अदृश्य_वाडा
त्यांच्या धावणाऱ्या पायांनी पाळापाचोळ्याची सळसळ वाढली होती.....त्या जंगलात आता बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज वाढू लागला....पोलीस अंधाधुंद फायरिंग करत होते.....बबलू आणि अमर ह्या दोन हिट लिस्ट वरील गुन्हेगारांचे एन्काऊंटर ऑर्डर निघाले होते....दोघांनीही शहरात अगदी दहशत माजवली होती....खंडणी,हत्या,दरोडा अश्या अनेक गुन्ह्यात त्याची नावं होती पण तरुण पोरांचा मोठा सपोर्ट असल्याने ते दोघे पोलिसांच्या तावडीत सापडत नव्हते........ dsp पाटील ह्यांची नुकतीच त्या शहरात नेमणूक झाली होती आणि त्यांनीच आल्याआल्या बबलू आणि अमरच्या एन्काऊंटर ची ऑर्डर काढली होती.....तसे ते दोघेही फरार होते....पोलिसांना एक टीप मिळाली त्यानुसार एका दारूच्या अड्ड्यावर पोलिसांनी दोघांना घेराव घातला होता....अमर आणि बबलू गुन्हेगारी क्षेत्रात खूप पुढे गेले होते दोघांच्याकडेही बंदुका होत्या.....पोलिसांची चाहूल लागताच त्या दोघांनी त्या बार मधेच फायरिंग सुरू केलं....2,3 पोलीस जखमी झाले होते..मागच्या दरवाज्यातून दोघेही बाहेर पडले....बबलू तसा बाईक चालवण्यात पटाईत होता.....त्याने वेगाने बाईक तिथून काढली... इन्स्पेक्टर पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला.....बबलू बाईक वेगाने पळवत होता तसे पोलीस पण त्यांचा पाठलाग सोडत नव्हते.....वेडीवाकडी वळणे आणि घाट चढत बबलूची बाईक खेडा अभयारण्य जवळ आली.....किर्रर्र अंधार....आणि त्या शांततेला भंग करणारा तो बाईकचा आवाज अधून मधून एखादी गोळी फायर होत होती.....
"बबल्या गाडी पळव xxx हातात गोळी घुसलीय माझ्या"
तशी बबलू ची नजर मागे गेली अमरच्या हातातून रक्त वाहत होते.....बबलू ने बाईकचे एक्सलेटर पूर्ण वाढवले होते पण ती बाईक तो सरळ घाट चढू शकत नव्हती.....
"अमऱ्या आर पोलीस लई माग पडल्यात आणि गाडीच तेल पण संपत आलंय चल उतर ह्या जंगलात कुठं तरी आसरा शोधू रातीचा"
अमर घामाने भिजला होता....त्याच्या हातातून रक्त वाहत होते त्याचे डोळे जड झाले होते...बबलू ने त्याला आधार देऊन उठवले.....बबलू ची नजर खाली गेली घाटातून दोन तीन पोलीस गाड्या येतानाच्या दिसल्या तसे ते दोघे एक टेकडी चढून जंगलात शिरले.......उन्हाळा कडक होता त्यामुळे बरीच झाडे सुकून गेली होती त्या पाल्यापाचोळ्यातून वाट काढत ते दोघे जंगलात शिरत होते.......चंद्राचा हलका उजेड त्या अंधाऱ्या रात्रीत त्यांची मदत करीत होता.....पोलिसांची गाडी त्या दोघांचा पाठलाग करीत तिथे आली....त्या दोघांची बाईक रस्त्यावरच पडली होती......पोलिसांनी तडक त्यांचा माग काढत जंगलात प्रवेश केला.....अमर आणि बबलू धावत होते.....रक्तप्रवाह जास्त झाल्याने अमर अशक्त झाला होता....बबलू त्याला सावरत धावत होता....जंगलातून खडतर मार्ग काढत...जीव वाचवण्यासाठी दोघे पळत होते....पोलिसांच्या बॅटरीचा उजेड जवळ येत होता.....बबलू घाबरला होता.....जरा वाकून दोघेही धावत होते कारण पोलीस अंधाधुंद गोळ्या चालवत होते.....आज आपला गेम फिक्स आहे असा विचार दोघांच्या मनात आला....बबलू आणि अमर मागे बघत धावू लागले....एका झाडाच्या आडव्या बुंध्याला त्या दोघांचा पाय अडकला आणि तसे दोघेही खाली कोसळले.....अमर बेशुद्ध होण्याच्या मार्गावर होता त्याचे डोळे जड होत होते.....खाली कोसळताच तो बेशुद्ध झाला.....बबलू प्रचंड घाबरला होता.....अमर त्याचा जिवाभावाचा मित्र होता....त्याला सोडून जाणे त्याला मान्य नव्हते.....काहीतरी मनात विचार करून त्याने अमरचा हात पकडला......समोरून पोलीस धावत येत होते.....सुकलेल्या पानांची सळसळ वाढली होती.....बबलूने अमरचा हात घट्ट पकडला....पोलीस अगदी जवळ उभे होते.....बबलू त्यांच्याकडे बघत होता....त्यांचा आवाज त्याला स्पष्ट ऐकू येत होता.....बबलूच्या कपाळावर आठ्या उमटल्या कारण अगदी समोर उभे असलेल्या पोलिसांना ते दोघे दिसत नव्हते....काही पोलीस दमले होते धापा टाकत होते
"सावंत ही दोघ रांxx गेली कुठं....आता तर दिसत होती की.....काही नाही आज त्या दोघांचा खेळ संपवायचा....शोधा त्यांना आणि हो दिसताचक्षणी गोळी घाला"
अस बोलून तो अधिकारी अगदी त्या दोघांच्या अगदी बाजूने निघून गेला....सगळे पोलीस त्या दोघांच्या बाजूने निघून गेले....बबलू हैराण झाला.....भीतीने त्याची हवा टाईट झाली त्या भीतीत तो हसू लागला हसता हसता जमिनीवर पडला...त्याला विश्वासच बसत नव्हता.....आपण वाचलो आहोत...त्याची छाती धडधडत होती.....तो उठला आणि बेशुद्ध अमरला जागं करण्याचा प्रयत्न करीत होता.....अचानक कसला तरी आवाज येऊ लागला.....पानांची सळसळ वाढली....बबलूला हा दुसरा धक्का होता......आसपास कुणीतरी होत.....त्याची नजर इकडे तिकडे फिरू लागली.....एक तीव्र प्रकाश त्याच्या डोळ्यावर पडला त्यातून एक वेगळाच आवाज ऐकू येत होता.....त्या तीव्र प्रकाशाने बबलूचे डोळे दिपले होते....त्याने घट्ट डोळे बंद केले आणि जमिनीवर कोसळला.....
सूर्याची तीव्र किरणे बबलूच्या डोळ्यावर पडली तसा तो जागा झाला......सकाळ झाली होती....अमर अजूनही बेशुद्ध होता....बबलू अमरला गदागदा हलवू लागला
"अमऱ्या ए आमऱ्या....उठ लवकर"
तसा अमर जागा झाला.......त्याने आपल्या हाताकडे बघितलं....त्याच्या शर्टावरचे रक्त सुकलं होत....आणि रात्री प्रमाणे त्याला वेदना होत नव्हत्या....त्याला आश्चर्य वाटलं.....ती हातातली गोळी त्याचा जीव घ्यायला उठली होती......बबलूने मोबाईल काढला त्यात 11 वाजले होते.....नेटवर्क काहीच नव्हते....ते दोघे उभे राहिले....बबलु मोबाईल चेक करत होता....त्याची नजर अमर कडे गेली तो एकटक काहीतरी बघत होता.....बबलूने मागे बघितले....मागे एक मोठा वाडा होता......
"अरे अमर....हे काय ह्यो वाडा काल तर इथं नव्हता...."
बबलूची नजर चहूबाजूला फिरू लागली.....ते दोघे त्या वाड्याच्या गेटच्या आत येऊन पडले होते.....अमर आणि बबलू बघतच राहिले कारण एखाद्या राजाच्या महालासारखा तो वाडा दिसत होता एकदम भव्य......आतून कसलातरी गाण्याचा आवाज येत होता.....अमर त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागला....एक मोठं लॉन आणि बाहेरच कारंज्या उडत होत्या....बबलू डोकं खाजवत होता....हा प्रकार त्याच्या डोक्याबाहेरचा होता....कारण काल इथे काहीच नव्हते....सगळीकडे फक्त आणि फक्त जंगल होते.....अमर त्या वाड्याच्या दरवाज्याच्या दिशेने जाऊ लागला....मागोमाग बबलू सुद्धा येत होता.....हे सगळं वैभव ते दोघ पहिल्यांदा बघत होते.....अमर त्या भव्य दाराजवळ गेला आणि त्याने ते दार उघडलं.....दोघेही आवक झाले....आत इतक्या मौल्यवान वस्तू होत्या ज्या त्यांनी आजपर्यंत कधीही बघितल्या नव्हत्या....दोघांचे डोळे दिपून गेले....बाजूच्या मोठ्या नक्षीदार टेबलावर एक ग्रामोफोन वाजत होता...त्यावर एका वेगळ्याच आवाजातले गाणे वाजत होते.....वाघाची हरणाची लावलेली मुंडकी जणू त्या दोघांकडे बघत आहेत अशी लावली होती....समोरच वैभव दोघांना थक्क करणारे होते.....अमर आणि बबलू दोघेजण दोन्ही दिशांना गेले त्या एवढ्या मोठ्या वाड्यात कुणीही दिसत नव्हते.....अमर हॉल मध्ये फिरून बघू लागला....बऱ्याच मौल्यवान वस्तू ज्यांची बाजारात लाखो रुपये किंमत होईल अशा दुर्मिळ वस्तू हत्यारे जुन्या बंदुका त्याच्या नजरे पडत होत्या.....अमरच्या डोक्यात वेगळाच प्लॅन सुरू झाला....तेवढ्यात एक किंचाळी ऐकू आली....तसा अमर धावला.....बबलू धावत आला होता....अमरने त्याला पकडले....
"बबल्या...काय झालं रे....भूत बघितलंस काय?"
बबलू घाम्याघुम झाला होता
"अरे आमऱ्या त्या खोलीत.....त्या खोलीत"
तसा अमर त्या खोलीच्या दिशेने जाऊ लागला....ती खोली म्हणजे काहीतरी वेगळाच प्रकार होता त्या सुंदर वाड्याला डाग लागण्यासारखा.....अमर त्या खोलीच्या दिशेने जाऊ लागला.....ती खोली पूर्णपणे काळवंडली होती आजूबाजूला भेगा पडल्या होत्या.....बबलू अमरच्या मागे थरथरत येत होता...अमर आत आला त्याने खोलीत सगळीकडे नजर मारली....सगळ्या भिंती पेन्सिल स्केच ने भरली होती.....पेपरवर वेगवेगळ्या लोकांचे पेन्सिल स्केच दिसत होते.....अमरने समोरच्या टेबलाकडे बघितले.....त्यावर एक हाडाचा सांगाडा होता......त्या सांगाड्याच्या धडावर कवटी नव्हती.....त्या सांगाड्यावरचे सगळे कपडे सडून जीर्ण झाले होते......त्याच्या गळ्यात सोन्याची मोठी चेन होती त्याला कसलतरी लॉकेट लटकत होते......धीट अमर जरा घाबरला.....बबलू तर खोलीच्या बाहेर उभा राहून थरथरत होता......अमरला खूनखराब्याची सवय होती.....तो त्या खुर्चीजवळ गेला.....त्या हाडाच्या सांगाड्यावर कोळ्यांनी आपलं जाळ विनल होत त्यातूनही ते लॉकेट चमकत होत......अमरने बघितलं की त्या सांगाड्याचा डावा हात ताठ होता आणि एका भिंतीकडे त्याचे बोट होते....अमरने त्या भिंतीकडे बघितले.....त्यावर एक मोठे सैतानाच्या चेहर्याचे चित्र होते.....अमरचे लक्ष त्या पेंटिंगकडे गेले....त्याच बरोबर एक थंड हवेचा झोत त्या खोलीत आला.....त्याच बरोबर भिंतीला लटकलेली चित्रे फडफडू लागली........अमर त्या एका भिंतीजवळ गेला....अमरचे शिक्षण खूप झालं होतं.....इतिहासाच्या अभ्यास त्याच्या प्रचंड होता....त्याने त्या भिंतीवरच्या चित्राकडे बघितलं.....1945-1950 च्या काळातील मोठी मोठी लोक होती ती.....त्यात अनेक समाजसेवक....सैनिक तसेच काही साधूंची चित्रे पण दिसत होती......काही स्केच अमरने ओळखले......त्या स्केचच्या खाली कुठल्या तरी विचित्र भाषेत काहीतरी लिहलं होत....त्या काळचे नावाजलेले समाजसेवक तसेच उद्योजक स्केच मध्ये दिसत होते.....त्यांच्या बद्दल अमरने वाचलं होतं....सगळ्यांचा मृत्य हार्ट अटॅक ने झाला होता काहीजण वेडे झाले होते.....एका ठराविक दिवसानंतर सलग होणाऱ्या प्रतिष्टीत लोकांच्या निधनाने त्या काळी समाज पुरता हादरून गेला होता.....अमरला काही सुचत नव्हतं....त्या वाड्याने काहीतरी विचित्र दाखवलं होतं त्याला......त्याची नजर भिंतीवर लावलेल्या त्या सैतानाच्या चित्रावर स्थिरावली.....एकदम भयानक चित्र होते त्याचे ते भेदक डोळे अगदी जिवंत वाटत होते.....अमर त्या सैतानाच्या डोळ्यात बघू लागला....कसलीतरी अजब ऊर्जा त्याच्या डोळ्यात होती....अमरचे डोळे फिरू लागले.....विचित्र असे आवाज त्याला ऐकू येऊ लागले.....त्या सैतानाच्या दातातून रक्त वाहत होत असे त्याला दिसले....त्याच्या कानात घुमणारा आवाज त्याला त्रास देत होता.....अचानक अमरचा हात थरथरू लागला....त्याने आपल्या हाताकडे बघितलं....तो आपोआप त्या चित्राकडे सरकत होता.....अमरने आपले अंगठ्याशेजारचे बोट त्या सैतानाच्या चित्राच्या जवळ नेले आणि त्या चित्रावर टेकवले.....त्याच बरोबर एक हसण्याचा आवाज अमर च्या कानात घुमला......अमर इकडे तिकडे बघू लागला......एक तीव्र कळ त्याच्या डोक्यात शिरली त्याने चित्राकडे फिरून बघितलं....त्या पेंटिंग मधल्या सैतानाने त्याचे बोट आपल्या मोठ्या दातात पकडले होते.....काही कळायच्या आत अमरचे अंगठ्या शेजारचे बोट त्या चित्रातील सैतानाने आपल्या तीक्ष्ण दातांनी तोडून टाकले होते.....रक्ताची चिळकांडी उडाली होती.....अमर जोरात किंचाळला......तसा बबलू धावत त्या खोलीत आला.....अमरच्या रक्ताने सगळी फरशी लाल झाली होती.....अमरने आपल्या हाताकडे बघितलं त्याच्या हातावरच्या शीरा काळ्या पडत होत्या.....अमरच्या डोळ्यातून पाणी येत होतं.....डोक्यात काहीतरी चालू होतं....डोक्याचा स्फोट होतो की काय अस ते ठणकत होतं....बबलू जवळ गेला तसा अमरने त्याला जोराचा धक्का दिला तसा बबलू खाली कोसळला.....त्याच्या डोक्यात समोरच्या लोखंडी टेबलाचा कोपरा घुसला होता....बबलूच्या डोक्यातून रक्ताची धार लागली होती....अमरला काही सुचत नव्हतं.....त्याने आपल्या बोटाकडे बघितलं....त्याचा बोट जिथे तुटला होता तिथे एक सोन्याची नक्षीदार कांडी तयार झाली होती.....ती कांडी त्याच्या शरीराचा एक भाग बनली होती.....अमरचा हात पूर्ण काळा पडला होता....त्यावर ते सोन्याचे एक बोट चमकत होते....अमरला काही सुचत नव्हते त्याच शरीर कुणीतरी वेगळीच शक्ती कंट्रोल करीत होती....अमरचे पाय आपोआप चालत होते....कुणीतरी आतून त्याला कंट्रोल करीत होते....तो वरच्या एका खोलीजवळ पोहोचला त्याचा काळा पडलेला हात त्या खोलीच्या की होल जवळ गेला...त्याने त्या की होल मध्ये आपले ते सोन्याचे नक्षीदार बोट घातले त्याबरोबर त्या खोलीचा भलामोठा लोखंडी दरवाजा उघडला.....अमर आत गेला तसा समोर एक हाडाचा सांगाडा पडला होता....तो सांगाडा अगदी अमानवी होता त्याची कवटी वेगळीच होती सुळे दात लांब हात जणू कुण्या राक्षसाचा सांगाडा होता तो पूर्णपणे काळा होता....त्याच्या पायाजवळचा काही भाग गायब होता....अमरच्या डोक्यात काहीतरी घुमत होत....त्याने आपला हात सांगाड्याजवळ नेला....आणि त्या सांगाड्याचे एक मोठे हाड मोडून काढले.....आणि ते काळे हाड अमर खाऊ लागला....अगदी कोळश्यासारखे ते हाड मऊ होते....अमर अगदी ते हाड फोडून खात होता.....काही मिनिटात त्याने ते हाड खाऊन टाकले......अमर त्या खोलीच्या बाहेर आला......त्याने आपल्या त्या सोन्याच्या नक्षीदार बोटाकडे बघितले......त्यावर एक टोकदार काळी निप बनली होती......अमर सगळ्यात वरच्या रुम मध्ये आला होता.....अचानक त्याच्या आजूबाजूला अनेक काळ्या आकृत्या दिसत होत्या त्यांचे लाल लाल डोळे अमरचा आदेश मानायला तयार होते......अमरचे दात काळे पडले होते....त्याने आपल्या बोटाकडे बघितले त्यातून काळी निप बाहेर आली होती.....अमरच्या डोक्यावर सैतानी ताकतीने ताबा घेतला होता अमरने इशारा केला तश्या त्या आकृत्या वाड्यातुन बाहेर पडल्या आणि पूर्ण शहरात पसरल्या.....अमर खाली आला....बबलूच्या डोक्यातून रक्त वाहत होते....बबलू ने जखम हाताने पकडून दाबली होती.....अमर त्याच्या समोर उभा होता....अमरचा एक हात पूर्ण काळा पडला होता....बबलूच्या डोक्यात प्रचंड कळ येत होती पण अमरचा अवतार बघून तो चक्रावला....तो एकटक बबलूकडे बघत होता.....त्याच्या तोंडावर काळे काळे डाग होते....ओठ पूर्ण काळे झाले होते......अमर बबलूच्या जवळ आला....बबलू काही बोलणार इतक्यात त्याने आपले ते नक्षीदार सोन्याचे बोट बबलूच्या मानेत खुपले.....सर्रर्रर्र कन बाहेर ओढले त्याबरोबर रक्ताची धार उडाली.....बबलू अमर कडे बघतच राहिला......आपल्या मानेला पकडून वाड्याच्या बाहेर लडखडत आला....बबलू पूर्ण रक्ताने भिजला होता....त्या किर्रर्र जंगलात बबलू धावत होता पण तो रक्तप्रवाह थांबत नव्हता.......बबलूच्या शिरा काळ्या पडू लागल्या......काही क्षणात तो गतप्राण होऊन त्या जंगलात पडला....तिकडे अमर आता वेगळ्याच रुपात होता....अमर त्या खुर्चीवरच्या सांगाड्या जवळ पोहोचला.....त्याने त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि लॉकेट काढून आपल्या गळ्यात घातले....आणि त्या सांगाड्याला उचलून खिडकीतून बाहेर फेकले.....अमर त्या खुर्चीवर बसला.....त्याने डोळे बंद केले तश्या काही काळ्या आकृत्या त्याच्या आजूबाजूला जमल्या.......एक काळी आकृती त्याच्याजवळ आली आणि धूर बनून अमरच्या नाकात शिरली.....त्याच बरोबर अमरचे डोळे बंद झाले तिथे ठेवलेल्या पेपरवर त्याच्या त्या सोन्याच्या नक्षीदार बोटातून काहीतरी चित्र बनत होते...अमरचे बोट एक पेन्सिल बनलं होत....आणि त्या पेन्सिलला निप म्हणजे त्या सैतानाच्या हाडाचा चुरा होता....अमरने ते हाड खाऊन त्या पेन्सिलीची निप मिळवली होती.....ती काळी आकृती अनेक शहरात फिरून आली होती.....तिने तिथला एक चेहरा हेरला होता.....अमर अगदी तसाच्या तसा चेहरा त्या कागदावर रेखाटत होता......तो चेहरा होता शहराचे प्रसिद्ध समाजसेवक काकासाहेब पुसे यांचा......अमरने त्या चेहऱ्याकडे बघितले......त्या काळ्या आकृती अमरजवळ जमल्या होत्या.....ज्याच्या बोटात ती पेन्सिल असेल त्याच्या त्या गुलाम होत्या...आता अमर त्यांचा मालक होता..अमर त्या स्केच कडे बघून हसू लागला........त्याने त्या स्केच खाली अनोळखी भाषेत काहीतरी लिहलं....त्याचं बरोबर त्या काळ्या लाल डोळ्याच्या सैतानी आकृती मधून निम्म्या सैतानी आकृत्या शहराच्या दिशेने उडाल्या.....त्या विचित्र भाषेतील मंत्र म्हणजे त्या सैतानी आकृतींना एक आदेश होता....त्यावर त्यांच्या मालकाचे साइन झालं आणि त्या आपल्या कामाला लागल्या ...(क्रमशः)
✍️ लेखन -- शशांक सुर्वे
दुसऱ्या भागाची लिंक👇👇👇