पिशाच्चाला असे समोर उभे ठाकलेले पाहुन आता अघोरीबाबाचेही अवसान गळाले होते..त्याने खांद्यावरील पिशवी चाचपून पुन्हा एकदा मुठीत भस्म घेऊन समोरील पिशाच्यावर फेकून मारले..पण यावेळी भस्म त्याच्या अंगावर पडलेच नाही कारण डोळ्याची पापणी लवायच्या आत ते भुत त्याची जागा सोडून परत छतावर जावून लटकले होते..त्याचा वेग पाहून आम्ही सर्वच चकीत झालो.
बाबाने पुन्हा पुन्हा चपळाईने मारलेल्या भस्ममुठीचाही काहीच परिणाम होत नव्हता..हॉलच्या भिंतीवरुन अंत्यत वेगाने धावणाऱ्या पिशाच्चाला भस्माचा थोडाही स्पर्शच होत नव्हता..हे पाहुन बहादूर आणी मी भितीने गारठलो होतो तर बाबापण हैराण झाला होता.. आता काय करावे असा प्रश्न बाबाला पडला होता पण लवकरच त्या प्रश्नाचा निकाल लागणार होता..
भस्माची मूठ फेकून दमलेल्या बाबाचा हात भिंतीवरून धावणाऱ्या पिशाच्चाने हवेतच वरच्यावर पकडला आणी एक हिसका मारून पुर्ण हातच मुळापासून उखडून फेकला..बाबा वेदनेने विव्हळत असताना ते पिशाच्च भयाण हास्य करत त्याच्या समोर उभे राहिले आणी बाबाला काही समजण्याच्या आतच दोन्ही हातांनी त्याची मान पकडून एका झटक्यात पुर्ण उलट्या दिशेला फिरवली..
बाबा पाय झाडत खाली कोसळला. अघोरीबाबाचा खेळ पुर्ण संपला होता..👹
आता त्या पिशाच्चाची भेदक नजर एवढा वेळ त्या मोठ्या हॉलच्या एका कोपर्यात थांबून मांत्रिक आणी भुताचा सामना बघणार्या आम्हा दोघांकडे रोखली होती..एखाद्या यंत्रमानवासारखे हळूहळू चालत ते आमच्या दिशेला सरकू लागले..बहादुर माझ्या पाठीमागे लपलेला होता..मी आ वासून समोर भुताकडे पाहत उभा होतो.. अचानकच बहादूरने मला पाठीमागून जोराचा धक्का देऊन भुताच्या अंगावर लोटले आणी स्वतः दरवाजाच्या दिशेला धावला, आणी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागला.. मी थेट पिशाच्याच्या अंगावर जाऊन धडकलो.. पिशाच्याने हाताच्या एका जोरदार प्रहाराने मला दूर भिरकावून लावले आणी एक मोठी झेप घेऊन दरवाजा उघडण्याचा अयशस्वी प्रयत्न करत असलेल्या बहादूरला पकडले..पिशाच्याच्या प्रहाराने मी बाजूच्या भिंतीवर जाऊन आदळल्याने माझ्यात आता परत उठून उभे राहण्याचे त्राण राहिले नव्हते.
बहादुर भुताच्या पकडीतून सूटण्यासाठी प्रयत्न करत होता, पण त्या अमानवी शक्तीसमोर त्याचे काही एक चालत नव्हते.. पिशाच्याने आता त्याचा जबडा बहादूरच्या मानेजवळ नेला आणी टोकदार सुळे त्याच्या मानेत खूपसले..बहादूर सुटकेसाठी धडपड करू लागला.. पण त्याच्या गरम रक्ताची चटक लागलेल्या पिशाच्याला तो स्वतः पासुन दूर करू शकला नाही..मी हतबलतेने भिंतीला टेकून समोर पाहत बसून राहिलो. पाच सहा मिनीटातच रस काढलेल्या उसासारखे शरीर झालेला बहादूर खाली फरशीवर निपचित पडला होता..ते पिशाच्च आता रक्ताने माखलेले तोंड घेऊन माझ्या दिशेला वळले..मी जागेवरून उठण्याचा प्रयत्न ही केला नाही..उठून काही फायदापण होणार नव्हताच..हळूहळू चालत पिशाच्च माझ्या समोर येऊन उभे राहिले आणी मी माझे डोळे घट्ट मिटून घेतले... 😑
पण खूपवेळ काहिच हालचाल न झाल्याने पुन्हा डोळे उघडून पाहु लागलो तर माझ्या समोर रवी उभा होता पिशाच्च रुपात नाही तर मनुष्याच्या रुपामध्ये.
"मला तुला मारायचे नाहीये..तु येथून निघून जाऊ शकतोस"
रवी म्हणाला. त्याचे शांत बोलणे ऐकून मला आता धीर आला.
"पण या दोघांना का ठार मारलेस तु रवी?"
मी भयभीत आवाजात विचारले.
"अघोरीबाबा हा क्रूर मांत्रिक होता..कमजोर भुतांना पकडुन जेरबंद करायचा..त्यांना गुलाम बनवून त्यांच्याकडुन ईच्छेविरूद्ध वाईट कामे करुन घ्यायचा..आणी आज येथे तो मला पकडून गुलाम बनवण्याच्या इराद्यानेच आलेला होता, त्यामुळे त्याला ठार करणे भागच होते..राहिली गोष्ट बहादूरची तर आज मी या पिशाच्च अवस्थेमध्ये भटकत आहे त्याचे मुळ कारण हा बहादूरच आहे"
"बहादूर?? काय केले होते त्याने?" मी आश्चर्याने विचारले..
"दोन अडीच वर्षापुर्वीची गोष्ट आहे, जेव्हा मी तुझ्यासारखाच या शहरामध्ये नवीन आलो होतो..राहण्यासाठी मेन सिटीत चांगला फ्लॅट न मिळाल्याने या सोसायटीमध्ये आलो..सुरूवातीला इथले वातावरण खूप चांगले वाटले पण हळूहळू आतल्या गोष्टी समजत गेल्या...अशोकबन सोसायटीचे मालक 'आगरवाल साहेब' हे दूसर्या शहरामध्ये राहायला होते आणी त्यांच्या मालकीचे अनेक बिजनेस असल्याने त्यांचे 'अशोकबन' कडे लक्षच नव्हते....सोसायटीचा केअरटेकर मँनेजर असणारा 'बहादूर' हा आगरवाल साहेबांना अंधारात ठेऊन दरमहिन्याला लाखो रुपयांचा अपहार करून चांगलाच गब्बर झाला होता..पण मला किंवा कोणालाच त्याचे काही देणेघेणे नव्हते..कारण हा विषय आगरवाल आणी बहादुर यांच्यामधला होता.🌇
बहादूर हा मुळातच गुन्हेगारी प्रव्रुत्तीचा होता..त्यामध्ये भरपुर पैसा आणी पॉवर मिळाल्याने तो मस्तवाल बनला होता..दोन नंबर बिल्डींगमध्ये राहणार्या 'मंगल' नावाच्या एका व्यभिचारी आणी लालची स्री सोबत त्याचे सुत जूळलेले होते.. मंगलच्या सक्रिय मदतीने सोसायटीतील अनेक असहाय्य महिलांचा बहादूरने गैरफायदा घेतला होता..त्यांना ब्लँकमेल करून त्यांचे शारिरीक आणी आर्थिक शोषणही करत होता..आपल्या याच चार नंबर बिल्डींमध्ये माझी एक 'उषा' नावाची मैत्रीण राहायला होती.. एके दिवशी तिने रडत रडत बहादूरने तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मला दिली, त्यानंतर सर्व प्रकार माझ्या लक्षात आला..त्यानंतर मी बहादूरची पोलखोल करण्याचा चंग बांधला आणी त्याच्याविरोधातील सर्व पुरावे गोळा करू लागलो.. महिनाभर रात्रंदिवस खपुन त्याचे आर्थिक गैरव्यवहार तसेच सोसायटीतील गैरवर्तणुकीचे अनेक पुरावे मी गोळा केले होते.. लवकरच ते सर्व पुरावे मी 'आगरवाल साहेब' आणी पोलीसांकडेही दाखल करुन बहादूरचा पर्दाफाश करणार होतो..पण दूर्दैवाने बहादूरला माझ्या कारनाम्याची खबर लागली.. आणी एका रात्री त्याने त्याच्या एका सहकार्यासोबत याच फ्लॅट मध्ये गुपचूप घुसून मी झोपेत असताना धारदार सुरा भोकसून माझी हत्या केली..
शेजारच्या फ्लॅट मध्ये राहायला असणार्या काही बिहारी कामगारांपैकी एकाला बहादूरने भरपूर पैसे देऊन त्याच्या मुळ गावी परत पाठवले आणी माझा खून त्या पळुन गेलेल्या बिहारी तरुणानेच केला असल्याचा खोटा बनाव रचला..
जरी बहादूरने माझा खून करून सूटकेचा निश्वास सोडला असला तरी पण माझा आत्मा मात्र या फ्लॅट मध्येच भटकत राहिला.. बहादूरचा बदला घेण्याच्या तीव्र अत्रुप्त ईच्छेमुळे मी नरपिशाच्च बनुन येथेच राहिलो.. माझ्या खूनाच्या प्रकरणानंतर सहा महिने हा फ्लॅट बंदच होता..नंतर येथे एक फँमिली राहण्यासाठी आली होती, ते रात्रंदिवस खूप गोंधळ घालणारे आणी आरडाओरडा करणारे होते त्यामुळे मला आवश्यक असणारी शांती भंग होत होती म्हणुन मी त्यांना थोडे भुताटकीचे प्रकार दाखवून येथून हाकलून दिले..
त्यांनी जाताजाता या फ्लॅट मध्ये एक अद्रूश्य शक्ती राहत असल्याने आम्ही सोसायटी सोडुन जात असल्याची तक्रार बहादूरकडे केली आणी तेव्हा बहादूरला माझे अस्तित्व समजले.. या फ्लॅट मध्ये राहायला आलेल्या आणखी दोन भाडेकरूंनीपण हिच तक्रार केल्याने माझ्या अस्तित्वाची बहादूरला पक्की खात्री झाली.💀
ह्या अनपेक्षित संकटाशी सामना कसा करायचा याचा बहादूर विचार करत असताना त्याला 'डोंगरवाडी' या रहदारीपासुन दूर असणाऱ्या छोट्याशा गावातील कुख्यात मांत्रिक 'अघोरीबाबा' चा शोध लागला आणी बहादूरने त्याच्याकडे धाव घेतली.. अघोरीबाबाला मोठी रक्कम देऊन आणी इतर अनेक आमिषे दाखवून बहादूरने त्याच्या कामासाठी राजी केले आणी त्याला माझ्याबद्दल सर्व माहिती दिली..सर्व भुत पिशाच्चांचे अचूक ज्ञान असणार्या बाबाने 'रवी हा तुझा बदला घेण्यासाठी पिशाच्च बनला आहे' अशी माहिती बहादूरला पुरवली..आणी त्याचबरोबर 'फ्लॅटला पिशाच्चा पासून मुक्त करण्यासाठी पिशाच्चाला एखाद्या मनूष्याचे रक्त पाजावे लागेल' हे पण सांगितले..आता पिशाच्याकडे कोणाला शिकार बनवून पाठवावे असा विचार बहादूर करत असतानाच त्याला तु भेटलास..दूरच्या गावाकडून शहरामध्ये नवीन आलेला आणी कुठलाही आधार नसलेल्या तुझा बहादूरने स्वताच्या फायद्यासाठी उपयोग करून घेण्याचे ठरवले..आणी तुला या झपाटलेल्या फ्लॅट मध्ये राहण्यासाठी जागा दिली.. मी तुला एका दिवसामध्ये सुद्धा येथून पळवून लावू शकलो असतो पण मी तसे काही केले नाही, तर तुझ्या सहाय्याने माझा बदला पुर्ण करण्याचा काही मार्ग सापडतो का ते पाहु लागलो..आणी त्यामुळे तुझा विश्वास जिंकून तुझ्याशी चांगले वागण्याचा प्रयत्न करत होतो..
पण बहादूर व बाबाने तुला "रवी हा भुताने झपाटलेला तरुण असुन त्याला वाचवण्यासाठी आमची मदत कर" असे तुला खोटे सांगितले.. आणी एका अमावस्येच्या रात्री तुला 'सिद्ध तांत्रिक भस्म' देऊन माझ्या कपाळावर लावायला सांगुन मला पुर्ण पिशाच्च रुपात येण्यास मजबूर केले..त्या रात्री मी खूप कष्टाने स्वतः ला ताब्यात ठेवले..जर त्या रात्री बाबाच्या योजनेला बळी पडुन मी तुझे रक्त पिले असते तर या फ्लॅट मधून माझी सुटका तर झाली असती, पण माझा बदला अपुर्ण राहिल्याने पिशाच्च योनीतुन माझी मुक्ती झाली नसती..त्यानंतरची सर्व कहाणी तर तुला माहितच आहे..तुझा बळी देण्याची योजना असफल झाल्यानंतर अघोरीबाबाने तुझाच उपयोग करून मला कैद करण्याची आणी गुलाम बनवण्याची योजना आखली होती, पण तु वेळेवर त्या योजनेबद्दल मला सांगुन माझी खूप मोठी मदत केलीस, पुर्वतयारी केल्याने अघोरीबाबासारख्या मोठ्या मांत्रिकाचा मी मुकाबला करू शकलो..आणी आज बहादूरला मारून माझा बदला पुर्ण झाला आहे आणी आता मला मुक्ती मिळण्यास काहीही अडचण राहिली नाही"
रवीने सांगितलेली ही सर्व कहाणी माझ्यासाठी अविश्वसनीय होती..पण मला विश्वास ठेवणे भागच होते..
"पण..पण मग आता मी काय करू रवी?" 😶
फरशीवर रक्ताच्या थारोळ्यात अस्ताव्यस्त पडलेल्या अघोरीबाबा आणी बहादूरच्या म्रुतदेहांकडे पाहत मी विचारले.
"तुला शक्य होईल तेवढ्या लवकर तु तुझ्या गावाकडे परत जा..नाहितर विनाकारण या दोघांच्या हत्येचा आरोप तुझ्यावर लागेल "
रवीने मला समजवल्यानंतर मी भानावर आलो आणी माझे थोडेफार सामान बँगेत भरून भल्या पहाटेच सोसायटीच्या बाहेर पडलो..मिळेल त्या वाहनाने रेल्वे स्टेशनवर पोहोचलो आणी माझ्या गावाच्या जवळपास जाणार्या एका रेल्वेच्या जनरल डब्यात घाईने तिकीट न काढताच चढलो..🚊
साधारणपणे महिनाभरापुर्वी या अनोळखी शहरात जॉबनिमीत्त आल्यापासूनचा एकुण एक प्रसंग माझ्या नजरेसमोरून हटत नव्हता..बहादूर आणी पिशाच्च या दोघांनीही एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी माझा एक मोहरा म्हणुन उपयोग करून घेतला होता, आणी त्यामध्ये शेवटी विजय हा पिशाच्याचा झाला..या भयंकर खेळात जो हरणार तो मरणार हे तर नक्कीच होते पण मी स्वतः ही अनेकदा म्रुत्युच्या समीप होतो...फक्त दैव बलवत्तर होते म्हणुनच मी वाचलो..असो, पण अशा भयानक शहरात राहण्यापेक्षा मी माझ्या गावीच बरा आहे असे मला आता वाटायला लागले आहे.. जीव राहिला तर नवीन जॉब मला दूसरीकडे कुठेतरी मिळेलच.. आणी जीवनात कधी जमलेच तर एखाद्या चांगल्या शहरातील चांगल्या सोसायटीमध्ये माझ्या स्वतः च्या नावावर एखादा फ्लॅट पण घेईल..
#समाप्त…
सर्व भागाच्या लिंक्स > Start sTory
https://marathighoststories.blogspot.com/2019/05/marathi-bhutachi-gosht.html
भाग १ > https://marathighoststories.blogspot.com/2019/06/blog-post_9.html
भाग २ > https://marathighoststories.blogspot.com/2019/06/blog-post_53.html
भाग ३ > https://marathighoststories.blogspot.com/2019/06/blog-post_55.html
भाग ४ > https://marathighoststories.blogspot.com/2019/06/blog-post_81.html
भाग ५ > https://marathighoststories.blogspot.com/2019/06/blog-post_83.html
भाग ६ > https://marathighoststories.blogspot.com/2019/06/blog-post_29.html