पिशाच्च - भाग 05
पिशाच्च -भाग 5 (अंतिम भाग)
मागील भाग लिंक -
https://marathighoststories.blogspot.com/2019/06/04.html
https://marathighoststories.blogspot.com/2019/06/04.html
अगदी कालपर्यंत माझे आयुष्य चाकोरीबद्ध ,सर्व सामान्यांप्रमाणे चालले होते. नवीन नोकरीचा आनंद नि भावी आयुष्याची स्वप्न पाहण्याचे दिवस माझे ! मी कधी कल्पनाही केली नव्हती की माझ्या जीवनात अशी काही उलथापालथ घडू शकते.
हे दोनच दिवस माझ्या आयुष्याला कलाटणी देऊ पाहत होते. माझा विश्वासच बसत नव्हता! कोणावर विश्वास ठेवावा?
हे दोनच दिवस माझ्या आयुष्याला कलाटणी देऊ पाहत होते. माझा विश्वासच बसत नव्हता! कोणावर विश्वास ठेवावा?
चांदलेकर की बाबू?
मोठा पेचप्रसंग आहे.
मी डोकं गच्च धरून बसलो.माझं काय होणार?
हा विचार सतत मनात येत आहे.
चांदलेकरांनी सांगितलेला घटनाक्रम मनाला पटत आहे पण बाबूचं काय? त्याने खरचं का माझी निवड केली होती? पण-जर त्याला काही करायचं असतं तर तो मला सांगायला का आला? त्याचा हेतू काय? मोठं प्रश्नचिन्ह आहे.
काय करू ? काय करू? माझीही अवस्था त्या रघुसारखीच तर व्हायची नाही ना? माझ्या मनाचा गोंधळ उडाला.

"तू पळून जायचा विचारही करू नकोस जयदीप,ते पिशाच्च तुझा पाठलाग सोडणार नाहीत."
चांदलेकर शांतपणे एका एका शब्दावर जोर देत बोलले.
मी चमकलो.चांदलेकर मनकवडे तर नाहीत ना?कारण इथून दूर पळून जायचा विचार नुकताच माझ्या मनात डोकावला होता.
मी चमकलो.चांदलेकर मनकवडे तर नाहीत ना?कारण इथून दूर पळून जायचा विचार नुकताच माझ्या मनात डोकावला होता.
मी असहाय्य झालो होतो . काहीही करून मला यातून बाहेत पडायचे होते .आता तरी मला एकच मार्ग दिसत होता तो म्हणजे चांदलेकर !
"चांदलेकर, प्लिज मला यातून वाचवा!"
मी अगदी काकुळतीला येऊन म्हणालो
काही क्षण विचार करून मनात काहीतरी निश्चय त्यांनी केला असावा.
काही क्षण विचार करून मनात काहीतरी निश्चय त्यांनी केला असावा.
"जयदीप, तुझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे ना ?"
मी मान डोलावली. दुसरे गत्यंतरच नव्हते.
"हे बघ ! यातून वाचायचा मार्ग मला माहिती आहे. पण मी सांगेन तसेच तुला करावे लागेल . एकही प्रश्न विचारता कामा नये. कोणत्याही परिस्थितीत माझ्यावर अविश्वास दाखविता कामा नये."
माझ्याकडे पाहत ते बोलले.
मी मान डोलावली.
मी मान डोलावली.
"बाबूने त्या पिशाच्चाला जागविले आहे. आता त्याला बळी द्यावाच लागणार आहे. तुला स्पर्श करून त्याने तुझी निवड केली आहे,हे दिसतेच आहे.आता मी काय सांगतो हे नीट लक्ष देऊन ऐक!"
मी प्राण कानात आणून ऐकू लागलो.
"ज्याप्रमाणे बाबूने तुला स्पर्श करून तुझ्यात नि त्या पिशाच्चात स्पर्शसंबंध निर्माण केला आहे. त्याचप्रमाणे उलटा विचार केला तर तुझासुद्धा स्पर्श बाबूला झाला आहे. म्हणजे त्याचा आणि पिशाच्चाचा ही स्पर्शसंबंधही निर्माण झालेला आहे. म्हणजे बळी जाण्यालायक तू एकटाच नाही तर बाबूही आहे. आता राहिला प्रश्न तो हा की पिशाच्च आवाहन विधी कोण करणार? तो की तू ?
मला वाटते बाबूने पिशाच्च आवाहन विधी करण्याअगोदर आपणच विधी करावा. तो विधी कसा करायचा ते मला ठाऊक आहे. तुझ्या वतीने मी तो करीन आणि बळी बाबू जाईन...तरच तू वाचशील."
मला वाटते बाबूने पिशाच्च आवाहन विधी करण्याअगोदर आपणच विधी करावा. तो विधी कसा करायचा ते मला ठाऊक आहे. तुझ्या वतीने मी तो करीन आणि बळी बाबू जाईन...तरच तू वाचशील."
माझ्या प्रतिक्रियेसाठी ते थांबले.
मी विचार करू लागलो मी वाचणार हे महत्वाचे असले तरी बाबूचा बळी जाणार हे मला पटणारे नव्हते.
"बाबू त्याच्या कर्माने जाईल ! तुला वाईट वाटण्याचे काही कारण नाही."
त्यांना माझ्या मनात काय चालले असावे ते कळले होते का?
"तू मला परवानगी देत आहेस ना पिशाच्च आवाहन विधी करायला?" त्यांनी मला सवाल केला.
"होय..." ठामपणे मी उत्तर दिले.
"आता इथून पुढे तूला एकही प्रश्न विचारायला परवानगी नाही.हे सर्व तुझ्या संमतीने चालले आहे.
अमावश्येला त्या शक्ती ताकदवान होतात.त्याचवेळी विधी करायचा असतो.बाबूही अमावश्येची वाट पाहिलं. पण आपल्याला अमावस्येपर्यंत थांबून चालणार नाही. या पौर्णिमेला चंद्रग्रहण आहे. त्याच दिवशी आपण आपले कार्य उरकायचे.

यावर मी काय बोलणार. मी आता पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून होतो.
दिवस येत आहेत नि जात आहेत. चांदलेकरच्या वागण्यात बदल झाला आहे . बोलणेही पहिल्यापेक्षा कमी,आवश्यक तितकेच झाले आहे . सकाळ- संध्याकाळ त्यांचे एकांतात ध्यान लावून बसण्याचे प्रमाण नि वेळ वाढली आहे. रात्री मंत्रपठणात ते जास्त वेळ घालू लागले आहेत. ते मंत्रपठण करतात त्यावेळी मला बाहेर व्हरांड्यात बसून राहायला सांगतात. आत अजिबात येऊ देत नाहीत. परसात तर बिलकुल जाऊ देत नाहीत. गेलो तरी माझ्यावर लक्ष ठेऊन आहेत. नेमके काय चालले आहे त्यांचे? दिवसभर पोस्टातील काम नि रात्री या गोष्टी. मी खूप वैतागलोय. कोणत्या लफडयात पडलो ? पण स्वतःला दोष देण्याशिवाय मी काही करू शकत नाही. पौर्णिमेपर्यंत वाट पाहण्याशिवाय माझ्या हातात काहीच नाही.
उद्या पौर्णिमा आहे.पंधरा दिवस उलटले पण मागच्या दिवसांत विशेष काही घडले नाही.बाबूही कुठे दिसला नाही. हा चांदलेकरांच्या मंत्रतंत्रांचा परिणाम की ही वादळापूर्वीची शांतता आहे,ते सांगता यायचे नाही. मी खूप अस्वस्थ आहे.चांदलेकर मात्र धीरगंभीर, शांत आहेत.अनेक तर्हेच्या विचित्र वस्तू त्यांनी आणल्या आहेत,पण मला बघायला बंदी आहे. पण मी चोरून पाहिलं, ती काळी केसाळ बाहुली तेवढी मला दिसली. मला चांदलेकरांना खूप प्रश्न विचारायचे आहेत पण धाडस होत नाही.
उदाहरणार्थ पिशाच्च जागे झाल्यावर पुढे काय? किंवा बाबूचा बळी द्यायला तो इथे आला तर पाहिजे ना?
मी विचारू शकत नाही.
आता युद्धाला तोंड फुटणार!
कोण जिंकणार?
या विचारात आजचा दिवसही मावळला.
उदाहरणार्थ पिशाच्च जागे झाल्यावर पुढे काय? किंवा बाबूचा बळी द्यायला तो इथे आला तर पाहिजे ना?
मी विचारू शकत नाही.
आता युद्धाला तोंड फुटणार!
कोण जिंकणार?
या विचारात आजचा दिवसही मावळला.
आज पौर्णिमा. मी आता कसल्याच विचार करण्याच्या परिस्थितीत नाही.डोकं बधिर झालंय. मेंदू ताब्यात आहे की नाही सांगता येत नाही. आज काय होणार?
मध्यरात्रीची वेळ! पौर्णिमा असली तरी चंद्रग्रहण असल्याने गडद अंधार पसरला होता.त्या भयाण काळोख्या रात्री विहिरीच्या काठी मी आणि चांदलेकर बसलो होतो.समोर ती काळी केसाळ बाहुली एका रिंगणात ठेवली होती.तिच्या भोवती कसल्या कसल्या वस्तू ठेवल्या होत्या.त्या अंधारातही ती बाहुली माझ्याकडे पाहते आहे असं मला वाटत होतं.
चांदलेकरांनी माझ्या भोवती मोठे एक वर्तुळ आखलं. माझ्या कपाळाला काळा बुक्का फासला.
जोरजोरात अनोळख्या भाषेत चांदलेकरांनी मंत्र सुरू केले. मला ते शब्द कळत नव्हते पण कानाला गोड वाटत होते.मला तंद्री लागली. माझ्या सगळ्या संवेदना बधिर व्हायला लागल्या.शरीर हलके झाले.मी आता हवेत गोल गोल तरंगायला लागलो इच्छेविरुद्ध. किती वेळ? कुणास ठाऊक?
चांदलेकर दिसत नाहीत कुठे? मी नीट पाहिलं तर ती बाहुली आकाराने वाढत होती. चांदलेकर जोरजोराने घुमत होते.आमच्या भोवती वावटळ निर्माण झाली होती.बाबू कधी येणार की मलाच बळी देणार?इतके दिवस दाबून ठेवलेला विचार उसळून बाहेर आला!शरीर मेंदूच्या नियंत्रणाबाहेर होते.इच्छा असूनही मी हालचाल करू शकत नव्हतो.
आणि एकदम शांतता पसरली...दोन क्षण...त्यापाठोपाठ हिडीस किंचाळी ऐकू आली...ती बाहुली उठून बसली होती.

चांदलेकरांचा हेतू सफल झाला होता. विजयी उन्माद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.मला माझी चूक समजली होती पण वेळ निघून गेली होती.
त्यांनी माझ्यावर झेप घेतली त्यावेळी त्यांच्या हातातील सुरा चमकला ! मी डोळे मिटले.
त्यांनी माझ्यावर झेप घेतली त्यावेळी त्यांच्या हातातील सुरा चमकला ! मी डोळे मिटले.
मला जाग आली तेव्हा दिवस उजाडलेला होता . मी जिवंत आहे की मेलो? रात्रीचा प्रसंग आठवला. मी फसलो गेल्याची जाणीव...चांदलेकरांचा हल्ला...आणि आणि कोणीतरी आल्याची पुसटशी जाणीव...पुढे एकदम काळाकुट्ट अंधार...
मी जिवंत आहे? अविश्वसनीय!
मलासमोर अनोळखी व्यक्ती दिसत होती.
मी उठण्याचा प्रयत्न केला पण उठू शकलो नाही.सगळी शक्ती कोणीतरी शोषून घेतली होती.
मलासमोर अनोळखी व्यक्ती दिसत होती.
मी उठण्याचा प्रयत्न केला पण उठू शकलो नाही.सगळी शक्ती कोणीतरी शोषून घेतली होती.
"शांत पडून रहा जयदीप!" अनोळखी आवाज.
" तू आता धोक्याबाहेर आहेस!निश्चिन्त रहा!"
मी वेडा झालोय का? ...भास होतायत...नक्कीच आपल्या डोक्यावर परिणाम झालाय.
"रात्री आम्ही वेळेवर आलो नसतो तर तू या जगात नसता, तो त्याच्या कार्यात यशस्वी झाला असता." तो बोलला.
"तू कोण...?"
एकच शब्द उच्चरायला मला खूप प्रयत्न करावा लागला.
"मी परसु..."
हा तोच परसु ज्याच्याकडे बाबू सालकरी म्हणून होता.
"आज शिवबाबा नसते तर खूप अनर्थ झाला असता."
तो बोट दाखवत बोलला. मी तिकडे पाहिले. कोपऱ्यात एक तेजपुंज व्यक्ति माझ्याकडे पाहून स्मितहास्य करत होते. पांढरीशुभ्र दाढी,तेजस्वी डोळे,धारदार नाक. त्यांच्याकडे पाहिल्यावर का कुणास ठाऊक पण मला जरा हुशारी वाटू लागली.

"म्हणजे या सगळ्यामागे चांदलेकर होते तर? " मी धीर येऊन बोललो.
"नाही रघु होता !"
शिवबाबांनी धीरगंभीर आवाजात उत्तर दिले.
"काय ?" मी जवळजवळ किंचाळलोच.
शिवबाबा पुढे सांगू लागले.
"हो चांदलेकर बिचारा पापभिरू माणूस होता.
रघु इथे आला तो मुळी पिशाच्च आवाहन विधी करण्यासाठी! हा 'कालावश ' पंथातील एक महत्वाचा विधी आहे. हा विधी जो करेल तो त्या पंथाचा प्रमुख बनण्याच्या लायकीचा होतो. रघुने त्याचा ध्यास घेतला होता. इथली जागा त्यासाठी योग्य होती. रघुने चांदलेकरांच्या घरात प्रवेश केला. आता त्याला मदतीला कोणीतरी हवा होता. बाबू त्यासाठी योग्य होता. विधीसाठी लागणाऱ्या वस्तू बाबू गोळा करायचा . त्याबदल्यात रघु त्याला भरपूर पैसे द्यायचा. बळी देण्यासाठी त्याने चांदलेकरांची निवड केली होती.चांदलेकरांना याची पुसटशीदेखील कल्पना नव्हती. बाबू परसुच्या घरी कामाला होता. त्या दिवशी मी परसुच्या घरी नेहमीप्रमाणे आलो ! त्यावेळी मला काहीतरी अस्वस्थ करणारे जाणवले. मी शोध घेतला तर त्याचा माग बाबूच्या झोपडीपर्यंत गेला.त्याच्या झोपडीत त्या गाठोड्यात या विधीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू होत्या.मी काय ते समजलो.बाबू अडाणी आहे,त्याच्या आवाक्यातील या बाबी नाहीत. यामागे नक्कीच कोणीतरी जाणती व्यक्ती असणार याची मला खात्री झाली.मी परसुला बाबूवर नजर ठेवायला सांगितले.पुढे बाबूचा खरा करता करविता कोण हे मला समजले. मी बाबूला या बाबतीत खडसावले तर तो रडायला लागला,परत करणार नाही असे वचन दिले. त्याने ही गोष्ट रघुला सांगितली आणि तो घाबरून गाठोडं घेऊन पळून गेला. खूप प्रयत्न करून रघुने सर्व जुळवून आणले होते . सर्व धुळीस मिळणार होते.पण तो सहजासहजी हार मानणाऱ्यातील नव्हता.त्याने नवीन डाव खेळला.चांदलेकरांवर त्याच्या वशीकरण विद्येचा वापर करून त्याने त्यांच्या मेंदूचा ताबा घेतला.म्हणजे शरीर चांदलेकरांचे पण मेंदू रघुचा. म्हणजे रघु चांदलेकर झाला आणि चांदलेकर रघु! पण चांदलेकरांचा मेंदू या गोष्टी सहन करू शकल्या नाहीत. ते सामान्य झालेच नाहीत. त्यांनी त्याच अवस्थेत इस्पितळात आत्महत्या केली. वरकरणी ती रघुची आत्महत्त्या होती पण मृत्यू चांदलेकर पावले होते. आम्ही निश्चिन्त झालो.
रघुने आम्हांला फसविले. पण चांदलेकरांच्या आत्महत्येमुळे त्याच्या समोर नवीन प्रश्न उभा राहीला.आता बळी कोणाचा द्यायचा?
नेमका त्याच वेळी तू आला ! त्याला नवीन मार्ग सापडला. त्याने तुला रघु नि बाबूची बनावट कहाणी सांगितली."

"पण बाबूचे काय ?"
"तो गाठोडं घेऊन पळून गेला. गाठोड्यापासून पिच्छा सोडण्याचा त्याने खूप प्रयत्न केला. त्याने ते नदीत फेकले,जाळले पण गाठोड्याने त्याचा पिच्छा सोडला नाही. शेवटी त्याची तशी अवस्था झाली. योगायोगाने तुझी आणि त्याची भेट झाली.
तो तुझा पाठलाग करत आला. तू परसात हातपाय धूत असताना रघुने त्याला पाहिले. तुला तात्पुरते सुन्न करून त्याने बाबुकडून ते हिसकावून घेतले.
गाठोडे गेल्याने बाबूही काही प्रमाणात नॉर्मल झाला.त्याला धोक्याची जाणीव झाली आणि दुसऱ्या दिवशी तुला सावध करायला आला.त्याच रात्री त्याने मला ही गोष्ट सांगितली आणि तुला वाचवायची विनंती केली."

मला बाबूविषयी आपुलकी वाटायला लागली.
"बाबू आता कुठाय?"
"मला ज्या रात्री भेटला त्याच्या दुसऱ्या दिवशी तो नदीकाठी मृत आढळला. मी त्याच दिवसापासून तुझ्यावर व राघूवर लक्ष्य ठेऊन होतो."
"रघु...त्याचं काय झालं?"
"तू परसात जाऊन पहा."
मी परसुच्या आधाराने उठलो.
परसात आलो .
परसात आलो .
रात्रीच्या घटनांचा नामोनिशाण दिसत नव्हता.सर्व वस्तू गायब झालेल्या होत्या आणि चांदलेकर उर्फ रघु विहिरीच्या काठावर मरून पडला होता.
मी प्रश्नार्थक चेहऱ्याने शिवबाबांकडे पाहिले.
" हार्ट अटॅक... "
माझ्याकडे डोळे मिचकावत ते बोलले.
माझ्याकडे डोळे मिचकावत ते बोलले.
समाप्त.
(वरील कथा काल्पनिक असून मनोरंजन हाच हेतू आहे.धन्यवाद.)
(वरील कथा काल्पनिक असून मनोरंजन हाच हेतू आहे.धन्यवाद.)
श्री.आनंद निकम,
पुणे 41
पुणे 41