🔸नरपिशाच्च - भाग तीन.🔸
माझा श्वास कोंडत चालला होता आणी मी सूटकेसाठी धडपड करत होतो..त्याच्या हाताचे वाढलेले मोठमोठे काळे नखे माझ्या मानेत रूतत चालले होते..त्याच्या अमानवी शक्तीसमोर माझी ताकद कमी पडत होती..पण माझ्या जोराच्या धडपडीमुळे मी माझ्या गळ्यात परिधान केलेले 'महाबली हनुमानाचे' लॉकेट आता थोडेसे शर्टाच्या बाहेर आले होते , रवीची नजर त्यावर पडताच त्याच्या हाताची पकड ढिली झाली. त्याने माझा गळा सोडला, त्याच्या चेहर्यावरील संताप मावळू लागला त्याचबरोबर त्याच्या नरड्यातुन येत असलेला विचित्र आवाजही हळूहळू कमी झाला आणी त्याचे शरीर आता पुन्हा पुर्वपदावर येऊ लागले होते..थोड्याच वेळात तो पुन्हा पहिल्यासारखाच नॉर्मल झाला होता.
मी दोन्ही हात माझ्या मानेवर ठेऊन खोकत भिंतीला टेकून खाली बसलो..आता माझ्या जीवात थोडा जीव आला होता..रवी अजूनही माझ्या समोर माझ्याकडे पाहत उभा होता..त्याने शेजारच्या टेबलावरील पाण्याची बाटली घेऊन माझ्यासमोर धरली.. बाटलीतील गार पाण्याचे दोन घोट पिल्यानंतर आणी थोडेसे सावरल्यानंतर त्याने मला विचारले,
“हे मनुष्याच्या चितेपासुन तयार केलेले सिद्ध 'तांत्रिकभस्म' तुला कुठे मिळाले, आणी ते मला लावण्यासाठी कोणी सांगितले होते तूला?”
त्यावर मी त्याला बहादूर व अघोरीबाबा सोबतची माझी झालेली भेट व घडलेली सर्व घटना सांगितली, ती ऐकून त्याच्या चेहर्यावर राग पसरला होता पण लवकरच त्याने तो आवरला.😡
“पण तु नक्की कोण आहेस? आणी भस्म लावल्यानंतर लगेचच तुझे रुप एवढे भयानक कसे काय झाले?” मी भीत भीत विचारले.
“तु आता सगळे पाहिलेच आहे तर तुला सांगायला हरकत नाही की, मी एक 'पिशाच्च' आहे..या फ्लॅट मध्ये राहायला असताना दोन वर्षापुर्वी माझा अकाली म्रुत्यु झाला होता पण काही कारणास्तव मला मुक्ती न मिळाल्याने माझा पिशाच्चयोनीमध्ये प्रवेश झाला आहे..आता तु जे पाहत आहेस ते माझे मनुष्यरूप धारण करुन मी येथे राहतो..तु माझ्या कपाळावर लावलेल्या भस्माने मला माझ्या मुळ रुपामध्ये येण्यासाठी मजबूर केले होते..आणी पिशाच्चाचे असे रुप पाहिल्यानंतर आजवर कोणीही मनूष्य जिवंत वाचला नाहिये.. कारण पिशाचाच्या रूपात आल्यानंतर आम्हाला माणसाच्या रक्ताची तहान लागते..आणी अघोरीबाबाने तुला माझी शिकार म्हणुनच येथे भस्म घेऊन पाठवले असावे असे मला वाटतेय...पण खर सांगायच तर मला तुला ठार मारायचे नव्हते म्हणुन मी खूप कष्टाने माझ्या स्वतः वर कसाबसा ताबा मिळवला आणी त्यामुळेच तु अजूनही जिवंत आहेस”
त्याचे बोलणे ऐकून माझा थरकाप उडाला होता.
“मला जाऊ दे रवी, मी परत या सोसायटीमध्येच काय पण या शहरामध्ये सुद्धा तुला कधीच दिसणार नाही”
"तुला माझ्यापासून भिण्याचे काहिच कारण नाही मित्रा, तुला येथे राहायचे असेल तर तु बिनधास्त राहू शकतोस, गेल्या दोन वर्षापासून मी या फ्लॅट मध्ये राहत आहे.. तुझ्या आधी पण दोन तीन भाडेकरू येथे राहायला आले होते पण ते सतत मोठा आवाज करणारे आणी गोंधळ घालणारे होते..आणी त्यामुळे मला आवश्यक असणार्या शांततेचा भंग करणारे असे लोक मला अजिबात आवडत नव्हते म्हणुन मी काही दिवसातच त्यांना येथून पळवून लावले..पण तुझा स्वभाव मुळातच शांत आणी एककल्ली असल्याने आजवर तुझ्यापासून मला कोणताही त्रास झालेला नव्हता म्हणुन मी तुला येथे राहु दिले..आणी यापुढेही जोपर्यंत तुझी ईच्छा आहे तोवर तु या फ्लॅट मधील तुझ्या खोलीत राहु शकतोस..जोवर तु मला काहि त्रास देत नाहीस तोवर तुला मी काहीच करणार नाही एवढे फक्त लक्षात ठेव " 😨
जरी रवी आता मला आश्वस्त करण्याचा प्रयत्न करत असला तरी पण काहीवेळापुर्वीच्या भयानक प्रसंगानंतर मला येथे राहण्याची ईच्छा होत नव्हती..मनूष्यरूपात वावरणाऱ्या एका भयानक पिशाच्चा सोबत एका फ्लॅट मध्ये राहण्याची मी कल्पनाही करू शकत नव्हतो.
पण बहादूर आणी अघोरीबाबाला रवी विषयी अर्धवटच माहिती असावी असे मला वाटू लागले.. रवी हा भुताने पछाडलेला व्यक्ती नसून स्वतच भुत आहे हे त्यांना माहित होते का?? जर माहित होते तर त्यांनी मला खोटे सांगुन येथे का पाठवले? भस्माच्या प्रभावामुळे मुळ रूपात आलेल्या पिशाच्चाने मला ठार मारले असते तर? अशा नाना शंकाकुशंका माझ्या मनात दाटून येत होत्या. आणी आता माझ्याशी शांतपणे बोलणार्या रवीला मी माझी शंका विचारली, रवी थोडावेळ विचार करून म्हणाला,
"बहादूर आणी अघोरीबाबाला माझ्याविषयी कितपत माहिती आहे याबद्दल मला माहिती नाही..आणी आजच्या घटनेबद्दलपण तु त्या दोघांना जास्त काही सांगितले नाही तर बरे होईल.."
एवढे बोलून तो एक मोठी जांभई देऊन त्याच्या बेडवर आडवा झाला आणी डोळे उघडे ठेवून झोपी गेला.😶
######################
दूसर्या दिवशी सकाळीच मी सोसायटीमधील बहादूरच्या ऑफिसमध्ये गेलो मला पाहताच तो थोडा दचकला आणी आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागला..
“मग काल रात्री रवीला भस्म लावले होते का तु? त्याचे भुत बाहेर निघाले का नाही ?” त्याने मला हळू आवाजात विचारले.
“रवी हा फक्त भुताने झपाटलेला तरुण नसुन स्वतःच भुत आहे हे तुम्हाला माहित होते ना? मग त्याच्यासोबत एका घरात राहण्यामध्ये धोका आहे हे पण तुम्हांला माहिती असेलच की, तरीपण तुम्ही मला त्याच्यासोबत एका फ्लॅट मध्ये का राहायला लावले, याचे उत्तर मला द्या आधी ” मी रागानेच बहादुरला जाब विचारला..
माझे बोलणे ऐकून बहादूर जरा चपापला.
“रवी भु..भुत..मला नाही माहित..मी तर फक्त अघोरीबाबाच्या सुचनेनुसार सगळे काम केले.. आणी तुझ्या सगळ्या प्रश्नांचा जवाब तुला मिळेल, पण त्यासाठी तुला परत एकदा माज्यासोबत अघोरीबाबाकडे यावे लागेल, आणी काल तुझ्यासोबत जे जे काही घडलेले आहे ते सगळे खरेखरे सांगावे लागेल.."
बहादूर थोडा अडखळत बोलला..
माझ्याकडे दूसरा काहि पर्यायपण नव्हता, थोड्याच वेळात आम्ही पुन्हा एकदा डोंगरवाडीच्या दिशेला निघालो. गावच्या स्मशानाबाहेर कार पार्क करून ओढ्याच्या कडेकडेने टेकडीखाली अघोरीबाबाच्या घराकडे आलो..आधीप्रमाणेच मला बाहेरच्या खोलीत बसवून बहादूर आतल्या खोलीत गेला. आणी मला बाहेर ऐकू येणार नाही अशा हळूवार आवाजात ते दोघे काहितरी बोलू लागले.
थोड्या वेळानंतर ते दोघेही बाहेर आले आणी काल रात्री नेमके काय काय घडले अशी विचारणा करू लागले,
मी त्यांना कालचा सर्व घटनाक्रम आणी आमचे संभाषण सविस्तर सांगितल्यानंतर अघोरीबाबा चिंताग्रस्त बनले..
“बहादूर , तुझ्या फ्लॅट मधील ती अमानवी शक्ती माझ्या अपेक्षेपेक्षाही जास्त शक्तीशाली दिसत हाये..त्यानं रवीच्या शरीरावर पुर्णपणे ताबा मिळवलेला दिसतोय.. एवढा की रवी स्वतःचे मुळ अस्तित्वच विसरुन गेला आहे.. माझ्या सिद्ध तांत्रिक भस्माने मोठमोठे भुतेसुद्धा त्यांनी धारण केलेले मनूष्य शरीर एका क्षणात सोडून पळतात पण हे पिशाच्च मात्र मला काहिसे वेगळेच वाटत आहे.. आणी दिनेश, दुसरी एक गोष्ट म्हणजे त्याने सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीवर आपण विश्वास ठेवायचा नाही.. अशी शक्तीशाली भुते नेहमीच तुमच्यासारख्या सामान्य माणसांची दिशाभुल करत असतात"👹
“पण मग आता त्या फ्लॅटला आणी रवीला त्या दूष्ट शक्तीपासुन मुक्त करण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल बाबा?”
बहादुरने विचारले.
“त्यासाठी मला स्वतःला तिथे यावे लागेल, मी एक योजना तयार केली आहे त्याप्रमाणे तुम्ही काम करा.. अजून दोन दिवसानंतर पोर्णिमा आहे..त्या राती जारण मंत्रसाधनेने अभिमंत्रित केलेले सिद्ध भस्म घेऊन मी अशोकबन मध्ये हजर राहतो.. मध्यरातीला रवी जेव्हा त्याच्या खोलीमध्ये झोपलेला असेल तेव्हा दिनेश रवीच्या बेडभोवती त्या सिद्ध भस्माचे एक रिंगण आखुन घेईल.. एकदा ते रिंगण आखल की रवीच्या अंगातील पिशाच्च त्या रिंगणाबाहेर येऊ शकणार नाही मग मी व बहादूर त्या खोलीमध्ये येऊन मंत्र मारून त्या पिशाच्चाला माझ्या बाटलीमध्ये कैद करून घेईल..पण सिद्ध भस्माचे रिंगण आखण्याचे काम फक्त दिनेशलाच करावे लागेल कारण तो बर्याच दिवसांपासुन रवीसोबत राहिलेला आहे आणी त्या फ्लॅट मधील दिनेशचे अस्तित्वही त्या पिशाच्चाला मान्य आहे..दिनेशशिवाय नवीन कोणी व्यक्ती त्या फ्लॅट मध्ये शिरताक्षणीच त्याच्या चाहुलीने ते पिशाच्च लगेच जागे होईल आणी त्याच्याभोवती भस्माचे रिंगण कधीही आखून देणार नाही.. त्यामुळे हे काम फक्त एकमेव दिनेशच करू शकतो… सोबतच दिनेशसाठी सुरक्षा म्हणुन मी एक तावीजपण देतो जो त्याने दंडाला बांधला की त्या भुतापासून त्याचे संरक्षण होईल.” ☠️
अघोरीबाबाची योजना ऐकताच बहादूर माझ्याकडे आशेच्या नजरेने पाहु लागला..पण मला मात्र काहीच सुचत नव्हते, तिकडे तो रवी होता जो स्वतालाच पिशाच्च म्हणवून घेत होता तर इकडे अघोरीबाबा व बहादूर हे मात्र रवी आणी पिशाच्च हे दोघे वेगवेगळे आहेत असे सांगत होते तसेच रवीला आणी त्या फ्लॅटला पिशाच्चापासून मुक्त करण्यासाठी माझी मदत मागत होते..पण मागच्यावेळेचा जीवावर बेतलेला अनूभव डोळ्यासमोर असल्याने यावेळी मी हे काम करण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला..आता बहादूर आणी अघोरीबाबा मला समजावून सांगू लागले..
#क्रमश..
सर्व भागाच्या लिंक्स > Start sTory
https://marathighoststories.blogspot.com/2019/05/marathi-bhutachi-gosht.html
भाग १ > https://marathighoststories.blogspot.com/2019/06/blog-post_9.html
भाग २ > https://marathighoststories.blogspot.com/2019/06/blog-post_53.html
भाग ३ > https://marathighoststories.blogspot.com/2019/06/blog-post_55.html
भाग ४ > https://marathighoststories.blogspot.com/2019/06/blog-post_81.html
भाग ५ > https://marathighoststories.blogspot.com/2019/06/blog-post_83.html
भाग ६ > https://marathighoststories.blogspot.com/2019/06/blog-post_29.html