#टॅटू-
भाग दुसरा
पहिल्या भागाची लिंक👇👇👇👇
https://marathighoststories.blogspot.com/2019/07/marathi-bhutkatha.html
रागाने येत असलेल्या अर्जुनला बघून त्या परदेशी माणसाने एका घोटात आपला चहा संपवला....अर्जुन अधिकच संतापला होता त्याने सरळ त्या माणसाची कॉलर पकडली त्याच्या राक्षसी टॅटू कडे बघत तो त्याला म्हणाला
"कोण आहेस तू??आणि का मागे लागला आहेस आमच्या...आम्ही तुला ओळखतही नाही...माझ्या पुष्पाने काय वाईट केलंय तुझं??...बोल..…हा टॅटू कुठून आला???"
त्या माणसाने एकनजर अर्जुनकडे बघितले ...त्या माणसाच्या निळ्या डोळ्यात एक वेगळीच ताकत होती...त्याची ती निळी बुबुळे अचानक काळी झाली...तो एकटक अर्जुनच्या डोळ्यात बघत होता...अर्जुनला चक्कर आल्यासारखं झालं....त्याच्या हाताची पकड सैल झाली.....तो पूर्णपणे शांत झाला होता....त्या परदेशी माणसाने आपला चुरगाळलेला सदरा झाडून व्यवस्तीत केला....अर्जुन मान खाली घालून उभा होता...त्या माणसाने बोटं हलवून त्याला इशारा केला
"चल ये माझ्या मागून"
एखादा हिप्नॉटिझम झालेला व्यक्ती जसा त्या आदेश देणार्यांचे सर्व आदेश पाळतो तसं अर्जुन त्याचे सगळे आदेश पाळायचा तयारीत होता....तो मान खाली घालून त्याच्या मागे जाऊ लागला....एका गल्लीत जाऊन तो थांबला तिथल्या एका कट्ट्यावर बसून त्याने अर्जुनला बसायचा इशारा केला तसा अर्जुन लगेच बसला....त्या माणसाने कपाळावर आलेले आपले लांब केस हाताने बाजूला केले....खिशातील सिगार पेटवून तो अर्जुनला म्हणाला
"हे बघ तू कोण आहेस..मला बघून असं का वागलास हे मला माहित नाही....पण तुझ्या डोळ्यात बघितल्यावर मला एक गोष्ट जाणवली की तुझ्यावर किंवा तुझ्या जवळच्या व्यक्तीवर कसली तरी काळी जादू केलीय....त्याचा त्रास तुला होतोय...तू...."
त्याचे वाक्य मधेच थांबवत अर्जुन त्याच्या हातावर हात ठेवून म्हणाला
"माझ्या बायकोवर केलीय कुणीतरी.....त्या दिवशी एका विचित्र मुलीने आमच्या हातावर हे टॅटू काढलेत तेव्हा पासून हे त्रास होत आहेत....डॉक्टरांना सुद्धा निदान लागत नाही आहे माझी बायको तिकडे तडफडत आहे.....त्या मुलीच्या हातावर सुद्धा असाच तुमच्या हातावर आहे तसा टॅटू होता.."
हे ऐकून त्या माणसाने आपली जळती सिगार पायाखाली फेकली आणि तिला पायाने कुस्करून टाकली....अर्जुनच्या बोलण्याने तो जरा विचारात पडला.....त्याने आजूबाजूला बघितले तो रस्ता पूर्णपणे निर्मनुष्य असल्याची खात्री केली
"तर तुला आता ह्या टॅटू बद्दल जाणून घ्यायची इच्छा आहे तर.....हे बघ आता मी जे काही सांगतो ते नीट ऐकून घे.....तुमची दुनिया आता विनाशाकडे चालली आहे....जे विधिलिखित आहे तेच घडतं आहे....प्रत्येक धर्मात ह्या अंताचा वेगवेगळा उल्लेख आहे कुणी ह्याला "कलियुग" म्हणत कुणी "कयामत की रात" कुणी "जजमेंट डे" .....काहीही म्हणोत ह्या दुनियेत आता विनाश अटळ आहे....विधिलिखिताप्रमाणे आता सैतानाचं राज्य येणार आहे....आणि ह्या काळात जो सैतानाची पूजा करेल तोच टिकून राहील......तुझ्या विचार शक्तीच्या पलीकडे आहे हे सगळं....तुला वाटणार पण नाही इतके लोक ह्यात सामील आहेत....मी पण त्याचा एक छोटासा हिस्सा आहे.....तुझ्या मनात हा प्रश्न येत असेल की हा परदेशी असून सुद्धा इतकं शुद्ध मराठी कसं बोलू शकतो???.......तर माझं नाव आहे विक्टर स्मित.....मी ह्या भारतात जवळपास 20 वर्षे वास्तव्य करून आमच्या सैतानी कामात हातभार लावत आहे....जसा तुझा तुझ्या देवावर विश्वास असेल तसे आमच्या पंथातील लोक सैतानावर विश्वास ठेवतात....त्याची सत्ता येणार हे अटळ आहे....आम्ही ज्या सैतानासाठी काम करतो त्याच नाव आहे "लॉर्ड ड्रेकुला"......आमचा एक मोठा पंथ आहे त्यात अनेक मोठे फिल्मस्टार,गायक,नेते,श्रीम ंत लोक,स्पोर्टस्टार सहभागी आहेत.....लॉर्ड ड्रेकुला च्या कृपेमुळे प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात यश खेचून आणत आहे.....प्रसंगी आमच्या विरोधकांचे आम्ही असे हाल करतो की तो आयुष्यातून उठला पाहिजे....पण हे सगळं फुकट मिळत नाही बरं......आम्ही प्रत्येकाने आपले आत्मे लॉर्ड ड्रेकुला कडे गहाण ठेवलेत....ह्याचा मोबदला म्हणून आम्हाला प्रत्येक कामात यश मिळते....नाही मिळालं तरीही आम्ही ते खेचून आणतो....लवकरच पृथ्वीवर सैतानाचे राज्य येणार आहे....आणि त्याला राज्य करण्यासाठी आवश्यक आहे ताकत.....ती ताकत आम्ही लोक पुरवतो....तुझ्यासारख्या गरजू लोकांच्या इच्छा पूर्ण करतो त्यांचे आत्मे गहाण ठेवून.....त्यांचा आम्ही त्या वेळी वापर करू आमच्या राक्षसी देवाला अजून ताकतवान बनवण्यासाठी.....एकूणच तू मला आत्म्याचा दलाल म्हणू शकतोस.....इथे जवळपास 50 लोकांचे आत्मे कैद केले आहेत मी....ते सैतानाला अर्पण करून मायावी जादूगार होणार आहे मी.....चल सोड मी तर सगळं सांगितलं आता तुझी बारी....बोल काय प्रॉब्लेम आहे
अर्जुन सगळं शांत पणे ऐकून घेत होता....विक्टर ने मुद्दाला हाथ घातला होता....त्याच्यापुढे हाथ जोडून बसलेला अर्जुन हतबल होऊन त्याला म्हणाला
"माझी बायको खूप आजारी आहे.....तिला खूप त्रास होत आहे....तिला तुम्ही बरे केले तर खूप उपकार होतील......माहीत नाही असं का होतंय...पण तुमच्या डोळ्यात एक वेगळीच शक्ती अनुभवली....मला विश्वास आहे की तिला तुम्हीच बरे कराल...माझं तिझ्यावर माझ्यापेक्षा जास्त प्रेम आहे तिच्यासाठी काहीही करायला मी तयार आहे"
हे ऐकून विक्टर गालात हसला तो ताडकन उठला....आणि अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवून बोलला
"बघ हा....काहीही करायला तयार आहेस....चल दाखव कुठे आहे तुझी बायको"
दोघेही हॉस्पिटलच्या दिशेने निघाले...पुष्पाच्या वार्ड मध्ये गेल्यावर विक्टर गोंधळला...त्याने पुष्पाचा हाथ हातात घेतला....आणि डोळे बंद केले....त्याला काहीतरी उमगले होते....तो ताडकन त्या खोलीबाहेर आला....पाठोपाठ अर्जुन सुद्धा आला विक्टर ची बैचेनी अर्जुनला अस्वस्थ करीत होती
आपल्या टॅटू कडे बघत बसलेल्या विक्टर ला बघून अर्जुन त्याला म्हणाला
"काय झालं???माझी बायको बरी तर होईल ना??"
तुझा अंदाज खरा आहे ही माझ्या ओळखीची काळी जादू आहे बहुतेक आमच्याच पंथातल्या कुणीतरी केली असेल....पण....माझ्याकडे उपाय आहे....मी पूर्णपणे तुझ्या बायकोला बरी करू शकतो.....काय करू शकशील तिच्यासाठी??"
विक्टरच्या ह्या प्रश्नाने अर्जुनला रडू कोसळले त्याने सरळ त्याचे पाय पकडले
"माझे खूप प्रेम आहे हो तिच्यावर....तिच्यासाठी मी काहीही करू शकतो अगदी जीव सुद्धा देऊ शकतो....पण काहीही करून माझ्या पुष्पाला वाचवा"
विक्टर हसला त्याने अर्जुनला खांद्याला धरून उचलले....डोळे पुसण्यासाठी त्याने आपला रुमाल त्याला दिला
"जीव द्यायची काही गरज नाही....मी तिला बरी करीन....पण तू तुझ्या आत्मा माझ्याकडे गहाण ठेवला पाहिजेस....तरच मी तुझी इच्छा पूर्ण करेन....घाबरू नकोस ह्या आत्मा गहाण ठेवण्याच्या विधीत तू मरणार नाहीस....फक्त आम्ही त्याचा वापर करू...तू तुझ्या बायको बरोबर तुझ्या आयुष्यात सुखी राहशील...बोल आहे मंजूर??"
विक्टर चा हाथ पुढे आला....क्षणाचाही विचार न करता...अर्जुनने त्याच्याशी हातमिळवणी केली
"गुड.....तुझा नंबर दे....मी तुला लवकरच कॉल करीन...आणि हो तुझी बायको नक्की बरी होईल....सैतानावर भरवसा ठेव"
अस बोलून अर्जुनचा नंबर एका कागदावर लिहून घेऊन विक्टर तिथून निघून गेला....आता अर्जुन नेहमी विक्टरच्या फोन ची वाट बघू लागला...पुष्पाची हालत त्याला स्वस्थ बसू देत नव्हती तिचा त्रास वाढतच होता....तिकडे सर्वांनी पुष्पा साठी देवाला साकडं घातलं होत आणि इकडे तिचा सगळ्यात जवळचा अर्जुन मात्र सैतानावर विश्वास ठेवून बसला होता....त्याच्या कृपेची वाट बघत बसला होता...एक दिवस पुष्पाला प्रचंड त्रास होत होता...तिने कित्येक वेळा रक्ताची उलटी केली होती....तिची ती अर्जुन कडे आशेने बघणारी नजर ...अर्जुनला अस्वस्थ करीत होती...डॉक्टरांनी त्याला रक्तपेढीतून रक्त आणायला सांगितले...एक रक्तदाता रक्त देत होता...त्याची वाट बघत अर्जुन आपल्या फोनकडे मोठ्या आशेने बघत होता.....अचानक त्याची नजर आपल्या टॅटू कडे गेली....टॅटू मधील बाणाचे टोक विरुद्ध दिशेला फिरले होते......अर्जुन ताडकन उभा राहिला...आणि टॅटूतील बाणाचे टोक ज्या दिशेला फिरेल तिकडे जाऊ लागला....त्याच्या मनात एक आशा निर्माण झाली...तो हॉस्पिटल पासून खूप दूर आला होता....शहर कधीच मागे पडले होते....गर्द झाडी...पण अर्जुनचे लक्ष त्या बाणाच्या टोकाकडे होते....अखेर एका ठिकाणी तो थांबला....एक पडझड झालेल्या जुन्या मोडून पडलेल्या बंद फॅक्टरी बाहेर तो उभा होता............(क्रमशः)
टॅटू-भाग १-Marathi Bhutkatha >https://marathighoststories.blogspot.com/2019/07/marathi-bhutkatha.html
टॅटू- भाग दुसरा >https://marathighoststories.blogspot.com/2019/07/blog-post_6.html
टॅटू- भाग तिसरा >https://marathighoststories.blogspot.com/2019/07/blog-post_66.html
भाग दुसरा
पहिल्या भागाची लिंक👇👇👇👇
https://marathighoststories.blogspot.com/2019/07/marathi-bhutkatha.html
रागाने येत असलेल्या अर्जुनला बघून त्या परदेशी माणसाने एका घोटात आपला चहा संपवला....अर्जुन अधिकच संतापला होता त्याने सरळ त्या माणसाची कॉलर पकडली त्याच्या राक्षसी टॅटू कडे बघत तो त्याला म्हणाला
"कोण आहेस तू??आणि का मागे लागला आहेस आमच्या...आम्ही तुला ओळखतही नाही...माझ्या पुष्पाने काय वाईट केलंय तुझं??...बोल..…हा टॅटू कुठून आला???"
त्या माणसाने एकनजर अर्जुनकडे बघितले ...त्या माणसाच्या निळ्या डोळ्यात एक वेगळीच ताकत होती...त्याची ती निळी बुबुळे अचानक काळी झाली...तो एकटक अर्जुनच्या डोळ्यात बघत होता...अर्जुनला चक्कर आल्यासारखं झालं....त्याच्या हाताची पकड सैल झाली.....तो पूर्णपणे शांत झाला होता....त्या परदेशी माणसाने आपला चुरगाळलेला सदरा झाडून व्यवस्तीत केला....अर्जुन मान खाली घालून उभा होता...त्या माणसाने बोटं हलवून त्याला इशारा केला
"चल ये माझ्या मागून"
एखादा हिप्नॉटिझम झालेला व्यक्ती जसा त्या आदेश देणार्यांचे सर्व आदेश पाळतो तसं अर्जुन त्याचे सगळे आदेश पाळायचा तयारीत होता....तो मान खाली घालून त्याच्या मागे जाऊ लागला....एका गल्लीत जाऊन तो थांबला तिथल्या एका कट्ट्यावर बसून त्याने अर्जुनला बसायचा इशारा केला तसा अर्जुन लगेच बसला....त्या माणसाने कपाळावर आलेले आपले लांब केस हाताने बाजूला केले....खिशातील सिगार पेटवून तो अर्जुनला म्हणाला
"हे बघ तू कोण आहेस..मला बघून असं का वागलास हे मला माहित नाही....पण तुझ्या डोळ्यात बघितल्यावर मला एक गोष्ट जाणवली की तुझ्यावर किंवा तुझ्या जवळच्या व्यक्तीवर कसली तरी काळी जादू केलीय....त्याचा त्रास तुला होतोय...तू...."
त्याचे वाक्य मधेच थांबवत अर्जुन त्याच्या हातावर हात ठेवून म्हणाला
"माझ्या बायकोवर केलीय कुणीतरी.....त्या दिवशी एका विचित्र मुलीने आमच्या हातावर हे टॅटू काढलेत तेव्हा पासून हे त्रास होत आहेत....डॉक्टरांना सुद्धा निदान लागत नाही आहे माझी बायको तिकडे तडफडत आहे.....त्या मुलीच्या हातावर सुद्धा असाच तुमच्या हातावर आहे तसा टॅटू होता.."
हे ऐकून त्या माणसाने आपली जळती सिगार पायाखाली फेकली आणि तिला पायाने कुस्करून टाकली....अर्जुनच्या बोलण्याने तो जरा विचारात पडला.....त्याने आजूबाजूला बघितले तो रस्ता पूर्णपणे निर्मनुष्य असल्याची खात्री केली
"तर तुला आता ह्या टॅटू बद्दल जाणून घ्यायची इच्छा आहे तर.....हे बघ आता मी जे काही सांगतो ते नीट ऐकून घे.....तुमची दुनिया आता विनाशाकडे चालली आहे....जे विधिलिखित आहे तेच घडतं आहे....प्रत्येक धर्मात ह्या अंताचा वेगवेगळा उल्लेख आहे कुणी ह्याला "कलियुग" म्हणत कुणी "कयामत की रात" कुणी "जजमेंट डे" .....काहीही म्हणोत ह्या दुनियेत आता विनाश अटळ आहे....विधिलिखिताप्रमाणे आता सैतानाचं राज्य येणार आहे....आणि ह्या काळात जो सैतानाची पूजा करेल तोच टिकून राहील......तुझ्या विचार शक्तीच्या पलीकडे आहे हे सगळं....तुला वाटणार पण नाही इतके लोक ह्यात सामील आहेत....मी पण त्याचा एक छोटासा हिस्सा आहे.....तुझ्या मनात हा प्रश्न येत असेल की हा परदेशी असून सुद्धा इतकं शुद्ध मराठी कसं बोलू शकतो???.......तर माझं नाव आहे विक्टर स्मित.....मी ह्या भारतात जवळपास 20 वर्षे वास्तव्य करून आमच्या सैतानी कामात हातभार लावत आहे....जसा तुझा तुझ्या देवावर विश्वास असेल तसे आमच्या पंथातील लोक सैतानावर विश्वास ठेवतात....त्याची सत्ता येणार हे अटळ आहे....आम्ही ज्या सैतानासाठी काम करतो त्याच नाव आहे "लॉर्ड ड्रेकुला"......आमचा एक मोठा पंथ आहे त्यात अनेक मोठे फिल्मस्टार,गायक,नेते,श्रीम