A real horror marathi story
फ्लॅट भाग 21
फ्लॅट भाग २१...
"बिघडलेलं काम सुधारण्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न ते काम अजून बिघडवत जातं…"
त्यादिवशी आम्ही सकाळी साडेसहा पर्यंत कोथरूडला पोहोचलो. सगळं आवरून झालं. आधी कोथरूडच्या स्वामींच्या मठात गेलो, स्वामींचे दर्शन घेऊन मी वरच्या ध्यान मंदिरात गेले. माझ्या दरवेळच्या सवयीनुसार मला त्या ध्यान मंदिरातल्या तसबिरीशी बोलायचं होतं. स्वामींच्या तसबिरीसमोर बराच वेळ डोळे बंद करून बसले होते आणि डोळ्यातून अखंड पाणी वाहत होतं. काही महिन्यांपूर्वी मी अशीच त्यांच्या तसबिरीसमोर बसून रडत होते. पण त्या वेळचं रडण आणि आत्ताच रडणं यात फरक होता. त्यावेळी आजूबाजूला घडत असलेल्या पण आकलन होत नसलेल्या नैसर्गिक घटनांच गाऱ्हाण आणि त्यातून सुटका मिळण्यासाठी आर्जव करायला आले होते आणि आज ती केलेली आर्जव स्वामिंनी ऐकून मला आणि माझ्या कुटुंबाला त्यातून जे सुखरूप पणे बाहेर काढलं त्याचे आभार मानायला आले होते. ध्यान मंदिरात बसून जरी मी एकटीच रडत असले तरी माईंच्या कुशीत शिरल्यावर मला जी माईंच्या मायेची ऊब मिळाली होती तीच आत्ताही मी अनुभवत होते. थोड्यावेळाने वैभवही वरती आला.
"काय झालं प्रीती? आत्ताही तुझ्या डोळ्यात पाणी?"
"वैभव प्रत्येक वेळी दुःखातच डोळ्यात पाणी येतं असं असतं का रे? आज हे डोळ्यातर पाणी आपण त्या घरातून सुखरूपपणे बाहेर पडलो यासाठी आहे त्या दिवशी मी इथे ध्यानाला बसले नसते, स्वामींशी सगळं बोलले नसते, मला दुर्गा भेटली नसती आणि काका ही भेटले नसते तर आपण काय करणार होतो? आज हे सगळं घडवून आणलं ते स्वामींनी ना रे? म त्यांचे आभार मानायला नकोत?"
"खरं आहे तुझं! ते होते म्हणूनच आपण आज वाचलो. माझा खरच ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास नव्हता गं. शाळा-कॉलेज याच्यामध्ये आपण शिक्षण घेतो, तिथे आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये सायन्सच्या दृष्टीने बघायला शिकवतात. प्रत्येक गोष्टीला का? असा प्रश्न विचारायला शिकवतात. पण गेल्या काही दिवसांमध्ये मी जे अनुभवलं त्यामागे कोणतही सायन्स काम करत नाही आणि जिथे सायन्स हात टेकत तिथून पुढे अध्यात्म चालू होतं. खरंच आपल्यासाठी दुर्गा आणि काका हे देवदूतासारखे आले, स्वामींनी आपल्या मदतीला त्यांना पाठवलं."
असं म्हणत वैभवने ही स्वामींच्या तसबिरीसमोर हात जोडले. माझा वैभव नास्तिक नव्हता, पण देवभोळा ही नव्हता. त्याने गेल्या काही महिन्यांमध्ये जे काही अनुभवलं, त्यामुळे त्याची देवावरची श्रद्धा अजून पक्की झाली. हे सगळं जे काही आज तुमच्यासमोर बोलतीये ते काही अंधश्रद्धा पसरवण्यासाठी नाहीये, तर देवावर विश्वास ठेवला तर तो सदैव आपल्या मदतीला धावून येतो. मग कोणत्याही देवावर ठेवा, कोणत्याही साधू संतांवर ठेवा, पण मनापासून श्रद्धा ठेवा.
त्या दिवसानंतर आमचं रेग्युलर आयुष्य सुरू झालं… मुलांना थोडा शाळेत सोडायचा त्रास होतं होता… करण ऍडमिशन घेऊन बसलो होतो, म्हणून शाळा सोडता येत नव्हती… तरी वैभवने विचारलंही एकदा-दोनदा, की आपण परत त्या फ्लॅटवर राहायला जाऊया का? निदान मुलांची ही सेमिस्टर संपेपर्यंत तरी… पण का? माहिती नाही माझी परत त्या घरात जायची इच्छा होईना… आता तिथे चंदी नव्हती, धनाजी नव्हता, कुठले आवाज येणार नव्हते, कोणी त्रास द्यायला नव्हतं, सगळं काही सुरळीत झालं होतं, काकांनी केलेल्या त्या उपायांवर काही अविश्वास नव्हता, चंदी आणि धनाजी परत येतील का? अशी भीतीही नव्हती, पण म्हणतात ना एखादी जागा एखाद्या व्यक्ती एखादी घटना आपल्या मनातून उतरली की आपण ती करू मागत नाही… तसंच काहीतरी त्या फ्लॅटच्या बाबतीत झालं होतं… मुलांच्या परीक्षा संपल्या… एक दिवस दुर्गा आली होती भेटायला…

"काय म्हणताय ताईसाहेब?… तुम्ही तर राव आकुर्डीत येणच सोडलं की… तिथे पण एक फ्लॅट आहे बरं का तुमचा… का आम्हाला विसरलात?…"
"अगं हो! हो!… किती ते आल्या आल्या सुनावशील?… बस जरा श्वास घे!…"
"मी बसते ग सावकाश!… माझी नको काळजी करूस तू… बोल! किती बिझी झाली आहेस?…"
"अग बिझी नाही गं!… इथे आले आणि रेग्युलर रुटीन सुरू झालं… मुलांच्या शाळा, वैभव ची नोकरी, माझे क्लासेस, मग काय त्यात अडकले… एवढच!… काका कसे आहेत? त्या दिवशीच्या गडबडीत तुझ्याकडून त्यांचा नंबर घ्यायचाच राहिला… काही बोलणं झालं? आमच्या बद्दल काही विचारलं त्यांनी?…"
"अगं!… जवळजवळ रोज फोन असतो माझा त्यांना… इनफॅक्ट मला तो करावाच लागतो… पण जेंव्हा जेंव्हा मी फोन करते, तेव्हा तेव्हा तुमच्या अख्ख्या कुटुंबाची चौकशी असते त्यांची… ते म्हणालेत मुलांना सुट्टी असेल तर इथे या, पण त्याआधी त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला त्या जागेवर जागरण गोंधळ घालायला सांगितलाय काळूबाईच्या नावाने…"
"आहे लक्षात!… कालच माझं आणि वैभवचं बोलणं झालं होतं, की आनायसे मुलांच्या परीक्षा संपल्यात, थोडे दिवसाची सुट्टी काढ, आपण जागरण गोंधळ घालून घेऊ आणि थोडे दिवस काकांकडे ही जाऊन येऊ…"
त्यानंतर बराच वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्या, वैभवही थोड्यावेळात ऑफिसमधून आला… दुर्गाची आणि त्याची ही भेट झाली… जागरण गोंधळासाठी लागणारी माहिती दुर्गा काढून कळवणार होती… दोनच दिवसात मॅडमचा परत फोन आला, येत्या दोन दिवसांमध्ये जागरण गोंधळ साठी लागणारी पूर्ण तयारी करून आम्ही परत आकुर्डीच्या आमच्या त्या फ्लॅट कडे जायला निघालो…
त्या फ्लॅटच्या सोसायटीत जाताना माहित नाही का? पण मनावर खूप दडपण होतं… खरं तर सगळं व्यवस्थित झालं होत, पण मनाला हुरहूर लागून राहिली होती… कुठेतरी मनात पक्क झालं होतं, की आपण या फ्लॅटमध्ये परत काही पाऊल ठेवायच नाही… त्यादिवशीची काळूबाईची जागरण गोंधळाची पूजा, तो गोंधळ हे सगळं व्यवस्थित पार पडलं… यथासांग पूजा झाल्यानंतर गोंधळ चालू व्हायच्या आधी धावजी पाटलांचा त्या छोट्याशा देवळामध्ये मला परत काहीतरी सोनेरी रंगाच चमकल्या सारखा दिसलं… जसं तन्मय वर जेव्हा चंदीने त्या रात्री हल्ला केलेला तेंव्हा दिसलं होतं तसंच… मी दुर्गाला ते लगेच सांगितलं…

"अगं ताई!… जशी चंदी आणि धनाजीने त्यांच्या कुलदैवताकडे मदत मागितली आणि देवाने त्यांना मदत दिली… तुला त्यादिवशी रात्रीच जे दिसलं ते धनाजी ला मिळालेला सपोर्ट होता अस समज पण आपण जे देवाला गाऱ्हाणं घातलं, आपण जो आपला प्रॉब्लेम देवाला सांगितला, त्याच्याकडे सुखरूप या सगळ्यांतुन बाहेर पडण्यासाठी मदत मागितली आणि हा जागरण गोंधळ घातला… आता हे सगळं झाल्यानंतर तुला तो प्रकाश त्या छोट्याशा देवळात परत दिसला याचा अर्थ हा जागरण गोंधळ सफल झाला… तो तेंव्हा ही तुलाच दिसला होता आणि आताही तो फक्त तुलाच दिसला… काळजी नको करूस, सगळं व्यवस्थित होईल…"
गोंधळाच्या पहाटे दुर्गा आम्हाला तिच्या घरी घेऊन गेली… घर कसलं! मोठा वाडा होता तो… घरासमोर पडवी होती, घराच्या बाहेर बैठकीची व्यवस्था होती, तिथे झोका, आराम खुर्च्या असं भरपूर काही ठेवलेलं होतं… आत मध्ये भरपूर खोल्या होत्या, त्या अख्ख्या मोठ्या वाड्यात दुर्गा आणि तिचे आई-वडीलच राहत होते… दुर्गा आणि तिच्या आई-बाबांनी आम्हाला त्यांचा अख्खा वाडा फिरवून आणला… एवढा मोठा बंगला बघून माझी मुलं तर फक्त तिथे बागडत होती… शहरातल्या लोकांना एवढं मोठं घर बघायला मिळत नाही कधी… सगळ्या खोल्या फिरवून झाल्यावर आम्ही शेवटी देवघरात आलो… प्रशस्त देवघर होतं, साधारण एखादा माणूस मांडी घालून बसावा तर किती मोठा होईल एवढा मोठा तर देव्हारा होता… त्यात कदाचित त्यांचे पिढीजात चालत आलेले टाक, देव ते सगळं होतं… आम्ही एकेक करुन सगळ्यांनी नमस्कार केला… शेवटी मी नमस्कार करण्यासाठी गेले, देवाला डोकं ठेवून नमस्कार केला अन वरती उठले आणि मला आश्चर्याचा मोठा धक्का बसला…
"माई!… दुर्गा या तर माई!…"
"सगळे जरा बाहेर जा… मला ताईशी काही बोलायचं…"
असं म्हटल्यावर सगळेजण बाहेरच्या खोलीत गेले दुर्गाच्या घरच्या देवघरात आता फक्त मी आणि दुर्गा होतो… दुर्गाने देवघराचं दार आतून लावून घेतलं…
"दुर्गा अग हे कसे शक्य आहे?… माई?…"
"हो माईच!… तो माईचाच फोटो आहे…"
"जोपर्यंत तुम्हा सगळ्यांना या संकटातून बाहेर काढत नव्हते तोपर्यंत ही गोष्ट तुला सांगू नये असं मला वाटलं… तू सुरुवातीला जेंव्हा या फ्लॅट मध्ये राहायला आलीस तेव्हाच तुला माई भेटली… ती भेटली, कारण तिला तुझ्यावर असलेल्या संकटाची पूर्ण जाणीव होती… ती वेळोवेळी तुझ्याबरोबर राहिली, तुला लक्षात आलं की नाही मला माहिती नाही पण माई तुला एकटीलाच भेटली, ती आत्तापर्यंत कधीच तुझ्या घरातल्या इतर कोणाला भेटलेली नाही आणि दिसलेली ही नाही… ज्या वेळेला तुला चंदीच्या तावडीतून माईने सोडवलं त्या ही वेळेला आम्हाला दार उघडलं गेलं, पण तू बेशुद्धावस्थेत होतीस आणि माई कोणालाच दिसली नव्हती… आज पर्यंत ती जेंव्हा जेंव्हा तुला भेटली आहे, तेंव्हा तेंव्हा तिने तुझी मदतच केली आहे… कारण ती फक्त तुझ्या मदतीसाठी आली होती… चंदी आणि धनाजी च्या तावडीत सापडणाऱ्या प्रत्येकाला माई अशी मदत करते… आता मात्र करायची असं म्हणावं लागेल… तुला आठवतं? तुझ्याकडे एक रुद्राक्षाची माळ माईने दिली होती? कुठे आहे ती?…

"अगं हो!… मी परत कोथरूडला आल्यापासून ती माळ माझ्या जवळ नाहीच ए… ती कुठे? कशी? केव्हां? गेली काहीच कळलं नाही…"
"ती बघ!… ती रुद्राक्षाची माळ परत देव्हाऱ्यात आहे… त्या माळेवर मालकीहक्क फक्त आणि फक्त माईचा आहे… तू संकटातून मुक्त झालीस आणि ती माळ परत देवार्यात आली… तू संकटात असताना जेंव्हा माईने तुला माळ दिली, तेंव्हा देवाकडची माळ गायब झालेली मी प्रत्यक्ष बघितली… तुझी माझी भेट होणं माईचा संकेत होता… माझी माई म्हणजे माझ्या वडिलांची आई… माई आणि काकांचे गुरु हे गुरुबंधू भगीनी… म्हणूनच त्या दिवशी सकाळी आपण परत येत असताना काकांना जो आवाज दिला गेला, तो माईंनीच दिला होता… त्यादिवशी सकाळी पण ती तुला भेटली तेंव्हा आम्ही माईला बघुन आनंदी झालो होतो म्हणून हसत होतो आणि आता सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगू?…"
"काय?…"
"माई कोण आहे माहिती आहे?…"
"नाही!… सांग ना?…"
"माई चं पूर्ण नाव 'नंदिनी आबा पाटील'… लग्नापूर्वीच… माई म्हणजे तीच नंदिनी, आबा पाटलाची मुलगी, चंदी आणि धनाजी यांच्या घडलेल्या इतिहासाची प्रत्यक्ष साक्षीदार…"
"म्हणजे आबा पाटलांची मुलगी नंदिनी ही तुझी…"
"हो माझी आजी, माझ्या वडिलांची आई…"
मी पाच मिनिटं दुर्गा कडे अवाक होऊन बघत होते… दुर्गा सांगत होती त्यावर दोन मिनिट विश्वासच बसत नव्हता… मला इतके दिवस दिसत असलेल्या, माझ्याशी बोलत असलेल्या, माझ्या मदतीला धावून येणाऱ्या माई या वारल्यात?… मी त्यांना इतक्या जवळून अनुभवले, त्यांच्या कुशीत शिरून रडले, त्यांनी मला मायेने थोपटलं, त्यामुळे या सगळ्यावर विश्वास ठेवण दोन मिनिटं माझ्या आवाक्याबाहेरचं होतं… फ्लॅटमध्ये आमच्या बरोबर जे जे म्हणून काही घडलं ते ज्या पाटील कुटुंबामुळे ते इथेच राहत होतं?… इथेच कुठेतरी या देवघरात अक्कासाहेब बसत असतील, दिवस दिवस आबा पाटील लपून राहत असेल… मला त्या घरात घडलेले आणि पोस्टमन काकांनी सांगितलेले एकेक प्रसंग डोळ्यासमोर यायला लागले?
"ताई!… ताई मला हे सगळं तुझ्यापासून लपवायचं नव्हतं, पण मी त्या वेळेला जर हे तुला सांगत बसले असते सगळं तर कदाचित तू वेगळा काहीतरी अर्थ काढून वेगळा पर्याय निवडायच्या नादात अजून चंदी आणि धनाजी च्या जाळ्यात अडकली असतीस… म्हणून हे सगळं होऊन गेल्यावर तुला सांगण्यासाठी मी थांबले होते… हे सगळं मी काकांच्या ही कानावर घातलय, अजिबात काळजी करू नकोस आता तुम्ही सर्व संकटातून बाहेर पडले आहेत… आपल्यामुळे कोणावर तरी संकट ओढवले तर आपल्याला मदत करायला हवी म्हणूनच माईने मला तुझ्याकडे पाठवलं होतं…"
"दुर्गा एक विचारू?…"
"विचार ना…"
"माईंनी तुला माझ्याकडे पाठवलं… मग तू आणि काकांनी आधीच मिळून चंदी आणि धनाजी ला मुक्त का नाही केलंत?…"
"अगं ताई!… शिशूपालाचे ही शंभर अपराध झाले नाहीत तोपर्यंत श्रीकृष्णाने त्याचा वध केला नाही… त्या आधीही श्रीकृष्णाकडे सुदर्शन होतच की, पण शंभर अपराध त्याचे होणे बाकी होतं ना… तसंच चंदी आणि धनाजी च्या बाबतीतही त्यांचे जोपर्यंत अपराध पूर्ण होत नाहीत तोपर्यंत त्याना शिक्षा देणं किंवा मुक्ती देणं शक्य नव्हतं… चल आपण बाहेर जाऊ, पण माईच सीक्रेट फक्त तुझ्यापर्यंत ठेव… सांगायला हरकत नाहीये, पण कोणी विश्वास ठेवला नाही तर त्याचा त्रास तुलाच होईल…
"दुर्गा मला माई परत दिसतील का गं?…"
"नाही माहिती मला!… मी जेंव्हा तिला मनापासून हाक मारली आहे तेंव्हा तेंव्हा ती माझ्या मदतीला आली… तू ही मरून बघ…"
देवघरातल्या माईंच्या तसबिरीसमोर मी हात जोडून वाकून नमस्कार केला, तसबीरी वरच फुल टपकन खाली पडलं…
"ताई तुला माईने आशीर्वाद दिला… ते बघ फुल पडलं…"
माईंनी दिलेला आशीर्वाद बरोबर घेऊन मी आणि दुर्गा देवघराच्या बाहेर आलो… दुर्गाच्या आईने जेवणाचा मस्त बेत केला होता… दुपारी जेवून, थोडा वेळ आराम करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो…
आम्ही काकांकडे निघालो होतो… दुर्गाच्या बाबांच्या गाडीत सासू-सासर्यांना बसवून दुर्गा मी वैभव तन्मय आणि रुद्र आम्ही काकांच्या घरी जायला निघालो… काकांच्या घरी पोहोचायला आम्हाला तीन चार तास लागणार होते, पण मुलं आणि दुर्गा यांच्या दंग्यांमध्ये, त्यांची मस्ती, त्यांचे लाड, फोटोसेशन, रस्त्यात थांबून खाणं, या सगळ्यांमध्ये आम्हाला काकांच्या घरी पोहोचायला पाच-सहा तास लागले… काकांच्या घरी पोहोचायला शेवटी शेवटी आम्हाला कच्चा रस्त्याचा वापर करावा लागला… त्यांच्या घरापर्यंत गाडी गेली, पण घराकडे जाईपर्यंत साधारण अर्ध्या एक तासाचा जो भाग होता तो संपूर्ण झाडीने व्यापलेला होता… असं वाटत होतं की आम्ही एखाद्या जंगलातून काकांच्या घरी चाल्लोय… इतर वेळेला म्हणे त्या गावात फक्त दिवसातून दोन का तीन वेळाच बस येते… काकांच घर गावापासून थोडस लांब एका धरणा काठी होतं… धरणाच नाव नाही माहिती, कारण ते खूप प्रसिद्ध धरण होतं असं नाही… पण आजूबाजूच्या गावातल्या लोकांनी पाण्यासाठी पैसे वाचवून उभा केलेला तो छोटासा डॅम होता… ते काकांच्या घरामागून डॅमचं पडणारे पाणी हे डोळ्यांना आल्हाददायक दृश्य होतं… काकांचे घर त्या डॅमच्या जवळ होतं आणि काकांच्या घराच्या मागच्या बाजूला त्या डॅमचे दरवाजे उघडत होते… त्याच्यामुळे मागून पडणारे पाणी आणि ते काकांचे घर परफेक्ट जुळून आलं होतं… एखाद्या चित्रकाराने त्याचे चित्रच काढावे… काकांच्या घराचं बांधकाम विटांच असलं तरीसुधा खूप साधं होतं… खाली दोन खोल्या आणि किचन वरती जायला घरातल्या आतल्या बाजूने फिरलेला एक जीना… वरती तशाच तीन खोल्या, त्याच्यावरती मोठी गच्ची… अख्खं घर काकांनी सौरऊर्जेवर चालवलं होतं… काकांच्या गावात वीज आली होती, काकांनी कनेक्शनही घेतलं होतं पण वरती सौर ऊर्जेचे पॅनल बसल्यामुळे त्यांच्या घराला आणि शेतीला वेगळ्या विजेची गरज नव्हती… घर आतून बाहेरून एकदम चकाचक होतं… काकांच्या घरी काका त्यांची बायको त्यांची मुलगी अमृता हे तिघे राहत होते… अमृता आर्किटेक्चर करत होती, सुट्टीसाठी म्हणून घरी आली होती… खूप गोड होती, माझी मुलं दुर्गाशी जशी एकदम मिळून-मिसळून होती तशीच अमृताने ही त्यांना आपलंसं करून घेतलं… चौघांची तर एकदम गट्टी जमली होती… आमच्या रुद्र ने तर अमृता ताई च एकदम अमूताईच करून टाकलं होतं… काकांच्या घराच्या समोर पडवी होती, त्यात शेरू नावाचा एक कुत्रा बांधला होता… एका कोपऱ्यात गोठा होता, त्यात कपिला आणि कल्याणी अश्या गाई होत्या… घराच्या आजूबाजूला लाकडी काटक्यांचे कुंपण घातलं होतं घराच्या चोहोबाजूंनी वेगवेगळी झाडं लावली होती त्याच्यात आंबा, चिकू, पपई, जांभूळ, कडूनिंब, लिंबू, सिताफळ, रामफळ, फणस, अशी भरपूर झाडे होती… घराच्या मागच्या बाजूला परसामध्ये वेगवेगळ्या भाज्या लावल्या होत्या ज्याच्यात वांगी, तोंडली, भेंडी, गवार, मिरची, घराच्या आजूबाजूच्या कुंपणावर भोपळा, दोडकं यांचा वेल सोडला होता, घराच्या मागच्या बाजूला एक भलं मोठं शेवग्याचं झाड होतं… मागूनच धरणाकडे जायला छोटी पायवाट केली होती… त्या पायवाटेने काकांनी आम्हाला सगळ्यांना धरणही फिरवून आणलं… काका धरणाच्या इतके जवळ राहत होते, की धरणाचे तुषार माझ्या मुलांनी पहिल्यांदा अनुभवले… संपूर्ण घर बघून झाल्यावर आम्ही सगळे स्वयंपाक घरात आलो… शहरातली माणसं येणार म्हणून काकू चूलीवर जेवण करत होत्या आणि पुढे आम्ही जे दोन दिवस राहणार होतो तेही चुलीवरच करावं असं काकांनी आधीच सांगून ठेवलं होतं… काकांना एक मुलगा पण होता, पण तो कामानिमित्त शहरात असायचा महिन्या दोन महिन्यात येऊन जाऊन करायचा… आम्ही सगळे स्वयंपाक घरात बैठक लावून बसलो होतो… अमू काकूंना मदत करत होती, काकूंनी मला काही काम करायला दिलं नाही… काकूंनी मस्त भरलं वांग आणि ज्वारीच्या भाकरीचा बेत केला होता… सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाकासाठी लागणारे सामान हे सर्व घरच्या शेतातलं होतं… धान्यापासून भाज्यां पर्यंत… भरली वांगी करताना अमूने मागच्या परसात जाऊन पटापट वीस-पंचवीस वांगी तोडून आणली, वाटणा घाटणासाठी लागणाऱ्या नारळा पासून मिरची पर्यंत सगळं घरातच… आमच्या शहरातल्या बायकांना भाकरी थापत थोडं अवघड जातं, पण बारा-तेरा जणांसाठी च्या भाकऱ्या काकूंनी पटापट थापल्या… काकांच्या घरात मला लक्षात आलेली एक गोष्ट अशी, त्यांनी सगळ्या खोल्यांमध्ये स्पार्टेक्स ची फरशी बसवलेली असली तरी स्वयंपाक घरात मात्र शेणाने सारवून घेतलेली जमीन होती… काकांचा स्वयंपाक घरात बसल्यावर गावच्या घरी बसल्याचा फिल भारी होता… घर आतून जरी मॉडन असलं, विचारांनी जरी प्रगत असलं, तरी संस्कारांनी देशी होतं… शेणामातीने सारवलेल्या जमिनीवर बसून जेवणाचा आनंद काही वेगळाच होता… पोटभर जेवून झाल्यावर बाहेरच्या पडवी मध्येच आज सगळ्यांची झोपायची सोय केली होती… तन्मय आणि रुद्र काकांचा हात पकडून त्यांनी लावलेल्या आजूबाजूच्या बागेची पूर्ण माहिती कळत नसूनही त्यांना खोदून खोदून विचारत होते…
हे कुठलं झाड? कुठली फळ येतात? हे फळ म्हणजे कुठलं? कसं खातात? तुम्ही ते फळ खाल्लंय? मं आत्ता का नाहीयेत फळ? त्याला फळ कधी येणार? किती दिवस असतात? मग तुम्ही इथेच हे झाड का लावलं? मं तुम्ही दोन झाडं का नाही लावली? एका झाडाला किती फळे येतात? हे आणि असे असंख्य प्रश्न विचारून रुद्र नी काकांना जणू हैराण केलं, पण काकाही एवढे हजरजबाबी… काकाही दोन्ही लहानग्यांच्या प्रश्नाला त्यांच्यापेक्षा लहान होऊन पुरून उरले… माझ्या मुलांच्या प्रत्येक प्रश्नाला समाधानकारकरीत्या उत्तर देऊन काकांनी शेवटी त्यांना झोपायला आणलं… खरं तर खूप दिवसांनी भेटलो, म्हणून काकांशी गप्पा मारण्याचा विचार होता… पण काल रात्रीच जागरण गोंधळ, आजची झालेली दगदग त्यामुळे सगळे लवकर झोपले…

पहाटे जाग आली तर गुरु-शिष्याची जोडी पूर्वाभिमुख ध्यानाला बसली होती… मी त्यांच्या बाजुला येऊन बसले, ध्यान काय करतात हे मला काही माहिती नव्हतं… पण दोघांना असं बसलेलं बघून आपणही यांच्या सहवासात बसाव असं वाटलं म्हणून येऊन बसले… थोड्यावेळाने दोघेही ध्यानातून जागे झाले…
"अरे वा!… प्रीतीजी आम्हाला वाटलं शहरातल्या लोकांना जरा निवांत झोप लागेल… पण तुम्ही तर लवकर उठलात की… नवीन जागा म्हणून झोप लागली नाही का?…"
"नाही हो काका… उलट खूप मस्त झोप लागली… उठून बघितलं तर तुम्ही दोघे ध्यानाला बसला होतात, म्हणून येऊन बसले तुमच्याजवळ… मला काही तुमच्यासारख ध्यान वगैरे लावता येत नाही…"
"अहो शिकलं की सगळ येतं… लावायचय ध्यान?…"
"शिकवाल मला?…"
"हो! हो!… तुमची शिकायची तयारी आहे तर मी आड्णारा कोण?…"
त्याच्यानंतर मला काकांनी ध्यान लावायला शिकवले… मी ध्यानाला बसल्यावर काकांनी त्यांच्या दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवर घासून त्यांचा उजवा हात माझ्या डोक्यावर ठेवला, त्यावेळी मात्र माझ्या डोक्यातून जमिनीपर्यंत एक ऊर्जेचा प्रवाह पास झाला असं वाटलं… त्याच्यानंतर मी बराच वेळ स्वामींना आठवून ध्यानाला बसले होते, दहा-पंधरा मिनिटात माझे ध्यान झालं असेल…
"कसं वाटलं?…"
"एकदम फ्रेश झाल्यासारखं…"
"व्हेरी गुड!… रोज केलं तर फायदा तुमचाच आहे… चिंतन करा चिंता करू नका…"
"अजून एक गोष्ट विचारायची होती…"
"बोला ना काका…"
"त्या घराबद्दल अजूनही मनात संभ्रम आहे?… भीती आहे?…"
"मनात संभ्रम आहे, पण भीती नाही… पण त्या घरात परत जायची इच्छा होत नाहीये…"
"विकून का नाही टाकत घर?…"
"विकायचा प्रयत्न करतोय, पण अजूनही काही जमून येत नाहीये…"
"माझ्या अंदाजाने अजून दिड एक महिन्यात ते घर विकलं जाव…"
"तसं झालं तर फार बरं होईल ओ काका…"
"हममम… बघू भगवंताच्या मनात काय आहे… जे होतं ते चांगल्यासाठीच…"
तिथून परत आले तर आमचा नोटंकी कधी नाही ते लवकर जागा झाला होता…
"रुद्र काय झालं रे? इतक्या लवकर का उठलास?
ते तू काल म्हणाली नव्हतीस का… ते काकू स्वयंपाक घरात काहीतरी करणार आहेत ते, गायीच्या शि ने काहीतरी…"
"अच्छा हां… शेणाने जमीन सारवणार आहेत…"
"हा तेच!… आम्हाला बघायचंय ते… दादू उठ ना रे…"
तन्मय आणि रुद्र बरोबर मीही स्वयंपाक घरात आले, तर तिकडे अमू होती… तिच्याकडून कळालं की काकू गोठ्यात गेल्यात… माझ्या शहरात वाढलेल्या मुलांना हे सगळं नवीन होतं, म्हणून मी दोघांना तिकडे घेऊन गेले… काकूही काकांसारख्याच खूप लाघवी आणि प्रेमळ होत्या… माझ्या दोन्ही मुलांना नीट समजावल त्यांनी… काकूंच गोठ्यात गेल्यावर पहिले गाईंवर माया करणे, त्यांच्याशी बोलणे, त्यांच्या वासरांना आधी दूध पिऊ देणे, गाईचं दूध काढायच्या आधी गाईची आचळं स्वच्छ साफ करून घेणे, गाईचं दूध काढणे, दूध काढून झालं की गोठा सगळा साफ करून घेणे, गायीच्या शेणाने स्वयंपाकघर सारवणे, ह्या सगळ्या गोष्टी नीट समजावल्या… गाईवर माया का करावी? गायीच्या वासराला आधी दूध का प्यायला द्यायचं? गायीशी गप्पा का मारायच्या? गाय उभी राहते ती जागा आपल्या घरा सारखी स्वच्छ का ठेवायची? जमीन शेणाने सारवली की काय होतं? या सगळ्या गोष्टींचे फायदे काकूंनी माझ्या मुलाना सांगितले… त्याच्यात रुद्रने अजून वेगवेगळे प्रश्न विचारून काकूंना भंडावून सोडलं ते वेगळच…
"प्रीती लबाड आहे तुझं धाकटं, पण दोन्ही पोरं प्रेमळ आहे तुझी…" असा काकूंनी शेराही दिला…
सकाळचा चहा आणि न्याहारी झाल्यानंतर काका आम्हाला त्यांच्या स्वतःच्या बांधलेल्या शिव मंदिरात घेऊन गेले… त्यांच्या शेता जवळच जमिनीच्या एका छोट्याशा तुकड्यांमध्ये काकांनी एक छोटसं शिव मंदिर उभारलं होतं… त्याशिवाय मंदिरा च्या आजूबाजूला गणपतीचं, रामाचं, मारुतीचं, दत्त महाराजांच, दुर्गेच अशी इतर सगळ्यांची छोटी छोटी मंदिरं होती… देवळांच्या आजूबाजूचा परिसर हा झाडांनी वेढलेला होता… प्रसन्न वातावरण होतं… आम्हाला देवळात बसवून काकांनी तन्मय आणि रुद्रला शेत फिरवून आणलं… आमच्या सगळ्यांच्या जेवणाची सोय काकांनी शेतातच केली होती… अमू दुर्गा आणि काकू सगळं जेवणाचं साहित्य घेऊन शेतात आल्या होत्या… आज काकांचा शेतात जेवण बनवायचा प्लॅन होता… घरच्या दुधाचं बनवलेले पनीर वापरून काका पनीर बटर मसाला बनवणार होते… वाटण-घाटण काकांनी सांगितलेल्या पद्धतीने काकू करून घेऊन आल्या होत्या… मिक्सरवर वाटलेल काकांना कदाचित आवडत नव्हतं, म्हणून स्पेशल पाटा-वरवंट्या वर वाटलेलं वाटण काकूंनी आणलं होतं, काकांनी तिथेच दगड जमवून त्यात बाजूला पडलेल्या काटक्या टाकून चुल पेटवली… आज पनीर बटर मसाला बरोबरच उलट्या खापरावर भाजलेल्या मैद्याच्या चपात्या ही होत्या रोटी म्हणून आणि जिरेसाळ तांदळाचा जीरा राईस… मजा, मस्ती, गप्पा हे सगळं करत असतानाच एकीकडे काकांचा जेवण बनवण्याचा प्रोग्राम चालू होता… तासा-दीड तासा नंतर काकांनी सगळ्यांना जेवायला बसायला सांगितलं आणि पनीर बटर मसाला बरोबरच गरम-गरम रोट्या आम्हाला खायला वाढल्या… काकांच्या बटव्यातून नवीन नवीन गोष्टी बाहेर पडत होत्या… फक्त अध्यात्मातच त्यांचा हातखंडा नव्हता तर स्वयंपाकातही ते मास्टर होते… ज्याच्या शीरी स्वामींचा वरदहस्त असेल त्याला अष्टसिद्धी प्राप्त व्हायला असा कितीसा वेळ लागणार?… पण कधीतरी दुर्गा ने सांगितलं होतं, काकांनी हे सगळं मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे… लोककल्याण आणि तेही कोणत्याही प्रकारचा हाव नं धरता करायचं तर त्याची फार मोठी किंमत मोजावी लागते… इतक्या सहजासहजी मनात असूनही देव कोणाचं कल्याण करायला देत नाही… लोकांचे कल्याण करण्याकरता लागणारी शक्ती मिळवायची असेल तर त्याच्या मागे भरपूर साधनेची तपश्चर्या लागते आणि काकांनी ती केलीये आणि म्हणूनच काकांना अशक्य असं काही नाही… तरीसुद्धा काकांना कसलाही मोह नाही, कुणाबद्दल द्वेष नाही, कोणाबद्दल राग नाही, आज त्यांनी ठरवलं तर कोणतीही गोष्ट त्यांच्या पायाशी लोळण घेईल, पण त्यांनी सगळ्यांची आसक्ती सोडली आहे, ते सगळ्यांमध्ये आहेत पण कोणा मध्येच अडकलेले नाहीत, सगळ्यांमध्ये राहून एकटं राहिला शिकता आलं पाहिजे… दुपारी त्या निसर्गाच्या सानिध्यात जेऊन आणि आराम करून आम्ही परत काकांच्या घरी आलो… आज रात्री सगळ्यांचा गच्चीवर झोपायचा प्लॅन झाला… दुर्गा आणि अमूने गच्चीवर झोपायची सगळ्यांची सर्व तयारी करून घेतली… आम्ही सगळे गच्चीत आलो, उद्या दुपारी आम्हाला परतीच्या प्रवासाला निघायचं होतं… जास्तीत जास्त वेळ काकांच्या अध्यात्मिक सानिध्यात घालवावा अशी मनापासून इच्छा होती आणि झालंही तसंच… मुलं झोपली पण आम्ही सगळे मोठे गप्पा मारत बसलो… मग त्याच्यात वेगवेगळे विषयांवर चर्चा झाली… राजकारण, समाजकारण, अर्थकारण, कला, अध्यात्म, इतिहास… प्रत्येकाने आपापल्या परीने या सगळ्यात भाग घेतला… पण सगळ्यात पुढे होते ते काका… राजकारण आणि समाजकारणात त्यांना थोडा इंटरेस्ट नाही असं दिसलं, पण अध्यात्म, इतिहास, कला या क्षेत्रामध्ये त्यांचं नॉलेज अफाट होतं… काकांशी गप्पा मारता मारता पहाट कधी झाली हेच कळलं नाही… आम्हाला सगळ्यांना जबरदस्ती तासभर का असेना झोपा असं सांगून काका चक्कर मारायला बाहेर पडले… तास-दोन तासांची झोप घेऊन आम्ही सगळे परत उठलो, पण एकाच्याही चेहऱ्यावर झोप किंवा आळस नव्हता, सगळे टवटवीत… दुपारची जेवण झाल्यावर परतीच्या प्रवासासाठी निघालो… निघताना काका-काकूंना आणि अमूला पुण्याचं आमंत्रण देऊनच… मुलांनी अमूताईचा नंबर मोबाईल मध्ये सेव करून फेवरेट लिस्ट मध्ये पण टाकला… अमू शिकायला पुण्यातच होती, त्याच्यामुळे तिची भेट होणार हे सहाजिक होतं… पण काकांना आग्रहाचे निमंत्रण अत्यावश्यक होतं… काकांनी ह्या छोट्याशा भेटीमध्ये किंवा ओळखीमध्ये आमच्यावर केलेले उपकार हे न विसरण्यासारखे होते… असे केलेले उपकार जर कोणी विसरलं, तर देवाने त्याला परत त्याचा आगीत टाकून द्यावं असं मला स्वतःला वाटतं…
काकांकडे दोन दिवस धमाल करून परत आल्यानंतर वैभव परत त्याच्या ऑफिसच्या कामात अडकला, मीही माझ्या मुलांमध्ये अडकले… परीक्षा झाल्या होत्या, त्याच्यामुळे सुट्ट्या तर होत्याच… घरासाठी कोणी गिऱ्हाईक आलं तर मात्र दाखवायला मला जावं लागायचं… तिकडे जातानाही दुर्गाताई कडे जायचा हट्ट, त्यामुळे मुलांनाही घेऊन जावं लागायचं… मग सकाळी दुर्गा कडे जायचं, थोडा वेळ मुलांना तिकडे सोडायचं, फ्लॅट बघायला आलेल्या माणसाला फ्लॅट दाखवायचा, तो दाखवून झाला की परत दुर्गा कडून मुलांना घ्यायचं आणि घरी यायचं असं आठवड्यातून तीन-चार वेळा तरी होतं होत…
काकांनी सांगितलं तसं दीड दोन महिन्यांमध्ये आमचा फ्लॅट आणि त्याची सांगितलेली किंमत ह्या दोन्ही गोष्टी आवडलेले आणि पटलेले एक कुटुंब आम्हाला मिळालं… कुटुंबाचे नाव होतं मंगेश पाध्ये आणि मानसी पाध्ये…
हे दोघे नवरा बायको फ्लॅट बघायला एकत्रच आले होते… नवीनच लग्न झालं होतं, त्यामुळे मुलबाळ कोणी नव्हतं अजून… नवरा आयटी कंपनीत कामाला होता, बायकोही आयटी कंपनीत होती पण पुण्यात शिफ्ट झाल्यामुळे अजून जॉब शोधायचा होता… साधारण एक महिन्याभरात या कुटुंबाशी आमचे सर्व व्यवहार पूर्ण झाले आणि तिथे असलेल्या सर्व फर्निचर सकट आम्ही आमचा तो फ्लॅट पाध्ये कुटुंबीयांना विकला… आज त्यांना चावी दिलेला दिवस आहे आजच मी त्या फ्लॅटच्या सर्व व्यवहारातून मुक्त झालीये… म्हणूनच मी ही गोष्ट आज सांगायला घेतली… आज सकाळी मी आणि वैभवने जाऊन पाध्ये कुटुंबाला त्या घराच्या चाव्या देऊन आलो… येत्या एक-दोन दिवसांमध्ये ते दोघे नवरा बायको आमच्या फ्लॅटवर राहायला जातील… आज खऱ्या अर्थाने मी या फ्लॅटच्या आणि त्या मुळे निर्माण झालेल्या सर्व अडचणीतुन मोकळी झाले आणि म्हणूनच मी तुम्हाला ही सर्व गोष्ट सांगितली… आपण वेळातवेळ काढून माझा अनूभव ऐकलात त्या बद्दल आभारी आहे…

समाप्त………🙏🙏🙏
मध्ये काही दिवस गेल्यानंतर…
मंगेश सकाळी ऑफिसला गेल्यावर मानसी चहा घेत आणि पेपरमध्ये जॉब च्या एड बघत बाल्कनीत बसलीये आणि तेवढ्यात…
टप!… टप!… टप!… हेहेहेहे!…
मानसीला पाण्याची टिपटिप आणि बाळाच्या हसण्याचा आवाज ऐकायला आला…
आणि इथे…
त्याच वेळी काकांच्या घरी दुर्गा ला ध्यानाचा प्रकार शिकवताना काळे काका ध्यानात बसलेले…
तेवढ्यात खाडकन डोळे उघडून दुर्गा ला…
तेवढ्यात खाडकन डोळे उघडून दुर्गा ला…
चंदीच बाळ…
सार काही सुरळीत चालू असताना फार मोठ्ठ्ठ विपरीत घडण्याची तयारी चालू असते हेच खरं…
आणि म्हणूनच…
क्रमशः………🙏🙏🙏
क्रमशः………🙏🙏🙏
||श्रीकृष्णार्पणमस्तू|
फ्लॅट- A real horror story -भाग १ -८ > https://marathighoststories.blogspot.com/2019/03/real-horror-story-bhutachi-gosht.html
फ्लॅट- A real horror story -भाग ९-१० > https://marathighoststories.blogspot.com/2019/06/real-horror-story-bhutachi-gosht-9-to-10.html
फ्लॅट- A real horror story -भाग ११-१३ > https://marathighoststories.blogspot.com/2019/06/real-horror-story-bhutachi-gosht-11-to.html
फ्लॅट- A real horror story -भाग १४-१५ >https://marathighoststories.blogspot.com/2019/06/real-horror-story-bhutachi-gosht-14-to.html
फ्लॅट- A real horror story -भाग १६-१८ > https://marathighoststories.blogspot.com/2019/06/real-horror-story-bhutachi-gosht-16-to.html
फ्लॅट- A real horror story -भाग १९ > https://marathighoststories.blogspot.com/2019/07/real-horror-story-bhutachi-gosht-19.html
फ्लॅट- A real horror story -भाग २० > https://marathighoststories.blogspot.com/2019/07/real-horror-story-bhutachi-gosht-20.html
फ्लॅट- A real horror story -भाग २१ >https://marathighoststories.blogspot.com/2019/07/real-horror-story-bhutachi-gosht-21.html