Part 2....ब्ल्यू साडी..
मी तो दिवस कसाबसा ढकलला... रात्री घरी येताच मात्र तापाने फणफणलो... आईने रात्र जागून काढली. मी झोपेतही काहीबाही बरळत होतो... अंगावर ठिकठिकाणी जखमा झाल्या होत्या.. आणि त्या मला रात्री खूप त्रास देत होत्या.. पण काही केल्या "ती ब्ल्यू साडी "मनातून जाईना. जणू ती मंद हसत मला बोलावत होती अगदी झोपेतसुद्धा..... !!
आठ दिवसांनी मी पुन्हा ऑफिसला जॉईन झालो..
सगळे माझी विचारपूस करीत होते... पण सुजय मला दिसला नाही.. माझ्या सहकाऱ्यांना विचारलं तर मागच्या तीन दिवसापासून तोही येत नव्हता... कोठे गेला होता कोणास ठाऊक??
दोन -तीन दिवसांनी सुजय परतला.. पण काहीसा शांत होता.. मी विचारलंही त्याला... नेहमीसारखा तो हसला इतकंच.. !!
तो आता माझी खूप काळजी घेत होता..पण त्याला नेमकं काय झाले ते काही कळत नव्हतं...काहीसा अस्वस्थ वाटला तो !! मीही मग त्याला सगळं सांगितलं. 10व्या मजल्यावर जाऊन आल्या मुळे माझी ही अवस्था झाली हे त्याला कळलं आणि त्यानं तिथे पुन्हा न जाण्यासाठी मला तंबी दिली... त्या मजल्यावर कोणीच नाही... !अगदी रिकामी आहे तो फ्लोअर..! खूप भयाण वाटतं तिथे...!!सगळे म्हणतात तो floor झपाटलेला आहे... तू कधीही तिथे जायचं नाही असं पुन्हा पुन्हा सांगितलं.. पण तरीही त्याची नजर चुकवून मी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पुन्हा दहाव्या मजल्यावर गेलो..
कॉरिडॉर मध्ये मंद बल्ब आपला सोनेरी प्रकाश फेकत होते... त्या मजल्यावर, इतर मजल्यापेक्षा कमी ऑफिसेस असावीत.. फारसा कोणी स्टाफ बाहेर दिसून येत नव्हता... आजूबाजूला पाहत असतानाच "ती ब्ल्यू साडी " मला पुन्हा दिसली.. लगबगीनं ती उजव्या दिशेला चालली होती.. मला हा चान्स सोडायचा नव्हता.. सुजय पुन्हा पुन्हा मला कॉल करत होता.. "yes... I am coming " म्हणून त्याला मेसेज केला आणि मी तिच्या पाठोपाठ गेलो...
समोरचा passage संपून एका नवीनच अरुंद वाट सुरु झाली होती... किती वेळ चाललो असेन माहित नाही पण तिचा पाठलाग करत एका कोंदट अशा रूममध्ये मी येऊन पोहचलो होतो... आमचं IT hub कोठे लुप्त झालं होतं.जे काही समोर होतं, मोठी horrible place होती ती !!
बर्फासारखी गोठवणारी थंडी...!!त्या रूम मध्ये जाणवत होती... उगाच घाबरून गेलो.. !! तहानेने घसा अगदी सुकून गेला.. घामाच्या धारा वाहू लागल्या..
"अरे !! कोठे फसलो आपण?? " असं वाटत असतानाच
समोरचा दरवाजा उघडला....
आत मध्ये काहीसा कोंदट वास पसरला होता.. कसलीतरी दुर्गंधी पसरली होती.. कोणतं तरी जुनं ऑफिस असावं तिथे !! सगळं लाकडी फर्निचर होतं पण आता सगळं सडून गेलं होतं... सगळीकडे वाळवी पसरली होती.. मी पुन्हा बाहेर फिरणार एवढ्यात मला त्या रुमच्या दर्शनी भागात एक मोठी तसबीर दिसली... अंधारात नीटसं दिसत नव्हते... मी थोडा आत मध्ये शिरलो.. मागे काहीतरी हालचाल जाणवली, मानेला काहीतरी टोचल्यासारखं झालं. मी चमकून मागे वळलो तर बाहेरचा दरवाजा धाड्कन बंद झाला... !!
मला हे सगळं विचित्र वाटत होतं... पण आता तेथून सुटका नव्हती..!!. नकळत मी त्या तसबिरीच्या समोर येऊन उभा राहिलो... आजूबाजूचा अंधारही थोडासा हलल्यासारखा वाटला..अंधारात कशाला तरी अडखळलो... बरेचसे मानवी सांगाडे तिथे पडले होते.. मी घाबरून माघारी जाण्याचा प्रयत्न केला पण समोरची तसबीर पाहताच मी पुरता हादरून गेलो.... !!!!
ती ब्ल्यू साडी वाली त्या तसबिरीतून भेसूर हसत होती... तिचे घारे डोळे विलक्षण तेजाने चमकत होते...मी फसलो होतो... सुजयचं ऐकलं असतं तर माझ्या वर ही वेळ आली नसती... पण आता उशीर झाला होता....
तसबिरीतून तिचा हात वेगाने माझ्या गळ्याकडे येऊ लागला... ती माझ्या पर्यंत पोहचणार... !!!
तोच बाहेरचा दरवाजा उघडला... कोणीतरी मला हाताने खेचून बाहेर काढले... खूप थंडगार स्पर्श होता तो !!!!
आपली कशी सुटका झाली... हा विचार न करताच
गोंधळून मी बाहेर पडलो...किती वेळ धावत होतो कोणास ठाऊक?? कसाबसा घरी पोहचलो.... पण बाहेर पडताना पाहिलेला तो चेहरा "सुजय" चा आहे हे कळताच अगदी कोलमोडून गेलो...
आजही मला सुजय ची कमतरता जाणवतेय.... !!!
काल्पनिक कथा... श्रद्धा भट....