🔸नरपिशाच्च - भाग दोन 🔸
त्या रात्री घडलेल्या प्रसंगानंतर मला आता त्याची भिती वाटायला लागली होती, आणी मी शक्यतो जास्तीत जास्त त्याला टाळण्याचा प्रयत्न करू लागलो. दुसर्या दिवशी संध्याकाळी कामावरून आल्यानंतर मी बहादूर ला जावून भेटलो आणी त्याला कालची घटना सांगितली तसेच शक्यतो दूसरीकडे एखाद्या रिकाम्या फ्लॅट मध्ये मला शिफ्ट करावे अशी विनंतीपण केली.. सुरूवातीला बहादूर टाळाटाळ करत राहिला, पण थोड्यावेळाने तो विचार करून म्हणाला,
“ रवीला मी चांगले ओळखतो तो माझा जूना भाडेकरू आहे.. पण काही दिवसांपुर्वी तो आपल्यासारखाच नॉर्मल होता..आजकाल तो जे काही वेडसरपनाने वागत आहे त्याच्या मागे पण एक कारण आहे, अखेर माझा अंदाज खरा ठरला”
"कसला अंदाज? काय कारण आहे त्यामागे?"
मी आश्चर्याने विचारले.
“दोन बरसपुर्वीची बात आहे..रवी त्या फ्लॅट मध्ये राहायला येण्याच्या आधी तुमच्याच वयाचा एक तरुण कामगार त्याच फ्लॅट मध्ये एकटाच राहायला होता..एका राती कोणीतरी चाकू भोकसुन त्याचा खून केला होता, त्या खूनाच्या प्रकारानंतर बरेच दिवस तो फ्लॅट बंद होता नंतर वर्षभराने रवी तेथे राहायला आला..मला तर असे वाटतेय त्या खून झालेल्या तरुणाच्या भुतानेच रवीला झपाटलेले असावे म्हणुनच तो असा विचित्र वागत आहे..त्याचे सगळे लक्षणे तरी हेच सांगतात”💀
“बापरे ,असे असल तर हा विचित्रच प्रकार म्हणावा लागेल, पण मग आता काय करायचे?”
सगळे प्रकरण आता हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागले होते.
“हे बघ दिनेश, तुझ्या अडचणीच्या समयमध्ये मी तुला राहायला घर देऊन तुझी मदत केली होती ना, मग आता तुझी बारी, तु पण माझी मदत करायचीस. रवीला त्या भुतापासून वाचवण्यासाठी तुला माझी मदत करावी लागल” बहादूरने स्पष्ट केले.
“मी..पण मला तर भुताची खूप भिती वाटते, दूसरे काही काम असते तर मी केले असते पण हे..”
“अरे काही नाही होत, मी आहे ना तुझ्याबरोबर” बहादूरने मला धीर दिला, आणी मी नाईलाजाने त्याचे काम करण्यास होकार दिला.
सध्यातरी मला त्याचे काम ऐकण्याशिवाय पर्यायपण नव्हता.
दूसर्या दिवशी रविवारची सुट्टी होती. बहादूरने संध्याकाळी मला बोलावून घेतले.. आम्ही दोघेजण त्याच्या कारमध्ये बसुन सोसायटीच्या बाहेर पडलो आणी तेथून काही अंतरावरून आत गेलेल्या एका कच्च्या रस्त्यावरून कुठल्यातरी खेडेगावाच्या दिशेला निघालो. संध्याकाळची वेळ होती. तासभर ड्रायव्हिंग केल्यावर 'डोंगरवाडी' नावाच्या छोट्याशा गावाजवळ पोहोचलो..त्या गावापासून काही अंतरावर असणाऱ्या स्मशानभूमीच्या बाहेर मोकळ्या जागेत कार लावून तेथून वाहत असलेल्या छोट्या ओढ्याच्या कडेकडेने आम्ही एका टेकडीच्या दिशेने चालत चालत गेलो. पंधरा वीस मिनीटे चालल्यानंतर त्या एकांत ठिकाणी आम्हाला एक जूनाट घर दिसले.🏡
“या समोरच्या मकानमध्ये “अघोरीबाबा” राहतात..बडे सिद्धमांत्रिक आहेत, आत गेल्यानंतर तु शांतच राहा, जे काही बोलायच ते मी बोलेल” बहादूरने मला समजावले.
त्या घराच्या बाहेर एक विजलेले हवनकुंड दिसत होते ज्यातुन थोडाथोडा धूर बाहेर येत होता. घराचा लाकडी दरवाजा लोटुन आम्ही आत शिरलो. बहादूरने मला बाहेरच्या खोलीत बसवले आणी तो आतल्या खोलीत गेला. मी थोडावेळ त्या खोलीचे निरीक्षण करत बसलो. खोलीत ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्राण्यांचे तसेच मानवी हाडके ठेवलेले दिसत होते. अनेक वेगवेगळ्या वनस्पतींची मुळे व पाने होती. एका कोपर्यात सापाचे सोललेले चामडे दिसत होते. काहीवेळ मला आतल्या खोलीतून बहादूर आणी अघोरीबाबाची काहितरी अस्पष्ट कुजबूज ऐकू येत होती.👥
दहा मिनीटानंतर ते दोघे बाहेर आले. ‘अघोरीबाबा’ नावाप्रमाणेच अघोरी वाटत होता. मोठे डोळे व भेदक नजर, डोक्याचे व दाढीचे लांब काळे पांढरे केस, अंगाचा किंवा अंगावरील जून्या कपड्यांचा जाणवणारा दूर्गंध. माझ्यासाठी हे सगळे वातावरण नवीन व भितीदायक होते पण बहादूर आणी अघोरीबाबाची आधीपासूनच जूनी ओळख असावी असे मला वाटले.
अघोरीबाबाने एक नजर माझ्याकडे टाकली आणी त्याच्या हातातील चामड्याच्या काळ्या पिशवीतुन एक मुठ राख काढुन एका कागदामध्ये पुडी करुन बहादूरच्या हातात दिली.
“हे 'महातांत्रिक भस्म' नीट सांभाळून ठेव..आज रातीला जवा तो भुतानं झपाटलेला छोकरा झोपेत असल तवा त्याच्या माथ्यावर हे लावायच..त्याच भुत लगेच उतरून जाईल"
मांत्रिकाने त्याच्या मोठ्या आवाजात माहिती दिली. बाबाचा निरोप घेऊन बहादूर व मी दोघेजण परत आमची कार लावलेल्या ठिकाणी चालत चालत आलो..आणी कारमध्ये बसुन डोंगरवाडीच्या बाहेर पडून परत आमच्या सोसायटीच्या रस्त्याला लागलो.🚘
अशोकवन सोसायटीमध्ये येताच बहादूरने भस्माची पुडी माझ्या हातात देऊन परत एकदा सगळे व्यवस्थित समजावून सांगितले आणी मी मान हालवून होकार दिला..आणी थोड्याच वेळात माझ्या फ्लॅट वर गेलो.
आता रात्र वाढीस लागली होती..झोप येऊ नये म्हणुन मी माझ्या खोलीत बराचवेळापासून कानात हेडफोन लावून गाणी ऐकत होतो. फ्लॅट मध्ये आल्याबरोबर मी हळुच रवीच्या खोलीत डोकावून आज तो आतच असल्याची खात्री करून घेतली होती. आता साडेबारा वाजून गेले होते,आता तो नक्कीच झोपला असावा, असा विचार करून मी हळुच बेडवरून उठलो आणी दबक्या पावलांनी त्याच्या खोलीत गेलो..त्याच्या बेडजवळ जाताच माझी धडधड वाढू लागली. मी त्याला परवा ज्या अवस्थेत पाहिलेले होते आजपण तो तशाच अवस्थेत झोपलेला दिसून येत होता.
मी हळूच कागदाची पुडी सोडुन त्यातली सगळी राख मुठीत घेतली आणी त्याच्या कपाळावर फासली..राख त्याच्या कपाळावर लावताक्षणीच माझ्या हाताला जोराचा चटका बसल्यासारखे झाले..मी लगेच हात झटकला.. दरम्यान जागे झालेल्या रवीने त्याचे डोळे फिरवत माझ्याकडे पाहिले.. त्याचे कपाळ लालभडक झाले होते आणी त्याच्या कपाळावर मी फासलेल्या राखेतुन धूर येत होता.
त्याच्या चेहर्यावर आता क्रोध दाटून आला होता. तो ताडकन उठून उभा राहिला. त्याचे शरीर आता झपाट्याने बदलत चालले होते. हाता पायाला लांब लांब काळे केस उगवले होते..त्याचा चेहरा तर मोठाच भयानक बनला होता, दोन्ही डोळे पांढरेफटक आणी चमकदार बनले होते..त्याच्या तोंडातील काही दातांचे छोटे टोकदार सुळे बनुन जबड्याबाहेर आले होते. साधारणपणे साडेपाच फुटाचा असणारा रवी आता मात्र चांगला सात फुट उंच बनला होता.. त्याच्या घशातुन विचित्र घरघर आवाज निघायला सुरूवात झाली होती..👹
काही क्षणातच त्याच्या शरीरात झालेला हा बदल पाहुन माझेपण भितीने डोळे वासले होते.
त्याने एका झटक्यात त्याच्या उजव्या हाताने माझी मान पकडली आणी एखाद्या बाहूल्याप्रमाणे मला मागे फरपटत नेऊन मागच्या भितींवर आदळले, मी माझी मान त्याच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करू लागलो.. पण माझ्या दोन्ही हातांचा जोर लावूनही त्याच्या काळ्या हाताची माझ्या मानेवरची मजबुत पकड मी सोडवू शकत नव्हतो..
#क्रमश..
सर्व भागाच्या लिंक्स > Start sTory
https://marathighoststories.blogspot.com/2019/05/marathi-bhutachi-gosht.html
भाग १ > https://marathighoststories.blogspot.com/2019/06/blog-post_9.html
भाग २ > https://marathighoststories.blogspot.com/2019/06/blog-post_53.html
भाग ३ > https://marathighoststories.blogspot.com/2019/06/blog-post_55.html
भाग ४ > https://marathighoststories.blogspot.com/2019/06/blog-post_81.html
भाग ५ > https://marathighoststories.blogspot.com/2019/06/blog-post_83.html
भाग ६ > https://marathighoststories.blogspot.com/2019/06/blog-post_29.html