पाचव्या भागाची लिंक 👇👇
https://marathighoststories.blogspot.com/2020/05/blog-post_47.html
#सोनगावचा_मास्तर - भाग सहा.
श्रीधर बाहेर निघून गेल्यानंतर काही वेळाने शेवंता उठली आणी तिने घराचा दरवाजा लोटून घेतला..केसाच्या वेणीमधला सुगंधी गजरा तिने पुढे घेतला आणी अभ्यासात मग्न असणार्या रघुच्या अगदी जवळ जावून त्याला खेटून बसली..अभ्यासात गुंगलेल्या रघुने एकदा मान वर करून तिच्याकडे पाहिले आणी तो तिच्यापासून थोडा दूर सरकला..
"अस्सं..एवढा नखरा, माझा स्पर्श काय नवीन हाये व्हंय तुम्हाला ?"
शेवंता ने लाडिक आवाजात म्हणले,
रघु तिच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागला..
"तुम्ही जगाला फसवू शकता पण मला नाही देसाई मास्तर, इथेच ह्या घरामध्ये आपण अनेक मधूर क्षण घालवलेले आहेत, आठवत नाय का तुम्हाला.. हां आता तुमचं शरीर बदलले असेल पण अजूनबी मी तुम्हाला माझा जिवलगच समजते, म्हणूनच तर मी आज इथे तुम्हाला भेटायला आले होते" 👩🦰
मादक हावभाव करत शेवंता बोलत होती, जाणुनबुजून रघुला स्पर्श करत होती..आणी त्या ऐकांताचा आणी धूंद क्षणांचा प्रभाव रघुवर पडताना दिसत होता, खरंतर चांगल्या संस्कारात वाढलेल्या लहानग्या रघुला शेवंताच्या हावभावाचा अर्थ समजणे अशक्य होते पण त्याच्या अंगामध्ये अंशरूपाने असणारा देसाई गुरूजी मात्र त्याची जूनी प्रेयसी असणार्या शेवंता कडे आकर्षित होऊन सक्रिय झाला होता..
रघुचे डोळे आता किलकिले होऊ लागले, आतापर्यंत त्याच्या चेहर्यावर असणारे छोट्या निरागस मुलाचे हावभाव झपाट्याने बदलत होते..
"बरं, नसलं तुम्हाला माझ्याशी बोलायच तर जाते मी, मला लई कामं पडलेली हायेत बाकीचे"
असे बोलून नाक मुरडत शेवंता रघुजवळून उठून दरवाजा कडे जावू लागली..पण ती पुढे निघाली असतानाच रघूने गपकन मागून तिचा हात पकडला..आणी ती दचकलीच..असे काही होईल याची तिला खरोखर कल्पना नव्हती.
रघूने एक हिसका देऊन शेवंताला आपल्या अंगावर ओढले, शेवंता बळेबळे हसत त्याच्या तावडीतून सुटकेचा प्रयत्न करू लागली, पण रघुच्या मजबूत पकडीपुढे तिचे काही एक चालत नव्हते..एवढ्या लहान मुलात एवढी ताकत कशी आली असा प्रश्र्न तिला पडत होता.
"लई हुश्शार आहेस गं माझी राणी, कसकायं ओळखलस गं तु मला? आणी आज किती दिसानंतर भेटलीस तु शेवंता"
रघुच्या अंगातील देसाई आता पुर्ण सक्रिय झाला होता, आणी रघुच्या शरीराचा वापर करुन तिच्यासोबत वेगवेगळे चाळे करायला लागला होता..पण त्या घराच्या अर्धवट उघड्या असलेल्या खिडकीतून काहीजन आश्र्चर्यचकित नजरेने हे सर्व दृश्य पाहत होते याची त्याला कल्पना नव्हती.🥺
घराच्या बाहेर खिडकीजवळ एकूण चार जण उभे होते, एक होता श्रीधर, दुसरा शंभू, तिसरा सरपंच आणी चौथी होती ती रघुची आई..
"पाहिलं ना तुम्ही ताई? आणी महाराज व सरपंच तुम्हीपण" हळू आवाजात श्रीधर पुटपुटला.
"हंम्म.., पण आता जा लवकर आतमध्ये तु सरपंचासोबत.. आधी त्या शेवंताची सुटका तर कर त्या देसाईपासून" शंभू आतील दृश्य पाहून म्हणाला.
ताबडतोब श्रीधर आणी सरपंच खिडकीपासून दरवाजा जवळ गेले आणी दरवाजा लोटून आतमध्ये शिरले.
"रघु..! काय चाललेय हे"
श्रीधर मोठ्याने ओरडत म्हणाला, रागाने त्याचे डोळे लाल झाले होते..
रघूने उतरवलेला छातीवरील साडीचा पदर सावरत शेवंता गडबडीत उभी राहिली ..
"मास्तर, ह्यात रघुची काहीबी चूक नाही, त्याला काय करू नका तुम्ही, आणी कुणाला काही सांगुबी नका"
डोक्यावरील विस्कटलेले केस सावरत शेवंता घाबरून म्हणाली.
पण तिचे बोलणे ऐकून सरपंचाचा राग अनावर झाला.
"चूप xxx, त्याला समजत नाही म्हणून तुला पण कळत नाही का? चल नीघ इथून, आणं परत येऊ नगस तुझं काळं तोंड दाखवायला"
सरपंच रागाने कडाडले.
संतप्त झालेल्या श्रीधर आणी सरपंचाला पाहून शेवंताने तेथून निघून जाणेच योग्य समजले आणी ती मान खाली घालून गूपचूप तेथून निघून गेली.
नूकत्याच सुरू झालेल्या प्रणयामध्ये अडथळा आनल्यामुळे रघू रागारागाने त्या दोघांकडे पाहत उभा होता.
"आणी तु रे पांगळ्या..! तुझे वयं हाये का असले चाळे करण्याचे? थांब तुझ्या आयलाच सांगतो तुझे नाव"
सरपंचाने बोलता बोलताच एक हलक्या हाताची थप्पड रघुला लगावली, आणी आतापर्यंत कसाबसा संयम राखलेल्या रघुचा बांध फुटला..त्याने दात ओठ खावून दोन्ही हातांनी सरपंचाला जोराचा धक्का दिला..तो धक्का एवढा जबरदस्त होता की, सरपंच अक्षरशः हवेमध्ये उडून मागील भिंतीवर जावून आदळले..,😮
पिसाळलेला रघू सरपंचाच्या अंगावर धावून गेला आणी खाली पडलेल्या सरपंचाच्या अंगावर बसुन दातओठ खात दोन्ही हातांनी त्याचा गळा दाबू लागला..रघुने केलेल्या ह्या अचानक हल्ल्याने घाबरलेला श्रीधर पुर्ण ताकत लावून रघुच्या तावडीतून सरपंचाची सुटका करण्याचा प्रयत्न करत होता..पण रघुने त्यालाही एका हाताच्या फटक्यात मागच्या भिंतीवर भिरकावून दिले..आणी पुन्हा डोळे वासून सरपंचाचा गळा पकडला..
हे सगळे दृश्य खिडकीतुन पाहणार्या शंभुने घाईघाईने दरवाजाकडे धाव घेतली..सरपंच रघुच्या तावडीतून सुटण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होता, पण ते त्याच्या आवाक्या बाहेरचे काम होते..तेवढ्यात,
"जय महाबली.. पवनपुत्र मारूती..!"
मोठ्याने उच्चारत घरात आलेल्या शंभूने एक मुठ भरून सिद्ध अंगारा रघुच्या अंगावर फेकला आणी त्याची सरपंचाच्या मानेवरची पकड ढिली झाली, आणी अखेर अंगावरच्या रघुला बाजूला ढकलत सरपंच कपडे झटकत उभा राहिला..
शंभूने मंत्रोच्चार करत जमीनीवर बसलेल्या रघुच्या भोवताली अंगारा वापरून एक गोल रिंगण आखले..सिद्ध अंगार्यामुळे रघुच्या शरीराची तळमळ होत होती, तो डोके हातात धरून तसाच जमीनीवर बसलेला होता.. रघुची आई आश्र्चर्यचकित होऊन निमुटपणे अजूनही खिडकीतच उभी होती, मुलाची अवस्था पाहून तिच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.
शंभुने रघुच्या भोवती चालत चालत एक चक्कर मारून त्याचे बारकाईने निरीक्षण केले..त्याच्या हातात एक वेताची चकाकती छडी होती, त्याने रघुकडे पाहून दरडावून विचारले,
"बोल देसाई, कशासाठी शिरला आहेस तु रघुच्या अंगात?"
रघुकडून काहीच उत्तर येत नाही हे पाहून शंभूने सपकन हातातील छडी रघुच्या दंडावर मारली, रघू वेदनेने कळवळला आणी विचित्र आवाजात तोंड वाकडे तिकडे करत बोलायला लागला.
"माझा जीव हाये रघुवर..मी मेल्यानंतर जगात कुणालाही दुःख झालं नाही, माझ्या बायकोलाबी नाही, पण माझा रघु रातभर त्या विहीरीच्या काठावर अश्रू ढाळत होता..त्याचा बी माझ्यावर तेवढाच जीव हाये जेवढा माझा त्याच्यावर, म्हणूनच तो मला हवा आहे, आणी काही जरी झालं तरी मी त्याला सोडू शकत नाही, मी त्याला माझ्या बरोबर घेऊनच जाणार" 🥺
आतापर्यंत शांत असणारा श्रीधर हे ऐकून पुढे झाला, आणी म्हणाला,
"अरे कोवळा पोरगा हाये तो, त्याला अजून जग बघायचेय, बघ जरा त्याची कशी अवस्था केलीय तु? एवढा चांगला मुलगा होता..त्याच तोंड वाकडं झालं, एक हात वाकडा झाला, एक पाय अपंग झाला, हिच का रे तुझी माया?
तु एक सुशिक्षित मास्तर हायेस देसाई, छोट्या मुलाला असा त्रास देणं तुला शोभत नाही..तुझ्या सगळ्यात लाडक्या विध्यार्थ्याचा एवढ्या कमी वयात मृत्यू झालेला आवडेल का तुला?"
"नाही..मी रघुला मरु देणार नाही...नाही मरुन देणार"
आवाज रघुच्या तोंडातून आवाज बाहेर पडत असला तरी त्याच्या आतून देसाई गुरूजी बोलत होता.
" मग रघुच्या शरीराला सोड देसाई, त्याच्या शरीरातुन बाहेर निघून जा"
रघुच्या भोवती चक्कर मारणार्या शंभूने देसाईला
असे आवाहन केले आणी पिशवीतून आणखी एक मुठभर अंगारा काढून रघुच्या अंगावर फेकून मारला, रघुचे सर्वांग अंगार्याने माखले होते, शरीराची जोरात तडफड होत होती..
"लवकर बाहेर नीघ देसाई, नाहीतर हकनाक जीव जाईल बघ पोराचा" शंभु देसाईला ओरडून म्हणाला.
रघुच्या डोळ्यातून अश्रु़ची धार लागली होती, अंगावर मीठ टाकलेल्या गांडुळासारखी त्याच्या शरीराची काही वेळ तडफड होत होती, आणी एकदमच मोठी आरोळी ठोकून तो बेशुद्ध पडला..,🗣️
नकारार्थी मान हलवत थकलेला शंभु खाली बसला आणी श्रीधर कडे पाहून म्हणाला,.
"मास्तर, अवघड आहे पोराच, काही केल्या देसाई सोडायला तयार नाहीये त्याला, आपल्यामुळे रघूचा जीव जावा असेही त्याला वाटत नाही, आणी त्याची मायासूद्धा त्याला सुटत नाही.."
"पण हे असं कसं आक्रित झालं म्हणायच" सरपंचाला अजून पुर्ण प्रकरण समजले नव्हते.
"देसाई गुरुजीचा विहीरीत पडुन मृत्यू झाल्यानंतर, रात्री त्या विहिरीच्या काठावर बसलेल्या रघुच्या अंगात देसाईच्या आत्माचा काही अंश त्याच्यावरील मायेपोटी सुक्ष्म अवस्थेत घुसून बसला, बहुतांश वेळी तो अंश सुप्त अवस्थे मध्येच असतो, पण त्याला हवे तेव्हा तो सक्रिय होवून रघुच्या शरीरावर ताबा मिळवतो, त्यावेळी रघु हा नेहमीचा रघु राहत नाही.. जसे जसे दिवस वाढत गेले तसेतसे रघुच्या शरीरातील देसाईचा प्रभाव पण वाढत गेला आणी तसा तसा रघुच्या मनावर आणी शरीरावरही विकृत परीणाम होत गेला..आता अशक्त आणी अपंग झालेले रघुचे शरीर जास्त दिवस भुतबाधेचा प्रभाव सहन करू शकणार नाही, जर देसाई गुरुजी रघुचे शरीर सोडून गेला नाही तर यापुढे हा भुतबाधेचा विकृत परिणाम असाच वाढत जाईल, जोपर्यंत रघुचा मृत्यू होत नाही तोपर्यंत",☠️
शंभुने सरपंचाला समजावून सांगितले.
"मग आता ह्यावर काय उपाय महाराज?" पदराने डोळे पुसत घरामध्ये प्रवेश करत रघुच्या आईने विचारले.
"आजच्या प्रचंड शारिरिक आणी मानसिक ताणामुळे बेशुद्धावस्थेत पडलेल्या रघुला ह्या प्रसंगातून सावरायला काहि दिवस लागतील, जेव्हा तो पुर्णपणे सावरेल तेव्हा एक शेवटचा उपाय करून पाहावा लागेल, त्यामध्ये आपण यशस्वी झालो तर... एक तर जूना रघू आपल्याला परत मिळेल नाहीतर, आपल्याला त्याला कायमच विसरावे लागेल" काहितरी विचार करत शंभू म्हणाला.
"बघा आता तुम्ही आणी मास्तर काय करायचं ते? पोरगं तुमच्या पदरात टाकलंय" रघुची आई म्हणाली.
"प्रयत्न करणं आपलं काम ताई, बाकी महाबलीची इच्छा"
शंभुने त्याच्याकडील अभिमंत्रित काळा दोरा बेशुद्ध पडलेल्या रघुच्या उजव्या हातात, पायात आणी गळ्यामध्ये बांधला.
"या धाग्यामुळे काही दिवस भुतबाधेचा प्रभाव थोडा कमी होईल, श्रीधर तु आणी ताई ह्याला असेच घरी घेवून जा, थोड्यावेळाने पाणी टाकुन शूद्धीवर आणा..
आणी हां, हे सर्वकाही जे तुम्ही पाहिलेले आहे, जे तुम्हाला समजले आहे हे रघुला आणी त्याच्यायोगे देसाईला माहित होऊ देऊ नका.. विशेष करून ताई, तुम्ही याची काळजी घ्या..देसाई जे काही पाहतो,ऐकतो आणी अनुभवतो ते रघुच्या शरीराचा वापर करूनच.. आणी आता रघू बेशुद्धावस्थेत आहे त्यामुळे आपले झालेले हे संभाषण देसाईला समजू शकणार नाही "
शंभुच्या सुचनेनुसार श्रीधरने रघुला तसेच बेशुद्धावस्थेत उचलून त्याच्या घरी नेऊन झोपवले आणी तेथून परत त्याच्या घरी निघून आला,
थोड्यावेळाने रघुच्या आईने बादलीभर थंड पाणी झोपलेल्या रघुच्या अंगावर ओतून त्याचा सगळा अंगारा धुवून काढल्यानंतर जरा वेळाने त्याने अलगद पापण्या उघडल्या..
"अरे काय झालं होतं तुला बाळा? केव्हाचा गाढ झोपी गेला होतास तु, कितीवेळा पासून उठवतेय मी तुला"
रघुच्या डोक्यावरून हात फिरवत लावत आईने काळजीने विचारले..
रघुचे डोके प्रचंड जड झाल्यासारखे वाटत होते, अंगामध्ये तापही भरला होता, त्याला काहीच समजत नव्हते, बराचवेळ तो तसाच डोके पकडुन आहे त्या जागेवरच काही न बोलता बसून राहिला..,😞
#क्रमश..
सातव्या भागाची लिंक 👇👇

bhubhu · 241 weeks ago
VINAY · 204 weeks ago