रात्री भुत फिरतात- Marathi Romanchak story |
काल जवळ जवळ १७/१८ वर्षांनी कॉलेज चे मित्र भेटले. जुने दिवस आठवले अचानक प्लान केला कॉलेज च्या दिवसात रात्री उशिरापर्यंत फिरायचो तस फिरायला जाऊ.
ठरल्या प्रमाणे आम्ही ५ जण जमलो राजा अमित साई विनोद आणि मी मस्त फिरत गाव बाहेरच्या समशन भूमी जवळ पोचलो हवेत बऱ्या पैकी गारवा होता. अंधार जरा जास्तच वाटत होता. पण आम्हाला काही फरक पडत नव्हता. तिकडेच बाजूला बसून गप्पा मारायला सुरुवात केली एकाने सिगरेट पेटवली आणि कॉलेज च्या गप्पांना पुन्हा जोर आला. तेवढ्यात एक म्हातारं बाबा येताना दिसला आम्ही थोडे घाबरलो. त्याने जाता जाता एक कटाक्ष टाकला काय बोलाव या पोरांना अस काहीतरी बडबडत पुढे गेला. तेवढ्या राजा म्हणाला चला जाऊ एकतर आज आमावस्या आहे. विनोद मस्करीत बोलला आता तुझ्या अंगात काय आपल्या कॉलेज मधला मन्या आला काय त्यावर साई म्हणाला कोन मन्या तो घाबरट त्या बरोबर सगळे हसायला लागले.
मन्या नेहमी बोलायचा रात्री भुत फिरतात. आणि मी त्याला बोलायचो तु भूत झाला की मला भेट. नेमकी आठवण झाली. आता उशिर पण झाला होता आम्ही निघालो. माझ्या घरा जवळच्या चौकात मला अमितने सोडलं आणि सगळे आपापल्या घरी निघालो. आता थोडा पाऊस पण चालू झाला होता. आधीच गार वातावरण आणि त्यात पाऊस म्हणून भरभर चालत होतो. इतक्यात समोरून कोणी तरी मागून चालत येतय वाटलं म्हणून मागे बघितलं काळ्या रंगाचा जुना रेनकोट घालून कोणी तरी येत होत. जवळ येताच ओळखले हा तर मन्या. मी मनात म्हटल बार झालं सोबत मिळाली . तो जवळ आला तसा मला म्हणाला काय अजून सवय गेली नाही का रात्री फिरायची मी त्याला बोललो इतक्या वर्षांनी बर ओळखलस. बोलत बोलत मी त्याला सगळ्या बद्दल सांगितले. तो काही तरी बोलणार तोच मी त्याला थांबवत बोललो आता थोड्या वेळापुर्वी तुझी आठवण काढली होती सगळ्यांनी. तो काहीसा निराश होत बोलला आता सगळे काढतील आठवण मला समजलं नाही तो अस का बोलतोय. मी परत मस्करीत बोललो आता तुला भीती नाही वाटत का रात्रीची तो फक्त म्हणाला नाही आता कशाची भीती नाही वाटत.
पण विसरू नको रात्री भूत फिरतात.
घर जवळ आल मी सोसायटी च गेट उघडून आता आलो आणि मागे बघतो तर मन्या कुठेच दिसत नव्हता हा अचानक कुठे गायब झाला. घरी आलो थकलो होतो. लगेच झोप लागली. सकाळी फोन च्या रिंग ने जाग आली ५ मिसकॉल अमित शेवटचा कॉल अमित चा थोडं कंटाळत कॉल बॅक केला.
समोरून अमित जे बोलला ते ऐकून मी गार पडलो
अमित: अरे काल दुपारी मन्या चा अपघात झाला पोरगा जागीच गेला रे......
मन्या चे शब्द कानात घुमू लागले
रात्री भुत फिरतात......
रात्री भुत फिरतात......
( काही चुका आणि बदल असतील तर कंमेंट मध्ये नक्की सांगा )