शोध... (भाग -१)
लेखक - अक्षय शेडगे
कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.. आणि माझ्या "वेश्या" या कथेला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद...🥰
![]() |
| Supsense marathi story |
शरद आणि माया कॉल आला तसे लगबगीने हॉस्पिटलकडे निघाले... त्यांच्या मनात भीती होती की प्रकाश सरांना काही बर-वाईट नको व्हायला...
"प्रकाश पाटील हॉस्पिटलमध्ये आहेत... त्यांच्या पकिटामध्ये तुमच कार्ड दिसलं म्हणून तुम्हाला कॉल करत आहे.."
एवढंच काय ते फक्त मायाने कॉलवर ऐकलं होत... लगेच तिने शरदला कळवल..

ते हॉस्पिटलमध्ये जाताच त्यांना समजलं... प्रकाश सरांच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे.... ते आय. सी. यू. मध्ये आहेत...
हे ऐकुन मायचे डोळे घळाघळा वाहू लागले... कारण तिने जगात कोणाला आपलं समजलं होत तर ते फक्त प्रकाश सर होते...
आणि मग ती तिथेच बसून राहिली.. शरदने तिची अवस्था बघून घरी जायचं ठरवलं.. कारण याला माहीत होत की माया इथून हलणार नाही म्हणून तिला जेवणाचा डब्बा आणायला काही वेळाने तो निघून गेला...

बाकड्यावर बसलेली माया चिंतेत होती... आणि अचानक ती विचारात बुडून गेली.. सगळं काही तिला सुरवातीपासून आठवू लागलं...
१२ वर्षाची माया... शाळेत जायची.. घरी येऊन आईला मदत करायची...लहानपणी वडील वारलेले.. खेडेगावात लाईट कधी असायची कधी नसायची, रोड कच्चा... तरीही माया चालत चालत तालुक्याला शाळेत जायची... आईचं जास्त लक्ष पैसा कमवण्याकडे असायचं कारण परिस्थिती गरीब...
आज शाळेत मायाला "प्रिया" नावाची नवीन मुलगी भेटली होती... तशी प्रिया वर्गात कधीच नाही यायची... पण मधल्या सुट्टीत, ग्राऊंडवर खेळायला गेल्यावर दिसायची... हसायची.. गप्पा मारायची...
कधी कधी तर वर्गाच्या खिडकीत येऊ फक्त हसून निघून जायची...

असच एका रविवारी... माया दारात खेळत असताना तिने पाहिलं की तिचे वर्गशिक्षक म्हणजेच दामले सर तिच्या घराकडे येत होते... तिने लगेच आईला आवाज दिला... आईने त्यांना पाणी दिले.. आणि चहा ठेवते अस सांगून आत गेली.. मनात शंका आलीच होती की नक्की काय झालं.. कारण, शिक्षक अस घरी कधी आले नव्हते...
पण .. चहा घेत घेत त्यांनी बोलायला सुरुवात केली...
" तुमची माया आजकाल सतत एकटीच असते.. कोणाशी जास्त बोलत नाही.. आणि एकटीच मात्र काहीबाही बडबड करत असते... "

दामले सरांनी प्रश्नार्थक नजरेने आईला सांगितलं...
"काय ग.. सर काय बोलतात? खर आहे का ते?" थोडंसं खडसावून आईने विचारलं..
" नाही ग आई.. एकटी नसते मी .. माझी मैत्रीण प्रिया आहे ना .. आम्ही दोघी गप्पा मारत असतो.. ती माझ्या वर्गात नाही.. पण कधी कधी मला बघायला खिडकीत येते" मायाच हे वाक्य पूर्ण होताच.. दामले सर गोंधळात पडले...
"काय नाव सांगितलस.. प्रिया? कोणत्या वर्गात आहे ती? " दामले सरांच्या तोंडावर जरा शंकेचे भाव होते...
"८ वी ब" मायाने हसून उत्तर दिलं...
हे उत्तर ऐकुन दामले सर जाम घाबरले..
त्यांनी मायाला आतमध्ये पाठवलं... आणि तिच्या आईशी बोलू लागले...
" अहो ... प्रिया नावाची कोणतीच मुलगी ८ वी ब मध्ये नाही.. पण ४ वर्षापूर्वी झालेली घटना तुम्हाला माहीतच आहे.. प्रिया नावाच्या मुलीवर शिपाई बंड्या याने बलात्कार करून तिला तिचा शाळेतच खून केला होता.. ही तीच प्रिया तर नाही ना? " दामले सर घाबरून बोलत होते.. मायाची आईपण हे ऐकुन घाबरली...

पण दाराला कान लावून हे सगळं माया ऐकत होती...
त्यांनतर १ आठवडा तिच्या आईने तिला शाळेत पाठवलं नाही.. पण हट्ट करून माया शाळेत गेली.. नेहमीप्रमाणे तिला ग्राऊंडवर प्रिया भेटली...
बोलत असतानाच...
" तू भूत आहेस का ग प्रिया? " त्या बालमनाने एकदम सहज हा प्रश्न विचारला...
" तुला कोण बोललं?" शांत आवाजात प्रियाने विचारलं..
"दामले सर माझ्या आईला म्हणत होते .. म्हणून तर तिने मला शाळेत नाही पाठवलं एवढे दिवस.."
हे ऐकुन प्रिया तिथून निघून गेले.. २ दिवसांत खबर आली की दामले सर हृदयविकाराच्या झटक्याने गेले..

संपूर्ण शाळेत बातमी झटक्यासरशी पसरली..
प्रियाच्या भुताने दामले सरांना मारलं.. आणि माया तिची मैत्रीण..

कोणीही मायासोबत बोलत नव्हतं.. शाळेत जायची तिची ईच्छा कमी होऊ लागली ...
आईनेही तिला शाळेत पाठवायच बंद केलं..
काही दिवसांनी मायाला शेजारचे पवार काका दिसू लागले ... बोलू लागले... हे तिने आईला सांगितलं.. आई अजून घाबरली कारण ते अपघात होऊन ८ महिन्यापूर्वी वारले होते..
मांत्रिक तांत्रिक झाले तरीही मायाला मेलेली लोक दिसायचं बंद झालं नव्हत.. काही लोक तिला वेडी समजू लागले..
काही दिवस असेच गेले... आणि तिला एक माणूस दारात उभा असलेला दिसला... तो शांतपणे मायाकडे बघत बसायचा...
एक दिवस तिने जाऊन त्याला त्याच नाव विचारलं.. तर त्याने सांगितलं की त्याच नाव नागेश आहे..

आणि तो तिच्या आईचा लग्नानंतरचा प्रियकर होता.. ज्याला तिच्याच आईने संपवलं होत कारण तो घरी येऊन धिंगाणा घालायची धमकी देत होता...
आणि म्हणून डाव साधून तिच्या आईने हा घात केला होता.. त्याला आता मुक्ती हवी होती... त्याने त्याचा मृतदेह कुठ गाडलाय हे मायाला सांगितलं...

मायाला आईने अस केलेलं नाही आवडलं.. पण ती गप्प होती..
काहीच दिवसात गावात प्रकाश सर आले...
दामले सरांच्या जागी ते रुजू झाले होते... वय जेमतेम ३२, शरीरयष्टी तगडी, काळेभोर केस, निळसर डोळे तर सर्वात जास्त लक्षवेधक होते...
त्यांनी शाळेत प्रवेश करताच सर्वांच्या नजरा त्यांच्यावर होत्या.. कारण खेडेगावच्या शाळेत पहिल्यांदा एवढ कोणीतरी रुबाबदार आले होते...
शिक्षिका तर त्यांच्याकडे सतत बघायच्या.. त्यांचं काम खूप चांगलं होत.. म्हणून काहीच दिवसात ते सगळ्यांचे प्रिय झाले...

एकेदिवशी सगळे शिक्षक स्टाफ रूममध्ये जेवायला बसले होते... बोलता बोलता विषय दामलेंच्या निधनापर्यंत गेला... ते ऐकताना प्रकाश सर बारकाईने सगळं ऐकत होते.. आणि काहीच वेळात सुट्टी संपली आणि सगळेजण आपापल्या वर्गावर निघून गेले..
सरांना पुढचं जाणून घ्यायचं होत...
त्यांनी बोलता बोलता ढमाले मॅडमकडून सगळी माहिती काढली...
त्यांना आता एवढ समजलं होत की माया , प्रियाच्या भुतासोबत बोलू शकत होती...
मग त्यांनी २ दिवसात मायाला गाठलं..
घरात जाताच त्यांना समजलं की तिची आई शेतात कामाला गेली होती.. माया एकटीच घरी होती.. त्यांनी शाळेचे सर आहे अशी ओळख करून दिली म्हणून मायाने त्यांना घरात घेतलं... पाणी दिलं..

त्यांनी तिला काहीबाही विचारायला सुरुवात केली.. पण माया थोडी घाबरली होती..
जास्त काही बोलत नव्हती..
त्यांनी त्यांच्या खिशात असलेलं चॉकलेट तिला दिलं.. तशी ती थोडी खुश झाली....
आणि बोलता बोलता तीच लक्ष दारात गेलं .. तस तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलू लागले...
त्यांनी तिला याबद्दलही विचारलं पण ती काहीच बोलली नाही..

प्रकाश सरांनी ठरवलं.. दुपारी शाळा सुटली की मायाला थोडा वेळ भेटायला गेलं पाहिजे.. आणि तसच ते करू लागले..
माया आता प्रकाश सरांसोबत बोलताना दचकत नव्हती...

असेच एकदा प्रकाश सर आले असता मायाने अंगणात पाहिलं आणि पुन्हा चेहरा बारीक केला.. यावेळीही सरांनी तिला विचारलं तर ती काही बोलली नाही..
" आज जर मला सांगितलं नाहीस , तर मी पुन्हा कधीच येणार नाही " थोडासा राग आणत ते बोलले.. हे बघून मायाला वाईट वाटलं.. कारण तिलाही आता त्यांची सवय झालेली.. वडिलांचं प्रेम न भेटलेली माया नकळतपणे त्यांच्यात आपला वडील बघू लागली होती....

तिने त्यांना सगळं काही सांगितलं.. तिला अंगणात नेहमी नागेश दिसायचा आणि तो हिच्याकडे मुक्ती मागायचा..
तिने अगदी त्याच्या हत्येपासून ते त्याचे शरीर कुठ आहे.. हे सगळं प्रकाश सरांना सांगितलं...
हे ऐकुन प्रकाश सरांना राग आणि दया दोन्ही गोष्टी एकत्र जाणवला.. राग त्यांना मायाच्या आईचा आलेला.. तर वाईट नागेशच आणि हा त्रास सहन करणाऱ्या मायाच वाटू लागलं..
ते जास्त काही न बोलता तिथून निघून गेले..

पुढच्या दिवशी सकाळीच मायाच्या घरापुढे पोलिसांची गाडी आली.. आणि सोबत प्रकाश सरही होतेच... ते मायाला आणि तिच्या आईला घेऊन मळ्याकडे निघाले.. हे बघून शेजारी राहणाऱ्या माणसाने ही बातमी मायाच्या मामाला म्हणजेच गणपतला फोन करून कळवली....
मायाचा मामा शेजारच्या गावात राहायचा.. तो तडक इकडे यायला निघाली सोबतच त्याची खडूस बायको शेवंता...

इकडे पोलिसांची गाडी मळ्यात थांबली.. मायाची आई सतत विचारत होती.. " काय झालं साहेब? मी काय केलं? " पण तिच्या प्रश्नाचं उत्तर कोणीही देत नव्हत..
गाडीतून उतरून सगळे चालत चालत मोठ्या आंब्याच्या झाडाखाली आले..
तिथं पोहचताच मायाच्या आईला घाम फुटला.. पण तिने चेहऱ्यावर काही भाव आणले नाही..
" काय वो मास्तर.. हेच झाड ना? " एका पोलिसाने प्रकाश सरांना विचारलं...
" होय साहेब.. हेच झाड.." प्रकाश सरांची संमती ऐकू येताच त्यांनी तिथे खणायला सुरुवात केली.. आणि काहीच वेळात तिथं मृतदेह सापडला.. नागेशचा
सडलेला मृतदेह पाहिल्यावर माया तिच्या आईला जाऊन बिलगली.. पण तिला समजल होत की हे तिच्या आईनेच केलयं.... तशी ती परत लांब झाली आणि प्रकाश सरांच्या जवळ जाऊन थांबली...

" काय मग मॅडम? अजून काय बोलायचं. तुम्हाला? " पोलिसांचे हे शब्द ऐकून तिची आई तिथच रडायला लागली.. पोलिस तिला घेऊन गेले चौकीत..
तिथे काहीच वेळात मायाचे मामा मामी आले...
त्यांना सगळी हकीकत समजली..
आपण काहीच करू शकत नाही याच मामाला वाईट वाटत होतं.. मामीला तसाही काही फरक पडत नव्हता..
मग त्यांनी मायाकडे पाहिलं.. लहानग्या जीवकडे बघून मामाने तिला घरी न्यायचं ठरवलं..
आणि हे ऐकताच मामीने तिथच भांडायला सुरुवात केली...

असल्या आरोपी आईची मुलगी मी सांभाळणार नाही ... या तिच्या वाक्यानंतर मामा काहीच नाही बोलू शकला...
"मी काही बोलू का?" प्रकाश सरांचे शब्द कानावर पडताच सगळे त्यादिशेने बघू लागले..
"काय बोलायचं बोला" मामीचा खंबक्या आवाजात उत्तर आल...

" मी मायाला माझ्याकडे ठेवू का? म्हणजे मी तीच शिक्षण आणि सर्वकाही बघेल.. कारण आता बा तिच्या आईला जन्मठेप होणार हे नक्कीच... माझ्यासोबत माझी आई असते.. मी अविवाहित आहे .. त्यामुळे मायाला सावत्र आईचा वगैरे कसलाही त्रास होणार नाही ." एका दमात प्रकाश सर बोलून रिकामे झाले.. आणि मग मामाही तयार झाला...
त्या दिवसापासून आजपर्यत तिला त्यांनी कधीच परक असल्याची भावना करू दिली नव्हती... हेच सगळं आठवून माया हॉस्पिटलमध्ये रडत होती....
काहीच वेळात शरद आला.. त्याने मायाला जेवायला डब्बा आणला होता.. पण तिने जेवायला साफ नकार दिला ...
शरद तिची समजूत काढत होता.. पण तिने त्याचं काहीही ऐकलं नाही...

ती उठली आणि हॉस्पिटलमध्ये एका बाजूला देव्हारा होता.. तिथे ती जाऊन बसली.. आणि समोर गणपती बाप्पाच्या मूर्तीकडे बघत सरांना लवकरात लवकरात बर होण्यासाठी प्रार्थना करू लागली... ती एकटक मूर्तीकडे बघत होती.. आणि पुन्हा ती भूतकाळात हरवून गेली...
प्रकाश सरांनी तिला शहरात घरी नेलं.. ती घर बघतच राहिली.. कारण घर खूप मोठं होत.. प्रशस्त खोल्या.. सुंदर भिंती.. त्यावर चित्रं.. माया हे बघून खुश झाली.. पण तिने पहिल्यांदाच शहराचा गोंगाट ऐकला होता... पण आता तिला या सगळ्याची सवय करून घ्यावी लागणार होती... प्रकाश सरांच्या आई त्यांच्यासारख्याच मायाळू...
सरांनी त्यांना झालेली हकीकत सांगितली.. त्यांना प्रकाश सरांच कौतुक वाटलं.. आणि मग लाडाने मायाला जवळ घेतलं...
मायाला तिची खोली दाखवली..

एवढी मोठी खोली बघून माया खुश झाली... मग त्या निघून गेल्या.. माया सगळ्या रूमकडे न्याहाळून बघत होती... सर्व काही सुबक आणि आकर्षक होत..
थोड्याच वेळात तिला जेवणासाठी आवाज दिला आजीने.. हो कारण आता ती मायाची आजीच झाली होती..
जेवण करत असताना प्रकाश सरांनी बोलायला सुरुवात केली..

"तुझ नाव उद्याच मी इथल्या शाळेत टाकून येतो.. आणि मग परवा मी गावी जायला निघतो.. आणि तिथून बदलीची शिफारस करतो.." त्यांनी त्यांचं बोलणं संपवलं.. माया खुश झाली.. नवीन शाळा नवीन लोक भेटणार या गोष्टीने..
ठरल्याप्रमाणे प्रकाश सरांनी तीचं नाव शाळेत टाकलं.. माया शाळेत जाऊ लागली.. सगळकाही सुरुळीत चालू झालं.. २ महिन्यात प्रकाश सर बदली मिळवण्यात यशस्वी झाले.. आणि त्यांची बदली मायाच्या शाळेत झाली..
एका संध्याकाळी माया तिच्या खोलीत जात होती... इतक्यात तिला दिसलं की प्रकाश सरांच्या खोलीचं दार उघडं होत.. आणि कदाचित खिडकी उघडी असल्यामुळे ते दार हवेमुळे आपटत होत..
हे बघून माया ते दार बंद करायला तिथे गेली.. तिने हळूच खोलीत झाकून पहिलं... आणि जोरात तिच्या खोलीत पळत गेली..
तिने एक विचित्र गोष्ट त्या रुममध्ये पाहिली होती..
ते म्हणजे मानवी कवटी...
आणि म्हणूनच ती घाबरली होती...

काही वेळात आजीने तिला जेवणासाठी आवाज दिला.. पण माया रूमच्या बाहेर पडली नाही.. मग आजी आली.. तिने पाहिलं की माया खूप घाबरली होती...
मायाला जवळ घेत तिने विचारलं की काय झालं?
माया त्यांना बिलगली होती... थोडी शांत होऊन मायाने सगळकाही आजीला सांगितलं...
ते ऐकुन आजी नाजूक हसली... मायाला समजलंच नाही की आजी का हसली??

आजीने प्रकाश सरांना आवाज देऊन बोलावलं... आणि त्यांना झालेला प्रकार सांगितला...
प्रकाश सरांनी मायाला जवळ घेतलं आणि सांगायला सुरुवात केली...

"हे बघ माया बाळा... मी एक शिक्षक तर आहेच पण त्यासोबत मी लोकांना त्यांच्या त्रासातून मुक्त करतो.. आणि त्रास म्हणजे शारीरिक त्रास नव्हे तर भूतबाधा, करणी, भानामती या गोष्टींपासून.. आणि मी भटकत असलेल्या आत्म्याला मुक्ती कशी मिळावी यावर अनेक वर्ष सराव केला... मला ती शक्ती प्राप्त झाली.. आणि काहीच दिवसात एक माणूस मला भेटायला आला... त्याला त्याची मृत लहान बहीण रोज स्वप्नात येऊन सांगायची की तिला एक अघोरी मेल्यानंतर त्रास देतो, तिला वश करायला बघतोय.. ते ऐकुन आम्ही मागच्या अमावस्येला स्मनाशात गेलो होतो आणि खरच तो अघोरी काहीतरी तंत्रमंत्र वापरत असताना दिसला.. त्या माणसाने त्या आघोरीला खूप मारहाण केली आणि त्याची शक्ती कवटीमध्ये आहे अस समजलं म्हणून मी ही कवटी उचलून आणली.. आणि आज रात्रीच तिला नष्ट करणार आहे... घाबरु नकोस.. "
एवढ सगळ बोलून झाल्यावर त्यांनी मायाकडे बघितल तर ती हे ऐकुन बिलकुल घाबरली नव्हती... सर काहीतरी चांगलं काम करतात हे तिला समजलं होत..
तिला काहीतरी बोलायचं हे कळल्यावर सरांनी तिला बोलायला सांगितलं...
तशी ती बोलू लागली...
" तुम्हाला माहीतच आहे.. लहानपणापसूनच मला मेलेले लोक दिसताना... ज्यांची इच्छा पूर्ण नसते ते लोक.. मी तुमची काही मदत करू शकले तर नक्की करेल " तीच बोलणं झाल्यावर.. सरांनी तिच्याकडे कुतूहलाने बघितल... एवढ्या लहान वयात माया खूप समंजस होती...
" हो नक्कीच... मला तुझीच खूप गरज लागणारे.. पण आधी दहावी होउदे म्हणजे हळूहळू तुला सगळं समजवून सांगेल " सरांनी वाक्य संपवलं आणि सगळे जेवण करायला निघाले...

काहीच वर्षात मायाची दहावी झाली . ती उत्तम गुण मिळवून पास झाली... आणि मग तिथून सुरुवात झाली तिच्या खऱ्या आयुष्याला... माया कॉलेज करत करत सरांकडून भरपूर गोष्टी शिकली... तिची दहावी होई पर्यंत कोणता आत्मा तिला त्रास देणार नाही याची काळजी सरांनीच घेतली होती...
माया आणि प्रकाश सर मिळून आता काही चांगल्या आत्म्यांना मुक्ती देऊ लागले.. मायाला नेहमीच मुक्त आत्मे दिसू लागले.. आणि मग ते मिळून त्याची समस्या ऐकुन त्यावर उपाय काढून मुक्ती देत... हळू हळू त्यांचं काम वाढू लागलं.. आता त्यांना काही ठिकाणी आत्मा खरच आहे की नाही यासाठी काही खास कॅमेरे, लाईट्स, रेकॉर्डर या सर्वांची गरज भासणार होती आणि त्याच सोबत ते सगळं जमणाऱ्या व्यक्तीची... कारण आत्म्याची इच्छा असेल तरच माया त्याला बघू शकत होती...
आणि मग त्यांना शरद सापडला..
हुशार, तारुण्य भरभरून असलेला, गोरापान, आणि बोलका चेहरा असा शरद ...

त्याला सरांनी सगळंकाही समजवून सांगितलं..
तो देखील आता त्यांच्यात सामील होऊन काम करू लागला.. त्यांचं काम पवित्र होत म्हणून मनाला शांती भेटायची... तिघांची तीगडी मिळून खूप नाव कमवू लागली... पण काही चांगल्या आत्मा सोबत वाईट आत्मेही त्यांना भेटायचे... प्रकाश सरांकडे याबद्दल भरपूर ज्ञान होत म्हणून सहसा कधी त्यांना हानि झाली नव्हती... फक्त काही दिवसांपूर्वी एका बाईचं भुतं काढत असताना ती मायाला जोरात चावली होती.. पण काहीच दिवसात ती जखम नाहीशी झाली....

वाईट, चांगल्या, लहान, वृद्ध, काही सबळ तर काही दुर्बळ अश्या अनेक भूतांना यांनी मुक्ती दिली होती... असा सगळा जीवनपट मायाच्या डोळ्यापुढे उभा होता.. आणि तिने मनातल्या मनातल्या ..
गणपती बाप्पा मोरया...
म्हणत तिथून उठली...
गणपती बाप्पा मोरया...
म्हणत तिथून उठली...
काहीच वेळात डॉक्टर आले आणि त्यांनी सांगितलं की सकाळपर्यंत सरांना शुध्द येईल.. आता घाबरायच काही कारण नाही...
मायाला आनंद झाला... आत्ता आजी असती तर किती बर झालं असतं जोडीला.. अस तिला मनोमन वाटलं.. पण लाडकी आजी जाऊन आता १ वर्ष झाल होत...

घाबरण्याचे काही कारण नाही, हे शरदला समजले तेव्हा तोही आनंदी झाला.. आणि त्याने मागे लागून लागून मायाला जेवायला तयार केलं...
आणि तिला घरी जायला सांगू लागला ..
पण ऐकलं ती माया कसली....
आणि तिला घरी जायला सांगू लागला ..
पण ऐकलं ती माया कसली....
तीही हॉस्पिटलमध्ये थांबली... सकाळी १० वाजता सर शुध्दीवर आले..
लगेच त्यांना भेटून देत नव्हते.. म्हणून माया बाहेरच्या काचेतून त्यांना बघत होती.. डोळे आपोआप ओले होत होते... तिला माहीतच नव्हत की सरांची अशी अवस्था कशी झाली होती...

दुपारी मायाला आत सोडलं.. तिने जवळ जाऊन सरांना पाहिलं.. विचारपूस केली .. सरांना डोक्याला गंभीर जखम होती.. आणि हातापायाला खरचटल्याचे वण होते...
मायाला कळून चुकलं.. की तिला न सांगता सर कुठेतरी गेले असणार आणि तिथेच एखाद्या आत्म्याने हल्ला केला असणार...
पण.. सरांवर हल्ला करणारा आत्मा किती शक्तिवान असेल?

तिने मनातले विचार बाजूला केले.. आणि तिथेच बसून राहिली... आणि तिची नजर बाहेरच्या काचेवर गेली.. तिथे कोणीतरी त्याच्याकडे पाहत होते.. कोणतरी असे जे ओळखीचे वाटत होते... पण कोण?
अरे त्या तर संगिता.. ज्यांच्यावर भूत बसले असताना त्यांनी मायाला चावल होत त्या... माया उठून दरवाज्याकडे जाऊ लागली... तिने आतून दरवाजा उघडायला हात लावला आणि तेवढ्यात बाहेरून दरवाजा उघडला गेला .. ती थोडी दचकली .. पण समोर शरद होता..
तिला दचकलेल पाहून त्याने विचारलं तर तिने विषय टाळला.. आणि परत सरांकडे जाऊन बसली...
५ दिवसांनी सरांना घरी सोडण्यात आले.. घरी आल्यावर मायाने त्यांची काळजी घ्यायला सुरुवात केली.. ५-६ दिवस ती जास्त काही बोलली नाही.. पण एकदा जेवता जेवता तिने विषय काढायचा ठरवला...
" आता तरी तुम्हाला मला सांगावच लागेल की नक्की काय झालं? तुम्हाला एवढ सगळं कसं लागलं? तुमच्यावर हल्ला करणारा कोणता आत्मा होता जो एवढा शक्तिशाली होता?
तिने हा प्रश्न विचारायला आणि तेवढ्यात शरद आला..
त्यालापण सरांनी जेवायला बसवलं.. आणि सांगायला सुरुवात केली...

"मागच्याच महिन्यात आपण ती संगीताची भूतबाधा काढत असताना माझ्याकडे एक प्रकरण आल.. तुम्ही दोघं त्या कामात व्यस्त होता म्हणून मी तुम्हाला काही सांगितलं नाही...
संगीताने तुला जेव्हा चावा घेतला तेव्हा ती जखम २ दिवसात भरायला हवी होती पण ती जखम भरत नव्हती म्हणून मी काही प्रयोग करून तुला बर केलं....
जी नवीन केस माझ्याकडे आली होती ती केस सायली नावाच्या मुलीची होती.. आणि काही प्रमाणात संगितासारखी होती... सायलीने तिच्या आईच्या हाताला चावा घेतला होता आणि १५ दिवस होऊन पण ती जखम भरली नव्हती... मी सायलीला बर केलं पण त्या जखमेच शरीरात मिसळून विष तयार झालं होतं.. आणि ४-५ दिवसात सायलीची आई वारली..." सरांनी त्यांचं वाक्य संपवलं...

" पण मग आता तुम्हाला कसं लागलं? ते दोन्ही प्रकरण तर संपले होते ना? " मायाने प्रश्न विचारला ...
" हे सगळं झाल्यानंतर मला जाणवू लागलं की हे जास्त वाढू शकत म्हणून मी या सगळ्याचा छडा लावण्याचं ठरवलं... मी सायलीला विचारलं तर ती बोलली की शहरापासून लांब एक बंगला आहे एकटाच.. आजूबाजूला झाडी नुसती.. टेकडीच्या बरोबर मधोमध.. त्याच टेकडीच्या पायथ्याशी एक हॉटेल आहे... तिथं ती आणि तिच्या मैत्रिणी पिकनिसाठी गेल्या होत्या... त्या सगळ्याजणी फिरायला गेल्या..
आणि त्यांना तिथं हा बंगला दिसला... त्यांना त्या बंगल्याबद्दल थोडीही कल्पना नव्हती... म्हणून त्या आत गेल्या नाहीत...
त्यांनी पूर्ण डोंगर फिरला आणि संध्याकाळ होणार म्हणून हॉटेलकडे निघाल्या... जाताना बंगल्याच्या रोडने जाव लागणार होत... आणि मग त्या तिथे पोचल्या.. सायली एकटीच मागे होती... बाकीच्या पुढं होत्या.. ती तिच्या मोबाईलमध्ये फोटो काढत बसली होती... तिच्या मैत्रिणी पुढे निघून गेल्या.. तिला आवाज दिला तर ही बोलली पुढे व्हा.. येतेच मी... सूर्योदयाच्या फोटोमध्ये सायली मोहून गेली...

थोडा अंधार दाटून आला.. ती बंगल्याच्या गेटवर पोचली इतक्यात तिला समजल की सकाळी बंद असलेला बंगल्याचा गेट आता उघडा होता...
तिने नीट त्या बंगल्याकडे पाहिलं.. नजर फिरवताना तिला एका खिडकीत एक पोरगी दिसली... लहान पोरगी...
ती मुलगी रडकुंडीला आली होती... आणि सायलीला जवळ बोलवत होती... लहान मुलीला बघून सायली धावत तिच्याकडे गेली... पण बंगल्याचे दार बंद होते... तिने खूप दार उघडायचा प्रयत्न केला पण काहीही फायदा झाला नाही... म्हणून ती थोडी मागे येऊन खिडकीत त्या पोरीला बघू लागली... आणि समोर बघून ती खूप घाबरली... कारण त्या मुलीच्या मागे एक काळी सावळी उभी होती... आणि पुढच्याच क्षणी त्या सावलीने त्या लहान मुलीचे डोकं देहापासून वेगळं केलं.. हे बघून सायली किंचाळून खाली कोसळली...
काही वेळाने तिला शोधायला तिच्या मैत्रिणी आणि त्या हॉटेलमध्ये काम करणारे ३ पुरुष आणि १ महिला त्यांच्यासोबत आले.. ती महिला म्हणजे संगीता.. ती त्याचं हॉटेलमध्ये साफसफाईचे काम करते... आठवड्यातून २ दिवस शहरात घरी येते... त्यांना त्या बंगल्याच्या बंद गेटच्या आतमध्ये सायली दिसली... गेटच कुलूप तोडून गेट उघडला आणि सगळे आत गेले.. सायलीला शुध्दीवर आणलं.. तीच डोकं जड झालेलं ... आणि ते सगळे तिथून निघून येत होते.. तेवढ्यात संगीताला ती लहान मुलगी आणि ती सावली त्या खिडकीत दिसली... तिने कोणाला काय सांगितलं नाही आणि तिथून निघून आली... तेव्हापासून त्या दोघींना त्रास सुरू झाला..." एवढी मोठी गोष्ट सांगून सरांनी पाणी पिल.. आणि पुढचं सांगू लागले... माया आणि शरद हे सगळं बारकाईने ऐकत होते...

" ही सगळी माहिती गोळा करून मी त्या बंगल्यात जायचं ठरवलं... मी तुम्हाला नंतर सांगणारच होतो.. पण हा घात झाला... मी बंगल्याच्या जवळ गेलो तर दिसलं गेटचं कुलूप तुटल होत.. म्हणून मी बंगल्याच्या चारही बाजूने एका फेरफटका मारला.. आणि दार उघडायचा प्रयत्न करू लागलो... पण दार उघडत नव्हतं... म्हणून मी पवित्र वस्तू म्हणजेच गंगाजल आणि मला एका सिद्ध साधू कडून भेटलेला भस्म एकत्र केला आणि ते दार उघडलं...
दार उघडताच खूपच घाण वास नाकात गेला.. अश्या वासाची तर मलाही सवय नव्हती एवढा घाण वास आला.. मी त्या बंगल्यात फेरफटका मारायच ठरवलं...
मी वरच्या खिडकीजवळ गेलो जिथ सायलीला आणि संगीताला ती मुलगी आणि सावली दिसली... पण तिथे मला काहीच नाही जाणवलं... मी खिडकीतून बाहेर बघत होतो तेव्हा मला खिडकीच्या बाहेर संगीता उभी दिसली... मला काही समजलंच नाही.. तेवढ्यात मागून एक नाजूक आवाज आला..
" काका तुम्ही इथ का आले? का आले काका? " मी मागे वळून बघितलं तर तिथे कोणीच नव्हत... झटकन मी बाहेर बघितल तर तिथेही कोण नव्हत....
मागून मला पळत जायचा आवाज आला.. मी मागे मान वळवली तर ती भयानक सावली माझ्या चेहऱ्याचा पुढ होती.. इतकी जवळ की तिचा गरम श्वास आणि सडका वास मला सहज जाणवत होता.. आणि मला काही कळायच्या आत त्या सावलीने मला त्या खिडकतून एखाद्या बाहुलीसारखे फेकून दिलं... मी खाली जोरात दगडावर आपटलो...
काही वेळाने काही टेकडी फिरायला गेलेल्या मुलांच्या ग्रुपला मी दिसलो आणि त्यांनी मला उचलून हॉस्पिटलकडे आणल... माझा काही वेळ डोळा उघडला होता.. तेव्हा ती मुल मला उचलून नेत होती.. मी त्या खिडकीकडे बघितल तर मला दिसलं की खिडकी जशीच्या तशी होती... काहीच फुटली नव्हती.. पण ती काळी सावली तिथेच होती.."
सरांचं वाक्य संपलं आणि थोडावेळ स्मशानशांतता पसरली.. कोणीच काहीच बोललं नाही.. मायाला थोडी भीती वाटली कारण सरांना इजा केली ती शक्ती खूप ताकदवान होती..
आणि तिला झटक्यात तो प्रसंग आठवला.. संगीता हॉस्पिटलमध्ये दिसलेली तो.. तिने ते बोलूनही दाखवलं... सरांनी जेवण झाल्यावर तिघे एकत्र बसले असताना संगीताच्या नवऱ्याला फोन केला..
त्याच वाक्य ऐकुन सगळे गप्प झाले.. सरांनी त्याला संगीताबद्दल विचारायला फोन केला होता.. पण तो म्हणाला की...
" संगीताला जाऊन आता १५ दिवस झाले " ....

क्रमशः