ट्रान्सफर - Transfer full horror story in marathi
(पूर्ण कथा)

डॉक्टर मी आता सु*साईड करणार आहे...हे आवाज ह्या काळ्या आकृत्या मला जगू देणार नाहीत....असह्य झालं आहे सगळं....कुणीतरी माझ्या मरणार उठलं आहे बहुतेक....त्याला मला ह्या जगात राहू द्यायचं नसेल....तसेही माझे हे वृद्ध शरीर फार काळ साथ देणार नाही....कुणीतरी भयानक काळी जादू केलीय माझ्यावर...हे आजूबाजूला सापासारखे फुत्कारत फिरणारे काळे अमानवी जीव मला ओरबाडून खाऊन टाकतील अस मला वाटत आहे.....तुम्ही माझी खूप काळजी घेतली अगदी स्वतःच्या वडिलांच्या प्रमाणे काळजी घेतली....त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि मी माझी सगळी इस्टेट प्रॉपर्टी माझ्या पत्नीच्या सुमनच्या नावे "ट्रान्सफर" करत आहे....मी गेल्यावर तिची थोडी काळजी घ्या....माझं खूप प्रेम आहे तिच्यावर....मला जास्त बोलता येत नाही असं वाटतंय कुणीतरी माझ्याकडे रोखून बघत आहे आणि कोणत्याही क्षणी मला फरफटत अंधारात घेऊन जाईल....मला अस कुणाच्या हाती नाही मरायचं...तुम्ही जेव्हा घरी याल तेव्हा तळघरात माझे मृत शरीर दिसेल....तिथेच हे प्रॉपर्टी पेपर्स आणि काही सोने नाणे तुम्हाला मिळेल....गुड बाय डॉक्टर.......
विश्वासराव अस्वस्थ होऊन बोलून गेले....डोळ्याभोवती आलेली काळी वर्तुळे त्यावरून वाहणारे अश्रू स्पष्ट संकेत देत होते की त्यांनी आता ह्या जगातून निघून जायचा निर्णय घेतलाच आहे...त्यांच्या चेहऱ्यावर केविलवाणे भाव होते....डॉक्टर सुमित हातवारे करून त्यांना थांबवू पाहत होते पण विश्वासराव ऐकण्याच्या मनस्थिती मध्ये नव्हतेच तिकडून कॉल कट झाला तरी सुमित हॅलो....हॅलो....हॅलो करत बेचैन होत होते.....कॉल कट झाला आणि त्याने हसत हसत सुमनला जवळ ओढले....त्या फार्म हाऊस वर दोघेही त्या रूम मध्ये प्रणयरंग उधळून शांत झाले होते....इतक्यात विश्वासरावांचा हा कॉल आला आणि सुमितने सुमनला जवळ ओढले आणि दीर्घ चुंबन घेतले.....तिच्या नग्न देहावरून हात फिरवत फिरवत तिला जवळ ओढत सुमित आनंदाने ओरडला
"तुझा म्हातारा मेला.....मेला तुझा म्हातारा.....आता आपण त्याच्या इस्टेटचे मालक झाले आहोत....आपला प्लॅन सक्सेस झाला"
सुमन सुद्धा खूप खुश झाली....ह्या जबरदस्तीच्या पैशासाठी ठेवलेल्या नात्याच्या शेवट अखेर झाला होता....तिने सुद्धा सुमितला घट्ट मिठी मारली....
"चल चल आपण तिथे जाऊया....आपल्याला आता खूप नाटक केले पाहिजे ना?"
सुमितने तिच्या खांद्याला पकडून थोडं दूर केलं
"वेडी आहेस का ग तू??.....आधी तो म्हातारा विश्वासराव मेलाय की नाही ते चेक करून येतो ना मी....तिथे गेल्यावर कॉल करतो तुला....खूप खवाट म्हातारा आहे तो....तस तर त्याला महिन्यांपूर्वी मरायला हवं होतं पण अजून जगत राहिला....त्यामुळे मी आधी चेक करतो...चार लोकं जमवतो मग तुला कॉल करतो"
फार्म हाऊस वरून सुमितची कार विश्वासराव ह्यांच्या बंगल्याकडे निघाली....सुमितच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता....त्याने हे सगळं साध्य करायला 3 वर्षे घालवली होती....सुमित हा एक 32 वर्षीय प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ होता...दिसायला आकर्षक आणि प्रभावी होता..त्याचे ते घारे डोळे खूप सुंदर आणि बोलके होते...अनेक मुली स्वतःहून त्याला प्रपोझ करायच्या पण सुमित सुमनच्या प्रेमात आकंठ बुडालेला होता अगदी कॉलेजपासून....त्याची स्वप्ने मोठी होती.....तो डॉक्टर होता क्लिनिक सुरू होते...पण मोठे यश काही केल्या त्याच्या हाती लागत नव्हते म्हणून त्याने हा अघोरी कट रचला होता.....
एकेदिवशी विश्वासराव काळे अचानकपणे सुमितच्या दवाखान्यात आले...त्यांना बघून सुमित चपापला कारण विश्वासराव काळे म्हणजे शहराचे काय पूर्ण जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योगपती.....सुमितला आधी कळलं नाही की एवढा श्रीमंत माणूस आपल्या ह्या छोट्याश्या क्लिनिक मध्ये आला कसा?? त्यावर विश्वासराव ह्यांनी खुलासा केला की त्यांच्या एका कुण्या ड्रायव्हरला सुमितच्या उपचारामुळे बरं वाटत आहे....त्यामुळे ते इथवर आले होते....त्यांना रात्री झोप लागत नसे....सुमितने आपले उपचार सुरू केले....विश्वासराव म्हणजे कसे दिलखुलास व्यक्तिमत्व....काही क्षणात समोरच्या व्यक्तीला आपलेसे करणारे प्रभावी रसायन होते ते....काही दिवस ट्रीटमेंट चालू होती आणि विश्वासरावांना फरक सुद्धा पडला बरे.....रात्र रात्र जागा राहणारा माणूस आता रात्री शांत झोपू लागला....विश्वासराव कमालीचे खुश होते....बाकी विश्वासराव काळे ह्यांची ख्याती होती की ते एकट्याने राहणे जास्त पसंद करत होते....त्यांनी लग्नही केलं नव्हतं....आपल्या एकटेपणा मध्ये ते जाम खुश होते....पण न जाणो आज कित्येक वर्षांनी त्यांना डॉक्टर सुमितच्या रुपात कुणी चांगला मित्र भेटला होता....त्यांना सुमितचा स्वभाव खूप आवडला होता....विश्वासरावांना सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे सुमितचे डोळे सुद्धा विश्वासराव ह्यांच्यासारखेच घारे होते....त्यामुळे विश्वासराव सुमितमध्ये आपलं तरुणपण बघत होते म्हणून तर विश्वासराव आपला आलिशान बंगला सोडून सुमितच्या छोट्याश्या क्लिनिक मध्ये सारखे येत असत मनमोकळ्या गप्पा मारत असत....बोलता बोलता विश्वासराव सहज बोलून गेले की ते 1000 कोटींचे मालक आहेत....ही हजार कोटींची गोष्ट सुमितच्या मनात घर करून गेली...सुमित जेवढा हुशार होता तेवढाच कपटी सुद्धा होता......सुमित स्वतः केमिकल प्रक्रिया करून औषध बनवू शकत होता.....विश्वासराव सतत सुमितला भेटायला येत असत त्यामुळे सुमितने एक कपटी योजना आखली त्याने मदतनीस म्हणून मुद्दाम आपल्या प्रेयसीला सुमनला ठेवले....सुमन जवळपास सुमितच्या वयाची होती....ती आता विश्वासरावांच्या ट्रीटमेंट मध्ये मदत करू लागली म्हणजे हे सगळं प्रीप्लॅन होत विश्वासरावांच्या जवळ जायचं...सुमन मुद्दाम हुन विश्वासरावांची अधिक काळजी घेत असे....सुमित सतत चर्चा करून विश्वासरावांना पटवून देण्यात यशस्वी झाला की "ह्या वयात तुम्हाला एका जोडीदाराची गरज आहे जी तुमची काळजी घेईल".....विश्वासरावांना सुद्धा ही गोष्ट पटू लागली.....पण 60 व्या वर्षी जोडीदार मिळणार कुठून?? आणि हे बर दिसेल का समाजात?......ह्या विचाराने लग्नाचा विचार मागे पडला....सुमितच्या हवे ते साध्य होत नव्हते....त्यामुळे तो थोडा अस्वस्थ होता
त्यादिवशी सुमितने असे औषध तयार केले जे कुणाचेही डोके खराब करू शकत होते...म्हणजे त्याने असं काहीसं रिव्हर्स रसायन तयार केलं ज्यामुळे एखादी व्यक्ती सतत भीतीच्या सावटाखाली राहील.....उच्चरक्तदाब वाढवनारे असे काहीसे औषध होते सोबत डोके बधिर करणारे.....ट्रीटमेंटच्या नावाखाली आता विश्वासरावांना ह्या विषारी गोळ्यांचा कोर्स सुरू झाला.....हळूहळू विश्वासरावांना आता ह्या गोळ्यांचा त्रास होऊ लागला म्हणजे आता ते रात्ररात्र जागू लागले...डोक्यात इतक्या वेदना की डोकं फुटते की काय अस काहीसं वाटत होतं....आता विश्वासराव रोजच सुमितच्या दवाखान्यात जाऊ लागले....त्या काळात सुमितने त्या विषारी गोळ्यांचे डोस अजून वाढवले....आता मात्र विश्वासरावांना आजूबाजूला काळ्या आकृत्या दिसू लागल्या.....त्यांना ते घाबरू लागले....भूत भूत म्हणून ओरडू लागले..त्यांचे ते एकटक छताकडे बघणे बोट दाखवून "हा मला घेऊन जाईल" असे ओरडणे सुमित समोर मला अमानवी गोष्टी दिसत आहेत हे सांगणे त्यांची मानसिक स्थिती स्पष्ट करत होते..ह्या गोळ्यांचा असाही प्रभाव होऊ शकतो ह्याची सुमितने कल्पना सुद्धा केली नव्हती....पण आता विश्वासराव घाबरून घाबरून राहू लागले.....आपल्या वेदना असह्य झाल्या आहेत असं सुमितला बोलून दाखवू लागले....आणि सुमित परत परत त्यांना जोडीदाराविषयी सांगू लागला.....त्यांनी विश्वासरावांना एक सल्ला सुद्धा दिला तो म्हणजे सुमन शी लग्न करण्याचा कारण खूप महिने झाले सुमन विश्वासरावांची काळजी घेत होती....विश्वासराव अजूनही आढेवेढे घेत होते....पण अखेर सुमितने त्यांना जबरदस्ती तयार केले....न जाणो विश्वासराव सुद्धा वाहवत गेल्यासारखे सुमितची प्रत्येक गोष्ट मान्य करू लागले....कदाचित त्या गोळ्यांचा प्रभाव असावा....विश्वासरावांना सुद्धा वाटू लागले की खरोखर आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत कुणीतरी जोडीदार असला पाहिजे.....त्यामुळे अखेर विश्वासराव लग्नाला तयार झाले 60 वर्षाच्या व्यक्तीचे 32 वर्षीय तरुणीशी लग्न लागत होते....सुमन सुद्धा आढेवेढे घेत नाटक करत लग्नाला तयार झाली......तिने सुद्धा एक मस्त भावनिक कारण दिले की "विश्वासरावांची इतके दिवस सेवा करून तिला त्यांच्याबद्दल सहानभूती तयार झाली आहे...." अखेर विश्वासराव आणि सुमनचे लग्न कायदेशीरपणे कोर्टात आणि मंदिरात पार पडले..एक नाते पक्के झाले...आणि खरोखरच विश्वासरावांची मानसिक स्थिती सुधारू लागली म्हणजे सुमनच्या रुपात त्यांना एक चांगला जोडीदार मिळाला होता.....आणि ते सामान्य होणारच होते कारण सुमितने काही दिवस त्या विषारी औषधांचा डोस बंद केला होता.....विश्वासरावांना खात्री पटली की सुमन बरोबर लग्न करून त्यांनी कोणतीच चूक केली नाही.....ते सुमन वर अखंड प्रेमाचा वर्षाव करू लागले तिला लागेल ते आणून देऊ लागले....महागड्या वस्तू,दागदागिन्यांनी सुमनची खोली भरून गेली होती....विश्वासराव दोन्ही हातांनी सुमनवर प्रेम उधळत होते.....सुमन सुद्धा नाटकी पद्धतीने प्रतिसाद देत होती कारण तिचं प्रेम सुमित होतं....ती फक्त पैशासाठी विश्वासरावांच्या सोबत होती.....पण चोरून चोरून सुमितला भेटत होती...."त्या म्हाताऱ्या बरोबर राहणे आता असह्य होतंय....त्याचा लवकरात लवकर काटा काढ" अश्या विनवण्या सुमितला सतत करत होती....सुमितसुद्धा आता काही महिन्यांची वाट बघणार होता त्यानंतर त्या विषारी गोळ्यांचा डोस डबल करून विश्वासरावांना एका वेगळ्या आभासी जगात जबरदस्ती ढकलून त्यांचा जीव घेणार होता....आणि झालं सुद्धा असच.....सुमितने त्या गोळ्यांचा डोस डबल केला....आता मात्र विश्वासरावांना हा त्रास अधिक होऊ लागला होता....त्यांनी एकदोनदा स्वतःचे डोके आपटून घेऊन स्वतःला जखमी सुद्धा करून घेतलं होतं...विश्वासराव परत परत सुमितला विनवण्या करू लागले की मला ह्या सगळ्या त्रासातून बाहेर काढ....त्यांच्या त्या घाऱ्या डोळ्यात एक कमालीची व्याकुळता होती....पण इथे तर कुंपनच शेत खात होत....सुमित हे डोस अजून अजून तीव्र करत होता....अखेर विश्वासरावांनी सुमितला तो व्हिडिओ कॉल केलाच....त्यात विश्वासरावांच्या डोक्यातून एक रक्ताचा ओघळ वाहत होता.....अखेर ते आपलं जीवन संपवणार होते.....
कॉल कट झाल्यावर सुमित मात्र खूप आनंदात होता कार चालवत असताना भविष्यातली स्वप्ने रंगवत होता....आता विश्वासरावांच्या सगळ्या इस्टेटीची मालकीण सुमन आणि पर्यायाने सुमित होणार होता.....विश्वासरावांच्या मेंटल स्टेटस बद्दल त्याने एक स्वतंत्र फाईल बनवली होती.....जेणेकरून कुणाला संशय येणार नव्हता....त्याने विश्वासरावांच्या मेंटल स्टेटस बद्दल मुद्दाम काही प्रतिष्ठित व्यक्तींना सांगून ठेवले होते एकप्रकारे साक्षीदार पेरले होते....सगळा प्लॅन सक्सेस झाला होता.....आता जाऊन विश्वासरावांची डे*डबॉडी बघायची होती आणि ते प्रॉपर्टी पेपर्स ज्याबद्दल ते कॉल वर बोलत होते
सुमित लगबगीने विश्वासरावांच्या बंगल्यात पोहोचला....विश्वासराव एकट्याने राहणारे व्यक्ती होते त्यामुळे त्यांच्या घरात एकही नोकर नव्हता.....दार उगडेच होते.....सुमितच्या नजर विश्वासरावांना शोधत होती....तो त्यांच्या रूम मध्ये,बाथरूम मध्ये सगळीकडे शोधू लागला...त्या आलिशान बंगल्यात त्यांना शोधता शोधता सुमितची दमछाक होत होती.....गेलं कुठं हे म्हातारं??? स्वतःला प्रश्न करीत सुमित दमून सोफ्यावर बसला....एका कोपऱ्यातून मंद संगीताचा आवाज येत होता.....किशोर कुमार ह्यांची गाणी चालू होती.....सुमित ताडकन उठला आणि त्या आवाजाचा पाठलाग करू लागला....मंद आवाज त्याला किचन मध्ये घेऊन आला....किचनचे एक सिक्रेट असे दार उघडे होते तिथून त्या गाण्याचा आवाज येत होता.....कपाट सदृश्य ते दार उघडे होते....बंद असते तर कुणाला कळलं सुद्धा नसत की ह्या कपाटाच्या मागे दरवाजा आहे....सुमित समजून चुकला की ह्या म्हाताऱ्याने ह्या सिक्रेट रूम मध्ये स्वतःला संपवलं.....सुमित हळूहळू हळूहळू पुढे जाऊ लागला....आधुनिक डिजिटल लाईट्सने आता त्याची साथ सोडली एक मंद उजेड त्याला रस्ता दाखवत होता....जुन्या लाईट्स च्या उजेडात समोर एक भिंत दिसत होती.....सुमित हळूहळू चालू लागला....त्या भिंतीपासून आत वळल्यावर तो एका मोठ्या खोलीत उभा होता....किशोर कुमार ह्यांची गाणी वातावरणात घुमत होती....सुमित चौफेर नजर फिरवत होता....आलिशान बंगल्याच्या तुलनेत ही रूम भलतीच कोंदट आणि गच्च भरल्यासारखी वाटत होती....मंद बल्बचा उजेड होता त्या उजेडात समोरच्या भिंतीवर काही ब्लॅक अँड व्हाइट मधले फोटो लावले होते....ते फोटो रोखून सुमितकडे बघत होते....सुमित सगळीकडे नजर मारत होता.....समोर खाली एक मोठा जवळपास 10 बाय 10 ची दगडी फारशी होती.....त्या फरशीवर एक वर्तुळ कोरले होते...एकप्रकारे दगडावर वर्तुळाकार खाच खोदली होते....त्या वर्तुळाच्या बरोबर मधे सुमितचा आणि विश्वासरावांचा फोटो एकत्र ठेवला होता....त्या वर्तुळाच्या बरोबर समोर एक लालसर दगड दिसत होता....बाजूला एक चमकदार आणि नक्षीदार चाकू ठेवला होता.....दगडाच्या खाली सुमनचा म्हणजे विश्वासरावांच्या पत्नीचा फोटो ठेवला होता....एखाद्या अघोरी तंत्र विद्येची तयारी केली असावी असं भासत होतं...आता मात्र सुमित थोडा सावध झाला.....त्या कोंदट वातावरणात त्याला थोडा घाम फुटला त्याचे डोळे तेव्हा विस्फारले जेव्हा त्याची नजर वरती गेली.....मानवी कवट्यांचे झुंबर बरोबर त्याच्या डोक्यावरती होते.....असंख्य मानवी कवट्या हळूहळू हेलकावे घेत होत्या..त्यांचा एकमेकांवर आपटन्याने खट खट खट आवाज येत होता...काहीतरी भयानक प्रकार होता हा.....त्या निघेटिव्ह वातावरणात सुमितच्या मनाचा थरकाप उडाला होता.....सुमित मागे वळणार इतक्यात त्याची नजर त्यांच्या पायाकडे गेली....त्याचे पाय त्याला दिसत नव्हते त्यावर आणि आजूबाजूच्या एक गडद काळा धूर साचलेला होता.....जणू त्या धुरातून त्याचे पाय कुणी घट्ट पकडले असावेत....त्याला आता हलताही येत नव्हते....सुमित धापा टाकत इकडे तिकडे बघू लागला....कवट्यांचे झुंबर हलू लागले....त्या कवट्या एकमेकांवर आपटू लागल्या....त्या आवाजाच्या दिशेने सुमितने वरती बघितले त्याच बरोबर एक काळ्या धुराचा लोट सुमितच्या नाकातोंडात जबरदस्ती शिरत होता....सुमितचे हातपाय थरथरत होते....त्याला आता हलताही येत नव्हतं....कुणीतरी घट्ट जखडून ठेवल्यासारख त्याला वाटत होतं.....सुमित एखाद्या मूर्तीसारखा स्तब्ध झाला होता....त्या काळ्या धुराने त्याला आतून जखडून ठेवले होते......एक विशिष्ट सुईईई असा आवाज कधी कानाच्या मागून कधी डोक्यावरून जाऊ लागला......सुमित अगदीच अंग आखडून उभा होता.....किशोर कुमार साहेबांचे गाणे अखंड वाजत होते....त्या गाण्यातील एका कडव्याला धरून एक परिचित आवाज एका अंधाऱ्या कोपऱ्यातुन बाहेर आला
"जिंदगी एक सफर है सुहाना....यहां कल क्या हो किसने जाना........"
विश्वासराव त्या अंधाऱ्या धुरातून बाहेर आले.....सुमितचे फक्त डोळे हलत होते....ते मोठे करून तो हे जे घडत आहे त्याचा विरोध करत होता.....समोरच्या त्या दगडावर विश्वासराव बसले.....ती एकप्रकारे गुहाच होती त्यात ह्या कोंदट वातावरणाने विश्वासरावांना प्रचंड घाम फुटला होता....त्यामुळे त्यांनी आपला शर्ट काढला.....त्याची छाती जवळपास काळी-निळी झाली होती....मोठमोठ्या फोड्या त्यावर उठल्या होत्या....त्यांना हातांनी खाजवत ते सुमितकडे बघू लागले....त्यांचा आवाज ह्या वातावरणात धीरगंभीर झाला होता....आता ते हसतखेळत राहणारे विश्वासराव वाटत नव्हते.....चेहऱ्यावर खुनशी भाव आणि मधेच भाव बदलून स्मितहास्य करत ते सुमितकडे बघत होते.....आता इथे ऐकायला एक आणि बोलायला एक असे दोन व्यक्ती होते.....विश्वासराव सुमितकडे बघत ती छातीवरची जखम खाजवत होते....त्याचा एक तो खर खर खर असा आवाज येत होता....जणू जाड कातडीवर कुणी तीक्ष्ण नखांनी खरवडत असावे
"हे सगळं तुझ्या त्या औषधामुळे झालं आहे.....नाहीतर अजून 5-6 वर्षे मी आरामात जगलो असतो....पण स्वार्थ हा असा राक्षस आहे ना की ज्याच्यावर तो हावी झाला त्याला आपला गुलाम करवूनच सोडतो.....तुला पैशाची लालसा आहे आणि मला...........
चल सोड.....माझं एक तत्व आहे मारायच्या आधी मी समोरच्याला सगळी हकीकत सांगून टाकतो....तू मला ना हवा होतास अगदी 4 वर्षांपासून तुझ्यावर पाळत ठेवून होतो....म्हणजे मला असं कुणाच्याही देहावर ताबा मिळवता येत नाही.....त्याची निवड ह्या तुला जखडल्या आहेत ना त्या काळ्या शक्ती करतात....आणि त्यांना तुला निवडलं आहे.....बाकी एकदा सिद्ध केलं की ह्या शक्ती आयुष्यभर साथ देतात....माझी साथ ह्या काळ्या शक्तींनी गेली 250 वर्ष सोडली नाही.....अमर राहणे किती कमालीचे असते हे तुला नाही कळायचं......एक साधू ते विलासी पुरुष हा प्रवास खरोखरच कमालीचा होता......ह्या काळ्या शक्तींची पूजा करत करत मी इथवर आलो आहे....आपल्या आवडत्या व्यक्तीची ब*ळी देऊन ह्या काळ्या शक्ती जागृत ठेवता येतात.....आपण ह्या शक्तींशी किती प्रामाणिक आहोत ही परीक्षा बघत असतील कदाचित.....आणि मी ह्या परीक्षेत सदैव यशस्वी झालो आहे. ... ..वर हे झुंबर बघत आहेस ना.....ह्यात कुणी माझी आई आहे कुणी वडील कुणी नातेवाईक कुणी मित्र सगळे सगळे माझ्या जवळचे कुणी माझे अत्यंत प्रिय.....पण.......हम्मम्म......आता पत्नी सुद्धा.......तुम्हा दोघांना काय वाटत होतं की म्हातारा सहज तुमच्या जाळ्यात अडकत आहे.....सगळं नाटकं होतं....खरा शिकारी तर मी आहे....तुमच्या सगळ्या कल्पना ह्या शक्ती आधीच माझ्या कानात येऊन सांगत होत्या.....तुमची सगळी लफडी मला माहित आहेत....तरीही मी सुमनवर जीवापाड प्रेम केलं....ते....ते ह्या क्षणासाठी......तुझा हा देह आता माझा होणार आहे......मी नव्याने उपभोग घ्यायला सिद्ध होणार आहे....."
हे सगळं ऐकून सुमितच्या डोळ्यातून पाणी येत होतं.....तो डोळ्यांची बुबुळे फिरवून विरोध करत होता.....विश्वासराव त्या दगडावरून उठून सुमित समोर आले.....ते तोंडात कसले तरी मंत्र पुटपुटत होते....त्याचे ते कंपन पूर्ण वातावरणात पसरले होते.....विश्वासराव जसजसे जवळ येत होते तेव्हा त्या काळ्या सावल्यानी सुमितला हवेत उचलले तो 8 फुटावर हवेत तरंगत होता.....खालून विश्वासराव मंत्र म्हणत होते तश्या त्या काळ्या धुराचा फास सुमितच्या देहभोवती आवळत चालला होता....सुमितचे डोळे जडजड होत होते.....अंग थरथरत होते....फास घट्ट आवळत होता.....विश्वासराव वर मान करून एकटक मंत्र म्हणत होते......अखेर सुमितचा तडफडता देह शांत झाला तो खाली कोसळला.....सुमित ठार झाला होता.....त्याचा मृतदेह खाली कोसळला होता. ...तशीही त्या गडद काळ्या शक्ती त्या मृतदेहाला घेरून होत्या.....त्याच्या नाकातोंडाजवळ घिरट्या घालत होत्या.....विश्वासराव अजूनही मंत्र म्हणत होते....अचानक सुमितच्या देहातून कसलासा पांढरा चमकदार धूर निघताना दिसत होता.....एखाद्या ब्रेडच्या तुकड्यावर पाण्यातील माश्यानी एकत्र चौफेर हल्ला करावा तश्या त्या काळ्या शक्ती सुमितच्या देहातून मुक्त होऊ पाहणारी त्याची आत्मा ओढून ओढून खाऊ लागल्या होत्या.....ते बघून विश्वासराव हसले....त्यांना आता एक शुद्ध देह समोर दिसत होता.....त्यांनी समोरच्या दगडावरचा तो चांदीचा चमकदार चाकू हातात घेतला आणि सुमितच्या मृतदेहाच्या हातावर त्यांनी तो चाकू फिरवला सुमितचे र*क्त त्या चाकूला लागले होते....तो र*क्ताळलेला चाकू त्यांनी आपल्या गळ्यावर सररकन फिरवला.....र*क्ताच्या चिळकांड्या उडू लागल्या....पण विश्वासरावांना जराही वेदना होत नव्हती....त्यांच्यासाठी तर हा आनंदाचा क्षण होता.....हे फक्त एक बॉडी "ट्रान्सफर" होते....एका सुदृढ तरुण देहात.....विश्वासराव जमिनीवर कोसळले होते.....रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.....त्यांच्या देहातून सुद्धा तो चमकदार प्रकाशमान धूर बाहेर पडला....पण तो धूर आता सुमितच्या तोंडावाटे शरीरात प्रवेश करत होता........सुमितचा मृ*तदेह आता हालचाल करू लागला....त्या काळ्या शक्ती सुमितच्या देहभोवती फिरून एका विशिष्ट मंत्राचे चक्र बनवत होत्या.....थरथरता देह अखेर शांत झाला....सुमितने डोळे उघडले.....एकवार आपल्या तरुण देहाकडे बघितले....बाजूला आपलेच शरीर विश्वासरावांच्या रुपात र*क्ताच्या थारोळ्यात पडले होते....त्याकडे बघून सुमित म्हणजे नवीन देह धारण केलेले विश्वासराव.....नवीन देह बघून जोरात हसून आनंद साजरा करत होते.....विश्वासराव आपल्या देहावरचे सगळे कपडे काढत होते पूर्ण नग्न होऊन स्वतःला न्याहाळत होते.....सुमितला निवडून कोणती चूक केली नाही ह्याचा एक वेगळा अभिमान बाळगत ते आपल्या नवीन देहावर हात फिरवत होते.....स्वतःच्या आनंदाला सावरत आता त्यांना मुख्य कार्य पूर्ण करायचे होते......सुमितचा देह धारण केलेल्या विश्वासरावांनी सुमनला फोन लावला.....आपलं काम पूर्ण झालं आहे तू ताबडतोब तुझ्या घरी ये अस सांगितलं......समोरच्या दगडावर बसून अघोरी मंत्र पुटपुटत विश्वासराव बसले होते....त्यांच्या प्रत्येक मंत्रांनी त्या खोलीत असलेली काळी शक्ती त्यांच्या बाजूला गोळा झाली होती....पूर्ण खोली त्या काळ्या धुराने गच्च भरून गेली होती.....अचानक दारावरची बेल वाजली आणि विश्वासराव भानावर आले....लगबगीने ते दरवाज्याच्या दिशेने जाऊ लागले.....त्यांनी दरवाजा उघडला आणि सुमन त्यांना बघून हादरलीच.....कारण तिच्या समोर सुमित नग्न उभा होता......पण त्याच्या चेहऱ्यावर थोडे उग्र भाव होते.....सुमितला असे बघून सुमन गोंधळली
अरे सुमित काय प्रकार आहे हा.......????
एकही शब्द न बोलता त्याने सुमनला जवळ ओढले आणि चुंबनाचा वर्षाव सुरू केला.....सुमनला काहीच कळत नव्हतं....कारण आत विश्वासरावांची डे*डबॉडी पडली असावी आणि हा सुमित अस काय करतोय हे तिला कळत नव्हतं....ती सुमितला दूर करत होती पण सुमित तिच्यावर हावी झाला होता.....जबरदस्ती उपभोग घेत होता.....समोरच्या सोफ्यावरचा सुमनचा जबरदस्ती उपभोग घेऊन सुमित म्हणाला
"ह्या जवानीचा जोश काही वेगळाच असतो"
सुमनला ह्या वाक्याचा अर्थ लागला नव्हता....ती प्रश्नार्थी नजरेने सुमितकडे बघत होती....इतक्यात सुमितने तिला परत जवळ खेचले आणि चुंबन घेतले....हे त्याचे शेवटचे चुंबन होते.....विश्वासरावांनी आपल्या तोंडातून काही काळ्या शक्ती सुमनच्या तोंडात सोडल्या त्याबरोबर ती जाग्यावर स्तब्ध होऊन एखाद्या काठी सारखी सरळ रेषेत जमिनीवर कोसळली.....तिचे फक्त डोळेच हलत होते....त्या तळघरातील खोलीतून कसले तरी संकेत येत होते....त्यामुळे लगबगीने विश्वासरावांची सुमनचा पाय पकडला आणि आपल्या शक्तीने तिला फरफटत त्या खोलीत ओढून आणू लागले....फरफटत ओढून आणून त्यांनी सुमनला त्या मोठ्या दगडावर झोपवले.....कर्णकर्कश मंत्र वातावरणात घुमत होते.....ठरल्याप्रमाणे आपल्या आवडत्या व्यक्तीचा ब*ळी देऊन काळ्या शक्तींना प्रसन्न करवून घ्यायचे होते....एकप्रकारे कर्कश ढोलचा आवाज येत होता....विश्वासरावांनी समोरची चांदीचा चाकू उचलला आणि सुमनच्या गळ्यावर फिरवला.....सुमन आता तडफडू लागली होती....तिच्या छातीवर हात दाबून तिचं ते तडफडवणे थांबवत विश्वासराव मंत्र म्हणत होते....मध्ये हसत होते.....दगडावरून र*क्त ओघळत होत....ते र*क्त सुमनच्या फोटोवरून वाहत त्या दगडी गोलाकार खाचित पसरत होते.....सुमनच्या र*क्ताने ते वर्तुळ जेव्हा पूर्ण झाले तेव्हा विश्वासरावांचा त्या वर्तुळातील फोटो जळू लागला....ह्याचा अर्थ स्पष्ट होता की काळ्या शक्ती विश्वासरावांच्यावर खुश होत्या आणि त्यांनी सुमितचा तरुण देह त्यांना देऊ केला होता हे चक्र गेल्या 250 वर्षांपासून असच सुरू होते...एका वेगळ्या शक्तीचा अनुभव विश्वासरावांना झाला....खंगलेला वृद्ध देह गेल्याने आता त्यांना खूप जोश आला होता.....सुमनच्या देहातून र*क्ताचा एक अन एक थेंब वाहून गेला होता.....विश्वासरावांनी तिचे शीर धडापासून वेगळे केले.....कारण त्या वरच्या झुंबराची अजून एक प्रिय व्यक्तीची जागा भरायची होती.....
शीर नसलेल्या सुमनचा देह आणि आपला वृद्ध देह गाडीत घालून ते एका सुमसान जागी पोहोचले...आपल्याच वृद्ध मृत शरीराच्या हातात एक चाकू दिला....बाजूला शीर नसलेला सुमनचा देह.....दुसऱ्या दिवशी केस फाईल झाली की "प्रसिद्ध उद्योगपती विश्वासरावांनी पत्नीचा खू*न करून स्वतःलाही संपवले"
दुसऱ्या दिवशी ही बातमी वाचून तरुण विश्वासराव भलतेच खुश होऊन हसू लागले.....त्यांची आता ह्या तरुण देहाबरोबर एक नवीन सुरवात होती.....अमाप पैश्याच्या जीवावर आपली जुनी ओळख पुसून आता विश्वासराव सुमितच्या नावे एका दुसऱ्या जागी आरामात आपले तारुण्य साजरे करू शकणार होते..............(समाप्त)

(ही कथा कशी वाटली???ह्याबद्दल आपले बहुमूल्य अभिप्राय कमेंट बॉक्स मध्ये जरूर नोंदवा......धन्यवाद

)


