" भ्रम "
भ्रम-Marathi bhutkatha online book |
विज्ञानानं आज कितीही प्रगती केली तरी "काळ " हे विज्ञानासाठी न सुटणारं कोडं आहे.विज्ञानानासाठी काळ आजही एक न उलगडलेलं रहस्य आहे कारण, काळाच्या शोधात विज्ञानाचे कितीतरी सिद्धांत कोणत्याही निष्कर्षाविना,फक्त शक्यतेच्या पातळीवर अनुत्तरित राहिले आहेत. आणि काळ !.... काळ मात्रं वेळेच्या प्रवाहात दुसऱ्या टोकाला निरंतर पुढं सरकतोय.आणि आपण त्या काळासोबत दिवसेंदिवस बुडत जातोय.पण काळ अजूनही आपल्यासाठी अनोळखीच आहे. कदाचित काळ एक अशी वस्तू असू शकते जी आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहे.किंवा काळ एक "भ्रम" ही असू शकतो!
दार सताड उघडंच होतं म्हणून P D सरळ आत आली होती. पण पहाटे सहा वाजता असा सताड उघडा दरवाजा पाहून तिलाही थोडं आश्चर्य वाटलं होतं.कारण उचभ्रु सोसायटीत पंचविसाव्या फ्लोरवर दिवसापण दारं उघडी नसतात आणि प्रमोदलाही दार उघडं ठेवून बसायची सवय नव्हती,साहजिकच P D ला आश्चर्य वाटणारच.P D म्हणजे प्रियवंदा देशपांडे ! वय वर्षे वीस,गोरा रंग, नाजूक कमनीय बांधा आणि त्यात गारे डोळे.कुठल्याही पुरुषाला भुरळ पडावी असं सौंदर्य. प्रमोदच्याच सोआयटीत फर्स्ट फ्लोर ला राहणाऱ्या मुकुंद देशपांडे यांची धाकटी मुलगी. प्रियवंदा हे नाव ऐकल्यावर आपल्या डोळ्या समोर संगीत नाटकातील सोजवळ तरुणी उभी राहील, पण तसं नाहीए.कारण प्रियवंदा देशपांडे हे नाव तिच्या बोल्ड आणि स्वतंत्र व्यक्तिमत्वाला अजिबात शोभत नाही म्हणूनच, प्रमोदने "P D "हे शॉर्ट नामकरण केलं होतं.आणि हे नाव पीडीलाही खूप आवडलं.प्रमोद आणि पीडीची पहिली भेट शिवाजी पार्कात मॉर्निंग वॉल्कला झाली होती.प्रमोद पीडी पेक्षा पंधरा वर्षांनी मोठा असला तरी तो मनानं तरुण आणि मोकळ्या विचारांचा असल्यामुळे दोघात लवकर मैत्री झाली.पीडी आपल्या मित्र,मैत्रिणी बॉयफ्रेंड सोबत ज्या गोष्टी share करत नव्हती ते प्रमोदला बिंदक्तपणे सांगत असे. जागतिक अर्थव्यवस्थेपासून बॉलिवूड, क्रिकेट, राजकारण, स्टॉक मार्केट, इंशुरन्स पॉलिसीस ते सेक्स अगदी वाट्टेल त्या विषयांवर दोघं भरपूर चर्चा वादविवाद करत.प्रमोदला पीडी सारख्या सुदंर कॉलेजतरुणी सोबत फिरताना पाहून,पार्कातल्या सगळ्याच वयोगटातल्या पुरुषांना प्रमोदचा हेवा वाटे.पीडी आणि प्रमोद म्हणजे शिवाजी पार्कातील कुतुहलाचाच विषय होता.मोर्निंग वॉल्कला कधीही दांडी न मारणारा प्रमोद गेले दोन दिवस पार्कात फिरकला नव्हता.म्हणून,पीडी पहाटेच घरी आली होती. दरवाजा उघडा पाहून पीडीला थोडं आश्चर्य वाटलं पण कसली शंका आली नाही. 'प्रमोद'...पीडी आवाज देत आत आली आणि पाहते तर हॉलमधला लाईट पंखा चालूच होता. हॉलमध्ये सर्वत्र सिगारेटच्या धुराचा वास दरवळत होता,पण प्रमोद कुठं दिसत नव्हता म्हणून पीडी ने पुन्हा आवाज दिला "प्रमोद!" पण कुठलाच प्रतिसाद नाही. पीडीनं बेडरूम, किचन, स्टोररूम, ड्रॉईंगरूम सगळीकडे शोधलं पण प्रमोद कुठेच नव्हता. आता मात्रं पीडीला काळजी वाटू लागली.फोन करून बघावं म्हटलं तर मोबाईल घरी ठेवला होता.पीडी हॉलमध्ये येऊन सोफ्याबर हताशपणे बसली आणि तिच्या लक्षात आलं की सिगारेटचा वास आतल्या खोलीत येत नव्हता पण इथं हॉलवर अजूनही येतोय,तसं पीडी आजूबाजूला निरखून पाहू लागली,आणि तिचं लक्ष सोफ्याच्या मागे ओपन गॅलरीकडे गेलं. गॅलरीजवळचा पडदा वाऱ्यानं झुलत होता.ही जागा बघायची राहिली म्हणून पीडी उठली आणि गॅलरीचा पडदा बाजूला करून पाहते तर प्रमोद आराम खुर्चीत सिगारेट ओढत बसला होता आणि खाली जमिनीवर असंख्य सिगारेटची तोटकं पडली होती. जवळ जवळ तोटकांचा ढीगच जमा झाला होता म्हणायला हरकत नाही. सदैव हसतमुख, आनंदी असणारा प्रमोद अबोलपणे अंतर्मुख होऊन खोल विचारात इतका बुडाला होता की त्याला आजूबाजूचं कशाचंही भान नव्हतं. कसला विचार करत असेल ?कारण हसतमुख हजरजबाबी आणि सतत अविरत बडबड करणाऱ्या प्रमोदला असं गंभीर,अबोल पाहून पीडीला धक्काच बसला. मघापासून पीडी प्रमोदला हाका मारत होती पण आता प्रमोद समोर होता तरी पीडीच्या तोंडातून एक शब्द फुटत नव्हता. कारण तो एखादया पाषाणा सारखा भासत होता. ती निशब्दपणे प्रमोदकडे फक्त पाहत उभी होती आणि प्रमोद आकाशाकडे बघत मलूलपणे आराम खुर्चीवर पडून होता. त्याच्या डोळ्यांच्या बुबुळांचीही साधी हालचाल होत नव्हती,फक्त सिगारेट ओढताना हाताची होणारी हालचाल आणि नाका तोंडातून निघणारा धूर.. बस्स... या व्यतिरिक्त कसलीच हालचाल होत नव्हती. माणूस एकतर भीतीनं किंवा अतिव दुःखानं गंभीर परिणामांच्या विचारांत खोल रुतत जातो पण प्रमोदच्या चेहऱ्यावर कुठेच भयाची अथवा दुःखाची एक रेष दिसत नव्हती. तरीही त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण गुंतागुंत मात्र दिसत होती. आणि ही विलक्षण गुंतागुंतच पीडीला आणखी संभ्रमात टाकत होती. प्रमोद जागा होता पण कुठंतरी लांब दूरवर पोहोचला होता, तिथून त्याला परत आणण्यासाठी जाग करणं गरजेचं होतं.पण पीडी प्रमोदला स्पर्श करायलाही घाबरत होती. तिनं एकदोनदा आपला हात त्याच्या खांद्याजवळ नेऊन भीतीनं पुन्हा मागे आणला होता.तरीही पुन्हा धीर करत ती हळूहळू त्याच्या समोर जाऊन उभी राहिली.पीडी समोर दिसताच प्रमोदच्या डोळ्यांत हलकी हालचाल झाली तसं तो पूर्ववत भानावर आला. प्रमोदने शांतपणे पीडी कडे पाहत 'तू इथे यावेळी'... अगदी थंड आवाजात विचारलं तसं पीडीला थोडस हायस वाटलं. कारण तिला जसं वाटल होतं तसं काहीच नव्हतं.प्रमोदला आजूबाजूच्या परिस्थितीचं चांगलंच भान होतं, पण तरीही त्याच्या बोलण्यात तो नेहमीचा उत्साह, उत्स्फूर्तपणा नव्हता. चेहरा अगदीच निस्तेज आणि केविलवाणा झाला होता. कपडे मळले होते, अंगाला उभट वास येत होता. एकंदरीत प्रमोद हरवल्या सारखाच झाला होता. 'गेले दोन दिवस तू वॉल्कला आला नाहीस म्हणून मी बघायला आले,आणि इथं येऊन पाहते तर दरवाजा सताड उघडा'
पीडीे प्रमोदच्या माथावर हात लावून ताप आहे का बघू लागली
'मला वाटलं आजारी पडला की काय! पण ताप वगैरे नाहीए.आणि हा केवढा वास येतोय अंगोळ केली नाहीयेस का !उठ आणि आधी अंगोळ कर तोपर्यंत मी चहा करते.'
प्रमोद काहीच न बोलता उठला आणि बाथरूममध्ये गेला.पीडी त्याच्याकडे पाहतच उभी राहिली,तिचा विश्वासच बसत नव्हता की, हा प्रमोद आहे.दोन दिवसात तो जास्तच प्रौढ दिसत होता.असं म्हणतात जास्त मानसिक ताणाचा माणसाच्या शरीरवर, मनावर परिणाम होतो तसा त्याच्या वयावरही होतो.आणि हे सगळे परिणाम प्रमोदमध्ये स्पष्ट दिसत होते.पीडीने गॅलरीतला सिगारेटचा कचरा साफ केला आणि दोन आराम खुर्च्यांच्या मध्ये छोटं टेबल ठेवून सगळं नीटनेटकं मांडून ठेवलं आणि किचन मध्ये गेली.
थोड्या वेळानं एका प्लेटमध्ये चहा, ब्रेड टोस्ट घेऊन हॉलमध्ये आली.प्रमोद डायनिंग टेबलजवळ खुर्चीवर शांत बसला होता.पण त्याचं विचारचक्र अविरत चालूय हे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं.पीडीने स्मित करत प्लेट टेबलवार ठेवली आणि प्रमोदच्या बाजूला खुर्चीवर बसून बोलू लागली
थोड्या वेळानं एका प्लेटमध्ये चहा, ब्रेड टोस्ट घेऊन हॉलमध्ये आली.प्रमोद डायनिंग टेबलजवळ खुर्चीवर शांत बसला होता.पण त्याचं विचारचक्र अविरत चालूय हे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं.पीडीने स्मित करत प्लेट टेबलवार ठेवली आणि प्रमोदच्या बाजूला खुर्चीवर बसून बोलू लागली
पीडी -'मला माहीत नाही तुला आवडेल की नाही पण, मी आज पहिल्यांदाच नाश्ता बनवलाय.So मी आधीच सॉरी बोलते हा !
प्रमोदने टोस्टचा एक तुकडा उचलून तोंडात टाकला आणि पीडीकडे स्मित करत" nice "म्हणाला तसं गंभीर वातावरण एकदम हलकंफुलकं झालं.
पीडी प्रमोदच्या हातात हात गुंफत त्याच्या दंडावर आपलं डोकं टेकवत थँक्स थँक्स थँक्स म्हणत बिलगली.
प्रमोद चहाचा एक गोठ घेत बोलू लागला, पण त्याच्या बोलण्यात थंडपणा होता.
पीडी प्रमोदच्या हातात हात गुंफत त्याच्या दंडावर आपलं डोकं टेकवत थँक्स थँक्स थँक्स म्हणत बिलगली.
प्रमोद चहाचा एक गोठ घेत बोलू लागला, पण त्याच्या बोलण्यात थंडपणा होता.
प्रमोद -i know तुला माझं वागणं विचित्र वाटत असेल
पीडीने डोळे चमकावून प्रमोदकडे पाहिलं आणि थट्टेच्या स्वरात म्हणाली 'हो तर ! मला वाटलं तू स्किजोफ्रेनिक झालास की काय '!... म्हणत हसू लागली.. 'नाहीतरी हे असले मानसिक आजार तुझ्या सारखं एकटं जगणार्यांनाच जास्त प्रमाणात होतात but thnk god ! तुला असलं काही झालं नाही.'डोळे मोठे करत लाडिक रागात बोलू लागली.
पीडीच्या बोलण्याकडे प्रमोदचं लक्षच नव्हतं म्हणजे त्याला विचार करण्यातच जास्त रस वाटत होता.प्रमोदने खिशातून सिगारेट काढून शिलगावताच पीडी तावातावात त्याला दटावणीच्या स्वरात बोलू लागली.'अरे किती सिगारेट ओढतोयस !कचऱ्याचा डब्बा सगळा भरून गेलाय,आणि तू सिगारेट सोडणारयस म्हणाला होतास !'
पीडीच्या ओरडण्याला जास्त महत्व न देता प्रमोदने विचार करत करत एक प्रश्न विचारला
'तू सायन्स student आहेस ना ?'
प्रमोदच्या या प्रश्नानं पीडी एकदम गोधळली आणि आश्चर्यानं 'हो 'म्हणाली
प्रमोद पीडीशी बोलत होता पण स्वतःच्या विश्वात हरवल्यासारखा. तो तिच्याबरोबर फक्त बसला होता पण त्याचं मन विचारचक्रात गुंतलं होतं ,आणि त्याच मनाला काही उत्तरं हवी होती. प्रमोद चहाचा कप उचलत उठला आणि स्वतःच्याच विचारात चालत चालत पीडीला एक प्रश्न विचारला...
'मला सांग what is the defination of time!
पीडीने एकक्षण प्रमोदकडे कुतूहलानं पाहिलं,प्रमोद चालत चालत गॅलरीत गेला आणि बाहेर बघत उभा राहिला.प्रमोदचा प्रश्न विसंगत वाटला तरी तो अर्थहीन मुळीच नव्हता.पीडी फिजिक्स स्टूडेंट असल्यामुळं तिच्याकडे या प्रश्नाचं सविस्तर उत्तर होतं.पीडी खुर्चीवरून उठली आणि गॅलरीकडे आरामशीर जात सविस्तरपणे बोलू लागली.
पीडी -'well ! विज्ञानात काळाची डेफिनेशन्स म्हणशील तर अनेक आहेत. म्हणजे अनेक सायंटिस्ट्सनी यावर रिसर्च केलंय,पण काळ exact काय आहे हे कुणीच ठामपणे सांगू शकलं नाही! अल्बर्ट आइन्स्टाइन च्या थेअरी ऑफ रॅलेटिव्हीटी सिध्दांता नुसार, काळ कधीच स्थिर नसतो तो सतत move होत असतो,पुढे जात असतो. पण या काळ वेळेच्या गतीत ग्रॅव्हिटीच्या प्रभावाचा फरक मात्रं दिसू शकतो. म्हणजे वेगवेगळ्या स्थळ काळातील ग्रॅविटीच्या प्रभावानं वेळेची गती कमी जास्त होऊ शकते हे अल्बर्ट आइन्स्टाइन यांनी त्यांच्या सिद्धांता वरून जगासमोर मांडले. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर time, वेळ एक भ्रम ही असू शकतो. प्रमोद ! Time, काळ, वेळ ही एक सतत आणि अविरत चालणारी प्रक्रिया आहे,जी दिसत नाही पण बदलातून ती आपल्याला जाणवत असते. आता हेच बघ न ! आपण काळाला भूत, वर्तमान आणि भविष्य काळाच्या रूपात ओळखतो. पण या काळाच्या बाबतीत एक विचित्र विसंगती आहे,आणि ती म्हणजे आपण सतत वर्तमानात राहून सुद्धा वर्तमानात जगू शकत नाही ! कारण आपला वर्तमानातला प्रत्येक क्षण भूतकाळात रूपांतरित होतोय,आणि आपण भूतकाळाला मागे टाकत पुढे भविष्याकडे वाटचाल करतोय. वेळेचं एक विचित्रच गणित आहे,ते म्हणजे आपण वर्तमानात राहून भूतकाळ आणि भविष्यकाळ संग्रहित करू शकतो. म्हणजे एखादी ऐतिहासिक घटना किंवा लग्न सोहळा आपण डिवाइस मध्ये रेकॉर्ड करून संग्रहित करू शकतो. अगदी याचप्रकारे "भविष्य "ही सुद्धा एक न रिकॉर्ड केलेली blank टेप आहे. आपल्याला काळाची अनुभूती भूत, वर्तमान आणि भविष्य काळाच्या रूपात नेहमीच एक भ्रम निर्माण करत असते !'
प्रमोद सिगारेट ओढत गॅलरीतून बाहेर बघत होता पण त्याचं सगळं लक्ष पीडीच्या बोलण्याकडे होतं. सिगारेट संपताच बोटानं हलकी टिचकी मारत प्रमोदनं सिगारेट बाहेर फेकून दिली. पीडी बाजूला येऊन उभी राहिली आणि गॅलरीच्या कठड्यावर हाताचे दोन्ही कोपरे पसरवून, तळहाताचा ओंजळीत कप पकडत,चहाचा गोठ घेत एक उदाहरण देऊ लागली.
पीडी -'आता हेच बघ !आपण इथं स्थिर उभं आहोत,कसलीच हालचाल करत नाही आहोत!म्हणजे वेळ आपल्यासाठी स्थिर आहे का ? तर नाही! कारण आपण इथं स्थिर जरी उभे असलो तरी पृथ्वी स्थिर नाहीए,ती निरंतर गतीनं सूर्याभोवती फिरतेय त्यामुळे वेळही पुढे सरकतोय पण आपल्याला त्याची जाणीव होत नाहीए. वेळ ही काँस्टंट्स कधीच नसते कारण ती सतत चालत राहणारी एक प्रक्रिया आहे.
प्रमोद हम्म करीत म्हणाला... 'म्हणजे काळ यंत्रासारखी अविरत चालणारी प्रक्रिया आहे !
पीडी आपले ओठ पसरत हसऱ्या स्वरात म्हणाली 'correct !
प्रमोदने शर्टच्या खिशातून सिगारेट पाकीट काढलं आणि सिगारेट दोन बोटांमध्ये पकडत, पाकिटावर टिचकी मारत विचार करत , बाजूच्या खुर्चीत बसत तंद्रीत बोलू लागला ..
'म्हणजे!यंत्रात जसा बिघाड होतो तसा वेळेच्या प्रक्रियेतही बिघाड होऊन,काळात विसंगती निर्माण होऊ शकते !'
पीडीने कपात उरलेला थंड चहा एका झटक्यात पिला आणि कप कठड्यावर ठेऊन प्रमोदच्या समोर खुर्चीवर येऊन बसली. प्रमोदनं तंद्रीतच सिगारेट शिलगावली आणि आराम खुर्चीत रेटून पीडीचं बोलणं ऐकू लागला
पीडी -its quit posible ! 'आईनस्टाईन च्या सापेक्षतावादाप्रमाणे काळ हे विश्वाचे एक वैशिष्टय आहे आणि त्यात पुढे मागे जाता येऊ शकते. रज्जू सिद्धांताप्रमाणे (स्ट्रिंग सिद्धांत) स्थळाच्या ३ हुन अधिक मिती आहेत त्यामुळे आपण भूतकाळात प्रवेश करू शकतो किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणी काही वेळासाठी उद्भवलेल्या स्थल-काळातील विसंगतीमुळे (anomaly) अचानक वेगळ्या मितीत प्रवास होऊ शकतो. वेळेच्या सापेक्षतेमुळे त्या स्थळ काळात आपण काही सेकंदांसाठी राहिलो तरी त्या काळातील ती काही वर्षे असू शकतात.
प्रमोदने धुराचा भपकारा हवेत सोडला व आश्चार्यानं पीडी कडे बघितलं.
प्रमोद -'म्हणजे ! स्ट्रिंग सिद्धांता प्रमाणं काळाच्याही तीन हुन जास्त मिती असू शकतात ?'
पीडी -'yes !that's call पॅरलल युनिव्हर्स थेअरी ! त्या तीन हुन जास्त मितीत म्हणजे डायमेशन्स मध्ये आपल्या सारखीच समांतर विश्व् असू शकतात
प्रमोद -समांतर विश्व् ?
पीडी -'yes ! समांतर विश्व्...समांतर विश्वा बद्दल विज्ञानात अनेक मतमतांतरे असले तरीही विज्ञान समांतर जगाला नाकारू शकत नाहीए.विज्ञानाच्या मते वेगवेगळ्या डायमेन्शन्स मध्ये अनेक समांतर जग असू शकतात.पण त्या समांतर जगात थोडाफार फरक असू शकतो.कदाचित तिथले फिजिक्सचे law वेगळे असू शकतात किंवा वेळ, ग्रॅव्हिटी इथल्या जगापेक्षा वेगळी असू शकते किंवा नसूही शकते ! सोप्प्या पद्धतीनं सांगायचं झालं तर समांतर जगात आपली प्रतिमा उलट असू शकते !'
प्रमोद -'म्हणजे ?'
पीडी -'म्हणजे, तू या जगात "बॅचलर "आहेस आणि समांतर जगात कदाचित तुझं लग्न झालं असेल, नऊ, दहा मुलं झाली असतील !'
बोलता बोलता पीडी हसू लागली.
पीडी -im सॉरी ! 'जरा हे जास्तच झालं पण अशा वेगवेगळ्या शक्यता असू शकतात.वेगवेगळ्या डायमेन्शन्स मध्ये आपण वेगवेगळं किंवा अगदी हेच आयुष्यही जगत असू,फक्त तिथं काळ बदलेला असेल.कदाचित मी त्या जगात म्हातारी झाली असेन किंवा तू शाळेत जात असशील !अशा अनेक शक्यता असू शकतात.भविष्यात कधी न कधी विज्ञान समांतर विश्वाचं गूढ उकलून काढेलच म्हणून आत्ता आपण या गोष्टीचा जास्त विचार न करता या जगातला प्रत्येक क्षण आनंदाने अनुभवायला हवा !'
प्रमोदनं शेवटचा झुरका मारून सिगारेट टाकली आणि विस्कळीतपणे बोलू लागला.बोलताना त्याच्या मनात वाढत चाललेला गुंता पीडीला स्पष्ट जाणवत होता.
प्रमोद -'तुला असं नाही वाटत !आपण पुन्हा तेच,तेच रिपीट आयुष्य जगतोय.म्हणजे प्रत्येक डायमेन्शन्स मध्ये वेगवेगळ्या काळात सगळं रिपीट होतंय?time रिव्हर्स?.. Yes ! Time रिव्हर्स होतोय ! पण मग...
प्रमोद खूपच गुंतत चालला होता,त्याला बाहेर काढणं गरजेचं होतं.म्हणून पीडी अतिशय काळजीनं बोलू लागली
पीडी -'प्रमोद काय प्रॉब्लेम झालाय ?... मी तुला असा हरवलेला नाही पाहू शकत. मला विश्वासच बसत नाहीए की तू प्रमोद आहेस.स्वतःमध्ये इतका गुंतू नकोस वेडा होशील ! बोल काय प्रॉब्लम झालाय !
प्रमोद -'कसं सांगू तुला !
पीडी -'कसं सांगू म्हणजे ?'
प्रमोद -'मलाच ते नीट कळत नाहीए,सगळा गोंधळ उडालाय!गेले दोन दिवस मी झोपलो सुद्धा नाहीए !'
हे ऐकून पीडीला एकदम धक्काच बसला
पीडी -'काय !म्हणजे गेले दोन दिवस तू फक्त विचार करत बसला होतास ?तरीच तू असा एकदम थकलेला दिसतोयस. प्रमोद exact काय झालंय ते सांगशील !
प्रमोद -'तुझा कदाचित विश्वास बसणार नाही,पण हा विचित्र प्रकार माझ्या बरोबर घडलाय, मी स्वतः तो अनुभवलाय !
पीडी -'हे बघ आता जास्त विचार करून स्वतःला आणखी त्रास नको देऊ. मला सांग तरी काय झालंय!
प्रमोद -'परवा मला एक call आला होता.'
पीडी -'कुणाचा ?'
प्रमोद -'तोच विचार करतोय, काही ठरवताच येत नाहीए,तर्कच लागत नाहीए.म्हणजे कसं शक्य आहे हे ?'
पीडी -'तू काय बोलतोयस मला काहीच कळत नाहीए!'
प्रमोद -'मला एक cll आला होता !'
पीडी -'हा मग तेच विचारतेय कुणाचा cll होता !आणि काय बोलणं झालं तुझं की,तू इतका कन्फ्यूस झालायस.'
प्रमोद -'परवा मी ऑफिसच्या कामासाठी पुण्याला गेलो होतो.'
पीडी -'yes i remember ! तू सकाळच्या फ्लाईटने जाऊन रात्री परत येणारयस म्हणाला होतास. '
प्रमोद -'दुपारी तीन वाजता मिटिंग संपवून मी कंपनीच्या गेस्ट हाऊसला आलो.शहरापासून दूर अगदीच आडबाजूला, निसर्गाच्या सानिध्यात ते गेस्ट हाऊस होतं.Wifi आणि मोबाईलचं नेटवर्क सोडलं तर तिथं सगळ्या सुविधा होत्या,त्यामुळं जास्त काही त्रास नव्हता. आमच्या गेस्ट हाऊस समोर एक उंच टेकडी होती.खिडकी उघडताच ती हिरवीगार टेकडी दिसायची.मला ती टेकडी जवळ जाऊन बघायची होती.तसंही रात्री दहाच्या फ्लाईटने मुबंईला यायला निघणार होतो. म्हटलं जायच्या आधी त्या टेकडीवर जाऊन येऊ!गेस्ट हाऊसची देखरेख करणाऱ्या काकांना माझा बेत बोलून दाखवला,तसं त्यांनी माझ्या सोबतीला गावातल्या एका मुलाला,बंड्याला बोलावलं.बंड्या आणि मी जंगल तुडवत संध्याकाळी पाच वाजता टेकडीवर पोचलो. वरती पोहोचल्या पोहोचल्या आम्ही दोघं पटकन धाप टाकून शांत पडून राहिलो.आणि तितक्यात माझा मोबाईल वाजू लागला. तसं बंड्या म्हणाला "सायब काय भारी नेटवर्क तुमच्या मोबाईलला! या अख्ख्या भागात नेटवर्क पकडत नाय ." मी call उचलला तर समोरून एक शाळकरी मुलगा खूप उत्साहानं बोलत होता.
पीडी -काय बोलला तो आणि तुला कसं कळलं की तो शाळेत जाणारा होता ?
प्रमोद -cll उचलला तसं तो मोठ्यानं ओरडला "पप्पा you know what ?मला 80%मिळाले आहेत! तुम्ही म्हणाला होता दहावीला 70%टक्के काढ आणि सायकल घे,आता तुम्ही येताना सायकल घेऊन या! त्याचा उत्साह आणि आनंद बघून मलाही मज्जा आली,म्हणून मी पण त्याच्याशी बोलू लागलो.Oh अभिनंदन.अरे पण हे वय सायकल चालवायचं आहे का रे !अरे मस्त बुलेटवर girlफ्रेंड ला फिरवायचं सोडून सायकल कसली चालवतोस ! माझा आवाज ऐकताच तो मुलगा म्हणाला 'oh सॉरी बहुतेक wrong नंबर लागलाय पण मी नंबर बरोबर लावला होता ?'त्यावर मी त्याला म्हणालो 'अरे आनंदाच्या भरात होतं असं कधी कधी 'आणि मी त्याला त्यांचं नाव विचारणार तितक्यात नेटवर्क गेलं.
पीडी -ok मग यांत प्रॉब्लम काय आहे ?
प्रमोद -'आहे प्रॉब्लम ! टेकडीवर थोडा वेळ घालवल्या नंतर मी गेस्ट हाऊसला आलो.रात्री एअरपोर्ट ड्रॉप करायला बंड्या आला होता.त्याची गाडीत बडबड सुरूच होती पण मी मात्र त्या मुलाच्या cll चा विचार करत होतो.मला काहीतरी खटकत होतं पण काय ते कळत नव्हत
पीडी -म्हणजे
प्रमोद -म्हणजे मला असं वाटत होतं की, हे असं आधी माझ्या बरोबर घडलंय.
पीडी -ohh deja vu त्याला deja vu असं म्हणतात म्हणजे ! एखादी घटना अथवा क्षण आपण पुन्हा जगतोय असा भास होतो. काहींच्या मते या आपल्या समांतर जगात अनुभवलेल्या आठवणी असू शकतील.
प्रमोद -'नाही हे deja vu नाहीए आणि भास तर मुळीच नाही ! पण त्याच्याशीच निगडित काहीतरी आहे,रात्रभर फ्लाईट मध्ये विचार केल्यावर मी अगदी जिवंतपणे अनुभवलेला तो क्षण आठवला आणि माझी झोपच उडाली.मुंबईत आल्यावर सकाळीच मी घाटकोपरला गेलो.'
पीडी -कशासाठी ?
प्रमोद -'मी आधी घाटकोपरला राहायचो '
पीडी -'पण त्याचा त्या कॉलशी काय संबंध ?'
प्रमोद -आहे, खूप गहिरा संबंध आहे
पीडी -'म्हणजे !
प्रमोद -'घाटकोपरला सिद्धिविनायक जनरल स्टोर्स आहे, म्हणजे होतं आधी !' आणि तो call त्या जनरल स्टोर्सच्या pco वरूनच आला होता !'
पीडी -'पण हे तुला कसं ठाऊक !आणि आधी तिथं दुकान होतं म्हणजे ?'
प्रमोद -'म्हणजे ते दुकान आधी तिथं होतं पण आता नाहीए! तिथं आता इंडस्ट्रियल कंपनी उभी राहिलीय,सगळा एरिया डेव्हलप झालाय.'
पीडी -'अरे !पण मग त्या नंबरवर cll करायचा ना!'
प्रमोद -'केला होता ! पण तो नंबरच अस्तित्वात नाहीए.आणि ज्यांचं दुकान होतं ते पाच वर्षांपूर्वीच बदलापूरला कायमचे शिफ्ट झाले.
पीडी -what ! मग तो मुलगा तिथून cll कसा करू शकतो ?शक्य आहे का हे !
प्रमोद -'हो शक्य आहे आणि ते शक्य झालंय !पण हेच कळत नाहीए की, हे कसं शक्य होऊ शकतं !
पीडी -'म्हणजे ?
प्रमोद -'एक विचित्रच गुंता आहे जो सुटता सुटत नाहीए, जितका मी तो सोडवायला जातोय तितका अधिकाधिक त्यात अडकत चाललोय !'
प्रमोदने सिगारेट शिलगावली आणि खुर्चीवरून उठत सिगारेट ओढत गॅलरीच्या कठडया जवळ गेला.
पीडी अक्षरशः वैतागली होती .पण ती सुद्धा यात हळूहळू गुंतत होती.तिचं मन अनेक आढाखे बांधत प्रमोदच्या काळाच्या विसंगतीत रस घेत होतं.खरंतर पीडी ने नकळतपणे काळ वेळेच्या अगम्य प्रदेशात प्रवेशच केला होता.पण तिला हे माहीत नव्हतं की,काळाच्या विचित्र प्रदेशात ती स्वतःसकट गडप होणार आहे...
पीडी अक्षरशः वैतागली होती .पण ती सुद्धा यात हळूहळू गुंतत होती.तिचं मन अनेक आढाखे बांधत प्रमोदच्या काळाच्या विसंगतीत रस घेत होतं.खरंतर पीडी ने नकळतपणे काळ वेळेच्या अगम्य प्रदेशात प्रवेशच केला होता.पण तिला हे माहीत नव्हतं की,काळाच्या विचित्र प्रदेशात ती स्वतःसकट गडप होणार आहे...
पीडी -'ok fine! Let me understand this.तुला चुकून एक call आला,बरोबर !तू हार्डली दोन तीन मिनिटं त्याच्याशी बोलला असशील आणि त्यानंतर तो cll कट झाला.But the problem is जर तो नंबरच अस्तित्वात नाहीए तर मग तुला तो मुलगा call कसा करू शकतो ?
प्रमोद तणतणत पीडी जवळ गेला आणि खिशातून मोबाईल काढत खेकसत बोलू लागला तसं पीडी दचकून खुर्चीवरून उठली.
प्रमोद -'तुला खोटं वाटतंय ?खोटं वाटतंय तुला ! बघ हा मोबाईल बघ,परवा संध्याकाळचा इनकमिंग cll दिसतोय तुला ?तू आताही cll लावून बघू शकतेस.
प्रमोदने माइक ऑन करून call लावला तसं "the number ur डायल is डसन्ट एक्सिस्ट please chek the number" ऐकू येत होतं.
प्रमोद -'मी टेलिफोन डिक्शनरी पण तपासून पाहिली पण हा नंबरच अस्तित्वात नाहीए !
पीडीचाही थोडा गोंधळ होत होता
पीडी -'पण मला हे कळत नाहीए, तुला कसं कळलं की तो cll त्या दुकानातून केला होता ?'
प्रमोद -कारण तो call मी केला होता !
पायाखालची जमीन हादरावि तसं पीडी ओरडली
पीडी -what !
पीडीला काय बोलावं काही सुचत नव्हतं.तिच्या मनात विलक्षण गोंधळ झाला होता
पीडी -'अरे प्रमोद तू काय बोलतोयस !तू call केला म्हणजे ?नक्की काय म्हणायचंय तुला !
प्रमोद -'म्हणजे मला हे म्हणायचंय की, असाच एक cll मी वीस वर्षांपूर्वी केला होता !
पीडी -'म्हणजे ?
पुढे प्रमोदनं जे सांगितलं ते ऐकल्यावर पीडी अक्षरशः गोठून गेली. प्रमोदच्या शब्दागणिक पीडीचे डोळे आश्चर्यानं विस्फारत होते आणि ती स्वतःच्या कोषात खोल खोल बुडत होती.प्रमोदच्या घटनेला पीडीचे सगळे तर्क तोकडे पडत होते.पीडीचा मेंदू त्या घटनेला ठामपणे नाकारू शकत नव्हता.
प्रमोद -परवा त्या मुलानं मला जसा चुकून cll केला होता अगदी तसाच wrong नंबर मीही वीस वर्षांपूर्वी केला होता.खरं तर ही खूप शुल्लक घटना होती,त्यात लक्षात राहण्यासारखं काही नव्हतं.पण परवा तो cll आला आणि मेंदूच्या कुठल्यातरी कोपर्यात दडलेली ती घटना हळूहळू लक्षात येत होती. कारण माझ्या मेंदूनं ती घटना प्रत्यक्ष अनुभवली होती!
10जून 2000! दहावीचा रिजल्ट लागला होता.
पप्पा म्हणाले होते "70%काढ आणि माझ्याकडून सायकल घे " मला 80%मिळाले होते! आणि हेच सांगण्यासाठी, त्या जनरल स्टोर्सच्या pco वरून मी पप्पांना cll केला ! call लागला तसं मी आनंदाच्या भरात बोलायलाच सुरुवात केली, "u know what ! मला 80%मिळाले आहेत. तुम्ही बोलला होतात 70%काढ आणि सायकल घे!आता तुम्ही येताना सायकल घेऊन या !
समोरील व्यक्तीचा आवाज ऐकला तेंव्हा मला कळालं की मी चुकीचा नंबर लावलाय . आणि... परवा मी ज्या पद्धतीनं त्या मुलाची थट्टा करत बोललो "अरे हे वय सायकल चालवायचंय का रे !अरे बुलेट वर पोरींना फिरवायच सोडून सायकल कसली चालवतोस!"
अगदी तसंच तो माणूस माझ्याशी फोनवर बोलला होता .....
10जून 2000! दहावीचा रिजल्ट लागला होता.
पप्पा म्हणाले होते "70%काढ आणि माझ्याकडून सायकल घे " मला 80%मिळाले होते! आणि हेच सांगण्यासाठी, त्या जनरल स्टोर्सच्या pco वरून मी पप्पांना cll केला ! call लागला तसं मी आनंदाच्या भरात बोलायलाच सुरुवात केली, "u know what ! मला 80%मिळाले आहेत. तुम्ही बोलला होतात 70%काढ आणि सायकल घे!आता तुम्ही येताना सायकल घेऊन या !
समोरील व्यक्तीचा आवाज ऐकला तेंव्हा मला कळालं की मी चुकीचा नंबर लावलाय . आणि... परवा मी ज्या पद्धतीनं त्या मुलाची थट्टा करत बोललो "अरे हे वय सायकल चालवायचंय का रे !अरे बुलेट वर पोरींना फिरवायच सोडून सायकल कसली चालवतोस!"
अगदी तसंच तो माणूस माझ्याशी फोनवर बोलला होता .....
उंचावरून कागदाचा तुकडा तरंगत खाली पडावा तसं पीडी स्वतःच्याच तंद्रीत आरामखुर्चीवर बसली.वेळेचं एक विचित्रंच गणित असतं ते म्हणजे आवडत्या व्यक्ती बरोबर वेळ कसा निघून जातो कळतंच नाही. बोलता बोलता संध्याकाळ कधी झाली कळलंच नाही. मावळतीकडं जाणारा सूर्य बघत पीडी बराच वेळ आराम खुर्चीवर निश्चल पडून होती. तिच्या डोळ्यांच्या बुबुळांचीही साधी हालचाल होत नव्हती... फक्त सिगारेट ओढताना हाताची होणारी हालचाल आणि नाका तोंडातून निघणारा धूर.. बस्स... या व्यतिरिक्त कसलीच हालचाल होत नव्हती....
समाप्त