लेखक:- अड. अंकुश सू. नवघरे. (पालघर)
पुनः प्रकाशन:- दि.०५.०६.२०१९
©Ankush S. Navghare ®२०१९
(ह्या कथेचे सर्व हक्क लेखकाकडे सुरक्षित आहेत)
नमस्कार मित्रांनो ह्या कथांचे विडिओ मध्ये रूपांतर करण्यासाठी मी ह्या कथा काही लोकांना दिल्या होत्या त्यातील 3 कथांचे विडिओ मध्ये रूपांतर झालेले आहे. परंतु आता त्याचे विडिओ बनणार नाहीत, आणि कुठे तसे आढळून आल्यास मला कळवावे.
रात्रीचे ११ वाजून गेलेले, निशा परवाच बाळंत झाली आणि त्यात सिझर झाल्याने ती अजूनच अशक्त झाली होती. बाळाला आणि तिला त्रास नको म्हणून तिच्या नवऱ्याने त्यांच्यासाठी डीलक्स रूम ची व्यवस्था केलेली होती. ज्योत्स्ना सिस्टर ने निशाला खूप समजावलं की तुम्ही जनरल वॉर्ड मधेच रहा, तेच तुमच्यासाठी चांगलं आहे, परंतु निशाचा खूपच आग्रह झाल्याने तिला डीलक्स रूम मध्ये हलवण्यात आले. दिलक्स रूम एकदम शांत होती, एयर कंडिशनर, कोणाची कटकट नाही, आणि मुख्य म्हणजे एकांत आणि तिच्या नवऱ्यालाही सोबत राहता येणार होते. निशाचा आत्ताच डोळा लागला होता. बसूनबसून कंटाळा आल्याने तिचा नवरा जरा बाहेर पाय मोकळे करण्यासाठी गेलेला होता. अचानक कसल्याश्या आवाजाने निशाला जाग आली, आणि पहाते तर काय बाळ जागेवर नव्हतं, तिने आजूबाजूला पाहिले तर हिरव्या पार्टिशन पडद्याची हालचाल होताना दिसत होती आणि पडद्याच्या मागूनच बाळाच्या हुंकाराचा आवाज येत होता, पडद्याच्या त्याबाजूला पेशंटच्या नातेवाईकांसाठी झोपायला एक कॉट ठेवलेली होती. निशाला वाटलं की तिचा नवराच बाळाला तिकडे घेऊन बसला असणार म्हणून निशाने तिच्या नवऱ्याला म्हणजे सुनीलला हाक मारली, सुनील! काहीच उत्तर आलें नाही, निशाने परत हाक मारली "सुनील तू आहेस का रे तिकडे", पण परत कोणीच ओ दिला नाही, निशा विचारात पडली की सुनील तिकडे नाहीय तर मग कोण असेल, विचारात असतानाच ठणठण करत घड्याळात १२ चा ठोका पडला, त्या अचानक आलेल्या आवाजाने भानावर आलेल्या निशाच्या काळजात चर्रर्रर्र झालं, तिला वाटलं की आपण स्वप्नात तर नाही ना, पण ते स्वप्न नव्हते, तिचे बाळ खरच पाळण्यात नव्हते आणि तो हिरवा पडदा हलत होता, निशा हळूहळू पुढे गेली आणि तिने पडदा सरकवून पाहिले तर, ते दृश्य बघून एक भयाची लहर तिच्या सर्वांगातून गेली, एक बाई पडद्याला पाठमोरी बसून बाळाला मांडीवर घेऊन दूध पाजत होती, तिचा पेहेराव नर्स सारखाच होता, तिची मान खाली होती पण शरीराची काहीच हालचाल होत नव्हती, निशाने तिला हाक मारली, सिस्टर!, पण तिने निशाकडे पाहिलेच नाही, ती काहीच बोलली म्हणून निशाला थोडं आश्चर्य वाटलं, तिने परत हाक मारली, ह्यावेळी तिला आवंढा गिळल्यासारखं वाटलं, काहीच उत्तर येत नाही हे पाहून निशाने घाबरत घाबरत हात पुढे केला आणि त्या नर्स च्या खांद्यावर लावला, तीच अंग एकदम थंड वाटत होत, अचानक त्या नर्स ची मान फिरली आणि तीने निशकडे वळून पाहिले, निशाला एकदम जोराचा धक्का बसल्यासारखं झालं, क्षणभर चक्रावल्यासारखं झालं आणि डोळ्यासमोर अंधेरी आली, किती वेळ गेला असेल माहीत नाही पण कसल्यातरी आवाजाने निशाला शुद्ध आली तेव्हा तिला दिसले की डॉक्टर आणि तिचा नवरा तिच्या बाजूला उभे राहून आपापसात काहीतरी बोलत होते, आणि ती बेडवरच होती, तिने पाळण्याकडे पाहिले तर बाळ पाळण्यात गाढ झोपलेले होते. बाळाला पाहून तिच्या जीवात जीव आला, ती मनाशी विचार करत राहिली की बाळ जर पाळण्यात झोपलेय तर मग काही वेळापूर्वी तिने जे पाहिले ते स्वप्न होते की काय, तिला जरा बरे वाटले पण ती घाबरल्यासारखी झालेली होती, म्हणून डॉक्टर ने नर्सला निशाला कसलेतरी इंजेक्शन द्यालला सांगितले, नर्सने इंजेक्शन ने हवेत औषध उडवून निशाकडे पाहिले, निशाला परत धक्का बसला, तीने डोळे मिटून घेतले आणि उघडले तर बाळाला घेऊन बसलेली बाई निशाकडे पाहत हसत होती, तिचे डोळे पांढरे होते आणि डोळ्यांत बुबुळाचा पत्ताच नव्हता, तोंडात दाताऐवजी काळ्या चमकणाऱ्या चुका होत्या. निशा जोरात किंचाळली आणि शुद्ध हरपून जमिनिवर कोसळली. शुद्धीवर आल्यावर निशा तडक उठली आणि बाळाला घेऊन डॉक्टरांकडे कडे जाऊन म्हणाली की मला आत्ताच्या आत्ता घरी जायचंय, मला आजच्या आजच डिस्चार्ज हवा आहे, तीला डॉक्टरांनी, तीच्या नवऱ्याने खूप समजावलं की इतक्या रात्री कसं डिस्चार्ज घेणार पण ती कोणाचेच ऐकायच्या मनस्थितीत नव्हती, डॉक्टर ने नर्स ला पेपर्स बनवायला सांगितले, नर्स ने निशाला हाक मारली, मॅडम इकडे सही करा, निशाने तिच्याकडे पाहिले.... क्षणभर तेच बुबुळ नसलेले डोळे.... समाप्त...
अंकुश नवघरे...