रवीचे बोलणे आता मलापण योग्य वाटू लागले होते..
" आणी हा, आणखी एक गोष्ट म्हणजे आपल्यामध्ये आज जे काही संभाषण झाले आहे ते बहादूर आणी अघोरीबाबाला अजिबात कळू देऊ नकोस, नाहीतर ते मला पकडण्याचा तुमच्या ठरलेल्या प्लॅनमध्ये बदल करतील आणी तुला तुझा मोबदला म्हणजे हा फ्लॅट मिळणार नाही..त्यामुळे आपले जे काही आहे ते सगळे आपल्या दोघातच राहु दे" रवीने पुढे सांगितले.
"पण तुला पकडण्याच्या आमच्या प्लॅन मध्ये तु मला सहकार्य कशासाठी करत आहेस?" मी विचारले.😐
"आता ज्याअर्थी बहादूर आणी अघोरीबाबा पुर्ण शक्तीनिशी मला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे आज ना उद्या माझे पकडले जाणे तर निश्चितच आहे..त्यामुळे मला कळून चूकलेय की मी आता फारवेळ त्यांच्यापासून वाचू शकत नाही. मग जर मला कैद होणारच आहे तर त्यानिमित्ताने तेवढाच तुझाही फायदा करून देतो..म्हणजे भविष्यात तु कायम माझी आठवण ठेवशील"
रवीने माझे शंकानिरसन केले. आणी मी त्याचा निरोप घेऊन त्याच्या रूममधून बाहेर पडुन माझ्या रुममध्ये येऊन झोपलो.
या भेटीमुळे आता माझी रवी बद्दलची भिती कमी झाली होती.
######################
पुढील दोन दिवस मी ऑफिसमधील माझे पेंडीग कामे आवरून घेत होतो, कामावरून संध्याकाळी आलो कि बहादूरची भेट व्हायची..अघोरीबाबा आता रात्रंदिवस साधना करून पोर्णिमेच्या रात्रीसाठी तयारी करत आहे असे बहादूरने मला सांगितले तसेच रवी समोर एकदम नॉर्मल राहत चल असेही बजावले.
रात्री फ्लॅट वर गेल्यावर कधी मला रवी दिसला तरी एकदम शांत वाटत होता, तरीपण त्याच्यासोबत बोलणे मी आता कटाक्षाने टाळत होतो..
पोर्णिमेच्या रात्रीसाठी माझी पण मानसिक तयारी आता पुर्ण झाली होती, लवकरच मी राहत असलेला फ्लॅट माझ्या स्वताच्या नावावर दिसणार होता आणी त्यासाठी मला एका रात्रीची रिस्क तर घ्यावीच लागणार होती.🌃
अखेर ती रात्र उजाडली..रात्री दहाच्या सुमारास मी ठरल्याप्रमाणे बहादुरच्या ऑफिसमध्ये जावून थांबलो..बहादूर अघोरीबाबाला आणण्यासाठी एकटाच डोंगरवाडीला गेला होता..सोसायटीमध्ये पण आता जवळपास शांतता झाली होती..आणखी तासभर वाट पाहिल्यानंतर बहादूरची कार तेथे आली आणी अघोरीबाबा खांद्यावर लटकवायची एक मोठी चामडी पिशवी घेऊन कारबाहेर बाहेर उतरला..आम्ही तिघांनी तेथेच ऑफीसमध्ये बसून काही वेळ चर्चा केली आणी आणखी वेळ उलटण्याची वाट पाहू लागलो.
आता रात्रीचे साडेबारा वाजले होते..आम्ही ऑफीसच्या बाहेर आलो...सोसायटी पुर्ण सामसूम झाली होती. बिल्डींग्सच्या वर आकाशात उडणार्या वटवाघूळांशिवाय आणी आमच्या तिघांशिवाय आता कोणीही जागे नव्हते. चार नंबर बिल्डींगच्या खाली येताच अघोरीबाबाने भस्माची एक छोटी थैली माझ्या हातात दिली आणी माझ्या फ्लॅट मध्ये जाण्यास सांगितले. मी जिने चढुन माझ्या फ्लॅट मध्ये गेलो ..रात्री बाहेर पडतानाच आतील सर्व मोठ्या लाईट्स बंद केलेल्या होत्या..आणी आता मी अंधुक प्रकाशातच चोर पावलांनी त्याच्या रुममध्ये शिरलो..तो बेडवर संपुर्ण अंगावर पांढरी चादर ओढून झोपलेला दिसत होता..जरी रवीने दोन दिवसापुर्वीच मला आश्वासन दिलेले असले तरी तो त्याच्या मुळ पिशाचाच्या रुपात आल्यास माझी काही खैर नव्हती..त्यामुळे सर्व काम मी सावधपणे आणी आवाज न करता करत होतो..थैलीतुन मुठभर सिद्ध भस्म घेऊन मी त्या बेडभोवती रिंगण काढण्यास सुरूवात केली. बेडवर कोणतीही हालचाल होत नव्हती..हळूहळू थैलीतील सर्व भस्म वापरून बेडच्या सगळ्या बाजूंनी भस्माचे रिंगण आखून मी सुटकेचा निश्वास सोडला..आणी तशाच दबक्या पाऊलांनी त्याच्या रुमच्या बाहेर पडलो..बाहेर बाल्कनीत येऊन बिल्डिंगच्या खाली थांबलेल्या दोघांना काम फत्ते झाल्याचा इशारा केला..👍
लगेच अघोरीबाबा आणी त्याच्या मामोमाग बहादुरपण हातामध्ये कसल्यातरी पिशव्या घेऊन जिन्याने चौथ्या मजल्यावरील त्या फ्लॅटच्या दरवाजाच्या बाहेर आले.
"सांगितल्याप्रमाणेच सगळे बरोबर केले आहेस ना " अघोरीबाबाने त्रासिक आवाजात विचारले. मी मान हलवून होकार दिला.
दोघेही अंधूक प्रकाशात दरवाज्यातुन हॉलमध्ये आले आणी मला रवीच्या रूममधील लाईट लावायला सांगितली.
लाईट लावल्यानंतर अघोरीबाबाने रूमच्या बाहेरूनच डोकावून आत भस्माचे रिंगण व्यवस्थित आखलेले तपासून पाहिले आणी नंतरच त्या दोघांनी रूममध्ये प्रवेश केला. आता आम्ही तिघेही रवीच्या बेडच्या समोर उभे होतो..रवी आमच्यासमोर अंगावर चादर घेऊन झोपलेला दिसत होता.
अघोरीबाबाने वेळ न दवडता त्यांच्या खांद्यावरील पिशवी खाली ठेऊन दिली. पिशवीतल्या एका कप्यातुन थोडी पांढर्या रंगाची वाळू काढुन खाली फरशीवर त्या वाळुचे कसलेतरी यंत्र आखले.. एक जाड काचेची बाटली झाकण उघडून त्या यंत्राच्या मधोमध ठेवली..बहादुर आणी मी उत्सुकतेने पाहु लागलो..
नंतर बाबांनी पिशवीमधल्या एका बाटलीतील पाणी हातामध्ये घेऊन एक मंत्र म्हणून त्या बेडवर टाकले.
ते अभिमंत्रित पाणी बेडवर पडताच जणू गरम तव्यावर टाकल्यासारखीच त्या पाण्याची वाफ बनली, पण अंगावर घट्ट चादर ओढुन झोपलेल्या रवीच्या शरीराची मात्र कोणतीच हालचाल झाली नाही, हे पाहून बाबाला आश्चर्य वाटले.
बाबाला काहीतरी संशय आला आणी त्याने पुढे होऊन एका झटक्यात रवीच्या अंगावरील पांढरी चादर ओढून काढली आणी समोरचे द्रूश्य पाहुन आमच्या अंगावर सर्रकन काटा ऊभा राहिला.
आमच्या समोरील बेडवरील चादरीखाली फक्त उशी आणी लोड तक्के ठेवलेले होते..रवी तेथे नव्हताच.
"धोका..आपल्याला पिशाच्चाने धोका दिला, आपण येथे येणार हे बहुतेक त्याला आधीच समजलेले होते " अघोरीबाबा ओरडला.
बहादूर आणी माझे तर हातपायच गळाले.😵
"लवकर या घरातुन बाहेर चला" बाबाने आम्हाला सुचना दिली.
आम्ही घाईने रवीच्या रुममधून बाहेर पडुन, हॉलमध्ये आलो आणी फ्लॅटच्या बाहेर जाण्यासाठी दरवाजा खोलण्याचा प्रयत्न करू लागलो..पण दरवाजा काही केल्या उघडतच नव्हता.
"अरे हा दरवाजा बाहेरून कोणी लॉक केला रे " बहादूर चिडला होता.
मी लगेच त्या मोठ्या हॉलमधील लाईट्स ऑन केली आणी पाहु लागलो तर दरवाजा खरोखरच बाहेरुन लॉक झालेला होता.. हे पाहून आता माझे अंग थरथरू लागले होते. तेवढ्यात माझ्या कानावर घर्रघर्र आवाज आला आणी मी चमकून ईकडेतिकडे पाहु लागलो, माझे लक्ष छताकडे गेले आणी तोंडातुन किंकाळीच बाहेर पडली..
काही दिवसांपूर्वी मी रवीला झोपेत तांत्रिकभस्म लावल्यानंतर तो ज्या रूपात आला होता त्याच पिशाच्चरूपात तो हॉलच्या छताला चिकटून उलटा झोपला होता..त्याचे डोळे अंगारासारखे तापलेले होते आणी घशातुन आवाज येत होता म्हणजेच रवी आता पुर्ण पिशाच्च रुपात होता.
मी घाबरलेल्या चेहर्याने बहादूर आणी बाबाला छताला चिकटून झोपलेले पिशाच्च दाखवले आणी त्यांच्याही छातीचा ठोका चूकला.👹
"घाबरू नका, भुत रिंगणाच्या बाहेर असले तरी अजूनही मी याचा बंदोबस्त करू शकतो..येतानाच सगळ्या तयारीनिशी आलो होतो मी" अघोरीबाबाने बोलताना आवंढा गिळला होता.
बाबाने ताबडतोब चामडी पिशवीतुन एक मुठ भरुन सिद्ध भस्म काढले आणी छताला चिकटलेल्या भुताच्या अंगावर जोरात फेकून मारले. भस्म पडताच भुताच्या अंगाची लाही लाही झाली आणी ते सात फुटाचे अजस्र, काळ्या रंगाचे केसाळ धूड धाडकन छतावरुन खाली फरशीवर आदळले.
दरम्यान बाबाने चपळाईने त्याच्या पिशवीतुन एक छोटी मानवी कवटी आणी एक जाड हाडूक बाहेर काढलेले होते..तोंडातल्या तोंडात मंत्रोच्चार करत डाव्या हातात कवटी घट्ट धरून आणी दूसर्या हाताने हाडूक हवेत गोल गोल फिरवत खाली फरशीवर पडलेल्या पिशाच्याला लावले. बाबाच्या मंत्रसामर्थ्याने आता फरशीवर धडपड करत असलेल्या पिशाच्याचे रुपांतर पांढर्या धुरामध्ये होउन तो धूर बाबाने हातामध्ये पकडलेल्या कवटीमध्ये सामावत चालला होता. बहादूर आणी मी डोळे विस्फारून सगळे पाहत होतो..बाबाच्या चेहर्यावर आता थोडे समाधानाचे भाव दिसत असले तरी पण बाबाच्या चेहर्यावरील आनंद फारकाळ टिकणार नव्हता.
जरी पिशाच्च धूररूपाने कवटीमध्ये शिरलेला असला तरी त्याची शक्ती अजून संपलेली नव्हती..पिशाचाच्या अद्भुत शक्तीची जाणीव बाबालासुद्धा होती म्हणुनच त्याने रवी झोपेत असतानाच त्याच्याभोवती सिद्ध भस्माचे रिंगण आखायला लावले होते..कारण त्या रिंगणाच्या आत पिशाच्यावर काबू मिळवणे बाबाला शक्य होते.. पण आता त्या मोकळ्या हॉलमध्ये मुक्त असणार्या भुताला पकडुन ताब्यात ठेवणे हे काम मात्र बाबाच्याही आवाक्याबाहेरचे दिसत होते..आणी आता पुढे काय होणार हे कोणालाच समजत नव्हते..कारण आता बाबा भुतावर विजय मिळवून त्याला कैद करण्यासाठी नाही तर त्या फ्लॅट मधून सुखरूप बाहेर पडण्यासाठी लढत होता..👤
सगळा धुर कवटीमध्ये शिरल्यानंतर बाबाच्या हातातील कवटी आता गदागदा हलू लागली होती..कवटी प्रमाणापेक्षा जास्त गरम होऊन लाल भडक दिसायला लागली होती..बाबाच्या हाताला जोराचा चटका बसल्याने बाबाने ती कवटी हातातुन खाली फरशीवर सोडुन दिली..आणी थोड्याच वेळात लाल निखार्यासारख्या तप्त तापलेल्या कवटीला चिरा पडुन ती फुटून गेली..आत कोंडलेला धूर पुन्हा बाहेर आला होता. ते पिशाच्च कवटीतुन मुक्त झाले होते..सगळा धूर एकत्रित येऊन पुन्हा मानवी आकार घेऊ लागला होता..थोड्याच वेळात ते पिशाच्च पुन्हा आमच्यासमोर उभे राहिले होते..
#क्रमशः
सर्व भागाच्या लिंक्स > Start sTory
https://marathighoststories.blogspot.com/2019/05/marathi-bhutachi-gosht.html
भाग १ > https://marathighoststories.blogspot.com/2019/06/blog-post_9.html
भाग २ > https://marathighoststories.blogspot.com/2019/06/blog-post_53.html
भाग ३ > https://marathighoststories.blogspot.com/2019/06/blog-post_55.html
भाग ४ > https://marathighoststories.blogspot.com/2019/06/blog-post_81.html
भाग ५ > https://marathighoststories.blogspot.com/2019/06/blog-post_83.html
भाग ६ > https://marathighoststories.blogspot.com/2019/06/blog-post_29.html