांगायची गरज पडली नाही… वैभव ला हे सगळं विचारण्याच्या भानगडीत माझी मुलं पडली नसती, पण मला असं सारखं वाटायचं की मी जेव्हा फक्त त्यांच्याबरोबर असते तेव्हा ते मला हा प्रश्न नक्की विचारतील… आज रात्री जेवण झाल्यानंतर वैभव; आई बाबां बरोबर आमच्या बेडरूममध्ये बोलत बसला होता, मी आणि मुलं हॉलमध्ये अभ्यास करत बसलो होतो… तन्मय चा शाळेत दिलेला थोडासा होमवर्क बाकी होता आणि रुद्रच्या एका प्रोजेक्टचं काम सुरू होतं म्हणून आम्ही ते करत बसलो होतो… एवढ्यात मला तन्मय आणि रुद्र एकमेकांशी काहीतरी कुजबुजत आहेत असा आवाज आला…
"विचार ना?…"
"नाही तू विचार…"
"आपलं काय ठरलं होतं?… तू विचारणार म्हणून…"
"नको ना दादू!… तूच विचार…"
"मी नेटवरून इन्फॉर्मशन काढली की नाही?… म आता तू विचार…"
"तन्मय रुद्र काय झालं?… तुम्हाला काय हवय?… रुद्र त्याला अभ्यास करू दे तू इकडे ये बरं…"
"आई रुद्र तुला काहीतरी विचारतोय… विचारना?…"
तन्मयने असं रुद्र च नाव डायरेक्ट पुढे केल्यामुळे रुद्र ही बोलायला पुढे आला… माझ्याकडून एखादी गोष्ट जेव्हा रुद्रला हवी असते तेव्हा साहेबांचा मस्का मारायची पद्धत अगदी बघण्यासारखी असते… त्याच्या मस्का मारायच्या सवयीनुसार तो अगदी लाडात माझ्याजवळ येऊन बसला… अशावेळी चेहऱ्यावर एवढे निरागस भाव आणतो की जर समोरच्याला कळालं की हा नोटंकी करतोय तर समोरचा ह्याला विचारणार सुद्धा नाही… पण मला आता आमच्या या नोटंकी ची सवय झाली होती…
"आई!… दादूला आणि मला तुला ना काहीतरी विचारायचं… दादूच बोलणार होता तुझ्याशी, पण तुला माहितीये ना मी स्मार्ट ए? मग त्याने मला सांगितलं विचारायला…
"पुरे!… पुरे!… विचार आता काय ते…"
"आई!… आपल्या घरात घोस्ट आहे का गं?… आम्हाला सांग ना तिची स्टोरी, आम्ही कुणालाही सांगणार नाही…"
"तन्मय रुद्र!… काय चाललंय तुमचं?… कोणी सांगितलं हे सगळं तुम्हाला?…असं काहीही नाहीये…"
"आई मला आणि रुद्रला सर्व माहिती आहे… तुम्ही हॉल मध्ये जेव्हा बोलत बसता तेव्हा तुमचा आवाज आत बेडरूम पर्यंत येत असतो… आणि मला पण ती बाई त्या दिवशी खिडकीत दिसली होतीच ना?… ज्या बाळाला रुद्र ने खेळताना बघितलं त्याचाच आवाज त्यादिवशी रडताना येत होता ना?… आम्हाला इतकं सगळं माहिती आहे मग तू आमच्यापासून का लपवतीयेस?…"
आई!… दादूने तर नेटवर पण सर्च मारलाय सगळा… आम्ही त्यांच्या सगळ्या स्टोरीज वाचल्यात…"
"कोणाच्या सगळ्या स्टोरीज?…"
"नेटवर त्या हॉरर स्टोरीज असतात ना, गोष्टी वाल्या… त्या आम्ही वाचल्यात…"
आपली नवीन पिढी किती ऍडव्हान्स असते ना?… ज्या मुलांना मी अजून लहान समजत होते त्या मुलांनी आमच्या अपरोक्ष भूत म्हणजे काय? ते काय असतं? हे सर्व नेटवर वाचून त्याची माहिती पण घेऊन ठेवली होती… मी त्यांना अगदी बालिश पणे जेव्हा घरात वावरणाऱ्या चंदी आणि तिच्या बाळाबद्दल सांगायला गेले, तेव्हा मी ज्या बालिश शब्दात त्यांना समजावलं त्याच शब्दांचे त्यांनी मला रेग्युलर बोलीभाषेतले शब्द सांगितले… माझं मलाच आश्चर्य वाटलं की माझ्या मुलांना या सर्व गोष्टींबद्दल माझ्या एवढं नसलं तरी बऱ्यापैकी नॉलेज दिसत होतं… ही दोघं अजून काय काय विचारतील त्याचा एकंदरीत मला अंदाज आला होता… म्हणून मी झोपायचा विषय काढून विषय बदलायचा प्रयत्न केला, नशीब ती दोघंही तयार झाली… नाही तर माझं आज काही खरं नव्हतं, तरी जाता जाता मी त्यांना म्हणाले…
तन्मय रुद्र एक मिनिट इकडे या… आत्ता जे मी तुम्हाला सांगितलं ते कोणालाच सांगायचं नाही घरातही आणि बाहेर पण…"
आई आम्ही इतके दिवस कोणाला काही बोललोय का?… तुला तरी काही बोललो होतो का?… आम्ही नाही गं सांगणार…"
"रुद्र आणि तुझं काय?… मला दोघंही प्रॉमिस द्या…"
आई!… यू नॉ ना? मी किती स्मार्ट आणि स्ट्रॉंग आहे?… सो चिल्ल्ल…"
"ओय नोटंकी!… मला प्रॉमिस दे…"
ओके बाबा… दिलं प्रॉमिस तुला… तुला माहितीये ना मी…"
"बस झालं आता, माहितीये मला सगळं तुझं…"
आम्ही नेहमीसारखेच आमच्या बेडरूममध्ये झोपलो होतो… अंगावर येणाऱ्या थंड हवेच्या स्पर्शाने जाग आली… खरंतर दारं-खिडक्या बंद असल्याने हवा अंगावर येण्याचा तसा काही प्रश्न नव्हता… बघितले तर बेडरूमच्या बाल्कनीच स्लायडींग डोअर उघडं होत… रात्री झोपताना कदाचित राहिल असेल, म्हणून उठले आणि तो दरवाजा बंद केला… झोपण्यासाठी परत वाळले तर तनमय बेडवर नव्हता… वॉशरूम ला वगैरे गेला असेल म्हणून त्याला बघायला मी बाहेर आले पण वॉशरूम मध्ये कोणीच नव्हतं… म्हणून हॉलमध्ये आले तर घराचा मुख्य दरवाजा उघडा होता… बाल्कनीचा आणि घराचा दरवाजा उघडा, तन्मय घरात नाही हे बघून माझ्या छातीत धडकीच भरली… घराचा मुख्य दरवाजा लावून मी धावतच बेडरुममध्ये आले…
"वैभव!… वैभव अरे उठ ना!… आपला तन्मय बघ घरात नाहीये… आई-बाबा उठाना!… तन्मय बघाना दिसत नाहीये कुठेच…"
माझ्या आवाजाने सगळे खडबडून जागे झाले… सकाळी पडल्या मुळे होत असलेली दुःखी विसरून आई माझ्याजवळ आल्या… बाबा आणि वैभव अख्ख्या घरात तन्मयला शोधून आले…
"प्रीती अगं काय झालं ते तरी सांग?… कुठे गेला तन्मय?… बघितलंस का तू?…"
"नाही ओ!… मी उठले तर बाल्कनी चे दार उघडं होतं… ते लावलं, तन्मय दिसला नाही म्हणून त्याला बघायला हॉल मध्ये गेले, तर आपला मेन डोअर पण उघडा होता… वैभव कुठे असेल रे आपला तन्मय?… त्या चंदीने तर त्याचं काही बरं वाईट केलं नसेल ना?… वैभव मला खूप भीती वाटतीये…"
आणि एवढ्यात दारावरची बेल वाजली… आम्ही सगळे धावतच दाराकडे गेलो… दार उघडलं तर दारात आमचा गुरखा बहाद्दूर उभा होता… तो प्रचंड घाबरलेला होता, काहीतरी भयानक पाहिल्यासारखा त्याचा चेहरा झाला होता…"
त्याने वैभव ला काय सांगितलं माहिती नाही… वैभव धावतच त्याच्या बरोबर खाली गेला… आम्हीही त्याच्या मागोमाग धावत खाली गेलो… आणि खाली जाऊन जे बघितलं ते इतकं भयानक होतं की देवाने कुठलाच आईला असं दृश्य दाखवू नये… चंदी प्रकरण सुरू झाल्यापासून आतापर्यंतच हे सगळ्यात भयानक दृश्य होतं असं मी म्हणेन… वैभव तर डोक्याला हात लावून खालीच बसला… आई-बाबांनीही स्वतःला कसं सांभाळल हे अजूनही मला माहिती नाही… मी तिथेच बसून जमिनीवर हंबरडा फोडला… कारण माझा तन्मय आमच्या वरच्यांच्या म्हणजेच तिसऱ्या मजल्यावरच्या बाल्कनीच्या रेलिंगला बाहेरच्या बाजूने उलटा लटकलेला होता… आबा पाटलाला लटकवताना जे वर्णन नानांनी केलं होतं अगदी तसंच माझ्या तन्मयलाही एका पायाला बांधून त्या रेलिंगला लटकवलेल होतं… मी फोडलेल्या हंबरड्याने बिल्डिंगची ती बाजू अख्खी जागी झाली… बरेच जण खाली उतरले… सोसायटीतल्या लोकांच्या मदतीने बहादूरने तन्मयला खाली उतरवलं… वैभव अजून शॉक मधून बाहेर यायचा होता… कोणीतरी ऍम्ब्युलन्स बोलवून घेतली…
तन्मयला खाली उतरवल, तेव्हां माझ्या बाळाची अवस्था मला बघवत नव्हती…
तन्मयला खाली उतरवल, तेव्हां माझ्या बाळाची अवस्था मला बघवत नव्हती…
त्याने घातलेला नाईट ड्रेस जागोजागी फाटला होता आणि मातीत लोळल्या सारखा दिसत होता… अंगावर सर्व ठिकाणी खरचटल्याच्या खुणा होत्या… पुर्ण चेहऱ्यावर कोणीतरी नखांनी ओरबाडलं होतं… माझा तन्मय बेशुद्ध होता…
ऍम्ब्युलन्स आल्यावर वैभव बरोबर सोसायटीतले दोघं तिघं जण तन्मयला घेऊन दवाखान्यात गेले… सोसायटीतल्या काही बायकांना बरोबर देऊन मी आई-बाबांना वर जायला सांगितलं… ऍम्ब्युलन्स गेली तशी मी घरी जायला वळणार एवढ्यात मला लॉनमधे काहीतरी दिसलं… लॉन वरच गवत अस्ताव्यस्त झालं होतं, माती कोणीतरी खेळल्यासारखी वर आली होती… असं वाटत होतं की लहान मुलांनी तिथे मस्ती केल्यामुळे तो तेवढाच भाग खूप उलटा पुलटा झालाय… माझ्या तन्मय च्या अंगावर जे खरचटलं होतं आणि कपडे मातीत लोळल्या सारखे दिसत होते, जागोजागी फाटले होते त्याचं कारण मला आत्ता समजलं… त्या चंदिनी माझ्या मुलाला या मातीत लोळवला होता आणि तिचं पुढचं काम केलं होतं… मी घरी जायला वळले तेव्हा आमच्या सोसायटीच्या मागच्या गेट जवळ जे जांभळाचं झाड आहे त्या झाडाखाली धावजी पाटील म्हणून कुठलंसं एक छोटेस मंदिर आहे आणि त्या देवाची छोटीशी मूर्ती आहे…
तिथे कसलासा आवाज होऊन सोनेरी रंगात काहीतरी चमकल्याचा भास झाला आणि का माहिती नाही मला परत धडकी भरली…
क्रमशः………
वेलिंग नाडकर्णी...
फ्लॅट- A real horror story -भाग १ -८ > https://marathighoststories.blogspot.com/2019/03/real-horror-story-bhutachi-gosht.html
फ्लॅट- A real horror story -भाग ९-१० > https://marathighoststories.blogspot.com/2019/06/real-horror-story-bhutachi-gosht-9-to-10.html
फ्लॅट- A real horror story -भाग ११-१३ > https://marathighoststories.blogspot.com/2019/06/real-horror-story-bhutachi-gosht-11-to.html
फ्लॅट- A real horror story -भाग १४-१५ >https://marathighoststories.blogspot.com/2019/06/real-horror-story-bhutachi-gosht-14-to.html
फ्लॅट- A real horror story -भाग १६-१८ > https://marathighoststories.blogspot.com/2019/06/real-horror-story-bhutachi-gosht-16-to.html
फ्लॅट- A real horror story -भाग १९ > https://marathighoststories.blogspot.com/2019/07/real-horror-story-bhutachi-gosht-19.html
फ्लॅट- A real horror story -भाग २० > https://marathighoststories.blogspot.com/2019/07/real-horror-story-bhutachi-gosht-20.html
फ्लॅट- A real horror story -भाग २१ >https://marathighoststories.blogspot.com/2019/07/real-horror-story-bhutachi-gosht-21.html