Propose -part 2
काही वेळातच तीला हॉस्पीटलमधे दाखल केल.
तीची आई आणी बाबा दोघे हॉस्पीटल मधे होते तर भाऊ बाहेरगावी पाहुण्यांच्या घरी गेलेला... त्यांना गरज लागेल म्हणुन मी तीथच थांबलो..
डॉक्टर तपासून जायचे आणी नानात-हेचे रिपोर्ट तयार करत होते , मेंदुच काय संपुर्ण शरीर स्कॅन केल, ब्लड रिपोर्ट तपासु लागले... मी मात्र बघ्याच्या भुमिकेत सर्व लांबूनच पहात होतो.. रात्रीचे दोन वाजुन गेले होते.. जांभई देतच मी दोन्ही हात पैंटच्या खिशात घालुन चालत येत दरवाजावर लावलेल्या काचेतुन आत पाहील तर 'प्रिया' अजुनही बेशुद्ध अवस्थेत होती . बेडच्या बाजुला उभ्या लोखंडी सळीला अडकवलेल्या सलाईनच्या बॉटल मधुन थेंब थेंब ग्लुकोज तीच्या शरीरात जात होत, बेडच्या बाजुला ए.सी.जी. मशीनचा अखंड बीप बीप आवाज येत होता.. इतक्यात माझी नजर तीथच कोप-यात गेली, रूग्णाची औषध ठेवण्याच्या छोट्या टेबल पलिकडे किंचीत हलचाल जाणवली... माझी नजर तीथच स्थिरावली... अगदी श्वास रोखुन मी पहात होतो.. काहीतरी होत तीथ... भुवया आकसुन मी नजर स्थिरावली आणी काळजात धस्स झाल.. त्या I.C.U. रूमच्या आतल्या ऊजव्या कोप-यात एक सावली दिसत होती... कोणतरी उभ असल्याची सावली. पण आत कोणी डॉक्टर नर्स नव्हत्या तरी एक सावली होती , अगदी स्थीर, गंभीर , निश्चल धुसर अशी एक सावली.. त्या काचेतून माझी नजर सर्वत्र फिरू लागली पन त्या पारदर्शक सावलीच रहस्य उलगडेना,
मी तीच्या बाबांना सांगायच या उद्देशान त्यांना जवळ बोलवल..
"काका. त्या कोप-यात काही दिसतय का ?''

''कोणत्या कोप-यात...? काय आहे..?'' ते कुतुहलाने आत पाहु लागले.
मी पुन्हा पाहील तर मघापासुन तीथ घुटमळणारी ती सावली आता दिसत नव्हती.. त्यांनी माझ्याकड पाहील.
''तुम्ही आराम करा इथे.. दिवसभर कामाने थकवा आला असेल म्हणुन अस काहीतरी भास होत असतील...''
त्यांनी नम्रतापुर्वक सांगीतल आणी मी ही बाजुच्या लाकडी बेंचवर आडवा झालो पन नजर मात्र दरवाजावरील त्या काचेवर स्थिरावलेली...

*****
"hello..... "
एका गोड आवाजान हल्की जाग आली.. डोळ्यावर अजुनही झपड होतच...
"Hello....उठताय का....?"

"आई झोपू दे ना ग... आज सुट्टी आहे...."
कोणीतरी तोंडावर किंचीत पाणी शिंपडल तसा सर्रर्रर्रर्रर कन अंगावर शहारा आला... झटकन उठलो.. तर समोर 'ती' म्हणजे प्रिया उभी होती.. केस मागे बांधलेले तर अंगात पांढरट रंगाचा पंजाबी ड्रेस. हाताला पांढरी चिकटपट्टी लावलेली सलाईन लावलेल्या शिरेवर.. मी तर पहातच राहीलो.

" sorry तुम्ही...! तुम्ही इथ काय करताय....? चला आत बेडवर आराम करा....नर्स...??( मी एका नर्सकडे पहात हाक दिली...) यांना आता घेऊन जा..."
" त्यांना डिस्चार्च दिलाय." नर्स म्हणाली..
"काय.....? डिस्चार्ज......?"
"हो....." ती नर्स निघुन गेली....
" हो आपन घरी जातोय..." प्रिया म्हणाली
"हे काय चाललय समजेल का प्लिज...?" मी भारी कन्फुज होतो....पन तीच्या तब्बेतीत बदल मात्र दिसत होता.
" चला...... रिक्क्षा आणलीय....." तीचे बाबा चालत येत मला बघुन बोलु लागले....
" तुमच बरच जागरण झालय... आमच्यामुळ खुप त्रास झालाय तुम्हाला......"

मी चक्राऊन गेलेलो..... एक मुलगी जी रात्री I.C.U. मधे होती आणी आता घरी जातेय...? व्यवस्थीत... इथले बरेच कर्मचारी, नर्स त्यांच्या परीचयाचे होते..
तीच्याकड मी पहातच राहीलो, कीती बोलक्या, मनमोकळ्या स्वभावाची होती,
अॅडमीट पेशंटच्या जवळ जात त्यांची विचारपुस करायची तर एखाद्या पेशंटला स्वता:च आय.व्ही. लावायला मदत करायची... मनमोकळी, हसरी , तीचे वडील काऊंटर शेजारी उभे बील भरत होते तर तीची आई आणी मी बाजुला उभे तीला पहात होतो...

"प्रिया... चल बाळा...."
तीच्या वडीलांनी हाक दिली तशी ती ही नर्स ना बाय म्हणत चालत आली. प्रश्न खुप होते पन विचारू तरी कस....?
" काल तुम्ही इतक्या सिरीयस कंन्डीशन मधे होतात आणी काही तासात पुन्हा व्यवस्थीत जस काही झालच नाही...? "
ती थोडी अस्वस्थ झाली... माझ्याकडे पहात शांतपने म्हणाली
" सांगेन नंतर... तुमचा नंबर द्या ... एकाच गल्लीत रहातो ना... तसेही तुमचे खुप उपकार झालेत..."

" उपकार..? मदत करण म्हणजे उपकार का..?"
माझ्या बोलण्याला तीची आई उत्तर देत म्हणाली.
" हो . उपकारच.. , ज्या अपार्टमेंट मधे रहात होतो तीथ अनुभवलय आम्ही.... ते स्वता:च्या बंद दरवाजाच्या कीहोल मधुन माझ्या मुलीची अवस्था पहायचे, आमची होणारी धावपळ पहायचे..! पन कोणीच मदतीला येत नव्हत....आमच्या मुलीची अशी अवस्था बघुन रक्ताची नातीही दुरावलीत..."

" अवस्था म्हणजे ....? " मी आश्चर्यान , विचारल....
" डॉक्टर म्हणतात तीला....." त्या पुढ बोलणार तोच तीचे वडील समोरून येत म्हणाले....
"चला ... रिक्शा आणलीये...."
सर्व रिक्शाने घरी पोहोचलो... या घाईत प्रियाचा नंबर मात्र आठवणीन घेतला...

व्हॉट्सअॅप बनवणारे पन ग्रेट खरच... म्हणजे मानावे तीतके आभार कमीच... म्हणजे तीच्यासोबत आता व्हॉट्सअॅप वर बोलण सुरु झालेल... नो टाईम लिमीट....खुप छान मैत्री झालेली आमची... आमच्या जॉबवर मोबाईल वापरायला बंदी होती, पन मी online नसतानाही ती मात्र मेसेज, व्हिडीओ पाठवत रहायची.... मला तर तीची जणु सवयच झाली.. कुणास ठाऊक कस पण ती मला आवडु लागली होती... छान बोलका स्वभाव होता तीचा... बोलायची... मस्करी करायची... रागवायची आणी पुन्हा मी रागात आहे का पहायला पुन्हा मेसेज करून सॉरी म्हणायची... एखादा नवीन पदार्थ केला की तो कसा झालाय बघायला मलाच बोलवायची.. असच एकदा तीने तयार केलेला लोणीडोसी खायला मला बोलवल.. फ्रेश झालो, छान कपडे घातले. केस नीट बसवु लागलो पन ते काही केल्या बसेनात... तसाच तीच्या घरी...
प्लेट हातात देत म्हणली,
'' सांग कसा झालाय....?''
एक एक घास तीच्याकडे पहात खात होतो, तीला पहाण्याच्या नादात चव नाही समजली पन 'टेस्ट रिपोर्ट' सांगण महत्वाच होत.. मी म्हणालो

" तु खुपच छान बनवतेस आणी नवीन पदार्थ केलास की मलाच खायला देतेस , मग बाकीच्यांना.. thanks.... खर सांगु का आई..."
प्लेटमधला पदार्थ खात तीच्या आईकडे पहात म्हणालो
"एवढा रिस्पेक्ट कोण देत नव्हत मला......"

त्यावर प्रिया म्हणाली
"मेडिकल ची स्टुडेंट आहे... आपला प्रयोग कसा झालाय हे एखाद्या प्राण्यावर टेस्ट करून बघायची जणु सवयच झालीये...."
त्यावर तीच्या घरात चांगलाच हाश्या पिकला... माझ केविलवान तोंड पहात हळुच स्वताचे कान पकडुन माफी मागितली...
पन राग नव्हता , तीच्या कसल्याच बोलण्याचा, मस्करीचा.... ती काही बोलुदे.. किती मस्करी करूदे छान वाटायच... तीला पाहील की सार जग हरवुन जायचो.. कारण माझ्यासाठी ती आता जगातली सर्वात आवडती होती , स्वताच्या जीवापेक्षा ही.. पन ते इथ आणखी किती दिवस आहेत हे माहीत नव्हत..

करू तीला प्रपोज...? सांगु का तीला मनातल गोड गुपित..? . तीच्या मनात काय आहे माहीत नव्हत पन ते अचानक हे शहर सोडून गेले तर.....? तीला प्रपोज करायच ठरवल.. दिवस फिक्स केला... व्हॉट्सॅप उघजला, मेसेज टाकला...
' रंकाळा. 11, am '
रिप्लाय आला..
' वाढदिवस आहे वाटत...?'
'हो..' मी ही मेसेज चिकटवला..
' रंकाळा. 11, am '
रिप्लाय आला..
' वाढदिवस आहे वाटत...?'
'हो..' मी ही मेसेज चिकटवला..
******
मी जरा अधिकच उतावळा . अर्धातास आधीच पोहोचलो..
एक छानस गुलाबाच फुल शर्टच्या आत लपवुन मी तीची वाट पहात बसलेलो..
ती आली... क्लासवरून थेट ठरलेल्या ठिकानी... नेहमीसारखीच सुरेख दिसत होती... ब्लॅक जीन्स . पिंक टॉप, चमकदार सोनेरी केस जे आजही नेहमीप्रमाणेच मोकळे सोडलेले. कानात छानशा रिंग्ज तर कपाळावर बारीकशी टीकली.. दुरूनच स्माईल करत पुढ आली...
" आज सुट्टी तुला....?" बॅग बाजुला ठेवत बाकड्यावर बसली....

" नाही ग.... एक खुपच Importent काम होत म्हणुन सुट्टी घेतली.."
थोडा वेळ काय बोलाव सुचेनास झाल ..
ती मात्र नेहमीच्या गमती सांगण्यात दंग होती हसता हसता दोन वेळा माझ्या पाठीवर नेहमीसारखीच चपाट मारली, पन माझ लक्ष कशातच नव्हत.. मी तीच गोड हसण ,बोलण मन लाऊन ऐकत होतो.. पन तीला 'प्रपोज' करायच आहे या विचारान काळीज मात्र धडधडत छातीतुन बाहेर येतय की काय अस वाटु लागल..
" काय झालय तुला....असा गप्प का...?"

काळीज धडधडत होत, भीती वाटत होती...
" तुला काहीतरी सांगायच आहे ग..."
" तुला काहीतरी सांगायच आहे ग..."
"अरे मग सांग ना.. कोणी आडवलय..."
शेवटी सारा धीर एकवटला.. डोळे बंद केले , माझ्या शर्टमधे हात घालत ते गुलाबाच फुल बाहेर काढल आणी तीच्या निरागस ,
गोड चेह-याकडे पहात म्हणालो
" प्रिया.......तु....तु...मला खुुप , खुप आवडतेस ग... I love you. प्रिया......"

आयुष्यातल आजवरच सर्वात मोठ धाडस केल होत... ते म्हणजे 'प्रपोज'... काही काळ जणु सार जगच थांबल होत, मघापासुन होणारी झाडांची हलचाल, संथ हवेचे झोके, पाण्याच वेग काही क्षण सारच थांबल.. आवाज येत होता तो काळजाच्या धडधडण्याचा. अगदी स्पष्ट , अतिशय वेगाने, तीच उत्तर काय येतय हे श्वास रोखुन ऐकत होतो आणी मला जे आपेक्षीत होत तेच झाल. तीच्या चेह-याचा रंग उडाला, ती अगदी शांत बसुन होती, खाली शुन्यात पहात.. पुढचे काही सेकंद ही जिवघेणी शांतता तशीच राहीली ,
तीच्या अस्वस्थ चेह-याकडे पहात माझ्या डोळ्यात पाणी आल, कारण मला माझ उत्तर भेटल होत. ती काही वेळात निघुन गेली पन मी मात्र त्या तलावातील संथ पाण्याकडे पहात तसाच बसुन राहीलो... किती वेळ, माहीत नाही. पन आता सार काही संपल होत.. काही भावना ह्या मनातच छान असतात सुंदर , सुरेख स्वप्नातल्या चांदण्यासारख्या.. पन जेव्हा त्याच भावना ओठावर येतात तेव्हा त्यांची सत्यता किती वेदनादायी आहे हे समजत पन तेव्हा खुप उशीर झालेला असतो.

रात्रीचे दहा वाजले होते... तलावातील पाणी किती सुरेख वाटत होत.... आजुबाजूच्या इमारतींमधल्या, रस्त्यावरच्या लाईटचा प्रकाश परावर्तीत होउन चमकत होत ते तलावातील पाणी...
पाणी.. माझ्या डोळ्यातही होत.. खारट पाणी.. एकतर्फी प्रेमात अपयश आल्यानंतर डोळ्यात दाटुन येणार पाणी... काळजात उठणारी वेदना..
खुप खुप वाईट वाटत होत, ती मला आपला चांगला मित्र समजत होती पन मी..?
प्रपोज केल तीला ? गमाऊन बसलो तीला...! माझ्या आयुष्यात तिच सर्व काही आहे.. माझ सर्वस्वच... पन संपल हे सार काही..
घरी आलो पन जेवण्याची ईच्छा नव्हती..
"आई .... मी जेऊन आलोय ग....."
एवढ म्हंटल आणी तसाच बेडवर पडलो... मिनीटा मिनिटाला येणारा तीचा मेसेज आज आला नव्हता... झोप येत नव्हती... या कुशीवरून त्या कुशीवर , पन विचार डोक्यातुन जाईना आणी डोळ्यातल पाणी थांबेना... रात्र पुढे सरकत होती फक्त रोजची स्वप्न आजच्या रात्रीत नव्हती, होता तो एकटेपना, आयुष्याला ग्रहण म्हणुन लागलेला एकटेपना.... डव्या कुशीवर झालो इतक्यात दारावर टकटक झाली.. किती वाजलेले माहीत नाही पन बाहेर कोणीतरी आल होत... डोळे नीट पुसले आणी बेडवरून खाली उतरलो... लाईटच बटन ऑन करून दरवाजा उघडला पन बाहेर कोणीच नव्हत.. अगदी निरव शांतता आणी बाहेरचा काळोख किंचीत दुर करणारा सरकारी खांबावरील ट्युबचा पांढरा प्रकाश तेवढच बाहेर होता... कदाचीत भास झाला असेल... मी दरवाजा बंद करून घड्याळ पाहील.. दीड वाजुन गेलेला.. बाजुच्या टेबलवर ठेवलेल्या जार मधल घोटभर पाणी प्यायलो आणी बेडवर आडवा झालो.... भुक लागलेली, त्यामुळे झोप लागेना... डोळे बंद केले तसा तीचा हसरा चेहरा नजरेसमोर आला आणी पुन्हा दरवाजावर टक टक झाली... कोणीतरीे दरवाजा वाजवत होत... पुन्हा दरवाजा उघडला पन कोणीच नव्हत... कोण मस्करी करतय समजेना.... दरवाजा पुढ केला आणी मागेच उभा राहीलो... म्हणजे झटकन दरवाजा उघडुन जो कोणी आहे त्याला फोडायचा या उद्देशाने .. काही वेळ श्वास रोखुन बाहेर काही चाहुल जाणवते का पाहु लागलो. पन अगदी माझ्या संथ गतीन धडधडणा-या काळजाची धडधड ऐकु येईल इतकी ती रात्रीची निरव शांतता पसरलेली..
. भींतीवरील घड्याळाचे काटेही अगदी स्पष्ट ऐकु येत होते.. कानात प्राण आणुन मी बाहेरुन येणारा आवाज ऐकु लागलो.
आणी पुन्हा दरवाजावर 'टक टक' झाली..................

क्षणाचाही विलंब न करता मी दरवाजा उघडला तसा अंगावर सर्रर्रर्र कन काटा आला... बाहेर कुणीच नव्हते.. होती ती एक जिवघेणी शांतता... आता मात्र भीती वाटु लागली.. कसलीच हलचाल न करता मी हळूच दरवाजा बंद करू लागलो तसा एक आवाज कानावर पडला.. कोणातरी कण्हत होत, शरीराला होणा-या असह्या यातनांनी रडत होत.. माझी नजर समोरच्या रस्त्यावर गेली, धुळ मातीन माखलेल्या रस्त्यावर एक सावली पडलेली.. आडवी... जीला शरिर नव्हत पन तरी एक सावली जमिनीवर होती.. दाराच्या चौकटीच्या आत मी उभा त्या सावलीकडे पहात होतो तोवर त्याच्यात किंचीत हलचाल जाणवली... ते अखुड होता होता तडफडत असल्यासारखे शरिराची हलचाल करू लागले...
जमिनीवर पाय आकडुन घेत सार शरिर गोळा करत पुन्हा झटक्यासरशी सरळ केले . समोरच ते भयान दृश्य पाहुन भितीन अंग थरथर कापत होते, सर्वशक्तिनीशी ओरडाव किंचाळाव वाटत होत पन दातखिळी बसल्यासारखी अवस्था झालेली.. पाय जमिनीत रूतल्यासारखा मला जागेवरून हालता येईना.. संपुर्ण शरिराला जणु लकवाच मारला... उघड्या डोळ्यांनी फक्त पहाण्याशिवाय काहीच करता येत नव्हत. अस वाटत होत की असह्य वेदनेन कण्हत होती, तळमळत होती आणी त्यामुळे रस्त्यावरचे खडे आजुबाजूला सरकत होते.. आता ती सावली माझ्याकड सरपटत येत असल्याच लक्षात आल... इतक्यात चरर्रर्रर्रर्र चर्रर्रर्रर्रर्रर्र आवाज करत बाहेरच्या खांबावरची ट्युब फट्टकन गेली तशी बाहेरची ती भयान शांतता दुरवर पसरलेला काळोख आणखी गडद्द झाला... आकाशातल चंद्रबिंबाच्या नितळ प्रकाशात ती सावली आता आणखी गडद , काळीकुट्ट दिसु लागली... तीचा आवाजातली घरघर काळजाचा थरकाप उडवत होतीे... ती काळीतुट्ट आकृति तशीच जमिनीवरून माझ्या दिशेने सरकत पुढ येऊ लागली... मी मागे सरकण्याचा प्रयत्न करत होतो पन व्यर्थ... त्या आकृीतीन दरवाजा जवळ येत माझा डावा पाय घट्ट पकडला... एक घट्ट पकड जस एखाद्या श्वापदाच्या जबड्यात माझा पाय सापडला होत...घट्ट, आणखी घट्ट पकड करत ते मान वर करून माझ्याकड पाहु लागले.. लाल तांबुस रंगाचे डोळे माझ्यावर रोखले होते.. मी डोळे विस्फारुन त्याला पहात होतो की झट्टकन माझा पाय खेचला आणी मी जमीनिवर आपटलो... माझ लकवा मारल्यासारख शरीर कसलीच हलचाल करण्याच्या स्थितीत नव्हत... ते आता माझ्या अंगावर तसच सरपटत येत होत... त्याच्या घरघरणा-या आवाजान मेंदु बधीर होत निघाला...माझ्या पोटावर उभ रहात त्या आकृतिन आपले दोन्ही हात हवेत पसरले आणी झटक्यासरशी माझ्या शरिरात घुसली तसा खाडकन जाग झालो.. अंग घामान भिजलेल...उठुन बसलो अंग थरथर कापत होत... पन मी माझ्या बेडवर नव्हतो तर बंद दरवाजाच्या जवळ होतो... लाईट सुरूच होती.. हे स्वप्न होत..?डाव्या पायावर काहीतरी चरचरत होत.. दाह होत होता... मी नाईटपैंट वर करून पाहील आणी व्रण दिसत होता... हातांच्या पंजाचा.... अंग अजुनही थरथर कापत होत...

प्रपोज - एक थरारक अनुभव
भाग १ > https://marathighoststories.blogspot.com/2019/07/propose.html
भाग २ >https://marathighoststories.blogspot.com/2019/07/propose_6.html
भाग ३ > https://marathighoststories.blogspot.com/2019/07/propose_22.html
भाग ४ > https://marathighoststories.blogspot.com/2019/07/propose_61.html
भाग ५ >Coming Soon