सकाळी आवरून कामावर गेलो पन लक्ष लागत नव्हत... रात्रीच स्वप्न कधीच डोक्यातुन गेल होत.... पन स्वता:च्या मुर्खपनावर राग येत होता.. मी तीच्या निखळ मैत्रीला कायमच मुकलो होतो. आजही तीचा एकही मेसेज नव्हता की मिसकॉलही नव्हता... इतका तिरस्कार करत होती माझा.. इतका राग आलेला तीला माझा...? खरच मी तीच्या मैत्रीला समजुन घेतल नाही, पन मी ही प्रेम केल तीच्यावर , म्हणुन तर तीच्या अप्रत्यक्ष नकारानंतरही तीच्याबद्दलचा आदर , प्रेम , भावना कमी झाल्या नव्हत्या.. रात्री उशीराच घरी आलो... बॅग ठेवतच सोफ्यावर अंग टाकल... डोळे बंद करुन तसाच बसुन होतो..
"संज्या..... इतका राग मनात धरायचा....?"
कानावर पडलेल्या त्या शब्दांत राग होतो आणी आदेशही होतो...
" हो ना.... खुपच राग आहे त्याला..." पुस्तकातून डोकावत माझी छोटी बहीन पुजा थोडी रागातच बोलली....
" पुजा..... तु अभ्यास कर, आणी आई कसला राग...? काय बोलतेस....?"
" मग पाहुन तरी ये तीला..."
" म्हणजे .... कोणाला....? आई... जरा निट सांगशील का....?"
"म्हणजे .... तुला काहीच माहीत नाही...?"
माझ्या काळजात चर्रर्रर्र कन झाल....
" आई.... कोणाला काय झाल.....?"

" काल रात्रीच दवाखाण्यात नेल.. पोरीच सार अंग आकडुन गेलेल... काल रात्री तु यायच्या आधीच नेल प्रियाला..."
आईच बोलण ऐकताच डोक सुन्न झाला... प्रियाला दवाखाण्यात नेल..? आणी मला माहीतीही नव्हत..! झटकन उठलो आणी गाडीला किक मारली... सुसाट वेगाने माझी गाडी त्या हॉस्पीटलच्या दिशेने धावत होती... काय झाल असेल तीला...? पुन्हा तोच त्रास तर...? हॉर्न देतच रस्त्यावरून गाडी वेगात जात होती, सगळ्यांना मागे टाकत.... दोन वेळा ट्रकला ठोकता ठोकता वाचलो.... हॉस्पीटल समोरच गाडी लावत आत शिरलो प्रियाचा भाऊ समोरच होता.. त्याच्या डोक्यालाही पट्टी बांधलेली...
"हे काय झाल रे तुला.... आणी कुठ आहे प्रिया...?"
"त्याच्या डोळ्यातल पाणी पाहुन माझ्या काळजात धस्स झाल..."
दोघेही चालत I.C.U. रूम जवळ आलो.. तीची आई , बाबा दोघेही बाहेरच उभे होते. मला पाहुन तीच्या आईला अश्रु अनावर झाले... दरवाजा जवळ जात आत पाहील... ती आत बेडवर पडुन होती.. निपचीप , निस्तेज, एका असाध्य रोगान ग्रस्त रूग्णासारखी कोमेजून गेलेली ...हळूच दरवाजा उघडत आत गेलो पन ती शुद्धीवर नव्हती... तीची अवस्था पाहुन खळ्ळकन डोळ्यात पाणी तराळल, फक्त दहाच दिवस झालेले तीला याच हॉस्पीटल मधुन घरी जाताना आमची किंचीतशी ओळख झालेली आणी तीच्या स्वभावाचा फॅन झालो.. तीची मस्करी, बोलण सार एकदम नजरेवर आल...
" काय झालय प्रियाला...? का अस होतय तीला..? आणी मला कोणीच का नाही सांगितल....?"
बोलत मी तीच्या बाबांकडे पाहील
"प्रिया म्हणाली होती.... आपल्यामुळे कुणाला त्रास नको व्हायला..."
तीच्या बाबांच उत्तर ऐकुन काळीजच फाटल.
तीच्यासाठी इतका दुरावलो मी...?
तीला प्रपोज करून इतकी मोठी चुक केली का मी...?
स्वताचाच तीरस्कार वाटावा अस वागलो होतो मी.. I.C.U. चा दरवाजा उघडुन डॉक्टर आत आले..
" रिपोर्ट आणले का सांगितलेले...."
" हो साहेब...." तीच्या भावाने रिपोर्ट फाईल डॉक्टरांच्या हातात ठेवली... फाईल हातात घेत एकएक रिपोर्ट चाळू लागले... तसे अनुभवी , नावाजलेले डॉक्टर होते... विरळ होत चाललेले पांढरट केस, किंचीत सुरकुतलेला उभा चेहरा , सरळ नाकावर चौकोनी फ्रेमचा जाड चश्मा, जाड पांढरट मिशा, चकचकीत दाढी...
भुवया किंचीत आकसत त्यांनी रिपोर्टची सारी पानं पुन्हा पुन्हा पाहीलित आणी डोळ्यावरचा चष्मा काढला.. आम्ही सर्वच गंभिर मुद्रेने त्यांच्याकडे पहात होतो... माझ्या तर काळजाचा क्षणाक्षणाला ठोका चुकत होता... ते काय सांगतील...
' परमेश्वरा जे काय व्हायच ते मला होऊदे. ती बरी होऊदे..'
मनातुन माझा ईश्वाराचा धावा सुरू होता..
" सगळे रिपोर्ट तपासलेत, जुने नवे... सगळ्या टेस्ट करून झाल्या पन कुठच काही प्रॉब्लम दिसत नाही आहे...."
डॉक्टरांचे शब्द ऐकुन आयुष्यातल सर्वात मोठ समाधान भेटल्यासारख वाटल...
" पन तरीही त्यांना त्रास होतोय... केस बरीच कॉम्पलिकेटेड वाटतेय..."
डॉक्टर तीच्या बाबांशी बोलत बाहेर पडले , मी ही तीच्याकड पाहील आणी बाहेर पडायला I.c.u. चा दरवाजा उघडणार तोच त्या काचेत काहीतरी दिसल ज्याने माझ लक्ष वेधुन घेतल... मी जागेवरच थबकलो... तसच निरखुन पहाताना काळजाचा थरकाप उडाला... डोळे विस्फारून मी मागे वळून पाहील तर प्रिया तशीच पडुन होती आणी पुन्हा समोर पाहील तर मागे बेडवर झोपलेल्या प्रियाच प्रतिबींब समोर दरवाजावरील काचेत दिसत होत तीच्या अंगावर उभी एक धुसर आकृती दीसत होती... जशी एक सावली , पुरषाची.. तीच्या बेडवर उभी, दोन्ही हात हवेत पुर्ण पसरलेले आणी वर छताकडे पहात तोंडाचा जबडा पसरलेली ती आकृति पाहुन अंगावर शहारा आला... मी त्या आकृतिची होणारी हलचाल पहात होतो त्या आकृतीने हवेत पसरलेल्या आपल्या दोन्ही हातांच्या मुठी करकचुन आवळल्या आणी झटक्यासरशी प्रियाच्या शरिरात सामावली त्या आघातासरशी प्रियाच्या तोंडातुन आर्त किंकाळी बाहेर पडली... सर्वांग आखडुन गेल असह्य वेदनेन गुडघे आखडुन घेतले आणी सार शरीर गोळा करत रडु लागली.. किंचाळू लागली... आणी तीची आई तीला सावरु लागली पन काळीज पिळवटून टाकणार तीच किंचाळण सुरूच होत.. काय कराव सुचेना.. तसाच धावत डॉक्टरांना बोलवून आणल.. इकडे तीच्या वेदना वाढतच होत्या . मासा पाण्यावीना जमिनीवर तडफडावा, झटके खावा तस तीच सार शरीर तडफडत होत क्षणाक्षणाला झटके खात होत आणी पुन्हा बेशुद्ध झाली.. डॉक्टरांनी तीची अवस्था पाहीली आणी शांतपने म्हणाले
" तुमच्या मुलीचे रिपोर्ट तर नॉर्मल आहेत सगळ चेकअप करून पाहीलय.. मुंबईच्या , पुण्याच्या डॉक्टर्सचे पन रिपोर्ट पाहीलेत त्यांनीही तेच लिहीलय.... नॉर्मल...तरी काहीतरी घडतय ... "
" डॉक्टरसाहेब आता तुम्हीच सांगा... पुण्यातुन इकडे कोल्हापुरला आलो. मागच्या सहा महीण्यापासुन सहन करतीये ती....."
तीच्या वडीलांनी आपल्या शुद्ध हरपलेल्या मुलीकड पाहील.....
" एक विचारू का......?"
" हो विचारा ना साहेब....."
डोळ्यावर लावलेला चश्मा काढत डाक्टरांनी एक कटाक्ष प्रियाकडे टाकला.....
" गैरसमज करून घेऊ नका.... मी फक्त माहीत असाव म्हणुन विचारतोय...."
"बोला साहेब... परमेश्वरान मुलीचा बाप बनवताना सहनशक्तिही दीली आहे.. विचारा.."
" एक तर ती आजारी असल्याच नाटक करतेय किंवा तीला एखाद्या मानसिक आजारान ग्रासलय ...."
डॉक्टरांच बोलण ऐकताच माझा पारा चढला..
" डॉक्टर... ती वेडी नाही आणी नाटकही करत नाही...."
माझ्या अशा तडकाफडकी बोलण्याण तिथला प्रत्येकजन एकापेक्षा एक माझ्याकड पहात होते...
" आणी हो... या जगात जशा आडचणी आहेत तसे उपायही आहेत.... ती बरी होईलच... तुमच्याकडून काही होईल का ते सांगा....?"

मी आवेगात बोलुन गेलो पन सर्वच निरूत्तर झाले.. डॉक्टरांनी एक कटाक्ष माझ्याकडे टाकला आणी बाहेर निघुन जात तीच्या बाबांना सोबत यायला सांगितल...
" आई...." त्या केविलवाण्या यातनेन भरलेल्या आवाजान आम्हा तीघांच लक्ष वेधुन घेतल...
तीची आई धावतच तीच्याजवळ जात तीचा हात आपल्या हातात घेत म्हणाली ...
"बोल बाळा...."
" मी कधीच बरी होणार नाही का ग..?"
तीच ते वाक्य मनाला चाटका लाऊन गेल... मी दुरूनच तीला पहात होते...
"बरी होशील ग बाळा.. आम्ही आहोत ना.."

" खुप त्रास होतोय ग आई... आता अस वाटतय या वेदना माझ्या प्रेतासोबतच संपतील ग...."
" अस नको बोलु बाळ... आपन आणखी चांगल्या डॉक्टरकडे जाऊ..." आई तीला धीर देत होती..
" नाही सहन होत आता..." प्रिया मनापासुन थकली होती...
" आई.... खुप स्वप्न पाहीली होती ग... डॉक्टर व्हायच होत.. वाचवशील का ग मला...?"
काळीज पिळवटुन टाकणारा तीचा शब्द नी शब्द मनात घर करत होता....

"काही गोष्टींवर औषधांबरोबरच आणखी एक उपाय करावा लागतो..." मी नकळत बोलुन गेलो तस तीच्या भावाने माझ्याकडे पाहील,
"कसला उपाय....?"
"कसला उपाय....?"
" जेव्हा डॉक्टरही हतबल होतात तेव्हा स्वता:सांगतात.. 'आता सर्व काही परमेश्वराच्या हाती आहे.'.."
" कुठला परमेश्वर.. आमचा आता कशावरच विश्वास राहीलेला नाही... आमच हसत खेळत सुखी कुटुंम्ब आज मुलीचा जीव वाचवायला मागच्या सहा महीण्यांपासुन एका शहरातुन दुस-या शहरात फिरतय... का त्याला दया नाही येत...?"
तीच्या आईची ती तक्रार योग्यच होती,
प्रिया आपल्या आईला शांत व्हायला सांगु लागली पन त्याच्या डोळ्यातुन पाणी येतच राहील....

*****
दोन दिवसात तीला डिस्चार्ज मिळाला पन तीच शरीर निस्तेज कृश होत चाललेली... एका असाध्या रोग्यासारख निस्तेज बनत चाललेल तीच शरिर पहावत नव्हत .. ती बरी झालेली पन कायमची नाही... तीला पुन्हा कधी त्रास सुरू होईल कोणीच सांगु शकत नव्हत... आणी आता तीला त्रास सुरू झाला तर तो सहन करण्याची शक्तिही तीच्या शरिरात राहीली नव्हती ... तीचा अंत निश्चीत होता... पन हे का होतय.. उत्तर फक्त प्रियाच देऊ शकत होती... हो... याच उत्तर तीच देऊ शकत होती.. तीला मदत हवी होती आणी तीला अस तडफडताना मला पहावत नव्हत...
*****
रात्री त्यांच्या घरी पोहोचलो.. दहा वाजले होते, सर्व जेवण आवरून गप्पा मारत बसले होत.. हाॅलमधे सोफ्यावर ती आणी तीचा भाऊ टीवी पहात होते, तर वडील बाजच्या खुर्चीवर सकाळच वर्तमान पत्र चाळत होते...
मला समोर पहाताच टीवीचा रिमोट भावाकड देत प्रिया काहीतरी निमीत्त काढुन आपल्या रुममधे गेली... माझ्या 'प्रपोजचा परिणाम'., राग होता शेवटी. जास्त काही न बोलता थेट मुद्द्याला हात घातला.
" आई .... एक विचारू का...?"
" हो विचार ना...."
मी काय विचारतोय हे सर्वच कुतूहलाने पाहु लागले..
" आई इतके मोठमोठे डॉक्टर पुण्या मुंबईत आहेत मग तुम्ही कोल्हापुरला कसे आलात...? कारण, इकडे 'निदान' नाही झाल तर इथले लोक त्या मोठ्या शहरात जातात...."
माझ्या प्रश्नाने सर्वच स्तब्ध झाले... तीच्या भावाने टीवीचा आवाज कमी केला आणी माझ्याकडे पाहु लागला, सर्वांचा उडालेला गोंधळ मला त्यांच्या चेह-यावरून दिसत होत...
कोणी काहीच समजु देत नव्हत. कदाचीत त्यांना ही गोष्ट कुणाला सांगावी वाटत नव्हती...
त्यांच्या स्तब्ध चेह-याकड पहात मी पुढच वाक्य बोलुन गेलो..
"मला त्याची चाहुल जाणवली, ते जे कोणी प्रियाला त्रास देतय ते आहे..."

माझ्या या वाक्यान सर्वांच्याच चेह-यावर एक भीती झळकली. भिंतीकडेला उभी तीची आई मागे तोल गेल्यासारखी भींतीचा आधार घेत खाली बसली, वडीलांनी हातातल वर्तमानपत्र समोर टेबलवर ठेवत अस्वस्थपने माझ्याकडे पाहु लागले...मला पाहुन आपल्या रूममधे गेलेली प्रिया दरवाजा उघडुन बाहेर आली..
" काय पाहीलस तु...?"
प्रिया रागात आणी कुतूहलान विचारू लागली पन तीच्याही चेह-यावर भीती होतीच.
" एक विचीत्र आकृति. जी तुझ्या या अवस्थेला , वेदनांना कारणीभुत आहे....."
माझ बोलण ऐकताच प्रियान आपल्या आई बाबांकडे पाहील...
"आता तरी विश्वास ठेवा माझ्यावर...." तीच्या डोळ्यात पाणी आल आणी बोलता बोलता रडत आपल्या आईजवळ बसली..
" तुम्ही सगळे मला वेड ठरवत होतात. पन मी खरच सांगतेय मी वेडी नाही हो.... 'ते' आहे ..."
" काहीतरी बरळु नकोस..." बाबानी प्रियावर ओरडत माझ्याकड पाहील....
" काय पाहीलस... ? काय दिसल तुला..? प्रिया तुच सांगितल असशील याला...!"
" नाही.... तीने काही नाही सांगीतल आणी मी तेच समजुन घ्यायला आलोय...."
मी तीच्या बाबांना पहात म्हणालो....
" जेव्हा जेव्हा प्रियाला त्रास झालाय तेव्हा एक काळी सावली तीच्या आजुबाजूला होती.. याचा अर्थ ती फक्त प्रियालाच यातना देतेय...पन परवा त्या आकृतिन माझ्यावरही हल्ला केला.. प्रियाला तडफडताना पाहुन एक विलक्षण आनंद त्या आकृतिला होत असल्यासारख वाटत...."
सर्वच माझ्या बोलण्यान आवक झाले काही वेळ सर्वच गप्प होते.. अधुनमधून प्रियाच मुसमूसन तेवढच सुरू होत.. बाहेर रात्र गडद्द होत चाललेली आणी समोरच्या भिंतीवरच्या घड्याळाचे टीक टीक करणारे काटे संथ गतीने पुढ सरकत होते...
" कदाचीत तुम्हाला वाटत असेल मी तुमच्या खाजगी आयुष्यात जास्तच रस घेतोय , पन प्रियाच्या वेदना पहावत नाहीत, रस्त्यात एखाद्या अनोळखी व्यक्तिचा अपघात झाला तरी पुढ जाऊन मदत करतो मग प्रिया तर ....." मी मागे दरवाजा कडे वळलो तसा मागुन आवाज आला...
" प्लीज थांब...." तीचा आवाज येताच मी मागे पाहील.. ती आपल्या आई बाबांकडे पहात बोलु लागली...
" आजवर सगळ्यांनी मला वेड ठरवल, हायएज्युकेटेड होते ना..."
आपल्या वडिलांकडे पहात म्हणाली.
"'हैल्युसिनेशन' ..... हो हाच आजार झालाय म्हणाले होते ना तुमचे मोठे भाऊ... आणी मला कोल्हापुरला उपचारासाठी नव्हे तर मिरजच्या मेंटल हॉस्पीटल मधे भरती करायला आलो आहोत ना आपन....? हो ना ग आई...."
बोलताना तीला भरुन आल होत....

मी घरी परतलो... ती थोड का असेना बोलली माझ्यासाेबत. लाईट बंद करत अंथरूणावर पडलो तोच व्हॉट्सअॅपवर मेसेज आला, प्रियाचा..
' उद्या मी तुला सांगेन सगळ , क्लास सुटल्यावर भेटू...'
तीचा मेसेज वाचुन थोड बर वाटल निदान ती या निमीत्ताने तर दोन शब्द बोलेल ...

मी ड्युटीवर तब्बेत बरी नसल्याच सांगून बाहेर पडलो ... तीची वाट पहात ठरलेल्या ठिकाणी बसुन होतो...
तोच तलाव, 'प्रपोज' वाला..... निसर्गाने जमिनीवर हिरव्यागार गवताचा जणु गालीचा अंथरला होता, त्यावर ठरावीक अंतरावर बसलेली प्रेमी युगूल कुणालाही हेवा वाटावी अशीच ... एकमेकांच्या हातात हात गुंफून चालणारे जोडपे... आयुष्यातली सर्वात मोठी श्रीमंती त्याच्याकडे होती, आपल्या आवडत्या व्यक्तीच्या रूपातच... त्यांना पाहुन आपन कीती कमनशिबी आहोत याची जाणिव मात्र होत होती...
"संजु......? कधीपासुन तुला बोलावतेय मी."
पाठीमागुन आलेल्या प्रियाच्या आवाजान अचानक त्या सुंदर कल्पनेतून बाहेर आलो.. समोर दूरवर गोलाकार पसरलेल्या त्या तलावामधील त्या निळसर पाण्याकडे पहातच म्हणालो
" सॉरी... जरा वेगळ्याच विचारात होतो... " बोलतच तीच्याकड पाहील .आणी थक्क झालो.. मागे कोणीच नव्हत , ती आली नव्हती. पन माझ्या जवळुन जाणा-या प्रेमी युगूलान विचीत्र नजरेन माझ्याकड पाहील आणी तसेच चालत पुढ गेले. पन ती अजुन कशी आली नव्हती...? 11 ला भेटणार होती 12 वाजुन गेले होते... मी तीला कॉल लावला पन नॉट रिचेबल... आणखी थोडा वेळ वाट पाहीली पन शेवटी निराश मनान परतलो...येताना तीच्या घरासमोरूनच आल... बाईक स्टँडवर लावून आत आलो, पन अजुनही तीचा कॉल लागत नव्हता...
" प्रियाला कॉल करतोयस ना..?" माझ्या अस्वस्थ चेह-याकड पहात पुजा न विचारल
" हो ग..... काहीातरी महत्वाच बोलायच आहे म्हणाली होती..."
" हे घे...." माझ्याकडे एक कागद देत म्हणाली
" तीला उपचारासाठी दुस-या हॉस्पिटल मधे नेलय... कदाचीत ते पुन्हा आपल्या गावी नाशीकला गेलेत..."
" काय...? पन मला का नाही बोलली...."
" ती सकाळी क्लासला जात होती तेव्हाच एक व्हाईट व्हॅन आली होती सगळेच सोबत गेलेत.."
मी चिठ्ठी उघडुन वाचु लागलो..
' सगळ्यांनी मला वेड ठरवल आणी एकवेळ मला स्वता:लाही वाटल की खरच मी वेडी आहे पन मी वेडी नाही रे.. निदान तु तरी माझ्या विश्वास ठेवलास thank you....'
ती चीठ्टी वाचली आणी सुन्न झालो नकळत डोळ्यात पाणी आल पन आता पुढ काय....? ती परत तीच्या गावी गेलीय, आपली सारी दुख: , सा-या यातना एक भयान पोखरत जाणार आयुष्य घेऊन ती गेली... मला एकटच सोडुन गेली ती.... पन तीला जे सांगायच होत ते चिठ्ठीत लिहू शकत होती आणी चिठ्ठी लिहीण्यापेक्षा मेसेज करू शकत होती... बरोबर.... कारण ती मला परका समजत होती... 'आपल्यामुळे दुस-याला त्रास नको'... हेच म्हणाली होती ना... तसाच आपल्या रुममधे जाऊन बसलो पन लक्ष लागेना. समोर काचेच्या कपाटात एका ग्रिटींगमधे पीन लाऊन उभा केलेला तो गुलाब दिसला... 'प्रपोज' वाला गुलाब. त्याच्यावरच तेज , सुगंध , त्याच सौंदर्य कमी होत चाललेल... तो पुन्हा ताजा , टवटवीत नाही होणार.... आणी शेवटी तो नकळत बाहेर फेकला जाणार , जशी प्रिया आता वेड्याच्या हॉस्पीटल मधे....
'वेड्यांच हॉस्पीटल' .......? झटकन ऊभा राहीलो
हो ती म्हणाली होती घरचे सर्व तीला मेंटल हॉस्पीटल मधे भरती करायला आलेत.. आणी तो डॉक्टरही तेच म्हणाला होता...?

****
प्रपोज - एक थरारक अनुभव
भाग १ > https://marathighoststories.blogspot.com/2019/07/propose.html
भाग २ >https://marathighoststories.blogspot.com/2019/07/propose_6.html
भाग ३ > https://marathighoststories.blogspot.com/2019/07/propose_22.html
भाग ४ > https://marathighoststories.blogspot.com/2019/07/propose_61.html
भाग ५ >Coming Soon