तिन्ही सांज
तुम्ही कधी कोणाला मदत केली आहे का? नक्कीच केली असणार व करत असाल ....पण मदत करताना ती जागा , ती व्यक्ती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती वेळ पाहुन करता का? जर हे सगळ पाहत नसाल तर ....ती तुमची शेवटची मदत ठरू शकते....!!!!!!!!!!!
"उठशील का आता तु....किती वाजलेत दिसतय का? आपल्या व शानु मावशीच्या अंगणातले सगळे फणस आज काढुन दे....फणसाच्या पोळ्या आणि वेफरस बनवायचे आहेत आम्हला ....आणि दुपारनंतर सड्यावरील किंवा नदीजवळ करवंद लागली आहेत ती घेऊन ये...आणि निट कान देऊन ऐक पंक्या, तिन्ही सांज व्हायच्या आत करवंद घेऊन घरला परत ये, नाहीतर तंगड तोडेन तुझं..आणि कोणी बोलवल, काही दिसलं तर मोरं जावु नगसं..."
माझी आई व काही बायकांचा मिळुन एक महिला मंडळ होत, रानमेवा गोळा करायचा त्यातुन खुप प्रकारचे पदार्थ बनवायचे व बाजारात नेवुन विकायचे. हा रानमेवा आणायला मी मदत करायचो...आणि हो मी रोजच आईच्या शिव्या खातो, रानमेवा सारख्या आंबटगोड लागतात त्या मला.😊 दुपारच जेवून मी थोडा पडलो कारण आई अजुन आली नव्हती, आली तर झोपायला नाही भेटणार म्हणून थोडं झोपलो......
बाप रे!!!! उशीरच झाला उठायला. निघायला हंव करवंद आणायला , तिन्ही सांज व्हायच्या आत परत आलो नाही तर सड्या किंवा नदी ऐवजी घरातच भुत भेटायचं....अस बोलतात की तिन्ही सांजेला भुतांचा वावर जास्त असतो... अर्थात त्यांची ही एक जागा असते ...पण चुकुन त्या वेळेत आणि त्या जागेत आपण अडकु नये एवढचं......
जास्त प्रमाणात करवंद हवी होती म्हणुन आधी सडया वर गेलो आणि आता नदीवर आलो... ईथुन लवकर निघायच होतं कारण तिन्ही सांज व्हायला आली होती... तिन्ही सांज म्हणजे आपण कातरवेळ म्हणु शकतो. सहा वाजायच्या आत मला घरी पोहचायच होत. माझ्याकडे घड्याळ नाही पण मी अंदाज लावु शकत होतो... आतापर्यंत पाच पिशव्या करवंद काढुन झाली होती आणि घरी जायला निघालोच होतो तेव्हढ्यात नदी जवळ एका दगडावर एक म्हातारी बाई बसली होती आणि तिच्या जवळ लाकडाची मोळी होती...काळ वेळ न बघता मी गावात सगळ्यांचीच मदत करायचो. थकली असेल व या वयात एवढं वजन झेपल़ं नसेल म्हणून मी गेलो तिची मदत करायला..... आणि त्यात ही वयस्कर....
ओ....आजी.....कुठं जायच हाय तुम्हाला , मी सोडु का? द्या ती मोळी इकड म्या घेतो... तुम्ही रस्ता दाखवा मोरं होऊन....काही ही न बोलता ती आजी पुढे जाऊ लागली... वय झाल्यामुळे तिला निट चालता पण येत नव्हतं....मीच एकटा बडबड करत चालत ह़ोतो....आता तर अंधार व्हायला आला होता पण आजी च घर काही येत नव्हतं..शेवटी मी आजी ला विचारलेच ,"आजी कुठ हाय तुझं घर....मला माझ्या घरला जायला उशीर झाला आहे मॉप, आता घरी गेल्यावर आई चांगलीच वरात काढेल माझी", एवढ बोलुन सुद्धा ती आजी काहीच बोलत नव्हती. एकदम निर्वीकार वाकडी पण सरळ रांगेतच चालत होती....
आता मात्र मी जरा घाबरलो कारण, आई ने सांगितल होत की, कोणी बोलवलं, काही दिसलं तर मोरं जावु नगसं..." आणि मी तिच चुक केली होती. ती माझ्या पुढे होती आणि मी मागे होतो याच गोष्टीचा फायदा घेऊन मी मागच्या मागे पळायचं ठरवलं..हळुच लाकडाची मोळी खाली ठेवली आणि मागे वळून पळणारच होतो की ती आजी वार्याच्या वेगाने माझ्या समोर येऊन ऊभी राहीली...ती आता तिच रूप बदलु लागली.... तिचे डोळे गायब झाले...हात व पायाचा आकार बदलला... केस लांबसडक झाले...चेहरा विद्रूप झाला, एक क्रुर ते च हसु तिच्या सडलेल्या ओठांवर होतं....". "मला तहान लागली आहे..... नदीच्या पाण्यांने माझी तहान भागत नाही......रगत , रगत हवय मले......" मी जीवाच्या आकांताने खुप धावलो , खुप ओरडलो, पण त्या जंगलात माझा आवाज हळुहळू गायब होत गेला....आणि शेवटी मी हरलो... माझ शरीर गार पडल होत....एक थेंब रक्ताचा शरीरात उरला नव्हता. माझी केलेली ही मदत शेवटची ठरली होती...
आता मी ही तिथेच आहे ....त्याच दगडावर.....तिन्ही सांज व्हायची वाट बघतोय........कारण नदीच्या पाण्याने तहान जात नाही ना......
समाप्त
ऋचा हाडवळे
ठाणे.
ठाणे.