" सेल्फी " एक भयकथा
लेखिका - सौ. पुनीका सोरटे
वाचक मित्रांनो आणि मैत्रिणींनो , मी जी सत्यकथा आपल्यासमोर सादर करत आहे. ती मी स्वतः अनुभवलेली आहे. या कथेद्वारे मला कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती पसरवायची नाही. वाचकांनी केवळ मनोरंजनाच्या दृष्टीनेच हि कथा वाचावी हि विनंती.
व्यवसायाच्या निमित्ताने आम्ही काही वर्ष साताऱ्याला राहिलो होतो. माझे माहेर देखिल सातारा असल्यामुळे मला तिथे आधार होता. कारण माझे मिस्टर Business संदर्भात बाहेर गेल्यावर त्यांना घरी येण्यास उशीर होत असे. म्हणून आम्ही आईच्याच शेजारी एका कॉलनी मध्ये भाड्याने फ्लॅट घेऊन राहत होतो. माझ्या माहेरी माझी आई आणि माझा लहान भाऊ हे दोघेच असत. भाऊ रिक्षा चालवत असे. यांना येण्यास उशीर झाला तर मी आई जवळच थांबत असे.
त्यावेळी नवरात्र चालू होती. आईने नेहमीप्रमाणे घटस्थापना केली होती. माझ्या माहेरी नवरात्रीचे खूप काटेकोरपणे पालन केले जाते. नऊ दिवस मांसाहार बंद असतो. एरव्ही माझा लहान भाऊ व्यसन करतो. पण नवरात्रीमध्ये तो दिवसभर केवळ पाण्यावरच असतो. अन्न ग्रहण करत नाही. त्याच्याच बाबतीत घडलेली सत्यकथा आज मी आपल्यासमोर सादर करणार आहे.
त्याला त्याच्या दारू पिण्यावरून मी किंवा माझे मिस्टर नेहमी बोलायचो. तो तर या कारणामुळे माझ्या मिस्टरांच्या समोर थांबतच नसे. त्याने अनेक वेळा दारू सोडण्याचा प्रयत्न देखील केला होता पण तो मला म्हणाला कि, मला रिक्षा चालविताना कुणीतरी मागील सिटवर बसल्याचा नेहमी भास होतो. आणि का कुणास ठाऊक माझी रिक्षा आपोआप दारूच्या गुत्त्याकडे वळते. त्याच्या असं बोलण्याचा सुरुवातीला मला खरे वाटले नाही. कारण व्यसनी लोक दारू पिण्यासाठी निरनिराळ्या सबबी नेहमी सांगताच असतात. म्हणून मी त्याच्याकडे दुर्लक्ष्य करत असे.
पण त्यादिवशी त्याचा मला फोन आला. खूपच घाबरलेल्या अवस्थेत होता तो. त्याला फोनवर नीट बोलता देखील येत नव्हते. मग खूप वेळाने मला त्याने जे काही सांगितले त्यावर माझा विश्वासच बसला नाही. बरे त्याने दारू प्यायलेली असेल असं म्हणावं तर ते शक्य नव्हतं कारण नवरात्र चालू होती आणि नवरात्रीमध्ये तो व्यसन करत नव्हता. नऊ दिवस त्याचा कडक उपवास असायचा. पायामधे चप्पल देखील घालायचा नाही तो नऊ दिवस. मी त्याला प्रथम शांत होण्यास सांगितले. मग तो मला म्हणाला, मी दुपारी जेवायला घरी आलो होतो. घराला कुलूप होते. बहुतेक आई बाजारात गेली असावी असं मला वाटलं. म्हणून मी हातपाय धुवून थोडा वेळ खाटेवरच पडलो होतो. घड्याळात दुपारच्या १२. ३० वाजल्या होत्या. मी आईची वाट बघत मोबाइलला search करत खाटेवरच पडलो होतो. घरात कुणी नसल्यामुळे मी स्वतःची सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. पण सेल्फी काही व्यवस्थित आली नाही. मला वाटले अंधारामुळे झाले असावे. म्हणून मग मी लाईट लावली. आणि पुन्हा सेल्फी घेऊ लागलो. पण सेल्फी काही येत नव्हती. मला वाटले मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असावा. म्हणून मग मी घराबाहेर येऊन उजेडामध्ये बॅक कॅमेऱ्याने स्वतःचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला. फोटो काढून मी घरात आलो. आणि काढलेले फोटो चेक करत बसलो. तर माझ्या ऐवजी कॅमेऱ्यामध्ये एका भयानक माणसाच्या चेहऱ्याचा , दाढी आणि मिशा असलेल्या आणि डोक्यावर मुस्लिम लोक घालतात तशी टोपी घातलेल्या माणसाचा फोटो आलेला होता. त्या माणसाचे डोळे खूपच भयानक दिसत होते. एकंदरीत त्याचा चेहराच खूप भयानक होता. तो फोटो पाहून मी घाबरून गेलो.कारण त्या माणसाला मी माझ्या उभ्या आयुष्यात कधीही पाहिलेले नव्हते. मग माझा सेल्फी काढताना या माणसाचा चेहरा फोटोमध्ये कसा आला या विचाराने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या छातीच्या ठोक्यांची धडधड वाढली. भीतीने माझ्या सर्वांगाला कंप सुटू लागला. काय करावे मला सुचेना म्हणून मी तुला फोने लावला असे तो म्हणाला.
मी त्याला म्हणाले , तू आत्ताच्या आत्ता आईला सोबत घेऊन माझ्या घरावर निघून या. वाटेत कुठेही थांबू नका. निघण्यापूर्वी आपल्या देवचा थोडा अंगारा पुदीमध्ये बांधून घ्या असे मी भावाला सांगितले. साधारणपणे दुपारी १. ३० च्या सुमारास आई आणि भाऊ दोघेही माझ्या घरी आले. मी घडलेला प्रकार फोने करून माझ्या मिस्टरांना सांगितला. मिस्टरांनी त्याला बाहेर कुठेही जाऊ देऊ नको असे मला सांगितले. आणि ते लवकरच घरी येतील मग बघूया पुढे काय करायचे ते. असं ते म्हणाले.
संध्याकाली ६ वाजता माझे मिस्टर घरी आले. त्यांनी माझ्या भावाची विचारपूस करून त्याचा मोबाइल कम्प्युटरला कनेक्ट केला. आणि त्यामध्ये image मोठी केल्यामुळे भावाने सांगितल्याप्रमाणे खरंच एका मुस्लिम माणसाचा चेहरा त्यात स्पष्ट दिसत होता. मला तर ते पाहून खूपच भीती वाटली. ती रात्र आम्ही त शीच काढली. दुसऱ्या दिवशी आम्ही भावाला घेऊन काही मांत्रिकांना भेटलो. पण नवरात्रीमध्ये ते पाहत नाही म्हणून त्यांनी सांगितले. मग यांच्या एका मित्राने एका मुस्लिम मांत्रिकाचे नाव आम्हाला सुचविले. आम्ही ताबडतोब त्याची भेट घेतली. भाऊ घाबरलेल्या अवस्थेतच होता. मुस्लिम मांत्रिकाला भेटल्यावर त्याने भावाला नक्की काय झाले होते याचा उलगडा केला.
तो म्हणाला कि खूप वर्षांपासून ते पिशाच्च त्याच्या अंगावरच आहे. त्याच्यामुळेच हा इतका दारू पितो. जे पिशाच्च त्याच्या अंगावर होतं तो एक मुस्लिम व्यक्ती होता. दारू पिऊन नशेमध्ये रस्ता क्रॉस करत असतांना त्याला एका ट्रकने उडविले होते . उडविल्यानंतर तो रस्त्याच्या कडेला असलेल्या वडाच्या झाडाखाली पडला होता. आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर काही दिवसांनी माझा भाऊ व त्याचे मित्र कुठेतरी पार्टी करण्याच्या निमित्ताने बिर्याणीने भरलेले मोठे पातेले घेऊन कुठेतरी चालले होते. पण दारू पिण्याच्या निमित्ताने नेमके ते लोक त्याच वडाच्या झाडाखाली थांबले होते. नेमकी त्या दिवशी अमावस्त्या होती तेव्हा त्यांच्यापैकी दोघांना त्यांनी धरले होते. त्यानंतर माझा भाऊ घरी आल्यावर त्याने स्वतःचे डोके कपाटाला लावलेल्या आरशावर आपटून स्वतःचे डोके फोडून घेतले होते. हे त्याने कबुल केले. पण हे सर्व माझा भाऊ करत नसून त्याच्या अंगातील पिशाचच हे सर्व त्याच्याकडून करवून घेत होते. हे स्पष्ट झाले. शिवाय त्यामुळे माझा भाऊ सतत आजारीही पडत असे.
त्यानंतर तो मांत्रिक म्हणाला , कि सध्या नवरात्र चालू आहे त्याचा कडक उपवास असल्यामुळे त्या पिशाच्चाला त्याचे अंग सोडणे भाग पडले. म्हणून तो त्याला फोटो काढत असताना दिसला. झाले हे एका परीने बरेच झाले. कारण त्यामुळे खरे काय ते कळले. त्यानंतर आम्ही भावाचा योग्य तो उतारा त्या मांत्रिकाकडून करून घेतला. आणि त्याला पुन्हा त्रास होऊ नये म्हणून काही बांधणी त्याने करून घेतली. त्याने दिलेल्या काही वस्तू घरामध्ये चारही दिशांना बांधल्या. त्यानंतर त्याला तो त्रास पुन्हा झाला नाही .