#सोनगावचा_मास्तर- भाग एक.
इ.स. १९५०-६०, पन्नासचे दशक म्हणून ओळखला जाणारा काळ होता तो, जेव्हा आजच्याऐवढ्या सोयी-सुविधा उपलब्ध नव्हत्या, शहरीकरण, तांत्रिक प्रगती मर्यादित होत्या, पण असे म्हणतात की, त्याकाळात समाजामध्ये, गावागावामध्ये आजच्यापेक्षा माणुसकी जास्त होती आणी भुताटकी सुद्धा..💀
त्याचकाळामध्ये घडलेली ही एक कथा..
त्याचकाळामध्ये घडलेली ही एक कथा..
सकाळचे दहा वाजून गेले होते, सोनगाव नाक्यावर वेळेवर आलेली एस टी कंडक्टरने बेल मारून थांबवताच 'श्रीधर' एका खांद्यावर लटकणारी पिशवी सांभाळत एस टी बसच्या दरवाज्यातून बाहेर पडला..त्याच्यामागोमाग आणखी एक म्हातारा प्रवासी उतरताच एस टी वेगाने रस्त्यावरची धुळ उडवत तिच्या पुढच्या रस्त्याला निघुन गेली..
"अहो बाबा, सोनगावला जायचा रस्ता कोणता आहे"
श्रीधरने त्याच्या सोबत उतरलेल्या खेडुताला आवाज देत विचारले, रस्ता विचारणार्या त्या तरुणाला म्हातार्याने एकदा वरपासून खालपर्यंत न्याहाळले,
श्रीधरने त्याच्या सोबत उतरलेल्या खेडुताला आवाज देत विचारले, रस्ता विचारणार्या त्या तरुणाला म्हातार्याने एकदा वरपासून खालपर्यंत न्याहाळले,
अंदाजे वयवर्ष पस्तीस असणारा तो तरुण दिसायला फारसा आकर्षक नसला तरी ठिकठाक होता, ओठांवरील पातळ मिशी आणी कपाळावरचा गोल अष्ठगंधाचा ठिपका त्याला शोभणारा होता. अंगावर स्वच्छ पांढरा सदरा आणी खाकी रंगाची फुल पँट, पायात चामडी चप्पल, एका खांद्यावर लटकणारी शबनम बॅग, आणी हातामध्ये पकडलेली काळी छत्री अशा पेहरावामधल्या श्रीधरला त्या म्हतार्याने बोटाने सोनगावचा रस्ता दाखवला आणी तो तेथून निघून गेला.
श्रीधरपण त्या फाट्यावर जावून थांबला, समोर नजर जाईल तिथपर्यंत त्याला त्या छोट्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी फक्त पडीक जमीन आणी छोट्या झांडाशिवाय दूसरे काहीच दिसत नव्हते, म्हणजे ह्या फाट्यापासून गावं तसं लांबच होत, आणी आत जायला कोणतेही वाहन मिळणे पण अवघड..
बराच वेळ झाला तरी श्रीधरला कोणीच वाटसरू न भेटल्याने त्याने चालत चालत जाण्याचा निर्णय घेतला पण तेवढ्यात एक बैलगाडी त्याला फाट्यापासून आत वळताना दिसली आणी त्याला हायसे वाटले..👋
त्याने त्या शेतकर्याला विनंती करून बैलगाडीत प्रवेश केला,

"कोन्या गावचं पाव्हन म्हणायचं तुम्ही? सोनपुरला काय काम?" त्या शेतकर्याने विचारले.
"मी.. खूप दूरून आलोय, सोनगावच्या सरकारी शाळेत शिक्षक म्हणून नियुक्ती झालीय माझी" श्रीधरने कारण सांगितले.
हळुहळु चालणार्या बैलगाडीत सुमारे पाऊण तास गप्पाटप्पा मारत, आजूबाजुचे सृष्टीसौंदर्य न्याहाळत तो सोनगाव ग्रामपंचायतीच्या शाळेच्या बाहेर पोहोचला..
"बघा मास्तर आली तुमची शाळा" शेतकर्याने श्रीधरला दूरूनच शाळा दाखवली.
"बघा मास्तर आली तुमची शाळा" शेतकर्याने श्रीधरला दूरूनच शाळा दाखवली.
एकाला जोडून एक अशा नऊ-दहा रंगवलेल्या कौलारू खोल्या आणी बाहेर मोठे मोकळे मैदान अशी ती एक जूनी सरकारी शाळा होती..श्रीधरने बैलगाडीवाल्याचे आभार मानले आणी उतरून तो शाळेच्या दिशेने गेला.
शाळेसमोर जावून त्याने एकदा हात जोडून शाळेला नमस्कार केला आणी नंतर शिक्षकांच्या खोलीमध्ये जावून आतमध्ये बसलेले वरिष्ठ शिक्षक पाटील गुरूजी यांना स्वताची ओळख सांगितली..श्रीधरला पाहून पाटील मास्तरांना आनंद झाला.
"बरं झालं तुम्ही आलात ते, आपल्या ह्या शाळेत पहिली ते सातवी पर्यंत वर्ग आहेत, आम्ही तिघेजण शिक्षक सगळे वर्ग हॅण्डल करतो , आता तुम्हीपण आलात म्हणजे आमचे ओझे थोडे हलके झाले, कसं आहे, गेल्या काही वर्षांपासून आपल्या शाळेचा निकाल फारसा व्यवस्थित लागत नाहीये..सातवी नंतर तालूक्याच्या शाळेत जाणारे आपले विद्ध्यार्थी दुसर्या मुलांपेक्षा मागे पडत आहेत, त्याचे खापर शिक्षक स्टाफवर फोडले जाते, तरी तुम्ही फक्त सहावी आणी सातवीच्या वर्गालाच शिकवा, बाकीचे वर्ग आम्ही बघतो"
"होय नक्कीच गुरुजी, तुम्ही म्हणाल तसं " श्रीधरने मान हलवली.
"तुमची राहण्याची सोय करतो गावात, एकटेच आहात की कुटुंब पण आहे सोबत"
"कुटुंब? नाही गुरुजी, मी एकटाच आहे"
"तुमची राहण्याची सोय करतो गावात, एकटेच आहात की कुटुंब पण आहे सोबत"
"कुटुंब? नाही गुरुजी, मी एकटाच आहे"
"तेवढं तरी बरं झालं, तुम्हाला तर माहितच असेल सरकारी कारभार, दोन दोन महिने पगार होत नाही शिक्षकांचा, आणी अख्खे कुटुंब सांभाळायचे म्हणल्यावर खूप अडचणी येतात, उदाहरणार्थ आमच्या कडेच पाहून घ्या." पाटील बळेच हसत म्हणाले.😊
आणखी थोडावेळ आवश्यक ती माहिती देऊन नंतर पाटील गुरूजी श्रीधरला घेऊन सहावीच्या वर्गात गेले.
"तर मुलांनो हे आहेत तुमचे नवीन वर्गशिक्षक, चला ह्यांना नमस्कार करा"
मुलांनी नमस्कार करताच पाटील श्रीधरला उद्देशून म्हणाले,
"तर मुलांनो हे आहेत तुमचे नवीन वर्गशिक्षक, चला ह्यांना नमस्कार करा"
मुलांनी नमस्कार करताच पाटील श्रीधरला उद्देशून म्हणाले,
"आता शाळा सुटेलच तासाभरात, तरी आजचा दिवस वर्गपरिचय करून घ्या तुम्ही, मी जातो चौथीच्या वर्गाला गृहपाठ देऊन येतो"
पाटील गेल्यानंतर श्रीधरने एकदा संपूर्ण वर्गभर नजर फिरवली, एकुन पस्तीस च्या आसपास मुले- मुली वर्गात होते, सगळेजन कुतुहलाने त्यांच्या नवीन शिक्षकाकडे पाहत होते.
"नमस्कार, माझे नाव श्रीधर सावंत, आता मला तुम्हा एकेकाची ओळख करुन द्या पाहू" खणखणीत आवाजात श्रीधर म्हणाला..
लगेच एका एका विद्यार्थ्याने क्रमाने उभे राहत आपापले पुर्ण नाव सांगितले.
लगेच एका एका विद्यार्थ्याने क्रमाने उभे राहत आपापले पुर्ण नाव सांगितले.
"खूप छान..आता मी तुमच्यापैकीच एकाची वर्गाचा मॉनिटर म्हणून निवड करणार आहे, म्हणजे माझ्या गैरहाजिरी मध्ये तो वर्गावर लक्ष ठेवेल, वाचन, अभ्यास करून घेईल , आणी जो कोणी ऐकत नसेल, विनाकारण दूसर्यांच्या खोड्या करत असेल त्याचे नाव नंतर मला सांगेल, तर मला सांगा तुमच्यापैकी कोणाची ईच्छा आहे मॉनिटर बनण्याची"
"मी मंजिरी देशमुख, मला मॉनिटर बनायचे आहे..मागच्या वार्षिक परीक्षेत माझा पहिला नंबर आला होता"☝️
मुली़च्या ओळीतील पहिल्या बेंचवर बसलेल्या एका मुलीने उभे राहत आत्मविश्वासाने सांगितले.
मुली़च्या ओळीतील पहिल्या बेंचवर बसलेल्या एका मुलीने उभे राहत आत्मविश्वासाने सांगितले.
"अरे व्वा, ठिक आहे मग तु आजपासून ह्या वर्गाची मॉनिटर, आता मला सांग मंजिरी वर्गात सगळ्यात हुशार तर तु आहेस मग आपल्या वर्गात सगळ्यात ढ विध्यार्थी कोण आहे"
उत्तरादाखल मंजिरीने एका कोप-यात बोट दाखवले, मुलांच्या रांगेतील एका शेवटच्या बेंचवर एक मुलगा अवघडल्यासारखा बसलेला होता, श्रीधरने त्याला उभे राहायला सांगितले आणी कुतुहलाने पाहु लागला..
तो मुलगा त्याच्या जागेवर उभा राहिला त्याचे तोंड वाकडे झालेले दिसत होते, उजवा हात पिरगाळल्या सारखा वाकडा झालेला होता, चेहरा पुर्णपणे निस्तेज आणी सुकलेला होता, खोल गेलेले डोळे किलकिले करून तो समोर पाहत होता..

"नाव काय तुझे बाळ" श्रीधरने आपुलकीने विचारले.
"तो येडा रघ्या आहे" मुलांमधील कोणीतरी बोलले आणी सगळा वर्ग हसायला लागला..😆
श्रीधरला वाईट वाटले..त्याने मुलांना हसणार्या दटावले, आणी त्या उभ्या मुलाला नाव सांगण्यात सांगितले.
श्रीधरला वाईट वाटले..त्याने मुलांना हसणार्या दटावले, आणी त्या उभ्या मुलाला नाव सांगण्यात सांगितले.
"रघुनाथ..वा..वाघमारे" अडखळत त्या मुलाने त्याचे नाव सांगितले,
श्रीधर आणखी पुढे काही बोलायच्या आत शाळा सूटायची घंटा वाजली आणी सगळेजण वर्गाच्या बाहेर पळाले, सगळे मुले पळत बाहेर पडल्यानंतर रघू निवांतपणे उठला आणी एका पायाने थोडासा लंगडत वर्गाच्या बाहेर पडला.,🚶
संध्याकाळ झाल्यावर पाटील गुरूजींनी श्रीधरला गावात सरपंचाच्या वाड्यावर नेवून ओळख करून दिली..सरपंचाच्या त्या मोठ्या वाड्याच्या शेजारीच एक दोन खोल्यांचे ऐसपैस घर होते त्यामध्ये श्रीधरची राहण्याची व्यवस्था करण्यात आली..
"तुमच्या आधीचं 'देसाई मास्तर' ते पण तिथेच राहत होते, तुम्ही पण बिनधास राहा, काय लागलं सवरल तर मला सांगा, कामवाल्या शेवंताला सांगून सकाळीच घर साफ करून घेतलंय मी..तुमच्या रोजच्या दोन वेळच्या जेवणाच्या डब्याचबी सांगतो तिला "
सरपंच आनंदाने सांगत होते..
सरपंच आनंदाने सांगत होते..
एकूणच सगळी सोय उत्तम रित्या झाल्याने गावात येण्याआधी श्रीधरला जी थोडी धाकधूक होती ती आता सगळी निवळली होती, शाळेतील इतर शिक्षकवर्ग आणी गावातल्या लोकांच्या आदराथित्याने ने तो भारावून गेला..
###########
सकाळी हापशाच्या थंड पाण्याने अंघोळ वगैरे आटपून श्रीधर घराबाहेरील अंगणात अंगावरील जेमतेम कपडयांवर सुर्यनमस्कार व्यायाम करत होता, तेवढ्यात,
"मास्तर, चहा घ्या की"
हे नाजूक शब्द त्याच्या कानावर पडले, त्याने मान वळवून पाहिले, सव्वीस- सत्तावीस वर्षांची एक साडी नेसलेली तरुण स्त्री एका हातामध्ये चहाचा ग्लास आणी एका हातात जेवणाचा डबा घेऊन उभी होती, नीटनेटकी, गोरीपान आणी उठावदार.👩🦰

"तुम्ही कोण?" तिच्या हातातील चहा घेत श्रीधरने विचारले.
"मी शेवंता, सरपंचाच्या वाड्यावर काम करते"
"अच्छा तुम्ही आहात का? सरपंच बोलले होते काल तुमच्याबद्दल, आता हा सकाळचा चहा पण सरपंचांनी द्यायला सांगितला का?"
"त्यात सांगायला कशाला पायजे, गावात पाव्हण तुम्ही, तेबी एकटेच राहायला, मग तुम्हाला काय हवं नको ते बघायला नको का? तुमच्या आधी इथं राहणाऱ्या देसाई मास्तरांना पण काय हवं नको ते मीच पाहायचे"
शेवतांने तिच्या काळ्याभोर केसांच्या वेणीमधला गजरा पुढे घेत ठसक्यात उत्तर दिले.
शेवतांने तिच्या काळ्याभोर केसांच्या वेणीमधला गजरा पुढे घेत ठसक्यात उत्तर दिले.
"बरं धन्यवाद, तसा मी चहा घेत नाही, पण आता तुम्ही आणलाच आहे तर घेतो..वा..चहा तर एकदम मस्तच, बहुतेक दररोज सवय लावणार मला तुम्ही चहाची" ☕
"असं का? मग लावूनच घ्या आता तुम्ही सवय"
शेवतांने जेवणाचा डबा ओट्यावर ठेवला आणी ती चहाचा रिकामा ग्लास घेऊन तोर्यात निघून गेली..बाई स्वभावाने चंचल आणी मनमोकळी आहे हे श्रीधरला पहिल्या भेटीतच जाणवले होते.
शेवतांने जेवणाचा डबा ओट्यावर ठेवला आणी ती चहाचा रिकामा ग्लास घेऊन तोर्यात निघून गेली..बाई स्वभावाने चंचल आणी मनमोकळी आहे हे श्रीधरला पहिल्या भेटीतच जाणवले होते.
त्याने आता बाकी आवराआवर करत खांद्यावरील बॅग आणी छत्री घेऊन शाळा गाठली आणी कालच्या सहावीच्या वर्गासारखीच सातवीच्या वर्गाचीही ओळखपरेड करुन घेतली..हे दोन्ही वर्ग त्याच्या अखत्यारीत होते..
श्रीधर हा बाकी शिक्षकांपेक्षा काहिसा वेगळा होता,
शाळेतील इतर शिक्षक पाहिजे तेवढे हुशार नव्हते हे पुढील दोन तीन दिवसांतच त्याच्या लक्षात आले होते.. त्यामुळे त्याच्या अखत्यारीतील दोन्ही वर्गावर त्याला विशेष मेहनत घ्यावी लागत होती....फक्त अभ्यासच नाही तर इतरही कलागुणांमध्ये त्याचे विध्यार्थी पुढे असावेत असे त्याला वाटत होते..त्यामुळे प्रत्येक विध्यार्थ्यावर त्याची करडी नजर होती विशेष करुन अभ्यासात कमी असणाऱ्या मुलांवर जरा जास्तच,आणी त्याचबरोबर विचित्रपणे वागणार्या रघूवर सुद्धा..शिक्षक शिकवताना त्याचे लक्ष नेहमी भलतीकडेच असायचे, कधी वरचे छतांचे कवले मोजत राहायचा तर कधी खिडकीतून बाहेर एकटक पाहत राहायचा..

क्रमश..