" काळ्या जिभेची कुठली.... तोंड बंद कर नाहीतर बघ......."
हॉस्पीटलच्या शांत वातावरणात महीला कर्मचारी एका पेशंटवर ओरडत होती, तीचा आवाज मात्र हॉस्पीटलच्या दुस-या मजल्यावरच्या संपुर्ण वार्डमधे घुमला......
दुपारची कडक उन्ह आता काहीशी कमी होत सुर्य क्षितीजाकडे झुकत चाललेला... पाय-या चढुन हॉस्पीटलच्या वॉर्ड मधुन इन्स्पेक्टर झपाझप पावल टाकत चालत येत होते त्यांच्या मागे दोन हवलदार आणी सोबतच हॉस्पीटलचे प्रमुख डॉक्टर जोशी त्यांच्याशी बोलु लागले..
" साहेब मी दोन दिवस मुंबईला होतो.. हैल्युसिनेशन या मानसिक आजारावर एक व्याख्यान आयोजित केलेल आणी मुख्य अतीथी म्हणुन मला बोलवलेल...."
" बर मग तुम्ही कधी आलात...?"
इतक्यात त्यांच्या कानावर पुन्हा त्याच कर्मचारी स्त्रीचा आवाज पडला
" ए सटवे... काळ्या जीभेची कुठली... अस काहीतरी अभद्र बोलतेस म्हणुनच तुझ्या घरच्यांनी इथ ठेवलय...."
बोलता बोलता ती मागे फिरली आणी साहेबांना पाहुन दचकली... इन्स्पेक्टर तसेच चालत पुढ येत ती कर्मचारी ज्या पेशंटला रागवत होत्या त्या रूमच्या उघड्या दरवाजातुन पाहु लागले... काळोखान भरलेल्या त्या रुममधे कोप-यातुन किलकिल्या डोळ्यांवरच्या चष्म्याच्या पांढ-या काचा तेवढ्याच दिसत होत्या... कोणीतरी पहात होत.. पन तीची मात्र नजर स्थिरावली होती आपल्या समोरच्या रूम मधे...
" साहेब.... हीच रूम....." मावशी उद्गारल्या तसे साहेब मागे फिरले
"हम्म... तुम्ही कोण.....?"
" मी इथली वार्डन... 'मावशी' म्हणतात सगळे..." मावशींनी दाखवलेल्या रुमकडे साहेब पाहु लागले.... तो बंद दरवाजा किंचीत उघडला तशी समोरच्या खिडकीतुन मावळतीला गेलेल्या सुर्याची कोवळी किरणे आत पसरलेली दिसली...ते तसेेच चालत आत गेले.. एक छोटा बेड होता ज्यावर किंचीत रक्ताचे डाग दिसत होते.. समोरील खिडकीच्या पारदर्शक काचा फुटून बाहेरच्या बाजुला पडलेल्या... साहेबांनी खिडकीतुन बाहेर पाहील तर खाली दुरवर काचांचे तुकडे पसरलेले.. इन्स्पेक्टर साहेबांनी आपल्या हातातल्या त्या छोट्या स्टिक ने खिकडीच दार किंचीत पुढ केल आणी मागे फिरत पुन्हा ती खोली पाहु लागले... फर्शीवर ठिकठीकाणी रक्ताचे सुकलेले डाग पडलेले तर भिंतीवरही रक्त उडालेल.. अचानक साहेबांची नजर एके ठिकाणी स्थिरावली .... कोप-यात... भुवया आकसत ते खाली झुकले... तो मानवी हाताचा अर्धा तुटलेला अंगठा होत.. फॉरन्सिक टीमला नमुने घ्यायला सांगुन ते त्या रुमच्या दरवाजातुन बाहेर पडु लागले तशी त्यांची नजर समोरच्या रूमच्या किंचीत उघड्या दरवाजातुन आतल्या काळोखात दिसणा-या किलकील्या डोळ्यांवर गेली... तसा त्या खोलीतुन आवाज आला..
" अंत झाला शेवटी... पन अंत की सुरवात... की सुरवात होण्याआधी अंत.... त्यान मुक्त केल शेवटी... एक बळी देऊन तीला मुक्त केल..."
मावशी रागाने तो दरवाजा बंद करत म्हणाल्या..
" साहेब, ही सुजाता.... काय त्या आजाराच नाव....हालू.... हालू...."
" हैल्युलिनेशन......" डॉक्टर जोशी उद्गारले....
" हा तेच ते.... भुत बीत दीसत म्हणते तीला..... काय पन नमुणे येतात...."
पन त्यांच्या बोलण्याकड लक्ष न देता इन्स्पेक्टर चालत पुढ निघाले.... दोन्ही बाजुला दिसणा-या रुग्णाच्या खोल्या पहात सर्व डाव्या बाजुला मोडकळीला आलेल्या बाथरुमजवळ पोहोचले... तीथ आधीच उभ्या दोन वयस्कर व्यक्ती बाजुला सरकल्या त्यातला एक वॉचमन तर दुसरा त्या मावशीचा नवरा दोघेही हॉस्पीटल च्या आवारात त्यांना बाधुन दिलेल्या खोलीत रहायचे...

इन्स्पेक्टर बाथरूमच्या उघड्या दरवाजातुन आत आले... बाथरूमच्या . आतल्या पांढ-या फर्शीवर एक प्रेत पडलेल... बाजुलाच पडलेला एक धारदार प्युअर स्टेनलेस स्टीलचा चाकु भिंतीवरील बल्बच्या प्रकाशात चकाकत होता. त्या चाकुच्या धारधार दात-यांमधे त्याच्या मांसाचे बारीक लालसर कण अडकलेले अगदी स्पष्ट दिसत होते. गळा चिरून त्याचा खुन झालेला, त्याच्या जखमेतून भळाभळा वाहणार रक्त हवेच्या संपर्कात आल्यान घट्ट होऊन बाथरूमच्या पांढ-या फर्शीवर पसरल्यान त्याचा लाल रंग खुपच भडक दिसत होता.. त्याचा एक जाडसर थरच तयार झालेला. रक्तात पुरत भिजुन पालथ पडलेल त्याच शरीर निष्प्रान झाल असल तरी डोळे मात्र सताड उघडे एके ठिकानी स्थिरावली होती... इन्स्पेक्टर साहेबांनी समोरच्या आरशाकड पाहील, आरशाच्या त्या काचेवर मोठ्या अक्षरात काहीतरी लिहील होत... दोनच शब्द .. अर्धवट संदेश... पन त्या दोन शब्दांच कोड उलगडेना... कदाचीत खुन करून पसार होण्याच्या नादात तो अर्धवट राहीला असावा..
इन्स्पेक्टर त्या प्रेताकड पाहात म्हणाले ..

" खुन करुन खुनी पसार झाला पन कुणीच पाहील नाही.... वाॅचमन झोपला होता काय...?"
पण सर्व तसेच शांत उभे होते... साहेबांना वॉशबेसीनवर एक मोबाईल ठेवलेला दिसला.. इन्स्पेक्टर साहेबांनी खिशातला पांढरा रुमाल काढुन तो मोबाईल उचचला...
'Sound recorder' ऑप्शन सुरू होत... एक रेकॉर्ड केलेला मेसेज.... मोबाईल फ्लाईट मोडमधे टाकलेला ....
मोबाईल हातात घेत त्यांनी एक नजर सर्वांकडे पाहील... डॉक्टर जोशी शांतपने साहेबांकडे पहात होते तर त्यांचा स्टाफ एकमेकांत कुजबूज करीत होता...
त्यानी तो मेसेज प्ले केला.... तशी सर्वांची कुजबूज थांबली... सर्वच तो शांतपने ऐकु लागले... कदाचीत हा खुन करणा-यानच हा मेसेज ठेवलेला असेल...
एका गुढ शांततेनंतर त्या मोबाईल मधुन एका युवकाचा आवाज येऊ लागला...

प्रेम......? हं..... प्रेम.......!
प्रेम आंधळ असत अस म्हणतात...
प्रेम म्हणजे या जगातली सर्वात सुंदर कल्पना... कधी नुसती कल्पना,तर कधी भयान वास्तव.
कधी सुरेख चांदण, तर कधी भयान काळोख.. कधी आयुष्यभराची सोबत तर कधी अर्ध्यातच शेवट.
शेवट....तो ही भिषण... काळजाचा थरकाप उडवणारा शेवट...
तुम्हीही केल असेल प्रेम .. म्हणजे अजुनही करत असाल.. प्रियकर म्हणुन काय करू शकतो आपण तीच्या साठी... तीच्या निरागस चेह-यावर चांदण खुलवण्यासाठी.. तीच्या आयुष्यात इंद्रधणुषी रंग भरण्यासाठी...
मी ही केल.. त्या आंधळ्या प्रेमाचा अंत असा रक्तरंजीत होऊन संपेल हा विचारही मनात आला नव्हता..
पन हा अंत होता , की अंताची सुरवात ? की सुरवात होण्याआधीच झालेला अंत...? माहीत नाही पन याची सुरवात झाली ती दोन आठवड्यांपुर्वी.. हो दोन आठवड्यापुर्वीची ती घटना...
'त्या' रात्रीे... म्हणजे साधारण दहा, साडे दहा वाजायला आले होते. ही वेळ म्हणजे सामान्यता: जेवण उरकुन बाहेर कट्ट्यावर गप्पा मारण्याची. चंद्राची कोर अगदी मंदपने ढगांच्या मागुन हळुच डोकावत पुन्हा ढगांच्या मागे लपुन जायची.. थंडी तर कमालीची त्यात अंगाला झोंबणारी छानशी हवा सुटलेली... आम्हा मित्रांच्या गप्पा रंगात आलेल्या...
तोच एका मुलीच्या भयान, ह्रदय पिळवटून टाकणा-या आर्त किंकाळीने आम्ही सर्वच हादरून गेले.. मघापासुन मजेशीर गप्पांनी पिकनारा हाशा एकदम बंदच झाला... सर्वच ताडकन उठुन उभे रहात एकमेकांना प्रश्नार्थी नजरेने पहात आजुबाजुलाही नजर फिरवू लागलो... गल्ली पुर्ण शांत दिसत होती... त्यातच एक दोन विजेचे दिवे तेवढेच शिल्लक होते. तसेच सर्व त्या आवाजाच्या दिशेने पाहु लागलो.. पण आवाज कुठून आला समजल नाही.. त्या आवाजाने आजुबाजूच्या घरातील लोक ही पटापट बाहेर पडत एकमेकांकडे थोडी भिती आणि आश्चर्यान पाहु लागले.
आमची आपसात कुजबूज सुरू झाली तशी पुन्हा ती आर्त किंकाळी ऐकु आली... आवाज ज्या घरातुन येत होता ते साधारण आमच्या गल्लीतच साठ ते सत्तर मीटर अंतरावर असेल... आम्ही तसेच धावत त्या घराकडे निघालो रस्ता तसा कच्चाच होता. आणि त्यात भर म्हणुन रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबावरील दिवा गल्लीतीलच काही टवाळखोर , आणि शुद्ध मराठी भाषेत सांगायच तर गल्लीतुन ओवाळुन टाकलेल्या दिवट्यांनी फोडले होते. त्यामुळे खुपच अंधार होता.. पन ज्या घरातुन ती आर्त किंकाळी आली होती त्यांच्या दारात लावलाला बल्ब आपल्या परीन अंधार दुर करण्याचा केवीलवाणा प्रयत्न करत होता...
त्या घरात काही दिवसापुर्वी एक कुटूंम्ब रहायला आल होत. पती, पत्नी त्यांचा मुलगा जो बारावीला होता ,आणि मोठी मुलगी एकवीस, बावीस वर्षची असेल.. ती मेडीकलची स्टुडेंट होती.. दिसायला खुपच गोरीपान , लांब आणी किंचीतसे तांबूस केस, निळसर आणि काजळ घातल्या सारखे डोळे, रेखीव चेहरा तर अंगाने नाजुक, अगदीच बारीक होती. पहील्या नजरेतच सहज मनात भरेल अशी. आता हे सगळ वर्णन मला कट्ट्यावर खुपशा मित्रांच्या तोंडुन ऐकायला भेटलेल, पण प्रत्यक्षात तीला पहाण्याचा योग आजवर आला नव्हता... ती आमच्या गल्लीत रहायला आल्यापासुन संपुर्ण गावातीलच मुलांच्या मोटरसायकच्या फे-या आमच्या गल्लीतुन वाढल्या होत्या...
आम्ही धावतच त्यांच्या घराजवळ आलो आणि दरवाजा वाजवत बाहेरुन आवाज दिला तशी पुन्हा ती किंकाळी आणि वेदनेन कन्हत असलेला आवाज येऊ लागला.. आता मात्र नाईलाज झाला होता. सर्वाना बाजुला करत एक जोरदार लाथ घातली तसा खाडकन दरवाजा कडीमधून तूटला . पटापट आत शिरलो तर घरात वस्तू विस्कटल्या होत्या. समोर तीची आई डोक्याला हात लाऊन भिंतीला टेक रडत ऊभी होती. तर बाजुला तीचे वडिल तीला खुर्चीवर जखडून धरत होते. तीचा भाऊ देखील आपल्या बहीणीला जखडून ठेवण्यायाठी वडीलांना मदत करत होता. काय चाललय हे समजत नव्हत. समोरचे हे दृष्य पाहून आम्ही सर्वच गोंधळुन गेलो होतो. तोच आमच्या तील एकजन ओरडला.
"काय हे..? काय करताय हे...? का स्वता:च्या मुलीसोबत अस करताय. सोडा तीला..."
तस सगळ वातावरण एकदम शांत झाल.. ती मुलगी ही खुर्चीवर बसुन तशीच रडत होती. तीच्या वडिलांनी हाताची पकड सैल करत बाजुला झाले. तीला पाहुन आम्ही सगळेच चक्राऊन गेलो... पांढरा गाऊन अंगात होता, तीचे केस पुर्णपणे विस्कटून चेह-यावर पसरले होते.. दोन्ही हातानी खुर्ची घट्ट पकडलेली त्यामुळे तीच्या हातावर ऊठलेले ओरखडे आणि त्यातुन वहाणार किंचीतस रक्त, तीच्या नाजुक त्वचेवरुन स्पष्ट दिसत होते. हतबल झाल्यासारखे डोक्याला हात लाऊन तीचे वडिल आपल्या मुलीकडे पहात हुंदका आवरत जमिनीवर बसले . तीचा भाऊ ही शांत पने बाजुला झाला तशी तीची आई पदराने डोळे पुसत आपल्या मुलीजवळ गेली.. आम्ही मात्र तसेच ऊभे राहून फक्त पहात होतो. काय झालय काहीच समजत नव्हत. तीच्या आई ने जवळ जात चेह-यावर पसरलेले केस बाजुला केले तसे मी प्रथमच तीला पाहीले. आजवर मुलांकडुन ऐकलेल तीच वर्णन मिळतजुळतच होत. दिसायला खुपच गोरीपान असली तरी निष्तेज वाटत होती, चेह-यावर ठिकठीकानी नख ओरबडल्याच्या खुणा. लांब केस पन कोणीतरी खेचुन आढुन त्याना रुक्ष केल्यासारखे वाटत हेते, निळसर डोळे पन खुपच थकल्या सारखे. तीला पाहून अस वाटल की ही मुलगी एका भयानक दीर्घ आजारान ग्रासली असवी. तीला पाहुन नकळत एक वाक्य ओठांवर आल ..
" शापित सौंदर्य..."
आमच्या पाठोपाठ धावत आलेल्या मित्रांच्या वडिलांनी काय झालय विचारले, तसे ते म्हणाले
" काहीतरी पाप केल असेल मी मागच्या जन्मात, त्याचीच फळ मी भोगतेय..." पन काय झालय हे त्यानी सांगायच जाणुन बुजून टाळल...
आपल्या आईच्या कुशीत शिरुन ती भितीन थरथर कापत आजुबाजूला पहात होती...

*****
सकाळी ड्युटीवर जायला उशीरच झाला , कदाचीत काल रात्री त्या मुलीचा, म्हणजे तीच्या अवस्थेचा विचार करत होतो त्यामुळे लवकर झोप लागली नव्हती.. हातांवर, गालावर ,मानेवर नख्यांनी ओरबडलेल्या जखमा .. रात्रभर तेच दृष्य डोळ्यांसमोर येत होत... बाईक वरून काही अंतरावर गेलो तस लक्षात आल की मोबाइल घरीच राहीला आहे... बाईक वळवली तशी ती येताना दिसली.. तीचे वडिल गाडी चालवत होते... ती मागे बसली होती , तोंडाला रूमाल गुंडाळला असला तरी तीच्या डोळ्यावरून तीला ओळखल... ते गाडीवरुन पुढे गेले तसे तीच्यावर इंप्रेशन मारण्यासाठी रिकामटेकड्या तरूणांच्या गाड्या त्यांच्या मागे वेडीवाकडी वळण घेत सुटल्या...
*****
या घटनेला दोन दिवस उलटुन गेले होते... काम खुप वाढल्यामुळे आता मला घरी यायला बराच उशीर होत होता त्यामुळे मित्रांच्या भेटी कमी होऊ लागल्या...
रात्री नेहमीप्रमाणेच उशीरा घरी आलो... कट्ट्यावर जायची इच्छा होती पन खुपच थकलो होतो.. जेवण आवरुन झोप येईपर्यन्त टीवी पाहु लागलो.. पन कधी झोप लागली कळलच नाही... जाग आली ती कुत्र्यांच्या भुंकण्याने.. खुपच गोंधळ माजला होता... बाहेर जणु शहरातली सगळी कुत्री एकत्र येऊन जोरजोरात रडत, भुंकत होतीत... कोणीतरी बाहेर येऊन त्यांना हूसकाऊन लावेल म्हणुन वाट पहात होतो पन व्यर्थ , वैताग आला, तडक उठलो आणी दरवाजा उघडुन चालत रस्त्यावर आलो ... आवाजाच्या दिशेन पाहील तर तो दहा, बारा कुत्र्यांचा झुंड भुंकत, रडत होता... माझ्यापासुन काही अंतरावर असलेल्या विद्युत खांबावरील पांढ-या ट्युबलाईटने रस्ता अगदी स्पष्ट द्सत होता पन तो कळप जिथ भुंकत होता तीथल्या खांबावरील ट्युब लहान मुलांनी दगड मारुन फोडल्यान बंदच होती, त्यामुळे ती नेमक कोणावर भुंकत होती हे समजत नव्हत.. मला त्या आवाजान झोप येत नव्हती म्हणुन बाजुचाच एक लहानसा दगड उचलुन हातात घेतला आणी त्यांच्या दिशेने भिरकावला तस कुइssss कुईsssss करत धावतच तो झुंड अंधारात नाहीसा झाला पन भुंकण चालुच होत फक्त आवाज कमी होता... पुन्हा एकदा रस्त्यावर नजर टाकली तर जीथ त्या श्वानांचा गोंधळ चालु होत तीथच घराला लागुन बांधलेल्या कट्ट्यावर कोणीतरी बसल होत. कोण आहे हे स्पष्ट दिसत नसल तरी आकारावरुन आणी किंचीतशा होत असलेल्या हलचालीवरून तरी वाटत होत की कोणीतरी होत... जे त्या घराजवळ घुटमळत होत.. मी तसच चालत पुढ जाऊन पहायचा निर्णय घेतला... एक म्हणजे गल्ली आमची त्यात चोरांचा सुळसूळाट , लक्ष ठेवावच लागत... मोबाईल कानाला लावत मी तसाच पुढ निघालो तसा 'ते' हळूच उठुन उभ राहु लागल, मी ही त्याच्यावरच नजर ठेऊन होतो.. पन मी त्याच्या दिशेन जाताना ते ही घराच्या दरवाजाकडे सरकत गेल.. आता जेमतेम 20 पावलांच अंतर असेल मी त्याच्याकडेच पहात होतो पन दरवाजाची चौकट काहीशी आत असल्यान आणी खांबावरील बंद विजेच्या दिव्यांमुळे तीथ लख्ख काळोख पसरलेला .
आता तो दरवाजा पाच एक फुटांवर असेल पन मघापासुन घुटमळणार ते जे कोणी होत ते तीथ दिसत नव्हत... मी ही मोबाईलचा टॉर्च सुरू करून त्या काळोखात पुरता बुडालेल्या दरवाजावर पांढरा एल ए डी लाईट पाडला पन काहीच नव्हत. ते जे कोणी होत ते कदाचित तीथुन पळून गेल असाव.. थोडा वेळ मी तीथ आजुबाजूला नजर फिरवली पन व्यर्थ... पन मघाशी मी हाकलुन लावलेल्या कुत्र्यांच्या कळपातील काही दुर रिकाम्या टेकडीवर उभी राहुन भुंकत होतीत. रात्रीच्या या निरव शांततेत कोल्हेकुई व्हावी तसाच काहीसा त्यांचा आवाज वाटत होता... कदाचीत चोर असावा नाहीतर मला बघुन का लपुन बसला असता... मी माघारी फिरत पुन्हा टॉर्च दरवाजावर रोखला पन काहीच नाही. दुरवरून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज कानावर येता येता तो ही बंद झाला , राहीली ती निरव शांतता. मध्यरात्रीच्या त्या शांत वातावरणात रातकिड्यांचा मंद आवाज तेवढाच येऊ लागलेला , मी तसाच चालत घराकडे परतू लागलो पन चालत येतान अस वाटल की कोणीतरी माझ्या मागे येतय.... चालत.... ती चाहुल जाणवली तसा मी चालण्याचा वेग कमी केला . मागुन येणारा पावलांचा आवाज अगदी जवळ येत असल्यासारखा वाटला ... कदाचीत मघाशी मला पाहुन लपलेला तो इसम असावा म्हणुन मी ही चौकस राहीलो .. इतक्यात माझ्या मानेवर काहीतरी वळवळत असल्यासारख वाटु लागल मी झटक्यासरशी ते बाजुला केल , लाईटच्या खांबावरील पाखरू असाव म्हणुन मी दुर्लक्ष केल तोच कोणातरी माझ्या खांद्यावर हात ठेवला...मान किंचीत बाजुला झुकवत नजर तीरकी केली तसा एक काळाकुट्ट हात माझ्या खांद्यावरून सरकत मागे गेला.. झटकन मागे फिरून पाहील.... काळजात धस्स झाल... जेमतेम पंन्नास पावलांवर रस्त्याच्या मधोमध कोणीतरी उभ होत. दुरवरील खांबावरच्या त्या ट्युबच्या अंधुक प्रकाशात त्याची काळी आकृती तेवढीच दिसत होती. ते उभ होत पन त्याचे दोन्ही हात जमीनीला स्पर्श करत होते, अगदी शांतपने उभी ती भयान आकृति रखरखत्या क्रुर नजरेन माझ्याकडेच पहात होता.. माझ्याइतकीच साधारणच उंची म्हणजे 6 फुटाला थोडीच कमी अंगानेही जेमतेम. एखाद्या सावलीप्रमाणे धुसर आकृती मी भुवया आकसून पहाताना माझ्या काळजाची धडधड मला स्पष्ट ऐकु येत होती.. इतक्यात त्याच्या समोरच्या घरातल्या लाईट लागल्या आणी काळजात धस्स झाल. म्हणजे अंगावर सरसरून काटा आला तो ही भीतीन... कारण लाईट लागताच ती आकृती कुठेतरी नाहीशी झाली... मला आपेक्षीत होत की प्रकाशात ते कोण आहे समजेल पन झाल अगदी उलट... घरात जाव की तीथच थांबाव या संभ्रमावस्थेतच होतो की त्या घरात थोडा गोंधळ सुरू असल्या सारख वाटल. घरातुन कोणीतरी घाईतच बाहेर पडल. गोंधळलेल्या मनस्थितीतच होते.... तसे एकाच गल्लीत रहात असल्यान थोडी ओळख होतीच . मला समोर पाहताच हात करून बोलवल... कदाचीत अशा अवेळी हाक मारावी तर आजुबाजूचे लोक जागे होतील याची त्यांना भिती असावी.. मला बोलवुन ते घाईतच घरात शिरले . मी ही झपाझप पावल टाकीत त्यांच्या घरात गेलो ...
"प्लीज एखादी रिक्शा पहाल का...?" त्यांचा प्रश्न मला समजला, म्हणजे कोणालातरी तातडीन हॉस्पीटलमधे न्याव लागणार होत...
फोन लावत त्यांच्या घरात गेलो आणी दचकुन जागेवरच थीजलो... 'ती' जमीनिवर पडुन होती, निश्चल, खोबणीत गेलेले सताड उघडे डोळे आणी त्याखाली काळी वर्तुळे तयार झालेली , रूक्ष निर्जीव केस , चेहराही निस्तेज थकल्यासारखा दीसत होता....
"'प्रिया... काळजी करू नकोस बाळा.."
हुंदका आवरत तीची आई जवळ बसुन तीला शुध्दीवर आणायचा प्रयत्न करत होती...

प्रपोज - एक थरारक अनुभव
भाग २ >https://marathighoststories.blogspot.com/2019/07/propose_6.html
भाग ३ > https://marathighoststories.blogspot.com/2019/07/propose_22.html
भाग ४ > https://marathighoststories.blogspot.com/2019/07/propose_61.html
भाग ५ >Coming Soon