#कथा :- महरूम
#लेखक :- चेतन साळकर
#भाग :- ४
#Horrorostory tube present
#© सर्व हक्क लेखकाकडे बांधील आहेत
सूचना :-
• कथेचे एकूण "10" भाग असतील.
• कथा रोज "संध्याकाळी 7" वाजता पोस्ट होईल.
• कथेत कुठल्याही धर्माचा अवमान झालेला नसेल.
कथेचा भाग - ३ ची लिंक खाली दिलेली आहे
https://marathighoststories.blogspot.com/2020/12/blog-post_13.html
विनिता ने तो कागद वाचला आणि आदित्य ने सुध्दा तो चाळला. तेव्हा दोघांनाही अचानक काहीतरी आठवलं आणि पुढे . . .
पुढे दोघांनाही काहीतरी आठवले. विनिता धावत वर गेली आणि वडिलांचा फोटो घेऊन आली. आदित्य ने देखील तो फोटो हातात घेतला आणि उलटा केला. तेव्हा त्यावर लिहिलेल्या अक्षरांचे अर्थ लावू लागले. तेव्हा दोघंही समजून आले की, त्यावर जी अक्षरं लिहिलेली होती ती तोच पत्ता होता जो त्या फाईल मध्ये असलेल्या कागदावर होता. अस्पष्ट दिसत असलेल्या त्या अक्षरांमध्ये खाली पिनकोड नंबर होता - ४१०२०१. जश्याच्या तसा नंबर त्या कागदावर होता. आदित्य ने इंटरनेट वर सर्च करुन तो नंबर कुठला आहे ते एकदा व्यवस्थित लोकेट करून घेतले. तर तो नंबर होता "कर्जत" चा. दोघांनाही काही कळत नव्हते , फक्त एवढेच कळत होते की, ह्या दोन्ही गोष्टींचा काही संदर्भ असावा. अंदाज फक्त ते काढू शकत होते. त्यापलीकडे काही नाही. दोघांनी खूप विचारविनिमय केला आणि निर्णया अंती हे ठरवलं की, आपण तिथे जायचं. असही फाईल चे काम करण्यासाठी तिथे जावेच लागणार होते. "मिस्टर शोफी" यांची हस्ताक्षर घेतली की वडिलांची सगळी प्रॉपर्टी विनिता च्या नावे होणार होती. भावंड नसल्यामुळे जावई आणि मुलीने घेतलेला तो निर्णय होता. ते सोडून त्यांचं कोणीच नव्हतं. आई तर कधीच सोडून गेली होती. दोघांनी निर्णय घेतला आणि ठरवले की कर्जत ला जायचे. त्याप्रमाणे ते दुसऱ्या दिवशी निघणार होते. . . . म्हणून ते दोघेही जाऊन बेडरूम मध्ये पडले.. . . .झोपताना तिने मोबाईल मध्ये आलेला मेसेज वाचला तर , कोर्टातून वकिलाचा मेसेज होता की, आम्ही मुंबई ला जाताना तुमच्या दरवाज्यात फाईल ठेऊन जाऊ. तो तिने आदित्य ला दाखवला. दोघांनी मनोमनी काहीतरी ठरवले आणि झोपले . . . .
सकाळ झाली. थंड वातावरणात दोघांनाही जाग आली. दोघेही फ्रेश झाले. दिवस असाच गेला. दोघांनी तिकडे राहण्यासाठी कपडे वैगरे बांधून घेतले. बॅग बांधून झाल्या. गाडीने जाणार म्हटल्यावर तस काही टेंशन नव्हते. झाला दिवस गेला आणि संध्याकाळचे चार वाजले. दोघांनी घर सोडले आणि गाडीतून निघाले. दोघांच्या मनात अनेक प्रश्न तर होते पण उत्सुकता सुध्दा होती की, नेमकं त्या दोन गोष्टींचा संबंध काय असेल ? वारा भर वेगात चालला होता, वेग धरलेल्या गाडीने आगेकूच करीत कर्जत गाठायच मनात ठाम केलं होतं. बघता बघता काळोख दाटून आला. संध्याकाळ भरून रात्र चढायला लागली. काळोखाने आपले साम्राज्य पसरवले होते. गाडी आपल्या आवेगात चालली होती. अंतर कापत ती जंगलातून वाट काढीत होती. गाडीच्या वेगा बरोबर अनेक स्वप्न , प्रश्न देखील मनाच्या चौथऱ्यावर पळत होते. गाडी चालवत असताना आदित्यला देखील अनेक प्रश्नांनी पछाडले होते. अस करता करता काही वेळाने आदित्य ने गाडी थांबवली. तो गुगल मॅप चेक करू लागला तर तो बरोब्बर आहे त्या जागेवर पोहोचला होता. रात्र चढली होती. रात्रीचे ९ वाजले होते.
मिट्ट अंधार पसरला होता. चहूबाजूने फक्त काळोखाचे सावट होते. जराही आवाज नव्हता. आजूबाजूला एकही वस्तू किंवा घर - लॉज काहीच दिसत नव्हते. जंगलाच्या मध्यभागी येऊन ते थांबले होते. गाडीची पुढची लाईट त्याने चालूच ठेवली होती. तेवढाच काय तो प्रकाश समोरच्या रस्त्यावर पडला होता, बाकी बाजूला फक्त अंधार होता. काय करावे ? काय सुचेना ? इथे तर आलोय ,पण पुढे काय ? मी. शोफी कसे भेटणार ? त्यांचा नंबर दिला होता तो फोन लावला तर त्यांचा फोन लागत नव्हता. काय करावे ? दोघांनाही भीती वाटू लागली होती कारण जंगलाचा मध्यभाग ,दोन्ही बाजूने घनदाट झाडी , एखाद जनावर आल तर काय ? म्हणून ती दोघंही गाडीत जाऊन बसली. इतक्यात बाजूच्या गर्द झाडीतून अचानक हालचाल जाणवली. दोघेही स्तब्ध झाले. गाडीची लाईट बंद केली आणि जराही हालचाल न करता बसून राहिले. तसे हालचाल वाढली आणि बघता बघता मोठमोठ्याने ती झाडे हलायला लागली. विनिता घाबरली. काय करावे ? म्हणून आदित्य ने गाडी चालू केली. रिव्हर्स गेअर टाकून पाठी घेऊन पुन्हा वळवून त्याने सुसाट गाडी पळवली. भयंकर गोष्ट म्हणजे जशी त्यांनी गाडी भर वेगाने चालली होती तशीच बाजूची झाडी देखील हलत होती. कोणीतरी अगदी त्याच वेगाने बाजूने पळत असावे असा भास होता तो. गाडी पळते आहे , बाजूला झाडांची आदळआपट चालूच होती. रात्र भयानक आवेगात होती, भयानक वातावरण , कडाक्याची थंडी , किर्र काळोख आणि त्यात तो चाललेला प्रकार बघून दोघांच्याही मनात धडकी भरली होती. गाडीचा वेग इतका सुसाट होता की नजर थांबत नव्हती. गाडीने आणखीन वेग घेतला , रस्त्यांवर खडी होती ती वेगाने बाजूला होऊ लागली. आदित्य ने वेगावरचे नियंत्रण सोडले होते. त्याला फक्त त्या भयानक घटनेतून बाहेर पडायचे होते. अस करता करता जवळ जवळ दोन किलोमीटर गेल्यावर तो प्रकार बंद झाला पण गाडी पुन्हा स्थिर होण्यासाठी आदित्यने बाजूला घ्यायला काढली. बाजूलाच मोठा काळा दगड होता, अर्थात अंधारात दिसला नाही. त्यावर गाडीचे पुढेच चाक आपटले आणि गाडी बाजूला ढकलली गेली. जोरात झटका गाडीला बसला. दोघांनाही तो फटका बसला. कमरेत मार बसला. तेव्हा त्याने गाडी नॉर्मल मोड ला आणली. दोघे ही अवाक् झाले होते. असला प्रकार दोघांनीही पहिल्यांदाच अनुभवला होता.
गाडी थांबली पण त्यांची होरपळ थांबली नव्हती. शांत एकट्या जंगलात अपरात्री निर्जन स्थळी थांबवलेली कार शेवटी काही झालं तरी धोक्याच आहे. आदित्यला कळत नव्हते. त्यांनी पुन्हा मी शोफी ह्यांना फोन लावला. तेव्हा मात्र फोन लागला. समोरून ते बोलू लागले.
शोफी :- सरळ आओ. .. . !
आदित्य :- आम्ही आधीच २ किमी मागे आहोत. कुठे यायचं तो पत्ता द्या.
शोफी :- पत्ता आपको दिला होता ना !
आदित्य :- पत्त्या प्रमाणे इथे तर आलो, पण तुम्ही कुठे भेटणार हे नाही सांगितले त्या पत्त्यात ?
शोफी :- 2 किमी पुढे या मे हु यहापे !
फोन कट करून आदित्य वैतागून विनिता ला म्हणाला "काय बोलता येत नाही धड त्यांना , धड हिंदी ना धड मराठी". विनिता चे लक्ष मात्र एका वेगळ्याच दृश्याने वेधले होते. एका झाडावर एक कावळा बसला होता. इतक्या भयाण रात्री एक कावळा असा फांदीवर येऊन एकटक तिच्याकडे बघत होता. त्याच्या नजरेत मात्र वेगळी भयानकता होती. विनिता ला त्याच्या नजरेत नजर देता येत नव्हती. आदित्य पाठोपाठ ती देखील गाडीत बसली आणि दोघांनी गाडी पळवली, पुन्हा दोन किमी मागे. पुन्हा मागे जाताना मनात होणारी उलथापालथ मात्र बघण्यासारखी होती. थोड्यावेळापूर्वी जे काही त्या गाडीच्या दुतर्फा असलेल्या जंगलात घडल होतं ते पुन्हा आठवून दोघांनाही मनात भीतीचे सावट निर्माण झाले होते. कसे तरी करून त्यांनी दोन किमी अंतर पार केले आणि त्याची गाडी पुन्हा त्याच जागेवर येऊन थांबली जिथे आधी ते उभे होते. . . .
बरोब्बर गाडीच्या समोर आणि रस्त्याच्या मधोमध एक व्यक्ती उभा होता. पहिल्यांदा त्याचा अवतार बघून आदित्य आणि विनिता दोघांनाही भीती वाटली. नंतर जसं त्यांनी गाडी जवळ नेली तेव्हा कळले की ते मी. शोफी होते. पोशाख एकंदरीत वकीलाचाच होता. कोट ,मध्ये कुठली मळकट शी टाय , बुट असा. त्यांना बघून दोघेही खाली उतरले आणि त्यांना भेटले. .. तिघांच्याही भेटीगाठी झाल्या.
आदित्य :- चला , आता कुठे जायचे ? रात्र पण झालीय ?
शोफी :- इकडेच बगल में मेरा घर आहे. उधर जाऊया !
( तिघे ही गाडीत बसले आणि निघाले )
आदित्य :- तुम्ही मध्येच हिंदी मध्येच मराठी बोलता ? का ?
शोफी :- मेरा वडील , मुसलमान होता ना !!
तिघेही बोलत बोलत जागेवर पोहोचत होते. शोफी जरा विचित्र होता ते दोघांनाही जाणवले होते. तो मध्येच हसत बोलायचा , मध्येच थांबायचा. रात्रीचा १० वाजला होता. ते तिघे ही पोहोचले एका गर्द झाडांच्या गर्दीत असलेल्या निर्जन जागी स्थित झालेल्या शोफी यांच्या घरात. चारही बाजूंनी गच्च जंगल, वाऱ्याची झुळूक येऊन ही पान हलणार नाही इतकी घनदाट अरण्याची जागा , जिथे फार कमी सूर्याची किरणे पोहोचत होती अशी जागा. रात्र वाढली होती. त्या एवढ्याश्या घरात त्या तिघांना थांबावे लागणार होते. घर बघून तर विनिता आणि आदित्य दोघे ही अवाक् झाले. अश्या भेसूर , भयानक , एकांतवासात असणाऱ्या त्या जागेवर उभा असलेल्या त्या वास्तूत एक क्षण ही दोघांना थांबवत नव्हते पण काय करणार कोर्टाचे काम होते. मागेपुढे बघून चालणार नव्हते. झाले ते तिघे ही घरात जायला निघाले . . इतक्यात जिथे गाडी थांबवली होती त्या झाडाच्या मागून वनराईतून काहीतरी हालचाल झाली. ती फक्त विनिता ने ऐकली. आदित्य आणि शोफी बोलण्यात असल्याने त्यांना नाही ऐकायला आली. ती दोघं ही घरात प्रवेशकर्ती झाली. विनिता मात्र बाहेर थबकली. मागे फिरली आणि वेध घेऊ लागली. गाडी जवळ गेली. त्या झाडात नेमके काय आहे ह्याचा अंदाज लावू लागली. तिला त्या रात्रीच्या अंधारात अगदी पुसटसे असे चार पाय दिसले . .अंगाची लाही झाली , घाम फुटला , डोळ्यात भीती स्पष्ट दाटून आली , हातात कंप सुटला, भेदरट आवाज होऊन घशातुन बाहेर येत नव्हता. ते पाहिल्याबरोबर ती एक क्षण देखील थांबली नाही , पायांना थारा न देता सरळ धावत सुटली आणि घरात जायला पायरी चढणार इतक्यात तिला मागून पुन्हा हालचाल किंवा आवाज ऐकू आला.
ती मागे वळली आणि तिने जे पाहिले त्याने ती तिथेच मटकन खाली बसली. . . .आणि . . . . . !!
भाग - ५ पुढील टप्प्यातhttps://marathighoststories.blogspot.com/2020/12/blog-post_64.html