बराच वेळ समजवून सांगुनही मी ऐकत नसल्याने बहादूरचा नाईलाज झाला आणी त्याने त्याची शेवटची चाल खेळली..
“ठिक है दिनेश..तसे पाहायला गेले तर तुझ्यासाठी हे काम खूप मामुली आहे, तुला फक्त रात्रीच्या वेळी रवी झोपेत असताना त्याच्या भोवती भस्माचे गोल रिंगण आखायचे आहे आणी त्यानंतर पुढचे सगळे काम अघोरीबाबा आणी मी खुद करणार आहे...या पाच दहा मिनीटांच्या छोट्या कामासाठी मोबदला म्हणुन तु राहत असलेला फ्लॅट हा कायमस्वरूपी तुझ्या नावावर करण्यात येइल, फक्त एकदा त्या भुताला तेथून बाहेर काढण्यासाठी आमची मदत कर.. अशोकबन सोसायटीचे मालक 'आगरवाल साहेब' माझ्या शब्दाच्या बाहेर नाहीत, पाहिजे तर आता तुझ्यासमोरच फोन लावतो मी त्यांना”
ज्या शहरात मी भाड्याची खोलीसुद्धा मुश्कीलीने मिळवली होती, त्या शहरामध्ये माझ्या स्वताच्या नावावर एक फ्लॅट मिळणार या कल्पनेनेच मी शहारून गेलो..🌆
"तो फ्लॅट माझ्या नावावर? या कामाचा एवढा मोठा मोबदला का देताय पण तुम्ही मला?" मी आश्चर्याने विचारले.
"परिस्थितीच तेवढी गंभीर बनत चाललीय..मागील गेल्या दोन बरसपासून त्या फ्लॅट मध्ये पिशाच्चाचे वास्तव्य आहे. दिवसेंदिवस त्याची शक्तीसुद्धा वाढत चालली आहे..अजून कोणाला पक्की खबर नसली तरी या भुताटकीच्या प्रकाराची सोसायटीमध्ये दबक्या आवाजात चर्चा चालू झाली आहे.. जर आता लवकरात लवकर त्या भुताचा बंदोबस्त केला नाही तर आधीच शहरी हद्दीपासून दूर असणारी आपली सोसायटी कायमची ओस पडायला वेळ लागणार नाही.. मालकांनी पण कोणत्याही किमतीवर लवकर त्या भुताचा निकाल लावायला सांगितला आहे..आणी हे काम फत्ते होताच अघोरीबाबांना तर मुँहमांगी किंमत देण्याचेपण आगरवाल साहेबांनी मान्य केले आहे..ते भुत म्हणजे एखाद्या घरात घुसून बसलेल्या विषारी नागासारखे आहे रे, कधी कोणाला चावेल हे सांगता येणार नाही"
बहादूरच्या बोलण्यामध्ये तथ्य होते..तसे पाहायला गेले तर माझे स्वताचेही एक घर असावे अशी माझी गेल्या अनेक वर्षांपासून स्वप्न होते आणी ते स्वप्न पुर्ण होण्याची एक संधी मला समोर दिसत होती. पण मी त्या भुताच्या अमानवी शक्तीचा अनुभव घेतलेला असल्याने पुन्हा एकदा विषाची परिक्षा घेण्यास माझे मन धजावत नव्हते..
“पण ते पिशाच्च तर अतिभयानक आणी शक्तिशाली आहे..मग हे अघोरीबाबा आणी त्यांची मंत्रशक्ती खरोखर त्याचा मुकाबला करू शकेल का?”
मी माझी शंका विचारली, बहादुरपण बाबांकडे पाहू लागला.. पण माझे बोलणे ऐकून अघोरीबाबाच्या कपाळावर आठ्या पसरल्या, आणी तो म्हणाला,
“अशी शंका कोणालापण वाटु शकते, त्यामुळे तुला वाटली तर त्यामध्ये काही आश्चर्याची गोष्ट नाही..पण तुमचे शंकानिरसन करणे हे माझे काम आहे..चला तुम्ही दोघे माझ्यासोबत तुम्हाला एक गोष्ट दाखवतो” 😯
मी आणी बहादूर बाबांच्या मागे त्यांच्या आतल्या खोलीत गेलो.. तेथील एका कोपर्यात एक मोठी लोखंडी संदूक ठेवलेली दिसत होती.. बाबांनी संदूकीची कडी खोलून झाकण उघडताच आतमध्ये अनेक रंगीबेरंगी पारदर्शक काचेच्या बाटल्या ठेवलेल्या दिसल्या.. आत हात घालून त्यातल्या काही बाटल्या बाबांनी बाहेर काढल्या, त्या बाटल्यांच्या आत पुसट धूरकट रंगाचे काहितरी तरंगत असल्यासारखे दिसत होते..
बाबांनी तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत त्या बाटल्यांवर हात फिरवताच आम्हाला बाटल्यांच्या आतमध्ये चित्रविचित्र मानवी आकार दिसू लागले..बहादूर व मी आश्चर्याने पाहतच राहिलो.. ते बाटल्यांमधील मानवी आकार बाहेर येण्यासाठी धडपड करत आहेत असे मला वाटले..काहीजण तर आमच्याकडे पाहुन बाटलीतुन बाहेर काढण्यासाठी हावभावातुन आर्जव करत असल्यासारखे वाटत होते..मी आश्चर्याने बाबांकडे पाहिले.. बाबांच्या चेहर्यावर क्रुर हास्य होते..
“ह्या सगळ्यांना मी स्वतः पकडून बाटलीत भरलेले आहे...आजवर अनेक वेगवेगळ्या प्रदेशात जावून अनेक वेगवेगळे भुते मी पकडलेले आहेत.. कित्येक भुतांना कायमचे जमीनीमध्ये पुरून टाकले आहे तर काहीजणांना गुलाम बनवून ठेवले आहे..
त्यामुळे तु बिनधास्त राहा, रवीच्या अंगात शिरलेल्या पिशाच्चाला पकडणे माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे.. अजून दोन दिवसांनी तु पाहशीलच मी त्याला कसा बाटलीत भरतो ते ”🍾
बाबांनी माझा संशय दूर केला. त्यानंतर बहादूर आणी मी बाबांचा निरोप घेऊन डोंगरवाडीतून बाहेर पडुन अशोकवनकडे निघालो, वाटेत कारमध्ये बहादूर मला पुढचा प्लॅन समजावून सांगत होता.
यापुढील दोन रात्री मला माझ्या फ्लॅट मध्येच मुक्काम करायचा होता. जेणेकरून आमच्या चाललेल्या प्लँनिंगविषयी रवीला कोणताही संशय येणार नव्हता..
पुर्ण संध्याकाळ बहादूरसोबत त्याच्या घरी घालवून रात्री झोपण्यासाठी मी माझ्या फ्लॅट मध्ये परत गेलो..रवी हॉलमध्ये बसलेला होता, मी आत येताच माझ्याकडे पाहुन त्याने एक स्मितहास्य केले... मी निमुटपणे माझ्या रुममध्ये जाऊन झोपी जाण्याचा प्रयत्न करू लागलो पण आज मला झोप लागत नव्हती.
'रवी' तोच ज्याला भुताने झपाटलेले होते किंवा तो स्वताच भुत होता, जो कोणी असेल तो, पण आता लवकरच अघोरीबाबा त्याला कैद करणार होता.. आणी त्या कामात मी बाबांना मदत करणार होतो...पण माझ्या मनाची आता द्विधा मनस्थिती बनली होती..तसे पाहिले तर एवढे दिवस एकत्र राहुनही आजवर रवीने स्वताहून मला काही त्रास असा दिलेला नव्हता, माझे आणी त्याचे काही वैयक्तिक शत्रुत्व पण नव्हते , त्याचे शत्रुत्व तर बहादूरसोबत होते आणी बहादूरने मोठी रक्कम दिल्याने पर्यायाने अघोरीबाबासोबत पण होते.. कारण बहादूरला कोणत्याही परिस्थितीत तो फ्लँट एका अमानवी शक्तीपासुन मुक्त करायचा होता आणी त्याकामात मी त्याची मदत करणार होतो.. आणी मला या कामाचा मोठा मोबदलाही मिळणार होता..पण बहादूरसाठी आणी माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी मी त्या पिशाच्चाचे स्वातंत्र्य कायमचे हिरावून घेणार होतो..आणी हिच गोष्ट माझ्या मनाला खटकत होती..अघोरीबाबाने बाटलीमध्ये भरलेल्या भुतांसारखीच केविलवाणी अवस्था आता रवीचीपण होणार हा विचार मला अस्वस्थ करत होता..💀
आणखी एक दूसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मागच्यावेळी अशाच प्रयत्नात मी मरता मरता थोडक्यात वाचलो होतो, आणी परत तीच चूक करायला चाललो होतो..समजा यावेळेस पण मी काहितरी चूक करून पिशाच्याच्या तावडीत सापडलो तर जिवंत वाजचण्याची शक्यता जवळपास नव्हतीच.
या सर्वच गोष्टींचा विचार केल्यानंतर मी एका निर्णयापर्यंत आलो.. मी चुकीचे करत होतो का बरोबर हे मला त्यावेळी समजत नव्हते, पण त्यावेळी जे मला योग्य वाटत होते ते करण्याचा मी निर्णय घेतला आणी माझ्या रूममधून बाहेर पडुन रवीच्या रुममध्ये शिरलो, तो पलंगावर पडलेला होता पण अजूनही जागाच होता, मला आत आलेले पाहून पलंगावरच उठून बसला.
"ज्याअर्थी तु स्वतःहून न बोलवता माझ्या रुममध्ये आलास त्याअर्थी नक्कीच काहीतरी महत्वाचे काम असले पाहिजे तुझे" मितभाषी आणी एकांतप्रिय रवी थेट मुद्यावर आला होता.
“रवी, तुला आता मी कसे सांगू..तु नक्की कोण आहेस ते मला माहित नाही..पण जर तुला भविष्यकाळातील मोठ्या संकटापासून वाचायचे असेल तर लवकरात लवकर तु या फ्लँटमधून बाहेर पडुन दूसरीकडे कुठेतरी जावे असे मला वाटते” 😔
मी मान खाली घालत त्याला म्हणले..
"का पण? असे तुला का वाटते?" त्याने शांतपणे विचारले.
त्यावर मी त्याला बहादुर व अघोरीबाबा त्याच्याविषयी काय प्लॅन रचत आहेत ते सांगितले आणी त्याच्या पुढे नक्की काय वाढुन ठेवलेले आहे तो सगळा धोका त्याला समजावून सांगितला. रवीने शांतपणाने सगळे काही ऐकून घेतले..
“येथून निघून जाण्याची माझी ईच्छा असती तर मी कधीच गेलो असतो, पण आता जे काही व्हायचे असेल ते होऊदे पण मी येथून नाही जाऊ शकत"
“अघोरीबाबाची तंत्रशक्ती तुला माहित नाही रवी.. तुला कायमस्वरूपी एका छोट्या बाटलीमध्ये कैद केले जाईल..परत तुझी सुटका कधी होईल हे पण कोणी सांगू शकत नाही"
"पण तुझ्या म्हणण्यानुसार जर खरोखर मी या घरातुन स्वतः हून निघून गेलो तर त्यामध्ये बहादूरचा फायदा होईल पण तुझा काय फायदा होणार? तुझा मोबदला तुला मिळणारच नाही.. त्यापेक्षा एक काम कर, तुमचा प्लॅन ठरल्याप्रमाणे तुम्ही अमलात आणा..तु मला पकडुन देण्यात त्यांची मदत कर आणी या फ्लॅट चा मालक होऊन जा की..तुझा फायदा यामध्ये आहे"
रवीच्या या बोलण्याचे मला आश्चर्य वाटले..आणी पुढे त्याला काय उत्तर द्यावे याचा मी विचार करू लागलो..
"पण मग नंतर तुझे काय होणार? तुझे स्वातंत्र्य हिरावून मी ह्या फ्लॅटचा मालक कसा होऊ" 🤔
"त्याची फिकीर तु करू नकोस..आमच्या जाणीवा तुम्हा जिवंत माणसांसारख्या नसतात..माझ्यासाठी हा फ्लॅट काय किंवा छोटी बाटली काय दोन्हीपण एकसारखेच आहे..आणी दूसरी गोष्ट म्हणजे अघोरीबाबा सिद्ध मांत्रिक असला तरी माझ्यासारख्या पिशाच्चासोबत अद्याप त्याचा सामना झालेला नसावा, तो मला कैद करू शकतो पण जरी त्याने मला कैद केले तरी पाच सहा वर्षाहून जास्त काळ तो मला कैदेत ठेऊ शकणार नाही..नंतर मी त्याच्या तावडीतून सुटून दूर कुठेतरी निघून जाईल..बघ ठरव आता तु, आपल्या दोघांचाही यामध्येच फायदा आहे" रवीने मला समजावले.
#क्रमशः..
सर्व भागाच्या लिंक्स > Start sTory
https://marathighoststories.blogspot.com/2019/05/marathi-bhutachi-gosht.html
भाग १ > https://marathighoststories.blogspot.com/2019/06/blog-post_9.html
भाग २ > https://marathighoststories.blogspot.com/2019/06/blog-post_53.html
भाग ३ > https://marathighoststories.blogspot.com/2019/06/blog-post_55.html
भाग ४ > https://marathighoststories.blogspot.com/2019/06/blog-post_81.html
भाग ५ > https://marathighoststories.blogspot.com/2019/06/blog-post_83.html
भाग ६ > https://marathighoststories.blogspot.com/2019/06/blog-post_29.html