#एक काळी रात्र आरंभ १
लेखक : कुमार
प्रकरण : पाहिले
# एक काळी रात्र आरंभ भाग १
नमस्कार मंडळी मी अतुल तुमचे स्वागत करतो आज च्या सत्कार समारंभात , आज आपण इकडे एका खास व्यक्तीला सत्कारासाठी आमंत्रित केले आहे तर टाळ्यांच्या गजरात स्वागत करा आपले पाहुणे श्री. नीलकंठ जोशी यांचे, टाळया सुरु असताना एक २८ वर्षांचा युवक समोर येतो. तर आज पण सन्मानित करू श्री. नीलकंठ जोशी याना त्याचा बद्दल काय सांगू त्यांनी अश्या क्षेत्रात कामगिरी केली आहे ज्याचा विचार तुम्ही मी कोणीच करू शकत नाही. श्री.जोशी हे भूतांशी संवाद साधून त्याचा मुक्तीचा मार्ग उपलबध करून देतात त्याचा या कार्याला आज आपण एक सलाम करू आणि त्याचा सत्कार करू टाळ्या शाल आणि श्रीफळ सोबत एक छोटे मानचिन्ह दिले जाते. तर आज श्री. जोशी याना विनंती कारेन कि त्यांनी आपले अनुभव आपल्या सांगावे. जोशी सर प्लीज आणि अतुल नीलकंठ कडे माईक देतो.
नमस्कार मंडळी आज तुम्ही जो मला पुरस्कार दिला आहे त्या बद्दल तुमचे आभार आणि तुमच्या आग्रह खातर मी माझे २ किस्से तुम्हाला सांगतो नीलकंठ म्हणाला. या कथा मध्ये नायक मी नाही तर माझा मित्र माझा सखा ज्याचा मुळे आज मी इथे आहे त्याचे नाव लोकेश गुप्ते आणि आमची टीम आहे तर कथा सांगण्या पूर्वी मी सर्वांची ओळख करून देतो.सुरुवात लोकेश पासून करतो.
लोकेश आमच्या टीम चा हेड त्याचा मुळे खरं तर आम्ही एकत्र आलो, लोकेश लहान पण पासून थोडा वेगळा होता. तो कशाला कधी घाबरला नाही, लहान वयात मुलं अंधाराला घाबरतात आणि लोकेशला अंधार खुप आवडायचा देवावर त्याचा विश्वास नव्हता नेहमी बोलायचं माणसाने नशीब आणि देव या पेक्षा कर्मावर विश्वास ठेवला कि मग त्याचे कोणी काही करू शकत नाही.
त्याच्या बरोबर विरुद्ध होती नम्रता, नम्रता प्रधान म्हणजे निम्मी दिसायला सावळी पण रेखीव शाळेपासून तिला संचलनाची भारी हौस शाळेत गँदरिंग मध्ये सूत्र संचालन तीच करणार मग कॉलेज नंतर मग तिने ठरवले कि यात कॅरियर करायचे तिने चॅनल साठी ऑडिशन पण दिले त्यातले काही तिने केले पण प्रश्न आहे आता तिला मी विरुद्ध का म्हणालो? रात्री साधे कुत्रे किंवा मांजर रडले तरी हि दिवे लावून झोपायची, कसला मोठा आवाज झाला कि घाबरयची पण तिच्यात एक जिद्द होती चिकाटी होती तिला नाव प्रसिद्धी हवी होती आणि या साठी ती आमचा भाग होती.
मनोज सुकाळे बाहुली आणि प्रॉप म्हणजे त्याचे जीवन आहे, त्याने सांगितलं होत एकदा तो १२ वर्षाचा असताना एका काकूंची कळशी पाण्यात पडली होती आणि त्याने एका बाहुली साठी ती कळशी पाण्यातून बाहेर काढली होती. मुंबई मध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेऊन शेवटी त्याने प्रॉप अँड 'डोल नावाचे खेळणायचे दुकान सुरु केले. त्याला अजून एक छंद होता सतत दूरदर्शन पाहणे आणि पुढे याचाच आम्हाला उपयोग झाला.
त्याचा नंतर येते ती मनस्वी सकपाळ ती कधी मुलगी म्हणून वावरली नाही मुलं जे काम करतात ते मुली का करू शकत नाही, मुली आणि मुलं असा भेद तिला आवडायचा नाही तिने आवड म्हणून फोटोग्राफी आणि विडिओ मेकिंग शिकली पण घरी वडिलाना आवडले नाही म्हणून तिने एक नोकरी शोधली पण त्यात तिचे मन रमत नव्हते, कधी कधी सुट्टी घेऊन ती हळदी आणि लग्नाचे कार्यक्रम घेत होती.
पाचवा आणि शेवटचा राहिलेला मी नीलकंठ जोशी, शेवटचा का? सांगेन पुढे कथे मध्ये, तर मी तसा अभ्य्सात हुशार नाही पण संगणक माझी आवड होती १०वी नंतर मी संगणक शिकू लागलो आणि त्यात पुढे जायचे मी ठरवले. त्या नंतर मी सॉफ्टवेअर कंपनी मध्ये कामाला लागलो. अशी होती आमच्या सर्वांची थोडक्यात ओळख आता आम्ही भेटलो कसे त्याची पण एक गम्मत आहे.
आमच्या सर्व एका गोष्टी मुळे भेटलो ती म्हणजे लग्न, हो, लग्न माझे नाही तर माझा मित्र कल्पेश चे, कल्पेश आणि मी आम्ही शाळेत एकत्र आणि निम्मी आणि लोकेश त्याचे कॉलेज चे मित्र तसेच कल्पेश ची पत्नी अर्चना तिचे मित्र मनस्वी आणि मनोज हे तिचे मित्र होते. लग्नात आमची ओळख झाली आणि चांगली गट्टी झाली. हळू हळू आमचा ग्रुप तयार झाला त्यात कल्पेश आणि अर्चना नव्हते कारण नुकतंच लग्न झाले त्यांना पण त्याचे आयुष्य एन्जॉय करू द्याचा आम्ही ठरवले होते. आम्ही वेळ काढून दर संडे ला भेटायचो आमच्या भेटीचा परिणाम असा झाला कि मनोज आणि निम्मी आता एक झाले होते म्हणजे आम्हाला आनंद होता त्याचा. गप्पाना आम्हाला कधी विषय लागला नाही. साधारण एक वर्ष झाले होते आमची ओळख होऊन असेच एकदा गप्पा चालू असताना विषय भूत प्रेत खरे असतात कि नाही या वर गेला आम्ही चौघे होकार तर लोकेश नकार टीम मध्ये होता, लोकेश च्या मते भूत नसते माणूस जन्म घेतो आणि मरतो त्याचा आत्मा असेलच तर तो दिसणार नाही आणि इच्छा जिवंत पणे असतात मेल्यावर त्या पूर्ण झाल्या कि नाही झाल्या काय फरक पडत नाही. आमचे मत त्याच्या विरुद्ध होते म्हणजे इच्छा पूर्ण नाही झाल्या तर त्या माणसाची आत्मा भटकत राहते आणि तिला मोक्ष मिळत नाही. वाद झाला त्या नंतर पुरावे झाले पण लोकेश मानायला तयार नव्हता अश्यात आम्ही लोकेश ला पैज लावली कि त्याने रात्री ०२ वाजता एक भुताचे घर म्हणून जागा आहे तिकडे जाऊन दाखवायचे आणि कॅमेरा सुरु ठेऊन जायचे लोकेश त्याला तयार झाला. त्याच दिवशी रात्री करायचे ठरले. मनस्वी ने त्याला कॅमेरा लावला आणि काँनेकशन आमच्या कडे
ठेवले. गडी खूपच धीट निघाला आणि त्याने सिद्ध केले कि तसे काही नसते तो २ ला आत गेला आणि ०४ ला बाहेर आला. जेव्हा आम्ही तो विडिओ बघितला तेव्हा आमचे डोळे भीतीने पांढरे होयचे बाकी राहिले होते, त्या जागेवर जिकडे तो फिरत होता तिकडे कॅमेरा मध्ये एक आकृती दिसली होती ती काळी आकृती होती आणि एकदा नाही तर चक्क ३ वेळा ती लोकेश च्या समोरून गेली. लोकेश पण ते पाहून आश्चर्यचकित झाला होता. हे कसा पॉसिबल आहे तुम्ही तर काही केले नाही ना लोकेश ने विचारले. लोकेश आम्ही काहीच केले नाही जे आहे ते तुझ्या समोर आहे मनस्वी म्हणाली. मला विश्वास बसत नाही असे काही असेल लोकेश त्या स्क्रीन कडे पाहत म्हणाला . मी नंतर तो विडिओ यौटूब वर टाकला आणि तिकडे तो वायरल झाला त्या विडिओ ला लाईक आले आणि फेमस झाला होता अजून हि तो विडिओ आहे तुम्ही पाहू शकता. हे सर्व पाहून मनोज च्या सुपीक डोक्यात एक कल्पना आली आणि त्याने आम्हाला सर्वाना बोलावले.
* मनोज* काय झाले इतक्या तातडीने का बोलावले निम्मी ने विचारले. तुम्हाला माहित आहे का तो लोकेश चा विडिओ जो वायरल झाला होता मनोज म्हणाला. हो त्याचे काय? मनस्वी ने चिडून विचारले. त्याचे असे आहे कि त्या विडिओ वर खुप सारे लाईक आणि कंमेंट पण आले आहेत काही वाईट आहेत काहींना वाटते आपण खोटे केले आहे तर काहींच्या मते ते खरे आहे आणि तुम्हाला माहित आहे का अमेरिका मध्ये असे शो खुप हिट होत आहेत मनोज खुशीने सांगत होता. तर मग तुझे म्हणणे काय आहे हे बघ आपण हे सर्व मज्जा म्हणून केले होते पण परत करण्याची हिम्मत माझ्यात तरी नाही मी माझा मुद्दा मांडला. त्याला निम्मी ने दुजोरा दिला नील बोलतो ते बरोबर आहे कारण रिस्क आणि ते पण अश्या गोष्टीची कधीच नाही. लोकेश मात्र शांत होता मनस्वी लोकेश कडे पाहत होती तू कसला विचार करतो आहे मनस्वी ने लोकेश ला विचारले. मनोज मला एक सांग कोणता शो आहे आणि ते काय करतात आणि ते खरे असते का ? लोकेश ने भराभर आपले प्रश्न विचारले. ते मला पण नाही माहित पण आपण पाहू ना आणि त्याचंही काही ट्रेनिंग विडिओ पण असतील ते पण पाहू आणि करून पाहू तिकडे एक प्रयोग आणि पुन्हा अपलोड करू हे बघा मला आणि तुम्हा सर्वाना या सिम्पल जीवनाचा कंटाळा आला आहे आणि आपल्या प्रत्येकामध्ये एक गोष्ट आहे जे या सर्वला उपयोगी आहे मनोज सर्वांचे मन वळवण्याचा प्रयन्त करत होता.पण मला काही ठीक नाही वाटत निम्मी म्हणाली. हे बघ रडू नको तुला काही कोणी खाणार नाही आणि तू एकटी नाही आहेस आम्ही सर्व असू मनोज निम्मीच्या खांद्यावर हात ठेऊन धीर देत म्हणाला. ठीक आहे, पण काय करायचे आहे? निम्मी म्हणाली. आपण सर्व आधी त्याचे विडिओ पाहू मग ट्रेनिंग बघू मग ठरवू काय करायचे ते लोकेश म्हणाला. आम्ही त्याचे विडिओ पहिले त्याचे काही ट्रेनिंग विडिओ पण होते ते पण पहिले त्यानंतर लोकेश म्हणाला हे बघा कोणाला जबरदस्ती नाही हे केले पाहिजे मी तयार आहे आणि मनोज तयार आहे तुम्ही विचार करून रविवारी आपल्या नेहमीच्या ठिकाणी भेट आणि सांगा नाही बोले म्हणून राग किंवा मैत्री कमी होणार नाही त्या मूळ जे आहे ते स्पष्ट करा लोकेश म्हणाला आणि आम्ही घरी निघालो. २ दिवसानी आम्ही आमच्या नेहमीच्या बागेत भेटलो तिकडे मनोज आणि निम्मी आधीच बसले होते. काय रे तुम्ही काय सकाळ पासून येऊन बसता काय? अरे हा नंतर तुम्हाला प्रेमाचे बोलता येत नसेल ना? मी हसत बोलो. तसे काही नाही सहज आम्ही लवकर येतो निम्मी म्हणाली. हो का? चालू दे तुमचे मी जरा बाहेर उभा राहून बगतो कोण येते आहे तो पर्यंत हमम बोलून मी गेट वर येऊन उभा राहिलो.समोरून दुसरे जोडपे येताना दिसले तेव्हा मला वाटले अजून एक मुलगी हवी होती म्हणजे मग माझे पण काही तरी झाले असते पण ठीक आहे माझे नशीब खराब मी त्या दोघांना भेटून आत गेलो. लोकेश ने मुद्द्याला हात घातला, तर काय ठरवले आहे कोण तयार आहे मी विचार केला होता शेवटी हात वर करेन पण झाले उलटे मनस्वी ने हात वर केला लोकेश मनोज मनस्वी आता बाकी मी आणि निम्मी, निम्मी काही बोलायला तयार नाही म्हणून मग मी हात वर केला आणि मग निम्मी ने पण थोडे भीत भीतच. चला म्हणजे सर्व तयार आहेत तर मी काय सांगतो ते नीट ऐका, आपल्याला कामे वाटून घेतली पाहिजे तर जो ज्या कामात माहीर आहे त्याने ते करावे असे मला वाटते तर मी सांगतो कोणाला काही आक्षेप असेल तर सांगा लोकेश बोलत होत आणि आम्ही ऐकत होतो. मनस्वी तू कॅमेरा आणि साऊंड बघ, नील तू कॅमेरा चा संप्रर्क आणि माईक आणि सॉफ्टवेर किंवा कॉम्पुटर चे जे काम असेल ते तू करायचे, मनोज तू प्रॉप आणि बाकी सेट उप म्हणजे कोणाला मदत लागली तर आणि मी त्या आत्माशी बोलण्याचा प्रयन्त करेन अजून कोण राहिले निम्मी पण तिला काम नाही आहे कारण तिला काहीच येत नाही लोकेश बोला आणि निम्मी चिडली. ठीक आहे मी नाही येत जा तुम्ही मी जाते घरी आणि परत कधी नाही येणार निम्मी रागात बोली आणि निघणार तेवढ्यत लोकेश बोला अगं वेडे थांब तू तर आमच्या सर्वांचा चेहरा असणार आहेस तुझ्या काम पासून आमचे काम सुरु होणार आहे तू आमची सूत्रसंचालक असणार आहेस लोकेश म्हणाला आणि निम्मी चा राग चटकन गेला. पण हे सर्व करताना जॉब बघून करायचे आहे कारण हे सर्व आपण मजेसाठी करत आहोत त्यामुळे जॉब सोडायचा नाही ठीक आहे लोकेश बोला तसे सर्व येस्स म्हणून ओरडले.
हळू हळू काम सुरु झाले त्या कामासाठी लागणारी यंत्र थर्मल कॅमेरा सर्व जमाव जमाव सुरु केली आणि सर्व सामान मनोज च्या दुकानात ठेवले होते. कसला अनुभव नव्हता फक्त जे पाहिले त्यावर सर्व करायचे आम्ही ठरवले होते थोडा खर्च केला सर्वानी सामानासाठी पण तो वाया जाणार नव्हता, जर पुढे जमले नसते तर मनस्वी ते वापरले असते किंवा विकले असते त्यामुळे त्याची चिंता नव्हती. दिवस पण ठरवला जानेवारी ची २४ तारिक रविवार कारण त्या नंतर अमावास्या सुरु होत होती. आम्ही रविवारी सकाळी सर्व जागा बघून घेतली आणि मनस्वी ने सांगितले तिकडे कॅमेरा फिक्स केले सर्व काम दुपार पर्यंत संपले तिकडेच जेऊन घेतले आणि सर्व सेटउप चे काँनेकशन त्या भूत बंगलो च्या बाहेर होते. काय कोणी करायचे ते लोकेश ने समजून सांगितले होते त्या प्रमाणे सर्वानी आपले काम करणार होते.
रात्र गडद होत जात होती. निम्मी कॅमेरा समोर उभी राहिली. नमस्कार मंडळी मी निम्मी आपले स्वागत करते आजच्या कार्यक्रम मध्ये ज्याचे नाव आहे? निम्मी विचार करत होती. अरे लोकेश नाव काय ठरवले नाही निम्मी ने विचारले. त्यावर लोकेश बोला काही पण सांग नंतर बघू नील आवाज येतो आहे ना त्याने मला विचारले मी बाहेरून त्याला होकार दिला आम्ही सर्व एकमेकान सोबत कनेक्टेड होते फोन ने जेणे करून काही वाटले तर मी त्या व्यक्तीला बाहेरून बघून सूचना देऊ शकेन. परत टेक कर लोकेश बोला आणि त्याने घडाळ्यात पहिले रात्री चे ११:२५ झाले होते निम्मी लवकर सुरु कर आणि चुकू नको इकडे काही लिहिल नाही तुला वाटेल ते बोल ठीक आहे, तू जे काही बोलशील ते चांगले असेल विश्वास आहे माझा लोकेश बोला आणि जागेवर जाऊन उभा राहिला.
निम्मो ने सुरुवात केली नमस्कार मंडळी मी नम्रता म्हणजे तुमची निम्मो तुमचे स्वागत करते आहे आजच्या खतरनाक शो मध्ये ज्याचे नाव आहे घोस्ट हंटर आम्ही इकडे तुम्हाला काही गोष्टी दाखवणार आहोत ज्याने तुमचा विश्वास बसेल कि भूत प्रेत हे या जगात असतात त्याचे अस्तित्व असते आणि ते कधी कधी आपल्या सोबत वावरतात पण तर चला आपण पाहू काय होते ते? वाह्ह निम्मो मस्त फारच छान मनस्वी म्हणाली. काय नाव आहे घोस्ट हंटर मानले तुला मनोज म्हणाला. छान झाली सुरुवात आता पुढे जाऊ लोकेश म्हणाला. लोकेश अरे ते बाजूला काय आहे केस मोकळे सोडून मी विचारले तसे लोकेश आणि सर्व त्याचा बाजूला पाहत होते. अरे ती निम्मो आहे ठीक आहे नाही, अंधारात समजले नाही आणि हे घाबरीच्या जागी भूत हिला बघून पळून जाईल मी म्हणालो. सर्व हसू लागले तशी निम्मो चिडली आणि म्हणाली काय रे तुम्ही माझी मस्करी करता मी नाही करणार. त्यावर मनोज ने तिला समजावले अगं तो जळतो तुझ्यावर तू एवढा छान बोली ना म्हणून तो बोला.हो कि नाही रे मी माझे हसू दाबून हो म्हणालो. पुढे शूट सुरु झाले तर मित्रानो हे आहेत लोकेश जे खरं भूतान सोबत बोलणार आहेत, तर त्यांना विचारूया कसे आणि काय करणार आहेत? नमस्कार लोकेश तुम्ही सांगा तुम्ही कसे आणि काय करणार आहात निम्मो ने विचारले तसे लोकेश सांगू लागला. आम्ही काही प्रॉप ठेवले आहे तसेच कॅमेरा जागो जागी बसवले आहेत आणि हे कॅमेरा नॉर्मल नाही तर बॉडी टिम्प्रेचर पण दिसते यात आणि नाईट मोड पण आहे जेणे करून किती हि अंधार असला तरी सुद्धा त्यात आपण बघू शकतो शिवाय माझ्या हातात हे यंत्र आहे त्यात लाल आणि हिरवे चिन्ह आहे लाल म्हणजे नेगेटिव्ह आणि हिरवे म्हणजे काही नाही मी सुरु करून दाखवतो आणि लोकेश ने यंत्र सुरु केले ते हिरवे होते. मग तुम्ही काय करणार म्हणजे भूत पळवणार कि काय करणार? निम्मो ने विचारलं. नाही आम्ही पळवणार नाही पण ते इकडे आहे का आणि त्याची काय इच्छा आहे ते जाऊन ती पूर्ण करायचा प्रयन्त करणार लोकेश म्हणाला. आणि ते तुम्ही कसे करणार? निम्मो ने विचारले तर लोकेश म्हणाला त्या साठी तुम्हाला थांबवले लागेल लोकेश म्हणाला. तर मित्रानो हे होते लोकेश आता आपण पाहू ते काय आणि कसे करत आहेत? लोकेश ने मागच्या वेळी जिकडे त्यांना आकृती दिसली होती तिकडे एक बेल आणि एक बाहुली ठेवली होती. त्या सोबत एक केक कारण जर लहान मुलं असेल तर त्याचा साठी, लोकेश च्या खांद्यावर एक छोटा कॅमेरा होता त्यातून सर्व शूट होत होते. काही कॅमेरे वरती लावलेले होते ते पण सर्व लक्ष ठेऊन होते.१२:१५ ला लोकेश ने विचारले, इकडे कोणी आहे का? काहीच उत्तर आले नाही लोकेश ने पुन्हा विचारले इकडे कोणी आहे का? जर असेल तर बेल वाजवा. मी बाहेरून सर्व पाहत होतो लोकेश कॅमेरा ३ वर होता. इकडे कॅमेरा १ वर काही तरी हालचाल दिसू लागली. लोकेश कॅमेरा १ वर काही तरी हालचाल होते आहे मी बोलो तसे सर्व तिकडे धावले साधारण ५ मिन मध्ये तिकडे बेल वाजू लागली. आम्हाला समजले ते जे काही आहे ते आमच्याशी बोलत होते. मी बाहेर होतो तरी मला भीती वाटत होती तिकडे तर ते सर्व आत होते त्याची अवस्था तर माझ्या पेक्षा जास्त भीतीदायक होती. तुम्ही जे कोणी आहात त्या बद्दल धन्यवाद तुम्ही अजून कोणाला त्रास दिला नाही पण तुम्ही हि जागा पण सोडली नाही तुमच्या नंतर इकडे कोणी राह्यला येऊ नये असे तुम्हाला वाटते का? उत्तर हो असेल तर एकदा बेल वाजवा नाही असेल तर दोनदा लोकेश बोला तसे एकदा बेल वाजली. ते सर्व पाहून आम्ही सर्व चकित झाले होतो. याचे उत्तर आमच्या कोणाकडे नव्हते. आम्ही तुम्हाला त्रास नाही देणार आम्ही जातो तुमच्या मर्जी शिवाय आम्ही आलो तुमच्या मर्जीने जाणार आहे तुम्ही जर तयार असाल कि आम्ही जावे तर तिकडे एक बाहुली आहे तिचे बटन दाबा आम्ही जाऊ आणि तुमच्या साठी केक ठेवला आहे तसे त्या बाहुलीचे बटन दाबून त्यातून हसण्याचा आवाज येऊ लागला. तो आवाज त्या वातावरणात भयानक वाटत होता.आम्ही सर्व बाहेर आलो. तर मित्रानो पाहिलं तुम्ही हा आमचा पहिला प्रयन्त होता अजून असे विडिओ आम्ही तुमच्या साठी घेऊन येऊ आणि तुम्हाला वाटत असेल कि तुमच्या इकडे असे काही असेल तर विडिओ खाली ई-मेल आहे तुम्ही आम्हाला तुमचे नाव नंबर आणि समस्या मेल करा आम्ही ती नक्की सोडवणायचा प्रयन्त करू पुढचा विडिओ तुमचा कडून असेल जागा तुमची कला आमची भेट होत राहील लाईक शेअर आणि सब्स्क्रिप करा आमच्या चॅनेल ला ज्याचे नाव आहे घोस्ट हंटर बाय बोलून निम्मो आपली शूट संपवते. यार काय भयानक अनुभव होत खरचं मी एकटी असते ना तर कधीच आले नसते निम्मो घाबरून म्हणाली. नील काय दिसले आले का सर्व नीट मनस्वी ने विचारले तसे मी विडिओ सुरु केला. कॅमेरा १ मध्ये एक काली आकृती होती जेव्हा तिकडे सर्व आले होते तेव्हा ती आकृती लोकेश जवळ नंतर निम्मो जवळ बेल जवळ आणि नंतर मनोज च्या मागे उभी होती. शेवटी जेव्हा तिने बाहुली प्रेस केली तेव्हा तिने ती सोबत घेऊन गेली केक तिकडे होता मी जे पहिला ते सांगितले. त्या नंतर कॅमेरा बंद झाले होते अचानक आम्हाला वाटले खराब झाले आम्ही सकाळची वाट पाहत गाडीत झोपलो त्या नंतर सकाळी ७ ला मला जाग आली तेव्हा मी सर्वाना उठवून आत घेऊन गेलो आणि सर्व पहिले बाहुली तिकडे नव्हती बेल बाजूला पडली होती केक कोणी तरी अर्धा खाल्या सारखा होता. मित्रानो हे बघा मी त्यांना तो केक दाखवला म्हणजे हे सर्व खरं होत मी घाबरून म्हणालो. सर्व आता घाबरले होते फटाफट कॅमेरा चेक केले तर सर्व कॅमेरा चालू होते. मग ते बंद का झाले जे इकडे होते त्याची इच्छा नव्हती इकडे कोणी असावे हे घर एका पारशी बाई चे होते आणि ती एकटी राहायची कारण तिला गर्दी माणसे आवडत नव्हती ती प्रेमळ होती पण ती माणसात जास्त मिसळायची नाही आम्ही नंतर सर्व माहिती काढली. आमची पहिली वेळ होती म्हणून जास्त अभ्यास केला नव्हता. सर्व घरी गेलो आणि रात्री मी सर्व एडिट करून अपलोड केले. पहिल्या ३ दिवसात विडिओ ला यश मिळाले लाईक चा पाऊस पडला कॉम्मेक्ट ज्यात बरे आणि वाईट दोन्ही होते. शिवाय आम्ही जिकडे काम करत होते तिकडे नेगेटिव्ह आणि पोस्टिव्ह मते येत होती कोणी म्हणत होते खरं आहे तर कोणी विचारत होते हे सर्व तुमचा माणूस करत असेल आणि तुम्ही आम्हाला वेडे बनवत असाल. पण आम्हाला माहित होते खरे काय झाले होते. ई-मेल पण ४० च्या वर होते. त्यातलं एक ई-मेल मी वाचला त्यात लिहिले होते पत्ता द्या भेटून बोलणार मला विचित्र वाटले मी सर्वांचे मत घेतले आणि त्यांना हॉटेल मध्ये बोलावले
#क्रमश: