#कथा :- महरूम
#लेखक :- चेतन साळकर#भाग :- ३
#Horrorostory tube present
#© सर्व हक्क लेखकाकडे बांधील आहेत
सूचना :-
• कथेचे एकूण "10" भाग असतील.
• कथा रोज "संध्याकाळी 7" वाजता पोस्ट होईल.
• कथेत कुठल्याही धर्माचा अवमान झालेला नसेल.
कथेचा भाग - २ ची लिंक खाली दिलेली आहे
अचानक काहीतरी धाडकनsss.. पडल्याचा आवाज झाला. . . . .
विनिता फिरली आणि मागे वळून पाहिले तर तिला विचित्र पणाचा धक्का बसला . . . . तिने पाहिले तर कावळा खिडकीवर नव्हता. त्या खिडकी खाली एक फोटो पडून फुटला होता. विनिता उठली आणि खिडकी जवळ गेली. तिने पाहिले तर तिच्या वडिलांचा फोटो पडला होता. काचेचे तुकडे झाले होते आणि आतला वडिलांचा फोटो बाजूला पडला होता. विनिता ने तो उचलला. हातात घेतला. वडिलांच्या आठवणीने डोक्यात थेंब जमा झाले. तिने फोटो उलटा सुलटा करून पाहिला तर तिला आश्चर्य वाटले. त्या फोटोमागे काहीतरी अस्पष्ट शब्दात अक्षरे लिहिलेली होती. तिने ती अक्षरे वाचायचा प्रयत्न केला पण निष्फळ ! एकतर त्या अंधारात काही समजत नव्हते. लाईट लावली तर आदित्य उठेल. म्हणून चंद्राच्या प्रकाशातच काही दिसतंय का ते पाहू लागली. शेवटी काही उमगुन न आल्याने तिने तो फोटो असच टेबलावर ठेवला , काचा भरून टाकून दिल्या. बेडवर गेली. झोपायचा प्रयत्न करू लागली. एकेक घडलेल्या अश्या घटनांनी तिला गोंधळून टाकले होते. तिने झोपायचा यत्न केला.
रात्रीचे साधारण २.३० वाजले होते. विनिता गाढ झोपेत होती. तिला स्वप्न पडले. पुन्हा तोच गोंधळ ,तोच थरार , तेच स्वप्न. "ती घनदाट रानातून पळत आहे, संध्याकाळची वेळ आहे , पाठीमागून कोणीतरी धावत आहे. ती पुढे आणि मागे कोणीतरी. अस करता करता ती एका मोडक्या घरात शिरली. जराही हालचाल न करता तशीच लपून राहिली. काही क्षण असेच गेले. अचानक मग घराच्या समोरील दरवाज्यासमोर ती कोणी अज्ञात व्यक्ती उभी राहिली. स्पष्ट चेहरा न दिसता अंधुक अंधुक दिसत होते. विनिता घाबरली आणि पळत सुटली. पुन्हा भर वेगाने पळत पळत ती बाहेर मुख्य रस्त्यावर आली. त्या रानाला मध्यावर तो मुख्य रस्ता होता. ती त्या रस्त्यावर उभी राहिली. इकडेतिकडे नजर फिरवली आणि तिला समोरच्या डोंगरात दिसले एक चित्र. खालून उंच डोंगरात पायऱ्यांची वाट दिसली आणि वर उंचावर टेकडीवर होतं एक मंदिर. अंधुक दिसले पण काहीतरी कळस असल्यासारखे वाटले. इतक्यात त्या रस्त्यावर ती व्यक्ती आली आणि विनिता वर हल्ला केला". इतक्यात विनिता झोपेतून दचकून जागी झाली. . . .कुठल्या प्रकारचे ते स्वप्न होते. का असे दिसले असावे ? आदित्यला त्रास नको म्हणून ती बऱ्याच गोष्टी लपवत होती. अनेक प्रश्नांचे वादळ तिच्या मनात घोंगावत होते. रात्र वाढीस लागली. पहाटेकडे प्रस्थान करू लागली. त्याच वातावरणात तिला झोप लागली. ती खोल निद्रेत गेली आणि बघता बघता सकाळ झाली.
सकाळ झाली. तसे दोघे ही लवकर उठणारे होते पण एकंदरीत रात्री झालेल्या प्रकाराने विनिता ला उशिरा पर्यंत जाग नाही आली आणि आदित्य मात्र झोप पूर्ण झाल्यामुळे नेहमीच्या वेळी उठला. आदित्य ने देखील तिला झोप पूर्ण करू दिली .तोपर्यंत तो स्वतः आवरत होता. त्याने दरवाजा उघडला. त्याला दारातच एक फाईल ठेवलेली दिसली. ती चमकला. हा काय प्रकार आहे ? ही काय पद्धत ? कसली फाईल ? म्हणून त्याने ती फाईल उचलली. त्याने पाहिलं तर ती फाईल विनीताच्या वडिलांच्या प्रॉपर्टी ची होती जी दोन दिवसांपूर्वी तिने वकिलांना दिली होती. इतक्यात विनिता उठली. ती वरून खाली आली. तिच्या चेहऱ्यावरचे चिंतेचे भाव पाहून नक्कीच काहीतरी झालंय , असा अंदाज आदित्यने बांधला. त्याने तिला काही काम करू दिले नाही. स्वतः चहा बनवला, गरमागरम करून दोघांनी घेतला , नाष्टा त्याने बनवला आणि तिला ही प्रेमाने दिला.
दोघे जी बेडरूम मध्ये बसून नाष्टाचा आनंद घेत होते. तेवढ्यात विनिता ने काल झालेला प्रकार सांगितला आणि वडिलांचा फोटो देखील दाखवला. आदित्य ने तो फोटो घेतला आणि पाठीमागचा मजकूर काय आहे ते पाहू लागला. त्यालाही तो काय कळला नाही. शेवटी त्याने तो बाजूला ठेवला आणि नाष्टा आटपून तो जायला निघाला. तेव्हा त्याने दरवाज्यात ठेवलेल्या फाईल बद्दल विनिता ला सांगितले. विनिता ला देखील राग आला ही कोणती पद्धत फाईल आणून द्यायची ? तिने ती फाईल बाजूला ठेवली आणि आदित्यला सोडायला दरवाज्याजवळ आली. आदित्य बाहेर पडला आणि गाडीत बसून निघून देखील गेला. आत पुन्हा दिवसभर एकटेपणा ने काढायचं विनिता च्या जीवावर आले होते. घडणाऱ्या भयानक हालचाली तिला सहन होत नव्हत्या. दिवस असाच गेला आणि रात्र झाली. वर बेडरूम मध्ये विनिता वाचत बसली होती. शांत वारा विहरत होता. चिडीचूप शांतता होती. एकांत आपल्या उच्च स्थानी पोहोचला होता. पुस्तक वाचण्यात गर्क असलेल्या विनिता ला खालच्या मजल्यावरून काहीतरी आवाज यायला लागले. तीन उठली , खाली आली. तिने लाईट लावली. पाहिले की खिडकीच्या कोपऱ्यात एका टेबलावर ती सकाळी मिळालेली फाईल होती. ती फडफडत होती. वाऱ्याने तीची पाने सर्व उलटी सुलटी होत होती. ती जवळ गेली आणि खालची खिडकी बंद करून घेतली. पुन्हा लाईट बंद करून ती वर जायला निघाली तेव्हा पुन्हा कसलातरी आवाज आला. ती वळली आणि जे पाहिले ते बघून पायाखालची जमीनच सरकली. समोर खिडकी बंद केली तरी तिच्या फटीतून अंधुक प्रकाश आत येत होता. त्या प्रकशात तिला दिसले त्या टेबलाजवळ उभे असलेले दोन पाय. तिची अंगाची घालमेल झाली. काय करावे ? कोण आहे ? हृदय बंद पडते आहे की काय असे झाले. असा भयानक प्रकार , प्रत्यक्ष डोळ्यांनी प्रथमतः ती पाहत होती. ती घाबरून किंचाळली आणि दरवाजा उघडून बाहेर आली. . . . .
बाहेर येताच तिला नजरेत दिसली ती आदित्य काय गाडीची लाईट. तिला रडू कोसळलं. कधी एकदा तो येतोय आणि त्याच्या मिठीत जाऊन रडते असे तिला झाले. आदित्य देखील तीची अवस्था पाहून लगबगीने घाबरून गाडी बंद करून बाहेर आला. तिला त्याने जवळ घेतले आणि आत जायला निघाला. आत कोणीतरी आहे ? कोणीतरी आहे ! अस म्हणत ती त्याल बिलगू लागली. घाबरली होती. थरथर कापत होती. आदित्य तिला खांद्याला धरून दरवाज्याकडे निघणार इतक्यात दोघांनी मिळून घराच्या बाहेरून वरच्या मजल्यावरच्या खिडकीत पाहिले आणि तेव्हा मात्र आदित्यला धक्काच बसला. आदित्य आणि विनिता दोघे ही बघून अवाक झाले. खिडकीत दोन अस्पष्ट सावल्या उभ्या होत्या. त्या एकटक त्या दोघांकडे बघत होत्या. आदित्य हादरला होता. विनिता घाबरून खालीच बसली. आदित्य तिला सावरू लागला. त्याने तिला उचलून आत नेण्याचा प्रयत्न केला. हळूहळू चालत दोघे कसेबसे आत गेले. विनिता त्या घरात एक सेकंद सुध्दा थांबायला तयार नव्हती पण आदित्य ने तिला जबरदस्ती आत नेले. आत जाऊन त्याने आतील खालच्या आणि वरच्या दोन्ही मजल्यावरच्या लाईट चालू केल्या. अख्खं घर उजळून टाकलं. तेव्हा विनिता बरं वाटू लागलं.
लाईट चालू करून एक मिनिट होत नाही तोच सर्व लाईट आपोआप बंद झाल्या. विनिता प्रचंड घाबरली , किंचाळली. आदित्य ने तिला सावरले - थांबवले. खालच्या मजल्यावरून पुन्हा टक टक टक असा चालण्याचा आवाज येऊ लागला. प्रत्यक्षात तो कानाने ऐकून आदित्य जागच्या जागी उडाला गेला. विनिता म्हणत होती तस खरंच काहीतरी आपल्या घरात आहे , ह्याची त्याला खात्री पटू लागली. विनिता आणि आदित्य खाली आले. अडखळत त्यांनी मेणबत्ती प्रज्वलित केली. अडखळत चालताना अंधारात त्यांच्या पायाला काहीतरी लागले. विनिता घाबरली. आदित्य ने मेणबत्ती खाली धरली आणि पाहिले तर ती सकाळी आलेली फाईल होती. ती त्याने वर उचलली. त्याच्या आतून एक कागद खाली पडला. विनिता ने तो उचलला, त्यावर मजकूर होता.
Dear,
VINITA
Our process is almost over but we need some small way to reach at end. We want a last signature of head of court "MR. SHOFI".
For that u need to go at "KANDOVAN" he will meet u there and give you sign.
Lets go ahead
Address as following . .
( आपली सर्व प्रोसीजर होत आलेली आहे. फक्त एक हस्ताक्षर हवी आहे , कोर्ट चे सर्वेसर्वा "मी. शोफी" ह्यांची. त्यासाठी तुम्हाला "कांडोवण" येथे जावे लागेल. तिथे ते तुम्हाला हस्ताक्षर देतील. पत्ता खाली दिलेला आहे )
विनिता ने तो कागद वाचला आणि आदित्य ने सुध्दा तो चाळला. तेव्हा दोघांनाही अचानक काहीतरी आठवलं आणि . . . . . .पुढे . . . .
भाग - ४ पुढील टप्प्यात