कथा :- महरूम -भाग :- ५
#लेखक :- चेतन साळकर
#Horrorostory tube present
#© सर्व हक्क लेखकाकडे बांधील आहेत
सूचना :-
• कथेचे एकूण "10" भाग असतील.
• कथा रोज "संध्याकाळी 7" वाजता पोस्ट होईल.
• कथेत कुठल्याही धर्माचा अवमान झालेला नसेल.
कथेचा भाग - ४ ची लिंक खाली दिलेली आहे
पायांना थारा न देता सरळ धावत सुटली आणि घरात जायला पायरी चढणार इतक्यात तिला मागून पुन्हा हालचाल किंवा आवाज ऐकू आला.
ती मागे वळली आणि तिने जे पाहिले त्याने ती तिथेच मटकन खाली बसली. मागे वळल्यावर तिला दिसले की गाडीच्या इथून लांब मोकळ्या रस्त्यावर दोन लहान मुले तिच्या दिशेने पळत येताना दिसली. साधारण १० - ११ वर्षांची असतील. ती घाबरली. काय सुचले नाही म्हणून खालीच बसली. ती दोन मुले धावत धावत खूपच जवळ पोहोचली. जवळ येऊन तिला स्पर्श करणार इतक्यात आतून तिचा आवाज ऐकुन दोघेही बाहेर आले. आदित्य आणि शोफी दोघांनी तिला उचलले आणि घरात घेऊन गेले. जाताना विनिता सारखी पाठीमागे बघत होती तर कोणीच नव्हते. तिला खुप धक्का बसला होता. हृदय धडधडत होतं. तिला घेऊन ते आतल्या खोलीत गेले. आतली खोली बघून विनिता प्रचंड घाबरली.
दहा बाय दहा खोलीची व्याप्ती होती. प्रचंड अडचण , टेबल , टेबलावर अस्थावस्त पडलेली पुस्तक , कोनाड्यात पडलेल्या जुनाट वस्तू , अडगळ , त्यावरच कपडे वाळत घातलेले , तिथेच सगळ्या वस्तूंचा कोंडाळ केलेला, बाजूला गॅस त्यावरची भांडी मळकटलेली आणि ती व्यक्ती म्हणजे शोफी सुध्दा अगदी साधारण कपडे , गरिबीत राहणारा असा होता. वकील असून अस चित्र. आदित्य आणि विनिता दोघांच्याही चेहऱ्यावर एकाच प्रश्न होता की, एवढे वकील असून या अश्या जंगलात येऊन अश्या प्रकारच्या खोलीत गरिबीत का राहत असावे ? हा प्रश्न खरतर शोफी ला सुध्दा त्यांचे चेहरे बघून समजला होता पण त्याने मौन पत्करले. रात्र वाढली. एकांत खायला उठला. डोळ्यांसमोर भयानक चित्र दिसायला लागली. आदित्य आणि विनिता दोघांनाही झोप येत नव्हती. एकतर नवीन जागा , बाजूला घनदाट जंगल , त्यात तशी खोली , बाहेरील भयानक सूक्ष्म जंगली आणि भेदरट , भीतीदायक आवाज ह्यांनी त्यांना स्वस्थ राहू दिले नाही. शेवटी म्हणता म्हणता खूप वेळाने दोघंही झोपले.
मध्यरात्र शिगेला पोहोचली. चंद्र बाहेर तळपत होता. आपले चांदणे फेकत होता त्या जंगलात. अचानक विनिता ला जाग आली ती कसल्यातरी एका आवाजाने. तिला जाणवले की कोणाचा तरी श्र्वासांचा आवाज येत आहे. ती उठली मागे वळली तर आदित्य पाठमोरा होऊन पलीकडच्या कुशीवर झोपला होता. तिकडे शोफी सुध्दा खुर्चीच्या बाजूला पडला होता. एवढा मोठा श्वासांचा आवाज कुठून येत होता. ती उठली आणि तिने इकडे तिकडे नजर फिरवली. जे दृश्य समोर दिसले ते पाहून तोंडातून शब्द फुटत नव्हते. समोरच्या खिडकीवर तीच दोन मुलं बसली होती आणि मोठमोठ्याने श्वासोच्छवास करत होती. त्यांच्या नाकपुड्या फुलत होत्या आणि बंद होत होत्या. अंगावरून चरचरीत सुरी फिरवावी तस विनिता च अंग शहारून निघाले. त्या मुलांच्या चेहऱ्यावरील भाव रागीट होते. डोळे लाल होते. कंबरेवर संपूर्ण उघडे होते, अंगाला भस्मासारखे पांढरट काहीतरी फासलेले होते. दोघंही बसून जोरजोरात श्वास घेत होती. अचानक दोघांनी विनिता कडे बघितले. ती जोरात किंचाळली. तिच्या आतील भीतीने सर्व नियम तोडून बाहेर मोर्चा वळवला. तिच्या मोठ्या आवाजाने शोफी आणि आदित्य दोघे ही उठले.. दोघांनी तिला सावरले. शोफी ने विचारपूस केल्यानंतर विनिता म्हणाली,
विनिता :- तिकडे पुन्हा तो दोन मुलं दिसली जी मघाशी मला बाहेर धावताना दिसली होती.
शोफी :- एैसा कुछ नाही आहे. आप घबाराव नही.
आदित्य :- तू सारखा विचार करू नकोस. झोप शांत , कोणी नाही तिकडे.
दोघांनी समजावले नंतर विनिता पुन्हा झोपली. झोपेत पुन्हा तिला तेच स्वप्न पडले. ती धावत आहे , पाठीमागून पुन्हा ती माणसे आहेत. तिला धरत आहेत. तिला मारण्याचा प्रयत्न करीत आहेत. तेच तेच स्वप्न तिला वारंवार पडू लागले. ती तळमळत होती. तिला झोप काही स्थिर लागत नव्हती. मग हळूहळू ती झोपली. रात्र इरेला पेटली होती. खूप काही रहस्य , घटना ती आतल्या आत दाबत होती. त्याचे पडसाद मात्र त्या तिघांना सहन करावे लागत होते. रात्र पुन्हा मध्यावर आली. मध्यरात्रीचे ३ वाजले होते. विनिता ला अचानक जाग आली. तिला जाणवले की थंडी खूप वाजते आहे, बाजूला पक्ष्यांचा आवाज स्पष्ट ऐकू येत आहे, अंगाखाली खरखरीत काहीतरी लागत आहे, तिने डोळे उघडले आणि जे समोर दिसले ते पाहून तिच्या सर्वांगावर कळ उठली. ती मोकळ्या जंगलात , भर रात्रीची मधल्या रस्त्यावर मधोमध पडलेली होती. तिला कळेना हे काय झालं. समोर पाहिले तर लांबून काळोख्या रात्री तीच दोन मुलं तिकडून तिच्याकडे धावताना दिसली. ती घाबरली , ओरडत सुटली , आकाडतांडव करीत ती वेडीवाकडी जंगलात धावू लागली. तिला कुठे जावे हेच कळेना. घर दिसत नव्हते. आदित्य ला हाका मारून मारून हैराण झाली, सैरभैर होऊन ती वाट मिळेल त्या रस्त्याने धावू लागली. पाठीमागून असणारी ती दोन मुले तशीच पाठलाग करीत होती. जंगलातून रात्रीची वाट काढणं म्हणजे साधी गोष्ट नव्हे ,रस्ता अपरिचित असतो. कुठे खड्डा असेल , कुठे जनावर असेल , कुठे पाय फाटेल , काय होईल काही माहीत नसते. अश्या वेळी रात्री गडबडून जाऊन धावत सुटायचे म्हणजे खूप धाडसाची गोष्ट होती. विनिता ला नाईलाज होता. घर दिसत नव्हतं म्हटल्यावर कुठेतरी बचाव करावाच लागणार होता. कशीबशी जाऊन नेमकी ती पायाखालच्या एका मोठ्या वेलीला पाय लागून कोसळली आणि फरफटत जाऊन ती एका दगडाला आपटली. तिला लागले होते , खरचटले होते , काटे पायात घुसले होते. ती कशीबशी उठली. तिने समोर पाहिले तर ज्या दगडाला ती आपटली होती त्या दगडावर एक दगडांची माळ घातलेली होती. विचित्र दगड होता तो. गोल मणी कसे असावेत तसे गोल दगड होते ,त्या दगडांवर गोलाकार नक्षी दिसली. हार गळ्यात घालावा तशी तील दगडांची माळ त्या दगडाला घातलेली होती. विनिता ला खूप विचित्र आणि भयानक ही वाटले ते. ती घाबरली उठली तर पाठीमागून येणारी ती मुले देखील नव्हती. लांबून आदित्य आणि शोफी तिला हाक मारत येताना दिसले. ती सर्व सोडून धावत गेली आणि त्यांना भेटली. खूप रडली. आकांताने धावून तिने ताबा सोडला. दमून गेली होती. ते दोघेही तिला घेऊन घरी गेले. . . . आतून दरवाजा लावून घेतला.. . .तोपर्यंत ४ वाजले होते. पहाट व्हायला आली होती.
आदित्य :- शोफी साहेब हे काय आहे ? इथे हे असले प्रकार का घडतात ? कोण आहेत ती दोन मुलं ?
शोफी :- अहो साहेब , ये जंगल मे अशेच प्रकार होते है ना.
आप फिकर ना करो. आप आराम करा.
त्यांच्याकडे दुर्लक्ष करून दोघे ही पुन्हा झोपले. शोफी देखील बाजूला पडला. किर्र किर्र आवाज काढणारे रातकिडे नुसते उच्छाद मांडून होते. विनिता ने जे घाव सोसले होते ते कधी ही न विसरता येणारे होते. त्याच तिरमिरित ती पडली होती. तिने अलगद मान उंचावली आणि खिडकीतून बाहेर डोकावले तर समोर दूर अंधारात ती दोन मुलं तिच्याकडेच पाहत उभी होती. शिरशिरी यावी तशी विनिता ला अंगाची हेलकवणी झाली. दोघेही मागे पुढे वय असलेले असावेत. ती दोन मुले सारखी सारखी का दिसत आहेत, ह्याचा तिला काही अंदाज येत नव्हता. खरतर त्यांचे चेहरे देखील तिने अद्याप पाहिले नव्हते. जेव्हा जेव्हा ते दिसले तेव्हा फक्त घाबरून जीवाची घालमेल झालेलीच आहे. चेहरे लांबून तसे दिसलेही नव्हते. त्याच विचारात तिने पुन्हा खिडकीतून बाहेर पाहिले, तर तिथे कोणीच नव्हते. अनेक प्रश्न तसेच डोक्यात ठेऊन तिला रहायचे नव्हते. ती ते सगळ डोळ्यांसमोरून काढून टाकून पुन्हा झोपली. रात्र संपायला आली होती. पहाट होणारच होती. थोड्याच वेळात सकाळ झाली. दोघेही उठले. रात्रभर झालेल्या सगळ्या प्रकाराने दोघांनीही बॅग भरल्या. विनिताने फाईल काढली आणि शोफी समोर धरली. तशी शोफी ने देखील त्यावर लगेच हस्ताक्षर दिली. ती फाईल त्यांनी बॅगेत ठेवली. झाले जे काम करण्यासाठी आलो होतो ते झालं अस मनात आणून विनिता आणि आदित्य निघाले. जाता जाता शोफी म्हणाला
शोफी :- साहेब , थांबले असते दो दिन तर अच्छा वाटले असते.
आदित्य :- नको रे बाबा, ह्या असल्या भयानक जंगलात, अजिबात नाही. कालची रात्र कशी काढली आहे आम्हाला माहीत. पुन्हा ते कोण अंगावर ओढवून घेईल.
शोफी :- साहेब , नियती होती है. जाने कब कहा घेऊन जाईल.
त्याच्या ह्या वाक्यच आदित्य आणि विनिता दोघांनाही खरतर राग आला. निघालेल्या माणसाला अस काहीतरी बोलून पाठवू नये , एवढं पण कळत नाही का ह्या मुर्खाला. अस मनातल्या मनात बोलून ते गाडीत बसले.
झाले निघाले . . . . दोघे ही तसे आनंदात होते . . . त्या जंगलातून जाताना झालेल्या सगळ्या अनुभवांची आठवण काढून ते सगळं तिथेच सोडून ते निघाले होते इतक्यात थोडे अंतर प्रवास केल्यावर समोर एक गाडी आडवी आली आणि . . . त्यातून दोन व्यक्ती खाली उतरल्या. . . . .आणि
भाग - ६ पुढील टप्प्यात