टॅटू-भाग १-Marathi Bhutkatha
"ए......ए......संदीप.....अरे हाकलून दे तिला....ती जागा माझी हाय....ए....ए पोरी कोण हाईस तू???....आणि इथं काय बसलीस दुकान मांडून....कसली काय बाय चित्र ही.....चल उठ हितन" बाजूला असलेल्या फ्रुट मार्केट मध्ये श्यामतात्या नुकताच आला होता....आपल्या नेहमीच्या जागेवर...एक विचित्र दिसणारी वेस्टर्न कपड्यात रस्त्यावर कसलीतरी चार्ट मांडून बसलेली बघून तो जाम संतापला होता....सणाचे दिवस त्यात आपल्या जागेवर दुसरं कुणी बसलं आहे हे बघून त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली होती....त्याने त्या मुलीच्या चार्ट भिरकावून दिला...तिच्या दंडाला धरून तिला बाजूला ढकलली.....ती मुलगी बाजूला कोसळली....तिच्या चेहऱ्यावर तिचे केस आले होते...ते तिने बाजूला केले नाहीत....ती तश्याच अवस्थेत आपला चार्ट आणि आपापल्या वस्तू उचलू लागली....ती सारखी आपली मान झटकत होती....श्याम तात्याकडे बघून तोंडातून "फिस...फिस" आवाज करीत होती.....दर्शनासाठी उभी असलेली गर्दी नुसती तिच्याकडे बघत होती....तिच्या विचित्र रुपामुळे तिला सावरण्याचे धाडस कुणी करेना.....अखेर पुष्पाला तिची दया आली ती धावत तिच्याजवळ गेली....तिने तिला आधार देऊन उचलले....ती मुलगी अजून श्यामतात्याकडे रागाने बघत होती......पुष्पा तिला बाजूला घेऊन जाऊ लागली....ती त्या मुलीला त्या कट्ट्याजवळ घेऊन आली....तिच्या जीन्सला लागलेली माती पुष्पा हाताने झटकू लागली "लागलं का गं तुला??? हे घे पाणी....पाणी पी" अस बोलून पुष्पाने तीला अर्जुनच्या हातातली पाण्याची बॉटल दिली....ती बॉटल तिने काही क्षणात पूर्ण रिकामी केली...अर्जुन फक्त तिच्याकडे बघत होता....विस्कटलेले केस...हातावर पूर्ण भरलेले टॅटू....त्या टॅटू मुळें तो हाथ काळमिट्ट झाला होता...तिने फुल्ल साईजचा शर्ट घातला होता त्यामुळे तिच्या फक्त तळहातावरचे काही टॅटू दिसत होते....बाकीचा हात तिने फुल्ल टी शर्ट घालून झाकून टाकला होता....ती एकही शब्द बोलत नव्हती...सारखी मानेला झटका देत होती....तिच्या हातावरील टॅटूकडे अर्जुनचे लक्ष होते तिच्या हातवर असंख्य कवट्या गोंदवल्या होत्या त्या कवट्यावर वरच्या बाजूला एका विचित्र राक्षसाचे मुंडके होते....त्या राक्षसाचे लालभडक डोळे आणि त्याच्या नाकातून धूर निघत होता....त्याच्या डोक्यावर असलेली वेडीवाकडी शिंगे अर्जुनला अस्वस्थ करणारी होती त्याच्या मनात अनेक प्रश्न घुमू लागले "कोण आहे ही??? आणि असे विचित्र राक्षसी टॅटूस कुणी काढत का???ते पण भारतात" पाणी पीत असताना शर्टाच्या जरा वर सरकलेल्या बाह्यामुळे तो राक्षसाचा टॅटू अर्जुनला स्पष्ट दिसत होता...अर्जुनची टॅटू वर खिळलेली नजर बघून तिने लगेच बॉटल खाली ठेवली आणि वर सरकलेली बाही ती परत खाली घेऊ लागली.....अचानक पुष्पाला चक्कर येऊ लागली तिने आपला हात डोक्यावर लावला.....तिचे डोकं गरगरू लागलं...अर्जुनने तिला सावरलं... "काय झालं पुष्पा....काही त्रास होतोय का तुला??" अर्जुनची काळजी बघून पुष्पा सावरली तिने त्याला दिलासा दिला "अरे काही नाही...ह्या उन्हामुळे जरा चक्कर आल्यासारखं झालं" त्या विचित्र मुलीची नजर पुष्पाकडे होती....पुष्पा सुद्धा एकटक तिच्याकडे बघत होती....अर्जुनला हे अनपेक्षित होतं.....पुष्पाने सावरण्यासाठी आपल्या खांद्यावर ठेवलेला अर्जुनचा हात बाजूला केला....ती त्या मुलीकडे एकटक बघत होती....ती मुलगी सुद्धा एकटक तिच्याकडे बघत होती....अचानक पुष्पाने आपला हात त्या मुलीपुढे केला....त्या मुलीने आपल्या विचित्र अश्या लाकडी बॉक्स मधून एक मशीन बाहेर काढली....दोघी सुद्धा एकमेकीकडे एकटक बघत होता....तिच्या हातातील ती मशीन बघून अर्जुन समजून गेला की ही मुलगी "टॅटू आर्टिस्ट" आहे....पण...पण पुष्पाला ह्याची आवड आजिबात नव्हती....त्या अनोळखी मुलीपुढे काहीच न बोलता तिने पुढे केलेला हात अर्जुनला बुचकळ्यात पाडणारा होता...असल्या विचित्र आणि हातावर कवट्या,राक्षस गोंदवलेल्या मुलीकडून काहीतरी गोंदवून घ्यावे हे अर्जुनला मान्य नव्हते.... "पुष्पा....अग ए......अग काय करतेस तू हे?? अग असे रस्त्यावर टॅटू काढून घेऊ नयेत..अग ती सुई...इन्फेक्शन होईल त्याने...आपण टॅटू पार्लर मध्ये काढून घेऊ ना तुला हवं ते...कोण ही मुलगी...मला काही आवडली नाही...चल आपण आपल्या गावी जाऊन काढून घेऊ....चल" तिच्या पुढ्यात बसलेल्या पुष्पाला अर्जुनने उठवण्याचा प्रयत्न केला.....अचानक पुष्पाची एक रागीट नजर अर्जुनकडे वळली....ती नजर त्याला अनपेक्षित होती....तिच्या डोळ्यातील राग तो पहिल्यांदा बघत होता....."पुष्पाला कायम आनंदात ठेवणार" अशी शपथ अर्जुन रोज देवापुढे घेत होता त्यामुळे तिच्या ह्या हट्टापुढे त्याने गुडघे टेकले तो तिच्या बाजूला बसला....ती मुलगी कावरीबावरी झाली ती थरथरत्या हाताने काहीतरी शोधत होती....तोंडातून येणाऱ्या "फूस फूस" आवाजामुळे तिचे चेहऱ्यावर आलेले विस्कटलेले केस त्या श्वासाबरोबर उडत होते...शेवटी तिच्या हातात काहीतरी लागलं आणि थरथरणारा तिचा हात शांत झाला तिने आपल्या बॅगमधून टॅटू काढायचे मशीन काढलं त्याला सुई लावली ती काहीतरी मंत्र पुटपुटत होती.....सुईची सळसळ चालू झाली तिच्या मंत्राचा वेग वाढत होता.....अर्जुनने पुष्पा कडे बघितले ती डोळे बंद करून बसली होती.....काही क्षणात तिने आपले काम पूर्ण केले....पुष्पाचे डोळे उघडले.....त्या मुलीने त्या टॅटूवरून रुमाल फिरवला.....त्या मुलीने काही मिनिटात पुष्पाच्या हातावर एक सुंदर असे फुल गोंदले होते....सोबत दोन तीन फुलपाखरे सुद्धा होती....तो टॅटू बघून पुष्पाला खूप आनंद झाला ती एकसारखी त्या फुलाकडे बघत होती.....ह्या विचित्र मुलीकडून अश्या सुंदर टॅटूची अपेक्षा सुद्धा केली नव्हती अर्जुनने....तो फक्त आ वासून बघत होता. ..त्याला आपला टॅटू दाखण्यासाठी पुष्पाने त्याच्याकडे हाथ केला "अच्छा....तुझं नाव पुष्पा....म्हणून हे पुष्प काढले आहेस हातावर...खूपच सुंदर काढलं आहे" त्या टॅटूची तारीफ करत अर्जुन बोलत असताना पुष्पाने त्याचा हात ओढला आणि त्या विचित्र दिसणाऱ्या मुलीकडे केला.....अर्जुन विरोध करत होता...अखेर त्या मुलीने त्याचा हात पकडला तिने हाथ एवढ्या जोरात पकडला की त्याला हलता सुद्धा येत नव्हते....तो सोडवण्याचा प्रयत्न करीत होता.....ती विचित्र आवाज करणारी सुई अखेर अर्जुनच्या हातात घुसली.....त्याचे डोळे मिटले गेले....तो अचानक समाधी अवस्थेत गेला.....काही वेळाने त्याचे डोळे उघडले.....पुष्पा रुमालाने तो टॅटू पुसत होती.....अर्जुनने त्या टॅटूकडे बघितले.....एक सुंदर बाण त्या मुलीने त्याच्या हातावर गोंदला होता....तो एकटक त्या बाणाकडे बघतच होता....त्याला कसली तरी आठवण झाली त्याने त्या मुलीकडे बघितले ती मंत्र म्हणत तोंडातून फूस फूस असे आवाज करीत होती..... "अरे वा मी अर्जुन म्हणून हा बाण आणि तूझ नाव पुष्पा म्हणून तुझ्या हातावर हे सुंदर फुल... .व्वा...खूपच छान" अस बोलून अर्जुनने पटकन आपल्या खिश्यातली दोन हजाराची नोट काढली आणि त्या मुलीला देऊ लागली....ते पैसे बघून ती ताडकन उठून उभी राहिली...तिने आपलं सगळं सामान आपल्या सॅक मध्ये भरलं.....अर्जुनच्या हातातली नोट तशीच होती तिच्याकडे बघत ती विचित्र आवाजात बोलली "परीक्षा.....परीक्षा......दोघांची परीक्षा......बघूया की किती दिवस टिकतय तुमचं प्रेम.....तो येतोय परीक्षा घ्यायला" असं बोलून ती धावत धावत समोरच्या गर्दीत शिरली आणि तिथून दिसेनाशी झाली....अर्जुन आणि पुष्पा दोघेही टाचा वर करून त्या गर्दीत तिला शोधत होते पण ती कुठेच दिसत नव्हती....दोघेही घरी आले....अर्जुन चिंतेत असायचा कारण दोन्हीकडचा विरोध स्वीकारून त्याने लग्न केलं....त्यात ही मुलगी कसली "परीक्षा" कसली गोष्ट करत होती ह्या विचाराने त्यांची कित्येक वेळा झोप मोड झाली होती.....तिच्या हातावरील त्या कवट्या आणि त्या भयानक दिसणाऱ्या राक्षसाचे टॅटू त्याचे ते लालभडक डोळे अजून त्याला जसेच्या तसे दिसत होते......ती कुणी काळी जादूगार तर नसेल? किंवा माझ्या लग्नाला विरोध होता त्यांनी?? छे छे ते आता तस करणार नाहीत कारण त्यांची मुलगी आता माझी बायको आहे....मग ते काय होतं.....आपल्या हातावर तिने गोंदलेल्या बाणाकडे बघत तो विचार करायचा.... एके दिवशी पुष्पा चक्कर येऊन पडली....रविवारची सुट्टी त्यामुळे अर्जुन घरीच होता....त्याला काही सुचेना....त्याने सरळ तिला दवाखान्यात ऍडमिट केली....पुष्पाला अचानक वेदना चालू झाल्या....तिचे हात पाय आपोआप वाकू लागले......ती वेदनेने तळमळत होती....तिचा तो त्रास अर्जुनला सहन होत नव्हता.....तिच्या केबिन मधून डॉक्टर बाहेर येत होते त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव होते ते जवळ येताच अर्जुन त्यांच्याजवळ धावला तो काही बोलायच्या आतच "नेमकं काय झालं होतं.....आम्ही सगळ्या टेस्ट करून बघितल्या पण काहीच निदान लागत नाहीय.....तरी आम्ही प्रयत्न करीत आहोत काळजी करू नका"
असे बोलून खिश्यातून फोन काढून कानाला लावून डॉक्टर बाहेर गेले....अर्जुन पुष्पा ज्या खोलीत ऍडमिट होती तिकडे जाऊ लागला....एव्हाना सगळे पाहुणे जमले होते....तिच्या खोलीतुन विव्हळण्याचा आवाज येत होता...अर्जुनला बघून पुष्पा ने हाथ करून त्याला बोलावले....तीच्या हातात त्राण नव्हता....ती विव्हळत होती....तिचे निम्मे केस झडून बेडवर पडले होते....तिचा त्रास इतका प्रचंड होता की 2 नर्सेस आणि सासू आणि अर्जुनची बहीण पकडून सुद्धा ती तडफडत होती....एक मोठी किंचाळी आणि तिला एक उलटी झाली डॉक्टरांनी दिलेलं सगळं औषध बाहेर पडलं.....ती बेशुद्ध झाली....हार्टसबीट्स परत सामान्य झाल्या....अर्जुनच्या डोळ्यातून अश्रू आले..त्याने तिच्या डोक्यावर हाथ फिरवला....असे अचानक काय झाले....हा एकच प्रश्न त्याला सतावत होता.....त्याने तिचा हात हातात पकडला आणि रडू लागला....तिने उलटवलेल्या औषधांच्या बाटल्या तिचे गळलेले केस आणि निस्तेज होऊन पडलेली ती....आपलं प्रेम आपल्याला सोडून जाईल ही कल्पनाच त्याला करवत नव्हती.....त्याने तिचा हात खाली ठेवला अर्जुनच्या अश्रूंनी तिचा हात ओला झाला होता.....तो जाऊ लागला...अचानक त्याची नजर पुष्पाच्या हातातील टॅटूकडे गेली.....कालपरवा पर्यंत टवटवीत दिसणारे ते फुल आज कोमेजलं होतं....त्याने तिचा हात हातात घेतला.....त्याचे डोळे रागाने लालभुंद झाला.....विचित्र दिसणारी मुलगी.....तिने मंत्र पुटपुटत काढलेले टॅटू हे सगळं त्याला आठवू लागलं.....त्याने आपले डोळे पुसले आणि गाडीवर बसून तो त्या मंदिराकडे निघाला त्याची नजर सगळीकडे फिरू लागली....ती मुलगी त्याला कुठेच दिसत नव्हती.....तो पूर्ण आवर फिरला....शेवटी त्याने बाजूला फळ विकणाऱ्या श्यामतात्याला त्या मुलीबद्दल विचारलं "कोण ती व्हय??...आरं त्या पोरीला पहिल्यांदा बघितली मी....काय विचित्र होती ती....तुम्ही गोंदण काढून घेतलं व्हत नव्ह तिच्याकडन???त्यानंतर ती दिसली नाही बा" हे ऐकून अर्जुनचे डोके चक्रावले.....तो हताश होऊन खाली बसला....."त्या टॅटूमुळे होतंय सगळं"....असे विचार त्याच्या मनात येऊ लागले..अचानक त्याला काहीतरी आठवले त्याने आपल्या बाणाच्या टॅटूकडे बघितले....त्याचे डोळे विस्फारले....त्या बाणाचे टोक दक्षिणेकडे फिरले होते....अर्जुनची नजर तिकडे फिरली तो धावत धावत तिकडे गेला.....चौकात गेल्यावर त्या टॅटूमधील बाणाचे टोक परत वेगळ्या दिशेला फिरले होते.....तो परत धावत तिकडे गेला....एखादे कम्पस काम करावे तसा तो बाण काम करत होता....धावून धावून त्याला प्रचंड धाप लागली होती....तो एका ठिकाणी थांबला त्या बाणाचे टोक एका दिशेला फिरले होते धाप लागल्यामुळे अर्जुन गुडघ्यावर हाथ ठेऊन होता त्याने त्या दिशेने बघितले....एक भिंत होती खाली एक चहाची टपरी.....त्या टपरीवर एक परदेशी लांब केसांचा हिप्पी टाइप माणूस चहा पिट होता टॅटू मधील बाणाचे टोक त्याच्या दिशेने होते....अर्जुन उभा राहिला आणि त्या दिशेने जाऊ लागला.....चहा पिताना त्या माणसाचा ग्लास पकडलेला हात तोंडाकडे आला आणि अर्जुनला तोच राक्षसाचा टॅटू परत दिसला.....तोच टॅटू त्या मुलीच्या हातावर होता.....तो टॅटू बघताच अर्जुनची मूठ आवळली गेली.....त्याच्या डोळ्यात राग होता तो रागारागाने त्याच्याकडे जाऊ लागला............(क्रमशः)
टॅटू-भाग १-Marathi Bhutkatha >https://marathighoststories.blogspot.com/2019/07/marathi-bhutkatha.html
टॅटू- भाग दुसरा >https://marathighoststories.blogspot.com/2019/07/blog-post_6.html
टॅटू- भाग तिसरा >https://marathighoststories.blogspot.com/2019/07/blog-post_66.html
टॅटू-भाग १-Marathi Bhutkatha |
"झाला एकदा नवस पूर्ण.....साडेतीन शक्तीपीठांची यात्रा पूर्ण झाली.....माझी किती दिवसापासूनची इच्छा होती....आज पूर्ण झाली...आता कुठं मनाला समाधान मिळत आहे....किती श्रद्धा होती माझी देवीवर"
रखरखत्या उन्हात कपाळावर आलेला घाम रुमालाने पुसत पुष्पा आपला पती अर्जुन ला म्हणाली....अर्जुनाने आपल्या सॅक मधील पाण्याची बॉटल काढून तिला दिली....थोडा विसावा म्हणून ते एका कट्ट्यावर बसले.....ऐन नवरात्री मध्ये भाविकांच्या गर्दीने कोल्हापूरच्या आंबाबाईचा परिसर गर्दीने गजबजून गेला होता....अर्जुन आणि पुष्पा ह्यांचा नुकताच प्रेमविवाह झाला होता.....अर्जुन आणि पुष्पा अगदी लहानपणापासून एकमेकांवर जीवापाड प्रेम करायचे....लांबून पाहुणी लागत असलेली पुष्पा....अर्जुन आपल्या मामाकडे सुट्टीत गेला की ती त्याला दिसायची.....त्यांच्या शेजारीच राहत होती....मैत्रीचे कधी प्रेमात रूपांतर झालं हे त्यांना कळलंच नाही.....अर्जुन आणि पुष्पा हे जरी लांबून नातेवाईक लागत असले तरी त्या दोघांच्या घरी पूर्वीपासून वाद होता त्यात ह्या दोघांचे लग्न आजिबात शक्य नव्हते पण अर्जुनच्या पुढाकाराने त्या दोन कुटुंबाचे वैर अखेर ह्या नवीन नात्यामुळे मैत्रीत बदलले होते....पुष्पा खूप खुश होती लग्नापूर्वी देवीला केलेला नवस फेडायला ती कोल्हापूरला आली होती....दोघे सुद्धा दमून बसले होते......"ए......ए......संदीप.....अरे हाकलून दे तिला....ती जागा माझी हाय....ए....ए पोरी कोण हाईस तू???....आणि इथं काय बसलीस दुकान मांडून....कसली काय बाय चित्र ही.....चल उठ हितन" बाजूला असलेल्या फ्रुट मार्केट मध्ये श्यामतात्या नुकताच आला होता....आपल्या नेहमीच्या जागेवर...एक विचित्र दिसणारी वेस्टर्न कपड्यात रस्त्यावर कसलीतरी चार्ट मांडून बसलेली बघून तो जाम संतापला होता....सणाचे दिवस त्यात आपल्या जागेवर दुसरं कुणी बसलं आहे हे बघून त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली होती....त्याने त्या मुलीच्या चार्ट भिरकावून दिला...तिच्या दंडाला धरून तिला बाजूला ढकलली.....ती मुलगी बाजूला कोसळली....तिच्या चेहऱ्यावर तिचे केस आले होते...ते तिने बाजूला केले नाहीत....ती तश्याच अवस्थेत आपला चार्ट आणि आपापल्या वस्तू उचलू लागली....ती सारखी आपली मान झटकत होती....श्याम तात्याकडे बघून तोंडातून "फिस...फिस" आवाज करीत होती.....दर्शनासाठी उभी असलेली गर्दी नुसती तिच्याकडे बघत होती....तिच्या विचित्र रुपामुळे तिला सावरण्याचे धाडस कुणी करेना.....अखेर पुष्पाला तिची दया आली ती धावत तिच्याजवळ गेली....तिने तिला आधार देऊन उचलले....ती मुलगी अजून श्यामतात्याकडे रागाने बघत होती......पुष्पा तिला बाजूला घेऊन जाऊ लागली....ती त्या मुलीला त्या कट्ट्याजवळ घेऊन आली....तिच्या जीन्सला लागलेली माती पुष्पा हाताने झटकू लागली "लागलं का गं तुला??? हे घे पाणी....पाणी पी" अस बोलून पुष्पाने तीला अर्जुनच्या हातातली पाण्याची बॉटल दिली....ती बॉटल तिने काही क्षणात पूर्ण रिकामी केली...अर्जुन फक्त तिच्याकडे बघत होता....विस्कटलेले केस...हातावर पूर्ण भरलेले टॅटू....त्या टॅटू मुळें तो हाथ काळमिट्ट झाला होता...तिने फुल्ल साईजचा शर्ट घातला होता त्यामुळे तिच्या फक्त तळहातावरचे काही टॅटू दिसत होते....बाकीचा हात तिने फुल्ल टी शर्ट घालून झाकून टाकला होता....ती एकही शब्द बोलत नव्हती...सारखी मानेला झटका देत होती....तिच्या हातावरील टॅटूकडे अर्जुनचे लक्ष होते तिच्या हातवर असंख्य कवट्या गोंदवल्या होत्या त्या कवट्यावर वरच्या बाजूला एका विचित्र राक्षसाचे मुंडके होते....त्या राक्षसाचे लालभडक डोळे आणि त्याच्या नाकातून धूर निघत होता....त्याच्या डोक्यावर असलेली वेडीवाकडी शिंगे अर्जुनला अस्वस्थ करणारी होती त्याच्या मनात अनेक प्रश्न घुमू लागले "कोण आहे ही??? आणि असे विचित्र राक्षसी टॅटूस कुणी काढत का???ते पण भारतात" पाणी पीत असताना शर्टाच्या जरा वर सरकलेल्या बाह्यामुळे तो राक्षसाचा टॅटू अर्जुनला स्पष्ट दिसत होता...अर्जुनची टॅटू वर खिळलेली नजर बघून तिने लगेच बॉटल खाली ठेवली आणि वर सरकलेली बाही ती परत खाली घेऊ लागली.....अचानक पुष्पाला चक्कर येऊ लागली तिने आपला हात डोक्यावर लावला.....तिचे डोकं गरगरू लागलं...अर्जुनने तिला सावरलं... "काय झालं पुष्पा....काही त्रास होतोय का तुला??" अर्जुनची काळजी बघून पुष्पा सावरली तिने त्याला दिलासा दिला "अरे काही नाही...ह्या उन्हामुळे जरा चक्कर आल्यासारखं झालं" त्या विचित्र मुलीची नजर पुष्पाकडे होती....पुष्पा सुद्धा एकटक तिच्याकडे बघत होती....अर्जुनला हे अनपेक्षित होतं.....पुष्पाने सावरण्यासाठी आपल्या खांद्यावर ठेवलेला अर्जुनचा हात बाजूला केला....ती त्या मुलीकडे एकटक बघत होती....ती मुलगी सुद्धा एकटक तिच्याकडे बघत होती....अचानक पुष्पाने आपला हात त्या मुलीपुढे केला....त्या मुलीने आपल्या विचित्र अश्या लाकडी बॉक्स मधून एक मशीन बाहेर काढली....दोघी सुद्धा एकमेकीकडे एकटक बघत होता....तिच्या हातातील ती मशीन बघून अर्जुन समजून गेला की ही मुलगी "टॅटू आर्टिस्ट" आहे....पण...पण पुष्पाला ह्याची आवड आजिबात नव्हती....त्या अनोळखी मुलीपुढे काहीच न बोलता तिने पुढे केलेला हात अर्जुनला बुचकळ्यात पाडणारा होता...असल्या विचित्र आणि हातावर कवट्या,राक्षस गोंदवलेल्या मुलीकडून काहीतरी गोंदवून घ्यावे हे अर्जुनला मान्य नव्हते.... "पुष्पा....अग ए......अग काय करतेस तू हे?? अग असे रस्त्यावर टॅटू काढून घेऊ नयेत..अग ती सुई...इन्फेक्शन होईल त्याने...आपण टॅटू पार्लर मध्ये काढून घेऊ ना तुला हवं ते...कोण ही मुलगी...मला काही आवडली नाही...चल आपण आपल्या गावी जाऊन काढून घेऊ....चल" तिच्या पुढ्यात बसलेल्या पुष्पाला अर्जुनने उठवण्याचा प्रयत्न केला.....अचानक पुष्पाची एक रागीट नजर अर्जुनकडे वळली....ती नजर त्याला अनपेक्षित होती....तिच्या डोळ्यातील राग तो पहिल्यांदा बघत होता....."पुष्पाला कायम आनंदात ठेवणार" अशी शपथ अर्जुन रोज देवापुढे घेत होता त्यामुळे तिच्या ह्या हट्टापुढे त्याने गुडघे टेकले तो तिच्या बाजूला बसला....ती मुलगी कावरीबावरी झाली ती थरथरत्या हाताने काहीतरी शोधत होती....तोंडातून येणाऱ्या "फूस फूस" आवाजामुळे तिचे चेहऱ्यावर आलेले विस्कटलेले केस त्या श्वासाबरोबर उडत होते...शेवटी तिच्या हातात काहीतरी लागलं आणि थरथरणारा तिचा हात शांत झाला तिने आपल्या बॅगमधून टॅटू काढायचे मशीन काढलं त्याला सुई लावली ती काहीतरी मंत्र पुटपुटत होती.....सुईची सळसळ चालू झाली तिच्या मंत्राचा वेग वाढत होता.....अर्जुनने पुष्पा कडे बघितले ती डोळे बंद करून बसली होती.....काही क्षणात तिने आपले काम पूर्ण केले....पुष्पाचे डोळे उघडले.....त्या मुलीने त्या टॅटूवरून रुमाल फिरवला.....त्या मुलीने काही मिनिटात पुष्पाच्या हातावर एक सुंदर असे फुल गोंदले होते....सोबत दोन तीन फुलपाखरे सुद्धा होती....तो टॅटू बघून पुष्पाला खूप आनंद झाला ती एकसारखी त्या फुलाकडे बघत होती.....ह्या विचित्र मुलीकडून अश्या सुंदर टॅटूची अपेक्षा सुद्धा केली नव्हती अर्जुनने....तो फक्त आ वासून बघत होता. ..त्याला आपला टॅटू दाखण्यासाठी पुष्पाने त्याच्याकडे हाथ केला "अच्छा....तुझं नाव पुष्पा....म्हणून हे पुष्प काढले आहेस हातावर...खूपच सुंदर काढलं आहे" त्या टॅटूची तारीफ करत अर्जुन बोलत असताना पुष्पाने त्याचा हात ओढला आणि त्या विचित्र दिसणाऱ्या मुलीकडे केला.....अर्जुन विरोध करत होता...अखेर त्या मुलीने त्याचा हात पकडला तिने हाथ एवढ्या जोरात पकडला की त्याला हलता सुद्धा येत नव्हते....तो सोडवण्याचा प्रयत्न करीत होता.....ती विचित्र आवाज करणारी सुई अखेर अर्जुनच्या हातात घुसली.....त्याचे डोळे मिटले गेले....तो अचानक समाधी अवस्थेत गेला.....काही वेळाने त्याचे डोळे उघडले.....पुष्पा रुमालाने तो टॅटू पुसत होती.....अर्जुनने त्या टॅटूकडे बघितले.....एक सुंदर बाण त्या मुलीने त्याच्या हातावर गोंदला होता....तो एकटक त्या बाणाकडे बघतच होता....त्याला कसली तरी आठवण झाली त्याने त्या मुलीकडे बघितले ती मंत्र म्हणत तोंडातून फूस फूस असे आवाज करीत होती..... "अरे वा मी अर्जुन म्हणून हा बाण आणि तूझ नाव पुष्पा म्हणून तुझ्या हातावर हे सुंदर फुल... .व्वा...खूपच छान" अस बोलून अर्जुनने पटकन आपल्या खिश्यातली दोन हजाराची नोट काढली आणि त्या मुलीला देऊ लागली....ते पैसे बघून ती ताडकन उठून उभी राहिली...तिने आपलं सगळं सामान आपल्या सॅक मध्ये भरलं.....अर्जुनच्या हातातली नोट तशीच होती तिच्याकडे बघत ती विचित्र आवाजात बोलली "परीक्षा.....परीक्षा......दोघांची परीक्षा......बघूया की किती दिवस टिकतय तुमचं प्रेम.....तो येतोय परीक्षा घ्यायला" असं बोलून ती धावत धावत समोरच्या गर्दीत शिरली आणि तिथून दिसेनाशी झाली....अर्जुन आणि पुष्पा दोघेही टाचा वर करून त्या गर्दीत तिला शोधत होते पण ती कुठेच दिसत नव्हती....दोघेही घरी आले....अर्जुन चिंतेत असायचा कारण दोन्हीकडचा विरोध स्वीकारून त्याने लग्न केलं....त्यात ही मुलगी कसली "परीक्षा" कसली गोष्ट करत होती ह्या विचाराने त्यांची कित्येक वेळा झोप मोड झाली होती.....तिच्या हातावरील त्या कवट्या आणि त्या भयानक दिसणाऱ्या राक्षसाचे टॅटू त्याचे ते लालभडक डोळे अजून त्याला जसेच्या तसे दिसत होते......ती कुणी काळी जादूगार तर नसेल? किंवा माझ्या लग्नाला विरोध होता त्यांनी?? छे छे ते आता तस करणार नाहीत कारण त्यांची मुलगी आता माझी बायको आहे....मग ते काय होतं.....आपल्या हातावर तिने गोंदलेल्या बाणाकडे बघत तो विचार करायचा.... एके दिवशी पुष्पा चक्कर येऊन पडली....रविवारची सुट्टी त्यामुळे अर्जुन घरीच होता....त्याला काही सुचेना....त्याने सरळ तिला दवाखान्यात ऍडमिट केली....पुष्पाला अचानक वेदना चालू झाल्या....तिचे हात पाय आपोआप वाकू लागले......ती वेदनेने तळमळत होती....तिचा तो त्रास अर्जुनला सहन होत नव्हता.....तिच्या केबिन मधून डॉक्टर बाहेर येत होते त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव होते ते जवळ येताच अर्जुन त्यांच्याजवळ धावला तो काही बोलायच्या आतच "नेमकं काय झालं होतं.....आम्ही सगळ्या टेस्ट करून बघितल्या पण काहीच निदान लागत नाहीय.....तरी आम्ही प्रयत्न करीत आहोत काळजी करू नका"
असे बोलून खिश्यातून फोन काढून कानाला लावून डॉक्टर बाहेर गेले....अर्जुन पुष्पा ज्या खोलीत ऍडमिट होती तिकडे जाऊ लागला....एव्हाना सगळे पाहुणे जमले होते....तिच्या खोलीतुन विव्हळण्याचा आवाज येत होता...अर्जुनला बघून पुष्पा ने हाथ करून त्याला बोलावले....तीच्या हातात त्राण नव्हता....ती विव्हळत होती....तिचे निम्मे केस झडून बेडवर पडले होते....तिचा त्रास इतका प्रचंड होता की 2 नर्सेस आणि सासू आणि अर्जुनची बहीण पकडून सुद्धा ती तडफडत होती....एक मोठी किंचाळी आणि तिला एक उलटी झाली डॉक्टरांनी दिलेलं सगळं औषध बाहेर पडलं.....ती बेशुद्ध झाली....हार्टसबीट्स परत सामान्य झाल्या....अर्जुनच्या डोळ्यातून अश्रू आले..त्याने तिच्या डोक्यावर हाथ फिरवला....असे अचानक काय झाले....हा एकच प्रश्न त्याला सतावत होता.....त्याने तिचा हात हातात पकडला आणि रडू लागला....तिने उलटवलेल्या औषधांच्या बाटल्या तिचे गळलेले केस आणि निस्तेज होऊन पडलेली ती....आपलं प्रेम आपल्याला सोडून जाईल ही कल्पनाच त्याला करवत नव्हती.....त्याने तिचा हात खाली ठेवला अर्जुनच्या अश्रूंनी तिचा हात ओला झाला होता.....तो जाऊ लागला...अचानक त्याची नजर पुष्पाच्या हातातील टॅटूकडे गेली.....कालपरवा पर्यंत टवटवीत दिसणारे ते फुल आज कोमेजलं होतं....त्याने तिचा हात हातात घेतला.....त्याचे डोळे रागाने लालभुंद झाला.....विचित्र दिसणारी मुलगी.....तिने मंत्र पुटपुटत काढलेले टॅटू हे सगळं त्याला आठवू लागलं.....त्याने आपले डोळे पुसले आणि गाडीवर बसून तो त्या मंदिराकडे निघाला त्याची नजर सगळीकडे फिरू लागली....ती मुलगी त्याला कुठेच दिसत नव्हती.....तो पूर्ण आवर फिरला....शेवटी त्याने बाजूला फळ विकणाऱ्या श्यामतात्याला त्या मुलीबद्दल विचारलं "कोण ती व्हय??...आरं त्या पोरीला पहिल्यांदा बघितली मी....काय विचित्र होती ती....तुम्ही गोंदण काढून घेतलं व्हत नव्ह तिच्याकडन???त्यानंतर ती दिसली नाही बा" हे ऐकून अर्जुनचे डोके चक्रावले.....तो हताश होऊन खाली बसला....."त्या टॅटूमुळे होतंय सगळं"....असे विचार त्याच्या मनात येऊ लागले..अचानक त्याला काहीतरी आठवले त्याने आपल्या बाणाच्या टॅटूकडे बघितले....त्याचे डोळे विस्फारले....त्या बाणाचे टोक दक्षिणेकडे फिरले होते....अर्जुनची नजर तिकडे फिरली तो धावत धावत तिकडे गेला.....चौकात गेल्यावर त्या टॅटूमधील बाणाचे टोक परत वेगळ्या दिशेला फिरले होते.....तो परत धावत तिकडे गेला....एखादे कम्पस काम करावे तसा तो बाण काम करत होता....धावून धावून त्याला प्रचंड धाप लागली होती....तो एका ठिकाणी थांबला त्या बाणाचे टोक एका दिशेला फिरले होते धाप लागल्यामुळे अर्जुन गुडघ्यावर हाथ ठेऊन होता त्याने त्या दिशेने बघितले....एक भिंत होती खाली एक चहाची टपरी.....त्या टपरीवर एक परदेशी लांब केसांचा हिप्पी टाइप माणूस चहा पिट होता टॅटू मधील बाणाचे टोक त्याच्या दिशेने होते....अर्जुन उभा राहिला आणि त्या दिशेने जाऊ लागला.....चहा पिताना त्या माणसाचा ग्लास पकडलेला हात तोंडाकडे आला आणि अर्जुनला तोच राक्षसाचा टॅटू परत दिसला.....तोच टॅटू त्या मुलीच्या हातावर होता.....तो टॅटू बघताच अर्जुनची मूठ आवळली गेली.....त्याच्या डोळ्यात राग होता तो रागारागाने त्याच्याकडे जाऊ लागला............(क्रमशः)
टॅटू-भाग १-Marathi Bhutkatha >https://marathighoststories.blogspot.com/2019/07/marathi-bhutkatha.html
टॅटू- भाग दुसरा >https://marathighoststories.blogspot.com/2019/07/blog-post_6.html
टॅटू- भाग तिसरा >https://marathighoststories.blogspot.com/2019/07/blog-post_66.html