MBKB_LOCK
अरबी समुद्राच्या अगदी मध्यभागी दोन लोकं आपल्या जहाजाने समुद्रात बुडालेल्या एका जहाजाच्या शोधात म्हणजेच खजिन्याच्या शोधत येऊन पोहचतात,ऐकीव माहितीच्या आधारे त्यांना कळतं की त्या खजिन्यात एक निलमनी नावाचा हिरा आहे ज्याची आजच्या घडीला करोडोंच्या घरात किंमत आहे ,त्याचं अभिलाशेने ते दोघे निघाले होते ,ऐन समुद्रात जिथे तो खजिना बुडालेला त्या जागेवर गेल्यानंतर वातावरणात अचानक बदल व्हायला लागतो , अचानक जोरदार वादळ विजांच्या कडकडाटात तिथे येऊन धडकतं ,आणि त्यांना एका मुलीचा ओरडण्याचा आवाज येतो ते त्या वादळात बघतात तर तिथे एक छोटं बेट दिसतं जे त्यांना आधी दिसलं नव्हतं त्या बेटावर एक अतिसुंदर तरुणी त्यांना मदतीसाठी बोलवत असते ,ते दोघेही एका अज्ञात शक्तीने तिकडे ओढले जातात ,ते तिथे पोहचल्यावर त्यांना एक सुंदर युवती पाण्यात पाय टाकून पाठमोरी बसलेली दिसते आणि ती अतिशय मंत्रमुग्ध गाणं म्हणत असते ,ते दोघे संमोहित झाल्याप्रमाणे धीर एकवटून तिला आवाज देतात ,ती त्यांच्याकडे वळून बघते तेंव्हा ते दोघेही घाबरून पाण्यात पडतात ,पट्टीचे पोहणारे स्वः ला वाचवू शकत नाहीत कारण त्यांना कुणीतरी खाली ओढत असतं ,काहीसं गूढ हसून ती मुलगी सुद्धा पाण्यात उडी मारून निघून जाते आणि ते बेटही तिथून नाहीसं होतं...
काही दिवसांनी ...
नेहा,ऋषी,रोहन,प्रिया, स्वाती आणि समर्थ ,तसं बघायला गेलं तर हे सर्व ऑफिस मधले सोबती पण गेल्या चार वर्षांपासून एकमेकांचे अगदी जीव की प्राण बनले होते ऑफिस मधल्या मोकळ्या वेळात असो किंवा ऑफिस सुटल्यावर हे सर्व सोबतच ग्रुप करून राहायचे ,सर्व एकमेकांसोबत शेयर करायचे , त्यामुळे ,सर्वांच्या घरचे सर्वांना चांगलंच ओळखायचे,ह्यांच्या मैत्रीमुळे त्यांच्या घरच्यांच्या देखील ओळखी वाढल्या होत्या ,असंच एकदा लॉंग विकेंड आल्यामुळे सर्वांनी 3,4 दिवसांचा टूर काढायचा ठरवलं , ऋषी ला ऑफिस जवळ च्या रस्त्यावर एका भिंतीवर चिटकवलेली एक जाहिरात दिसली ,4 दिवस 3 रात्रीचं स्पेशल पॅकेज असलेली कुठल्याश्या ओसाड बेटावर असलेल्या एका रिसॉर्ट ची ती जाहिरात होती ,ऋषी ने सर्वांपासून ते लपवून ठेवलं की ते ओसाड बेट आहे म्हणून आणि तो अगोदर तिथे गेलाय असं खोटं त्याने मित्रांना सांगितलं ,सर्वजण एकमेकांच्या घरच्यांच्या ओळखीचे होते त्यामुळे कुणाच्याच घरातून कुणीच कसला विरोध केला नाही , अरबी समुद्राच्या टोकाला एक अतिशय सुंदर बेट वसलेलं होतं,निळा समुद्र,हिरवी माडाची झाडे आणि रुपेरी वाळू त्या बेटाचं सौंदर्य वाढवत होते ,बेटाच्या आत जायला पक्का रस्ता नव्हता त्यामुळे गाड्या मधेच सोडून 10 मिनिटं पायी चालत जावं लागायचं ,बेटाची सुरुवात घनदाट झाडांनी व्हायची ,लाल मातीची अरुंद पाऊलवाट घनदाट झाडांमधून नागमोडी वळणे घेत थेट समुद्राला मिळायची ,चालण्याचा जो काही थकवा असायचा तो मात्र समोरचं दृष्य बघितल्यावर पळून जायचा , बेटाच्या आजूबाजूला मोठमोठाले दगडं होते जे खूप विचित्र आकाराचे होते ,बेट तसं ओसाडचं होतं ,सहसा कुणी तिकडे फिरकत नसत ,पण ऍडवेंचर वाल्यांसाठी तो एक नितांत सुंदर अनुभव असायचा ,जगाच्या रहाटगाड्यापासून काही दिवस स्वतःसाठी घालवायला एक उत्तम ठिकाण, बेटाच्या जवळ जवळ गेल्यावर प्रियाला एक वेगळीच अस्वस्थता जाणवायला लागली होती ,तिला ते सर्व "देजा वु" सारखं वाटायला लागलं होतं,तिने नेहा ला तसं सांगितलं देखील की ",मला असं वाटतंय की हे बेट मी अगोदर पण बघितलं ,खूप जवळून ,एक आपलेपणा इथल्या प्रत्येकगोष्टीशी जाणवत आहे मला "पण नेहा ने ते सर्व ऐकून न ऐकल्या सारखं केलं ,त्या बेटावर एक सुंदर छोटेखानी कौलारू हॉटेल होतं , हॉटेल मध्ये पोहचल्यावर सर्वांना एक वेगळीच उदासीनता जाणवायला लागते ,आणि त्यात भरीस भर म्हणून अतिशन भयानक चेहऱ्याचा,एकच डोळा असलेला ,मख्ख चेहऱ्याचा हॉटेल चा मॅनेजर , हॉटेल मध्ये पोहचल्या पोहचल्या ऋषी एक पांचट जोक मारतो ,सर्वजण हसतात पण त्या मॅनेजर च्या चेहऱ्यावरची एक रेष देखील हलत नाही ,तो तेवढ्याचं मख्ख चेहऱ्याने बेलबॉय ला सर्वांच्या रूम दाखवायला सांगतो , त्या मॅनेजर च्या मागे त्या रिसॉर्ट च्या मालकाचा मोठा फोटो लटकावलेला असतो , त्या फोटोमधून सुद्धा त्या माणसाची नजर नेहा ला अस्वस्थ करते ,त्या भकास हॉटेल मध्ये दिलासा देणारी,नवल करायला लावणारी एकच गोष्ट होती ती म्हणजे ती हॉटेल वेगवेगळ्या मोत्यांच्या वस्तूंनी सजवलेली असते ,विविध रंगांचे,आकाराचे मोती ,त्या हॉटेल ची शान वाढवत असतात ,आणि ते मोती अतिशय दुर्मिळ प्रकारात मोडणारे असतात,
त्या सर्वांना त्यांच्या रूम दाखवण्यासाठी बेल बॉय तिथे येतो ,तो बेलबॉय देखील विचित्रचं असतो ,एका पायाने लंगडा ,आणि शरीरावर भरपूर चावल्याच्या खुणा ,तो एक पाय सरपटत चालायचा तेंव्हा अगदीच भेसूर दिसायचा ,सर्व मुली हॉटेल च्या असल्या वातावरणामुळे खूप घाबरल्या होत्या ,हॉटेल मध्ये मोजून चार खोल्या होत्या त्यातल्या फक्त तीनचं खोल्या ते पर्यटकांना देत असत ,असं त्यांना तो बेलबॉय सांगतो ,त्या तीनही रूम सुद्धा अतिशय उदासीन होत्या,पण एक गोष्ट विशेष होती की प्रत्येक रूम च्या खिडक्या मागच्या साइड ला उघडत होत्या अणि खिडकीतून समुद्रकिनारा स्पष्ट दिसायचा ,पण बेलबॉय होईल तेवढया भसड्या आवाजात सर्वांना सांगतो की काहीही झालं तरी कोणत्याच रूम ची खिडकी रात्रीला उघडायची नाही ,आणि संध्याकाळ नंतर खिडकी उघडी ठेवायची नाही ,सर्वांनी घाबरत घाबरतचं विचारलं असं का ? विकृत हसत तो बेलबॉय म्हणतो की रात्रीला ती गाणं म्हणते आणि जो कुणी तिचं गाणं ऐकून खिडकी किंवा दरवाजा उघडतो ,त्याला ती कायमस्वरूपी आपल्यासोबत घेऊन जाते ,....काहीसं विचित्र आणि गूढ हसत सर्वांना सावध राहण्याचा इशारा देऊन बेलबॉय तिथून निघून जातो.... दुसऱ्या दिवशी सर्वजण आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य बघण्यासाठी बाहेर पडतात ,सर्वजण समुद्राजवळ जातात पण ऋषी ला माडांच्या झाडीतुन कुणीतरी त्याला आवाज देत आहे अस वाटतं ,तो रोहन ला पण सांगतो ,पण रोहन तिकडे दुर्लक्ष करतो ,ऋषी पण भास झाला असेल म्हणून सोडून देतो ,त्याला आणखी एकदा आवाज येतो पण ह्यावेळी एका मुलीचा अतिशय मंजुळ आवाज आवाज येतो ,ऋषी भारावलेल्या अवस्थेत बेटाच्या त्या बाजूला जातो जिथे ते विचित्र दगडं ठेवलेले असतात ,तो तिथे गेल्यावर त्याला एका विचित्र दगडाजवळ एक जुनाट चामड्याच्या तुकड्यावर एक विचित्र,अगम्य भाषेत कोरलेला मजकूर दिसतो ,त्याला विविध भाषा येत असल्यामुळे तो खूप डोकं लावून तो मजकूर समजून घेतो आणि आनंदाने शीळ मारतो ,त्याला त्याचं खजिन्याचा नकाशा आणि त्याचं ठिकाण माहिती पडतं , तो पटकन तो नकाशा खिश्यात घालतो आणि सर्वांसोबत जाऊन मिसळतो ,त्याच्या मनात सर्व प्लॅन सुरू असतात ,स्वाती ला किनाऱ्यावर विचित्र आणि आकाराने खूप मोठाले शिंपले दिसतात ती तेहातात घेते तेंव्हा तिला एका शिंपल्यात एक सुवर्ण मोती सापडतो ,ती आनंदाने आणि लालसेने कुणाला काहीच न सांगता तो मोती स्वतः च्या खिश्यात टाकते ....
संध्याकाळी सर्वजण परत यायला निघतात पण ऋषी त्यांना कुठेच दिसत नाही ,मागून येईल म्हणून सर्वजण रिसॉर्टवर परत येतात, आल्यावर ते ऋषी बद्दल विचारपूस करतात पण मॅनेजर काहीच न बोलता फक्त विचित्र हसतो आणि सांगतो की येईल तो ,आणि त्यांना म्हनतो की कुणी बीच वरून सोबत काही आणलं तर नाही ना तिथली एखादी वस्तू ? सर्वजण नकारार्थी मान डोलवतात आणि आपल्या रूम मध्ये निघून जातात ,रात्र डोक्यावर आलेली असते पण ऋषी चा कुठेच पत्ता नसतो ....
(क्रमश
)