Hunted railway station

पश्चिम बंगालमध्ये बेगुंकोदार (Begunkodar) , याच गावात एक रेल्वे स्टेशन आहे , आणि तिथे एकच तिकीटाची खिडकी आहे तीहि मोडकळीस आलेली , आणि भिंती तर एकदम पार खचलेल्या. स्टेशनची तर खूपच वाईट अवस्था झालेली …संपूर्ण स्टेशनवर कोळ्यांनी जाळं विणून आपलं बस्तान मांडलेल आहे , प्लाटफॉर्मच्या एखाद्या भिंतीच्या तळाशी असलेल्या बिळातून एखादा उंदीर इकडून तिकडे पळतोय. आजूबाजूला शांत निपचित पडलेला परिसर आणि स्टेशनच्या आजूबाजूला वाढलेली झाडे झुडुपे . प्लाटफॉर्मवरच रेल्वे साठी एक घंटा टांगलेली आहे पण तिलाही पूर्णपणे गंज चढलेला आहे . रेल्वेट्रॅकहि आहेत. मग अचानक खूप वेगाने एखादी ट्रेन येते आणि कर्ण कर्कश हॉर्न वाजवत निघूनही जाते पण हे स्टेशन असूनही इथे थांबत नाही .पूर्णपणे ओसाड पडलेलं हे स्टेशन जिथे रात्री तर सोडाच पण दिवसाही तिथे जाण्याचं धाडस कुणी करत नाही. २००९ पर्यंत हेच चित्र होतं या गावात… पण खूप आधीपासून बंद होतं हे स्टेशन…… १ नाही… २ नाही…. ३० नाही …. तब्बल ४७ वर्षांपासून या स्टेशनवर अशीच स्मशान शांतात पसरलेली होती ..याचं कारण काय होतं ?????…………………… आहे ना …. यालाही एक कारण आहे ..याचं उत्तर आपल्याला मिळेल १९६२ साली घडलेल्या एका घटनेत . होय १९६२ साली इथे एक अशी घटना घडली ज्यामुळे गेली ४७ वर्ष हे गाव भीतीच्या छायेखाली वावरत होतं . ४७ वर्षांपूर्वी हे स्टेशनही इतर स्टेशन प्रमाणे गजबजलेलं होत, आजच्याप्रमाणे तिथे शांततेचा मागमूसही नव्हता. दिवसरात्र इथे प्रवाशांची वर्दळ असायची जी आपण कुठल्याही स्टेशनवर पाहतो. तर त्या दिवशी असाच रोजच्याप्रमाणे ट्रेन यायची वेळ झाली . आणि सर्व प्रवाशांची लगबग सुरु झाली . थोड्याच वेळात प्लाटफॉर्मवर ट्रेन येउन काही वेळ थांबली. सर्व प्रवासी पटापट ट्रेन मध्ये आपापलं समान घेऊन चढले आणि ट्रेन पुन्हा सुरु झाली, इतक्यात एक बाई धावत प्लाटफॉर्मवर आली, तिला आता कळून चुकले होते कि तिला खूप उशीर झाला आहे, म्हणून ती धावत ट्रेन मध्ये चढण्याचा प्रयत्न करू लागली . पण एवढ्यात ट्रेनने आपला वेग पकडलाही होता आणि इतक्यात तिचा पाय ट्रेनच्या पायरीवरून घसरला अन ती जोरात खाली पडली आणि तिच्या डोक्याला जबर मार बसला , आणि ट्रेनच्या वेगामुळे त्या बाईचे शरीर ट्रेनकडे खेचले गेले आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. ट्रेन निघून गेली होती आणि त्या प्लाटफॉर्मवर आणि रुळांवर रक्ताचा सडा पडला होता. सर्वत्र त्या बाईच्या शरीराचे तुकडे होऊन विखुरले गेले होते आणि त्या बाईची किंकाळी अजूनही तिथे उभ्या असलेल्या लोकांच्या कानात घुमत होती . काही वेळाने त्या बाईच्या शरीराचे तुकडे अक्षरश : कचऱ्यासारखे गोळा करण्यात आले आणि तिच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले, त्या घटनेनंतर काही दिवस असेच निघून गेले , हळू हळू लोक हि घटना विसरूनही गेले आणि पण तिथे काम करणारे कामगार मात्र खूप घाबरलेले होते . आणि एक दिवस…. एके रात्री मात्र काही भलतेच घडले . त्या रात्री शेवटची ट्रेन निघून गेली होती स्टेशनवर काम करणारे लोक स्टेशनवरच्या रूममध्येच खुर्चीवर पेंगत बसले होते, इतक्यात त्यांच्यातील एका कामगाराच्या कानात एक भयंकर किंकाळी घुमू लागली आणि तो खडबडून जागा झाला त्याच्या आजूबाजूचे सर्व लोक अजूनही गाढ झोपेतच होते . त्याने जवळच ठेवलेला कंदील हातात घेतला आणि बाहेर आला . त्या कंदिलाच्या प्रकाशात त्याने चौफेर त्या आवाजाचा अंदाज घेत पाहिलं पण दूरदूरपर्यंत स्टेशनवर कुणीच दिसत नव्हतं … इतक्यात त्याला भास झाला कि त्याच्या मागे कुणीतरी उभं आहे म्हणून त्याने झटकन मागे वळून पहिले तर त्याला समोर एक व्यक्तीसदृश्य धुसर आकृती दिसली , तो हळू हळू त्या आकृतीच्या दिशेने दबकत जाऊ लागला , भीतीने त्याचे पाय लटपटत होते , घाबरत घाबरत त्याने हळू हळू त्या दिशेने आवाज देत एक एक पाऊल टाकत पुढे जाऊ लागला. थोड पुढे चालून गेल्यावर ती आकृती त्याला स्पष्टपने दिसू लागली , ती आकृती एका बाईची होती, ती मोठमोठ्याने हुंदके देत रडत होती आणि तिने तिचा चेहरा दोन्ही गुडघ्यात लपवला होता , आता तो माणूस अगदी तिच्या समोर जाऊन उभा राहिला. एवढ्यात झटकन त्या बाईने वर चेहरा करून त्या माणसाकडे पाहिले आणि जोरात किंचाळली …. तिच्या आवाजाने तोहि दचकला आणि जेव्हा त्याने तिचा चेहरा पहिला तेव्हा तोही जोरात ओरडला, कारण ती तीच बाई होती जिचा काही दिवसांपूर्वीच याच स्टेशनवर अपघाती मृत्यू झाला होता. तो हळू हळू तिच्यापासून दूर जाऊ लागला इतक्यात अचानक त्या बाईच्या डोक्यातून रक्त वाहू लागले आणि तिच्या शरीराचा एक एक भाग गळून खाली पडू लागला , हे पाहून त्या माणसाच्या हातातील कंदील सुटून खाली पडला. आता ती बाई हळू हळू त्याच्या दिशेने चालू लागली , आता तर त्याच्या पायातील उरले सुरले त्रानच निघून गेले. आणि धडपडून तो तिथेच जागेवरच कोसळला …. अचानक त्याच्या हृदयाची धडधड थांबली. तो तिथेच निष्प्राण झाला होता.सकाळी जेव्हा लोकांनी त्याला अश्या मेलेल्या अवस्थेत पहिले तेव्हा कुणालाच कळले नाही कि त्याचा मृत्यू कसा झाला . त्याचे प्रेत हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी इतकेच सांगितले कि त्याचा मृत्यू हा हार्टअटॅकमुळे झाला होता .या घटनेनंतर तिथल्या बाकीच्या अनेक कर्मचर्यानाही असे अनुभव येऊ लागले . काहीजणांनी तिथून स्व:ताची बदली करून घेतली तर ज्यांना बदली करून नाही मिळाली त्यांनी तिथली नोकरीच सोडून दिली . कुठलेही नवीन कामगार तिथे काम करण्याचं धाडस करत न्हवते , आणि मग शेवटी ते रेल्वेस्टेशनच बंदच करण्यात आलं . आणि त्या स्टेशनावर ट्रेनही थांबणे बंद झाले ..२००९ साली म्हणजे तब्बल ४७ वर्षांनंतर ते स्टेशन पुन्हा दुरुस्त करून सुरु करण्यात आले,.आता हि घटना खरी आहे कि नाही असा प्रश्न तुम्हाला पडेल …गुगल वर ह्या गावाचं नाव टाईप करा किंवा हॉन्टेड रेल्वे स्टेशन म्हणू टाईप करा तरीही तुम्हाला या स्टेशनची माहिती आणि इतिहास मिळेल आणि तुमची खात्री पटेल.
Hunted railway station-Marathi Horror stories