टॅटू- भाग तिसरा
अर्जुन त्या पडक्या जुन्या फॅक्टरी जवळ आला होता....रात्र झाली होती सगळीकडे अंधार होता...त्या अंधारात एका खिडकीतून त्याला प्रकाश दिसत होता...अर्जुनने आपल्या टॅटू कडे बघितले बाणाची दिशा त्याच खोलीकडे होती...खूप दूर वरून चालत आल्यामुळे घामाने त्याचं सगळं अंग भिजलं होतं....तो पुढे पुढे जात होता....पडक्या भिंतीचे ढिगारे चढून तो त्या दिशेने जात होता...मधेच एखादं कुत्रं भुंकून त्याला सावध करीत होतं.... अनेक वर्षांपूर्वी ती फॅक्टरी जळाली होती तेव्हा अनेक जण मृत्युमुखी पडले होते....तेव्हा पासून तिकडे कुणाचे येणे जाणे नसायचे....अनेक अफवा त्या जागेबद्दल होत्या...तिथे येत होते ते फक्त पॅरानॉर्मल गोष्टीवर रिसर्च करणारे काही हौशी लोकं...बाकी तिथे कुणाचंही वास्तव्य नसायचं.....तिथल्या त्या काळवंडलेल्या भिंती भयाण शांतता....कुणाही माणसाच्या मनात भीती निर्माण करेल पण अर्जुन साठी पुष्पाची काळजी ह्या भीतीशी सामना करायला पुरेशी होती....अर्जुनने मोबाईल चा टॉर्च चालू केला....त्या उजेडात तो चालत त्या दिशेने जाऊ लागला....मधेच टॉर्चचा उजेड त्या जळून काळवंडून गेलेल्या भिंतीवर जाई....त्यावर सुद्धा विचित्र आकृत्या दिसत होत्या जणू कुणीतरी अर्जुनकडे बघत आहे.....अखेर तो त्या मोठ्या हॉल जवळ आला....बाहेरच्या भिंतीवर कुणीतरी विक्टर च्या आणि त्या मुलीच्या हातावर ज्या सैतानाचे टॅटू होते तसे पेंटिंग होते....ते बघून अर्जुनच्या मुठी आवळल्या...तो जवळ जाऊ लागला....आतुन त्याला हसण्या खिडळण्याचे आवाज येत होते....तो सावध पणे आत जात होता.....हॉल बाहेर कसली तरी हाडे....भिंतीवर कुठल्या तरी वेगळ्या भाषेतील मंत्र आणि एकदम भेसूर आवाजात रेकॉर्डर वर लावलेले म्युझिक.....अचानक ते हार्डकोर म्युझिक बंद झाले....हॉल मध्ये असलेल्या खांबाचा आधार घेत लपतछपत तो मुख्य हॉल मध्ये आला.....त्याची नजर चोरून समोरचं दृश्य बघत होती.....समोर विक्टर सिगार ओढत उभा होता.....पाठमोरा एक माणूस उभा होता....त्याची पाठ अर्जुन बघू शकत होता...तो माणूस हसत होता...त्याच्या हातात एक बाहुली होती....त्या बाहुलीला केसांचा पुंजका गुंडाळला होता....तो माणूस आपले हसू थांबवत बोलला
"साहेब....माझं काम झालंय बघा.....ती पुष्पा तिकडे तडफडत आहे....अहो तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी तिचे केस ब्युटी पार्लर मधून तुम्हाला आणून दिले आणि तुम्ही लगेच मंतर मारला....तिला तडफडताना बघून लई मज्जा येते बघा.....हिकडं तुम्ही तिचा जीव ह्या बाहुलीत कैद केला आणि मी इथं बाहुलीला तरास दिला की तिकडं ती तडफडते....असच तडफडून तिला मारणार आहे बघा"
अर्जुनच्या कानावर हे शब्द पडताच त्याच्या डोळ्यातून घळकन पाणी आले त्याने आपली आवळलेली मूठ जोरात समोरच्या भिंतीवर मारली....तो फक्त ऐकू शकत होता कारण कारण त्या माणसाच्या हातात होती ती बाहुली......
तिकडे विक्टरने आपल्या मोठ्या बॅग मध्ये हात घातला आणि त्यातून एक विचित्र आकाराची बरणी बाहेर काढली....त्यावर सैतानाचे चिन्ह कोरले होते....ती बरणी त्याने समोरच्या टेबलावर ठेवली तिथे अजून बऱ्याच बरण्या दिसत होत्या....विक्टर त्याच्याकडे बघून हसला.....त्याने आपली सिगार खाली फेकली...
"मी तुझं काम केलं आहे...आता तुझी वेळ आहे तुझा वादा पुरा करायची.....तयार आहेस ना??...तुझा आत्मा मी बरणीत बंद करणार आहे.....पण मला हे समजत नाही....आम्हाला आत्मे दान करून अनेक जण अपार पैसा,खेळात किंवा आपल्या फिल्ड मध्ये यश मागतात आता मीच बघ ना....मी सैतानाकडे काळी विद्या मागितली...आणि ती त्याने दिली सुद्धा....पण तू....तू एका मुलीची बरबादी मागीतलीस ते पण आपला आत्मा गहाण ठेवून....हे मला काही समजलं नाही....सांगू शकशील का??
हे ऐकून तो माणूस दोन पावले पुढे आला....आणि विक्टर ला म्हणाला
"साहेब ठार तर मी तिला लगेच केली असती....पण काय फायदा मला जेल झाली असती....मग काय फायदा म्हणून मी तिला तडफडत ठेवून मारणार....ही माझ्या कॉलेज मध्ये होती....खूप प्रेम करायचो मी तिच्यावर....पण ही ही साली दुसऱ्यावर प्रेम करायची आणि लग्न सुद्धा केलं त्याच्याबरोबर.....किती समजावलं किती धमकावले पण ऐकली नाही....हिच्या बापाने आणि भावाने मला कुत्र्यासारखा तुडवला होता....मी हिच्यासाठी रोज झुरत होतो आणि ही पुष्पा आपल्या नवऱ्याबरोबर मजेत जगत होती....तेव्हाच शपथ घेतली की हीच बदला घ्यायचा....आणि तुम्ही मला भेटलात....आता बघा कशी तडफडवतो हिला....अरे 10 वाजले....हिला डोस द्यायची वेळ झाली"
अस बोलून त्याने आपल्या खिश्यातली सुई काढली आणि ती सुई तिच्या पोटात खुपसणार तितक्यात खांबाच्या मागे लपलेला अर्जुन बाहेर आला...ती सुई बघून जोरात किंचाळला
"थांब राहुल.....थांब.....खबरदार पुष्पाला इजा पोचवलीस तर"
हा आवाज गरजताच दोघांनी सुद्धा मागे वळून बघितलं...समोर उभा असलेला अर्जुन बघून दोघेही आश्चर्यचकित झाले....अर्जुनला बघून हातात बाहुली पकडलेला राहुल गरजला....अर्जुन वेगाने त्याच्या दिशेने येत होता
"तू.....तू.....तू इथे कसा आलास???..तिथेच थांब....तुझ्या बायकोचा जीव माझ्या हातात आहे....पुढे आलास तर ही सुई सरळ तुझ्या बायकोच्या डोक्यात घुसविन.....मग सगळा खेळ खल्लास"
राहुलच्या हातातील सुई सरळ त्या बाहुलीच्या डोक्यावर होती....हे बघून अर्जुन जागेवर थांबला....अनपेक्षित पणे अर्जुनला बघून विक्टर विचार करू लागला....काहि सेकंद विचार केल्यावर त्याने स्वतःच्या डोक्यावर एक टपली मारली आणि म्हणाला
"अरे अरे थांबा....गोंधळ करू नका....अच्छा अस आहे तर.....राहुलने मला आत्मा गहाण देण्याचे वचन दिले अर्जुनची बायको तडफडून मरु दे म्हणून आणि अर्जुन मला काल आत्मा दान करण्याचे वचन देतोय त्याची बायको जगू दे म्हणून....अरे अरे कसल्या मोठ्या धर्मसंकटात पडलोय मी"
अस बोलून विक्टर जोरजोरात हसू लागला....त्याचे राक्षसी हसू दोघेही एखादं भुत बघावं तस बघत होते अचानक अर्जुन बोलला
"हे बघा मी तुम्हाला आता मी माझा आत्मा देतो पण तुम्ही माझ्या बायकोला काहि होऊ देऊ नका....काल...काल तुम्ही वचन दिलंय मला"
अर्जुनचे हे बोल ऐकून राहुल बैचेन झाला...तो विक्टर कडे बघत...."नाही नाही....हे नाही होऊ शकत...मी...मी आधी आलोय तुमच्याकडे"
विक्टर ने त्याला इशारा करून शांत रहायला सांगितले....आणि हातातील बरणी फिरवत तो म्हणाला
"हे बघ अर्जुन....शब्द म्हणजे शब्द तू मला काल भेटला होतास...मला हे प्रकरण माहीत असत तर मी तुला माझा उपाय सुद्धा सांगितला नसता....पण राहुलला मी 7 दिवसांपूर्वी शब्द दिला होता....त्यामुळे मी काहीही करू शकत नाही.....सॉरी"
अस बोलून विक्टर आपल्या आराम खुर्चीत बसून दोघांकडे बघू लागला....तिकडे राहुलच्या हातातील सुई बघून अर्जुनने हात वर केले....
"हे....हे बघ राहुल असा वेडेपणा करू नको....अरे प्रेम जबरदस्तीने करता येत नाही रे.....पुष्पाचं तुझ्यावर प्रेम नव्हतं....ती माझ्यावर प्रेम करायची....आणि मी तिच्यावर......आता तुला सुद्धा एखादी चांगली मुलगी मिळू शकते....पण आता आम्हाला सुखाने जगू दे...plz"
हे ऐकून राहुलने आपल्या हातातील सुई मागे केली....आणि आपल्या खिशातील लायटर बाहेर काढला
"अर्जुन.....अर्जुन.....अरे वेड्या तू माझ्या आयुष्याची काळजी करू नको.....मी आता मेलो तरी काही फरक पडत नाही....पण....पण.....आता तू तुझ्या बायकोची फिकीर कर....मी आताच हा लायटर पेटवून ह्या बाहुलीला पेटवून तुझ्या बायकोचा खेळ संपवू शकतो...पण नाही रे...नाही....त्यात काही मज्जा नाही....आता एक काम कर...बस गुडघ्यावर आणि रांगत येऊन माझ्या पायावर नाक रगडून तुझ्या बायकोच्या जीवाची भीक माग....चल ये"
राहुलने लायटर पेटवला आणि बाहुलीच्या जवळ घेऊन जाऊ लागला....तसा अर्जुन राहुल पुढे हाथ जोडू लागला
"नको....नको....मी येतो मी येतो"
अस बोलून अर्जुन गुडघ्यावर बसला आणि राहुलच्या दिशेने गुडघ्यावर चालू लागला.....राहुल आणि विक्टर त्याची दशा बघून हसत होते....तो राहुल जवळ गेला की राहुल पळत पळत दुसरीकडे जायचा...अस करत करत त्याने गुडघ्यावर अर्जुनला पूर्ण हॉल फिरवला....राहुलचे ते राक्षसी हसू पूर्ण हॉल मध्ये घुमत होते...चालून चालून राहुल दमला होता पण त्याच्याकडे बघत त्याच्या हातातील बाहुलीकडे आणि त्या जळत्या लायटर कडे बघत अर्जुन न दमता गुडघ्यावर चालत होता....खडबडीत मोठया दगडांनी भरलेली ती जमीन अक्षरशः अर्जुनचे गुडघे सोलवटून टाकत होती...त्याच्या गुडघ्यातून रक्त येत होतं...अखेर राहुल विक्टर जवळ येऊन धापा टाकत थांबला....अर्जुन तिथे आला आणि राहुलने आपल्या बोटाच्या इशाऱ्याने आपले पाय दाखवले....अर्जुनने आपले डोके राहुलच्या पायावर ठेवलेच...त्याच्या डोळ्यातून पुष्पा साठी वाहणारे अश्रू राहुलचे पाय ओले करत होते....राहुलने इशारा केला तसा विक्टर ने बाजूला पडलेला पालापाचोळा आणि काही जुने कपडे घेऊन त्यावर पेट्रोल टाकले.....आणि त्याला आग लावली....ती आग बघून राहुलने आपला पायाचा पंजा अर्जुनच्या मस्तकावर ठेवला आणि त्याला खाली दाबले....अर्जुन ती धगधगती आग स्पष्ट बघू शकत होता.....राहुलने दोन तीन लाथा त्याच्या पाठीत मारल्या....
"साल्या....घे...घे....माझं प्रेम हिरावून घेतोस काय....नाही...नाही माझी आवडती वस्तू कोणीही हिरावून घेऊ शकत नाही....ती माझी नाही तर कुणाची नाही"
अस बोलून त्या पेटलेल्या आगीच्या दिशेने राहुलने आपल्या हातातील बाहुली फेकून दिली....अर्जुनने हे बघितले आणि ताडकन उठून राहुलला एक धक्का दिला....बाहुली एका कपड्यावर पडली होती...बाजूने आग लागली होती...त्या जळत्या आगीत हात घालून अर्जुनने ती बाहुली उचलली...खाली कोसळलेला राहुल ताडकन उठला आणि एक जोराची लाथ पाठीमागून बसली तसा अर्जुन त्या आगीत पडला...त्याच्या कपड्याला आग लागली होती...त्याने ती बाहुली उराशी कवटाळली...त्याच्या कपड्याने आग पकडली....तो ती हाताने झाडून विझवण्याचा प्रयत्न करू लागला...पण आगीने आपले रूप दाखवले......बाहुली कवटाळून तो खालच्या जमिनीत लोळू लागला...आग पूर्णपणे विझली होती....हे बघून राहुलला प्रचंड संताप आला तो अर्जुन जवळ जाण्यासाठी धावला.....राहुल येताना बघून अर्जुन ताडकन उभा राहिला आधीच अर्धमेला झालेल्या अर्जुनला राहुलचा एक जोरदार ठोसा सहन झाला नाही तो खाली कोसळला...राहुल ती बाहुली हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू लागला....अर्जुन ने बाजूला पडलेली एक लाकडी फळी उचलली आणि जोरात राहुलच्या डोक्यात मारली....फळीला असलेला खिळा राहुलच्या डोक्यात घुसला.....रक्ताची चिळकांडी उडाली....राहुल उलट्या पायांनी डोके धरून विक्टर जवळ आला...
"वाचवा साहेब वाचवा...तो बघा...तो बघा"
एका हाताने बाहुली कवटाळून एका हातात लाकडी फळी घेऊन अर्जुन उभा होता....तो रागाने दोघांकडे बघत होता.....विक्टर खुर्ची वरून उठला आणि जोरजोरात टाळ्या वाजवू लागला
"व्वा....व्वा....व्वा..... मानलं तुला.....खरंच प्रेमात ताकत असते....जाळात उडी घेतलीस...व्वा....पण कसं आहे ना...आम्ही दलाल लोक ग्राहकाला खुश करण्यासाठी काहीही करतो...आणि आता राहुल माझा ग्राहक आहे.....आणि हे प्रेम...भावना आमच्या सैतानाला आवडत नाहीत...त्याला आवडतं दुःख....तिरस्कार आणि वेदना..."
अस बोलून विक्टर ने आपला हात वर करून अर्जुनच्या गुडघ्याच्या दिशेने हवेत उचलला आणि आपला हात मंत्र म्हणत हवेत फिरवला....विक्टर विचित्र मंत्र पुटपुटत होता त्याचा आवाज त्या हॉल मध्ये घुमत होता..खटकन आवाज झाला....अर्जुनचा पाय गुडघ्यातून मोडला होता...प्रचंड वेदनेने अर्जुन तळमळू लागला....त्याच्या हातातील रक्ताळलेली फळी खाली पडली पण बाहुली मात्र अजून त्याने उराशी कवटाळून ठेवली होती.....हे बघून विक्टर ला राग आला त्याने दुसऱ्या गुडघ्याकडे हाथ उंचावून मंत्र म्हणत हाथ फिरवला त्या बरोबर अर्जुनचा दुसरा पाय मोडला...अर्जुन खाली कोसळला....प्रचंड वेदनेने तो तळमळत होता.....
"तू माझ्या शक्तींची परीक्षा बघतोयस अर्जुन....सोड ती बाहुली..."
अर्जुन फक्त वेदनेने विव्हळत होता...त्याने ती बाहुली अजून कवटाळली....विक्टर संतापला त्याने त्या आगीकडे बघितले....आपला हात त्या आगीच्या दिशेने उंचावून त्या आगीतून एक मोठा गोळा त्याने हवेत उंचावला....विक्टरची मायावी शक्ती बघून राहुल थक्क झाला....विक्टरने इशारा करताच तो आगीचा गोळा अर्जुनच्या अंगावर धडकला....त्याचा शर्ट जळू लागला...एका हाताने ती आग विझवत अर्जुन मोडक्या गुडघ्यावर उभा होता....त्याचा पॉलिस्टर चा शर्ट पाघळून त्याच्या अंगाला चिटकत होता....त्याने बाहुली पकडलेला हात वर केला....शर्ट जळत होता...सोबत अर्जुनचे अंग सुद्धा भाजत होतं....त्याच अंग भाजून लालेलाल झालं होतं...भाजल्यामुळे फोड दिसत होते पण त्याचा बाहुली पकडलेला हात मात्र खाली येत नव्हता....तो किंचाळत होता....अखेर तो शर्ट जळून पाघळून विझून गेला....अर्जुनची जिद्द बघून विक्टर संतापला....त्याने आपला हात हवेत उचलून मंत्र म्हंटला त्याच बरोबर खाडकन आवाज आला....बाहुली पकडलेला हात मोडून लटकू लागला....त्याच बरोबर त्याच्या हातातील बाहुली खाली पडली....बाहुली पडताच राहुल धावत आला आणि बाहुली उचलू लागला....अर्जुनाने आपल्या दुसऱ्या हाताने त्याला मारण्याचा प्रयत्न केला....हे बघून विक्टर ने आपला हात उचलून मंत्र म्हंटला आणि अर्जुनचा दुसरा हात सुद्धा खांद्यातून खाडकन मोडला....राहुल आणि विक्टर दोघे हसत होते.....राहुलने ती बाहुली अर्जुनला दाखवली आणि त्या जळत्या आगीत फेकून दिली....अर्जुन रडत किंचाळत सरपटत त्या आगीच्या दिशेने जाऊ लागला.....त्याचे हात पाय लटकत होते तरी त्याने जिद्द सोडली नव्हती...त्याला सरपटत येताना बघून....विक्टर प्रचंड चिडला
"साला...ह्या स्टेजला माणूस मरून जातो...पण हा xxx मरतच नाही आहे....थांब...थांब....राखच करतो तुला"
विक्टर प्रचंड संतापला त्याने आपली सगळी शक्ती एकवटली आणि हवेत एक मोठा आगीचा गोळा तयार केला...त्या आगीच्या दाहाने राहुलचे डोळे जळजळू लागले तो तिथून दूर पळाला....तो मोठा आगीचा गोळा अर्जुनला भस्म करायला त्याची राख करायला पुरेसा होता......अर्जुनचे लक्ष त्या आगीच्या गोळ्यापेक्षा त्या आगीत पडलेल्या बाहुलीकडे होते.........(क्रमशः)
#शशांक_सुर्वे
टॅटू-भाग १-Marathi Bhutkatha >https://marathighoststories.blogspot.com/2019/07/marathi-bhutkatha.html
टॅटू- भाग दुसरा >https://marathighoststories.blogspot.com/2019/07/blog-post_6.html
टॅटू- भाग तिसरा >https://marathighoststories.blogspot.com/2019/07/blog-post_66.html
अर्जुन त्या पडक्या जुन्या फॅक्टरी जवळ आला होता....रात्र झाली होती सगळीकडे अंधार होता...त्या अंधारात एका खिडकीतून त्याला प्रकाश दिसत होता...अर्जुनने आपल्या टॅटू कडे बघितले बाणाची दिशा त्याच खोलीकडे होती...खूप दूर वरून चालत आल्यामुळे घामाने त्याचं सगळं अंग भिजलं होतं....तो पुढे पुढे जात होता....पडक्या भिंतीचे ढिगारे चढून तो त्या दिशेने जात होता...मधेच एखादं कुत्रं भुंकून त्याला सावध करीत होतं.... अनेक वर्षांपूर्वी ती फॅक्टरी जळाली होती तेव्हा अनेक जण मृत्युमुखी पडले होते....तेव्हा पासून तिकडे कुणाचे येणे जाणे नसायचे....अनेक अफवा त्या जागेबद्दल होत्या...तिथे येत होते ते फक्त पॅरानॉर्मल गोष्टीवर रिसर्च करणारे काही हौशी लोकं...बाकी तिथे कुणाचंही वास्तव्य नसायचं.....तिथल्या त्या काळवंडलेल्या भिंती भयाण शांतता....कुणाही माणसाच्या मनात भीती निर्माण करेल पण अर्जुन साठी पुष्पाची काळजी ह्या भीतीशी सामना करायला पुरेशी होती....अर्जुनने मोबाईल चा टॉर्च चालू केला....त्या उजेडात तो चालत त्या दिशेने जाऊ लागला....मधेच टॉर्चचा उजेड त्या जळून काळवंडून गेलेल्या भिंतीवर जाई....त्यावर सुद्धा विचित्र आकृत्या दिसत होत्या जणू कुणीतरी अर्जुनकडे बघत आहे.....अखेर तो त्या मोठ्या हॉल जवळ आला....बाहेरच्या भिंतीवर कुणीतरी विक्टर च्या आणि त्या मुलीच्या हातावर ज्या सैतानाचे टॅटू होते तसे पेंटिंग होते....ते बघून अर्जुनच्या मुठी आवळल्या...तो जवळ जाऊ लागला....आतुन त्याला हसण्या खिडळण्याचे आवाज येत होते....तो सावध पणे आत जात होता.....हॉल बाहेर कसली तरी हाडे....भिंतीवर कुठल्या तरी वेगळ्या भाषेतील मंत्र आणि एकदम भेसूर आवाजात रेकॉर्डर वर लावलेले म्युझिक.....अचानक ते हार्डकोर म्युझिक बंद झाले....हॉल मध्ये असलेल्या खांबाचा आधार घेत लपतछपत तो मुख्य हॉल मध्ये आला.....त्याची नजर चोरून समोरचं दृश्य बघत होती.....समोर विक्टर सिगार ओढत उभा होता.....पाठमोरा एक माणूस उभा होता....त्याची पाठ अर्जुन बघू शकत होता...तो माणूस हसत होता...त्याच्या हातात एक बाहुली होती....त्या बाहुलीला केसांचा पुंजका गुंडाळला होता....तो माणूस आपले हसू थांबवत बोलला
"साहेब....माझं काम झालंय बघा.....ती पुष्पा तिकडे तडफडत आहे....अहो तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी तिचे केस ब्युटी पार्लर मधून तुम्हाला आणून दिले आणि तुम्ही लगेच मंतर मारला....तिला तडफडताना बघून लई मज्जा येते बघा.....हिकडं तुम्ही तिचा जीव ह्या बाहुलीत कैद केला आणि मी इथं बाहुलीला तरास दिला की तिकडं ती तडफडते....असच तडफडून तिला मारणार आहे बघा"
अर्जुनच्या कानावर हे शब्द पडताच त्याच्या डोळ्यातून घळकन पाणी आले त्याने आपली आवळलेली मूठ जोरात समोरच्या भिंतीवर मारली....तो फक्त ऐकू शकत होता कारण कारण त्या माणसाच्या हातात होती ती बाहुली......
तिकडे विक्टरने आपल्या मोठ्या बॅग मध्ये हात घातला आणि त्यातून एक विचित्र आकाराची बरणी बाहेर काढली....त्यावर सैतानाचे चिन्ह कोरले होते....ती बरणी त्याने समोरच्या टेबलावर ठेवली तिथे अजून बऱ्याच बरण्या दिसत होत्या....विक्टर त्याच्याकडे बघून हसला.....त्याने आपली सिगार खाली फेकली...
"मी तुझं काम केलं आहे...आता तुझी वेळ आहे तुझा वादा पुरा करायची.....तयार आहेस ना??...तुझा आत्मा मी बरणीत बंद करणार आहे.....पण मला हे समजत नाही....आम्हाला आत्मे दान करून अनेक जण अपार पैसा,खेळात किंवा आपल्या फिल्ड मध्ये यश मागतात आता मीच बघ ना....मी सैतानाकडे काळी विद्या मागितली...आणि ती त्याने दिली सुद्धा....पण तू....तू एका मुलीची बरबादी मागीतलीस ते पण आपला आत्मा गहाण ठेवून....हे मला काही समजलं नाही....सांगू शकशील का??
हे ऐकून तो माणूस दोन पावले पुढे आला....आणि विक्टर ला म्हणाला
"साहेब ठार तर मी तिला लगेच केली असती....पण काय फायदा मला जेल झाली असती....मग काय फायदा म्हणून मी तिला तडफडत ठेवून मारणार....ही माझ्या कॉलेज मध्ये होती....खूप प्रेम करायचो मी तिच्यावर....पण ही ही साली दुसऱ्यावर प्रेम करायची आणि लग्न सुद्धा केलं त्याच्याबरोबर.....किती समजावलं किती धमकावले पण ऐकली नाही....हिच्या बापाने आणि भावाने मला कुत्र्यासारखा तुडवला होता....मी हिच्यासाठी रोज झुरत होतो आणि ही पुष्पा आपल्या नवऱ्याबरोबर मजेत जगत होती....तेव्हाच शपथ घेतली की हीच बदला घ्यायचा....आणि तुम्ही मला भेटलात....आता बघा कशी तडफडवतो हिला....अरे 10 वाजले....हिला डोस द्यायची वेळ झाली"
अस बोलून त्याने आपल्या खिश्यातली सुई काढली आणि ती सुई तिच्या पोटात खुपसणार तितक्यात खांबाच्या मागे लपलेला अर्जुन बाहेर आला...ती सुई बघून जोरात किंचाळला
"थांब राहुल.....थांब.....खबरदार पुष्पाला इजा पोचवलीस तर"
हा आवाज गरजताच दोघांनी सुद्धा मागे वळून बघितलं...समोर उभा असलेला अर्जुन बघून दोघेही आश्चर्यचकित झाले....अर्जुनला बघून हातात बाहुली पकडलेला राहुल गरजला....अर्जुन वेगाने त्याच्या दिशेने येत होता
"तू.....तू.....तू इथे कसा आलास???..तिथेच थांब....तुझ्या बायकोचा जीव माझ्या हातात आहे....पुढे आलास तर ही सुई सरळ तुझ्या बायकोच्या डोक्यात घुसविन.....मग सगळा खेळ खल्लास"
राहुलच्या हातातील सुई सरळ त्या बाहुलीच्या डोक्यावर होती....हे बघून अर्जुन जागेवर थांबला....अनपेक्षित पणे अर्जुनला बघून विक्टर विचार करू लागला....काहि सेकंद विचार केल्यावर त्याने स्वतःच्या डोक्यावर एक टपली मारली आणि म्हणाला
"अरे अरे थांबा....गोंधळ करू नका....अच्छा अस आहे तर.....राहुलने मला आत्मा गहाण देण्याचे वचन दिले अर्जुनची बायको तडफडून मरु दे म्हणून आणि अर्जुन मला काल आत्मा दान करण्याचे वचन देतोय त्याची बायको जगू दे म्हणून....अरे अरे कसल्या मोठ्या धर्मसंकटात पडलोय मी"
अस बोलून विक्टर जोरजोरात हसू लागला....त्याचे राक्षसी हसू दोघेही एखादं भुत बघावं तस बघत होते अचानक अर्जुन बोलला
"हे बघा मी तुम्हाला आता मी माझा आत्मा देतो पण तुम्ही माझ्या बायकोला काहि होऊ देऊ नका....काल...काल तुम्ही वचन दिलंय मला"
अर्जुनचे हे बोल ऐकून राहुल बैचेन झाला...तो विक्टर कडे बघत...."नाही नाही....हे नाही होऊ शकत...मी...मी आधी आलोय तुमच्याकडे"
विक्टर ने त्याला इशारा करून शांत रहायला सांगितले....आणि हातातील बरणी फिरवत तो म्हणाला
"हे बघ अर्जुन....शब्द म्हणजे शब्द तू मला काल भेटला होतास...मला हे प्रकरण माहीत असत तर मी तुला माझा उपाय सुद्धा सांगितला नसता....पण राहुलला मी 7 दिवसांपूर्वी शब्द दिला होता....त्यामुळे मी काहीही करू शकत नाही.....सॉरी"
अस बोलून विक्टर आपल्या आराम खुर्चीत बसून दोघांकडे बघू लागला....तिकडे राहुलच्या हातातील सुई बघून अर्जुनने हात वर केले....
"हे....हे बघ राहुल असा वेडेपणा करू नको....अरे प्रेम जबरदस्तीने करता येत नाही रे.....पुष्पाचं तुझ्यावर प्रेम नव्हतं....ती माझ्यावर प्रेम करायची....आणि मी तिच्यावर......आता तुला सुद्धा एखादी चांगली मुलगी मिळू शकते....पण आता आम्हाला सुखाने जगू दे...plz"
हे ऐकून राहुलने आपल्या हातातील सुई मागे केली....आणि आपल्या खिशातील लायटर बाहेर काढला
"अर्जुन.....अर्जुन.....अरे
राहुलने लायटर पेटवला आणि बाहुलीच्या जवळ घेऊन जाऊ लागला....तसा अर्जुन राहुल पुढे हाथ जोडू लागला
"नको....नको....मी येतो मी येतो"
अस बोलून अर्जुन गुडघ्यावर बसला आणि राहुलच्या दिशेने गुडघ्यावर चालू लागला.....राहुल आणि विक्टर त्याची दशा बघून हसत होते....तो राहुल जवळ गेला की राहुल पळत पळत दुसरीकडे जायचा...अस करत करत त्याने गुडघ्यावर अर्जुनला पूर्ण हॉल फिरवला....राहुलचे ते राक्षसी हसू पूर्ण हॉल मध्ये घुमत होते...चालून चालून राहुल दमला होता पण त्याच्याकडे बघत त्याच्या हातातील बाहुलीकडे आणि त्या जळत्या लायटर कडे बघत अर्जुन न दमता गुडघ्यावर चालत होता....खडबडीत मोठया दगडांनी भरलेली ती जमीन अक्षरशः अर्जुनचे गुडघे सोलवटून टाकत होती...त्याच्या गुडघ्यातून रक्त येत होतं...अखेर राहुल विक्टर जवळ येऊन धापा टाकत थांबला....अर्जुन तिथे आला आणि राहुलने आपल्या बोटाच्या इशाऱ्याने आपले पाय दाखवले....अर्जुनने आपले डोके राहुलच्या पायावर ठेवलेच...त्याच्या डोळ्यातून पुष्पा साठी वाहणारे अश्रू राहुलचे पाय ओले करत होते....राहुलने इशारा केला तसा विक्टर ने बाजूला पडलेला पालापाचोळा आणि काही जुने कपडे घेऊन त्यावर पेट्रोल टाकले.....आणि त्याला आग लावली....ती आग बघून राहुलने आपला पायाचा पंजा अर्जुनच्या मस्तकावर ठेवला आणि त्याला खाली दाबले....अर्जुन ती धगधगती आग स्पष्ट बघू शकत होता.....राहुलने दोन तीन लाथा त्याच्या पाठीत मारल्या....
"साल्या....घे...घे....माझं
अस बोलून त्या पेटलेल्या आगीच्या दिशेने राहुलने आपल्या हातातील बाहुली फेकून दिली....अर्जुनने हे बघितले आणि ताडकन उठून राहुलला एक धक्का दिला....बाहुली एका कपड्यावर पडली होती...बाजूने आग लागली होती...त्या जळत्या आगीत हात घालून अर्जुनने ती बाहुली उचलली...खाली कोसळलेला राहुल ताडकन उठला आणि एक जोराची लाथ पाठीमागून बसली तसा अर्जुन त्या आगीत पडला...त्याच्या कपड्याला आग लागली होती...त्याने ती बाहुली उराशी कवटाळली...त्याच्या कपड्याने आग पकडली....तो ती हाताने झाडून विझवण्याचा प्रयत्न करू लागला...पण आगीने आपले रूप दाखवले......बाहुली कवटाळून तो खालच्या जमिनीत लोळू लागला...आग पूर्णपणे विझली होती....हे बघून राहुलला प्रचंड संताप आला तो अर्जुन जवळ जाण्यासाठी धावला.....राहुल येताना बघून अर्जुन ताडकन उभा राहिला आधीच अर्धमेला झालेल्या अर्जुनला राहुलचा एक जोरदार ठोसा सहन झाला नाही तो खाली कोसळला...राहुल ती बाहुली हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू लागला....अर्जुन ने बाजूला पडलेली एक लाकडी फळी उचलली आणि जोरात राहुलच्या डोक्यात मारली....फळीला असलेला खिळा राहुलच्या डोक्यात घुसला.....रक्ताची चिळकांडी उडाली....राहुल उलट्या पायांनी डोके धरून विक्टर जवळ आला...
"वाचवा साहेब वाचवा...तो बघा...तो बघा"
एका हाताने बाहुली कवटाळून एका हातात लाकडी फळी घेऊन अर्जुन उभा होता....तो रागाने दोघांकडे बघत होता.....विक्टर खुर्ची वरून उठला आणि जोरजोरात टाळ्या वाजवू लागला
"व्वा....व्वा....व्वा.....
अस बोलून विक्टर ने आपला हात वर करून अर्जुनच्या गुडघ्याच्या दिशेने हवेत उचलला आणि आपला हात मंत्र म्हणत हवेत फिरवला....विक्टर विचित्र मंत्र पुटपुटत होता त्याचा आवाज त्या हॉल मध्ये घुमत होता..खटकन आवाज झाला....अर्जुनचा पाय गुडघ्यातून मोडला होता...प्रचंड वेदनेने अर्जुन तळमळू लागला....त्याच्या हातातील रक्ताळलेली फळी खाली पडली पण बाहुली मात्र अजून त्याने उराशी कवटाळून ठेवली होती.....हे बघून विक्टर ला राग आला त्याने दुसऱ्या गुडघ्याकडे हाथ उंचावून मंत्र म्हणत हाथ फिरवला त्या बरोबर अर्जुनचा दुसरा पाय मोडला...अर्जुन खाली कोसळला....प्रचंड वेदनेने तो तळमळत होता.....
"तू माझ्या शक्तींची परीक्षा बघतोयस अर्जुन....सोड ती बाहुली..."
अर्जुन फक्त वेदनेने विव्हळत होता...त्याने ती बाहुली अजून कवटाळली....विक्टर संतापला त्याने त्या आगीकडे बघितले....आपला हात त्या आगीच्या दिशेने उंचावून त्या आगीतून एक मोठा गोळा त्याने हवेत उंचावला....विक्टरची मायावी शक्ती बघून राहुल थक्क झाला....विक्टरने इशारा करताच तो आगीचा गोळा अर्जुनच्या अंगावर धडकला....त्याचा शर्ट जळू लागला...एका हाताने ती आग विझवत अर्जुन मोडक्या गुडघ्यावर उभा होता....त्याचा पॉलिस्टर चा शर्ट पाघळून त्याच्या अंगाला चिटकत होता....त्याने बाहुली पकडलेला हात वर केला....शर्ट जळत होता...सोबत अर्जुनचे अंग सुद्धा भाजत होतं....त्याच अंग भाजून लालेलाल झालं होतं...भाजल्यामुळे फोड दिसत होते पण त्याचा बाहुली पकडलेला हात मात्र खाली येत नव्हता....तो किंचाळत होता....अखेर तो शर्ट जळून पाघळून विझून गेला....अर्जुनची जिद्द बघून विक्टर संतापला....त्याने आपला हात हवेत उचलून मंत्र म्हंटला त्याच बरोबर खाडकन आवाज आला....बाहुली पकडलेला हात मोडून लटकू लागला....त्याच बरोबर त्याच्या हातातील बाहुली खाली पडली....बाहुली पडताच राहुल धावत आला आणि बाहुली उचलू लागला....अर्जुनाने आपल्या दुसऱ्या हाताने त्याला मारण्याचा प्रयत्न केला....हे बघून विक्टर ने आपला हात उचलून मंत्र म्हंटला आणि अर्जुनचा दुसरा हात सुद्धा खांद्यातून खाडकन मोडला....राहुल आणि विक्टर दोघे हसत होते.....राहुलने ती बाहुली अर्जुनला दाखवली आणि त्या जळत्या आगीत फेकून दिली....अर्जुन रडत किंचाळत सरपटत त्या आगीच्या दिशेने जाऊ लागला.....त्याचे हात पाय लटकत होते तरी त्याने जिद्द सोडली नव्हती...त्याला सरपटत येताना बघून....विक्टर प्रचंड चिडला
"साला...ह्या स्टेजला माणूस मरून जातो...पण हा xxx मरतच नाही आहे....थांब...थांब....राखच